MyDugsiStart learning

Surah Ash-Shu'ara in Marathi: translation and audio

Surah 26 · الشعراء · The Poets · 227 verses

Surah Ash-Shu'ara verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Ash-Shu'ara word by word in English.

Verse 1

طسٓمٓ

Transliteration tta-seen-meem

Marathi १. ता - सीन - मीम.

Verse 2

تِلْكَ ءَايَـٰتُ ٱلْكِتَـٰبِ ٱلْمُبِينِ

Transliteration til'ka āyātu l-kitābi l-mubīni

Marathi २. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत.

Verse 3

لَعَلَّكَ بَـٰخِعٌ نَّفْسَكَ أَلَّا يَكُونُوا۟ مُؤْمِنِينَ

Transliteration laʿallaka bākhiʿun nafsaka allā yakūnū mu'minīna

Marathi ३. त्यांनी ईमान न राखल्याबद्दल कदाचित तुम्ही आपला जीव सोडाल.

Verse 4

إِن نَّشَأْ نُنَزِّلْ عَلَيْهِم مِّنَ ٱلسَّمَآءِ ءَايَةً فَظَلَّتْ أَعْنَـٰقُهُمْ لَهَا خَـٰضِعِينَ

Transliteration in nasha nunazzil ʿalayhim mina l-samāi āyatan faẓallat aʿnāquhum lahā khāḍiʿīna

Marathi ४. जर आम्ही इच्छिले असते तर त्यांच्यावर आकाशातून एखादी अशी निशाणी अवतरित केली असती की जिच्यासमोर त्यांच्या माना झुकल्या असत्या.

Verse 5

وَمَا يَأْتِيهِم مِّن ذِكْرٍ مِّنَ ٱلرَّحْمَـٰنِ مُحْدَثٍ إِلَّا كَانُوا۟ عَنْهُ مُعْرِضِينَ

Transliteration wamā yatīhim min dhik'rin mina l-raḥmāni muḥ'dathin illā kānū ʿanhu muʿ'riḍīna

Marathi ५. आणि त्यांच्याजवळ रहमान (दयावान अल्लाह) कडून जे देखील नवे बोध- उपदेश आले, त्याकडून तोंड फिरविणारे बनले.

Verse 6

فَقَدْ كَذَّبُوا۟ فَسَيَأْتِيهِمْ أَنۢبَـٰٓؤُا۟ مَا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ

Transliteration faqad kadhabū fasayatīhim anbāu mā kānū bihi yastahziūna

Marathi ६. त्या लोकांनी खोटे ठरविले आहे, आता लवकरच त्यांच्याजवळ, त्या गोष्टीची वार्ता येऊन पोहचेल, जिची ते थट्टा उडवित आहेत.

Verse 7

أَوَلَمْ يَرَوْا۟ إِلَى ٱلْأَرْضِ كَمْ أَنۢبَتْنَا فِيهَا مِن كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ

Transliteration awalam yaraw ilā l-arḍi kam anbatnā fīhā min kulli zawjin karīmin

Marathi ७. काय त्यांनी जमिनीकडे नाही पाहिले की आम्ही तिच्यात प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या कितीतरी उगविल्या आहेत.

Verse 8

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi ८. निःसंशय त्यात मोठी निशाणी आहे, तथापि त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणार नाहीत.

Verse 9

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi ९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता वर्चस्वशाली आणि दयावान आहे.

Verse 10

وَإِذْ نَادَىٰ رَبُّكَ مُوسَىٰٓ أَنِ ٱئْتِ ٱلْقَوْمَ ٱلظَّـٰلِمِينَ

Transliteration wa-idh nādā rabbuka mūsā ani i'ti l-qawma l-ẓālimīna

Marathi १०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने मूसाला पुकारले की तू अत्याचारी जनसमूहाजवळ जा.

Verse 11

قَوْمَ فِرْعَوْنَ ۚ أَلَا يَتَّقُونَ

Transliteration qawma fir'ʿawna alā yattaqūna

Marathi ११. फिरऔनच्या जनसमूहाजवळ. काय ते सदाचरण करणार नाहीत?

Verse 12

قَالَ رَبِّ إِنِّىٓ أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ

Transliteration qāla rabbi innī akhāfu an yukadhibūni

Marathi १२. मूसा म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला तर भय वाटते की कदाचित त्यांनी मला खोटे (न) ठरवावे.

Verse 13

وَيَضِيقُ صَدْرِى وَلَا يَنطَلِقُ لِسَانِى فَأَرْسِلْ إِلَىٰ هَـٰرُونَ

Transliteration wayaḍīqu ṣadrī walā yanṭaliqu lisānī fa-arsil ilā hārūna

Marathi १३. आणि माझी छाती (हृदय) संकुचित होत आहे. माझी जीभ वळत नाही यास्तव तू हारूनकडेही वहयी (प्रकाशना) पाठव.

Verse 14

وَلَهُمْ عَلَىَّ ذَنۢبٌ فَأَخَافُ أَن يَقْتُلُونِ

Transliteration walahum ʿalayya dhanbun fa-akhāfu an yaqtulūni

Marathi १४. आणि त्यांचा माझ्यावर, माझ्या एका चुकीचा (दावा) ही आहे. मला भय वाटते की कदाचित त्यांनी माझी हत्या न करून टाकावी.

Verse 15

قَالَ كَلَّا ۖ فَٱذْهَبَا بِـَٔايَـٰتِنَآ ۖ إِنَّا مَعَكُم مُّسْتَمِعُونَ

Transliteration qāla kallā fa-idh'habā biāyātinā innā maʿakum mus'tamiʿūna

Marathi १५. (अल्लाहने) फर्माविले, असे कदापि होणार नाही. थुम्ही दोघे आमच्या निशाण्यांसह जा. आम्ही स्वतः ऐकणारे तुमच्या सोबतीला आहोत.

Verse 16

فَأْتِيَا فِرْعَوْنَ فَقُولَآ إِنَّا رَسُولُ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration fatiyā fir'ʿawna faqūlā innā rasūlu rabbi l-ʿālamīna

Marathi १६. तुम्ही दोघे फिरऔनजवळ जाऊन सांगा की निःसंशय आम्ही साऱ्या जगाच्या पालनकर्त्यातर्फे पाठविलेले आहोत.

Verse 17

أَنْ أَرْسِلْ مَعَنَا بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ

Transliteration an arsil maʿanā banī is'rāīla

Marathi १७. की तू आमच्यासोबत इस्राईलच्या संततीला पाठव.

Verse 18

قَالَ أَلَمْ نُرَبِّكَ فِينَا وَلِيدًا وَلَبِثْتَ فِينَا مِنْ عُمُرِكَ سِنِينَ

Transliteration qāla alam nurabbika fīnā walīdan walabith'ta fīnā min ʿumurika sinīna

Marathi १८. (फिरऔन) म्हणाला, काय आम्ही तुझे, तुझ्या बालपणात आपल्या येथे पालनपोषण केले नव्हते? आणि तू आपल्या वयाची (आयूष्याची) अनेक वर्षे आमच्यात नाही काढलीत?

Verse 19

وَفَعَلْتَ فَعْلَتَكَ ٱلَّتِى فَعَلْتَ وَأَنتَ مِنَ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration wafaʿalta faʿlataka allatī faʿalta wa-anta mina l-kāfirīna

Marathi १९. आणि नंतर तू जे आपले काम केले ते केले आणि तू कृतघ्न लोकांपैकी आहेस.

Verse 20

قَالَ فَعَلْتُهَآ إِذًا وَأَنَا۠ مِنَ ٱلضَّآلِّينَ

Transliteration qāla faʿaltuhā idhan wa-anā mina l-ḍālīna

Marathi २०. (मूसा) म्हणाले, मी हे काम अशा वेळी केले जेव्हा मी वाट चुकलेल्या लोकांपैकी होतो.

Verse 21

فَفَرَرْتُ مِنكُمْ لَمَّا خِفْتُكُمْ فَوَهَبَ لِى رَبِّى حُكْمًا وَجَعَلَنِى مِنَ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration fafarartu minkum lammā khif'tukum fawahaba lī rabbī ḥuk'man wajaʿalanī mina l-mur'salīna

Marathi २१. नंतर मी तुमच्या दहशतीमुळे तुमच्यापासून पळालो, मग मला माझ्या पालनकर्त्याने आदेश व ज्ञान प्रदान केले आणि मला आपल्या पैगंबरांपैकी केले.

Verse 22

وَتِلْكَ نِعْمَةٌ تَمُنُّهَا عَلَىَّ أَنْ عَبَّدتَّ بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ

Transliteration watil'ka niʿ'matun tamunnuhā ʿalayya an ʿabbadtta banī is'rāīla

Marathi २२. आणि काय माझ्यावर तुझा हाच तो उपकार आहे? जो तू जाहीर करीत आहेस की तू इस्राईलच्या संततीला गुलाम बनवून ठेवले आहे.

Verse 23

قَالَ فِرْعَوْنُ وَمَا رَبُّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration qāla fir'ʿawnu wamā rabbu l-ʿālamīna

Marathi २३. फिरऔन म्हणाला की सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता काय आहे?

Verse 24

قَالَ رَبُّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَآ ۖ إِن كُنتُم مُّوقِنِينَ

Transliteration qāla rabbu l-samāwāti wal-arḍi wamā baynahumā in kuntum mūqinīna

Marathi २४. (हजरत मूसा) म्हणाले, तो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंचा स्वामी व पालनकर्ता आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल.

Verse 25

قَالَ لِمَنْ حَوْلَهُۥٓ أَلَا تَسْتَمِعُونَ

Transliteration qāla liman ḥawlahu alā tastamiʿūna

Marathi २५. (फिरऔन) आपल्या निकटच्या लोकांना म्हणाला, काय तुम्ही ऐकत नाही?

Verse 26

قَالَ رَبُّكُمْ وَرَبُّ ءَابَآئِكُمُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration qāla rabbukum warabbu ābāikumu l-awalīna

Marathi २६. (हजरत मूसा) म्हणाले, तो तुमचा आणि तुमच्या पूर्वजांचाही स्वामी व पालनकर्ता आहे.

Verse 27

قَالَ إِنَّ رَسُولَكُمُ ٱلَّذِىٓ أُرْسِلَ إِلَيْكُمْ لَمَجْنُونٌ

Transliteration qāla inna rasūlakumu alladhī ur'sila ilaykum lamajnūnun

Marathi २७. (फिरऔन) म्हणाला, (लोकांनो) तुमचा हा पैगंबर, जो तुमच्याकडे पाठविला गेला आहे, हा तर अगदीच वेडा आहे.

Verse 28

قَالَ رَبُّ ٱلْمَشْرِقِ وَٱلْمَغْرِبِ وَمَا بَيْنَهُمَآ ۖ إِن كُنتُمْ تَعْقِلُونَ

Transliteration qāla rabbu l-mashriqi wal-maghribi wamā baynahumā in kuntum taʿqilūna

Marathi २८. (हजरत मूसा) म्हणाले, तोच पूर्व आणि पश्चिमेचा आणि त्याच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंचा पालनकर्ता आहे, जर तुम्ही अक्कल बाळगत असाल.

Verse 29

قَالَ لَئِنِ ٱتَّخَذْتَ إِلَـٰهًا غَيْرِى لَأَجْعَلَنَّكَ مِنَ ٱلْمَسْجُونِينَ

Transliteration qāla la-ini ittakhadhta ilāhan ghayrī la-ajʿalannaka mina l-masjūnīna

Marathi २९. (फिरऔन) म्हणाला, खबरदार जर तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला उपास्य बनविले तर मी तुला कैद करून टाकीन.

Verse 30

قَالَ أَوَلَوْ جِئْتُكَ بِشَىْءٍ مُّبِينٍ

Transliteration qāla awalaw ji'tuka bishayin mubīnin

Marathi ३०. (मूसा) म्हणाले, मी तुझ्याजवळ एखादी स्पष्ट वस्तू घेऊन आल्यावरही?

Verse 31

قَالَ فَأْتِ بِهِۦٓ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ

Transliteration qāla fati bihi in kunta mina l-ṣādiqīna

Marathi ३१. (फिरऔन) म्हणाला, जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर ती सादर कर.

Verse 32

فَأَلْقَىٰ عَصَاهُ فَإِذَا هِىَ ثُعْبَانٌ مُّبِينٌ

Transliteration fa-alqā ʿaṣāhu fa-idhā hiya thuʿ'bānun mubīnun

Marathi ३२. त्यांनी (त्याच वेळी) आपली काठी खाली टाकली ती अचानक उघड उघड (फार मोठा) अजगर बनली.

Verse 33

وَنَزَعَ يَدَهُۥ فَإِذَا هِىَ بَيْضَآءُ لِلنَّـٰظِرِينَ

Transliteration wanazaʿa yadahu fa-idhā hiya bayḍāu lilnnāẓirīna

Marathi ३३. आणि आपला हात बाहेर काढला तर तो देखील त्याच क्षणी पाहणाऱ्यांना शुभ्र प्रकाशमय दिसू लागला.

Verse 34

قَالَ لِلْمَلَإِ حَوْلَهُۥٓ إِنَّ هَـٰذَا لَسَـٰحِرٌ عَلِيمٌ

Transliteration qāla lil'mala-i ḥawlahu inna hādhā lasāḥirun ʿalīmun

Marathi ३४. (फिरऔन) आपल्या जवळच्या सरदारांना म्हणू लागला की हा तर फार मोठा निष्णात जादूगार आहे.

Verse 35

يُرِيدُ أَن يُخْرِجَكُم مِّنْ أَرْضِكُم بِسِحْرِهِۦ فَمَاذَا تَأْمُرُونَ

Transliteration yurīdu an yukh'rijakum min arḍikum bisiḥ'rihi famādhā tamurūna

Marathi ३५. हा तर असे इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या भूमीतून बाहेर काढावे. सांगा, आता तुम्ही काय सल्ला देता?

Verse 36

قَالُوٓا۟ أَرْجِهْ وَأَخَاهُ وَٱبْعَثْ فِى ٱلْمَدَآئِنِ حَـٰشِرِينَ

Transliteration qālū arjih wa-akhāhu wa-ib'ʿath fī l-madāini ḥāshirīna

Marathi ३६. ते सर्व म्हणाले, तुम्ही याला आणि याच्या भावाला सवड द्या आणि सर्व शहरांमध्ये (लोकांना) एकत्र करणारे पाठवा.

Verse 37

يَأْتُوكَ بِكُلِّ سَحَّارٍ عَلِيمٍ

Transliteration yatūka bikulli saḥḥārin ʿalīmin

Marathi ३७. ज्यांनी तुमच्याजवळ निष्णात जादूगारांना घेऊन यावे.

Verse 38

فَجُمِعَ ٱلسَّحَرَةُ لِمِيقَـٰتِ يَوْمٍ مَّعْلُومٍ

Transliteration fajumiʿa l-saḥaratu limīqāti yawmin maʿlūmin

Marathi ३८. मग एका निर्धारित दिवसाच्या वेळी सर्व जादूगार एकत्रित केले गेले.

Verse 39

وَقِيلَ لِلنَّاسِ هَلْ أَنتُم مُّجْتَمِعُونَ

Transliteration waqīla lilnnāsi hal antum muj'tamiʿūna

Marathi ३९. आणि सर्वसामान्य लोकांनाही सांगितले गेले की तुम्ही देखील जमा व्हाल.

Verse 40

لَعَلَّنَا نَتَّبِعُ ٱلسَّحَرَةَ إِن كَانُوا۟ هُمُ ٱلْغَـٰلِبِينَ

Transliteration laʿallanā nattabiʿu l-saḥarata in kānū humu l-ghālibīna

Marathi ४०. यासाठी की जर जादूगार प्रभावी ठरले तर आम्ही त्यांचेच अनुसरण करू.

Verse 41

فَلَمَّا جَآءَ ٱلسَّحَرَةُ قَالُوا۟ لِفِرْعَوْنَ أَئِنَّ لَنَا لَأَجْرًا إِن كُنَّا نَحْنُ ٱلْغَـٰلِبِينَ

Transliteration falammā jāa l-saḥaratu qālū lifir'ʿawna a-inna lanā la-ajran in kunnā naḥnu l-ghālibīna

Marathi ४१. जादूगार येऊन फिरऔनला म्हणू लागले की जर आम्ही जिंकलो तर आम्हाला काही बक्षीस वगैरे मिळेल ना!

Verse 42

قَالَ نَعَمْ وَإِنَّكُمْ إِذًا لَّمِنَ ٱلْمُقَرَّبِينَ

Transliteration qāla naʿam wa-innakum idhan lamina l-muqarabīna

Marathi ४२. (फिरऔन) म्हणाला, होय! (मोठ्या खुशीने) किंबहुना अशा परिस्थितीत तुम्ही माझे खास दरबारी व्हाल.

Verse 43

قَالَ لَهُم مُّوسَىٰٓ أَلْقُوا۟ مَآ أَنتُم مُّلْقُونَ

Transliteration qāla lahum mūsā alqū mā antum mul'qūna

Marathi ४३. (हजरत) मूसा जादूगारांना म्हणाले, जे काय तुम्हाला टाकायचे आहे, ते टाका.

Verse 44

فَأَلْقَوْا۟ حِبَالَهُمْ وَعِصِيَّهُمْ وَقَالُوا۟ بِعِزَّةِ فِرْعَوْنَ إِنَّا لَنَحْنُ ٱلْغَـٰلِبُونَ

Transliteration fa-alqaw ḥibālahum waʿiṣiyyahum waqālū biʿizzati fir'ʿawna innā lanaḥnu l-ghālibūna

Marathi ४४. त्यांनी आपल्या दोऱ्या आणि काठ्या खाली टाकल्या आणि म्हणाले, फिरऔनच्या प्रतिष्ठेची शपथ, आम्ही अवश्य विजयी होऊ.

Verse 45

فَأَلْقَىٰ مُوسَىٰ عَصَاهُ فَإِذَا هِىَ تَلْقَفُ مَا يَأْفِكُونَ

Transliteration fa-alqā mūsā ʿaṣāhu fa-idhā hiya talqafu mā yafikūna

Marathi ४५. आता (हजरत) मूसा यांनीही आपली काठी खाली टाकली, जिने त्याच क्षणी त्यांचा असत्याचा बनविलेला खेळ गिळायला सुरुवात केली.

Verse 46

فَأُلْقِىَ ٱلسَّحَرَةُ سَـٰجِدِينَ

Transliteration fa-ul'qiya l-saḥaratu sājidīna

Marathi ४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले.

Verse 47

قَالُوٓا۟ ءَامَنَّا بِرَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration qālū āmannā birabbi l-ʿālamīna

Marathi ४७. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तर सर्व विश्वाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले.

Verse 48

رَبِّ مُوسَىٰ وَهَـٰرُونَ

Transliteration rabbi mūsā wahārūna

Marathi ४८. अर्थात मूसा आणि हारूनच्या पालनकर्त्यावर.

Verse 49

قَالَ ءَامَنتُمْ لَهُۥ قَبْلَ أَنْ ءَاذَنَ لَكُمْ ۖ إِنَّهُۥ لَكَبِيرُكُمُ ٱلَّذِى عَلَّمَكُمُ ٱلسِّحْرَ فَلَسَوْفَ تَعْلَمُونَ ۚ لَأُقَطِّعَنَّ أَيْدِيَكُمْ وَأَرْجُلَكُم مِّنْ خِلَـٰفٍ وَلَأُصَلِّبَنَّكُمْ أَجْمَعِينَ

Transliteration qāla āmantum lahu qabla an ādhana lakum innahu lakabīrukumu alladhī ʿallamakumu l-siḥ'ra falasawfa taʿlamūna la-uqaṭṭiʿanna aydiyakum wa-arjulakum min khilāfin wala-uṣallibannakum ajmaʿīna

Marathi ४९. (फिरऔन) म्हणाला, माझी परवानगी घेण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले, निश्चितच हा तुमचा सरदार (मोठा गुरू) आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकवली आहे. तेव्हा तुम्हाला अत्ताच माहीत पडेल. शपथ आहे. मी देखील तुमचे हात पाय विरूद्ध दिशांनी कापून टाकीन आणि तुम्हा सर्वांना फासावर लटकवीन.

Verse 50

قَالُوا۟ لَا ضَيْرَ ۖ إِنَّآ إِلَىٰ رَبِّنَا مُنقَلِبُونَ

Transliteration qālū lā ḍayra innā ilā rabbinā munqalibūna

Marathi ५०. ते म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही तर आपल्या पालनकर्त्याकडे परतून जाणारच आहोत.

Verse 51

إِنَّا نَطْمَعُ أَن يَغْفِرَ لَنَا رَبُّنَا خَطَـٰيَـٰنَآ أَن كُنَّآ أَوَّلَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration innā naṭmaʿu an yaghfira lanā rabbunā khaṭāyānā an kunnā awwala l-mu'minīna

Marathi ५१. या कारणास्तव की आम्ही सर्वांत प्रथम ईमान राखणारे बनलो आहोत, आम्ही आशा बाळगतो की आमचा स्वामी व पालनकर्ता आमच्या सर्व चुका माफ करील.

Verse 52

۞ وَأَوْحَيْنَآ إِلَىٰ مُوسَىٰٓ أَنْ أَسْرِ بِعِبَادِىٓ إِنَّكُم مُّتَّبَعُونَ

Transliteration wa-awḥaynā ilā mūsā an asri biʿibādī innakum muttabaʿūna

Marathi ५२. आणि आम्ही मूसावर वहयी (प्रकाशना) केली की रात्रीच्या रात्री माझ्या दासांना घेऊन निघा. तुम्हा सर्वांचा पाठलाग केला जाईल.

Verse 53

فَأَرْسَلَ فِرْعَوْنُ فِى ٱلْمَدَآئِنِ حَـٰشِرِينَ

Transliteration fa-arsala fir'ʿawnu fī l-madāini ḥāshirīna

Marathi ५३. फिरऔनने शहरांमध्ये जमा करणाऱ्यांना पाठविले.

Verse 54

إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ لَشِرْذِمَةٌ قَلِيلُونَ

Transliteration inna hāulāi lashir'dhimatun qalīlūna

Marathi ५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे.

Verse 55

وَإِنَّهُمْ لَنَا لَغَآئِظُونَ

Transliteration wa-innahum lanā laghāiẓūna

Marathi ५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत.

Verse 56

وَإِنَّا لَجَمِيعٌ حَـٰذِرُونَ

Transliteration wa-innā lajamīʿun ḥādhirūna

Marathi ५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे.

Verse 57

فَأَخْرَجْنَـٰهُم مِّن جَنَّـٰتٍ وَعُيُونٍ

Transliteration fa-akhrajnāhum min jannātin waʿuyūnin

Marathi ५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले.

Verse 58

وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ

Transliteration wakunūzin wamaqāmin karīmin

Marathi ५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून.

Verse 59

كَذَٰلِكَ وَأَوْرَثْنَـٰهَا بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ

Transliteration kadhālika wa-awrathnāhā banī is'rāīla

Marathi ५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले.

Verse 60

فَأَتْبَعُوهُم مُّشْرِقِينَ

Transliteration fa-atbaʿūhum mush'riqīna

Marathi ६०. यास्तव फिरऔनचे अनुयायी सूर्य उगवताच त्यांचा पाठलाग करण्यास निघाले.

Verse 61

فَلَمَّا تَرَٰٓءَا ٱلْجَمْعَانِ قَالَ أَصْحَـٰبُ مُوسَىٰٓ إِنَّا لَمُدْرَكُونَ

Transliteration falammā tarāā l-jamʿāni qāla aṣḥābu mūsā innā lamud'rakūna

Marathi ६१. यासाठी जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिले तेव्हा मूसाचे साथीदार म्हणाले, आम्ही तर खात्रीने पकडीत आलो.

Verse 62

قَالَ كَلَّآ ۖ إِنَّ مَعِىَ رَبِّى سَيَهْدِينِ

Transliteration qāla kallā inna maʿiya rabbī sayahdīni

Marathi ६२. (हजरत मूसा) म्हणाले, कदापि नाही. विश्वास राखा, माझा रब (पालनकर्ता) माझ्या सोबतीला आहे. जो जरूर मला मार्ग दाखविल.

Verse 63

فَأَوْحَيْنَآ إِلَىٰ مُوسَىٰٓ أَنِ ٱضْرِب بِّعَصَاكَ ٱلْبَحْرَ ۖ فَٱنفَلَقَ فَكَانَ كُلُّ فِرْقٍ كَٱلطَّوْدِ ٱلْعَظِيمِ

Transliteration fa-awḥaynā ilā mūsā ani iḍ'rib biʿaṣāka l-baḥra fa-infalaqa fakāna kullu fir'qin kal-ṭawdi l-ʿaẓīmi

Marathi ६३. आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की समुद्राच्या पाण्यावर आपल्या काठीचा प्रहार करा तेव्हा त्याच क्षणी समुद्र दुभंगला आणि प्रत्येक हिस्सा पाण्याच्या मोठ्या पर्वताइतका झाला.

Verse 64

وَأَزْلَفْنَا ثَمَّ ٱلْـَٔاخَرِينَ

Transliteration wa-azlafnā thamma l-ākharīna

Marathi ६४. आणि आम्ही त्याच ठिकाणी दुसऱ्यांना जवळ आणून उभे केले.

Verse 65

وَأَنجَيْنَا مُوسَىٰ وَمَن مَّعَهُۥٓ أَجْمَعِينَ

Transliteration wa-anjaynā mūsā waman maʿahu ajmaʿīna

Marathi ६५. आणि मूसा आणि त्यांच्या सर्व साथीदारांना मुक्ती प्रदान केली.

Verse 66

ثُمَّ أَغْرَقْنَا ٱلْـَٔاخَرِينَ

Transliteration thumma aghraqnā l-ākharīna

Marathi ६६. मग इतर सर्वांना बुडवून टाकले.

Verse 67

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi ६७. निःसंशय, यात फार मोठा बोध आहे आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नाहीत.

Verse 68

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi ६८. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा वर्चस्वशाली आणि दया करणारा आहे.

Verse 69

وَٱتْلُ عَلَيْهِمْ نَبَأَ إِبْرَٰهِيمَ

Transliteration wa-ut'lu ʿalayhim naba-a ib'rāhīma

Marathi ६९. आणि त्यांना इब्राहीमचा वृत्तांतही ऐकवा.

Verse 70

إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِۦ مَا تَعْبُدُونَ

Transliteration idh qāla li-abīhi waqawmihi mā taʿbudūna

Marathi ७०. जेव्हा त्यांनी आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना फर्माविले की तुम्ही कोणाची उपासना करता?

Verse 71

قَالُوا۟ نَعْبُدُ أَصْنَامًا فَنَظَلُّ لَهَا عَـٰكِفِينَ

Transliteration qālū naʿbudu aṣnāman fanaẓallu lahā ʿākifīna

Marathi ७१. त्यांनी उत्तर दिले की आम्ही मूर्तींची उपासना करतो. आम्ही तर सतत त्यांचे उपासक बनून बसलो आहोत.

Verse 72

قَالَ هَلْ يَسْمَعُونَكُمْ إِذْ تَدْعُونَ

Transliteration qāla hal yasmaʿūnakum idh tadʿūna

Marathi ७२. पैगंबर (इब्राहीम अलै.) यांनी विचारले, जेव्हा तुम्ही यांना पुकारता तेव्हा काय ते ऐकतातही?

Verse 73

أَوْ يَنفَعُونَكُمْ أَوْ يَضُرُّونَ

Transliteration aw yanfaʿūnakum aw yaḍurrūna

Marathi ७३. किंवा तुम्हाला नफा - नुकसानही पोहचवू शकतात?

Verse 74

قَالُوا۟ بَلْ وَجَدْنَآ ءَابَآءَنَا كَذَٰلِكَ يَفْعَلُونَ

Transliteration qālū bal wajadnā ābāanā kadhālika yafʿalūna

Marathi ७४. ते म्हणाले, हे (सर्व आम्ही नाही जाणत) आम्हाला तर आमचे पूर्वज असेच करताना आढळले आहेत.

Verse 75

قَالَ أَفَرَءَيْتُم مَّا كُنتُمْ تَعْبُدُونَ

Transliteration qāla afara-aytum mā kuntum taʿbudūna

Marathi ७५. (इब्राहीम) म्हणाले, त्यांना काही जाणता, ज्यांची तुम्ही पूजा करीत आहात?

Verse 76

أَنتُمْ وَءَابَآؤُكُمُ ٱلْأَقْدَمُونَ

Transliteration antum waābāukumu l-aqdamūna

Marathi ७६. तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील.

Verse 77

فَإِنَّهُمْ عَدُوٌّ لِّىٓ إِلَّا رَبَّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration fa-innahum ʿaduwwun lī illā rabba l-ʿālamīna

Marathi ७७. ते सर्व माझे शत्रू आहेत, त्या सच्चा अल्लाहखेरीज, जो सर्व विश्वाचा पालनकर्ता आहे.

Verse 78

ٱلَّذِى خَلَقَنِى فَهُوَ يَهْدِينِ

Transliteration alladhī khalaqanī fahuwa yahdīni

Marathi ७८. ज्याने मला निर्माण केले आणि तोच मला मार्गदर्शन करतो.

Verse 79

وَٱلَّذِى هُوَ يُطْعِمُنِى وَيَسْقِينِ

Transliteration wa-alladhī huwa yuṭ'ʿimunī wayasqīni

Marathi ७९. तोच आहे जो मला खाऊ-पिऊ घालतो.

Verse 80

وَإِذَا مَرِضْتُ فَهُوَ يَشْفِينِ

Transliteration wa-idhā mariḍ'tu fahuwa yashfīni

Marathi ८०. तसेच जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तो मला स्वास्थ्य प्रदान करतो.

Verse 81

وَٱلَّذِى يُمِيتُنِى ثُمَّ يُحْيِينِ

Transliteration wa-alladhī yumītunī thumma yuḥ'yīni

Marathi ८१. आणि तोच मला मृत्यु देईल आणि मग पुन्हा जिवंत करील.

Verse 82

وَٱلَّذِىٓ أَطْمَعُ أَن يَغْفِرَ لِى خَطِيٓـَٔتِى يَوْمَ ٱلدِّينِ

Transliteration wa-alladhī aṭmaʿu an yaghfira lī khaṭīatī yawma l-dīni

Marathi ८२. आणि ज्याच्याकडून आशा बाळगतो की तो मोबदला दिला जाण्याच्या दिवशी माझे अपराध माफ करील.

Verse 83

رَبِّ هَبْ لِى حُكْمًا وَأَلْحِقْنِى بِٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration rabbi hab lī ḥuk'man wa-alḥiq'nī bil-ṣāliḥīna

Marathi ८३. हे माझ्या पालनकर्त्या! मला हिकमत (बुद्धी कौशल्य) प्रदान कर आणि मला नेक- सदाचारी लोकांमध्ये सामील कर.

Verse 84

وَٱجْعَل لِّى لِسَانَ صِدْقٍ فِى ٱلْـَٔاخِرِينَ

Transliteration wa-ij'ʿal lī lisāna ṣid'qin fī l-ākhirīna

Marathi ८४. आणि माझे पवित्र - स्मरण (भविष्यात) येणाऱ्या लोकांमध्येही बाकी ठेव.

Verse 85

وَٱجْعَلْنِى مِن وَرَثَةِ جَنَّةِ ٱلنَّعِيمِ

Transliteration wa-ij'ʿalnī min warathati jannati l-naʿīmi

Marathi ८५. आणि मला सुखांनी भरलेल्या जन्नतच्या वारसांपैकी बनव.

Verse 86

وَٱغْفِرْ لِأَبِىٓ إِنَّهُۥ كَانَ مِنَ ٱلضَّآلِّينَ

Transliteration wa-igh'fir li-abī innahu kāna mina l-ḍālīna

Marathi ८६. आणि माझ्या पित्यास क्षमा कर. निःसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता.

Verse 87

وَلَا تُخْزِنِى يَوْمَ يُبْعَثُونَ

Transliteration walā tukh'zinī yawma yub'ʿathūna

Marathi ८७. आणि ज्या दिवशी लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील, मला अपमानित करू नकोस.

Verse 88

يَوْمَ لَا يَنفَعُ مَالٌ وَلَا بَنُونَ

Transliteration yawma lā yanfaʿu mālun walā banūna

Marathi ८८. ज्या दिवशी धन-संपत्ती आणि संतती काहीच उपयोगी पडणार नाही.

Verse 89

إِلَّا مَنْ أَتَى ٱللَّهَ بِقَلْبٍ سَلِيمٍ

Transliteration illā man atā l-laha biqalbin salīmin

Marathi ८९. परंतु (लाभान्वित तोच ठरेल) जो अल्लाहसमोर व्यंगविरहित हृदय नेईल.

Verse 90

وَأُزْلِفَتِ ٱلْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ

Transliteration wa-uz'lifati l-janatu lil'muttaqīna

Marathi ९०. आणि नेक सदाचारी लोकांकरिता जन्नतला अगदी जवळ आणले जाईल.

Verse 91

وَبُرِّزَتِ ٱلْجَحِيمُ لِلْغَاوِينَ

Transliteration waburrizati l-jaḥīmu lil'ghāwīna

Marathi ९१. आणि मार्गभ्रष्ट लोकांकरिता जहन्नम उघड केली जाईल.

Verse 92

وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ

Transliteration waqīla lahum ayna mā kuntum taʿbudūna

Marathi ९२. आणि त्यांना विचारले जाईल की तुम्ही ज्यांची उपासना करीत राहिले, ते कोठे आहेत?

Verse 93

مِن دُونِ ٱللَّهِ هَلْ يَنصُرُونَكُمْ أَوْ يَنتَصِرُونَ

Transliteration min dūni l-lahi hal yanṣurūnakum aw yantaṣirūna

Marathi ९३. जे सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीजचे होते. काय हे तुमची मदत करतात किंवा एखादा बदला घेऊ शकतात?

Verse 94

فَكُبْكِبُوا۟ فِيهَا هُمْ وَٱلْغَاوُۥنَ

Transliteration fakub'kibū fīhā hum wal-ghāwūna

Marathi ९४. यास्तव ते सर्व आणि समस्त मार्गभ्रष्ट लोक जहन्नममध्ये वर खाली फेकले जातील.

Verse 95

وَجُنُودُ إِبْلِيسَ أَجْمَعُونَ

Transliteration wajunūdu ib'līsa ajmaʿūna

Marathi ९५. आणि इब्लिस (सैताना) चे संपूर्ण सैन्यही.

Verse 96

قَالُوا۟ وَهُمْ فِيهَا يَخْتَصِمُونَ

Transliteration qālū wahum fīhā yakhtaṣimūna

Marathi ९६. तिथे ते आपसात भांडण - तंटा करीत म्हणतील,

Verse 97

تَٱللَّهِ إِن كُنَّا لَفِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ

Transliteration tal-lahi in kunnā lafī ḍalālin mubīnin

Marathi ९७. अल्लाहची शपथ! निःसंशय, आम्ही तर उघट अशा चुकींवर होतो.

Verse 98

إِذْ نُسَوِّيكُم بِرَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration idh nusawwīkum birabbi l-ʿālamīna

Marathi ९८. वास्तविक तुम्हाला सर्व विश्वाच्या पालनकर्त्यासमान समजत होतो.

Verse 99

وَمَآ أَضَلَّنَآ إِلَّا ٱلْمُجْرِمُونَ

Transliteration wamā aḍallanā illā l-muj'rimūna

Marathi ९९. आणि आम्हाला तर गुन्हेगारांखेरीज इतर कोणीही मार्गभ्रष्ट केले नव्हते.

Verse 100

فَمَا لَنَا مِن شَـٰفِعِينَ

Transliteration famā lanā min shāfiʿīna

Marathi १००. आता तर आमची कोणी शिफारस करणाराही नाही.

Verse 101

وَلَا صَدِيقٍ حَمِيمٍ

Transliteration walā ṣadīqin ḥamīmin

Marathi १०१. आणि ना एखादा (सच्चा) हितचिंतक मित्र.

Verse 102

فَلَوْ أَنَّ لَنَا كَرَّةً فَنَكُونَ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration falaw anna lanā karratan fanakūna mina l-mu'minīna

Marathi १०२. जर आम्हाला एक वेळ दुसऱ्यांदा जाण्याची संधी लाभली असती तर आम्ही पक्के सच्चे ईमानधारक बनलो असतो.

Verse 103

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १०३. निःसंशय, यात एक फार मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नाहीत.

Verse 104

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १०४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.

Verse 105

كَذَّبَتْ قَوْمُ نُوحٍ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration kadhabat qawmu nūḥin l-mur'salīna

Marathi १०५. नूहच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले.

Verse 106

إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ نُوحٌ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla lahum akhūhum nūḥun alā tattaqūna

Marathi १०६. जेव्हा त्यांचा भाऊ नूह यांनी सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत?

Verse 107

إِنِّى لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ

Transliteration innī lakum rasūlun amīnun

Marathi १०७. (ऐका!) मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे.

Verse 108

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १०८. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि माझे म्हणणे मान्य केले पाहिजे.

Verse 109

وَمَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā asalukum ʿalayhi min ajrin in ajriya illā ʿalā rabbi l-ʿālamīna

Marathi १०९. आणि मी तुमच्याकडून त्याबद्दल कोणताही मोबदला इच्छित नाही. माझा मोबदला तर केवळ सर्व विश्वांचा पालनकर्त्याजवळ आहे.

Verse 110

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi ११०. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.

Verse 111

۞ قَالُوٓا۟ أَنُؤْمِنُ لَكَ وَٱتَّبَعَكَ ٱلْأَرْذَلُونَ

Transliteration qālū anu'minu laka wa-ittabaʿaka l-ardhalūna

Marathi १११. (जनसमूहाने) उत्तर दिले की काय आम्ही तुमच्यावर ईमान राखावे? तुमचे आज्ञापालन करणारे तर हलक्या प्रतीचे लोक आहेत.

Verse 112

قَالَ وَمَا عِلْمِى بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration qāla wamā ʿil'mī bimā kānū yaʿmalūna

Marathi ११२. (नूह) म्हणाले, मला काय माहीत की पूर्वी ते काय करीत राहिलेत?

Verse 113

إِنْ حِسَابُهُمْ إِلَّا عَلَىٰ رَبِّى ۖ لَوْ تَشْعُرُونَ

Transliteration in ḥisābuhum illā ʿalā rabbī law tashʿurūna

Marathi ११३. त्यांच्या हिशोबाची जबाबदारी तर माझ्या पालनकर्त्यावर आहे. जर समज बाळगत असाल.

Verse 114

وَمَآ أَنَا۠ بِطَارِدِ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration wamā anā biṭāridi l-mu'minīna

Marathi ११४. आणि मी ईमान राखणाऱ्यांना धक्के देणारा (झिडकारणारा) नाही.

Verse 115

إِنْ أَنَا۠ إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ

Transliteration in anā illā nadhīrun mubīnun

Marathi ११५. मी तर स्पष्टतः खबरदार करणारा आहे.

Verse 116

قَالُوا۟ لَئِن لَّمْ تَنتَهِ يَـٰنُوحُ لَتَكُونَنَّ مِنَ ٱلْمَرْجُومِينَ

Transliteration qālū la-in lam tantahi yānūḥu latakūnanna mina l-marjūmīna

Marathi ११६. ते म्हणाले, हे नूह! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला दगडांचा मारा करून ठार केले जाईल.

Verse 117

قَالَ رَبِّ إِنَّ قَوْمِى كَذَّبُونِ

Transliteration qāla rabbi inna qawmī kadhabūni

Marathi ११७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्या जनसमूहाच्या लोकांनी मला खोटे ठरविले.

Verse 118

فَٱفْتَحْ بَيْنِى وَبَيْنَهُمْ فَتْحًا وَنَجِّنِى وَمَن مَّعِىَ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration fa-if'taḥ baynī wabaynahum fatḥan wanajjinī waman maʿiya mina l-mu'minīna

Marathi ११८. तेव्हा तू, माझ्या आणि त्यांच्या दरम्यान निश्चितच फैसला कर, आणि मला व माझ्या ईमानधारक साथीदारांना मुक्ती प्रदान कर.

Verse 119

فَأَنجَيْنَـٰهُ وَمَن مَّعَهُۥ فِى ٱلْفُلْكِ ٱلْمَشْحُونِ

Transliteration fa-anjaynāhu waman maʿahu fī l-ful'ki l-mashḥūni

Marathi ११९. यास्तव आम्ही त्याला आणि त्याच्या साथीदारांना भरलेल्या नौकेत (स्वार करून) सुटका प्रदान केली.

Verse 120

ثُمَّ أَغْرَقْنَا بَعْدُ ٱلْبَاقِينَ

Transliteration thumma aghraqnā baʿdu l-bāqīna

Marathi १२०. मग त्यानंतर बाकीच्या सर्व लोकांना आम्ही बुडवून टाकले.

Verse 121

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १२१. निःसंशय, यात मोठा बोध आहे परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हतेच.

Verse 122

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे.

Verse 123

كَذَّبَتْ عَادٌ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration kadhabat ʿādun l-mur'salīna

Marathi १२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले.

Verse 124

إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ هُودٌ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla lahum akhūhum hūdun alā tattaqūna

Marathi १२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत.

Verse 125

إِنِّى لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ

Transliteration innī lakum rasūlun amīnun

Marathi १२५. मी तुमचा विश्वस्त पैगंबर (संदेशवाहक) आहे.

Verse 126

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १२६. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा.

Verse 127

وَمَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā asalukum ʿalayhi min ajrin in ajriya illā ʿalā rabbi l-ʿālamīna

Marathi १२७. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही, माझे पारिश्रमिक (मोबदला) तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याजवळ आहे.

Verse 128

أَتَبْنُونَ بِكُلِّ رِيعٍ ءَايَةً تَعْبَثُونَ

Transliteration atabnūna bikulli rīʿin āyatan taʿbathūna

Marathi १२८. काय तुम्ही प्रत्येक उंच स्थानावर खेळस्वरूप करमणुकीचे चिन्ह (स्मारक) बनवित आहात?

Verse 129

وَتَتَّخِذُونَ مَصَانِعَ لَعَلَّكُمْ تَخْلُدُونَ

Transliteration watattakhidhūna maṣāniʿa laʿallakum takhludūna

Marathi १२९. आणि मोठ्या उद्योगाचे (मजबूत महाल निर्माण) करीत आहात, जणू काही तुम्ही सदैवकाळ इथेच राहाल.

Verse 130

وَإِذَا بَطَشْتُم بَطَشْتُمْ جَبَّارِينَ

Transliteration wa-idhā baṭashtum baṭashtum jabbārīna

Marathi १३०. आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता, तेव्हा मोठ्या कठोरपणे पकडता.

Verse 131

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १३१. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा,

Verse 132

وَٱتَّقُوا۟ ٱلَّذِىٓ أَمَدَّكُم بِمَا تَعْلَمُونَ

Transliteration wa-ittaqū alladhī amaddakum bimā taʿlamūna

Marathi १३२. आणि त्याचे भय बाळगा, ज्याने त्या गोष्टीद्वारे तुमची मदत केली, ज्यांना तुम्ही जाणता.

Verse 133

أَمَدَّكُم بِأَنْعَـٰمٍ وَبَنِينَ

Transliteration amaddakum bi-anʿāmin wabanīna

Marathi १३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे.

Verse 134

وَجَنَّـٰتٍ وَعُيُونٍ

Transliteration wajannātin waʿuyūnin

Marathi १३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे.

Verse 135

إِنِّىٓ أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ

Transliteration innī akhāfu ʿalaykum ʿadhāba yawmin ʿaẓīmin

Marathi १३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते.

Verse 136

قَالُوا۟ سَوَآءٌ عَلَيْنَآ أَوَعَظْتَ أَمْ لَمْ تَكُن مِّنَ ٱلْوَٰعِظِينَ

Transliteration qālū sawāon ʿalaynā awaʿaẓta am lam takun mina l-wāʿiẓīna

Marathi १३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे.

Verse 137

إِنْ هَـٰذَآ إِلَّا خُلُقُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration in hādhā illā khuluqu l-awalīna

Marathi १३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे.

Verse 138

وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ

Transliteration wamā naḥnu bimuʿadhabīna

Marathi १३८. आणि आम्ही कदापि शिक्षा- यातना प्राप्त करणाऱ्यांपैकी असणार नाही.

Verse 139

فَكَذَّبُوهُ فَأَهْلَكْنَـٰهُمْ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration fakadhabūhu fa-ahlaknāhum inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १३९. ज्याअर्थी ‘आद’ जनसमूहाच्या लोकांनी (हजरत) हूद यांना खोटे ठरविले यासाठी आम्ही त्यांना नष्ट केले. निःसंशय, यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक ईमान राखणारे नव्हते.

Verse 140

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १४०. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.

Verse 141

كَذَّبَتْ ثَمُودُ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration kadhabat thamūdu l-mur'salīna

Marathi १४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले.

Verse 142

إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَـٰلِحٌ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla lahum akhūhum ṣāliḥun alā tattaqūna

Marathi १४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही?

Verse 143

إِنِّى لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ

Transliteration innī lakum rasūlun amīnun

Marathi १४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे.

Verse 144

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.

Verse 145

وَمَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā asalukum ʿalayhi min ajrin in ajriya illā ʿalā rabbi l-ʿālamīna

Marathi १४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे.

Verse 146

أَتُتْرَكُونَ فِى مَا هَـٰهُنَآ ءَامِنِينَ

Transliteration atut'rakūna fī mā hāhunā āminīna

Marathi १४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल?

Verse 147

فِى جَنَّـٰتٍ وَعُيُونٍ

Transliteration fī jannātin waʿuyūnin

Marathi १४७. अर्थात त्या बागांमध्ये आणि त्या झऱ्यांमध्ये.

Verse 148

وَزُرُوعٍ وَنَخْلٍ طَلْعُهَا هَضِيمٌ

Transliteration wazurūʿin wanakhlin ṭalʿuhā haḍīmun

Marathi १४८. आणि त्या शेतांमध्ये आणि त्या खजुरींच्या बागांमध्ये ज्यांचे घोस (भार वाढल्याने) तुटून पडतात.

Verse 149

وَتَنْحِتُونَ مِنَ ٱلْجِبَالِ بُيُوتًا فَـٰرِهِينَ

Transliteration watanḥitūna mina l-jibāli buyūtan fārihīna

Marathi १४९. आणि तुम्ही पर्वतांना कोरून आकर्षक (सुंदर) इमारती निर्माण करता.

Verse 150

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १५०. यास्तव अल्लाहचे भय राखा आणि माझे अनुसरण करा.

Verse 151

وَلَا تُطِيعُوٓا۟ أَمْرَ ٱلْمُسْرِفِينَ

Transliteration walā tuṭīʿū amra l-mus'rifīna

Marathi १५१. आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांचे अनुसरण करण्यापासुन थांबा .

Verse 152

ٱلَّذِينَ يُفْسِدُونَ فِى ٱلْأَرْضِ وَلَا يُصْلِحُونَ

Transliteration alladhīna yuf'sidūna fī l-arḍi walā yuṣ'liḥūna

Marathi १५२. जे धरतीत फसाद (उत्पात) पसरवित आहेत आणि सुधारणा करीत नाही.

Verse 153

قَالُوٓا۟ إِنَّمَآ أَنتَ مِنَ ٱلْمُسَحَّرِينَ

Transliteration qālū innamā anta mina l-musaḥarīna

Marathi १५३. ते म्हणाले, तू तर अशा लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला गेला आहे.

Verse 154

مَآ أَنتَ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا فَأْتِ بِـَٔايَةٍ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ

Transliteration mā anta illā basharun mith'lunā fati biāyatin in kunta mina l-ṣādiqīna

Marathi १५४. तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जर तू सच्चा लोकांपैकी आहेस तर एखादा मोजिजा (ईशचमत्कार) घेऊन ये.

Verse 155

قَالَ هَـٰذِهِۦ نَاقَةٌ لَّهَا شِرْبٌ وَلَكُمْ شِرْبُ يَوْمٍ مَّعْلُومٍ

Transliteration qāla hādhihi nāqatun lahā shir'bun walakum shir'bu yawmin maʿlūmin

Marathi १५५. (स्वालेह) म्हणाले, ही सांडणी आहे. पाणी प्यायची एक पाळी हिची, आणि एका निर्धारित दिवशी पाणी पिण्याची पाळी तुमची.

Verse 156

وَلَا تَمَسُّوهَا بِسُوٓءٍ فَيَأْخُذَكُمْ عَذَابُ يَوْمٍ عَظِيمٍ

Transliteration walā tamassūhā bisūin fayakhudhakum ʿadhābu yawmin ʿaẓīmin

Marathi १५६. (आणि खबरदार!) हिला वाईट हेतुने हात लावू नका, अन्यथा एका मोठ्या दिवसाची शिक्षा- यातना तुम्हाला येऊन धरेल.

Verse 157

فَعَقَرُوهَا فَأَصْبَحُوا۟ نَـٰدِمِينَ

Transliteration faʿaqarūhā fa-aṣbaḥū nādimīna

Marathi १५७. तरीही त्यांनी तिचे हात पाय कापून टाकले, नंतर पश्चात्ताप करणारे झाले.

Verse 158

فَأَخَذَهُمُ ٱلْعَذَابُ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration fa-akhadhahumu l-ʿadhābu inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १५८. तेव्हा अज़ाब (अल्लाहच्या शिक्षा- यातने) ने त्यांना येऊन धरले. निःसंशय, यात मोठी शिकवण (बोध) आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते.

Verse 159

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १५९. आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे.

Verse 160

كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration kadhabat qawmu lūṭin l-mur'salīna

Marathi १६०. लूतच्या जनसमूहानेही पैगंबरांना खोटे ठरविले.

Verse 161

إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ لُوطٌ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla lahum akhūhum lūṭun alā tattaqūna

Marathi १६१. जेव्हा त्यांचा भाऊ लूत यांनी त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत?

Verse 162

إِنِّى لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ

Transliteration innī lakum rasūlun amīnun

Marathi १६२. मी तुमच्याकडे विश्वस्त रसूल (पैगंबर) आहे.

Verse 163

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १६३. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा.

Verse 164

وَمَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā asalukum ʿalayhi min ajrin in ajriya illā ʿalā rabbi l-ʿālamīna

Marathi १६४. आणि मी तुमच्याकडून याबद्दल कोणताही मोबदला मागत नाही, माझ्या मोबदल्याची जबाबदारी केवळ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यावर आहे.

Verse 165

أَتَأْتُونَ ٱلذُّكْرَانَ مِنَ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration atatūna l-dhuk'rāna mina l-ʿālamīna

Marathi १६५. काय तुम्ही जगातल्या लोकांपैकी पुरुषांजवळ जाता?

Verse 166

وَتَذَرُونَ مَا خَلَقَ لَكُمْ رَبُّكُم مِّنْ أَزْوَٰجِكُم ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ عَادُونَ

Transliteration watadharūna mā khalaqa lakum rabbukum min azwājikum bal antum qawmun ʿādūna

Marathi १६६. आणि तुमच्या ज्या स्त्रियांना अल्लाहने तुमची पत्नी बनविले आहे त्यांना सोडून देता, खरी गोष्ट अशी की तुम्ही आहातच मर्यादा ओलांडणारे.

Verse 167

قَالُوا۟ لَئِن لَّمْ تَنتَهِ يَـٰلُوطُ لَتَكُونَنَّ مِنَ ٱلْمُخْرَجِينَ

Transliteration qālū la-in lam tantahi yālūṭu latakūnanna mina l-mukh'rajīna

Marathi १६७. (त्यांना) उत्तर दिले की हे लूत! जर तू हे थांबवले नाहीस तर अवश्य तुला बाहेर काढले जाईल.

Verse 168

قَالَ إِنِّى لِعَمَلِكُم مِّنَ ٱلْقَالِينَ

Transliteration qāla innī liʿamalikum mina l-qālīna

Marathi १६८. (लूत) म्हणाले, मी तुमच्या आचरणाने अगदी अप्रसन्न आहे.

Verse 169

رَبِّ نَجِّنِى وَأَهْلِى مِمَّا يَعْمَلُونَ

Transliteration rabbi najjinī wa-ahlī mimmā yaʿmalūna

Marathi १६९. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या कुटुंबाला या (कुकर्मा) पासून वाचव, जे हे करीत आहेत.

Verse 170

فَنَجَّيْنَـٰهُ وَأَهْلَهُۥٓ أَجْمَعِينَ

Transliteration fanajjaynāhu wa-ahlahu ajmaʿīna

Marathi १७०. यास्तव आम्ही त्यांना आणि त्यांच्याशी संबंध (नाते) असलेल्या सर्वांना वाचविले.

Verse 171

إِلَّا عَجُوزًا فِى ٱلْغَـٰبِرِينَ

Transliteration illā ʿajūzan fī l-ghābirīna

Marathi १७१. एका वृद्ध स्त्रीखेरीज की ती मागे राहणाऱ्यांपैकी झाली.

Verse 172

ثُمَّ دَمَّرْنَا ٱلْـَٔاخَرِينَ

Transliteration thumma dammarnā l-ākharīna

Marathi १७२. मग आम्ही इतर सर्वांना नष्ट करून टाकले.

Verse 173

وَأَمْطَرْنَا عَلَيْهِم مَّطَرًا ۖ فَسَآءَ مَطَرُ ٱلْمُنذَرِينَ

Transliteration wa-amṭarnā ʿalayhim maṭaran fasāa maṭaru l-mundharīna

Marathi १७३. आणि आम्ही त्यांच्यावर एक खास प्रकारचा पाऊस पाडला. तो मोठा वाईट पाऊस होता, जो खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर पडला.

Verse 174

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १७४. निःसंशय, यातही मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी अधिकांश लोक ईमान राखणारे नव्हते.

Verse 175

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १७५. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दया करणारा आहे.

Verse 176

كَذَّبَ أَصْحَـٰبُ لْـَٔيْكَةِ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration kadhaba aṣḥābu al'aykati l-mur'salīna

Marathi १७६. एयकावाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले.

Verse 177

إِذْ قَالَ لَهُمْ شُعَيْبٌ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla lahum shuʿaybun alā tattaqūna

Marathi १७७. जेव्हा (पैगंबर) शुऐब त्यांना म्हणाले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत?

Verse 178

إِنِّى لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ

Transliteration innī lakum rasūlun amīnun

Marathi १७८. मी तुमच्याकडे विश्वस्त पैगंबर आहे.

Verse 179

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

Transliteration fa-ittaqū l-laha wa-aṭīʿūni

Marathi १७९. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा, आणि माझे आज्ञापालन करा.

Verse 180

وَمَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā asalukum ʿalayhi min ajrin in ajriya illā ʿalā rabbi l-ʿālamīna

Marathi १८०. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा करीत नाही. माझ्या मोबदल्याची जबाबदारी तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्यार आहे.

Verse 181

۞ أَوْفُوا۟ ٱلْكَيْلَ وَلَا تَكُونُوا۟ مِنَ ٱلْمُخْسِرِينَ

Transliteration awfū l-kayla walā takūnū mina l-mukh'sirīna

Marathi १८१. माप - तोल पुरेपूर करा आणि कमी देणाऱ्यांमध्ये सामील होऊ नका.

Verse 182

وَزِنُوا۟ بِٱلْقِسْطَاسِ ٱلْمُسْتَقِيمِ

Transliteration wazinū bil-qis'ṭāsi l-mus'taqīmi

Marathi १८२. आणि सरळ (उचित) तराजूने तोल करून द्या.

Verse 183

وَلَا تَبْخَسُوا۟ ٱلنَّاسَ أَشْيَآءَهُمْ وَلَا تَعْثَوْا۟ فِى ٱلْأَرْضِ مُفْسِدِينَ

Transliteration walā tabkhasū l-nāsa ashyāahum walā taʿthaw fī l-arḍi muf'sidīna

Marathi १८३. आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी करून देऊ नका आणि (निर्भय होऊन) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित फिरू नका.

Verse 184

وَٱتَّقُوا۟ ٱلَّذِى خَلَقَكُمْ وَٱلْجِبِلَّةَ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration wa-ittaqū alladhī khalaqakum wal-jibilata l-awalīna

Marathi १८४. आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याने स्वतः तुम्हाला आणि पूर्वीच्या निर्मितीला निर्माण केले.

Verse 185

قَالُوٓا۟ إِنَّمَآ أَنتَ مِنَ ٱلْمُسَحَّرِينَ

Transliteration qālū innamā anta mina l-musaḥarīna

Marathi १८५. (ते) म्हणाले, तू तर त्या लोकांपैकी आहेस, ज्यांच्यावर जादूटोणा केला जातो.

Verse 186

وَمَآ أَنتَ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا وَإِن نَّظُنُّكَ لَمِنَ ٱلْكَـٰذِبِينَ

Transliteration wamā anta illā basharun mith'lunā wa-in naẓunnuka lamina l-kādhibīna

Marathi १८६. आणि तू तर आमच्यासारखाच एक मनुष्य आहे आणि आम्ही तर तुला खोटे बोलणाऱ्यांपैकीच समजतो.

Verse 187

فَأَسْقِطْ عَلَيْنَا كِسَفًا مِّنَ ٱلسَّمَآءِ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ

Transliteration fa-asqiṭ ʿalaynā kisafan mina l-samāi in kunta mina l-ṣādiqīna

Marathi १८७. जर तुम्ही सच्चा लोकांपैकी असाल तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा कोसळवा.

Verse 188

قَالَ رَبِّىٓ أَعْلَمُ بِمَا تَعْمَلُونَ

Transliteration qāla rabbī aʿlamu bimā taʿmalūna

Marathi १८८. पैगंबर म्हणाले की माझा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणणारा आहे, जे काही तुम्ही करीत आहात.

Verse 189

فَكَذَّبُوهُ فَأَخَذَهُمْ عَذَابُ يَوْمِ ٱلظُّلَّةِ ۚ إِنَّهُۥ كَانَ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ

Transliteration fakadhabūhu fa-akhadhahum ʿadhābu yawmi l-ẓulati innahu kāna ʿadhāba yawmin ʿaẓīmin

Marathi १८९. यास्तव त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा त्यांना सावलीवाल्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा- यातने) ने धरले. तो मोठ्या भयंकर दिवसाचा अज़ाब होता.

Verse 190

إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ

Transliteration inna fī dhālika laāyatan wamā kāna aktharuhum mu'minīna

Marathi १९०. निःसंशय, त्यात मोठी निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हते.

Verse 191

وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration wa-inna rabbaka lahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi १९१. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ताच वर्चस्वशाली, दयावान आहे.

Verse 192

وَإِنَّهُۥ لَتَنزِيلُ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wa-innahu latanzīlu rabbi l-ʿālamīna

Marathi १९२. आणि निःसंशय हा (कुरआन) सर्व विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केला आहे.

Verse 193

نَزَلَ بِهِ ٱلرُّوحُ ٱلْأَمِينُ

Transliteration nazala bihi l-rūḥu l-amīnu

Marathi १९३. यास विश्वस्त फरिश्ता (जिब्रील) घेऊन आला आहे.

Verse 194

عَلَىٰ قَلْبِكَ لِتَكُونَ مِنَ ٱلْمُنذِرِينَ

Transliteration ʿalā qalbika litakūna mina l-mundhirīna

Marathi १९४. तुमच्या हृदयावर (अवतरला आहे) यासाठी की तुम्ही (लोकांना) खबरदार करणाऱ्यांपैकी व्हावे.

Verse 195

بِلِسَانٍ عَرَبِىٍّ مُّبِينٍ

Transliteration bilisānin ʿarabiyyin mubīnin

Marathi १९५. स्पष्ट अरबी भाषेत आहे.

Verse 196

وَإِنَّهُۥ لَفِى زُبُرِ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration wa-innahu lafī zuburi l-awalīna

Marathi १९६. आणि पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांच्या ग्रंथांमध्येही या (कुरआन) ची चर्चा आहे.१

Verse 197

أَوَلَمْ يَكُن لَّهُمْ ءَايَةً أَن يَعْلَمَهُۥ عُلَمَـٰٓؤُا۟ بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ

Transliteration awalam yakun lahum āyatan an yaʿlamahu ʿulamāu banī is'rāīla

Marathi १९७. काय त्यांच्यासाठी ही निशाणी पुरेशी नाही की (कुरआनच्या सत्यतेला) इस्राईलच्या संततीचे विद्वानही जाणतात.

Verse 198

وَلَوْ نَزَّلْنَـٰهُ عَلَىٰ بَعْضِ ٱلْأَعْجَمِينَ

Transliteration walaw nazzalnāhu ʿalā baʿḍi l-aʿjamīna

Marathi १९८. आणि जर आम्ही याला (अरबी भाषेऐवजी) अन्य एखाद्या भाषेच्या व्यक्तीवर अवतरित केले असते.

Verse 199

فَقَرَأَهُۥ عَلَيْهِم مَّا كَانُوا۟ بِهِۦ مُؤْمِنِينَ

Transliteration faqara-ahu ʿalayhim mā kānū bihi mu'minīna

Marathi १९९. तर त्याने त्यांच्यासमोर याचे वाचन केले असते, पण यांनी त्यास मानले नसते.

Verse 200

كَذَٰلِكَ سَلَكْنَـٰهُ فِى قُلُوبِ ٱلْمُجْرِمِينَ

Transliteration kadhālika salaknāhu fī qulūbi l-muj'rimīna

Marathi २००. अशा प्रकारे आम्ही दुराचारी लोकांच्या मनात (इन्कार) दाखल केला आहे.

Verse 201

لَا يُؤْمِنُونَ بِهِۦ حَتَّىٰ يَرَوُا۟ ٱلْعَذَابَ ٱلْأَلِيمَ

Transliteration lā yu'minūna bihi ḥattā yarawū l-ʿadhāba l-alīma

Marathi २०१. ते जोपर्यंत दुःखदायक शिक्षा- यातना (स्वतः) पाहून घेत नाहीत. तो पर्यंत ईमान राखणार नाहीत.

Verse 202

فَيَأْتِيَهُم بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ

Transliteration fayatiyahum baghtatan wahum lā yashʿurūna

Marathi २०२. यास्तव तो (अज़ाब) अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना त्यांची कल्पना (अनुमान) देखील नसेल.

Verse 203

فَيَقُولُوا۟ هَلْ نَحْنُ مُنظَرُونَ

Transliteration fayaqūlū hal naḥnu munẓarūna

Marathi २०३. त्या वेळी म्हणतील, काय आम्हाला थोडा अवसर (संधी) दिला जाईल?

Verse 204

أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ

Transliteration afabiʿadhābinā yastaʿjilūna

Marathi २०४. तर काय हे आमच्या शिक्षा- यातनेकरिता घाई माजवित आहे?

Verse 205

أَفَرَءَيْتَ إِن مَّتَّعْنَـٰهُمْ سِنِينَ

Transliteration afara-ayta in mattaʿnāhum sinīna

Marathi २०५. बरे, हे सांगा की जर आम्ही त्यांना वर्षानुवर्षे फायदा उचलू दिला,

Verse 206

ثُمَّ جَآءَهُم مَّا كَانُوا۟ يُوعَدُونَ

Transliteration thumma jāahum mā kānū yūʿadūna

Marathi २०६. मग त्यांना तो (अज़ाब) येऊन पोहोचला, ज्या विषयी त्यांना भय दाखवले जात होते.

Verse 207

مَآ أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يُمَتَّعُونَ

Transliteration mā aghnā ʿanhum mā kānū yumattaʿūna

Marathi २०७. तर जे काही फायदे त्यांना पोहोचविले जात राहिले, त्यापैकी काहीही त्यांना उपयोग पडू शकणार नाही.

Verse 208

وَمَآ أَهْلَكْنَا مِن قَرْيَةٍ إِلَّا لَهَا مُنذِرُونَ

Transliteration wamā ahlaknā min qaryatin illā lahā mundhirūna

Marathi २०८. आणि आम्ही कोणत्याही वस्तीला नष्ट केले नाही, परंतु अशाच स्थितीत की तिच्यासाठी खबरदार करणारे होते.

Verse 209

ذِكْرَىٰ وَمَا كُنَّا ظَـٰلِمِينَ

Transliteration dhik'rā wamā kunnā ẓālimīna

Marathi २०९. बोध (उपदेशा) च्या स्वरूपात आणि आम्ही अत्याचार करणार नाही.१

Verse 210

وَمَا تَنَزَّلَتْ بِهِ ٱلشَّيَـٰطِينُ

Transliteration wamā tanazzalat bihi l-shayāṭīnu

Marathi २१०. आणि या (कुरआन) ला सैतान घेऊन आले नाहीत.

Verse 211

وَمَا يَنۢبَغِى لَهُمْ وَمَا يَسْتَطِيعُونَ

Transliteration wamā yanbaghī lahum wamā yastaṭīʿūna

Marathi २११. आणि ना ते याच्या योग्य आहेत, ना त्यांना याचे सामर्थ्य आहे.

Verse 212

إِنَّهُمْ عَنِ ٱلسَّمْعِ لَمَعْزُولُونَ

Transliteration innahum ʿani l-samʿi lamaʿzūlūna

Marathi २१२. किंबहुना ते तर ऐकण्यापासूनही वंचित केले गेले आहेत.

Verse 213

فَلَا تَدْعُ مَعَ ٱللَّهِ إِلَـٰهًا ءَاخَرَ فَتَكُونَ مِنَ ٱلْمُعَذَّبِينَ

Transliteration falā tadʿu maʿa l-lahi ilāhan ākhara fatakūna mina l-muʿadhabīna

Marathi २१३. यास्तव तुम्ही अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या आराध्य दैवताला पुकारू नका अन्यथा तुम्हीही शिक्षा प्राप्त करणाऱ्यांपैकी व्हाल.

Verse 214

وَأَنذِرْ عَشِيرَتَكَ ٱلْأَقْرَبِينَ

Transliteration wa-andhir ʿashīrataka l-aqrabīna

Marathi २१४. आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना (अल्लाहचे) भय दाखवा.

Verse 215

وَٱخْفِضْ جَنَاحَكَ لِمَنِ ٱتَّبَعَكَ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration wa-ikh'fiḍ janāḥaka limani ittabaʿaka mina l-mu'minīna

Marathi २१५. आणि त्यांच्याशी नरमीने वागा, जो कोणी ईमानधारक होऊन तुमच्या अधीन होईल.

Verse 216

فَإِنْ عَصَوْكَ فَقُلْ إِنِّى بَرِىٓءٌ مِّمَّا تَعْمَلُونَ

Transliteration fa-in ʿaṣawka faqul innī barīon mimmā taʿmalūna

Marathi २१६. जर हे लोक तुमची अवज्ञा करतील तर तुम्ही ऐलान करा की तुम्ही जे काही करीत आहात मी त्यापासून अलिप्त आहे.

Verse 217

وَتَوَكَّلْ عَلَى ٱلْعَزِيزِ ٱلرَّحِيمِ

Transliteration watawakkal ʿalā l-ʿazīzi l-raḥīmi

Marathi २१७. आणि आपला पूर्ण भरोसा त्यावर राखा जो वर्चस्वशाली, दयावान आहे.

Verse 218

ٱلَّذِى يَرَىٰكَ حِينَ تَقُومُ

Transliteration alladhī yarāka ḥīna taqūmu

Marathi २१८. जो तुम्हाला पाहत असतो, जेव्हा तुम्ही (नमाजसाठी) उभे राहता.

Verse 219

وَتَقَلُّبَكَ فِى ٱلسَّـٰجِدِينَ

Transliteration wataqallubaka fī l-sājidīna

Marathi २१९. आणि सजदा करणाऱ्यांमध्ये तुमचे हिंडणे फिरणेही.

Verse 220

إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ

Transliteration innahu huwa l-samīʿu l-ʿalīmu

Marathi २२०. निःसंशय तो (अल्लाह) मोठा ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे.

Verse 221

هَلْ أُنَبِّئُكُمْ عَلَىٰ مَن تَنَزَّلُ ٱلشَّيَـٰطِينُ

Transliteration hal unabbi-ukum ʿalā man tanazzalu l-shayāṭīnu

Marathi २२१. काय मी तुम्हाला सांगू की सैतान कोणावर उतरतात?

Verse 222

تَنَزَّلُ عَلَىٰ كُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٍ

Transliteration tanazzalu ʿalā kulli affākin athīmin

Marathi २२२. ते प्रत्येक खोट्या, दुराचारीवर उतरतात.

Verse 223

يُلْقُونَ ٱلسَّمْعَ وَأَكْثَرُهُمْ كَـٰذِبُونَ

Transliteration yul'qūna l-samʿa wa-aktharuhum kādhibūna

Marathi २२३. ते (वरवर) ऐकलेली गोष्ट पोहचवितात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे आहेत.

Verse 224

وَٱلشُّعَرَآءُ يَتَّبِعُهُمُ ٱلْغَاوُۥنَ

Transliteration wal-shuʿarāu yattabiʿuhumu l-ghāwūna

Marathi २२४. आणि कवींचे अनुसरण तेच लोक करतात, जे पथभ्रष्ट असावेत.

Verse 225

أَلَمْ تَرَ أَنَّهُمْ فِى كُلِّ وَادٍ يَهِيمُونَ

Transliteration alam tara annahum fī kulli wādin yahīmūna

Marathi २२५. काय तुम्ही नाही पाहिले की कवी दरी - दरीत डोके आपटत फिरतात.

Verse 226

وَأَنَّهُمْ يَقُولُونَ مَا لَا يَفْعَلُونَ

Transliteration wa-annahum yaqūlūna mā lā yafʿalūna

Marathi २२६. आणि ते जे म्हणतात ते करत नाहीत.

Verse 227

إِلَّا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَذَكَرُوا۟ ٱللَّهَ كَثِيرًا وَٱنتَصَرُوا۟ مِنۢ بَعْدِ مَا ظُلِمُوا۟ ۗ وَسَيَعْلَمُ ٱلَّذِينَ ظَلَمُوٓا۟ أَىَّ مُنقَلَبٍ يَنقَلِبُونَ

Transliteration illā alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti wadhakarū l-laha kathīran wa-intaṣarū min baʿdi mā ẓulimū wasayaʿlamu alladhīna ẓalamū ayya munqalabin yanqalibūna

Marathi २२७. त्यांच्याखेरीज ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केलीत आणि मोठ्या संख्येने अल्लाहची प्रशंसा (नामःस्मरण) करीत राहिले आणि आपण अत्याचारपीडित असल्यानंतर सूड घेतला, आणि ज्यांनी अत्याचार केला आहे ते देखील लवकरच जाणून घेतील की कोणत्या कुशीवर उलटतात.

Read Surah Ash-Shu'ara in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.