Surah Ya-Sin in Marathi: translation and audio
Surah 36 · يس · Ya Sin · 83 verses
Surah Ya-Sin verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Ya-Sin word by word in English.
Verse 1
يسٓ
Transliteration ya-seen
Marathi १. यासीन *
Verse 2
وَٱلْقُرْءَانِ ٱلْحَكِيمِ
Transliteration wal-qur'āni l-ḥakīmi
Marathi २. शपथ आहे बुद्धी-कौशल्ययुक्त (आणि मजबूत) कुरआनाची.
Verse 3
إِنَّكَ لَمِنَ ٱلْمُرْسَلِينَ
Transliteration innaka lamina l-mur'salīna
Marathi ३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात.
Verse 4
عَلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration ʿalā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi ४. सरळ मार्गावर आहात.
Verse 5
تَنزِيلَ ٱلْعَزِيزِ ٱلرَّحِيمِ
Transliteration tanzīla l-ʿazīzi l-raḥīmi
Marathi ५. (हा कुरआन, अल्लाह) जबरदस्त, मोठ्या दया करणाऱ्यातर्फे अवतरित केला गेला आहे.
Verse 6
لِتُنذِرَ قَوْمًا مَّآ أُنذِرَ ءَابَآؤُهُمْ فَهُمْ غَـٰفِلُونَ
Transliteration litundhira qawman mā undhira ābāuhum fahum ghāfilūna
Marathi ६. यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्या वाडवडिलांना खबरदार केले गेले नव्हते. यास्तव ते गफलतीत पडले आहेत.
Verse 7
لَقَدْ حَقَّ ٱلْقَوْلُ عَلَىٰٓ أَكْثَرِهِمْ فَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration laqad ḥaqqa l-qawlu ʿalā aktharihim fahum lā yu'minūna
Marathi ७. त्यांच्यापैकी अधिकांश लोकांबाबत ही गोष्ट साबित झाली आहे. यास्तव हे लोक ईमान राखणार नाहीत.
Verse 8
إِنَّا جَعَلْنَا فِىٓ أَعْنَـٰقِهِمْ أَغْلَـٰلًا فَهِىَ إِلَى ٱلْأَذْقَانِ فَهُم مُّقْمَحُونَ
Transliteration innā jaʿalnā fī aʿnāqihim aghlālan fahiya ilā l-adhqāni fahum muq'maḥūna
Marathi ८. आम्ही त्यांच्या मानांवर तौक (जोखंड) टाकले आहे, जे त्यांच्या हनुवटीपर्यंत आहे, ज्यामुळे त्यांची डोकी वर उठलेल्या स्थितीत आहेत.
Verse 9
وَجَعَلْنَا مِنۢ بَيْنِ أَيْدِيهِمْ سَدًّا وَمِنْ خَلْفِهِمْ سَدًّا فَأَغْشَيْنَـٰهُمْ فَهُمْ لَا يُبْصِرُونَ
Transliteration wajaʿalnā min bayni aydīhim saddan wamin khalfihim saddan fa-aghshaynāhum fahum lā yub'ṣirūna
Marathi ९. आणि आम्ही एक आड त्यांच्यासमोर उभा केला आणि एक आड त्यांच्या मागे उभा केला, ज्याद्वारे आम्ही त्यांना झाकून टाकले, तेव्हा ते पाहू शकत नाही.
Verse 10
وَسَوَآءٌ عَلَيْهِمْ ءَأَنذَرْتَهُمْ أَمْ لَمْ تُنذِرْهُمْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration wasawāon ʿalayhim a-andhartahum am lam tundhir'hum lā yu'minūna
Marathi १०. आणि त्यांच्या संदर्भात तुमचे भय दाखविणे किंवा न दाखविणे दोन्ही सारखेच आहे. हे ईमान बाळगणार नाहीत.
Verse 11
إِنَّمَا تُنذِرُ مَنِ ٱتَّبَعَ ٱلذِّكْرَ وَخَشِىَ ٱلرَّحْمَـٰنَ بِٱلْغَيْبِ ۖ فَبَشِّرْهُ بِمَغْفِرَةٍ وَأَجْرٍ كَرِيمٍ
Transliteration innamā tundhiru mani ittabaʿa l-dhik'ra wakhashiya l-raḥmāna bil-ghaybi fabashir'hu bimaghfiratin wa-ajrin karīmin
Marathi ११. तुम्ही केवळ अशाच माणसाला भय दाखवू शकता, जो उपदेशाचे अनुसरण करील आणि रहमान (अल्लाह) चे न पाहता भय बाळगेल, तेव्हा तुम्ही अशा माणसाला क्षमा आणि उत्तम मोबदला दिला जाण्याची खूशखबर ऐकवा.
Verse 12
إِنَّا نَحْنُ نُحْىِ ٱلْمَوْتَىٰ وَنَكْتُبُ مَا قَدَّمُوا۟ وَءَاثَـٰرَهُمْ ۚ وَكُلَّ شَىْءٍ أَحْصَيْنَـٰهُ فِىٓ إِمَامٍ مُّبِينٍ
Transliteration innā naḥnu nuḥ'yī l-mawtā wanaktubu mā qaddamū waāthārahum wakulla shayin aḥṣaynāhu fī imāmin mubīnin
Marathi १२. निःसंशय, आम्ही मृतांना जिवंत करू आणि आम्ही लिहित असतो जे कर्म देखील लोक पुढे पाठवितात आणि त्यांची ती कर्मेही, जी ते मागे सोडून जातात आणि प्रत्येक गोष्टीस आम्ही एका स्पष्ट ग्रंथात संकलित करून ठेवले आहे.
Verse 13
وَٱضْرِبْ لَهُم مَّثَلًا أَصْحَـٰبَ ٱلْقَرْيَةِ إِذْ جَآءَهَا ٱلْمُرْسَلُونَ
Transliteration wa-iḍ'rib lahum mathalan aṣḥāba l-qaryati idh jāahā l-mur'salūna
Marathi १३. आणि तुम्ही त्यांच्यासमोर एक उदाहरण (अर्थात एका) वस्तीवाल्यांचा किस्सा (त्या काळचा) सादर करा, जेव्हा त्या वस्तीत अनेक रसूल आले.
Verse 14
إِذْ أَرْسَلْنَآ إِلَيْهِمُ ٱثْنَيْنِ فَكَذَّبُوهُمَا فَعَزَّزْنَا بِثَالِثٍ فَقَالُوٓا۟ إِنَّآ إِلَيْكُم مُّرْسَلُونَ
Transliteration idh arsalnā ilayhimu ith'nayni fakadhabūhumā faʿazzaznā bithālithin faqālū innā ilaykum mur'salūna
Marathi १४. जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ दोन रसूल पाठविलेत, तेव्हा त्या लोकांनी (प्रथम) त्या दोघांना समर्थन दिले, तेव्हा ते तिघे म्हणाले, आम्ही तुमच्याकडे (पैगंबर बनवून) पाठविलो गेलो आहोत.
Verse 15
قَالُوا۟ مَآ أَنتُمْ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا وَمَآ أَنزَلَ ٱلرَّحْمَـٰنُ مِن شَىْءٍ إِنْ أَنتُمْ إِلَّا تَكْذِبُونَ
Transliteration qālū mā antum illā basharun mith'lunā wamā anzala l-raḥmānu min shayin in antum illā takdhibūna
Marathi १५. ते लोक म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच साधारण मनुष्य आहात आणि रहमान (दयावान) ने कोणतीही गोष्ट अवतरित केली नाही. तुम्ही केवळ खोटे बोलता.
Verse 16
قَالُوا۟ رَبُّنَا يَعْلَمُ إِنَّآ إِلَيْكُمْ لَمُرْسَلُونَ
Transliteration qālū rabbunā yaʿlamu innā ilaykum lamur'salūna
Marathi १६. ते रसूल म्हणाले, आमचा पालनकर्ता जाणतो की आम्हाला तुमच्याकडे रसूल बनवून पाठविले गेले आहे.
Verse 17
وَمَا عَلَيْنَآ إِلَّا ٱلْبَلَـٰغُ ٱلْمُبِينُ
Transliteration wamā ʿalaynā illā l-balāghu l-mubīnu
Marathi १७. आणि आमचे कर्तव्य तर केवळ स्पष्टपणे पोहचविणे एवढेच आहे.
Verse 18
قَالُوٓا۟ إِنَّا تَطَيَّرْنَا بِكُمْ ۖ لَئِن لَّمْ تَنتَهُوا۟ لَنَرْجُمَنَّكُمْ وَلَيَمَسَّنَّكُم مِّنَّا عَذَابٌ أَلِيمٌ
Transliteration qālū innā taṭayyarnā bikum la-in lam tantahū lanarjumannakum walayamassannakum minnā ʿadhābun alīmun
Marathi १८. ते म्हणाले की आम्ही तर तुम्हाला अभद्र समजतो आणि जर तुम्ही हे थांबविले नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी ठेचून तुमचे कामच तमाम करून टाकू आणि तुम्हाला आमच्यातर्फे सक्त शिक्षा मिळेल.
Verse 19
قَالُوا۟ طَـٰٓئِرُكُم مَّعَكُمْ ۚ أَئِن ذُكِّرْتُم ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ مُّسْرِفُونَ
Transliteration qālū ṭāirukum maʿakum a-in dhukkir'tum bal antum qawmun mus'rifūna
Marathi १९. ते पैगंबर म्हणाले की तुमची अभद्रता तर तुमच्या सोबतीला आहे, काय तिला (अशुभ समजता) की तुम्हाला शिकवण दिली जावी, किंबहुना तुम्ही तर मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.
Verse 20
وَجَآءَ مِنْ أَقْصَا ٱلْمَدِينَةِ رَجُلٌ يَسْعَىٰ قَالَ يَـٰقَوْمِ ٱتَّبِعُوا۟ ٱلْمُرْسَلِينَ
Transliteration wajāa min aqṣā l-madīnati rajulun yasʿā qāla yāqawmi ittabiʿū l-mur'salīna
Marathi २०. आणि एक मुष्य त्या शहराच्या शेवटच्या किनाऱ्याकडून धावत आला, तो म्हणाला, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या पैगंबरांच्या मार्गाचे अनुसरण करा.
Verse 21
ٱتَّبِعُوا۟ مَن لَّا يَسْـَٔلُكُمْ أَجْرًا وَهُم مُّهْتَدُونَ
Transliteration ittabiʿū man lā yasalukum ajran wahum muh'tadūna
Marathi २१. अशा लोकांच्या मार्गाचे अनुसरण करा, जे तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाहीत आणि ते सत्य - मार्गावर आहेत.
Verse 22
وَمَا لِىَ لَآ أَعْبُدُ ٱلَّذِى فَطَرَنِى وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
Transliteration wamā liya lā aʿbudu alladhī faṭaranī wa-ilayhi tur'jaʿūna
Marathi २२. आणि मला काय झाले आहे की मी त्याची उपासना न करावी, ज्याने मला निर्माण केले आणि तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
Verse 23
ءَأَتَّخِذُ مِن دُونِهِۦٓ ءَالِهَةً إِن يُرِدْنِ ٱلرَّحْمَـٰنُ بِضُرٍّ لَّا تُغْنِ عَنِّى شَفَـٰعَتُهُمْ شَيْـًٔا وَلَا يُنقِذُونِ
Transliteration a-attakhidhu min dūnihi ālihatan in yurid'ni l-raḥmānu biḍurrin lā tugh'ni ʿannī shafāʿatuhum shayan walā yunqidhūni
Marathi २३. काय मी त्याला सोडून अशांना उपास्य बनवू की जर (अल्लाह) दयावान (रहमान) मला एखादे नुकसान पोहचवू इच्छिल तर त्यांची शिफारस मला काहीच फायदा पोहचवू शकणार नाही आणि ना ते मला वाचवू शकतील.
Verse 24
إِنِّىٓ إِذًا لَّفِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration innī idhan lafī ḍalālin mubīnin
Marathi २४. मग तर मी निश्चितच उघड मार्गभ्रष्टतेत आहे.
Verse 25
إِنِّىٓ ءَامَنتُ بِرَبِّكُمْ فَٱسْمَعُونِ
Transliteration innī āmantu birabbikum fa-is'maʿūni
Marathi २५. माझे म्हणणे ऐका! मी तर (साफ मनाने) तुम्हा सर्वांच्या पालनकर्त्यावर ईमान राखले आहे.
Verse 26
قِيلَ ٱدْخُلِ ٱلْجَنَّةَ ۖ قَالَ يَـٰلَيْتَ قَوْمِى يَعْلَمُونَ
Transliteration qīla ud'khuli l-janata qāla yālayta qawmī yaʿlamūna
Marathi २६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते!
Verse 27
بِمَا غَفَرَ لِى رَبِّى وَجَعَلَنِى مِنَ ٱلْمُكْرَمِينَ
Transliteration bimā ghafara lī rabbī wajaʿalanī mina l-muk'ramīna
Marathi २७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१
Verse 28
۞ وَمَآ أَنزَلْنَا عَلَىٰ قَوْمِهِۦ مِنۢ بَعْدِهِۦ مِن جُندٍ مِّنَ ٱلسَّمَآءِ وَمَا كُنَّا مُنزِلِينَ
Transliteration wamā anzalnā ʿalā qawmihi min baʿdihi min jundin mina l-samāi wamā kunnā munzilīna
Marathi २८. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या जनसमूहावर आकाशातून एखादे सैन्य अवतरित केले नाही आणि ना अशा प्रकारे आम्ही अवतरित करतो.
Verse 29
إِن كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَٰحِدَةً فَإِذَا هُمْ خَـٰمِدُونَ
Transliteration in kānat illā ṣayḥatan wāḥidatan fa-idhā hum khāmidūna
Marathi २९. तो तर केवळ एक भयंकर चित्कार होता, ज्यामुळे ते सर्वच्या सर्व विझून गेले.
Verse 30
يَـٰحَسْرَةً عَلَى ٱلْعِبَادِ ۚ مَا يَأْتِيهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration yāḥasratan ʿalā l-ʿibādi mā yatīhim min rasūlin illā kānū bihi yastahziūna
Marathi ३०. (अशा) दासांबद्दल खेद! कधीही असा कोणताही रसूल (पैगंबर) त्यांच्याजवळ आला नाही, ज्याची त्यांनी थट्टा उडविली नसेल.
Verse 31
أَلَمْ يَرَوْا۟ كَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّنَ ٱلْقُرُونِ أَنَّهُمْ إِلَيْهِمْ لَا يَرْجِعُونَ
Transliteration alam yaraw kam ahlaknā qablahum mina l-qurūni annahum ilayhim lā yarjiʿūna
Marathi ३१. काय त्यांनी नाही पाहिले की त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले की ते यांच्याकडे परतणार नाहीत.
Verse 32
وَإِن كُلٌّ لَّمَّا جَمِيعٌ لَّدَيْنَا مُحْضَرُونَ
Transliteration wa-in kullun lammā jamīʿun ladaynā muḥ'ḍarūna
Marathi ३२. प्रत्येक जनसमूह एकत्रित होऊन आमच्या समोर हजर केला जाईल.
Verse 33
وَءَايَةٌ لَّهُمُ ٱلْأَرْضُ ٱلْمَيْتَةُ أَحْيَيْنَـٰهَا وَأَخْرَجْنَا مِنْهَا حَبًّا فَمِنْهُ يَأْكُلُونَ
Transliteration waāyatun lahumu l-arḍu l-maytatu aḥyaynāhā wa-akhrajnā min'hā ḥabban famin'hu yakulūna
Marathi ३३. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी मृत (कोरडी) जमीन आहे जिला आम्ही जिवंत केले आणि तिच्यातून अन्न (धान्य) काढले ज्यातून ते खातात.
Verse 34
وَجَعَلْنَا فِيهَا جَنَّـٰتٍ مِّن نَّخِيلٍ وَأَعْنَـٰبٍ وَفَجَّرْنَا فِيهَا مِنَ ٱلْعُيُونِ
Transliteration wajaʿalnā fīhā jannātin min nakhīlin wa-aʿnābin wafajjarnā fīhā mina l-ʿuyūni
Marathi ३४. आणि आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि ज्यांच्यात झरे देखील प्रवाहित केले.
Verse 35
لِيَأْكُلُوا۟ مِن ثَمَرِهِۦ وَمَا عَمِلَتْهُ أَيْدِيهِمْ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ
Transliteration liyakulū min thamarihi wamā ʿamilathu aydīhim afalā yashkurūna
Marathi ३५. यासाठी की (लोकांनी) तिची फळे खावीत आणि त्यांच्या हातांनी ते बनविले नाही, मग ते कृतज्ञता का नाही व्यक्त करीत?
Verse 36
سُبْحَـٰنَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلْأَزْوَٰجَ كُلَّهَا مِمَّا تُنۢبِتُ ٱلْأَرْضُ وَمِنْ أَنفُسِهِمْ وَمِمَّا لَا يَعْلَمُونَ
Transliteration sub'ḥāna alladhī khalaqa l-azwāja kullahā mimmā tunbitu l-arḍu wamin anfusihim wamimmā lā yaʿlamūna
Marathi ३६. तो (अल्लाह) मोठा पवित्र आहे, ज्याने प्रत्येक वस्तूच्या जोड्या निर्माण केल्या, मग त्या जमिनीतून उगविलेल्या वस्तू असोत, किंवा यांचे स्वतःचे (अस्तित्व) असो, मग त्या (वस्तू) असोत, ज्यांना हे जाणतही नाहीत.
Verse 37
وَءَايَةٌ لَّهُمُ ٱلَّيْلُ نَسْلَخُ مِنْهُ ٱلنَّهَارَ فَإِذَا هُم مُّظْلِمُونَ
Transliteration waāyatun lahumu al-laylu naslakhu min'hu l-nahāra fa-idhā hum muẓ'limūna
Marathi ३७. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी रात्र आहे, जिच्यातून आम्ही दिवसाला ओढून घेतो, तेव्हा ते अचानक अंधारात राहतात.
Verse 38
وَٱلشَّمْسُ تَجْرِى لِمُسْتَقَرٍّ لَّهَا ۚ ذَٰلِكَ تَقْدِيرُ ٱلْعَزِيزِ ٱلْعَلِيمِ
Transliteration wal-shamsu tajrī limus'taqarrin lahā dhālika taqdīru l-ʿazīzi l-ʿalīmi
Marathi ३८. आणि सूर्याकरिता जे निर्धारित मार्ग आहेत, तो त्यावरच चालत राहतो.१ हे आहे निर्धारित केलेले जबरदस्त ज्ञानी (अल्लाह) चे.
Verse 39
وَٱلْقَمَرَ قَدَّرْنَـٰهُ مَنَازِلَ حَتَّىٰ عَادَ كَٱلْعُرْجُونِ ٱلْقَدِيمِ
Transliteration wal-qamara qaddarnāhu manāzila ḥattā ʿāda kal-ʿur'jūni l-qadīmi
Marathi ३९. आणि चंद्राच्या आम्ही मजली निर्धारित केलेल्या आहेत. येथेपर्यंत की तो पुनश्च जुन्या फांदीसारखा होतो.
Verse 40
لَا ٱلشَّمْسُ يَنۢبَغِى لَهَآ أَن تُدْرِكَ ٱلْقَمَرَ وَلَا ٱلَّيْلُ سَابِقُ ٱلنَّهَارِ ۚ وَكُلٌّ فِى فَلَكٍ يَسْبَحُونَ
Transliteration lā l-shamsu yanbaghī lahā an tud'rika l-qamara walā al-laylu sābiqu l-nahāri wakullun fī falakin yasbaḥūna
Marathi ४०. ना सूर्याच्या आवाक्यात आहे की चंद्राला जाऊन धरावे आणि ना रात्र, दिवसाच्या पुढे जाणारी आहे आणि सर्वच्या सर्व आकाशात तरंगत फिरतात.
Verse 41
وَءَايَةٌ لَّهُمْ أَنَّا حَمَلْنَا ذُرِّيَّتَهُمْ فِى ٱلْفُلْكِ ٱلْمَشْحُونِ
Transliteration waāyatun lahum annā ḥamalnā dhurriyyatahum fī l-ful'ki l-mashḥūni
Marathi ४१. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी (ही देखील) आहे की आम्ही त्यांच्या संततीला भरलेल्या नौकेत स्वार केले.
Verse 42
وَخَلَقْنَا لَهُم مِّن مِّثْلِهِۦ مَا يَرْكَبُونَ
Transliteration wakhalaqnā lahum min mith'lihi mā yarkabūna
Marathi ४२. आणि यांच्यासाठी त्यासारख्याच इतर वस्तू निर्माण केल्या, ज्यांच्यावर ते स्वार होतात.
Verse 43
وَإِن نَّشَأْ نُغْرِقْهُمْ فَلَا صَرِيخَ لَهُمْ وَلَا هُمْ يُنقَذُونَ
Transliteration wa-in nasha nugh'riq'hum falā ṣarīkha lahum walā hum yunqadhūna
Marathi ४३. आणि जर आम्ही इच्छिले असते तर त्यांना बुडवून टाकले असते, मग ना कोणी त्यांची मदत करणारा असता आणि ना ते वाचवले गेले असते.
Verse 44
إِلَّا رَحْمَةً مِّنَّا وَمَتَـٰعًا إِلَىٰ حِينٍ
Transliteration illā raḥmatan minnā wamatāʿan ilā ḥīnin
Marathi ४४. परंतु आम्ही आपल्यातर्फे दया - कृपा करतो आणि एका ठराविक मुदतीपर्यंत त्यांना लाभ देत आहोत.
Verse 45
وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱتَّقُوا۟ مَا بَيْنَ أَيْدِيكُمْ وَمَا خَلْفَكُمْ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
Transliteration wa-idhā qīla lahumu ittaqū mā bayna aydīkum wamā khalfakum laʿallakum tur'ḥamūna
Marathi ४५. आणि त्यांना जेव्हा (कधी) सांगितले जाते की पुढच्या - मागच्या (दुष्कर्मां) पासून अलिप्त राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.
Verse 46
وَمَا تَأْتِيهِم مِّنْ ءَايَةٍ مِّنْ ءَايَـٰتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا۟ عَنْهَا مُعْرِضِينَ
Transliteration wamā tatīhim min āyatin min āyāti rabbihim illā kānū ʿanhā muʿ'riḍīna
Marathi ४६. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याकडून अशी एखादी निशाणी येत नाही जिच्यापासून हे तोंड फिरवित नसावेत.
Verse 47
وَإِذَا قِيلَ لَهُمْ أَنفِقُوا۟ مِمَّا رَزَقَكُمُ ٱللَّهُ قَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ أَنُطْعِمُ مَن لَّوْ يَشَآءُ ٱللَّهُ أَطْعَمَهُۥٓ إِنْ أَنتُمْ إِلَّا فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration wa-idhā qīla lahum anfiqū mimmā razaqakumu l-lahu qāla alladhīna kafarū lilladhīna āmanū anuṭ'ʿimu man law yashāu l-lahu aṭʿamahu in antum illā fī ḍalālin mubīnin
Marathi ४७. आणि त्यांना जेव्हा सांगितले जाते की अल्लाहने जे दिले आहे, त्यातून काही खर्च करा, तेव्हा हे काफिर, ईमान राखणाऱ्यांना उत्तर देतात की आम्ही त्यांना का खाऊ घालावे, ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच खाऊ - पिऊ घातले असते? तुम्ही तर आहातच उघड मार्गभ्रष्टतेत.
Verse 48
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلْوَعْدُ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration wayaqūlūna matā hādhā l-waʿdu in kuntum ṣādiqīna
Marathi ४८. आणि ते म्हणतात, हा वायदा (कयामतची धमकी) केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा.
Verse 49
مَا يَنظُرُونَ إِلَّا صَيْحَةً وَٰحِدَةً تَأْخُذُهُمْ وَهُمْ يَخِصِّمُونَ
Transliteration mā yanẓurūna illā ṣayḥatan wāḥidatan takhudhuhum wahum yakhiṣṣimūna
Marathi ४९. त्यांना केवळ एका भयंकर चित्काराची प्रतीक्षा आहे, जो त्यांना येऊन धरेल आणि हे आपसात लढत - भांडतच असतील.
Verse 50
فَلَا يَسْتَطِيعُونَ تَوْصِيَةً وَلَآ إِلَىٰٓ أَهْلِهِمْ يَرْجِعُونَ
Transliteration falā yastaṭīʿūna tawṣiyatan walā ilā ahlihim yarjiʿūna
Marathi ५०. त्यावेळी हे ना वसीयत (मृत्युपत्र) करू शकतील आणि ना - आपल्या कुटुंबाकडे परतू शकतील.
Verse 51
وَنُفِخَ فِى ٱلصُّورِ فَإِذَا هُم مِّنَ ٱلْأَجْدَاثِ إِلَىٰ رَبِّهِمْ يَنسِلُونَ
Transliteration wanufikha fī l-ṣūri fa-idhā hum mina l-ajdāthi ilā rabbihim yansilūna
Marathi ५१. आणि सूर (शंख) फुंकला जाताच सर्वच्या सर्व आपल्या कबरीमधून आपल्या पालनकर्त्याकडे (जलद गतीने) चालू लागतील.
Verse 52
قَالُوا۟ يَـٰوَيْلَنَا مَنۢ بَعَثَنَا مِن مَّرْقَدِنَا ۜ ۗ هَـٰذَا مَا وَعَدَ ٱلرَّحْمَـٰنُ وَصَدَقَ ٱلْمُرْسَلُونَ
Transliteration qālū yāwaylanā man baʿathanā min marqadinā hādhā mā waʿada l-raḥmānu waṣadaqa l-mur'salūna
Marathi ५२. म्हणतील, अरेरे! आम्हाला आमच्या आरामच्या जागेतून कोणी उठविले? हेच आहे ते, ज्याचा वायदा रहमान (दयावान) ने केला होता, आणि पैगंबरांनी खरे खरे सांगितले होते.
Verse 53
إِن كَانَتْ إِلَّا صَيْحَةً وَٰحِدَةً فَإِذَا هُمْ جَمِيعٌ لَّدَيْنَا مُحْضَرُونَ
Transliteration in kānat illā ṣayḥatan wāḥidatan fa-idhā hum jamīʿun ladaynā muḥ'ḍarūna
Marathi ५३. असे नव्हे, परंतु एक भयंकर गर्जना की अचानक सर्वच्या सर्व जमा होऊन आमच्या समोर हजर केले जातील.
Verse 54
فَٱلْيَوْمَ لَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْـًٔا وَلَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
Transliteration fal-yawma lā tuẓ'lamu nafsun shayan walā tuj'zawna illā mā kuntum taʿmalūna
Marathi ५४. तेव्हा आज कोणत्याही माणसावर किंचितही अत्याचार केला जाणार नाही आणि तुम्हाला त्याच कर्मांचा मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते.
Verse 55
إِنَّ أَصْحَـٰبَ ٱلْجَنَّةِ ٱلْيَوْمَ فِى شُغُلٍ فَـٰكِهُونَ
Transliteration inna aṣḥāba l-janati l-yawma fī shughulin fākihūna
Marathi ५५. निःसंशय, जन्नतवाले लोक आजच्या दिवशी आपल्या (मनोरंजन) कार्यात व्यस्त आणि आनंदित आहेत.
Verse 56
هُمْ وَأَزْوَٰجُهُمْ فِى ظِلَـٰلٍ عَلَى ٱلْأَرَآئِكِ مُتَّكِـُٔونَ
Transliteration hum wa-azwājuhum fī ẓilālin ʿalā l-arāiki muttakiūna
Marathi ५६. ते आणि त्यांच्या पत्न्या सावलीत आसनांवर तक्के लावून बसले असतील.
Verse 57
لَهُمْ فِيهَا فَـٰكِهَةٌ وَلَهُم مَّا يَدَّعُونَ
Transliteration lahum fīhā fākihatun walahum mā yaddaʿūna
Marathi ५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील.
Verse 58
سَلَـٰمٌ قَوْلًا مِّن رَّبٍّ رَّحِيمٍ
Transliteration salāmun qawlan min rabbin raḥīmin
Marathi ५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल.
Verse 59
وَٱمْتَـٰزُوا۟ ٱلْيَوْمَ أَيُّهَا ٱلْمُجْرِمُونَ
Transliteration wa-im'tāzū l-yawma ayyuhā l-muj'rimūna
Marathi ५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा.
Verse 60
۞ أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَـٰبَنِىٓ ءَادَمَ أَن لَّا تَعْبُدُوا۟ ٱلشَّيْطَـٰنَ ۖ إِنَّهُۥ لَكُمْ عَدُوٌّ مُّبِينٌ
Transliteration alam aʿhad ilaykum yābanī ādama an lā taʿbudū l-shayṭāna innahu lakum ʿaduwwun mubīnun
Marathi ६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे.
Verse 61
وَأَنِ ٱعْبُدُونِى ۚ هَـٰذَا صِرَٰطٌ مُّسْتَقِيمٌ
Transliteration wa-ani uʿ'budūnī hādhā ṣirāṭun mus'taqīmun
Marathi ६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे.
Verse 62
وَلَقَدْ أَضَلَّ مِنكُمْ جِبِلًّا كَثِيرًا ۖ أَفَلَمْ تَكُونُوا۟ تَعْقِلُونَ
Transliteration walaqad aḍalla minkum jibillan kathīran afalam takūnū taʿqilūna
Marathi ६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१
Verse 63
هَـٰذِهِۦ جَهَنَّمُ ٱلَّتِى كُنتُمْ تُوعَدُونَ
Transliteration hādhihi jahannamu allatī kuntum tūʿadūna
Marathi ६३. हीच ती जहन्नम आहे, जिचा वायदा तुम्हाला दिला जात होता.
Verse 64
ٱصْلَوْهَا ٱلْيَوْمَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ
Transliteration iṣ'lawhā l-yawma bimā kuntum takfurūna
Marathi ६४. आपल्या कुप्र (इन्कारा) चा मोबदला प्राप्त करण्याकरिता आज तिच्यात दाखल व्हा.
Verse 65
ٱلْيَوْمَ نَخْتِمُ عَلَىٰٓ أَفْوَٰهِهِمْ وَتُكَلِّمُنَآ أَيْدِيهِمْ وَتَشْهَدُ أَرْجُلُهُم بِمَا كَانُوا۟ يَكْسِبُونَ
Transliteration al-yawma nakhtimu ʿalā afwāhihim watukallimunā aydīhim watashhadu arjuluhum bimā kānū yaksibūna
Marathi ६५. आम्ही आज त्यांच्या तोंडावर मोहर लावून देऊ आणि त्यांचे हात आमच्याशी बोलतील आणि त्यांचे पाय साक्ष देतील, त्यांच्या त्या कर्मांची, जे ते करीत होते.
Verse 66
وَلَوْ نَشَآءُ لَطَمَسْنَا عَلَىٰٓ أَعْيُنِهِمْ فَٱسْتَبَقُوا۟ ٱلصِّرَٰطَ فَأَنَّىٰ يُبْصِرُونَ
Transliteration walaw nashāu laṭamasnā ʿalā aʿyunihim fa-is'tabaqū l-ṣirāṭa fa-annā yub'ṣirūna
Marathi ६६. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांचे डोळे आंधळे करून टाकले असते, मग हे मार्गाकडे धावत गेले असते, मग त्यांना कशा प्रकारे दिसून आले असते?
Verse 67
وَلَوْ نَشَآءُ لَمَسَخْنَـٰهُمْ عَلَىٰ مَكَانَتِهِمْ فَمَا ٱسْتَطَـٰعُوا۟ مُضِيًّا وَلَا يَرْجِعُونَ
Transliteration walaw nashāu lamasakhnāhum ʿalā makānatihim famā is'taṭāʿū muḍiyyan walā yarjiʿūna
Marathi ६७. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांच्या जागेवरच त्यांचे चेहरे बिघडवून (विकृत करून) टाकले असते. मग ना ते हिंडू फिरू शकले असते आणि ना परतू शकले असते.
Verse 68
وَمَن نُّعَمِّرْهُ نُنَكِّسْهُ فِى ٱلْخَلْقِ ۖ أَفَلَا يَعْقِلُونَ
Transliteration waman nuʿammir'hu nunakkis'hu fī l-khalqi afalā yaʿqilūna
Marathi ६८. आणि आम्ही ज्याला वृद्ध करतो, त्याला जन्माच्या वेळेच्या अवस्थेकडे दुसऱ्यांदा परतवितो, मग काय हे तरीही समजून घेत नाही?
Verse 69
وَمَا عَلَّمْنَـٰهُ ٱلشِّعْرَ وَمَا يَنۢبَغِى لَهُۥٓ ۚ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ وَقُرْءَانٌ مُّبِينٌ
Transliteration wamā ʿallamnāhu l-shiʿ'ra wamā yanbaghī lahu in huwa illā dhik'run waqur'ānun mubīnun
Marathi ६९. आणि ना तर आम्ही या पैगंबरास काव्य (कविता) शिकविले, आणि ना हा त्यास योग्य आहे. हा तर केवळ बोध उपदेश आणि स्पष्ट कुरआन आहे.
Verse 70
لِّيُنذِرَ مَن كَانَ حَيًّا وَيَحِقَّ ٱلْقَوْلُ عَلَى ٱلْكَـٰفِرِينَ
Transliteration liyundhira man kāna ḥayyan wayaḥiqqa l-qawlu ʿalā l-kāfirīna
Marathi ७०. यासाठी की त्याने प्रत्येक माणसाला सावध करावे, जो जिवंत आहे आणि सत्य (प्रमाण) प्रस्थापित व्हावे.
Verse 71
أَوَلَمْ يَرَوْا۟ أَنَّا خَلَقْنَا لَهُم مِّمَّا عَمِلَتْ أَيْدِينَآ أَنْعَـٰمًا فَهُمْ لَهَا مَـٰلِكُونَ
Transliteration awalam yaraw annā khalaqnā lahum mimmā ʿamilat aydīnā anʿāman fahum lahā mālikūna
Marathi ७१. काय ते नाही पाहात की आम्ही आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंपैकी, त्याच्यासाठी चतुष्पाद (गुरे-ढोरे) ही निर्माण केले ज्यांचे हे मालक बनले आहेत.
Verse 72
وَذَلَّلْنَـٰهَا لَهُمْ فَمِنْهَا رَكُوبُهُمْ وَمِنْهَا يَأْكُلُونَ
Transliteration wadhallalnāhā lahum famin'hā rakūbuhum wamin'hā yakulūna
Marathi ७२. आणि त्यां (पशूं) ना आम्ही त्यांच्या अधीन केले आहे, ज्यांच्यापैकी काही तर त्यांची वाहने आहेत आणि काहीं (चे मांस) खातात.
Verse 73
وَلَهُمْ فِيهَا مَنَـٰفِعُ وَمَشَارِبُ ۖ أَفَلَا يَشْكُرُونَ
Transliteration walahum fīhā manāfiʿu wamashāribu afalā yashkurūna
Marathi ७३. आणि त्यांना त्यांच्यापासून इतरही अनेक फायदे आहेत, आणि पिण्याच्या वस्तू काय तरीही हे कृतज्ञता दर्शवित नाही?
Verse 74
وَٱتَّخَذُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ ءَالِهَةً لَّعَلَّهُمْ يُنصَرُونَ
Transliteration wa-ittakhadhū min dūni l-lahi ālihatan laʿallahum yunṣarūna
Marathi ७४. आणि ते अल्लाहखेरीज दुसऱ्यांनाही उपास्य बनवितात (या आशेने) की त्यांची मदत केली जावी.
Verse 75
لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَهُمْ وَهُمْ لَهُمْ جُندٌ مُّحْضَرُونَ
Transliteration lā yastaṭīʿūna naṣrahum wahum lahum jundun muḥ'ḍarūna
Marathi ७५. (वास्तविक) त्यांना मदत करण्याचे ते सामर्थ्य बाळगत नाहीत, तथापि हे (अनेकेश्वरवादी) त्यांचे सैन्य या नात्याने हजर आहेत.
Verse 76
فَلَا يَحْزُنكَ قَوْلُهُمْ ۘ إِنَّا نَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ
Transliteration falā yaḥzunka qawluhum innā naʿlamu mā yusirrūna wamā yuʿ'linūna
Marathi ७६. यास्तव त्यांच्या गोष्टी (बोलण्या) ने दुःखी कष्टी न व्हावे आम्ही त्यांच्या लपलेल्या व उघड सर्वच गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.
Verse 77
أَوَلَمْ يَرَ ٱلْإِنسَـٰنُ أَنَّا خَلَقْنَـٰهُ مِن نُّطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُّبِينٌ
Transliteration awalam yara l-insānu annā khalaqnāhu min nuṭ'fatin fa-idhā huwa khaṣīmun mubīnun
Marathi ७७. काय माणसाला एवढेही माहीत नाही की आम्ही त्याला विर्यापासून निर्माण केले आहे, तरीही तो उघड भांडखोर बनून बसला.
Verse 78
وَضَرَبَ لَنَا مَثَلًا وَنَسِىَ خَلْقَهُۥ ۖ قَالَ مَن يُحْىِ ٱلْعِظَـٰمَ وَهِىَ رَمِيمٌ
Transliteration waḍaraba lanā mathalan wanasiya khalqahu qāla man yuḥ'yī l-ʿiẓāma wahiya ramīmun
Marathi ७८. आणि त्याने आमच्यासाठी उदाहरणे सांगितली आणि आपल्या (मूळ) उत्पत्तीला विसरला, म्हणाला की या सडल्या कुजल्या हाडांना कोण (पुन्हा) जिवंत करू शकतो?
Verse 79
قُلْ يُحْيِيهَا ٱلَّذِىٓ أَنشَأَهَآ أَوَّلَ مَرَّةٍ ۖ وَهُوَ بِكُلِّ خَلْقٍ عَلِيمٌ
Transliteration qul yuḥ'yīhā alladhī ansha-ahā awwala marratin wahuwa bikulli khalqin ʿalīmun
Marathi ७९. सांगा की त्यांना तो जिवंत करील, ज्याने त्यांना पहिल्यांदा निर्माण केले, जो सर्व प्रकारची उत्पत्ती चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
Verse 80
ٱلَّذِى جَعَلَ لَكُم مِّنَ ٱلشَّجَرِ ٱلْأَخْضَرِ نَارًا فَإِذَآ أَنتُم مِّنْهُ تُوقِدُونَ
Transliteration alladhī jaʿala lakum mina l-shajari l-akhḍari nāran fa-idhā antum min'hu tūqidūna
Marathi ८०. तोच होय, ज्याने तुमच्यासाठी हिरव्या वृक्षापासून आग निर्माण केली, ज्याद्वारे तुम्ही आग प्रज्वलित करता.
Verse 81
أَوَلَيْسَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ بِقَـٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يَخْلُقَ مِثْلَهُم ۚ بَلَىٰ وَهُوَ ٱلْخَلَّـٰقُ ٱلْعَلِيمُ
Transliteration awalaysa alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa biqādirin ʿalā an yakhluqa mith'lahum balā wahuwa l-khalāqu l-ʿalīmu
Marathi ८१. ज्याने आकाशांना आणि धरतीला निर्माण केले आहे, काय तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्यास समर्थ नाही? निश्चितच समर्थ आहे आणि तोच निर्माण करणारा, जाणणारा आहे.
Verse 82
إِنَّمَآ أَمْرُهُۥٓ إِذَآ أَرَادَ شَيْـًٔا أَن يَقُولَ لَهُۥ كُن فَيَكُونُ
Transliteration innamā amruhu idhā arāda shayan an yaqūla lahu kun fayakūnu
Marathi ८२. जेव्हा तो एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा त्याचे एवढे म्हणणे (पुरेसे) आहे की घडून ये, ती गोष्ट तत्काळ घडून येते.
Verse 83
فَسُبْحَـٰنَ ٱلَّذِى بِيَدِهِۦ مَلَكُوتُ كُلِّ شَىْءٍ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
Transliteration fasub'ḥāna alladhī biyadihi malakūtu kulli shayin wa-ilayhi tur'jaʿūna
Marathi ८३. मोठा पवित्र आहे तो अल्लाह, ज्याच्या हाती प्रत्येक गोष्टीचा सत्ताधिकार आहे आणि ज्याच्याकडे तुम्ही सर्व परतविले जाल.
Read Surah Ya-Sin in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.