MyDugsiStart learning

Surah As-Saffat in Marathi: translation and audio

Surah 37 · الصافات · Those who set the Ranks · 182 verses

Surah As-Saffat verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah As-Saffat word by word in English.

Verse 1

وَٱلصَّـٰٓفَّـٰتِ صَفًّا

Transliteration wal-ṣāfāti ṣaffan

Marathi १. शपथ आहे पंक्तिबद्ध होणाऱ्यां (फरिश्त्यां) ची.

Verse 2

فَٱلزَّٰجِرَٰتِ زَجْرًا

Transliteration fal-zājirāti zajran

Marathi २. मग पूर्णतः दरडाविणाऱ्यांची.

Verse 3

فَٱلتَّـٰلِيَـٰتِ ذِكْرًا

Transliteration fal-tāliyāti dhik'ran

Marathi ३. मग अल्लाहचा पाठ करणाऱ्यांची.

Verse 4

إِنَّ إِلَـٰهَكُمْ لَوَٰحِدٌ

Transliteration inna ilāhakum lawāḥidun

Marathi ४. निःसंशय, तुम्हा सर्वांचा उपास्य (माबूद) एकच आहे.

Verse 5

رَّبُّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا وَرَبُّ ٱلْمَشَـٰرِقِ

Transliteration rabbu l-samāwāti wal-arḍi wamā baynahumā warabbu l-mashāriqi

Marathi ५. आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्यांच्या दरम्यानच्या सर्व वस्तूंचा आणि समस्त पूर्व दिशांचा तोच स्वामी आहे.

Verse 6

إِنَّا زَيَّنَّا ٱلسَّمَآءَ ٱلدُّنْيَا بِزِينَةٍ ٱلْكَوَاكِبِ

Transliteration innā zayyannā l-samāa l-dun'yā bizīnatin l-kawākibi

Marathi ६. आम्ही जगाच्या (जवळ असलेल्या) आकाशाला तारकांनी सजविले आणि सुशोभित केले आहे.

Verse 7

وَحِفْظًا مِّن كُلِّ شَيْطَـٰنٍ مَّارِدٍ

Transliteration waḥif'ẓan min kulli shayṭānin māridin

Marathi ७. आणि (आम्ही त्याचे) प्रत्येक विद्रोही सैतानापासून रक्षण केले आहे.

Verse 8

لَّا يَسَّمَّعُونَ إِلَى ٱلْمَلَإِ ٱلْأَعْلَىٰ وَيُقْذَفُونَ مِن كُلِّ جَانِبٍ

Transliteration lā yassammaʿūna ilā l-mala-i l-aʿlā wayuq'dhafūna min kulli jānibin

Marathi ८. उच्च विश्वाच्या फरिश्त्यां (च्या गोष्टी) ऐकण्याकरिता ते कानही लावू शकत नाही, किंबहुना चोहीकडून त्यांच्यावर मारा होत असतो.

Verse 9

دُحُورًا ۖ وَلَهُمْ عَذَابٌ وَاصِبٌ

Transliteration duḥūran walahum ʿadhābun wāṣibun

Marathi ९. पिटाळून लावण्याकरिता आणि त्यांच्या साठी कायमस्वरूपी अज़ाब (शिक्षा - यातना) आहे.

Verse 10

إِلَّا مَنْ خَطِفَ ٱلْخَطْفَةَ فَأَتْبَعَهُۥ شِهَابٌ ثَاقِبٌ

Transliteration illā man khaṭifa l-khaṭfata fa-atbaʿahu shihābun thāqibun

Marathi १०. परंतु जो घाईगर्दीने एखादी गोष्टी हिसकावून पळेल तर (तत्क्षणी) एक धगधगता निखारा त्याच्या पाठीशी लागतो.

Verse 11

فَٱسْتَفْتِهِمْ أَهُمْ أَشَدُّ خَلْقًا أَم مَّنْ خَلَقْنَآ ۚ إِنَّا خَلَقْنَـٰهُم مِّن طِينٍ لَّازِبٍۭ

Transliteration fa-is'taftihim ahum ashaddu khalqan am man khalaqnā innā khalaqnāhum min ṭīnin lāzibin

Marathi ११. या काफिर लोकांना विचारा की त्यांना निर्माण करणे जास्त कठीण आहे की ज्यांना आम्ही निर्माण केले आहे? आम्ही तर मानवांना चिकण मातीपासून निर्माण केले आहे.

Verse 12

بَلْ عَجِبْتَ وَيَسْخَرُونَ

Transliteration bal ʿajib'ta wayaskharūna

Marathi १२. किंबहुना तुम्ही आश्चर्य व्यक्त करत आहात आणि हे लोक थट्टा उडवित आहेत.

Verse 13

وَإِذَا ذُكِّرُوا۟ لَا يَذْكُرُونَ

Transliteration wa-idhā dhukkirū lā yadhkurūna

Marathi १३. आणि जेव्हा त्यांना उपदेश केला जातो तेव्हा ते मानत नाहीत.

Verse 14

وَإِذَا رَأَوْا۟ ءَايَةً يَسْتَسْخِرُونَ

Transliteration wa-idhā ra-aw āyatan yastaskhirūna

Marathi १४. आणि जेव्हा एखादा ईश-चमत्कार (मोजिजा) पाहतात तेव्हा ते थट्टा उडवितात.

Verse 15

وَقَالُوٓا۟ إِنْ هَـٰذَآ إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ

Transliteration waqālū in hādhā illā siḥ'run mubīnun

Marathi १५. आणि म्हणतात की ही तर पूर्णपणे उघड जादू आहे.

Verse 16

أَءِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَـٰمًا أَءِنَّا لَمَبْعُوثُونَ

Transliteration a-idhā mit'nā wakunnā turāban waʿiẓāman a-innā lamabʿūthūna

Marathi १६. काय जेव्हा आम्ही मरण पावणार आणि माती व हाडे होऊन जाऊ, मग काय (खरोखर) आम्ही जिवंत केले जाऊ?

Verse 17

أَوَءَابَآؤُنَا ٱلْأَوَّلُونَ

Transliteration awaābāunā l-awalūna

Marathi १७. आणि आमच्यापूर्वी होऊन गेलेले वाडवडीलही?

Verse 18

قُلْ نَعَمْ وَأَنتُمْ دَٰخِرُونَ

Transliteration qul naʿam wa-antum dākhirūna

Marathi १८. (तुम्ही) उत्तर द्या की होय, आणि तुम्ही अपमानितही व्हाल.

Verse 19

فَإِنَّمَا هِىَ زَجْرَةٌ وَٰحِدَةٌ فَإِذَا هُمْ يَنظُرُونَ

Transliteration fa-innamā hiya zajratun wāḥidatun fa-idhā hum yanẓurūna

Marathi १९. ती तर केवळ एक जोरदार दटावणी असेल की ते अचानक पाहू लागतील.

Verse 20

وَقَالُوا۟ يَـٰوَيْلَنَا هَـٰذَا يَوْمُ ٱلدِّينِ

Transliteration waqālū yāwaylanā hādhā yawmu l-dīni

Marathi २०. आणि म्हणतील की, अरेरे आमचा विनाश, हाच मोबदल्याचा दिवस आहे.

Verse 21

هَـٰذَا يَوْمُ ٱلْفَصْلِ ٱلَّذِى كُنتُم بِهِۦ تُكَذِّبُونَ

Transliteration hādhā yawmu l-faṣli alladhī kuntum bihi tukadhibūna

Marathi २१. हाच तो फैसल्याचा (निर्णयाचा) दिवस, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिलात.

Verse 22

۞ ٱحْشُرُوا۟ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ وَأَزْوَٰجَهُمْ وَمَا كَانُوا۟ يَعْبُدُونَ

Transliteration uḥ'shurū alladhīna ẓalamū wa-azwājahum wamā kānū yaʿbudūna

Marathi २२. अत्याचारींना आणि त्यांच्या साथीदारांना आणि ज्यांची ज्यांची ते (अल्लाहखेरीज) उपासना करीत होते.

Verse 23

مِن دُونِ ٱللَّهِ فَٱهْدُوهُمْ إِلَىٰ صِرَٰطِ ٱلْجَحِيمِ

Transliteration min dūni l-lahi fa-ih'dūhum ilā ṣirāṭi l-jaḥīmi

Marathi २३. (त्या सर्वांना) एकत्र करून, त्यांना जहन्नमचा मार्ग दाखवा.

Verse 24

وَقِفُوهُمْ ۖ إِنَّهُم مَّسْـُٔولُونَ

Transliteration waqifūhum innahum masūlūna

Marathi २४. आणि त्यांना थांबवून घ्या (यासाठी) की त्यांना आवश्यक प्रश्न विचारले जाणार आहेत.

Verse 25

مَا لَكُمْ لَا تَنَاصَرُونَ

Transliteration mā lakum lā tanāṣarūna

Marathi २५. (या वेळी) तुम्ही एकमेकांची मदत करीत नाहीत, याला कारण काय?

Verse 26

بَلْ هُمُ ٱلْيَوْمَ مُسْتَسْلِمُونَ

Transliteration bal humu l-yawma mus'taslimūna

Marathi २६. किंबहुना ते (सर्वजण) आज आज्ञाधारक बनले आहेत.

Verse 27

وَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَآءَلُونَ

Transliteration wa-aqbala baʿḍuhum ʿalā baʿḍin yatasāalūna

Marathi २७. आणि ते एकमेकांना संबोधून प्रश्नोत्तर करू लागतील.

Verse 28

قَالُوٓا۟ إِنَّكُمْ كُنتُمْ تَأْتُونَنَا عَنِ ٱلْيَمِينِ

Transliteration qālū innakum kuntum tatūnanā ʿani l-yamīni

Marathi २८. म्हणतील की तुम्ही तर आमच्याजवळ आमच्या उजव्या बाजूने येत असत.

Verse 29

قَالُوا۟ بَل لَّمْ تَكُونُوا۟ مُؤْمِنِينَ

Transliteration qālū bal lam takūnū mu'minīna

Marathi २९. ते उत्तर देतील की नव्हे, उलट तुम्हीच ईमान राखणारे नव्हते.

Verse 30

وَمَا كَانَ لَنَا عَلَيْكُم مِّن سُلْطَـٰنٍۭ ۖ بَلْ كُنتُمْ قَوْمًا طَـٰغِينَ

Transliteration wamā kāna lanā ʿalaykum min sul'ṭānin bal kuntum qawman ṭāghīna

Marathi ३०. आणि आमच्या तुमच्यावर काहीच जोर नव्हता, किंबहुना तुम्ही तर (स्वतः) विद्रोही लोक होते.

Verse 31

فَحَقَّ عَلَيْنَا قَوْلُ رَبِّنَآ ۖ إِنَّا لَذَآئِقُونَ

Transliteration faḥaqqa ʿalaynā qawlu rabbinā innā ladhāiqūna

Marathi ३१. आता आम्हा (सर्वां) वर आमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान लागू झालेच आहे की आम्ही (शिक्षा-यातनाची) गोडी चाखणार आहोत.

Verse 32

فَأَغْوَيْنَـٰكُمْ إِنَّا كُنَّا غَـٰوِينَ

Transliteration fa-aghwaynākum innā kunnā ghāwīna

Marathi ३२. तेव्हा आम्ही तुम्हाला पथभ्रष्ट केले, आम्ही तर स्वतःदेखील पथभ्रष्टतेत होतो.

Verse 33

فَإِنَّهُمْ يَوْمَئِذٍ فِى ٱلْعَذَابِ مُشْتَرِكُونَ

Transliteration fa-innahum yawma-idhin fī l-ʿadhābi mush'tarikūna

Marathi ३३. तेव्हा आजच्या दिवशी (सर्वच) शिक्षा यातनेचे वाटेकरी आहेत.

Verse 34

إِنَّا كَذَٰلِكَ نَفْعَلُ بِٱلْمُجْرِمِينَ

Transliteration innā kadhālika nafʿalu bil-muj'rimīna

Marathi ३४. आम्ही अपराधी लोकांशी असाच (व्यवहार) करतो.

Verse 35

إِنَّهُمْ كَانُوٓا۟ إِذَا قِيلَ لَهُمْ لَآ إِلَـٰهَ إِلَّا ٱللَّهُ يَسْتَكْبِرُونَ

Transliteration innahum kānū idhā qīla lahum lā ilāha illā l-lahu yastakbirūna

Marathi ३५. हे असे (लोक) आहेत की जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा हे घमेंड करीत असत.

Verse 36

وَيَقُولُونَ أَئِنَّا لَتَارِكُوٓا۟ ءَالِهَتِنَا لِشَاعِرٍ مَّجْنُونٍۭ

Transliteration wayaqūlūna a-innā latārikū ālihatinā lishāʿirin majnūnin

Marathi ३६. आणि म्हणत की काय आम्ही आपल्या दैवतांना एका वेड्या कवीच्या बोलण्यावरून सोडून द्यावे!

Verse 37

بَلْ جَآءَ بِٱلْحَقِّ وَصَدَّقَ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration bal jāa bil-ḥaqi waṣaddaqa l-mur'salīna

Marathi ३७. (नाही मुळीच नाही) किंबहुना पैगंबर तर सत्य (सच्चा दीन धर्म) घेऊन आले आहेत आणि सर्व पैगंबरांना खरे जाणतात.

Verse 38

إِنَّكُمْ لَذَآئِقُوا۟ ٱلْعَذَابِ ٱلْأَلِيمِ

Transliteration innakum ladhāiqū l-ʿadhābi l-alīmi

Marathi ३८. निःसंशय, तुम्ही दुःखदायक शिक्षा-यातनां (ची गोडी) चाखणार आहात.

Verse 39

وَمَا تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration wamā tuj'zawna illā mā kuntum taʿmalūna

Marathi ३९. आणि तुम्हाला त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते.

Verse 40

إِلَّا عِبَادَ ٱللَّهِ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration illā ʿibāda l-lahi l-mukh'laṣīna

Marathi ४०. तथापि अल्लाहचे सच्चे, प्रामाणिक दास!

Verse 41

أُو۟لَـٰٓئِكَ لَهُمْ رِزْقٌ مَّعْلُومٌ

Transliteration ulāika lahum riz'qun maʿlūmun

Marathi ४१. त्यांच्याचकरिता निर्धारित आजिविका (रोजी) आहे.

Verse 42

فَوَٰكِهُ ۖ وَهُم مُّكْرَمُونَ

Transliteration fawākihu wahum muk'ramūna

Marathi ४२. (प्रत्येक प्रकारचे) मेवे आणि ते सन्मानित आदरणीय असतील.

Verse 43

فِى جَنَّـٰتِ ٱلنَّعِيمِ

Transliteration fī jannāti l-naʿīmi

Marathi ४३. सुखांनी भरलेल्या जन्नतीमध्ये.

Verse 44

عَلَىٰ سُرُرٍ مُّتَقَـٰبِلِينَ

Transliteration ʿalā sururin mutaqābilīna

Marathi ४४. आसनांवर एकमेकांच्या समोर बसले असतील.

Verse 45

يُطَافُ عَلَيْهِم بِكَأْسٍ مِّن مَّعِينٍۭ

Transliteration yuṭāfu ʿalayhim bikasin min maʿīnin

Marathi ४५. प्रवाहित (वाहत्या) मद्याचे प्याले त्यांच्या दरम्यान फिरत असतील.

Verse 46

بَيْضَآءَ لَذَّةٍ لِّلشَّـٰرِبِينَ

Transliteration bayḍāa ladhatin lilshāribīna

Marathi ४६. जे स्वच्छ सफेद आणि प्यायला स्वादिष्ट असेल.

Verse 47

لَا فِيهَا غَوْلٌ وَلَا هُمْ عَنْهَا يُنزَفُونَ

Transliteration lā fīhā ghawlun walā hum ʿanhā yunzafūna

Marathi ४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील.

Verse 48

وَعِندَهُمْ قَـٰصِرَٰتُ ٱلطَّرْفِ عِينٌ

Transliteration waʿindahum qāṣirātu l-ṭarfi ʿīnun

Marathi ४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील.

Verse 49

كَأَنَّهُنَّ بَيْضٌ مَّكْنُونٌ

Transliteration ka-annahunna bayḍun maknūnun

Marathi ४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी!

Verse 50

فَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَآءَلُونَ

Transliteration fa-aqbala baʿḍuhum ʿalā baʿḍin yatasāalūna

Marathi ५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील.

Verse 51

قَالَ قَآئِلٌ مِّنْهُمْ إِنِّى كَانَ لِى قَرِينٌ

Transliteration qāla qāilun min'hum innī kāna lī qarīnun

Marathi ५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता.

Verse 52

يَقُولُ أَءِنَّكَ لَمِنَ ٱلْمُصَدِّقِينَ

Transliteration yaqūlu a-innaka lamina l-muṣadiqīna

Marathi ५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस?

Verse 53

أَءِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَـٰمًا أَءِنَّا لَمَدِينُونَ

Transliteration a-idhā mit'nā wakunnā turāban waʿiẓāman a-innā lamadīnūna

Marathi ५३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती आणि हाडे होऊन जाऊ, काय त्या वेळी आम्हाला (कृत कर्मांचा) मोबदला दिला जाईल?

Verse 54

قَالَ هَلْ أَنتُم مُّطَّلِعُونَ

Transliteration qāla hal antum muṭṭaliʿūna

Marathi ५४. सांगितले जाईल, तुम्ही इच्छिता की डोकावून पाहावे?

Verse 55

فَٱطَّلَعَ فَرَءَاهُ فِى سَوَآءِ ٱلْجَحِيمِ

Transliteration fa-iṭṭalaʿa faraāhu fī sawāi l-jaḥīmi

Marathi ५५. डोकावून पाहताच त्याला जहन्नममध्ये मध्यभागी (जळताना) दिसेल.

Verse 56

قَالَ تَٱللَّهِ إِن كِدتَّ لَتُرْدِينِ

Transliteration qāla tal-lahi in kidtta latur'dīni

Marathi ५६. तो म्हणेल, अल्लाहची शपथ! तू तर माझाही सर्वनाश करण्याच्या जवळ होता.

Verse 57

وَلَوْلَا نِعْمَةُ رَبِّى لَكُنتُ مِنَ ٱلْمُحْضَرِينَ

Transliteration walawlā niʿ'matu rabbī lakuntu mina l-muḥ'ḍarīna

Marathi ५७. जर माझ्यावर माझ्या पालनकर्त्याची कृपा नसती तर मी देखील जहन्नममध्ये हजर केल्या जाणाऱ्यांपैकी असतो.

Verse 58

أَفَمَا نَحْنُ بِمَيِّتِينَ

Transliteration afamā naḥnu bimayyitīna

Marathi ५८. काय (हे उचित आहे की) आम्ही मरण पावणारच नाहीत?

Verse 59

إِلَّا مَوْتَتَنَا ٱلْأُولَىٰ وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ

Transliteration illā mawtatanā l-ūlā wamā naḥnu bimuʿadhabīna

Marathi ५९. पहिल्या एका मृत्युखेरीज, आणि ना आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिला जाईल.

Verse 60

إِنَّ هَـٰذَا لَهُوَ ٱلْفَوْزُ ٱلْعَظِيمُ

Transliteration inna hādhā lahuwa l-fawzu l-ʿaẓīmu

Marathi ६०. मग तर (स्पष्ट आहे की) ही फार मोठी सफलता आहे.

Verse 61

لِمِثْلِ هَـٰذَا فَلْيَعْمَلِ ٱلْعَـٰمِلُونَ

Transliteration limith'li hādhā falyaʿmali l-ʿāmilūna

Marathi ६१. अशी (सफलता) प्राप्त करण्यासाठी आचरण करणाऱ्यांनी आचरण केले पाहिजे.

Verse 62

أَذَٰلِكَ خَيْرٌ نُّزُلًا أَمْ شَجَرَةُ ٱلزَّقُّومِ

Transliteration adhālika khayrun nuzulan am shajaratu l-zaqūmi

Marathi ६२. काय हे आतिथ्य अधिक चांगले आहे की जक्कूमचे झाड?

Verse 63

إِنَّا جَعَلْنَـٰهَا فِتْنَةً لِّلظَّـٰلِمِينَ

Transliteration innā jaʿalnāhā fit'natan lilẓẓālimīna

Marathi ६३. ज्याला आम्ही अत्याचारी लोकांकरिता कठीण कसोटी बनविले आहे.

Verse 64

إِنَّهَا شَجَرَةٌ تَخْرُجُ فِىٓ أَصْلِ ٱلْجَحِيمِ

Transliteration innahā shajaratun takhruju fī aṣli l-jaḥīmi

Marathi ६४. निःसंशय, ते झाड जहन्नमच्या तळापासून निघते.

Verse 65

طَلْعُهَا كَأَنَّهُۥ رُءُوسُ ٱلشَّيَـٰطِينِ

Transliteration ṭalʿuhā ka-annahu ruūsu l-shayāṭīni

Marathi ६५. ज्याचे घोंस (गुच्छे) सैतानाच्या डोक्यांसारखे असतात.

Verse 66

فَإِنَّهُمْ لَـَٔاكِلُونَ مِنْهَا فَمَالِـُٔونَ مِنْهَا ٱلْبُطُونَ

Transliteration fa-innahum laākilūna min'hā famāliūna min'hā l-buṭūna

Marathi ६६. जहन्नमवासी याच झाडाला खातील आणि याच्याचद्वारे पोट भरतील.

Verse 67

ثُمَّ إِنَّ لَهُمْ عَلَيْهَا لَشَوْبًا مِّنْ حَمِيمٍ

Transliteration thumma inna lahum ʿalayhā lashawban min ḥamīmin

Marathi ६७. मग त्यावर उकळते पाणी प्यावे लागले.

Verse 68

ثُمَّ إِنَّ مَرْجِعَهُمْ لَإِلَى ٱلْجَحِيمِ

Transliteration thumma inna marjiʿahum la-ilā l-jaḥīmi

Marathi ६८. मग त्या सर्वांचे परतणे जहन्नमच्या (आगी) कडेच असेल.

Verse 69

إِنَّهُمْ أَلْفَوْا۟ ءَابَآءَهُمْ ضَآلِّينَ

Transliteration innahum alfaw ābāahum ḍāllīna

Marathi ६९. विश्वास करा की त्यांना आपले वाडवडील पथभ्रष्ट (असल्याचे) आढळले.

Verse 70

فَهُمْ عَلَىٰٓ ءَاثَـٰرِهِمْ يُهْرَعُونَ

Transliteration fahum ʿalā āthārihim yuh'raʿūna

Marathi ७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले.

Verse 71

وَلَقَدْ ضَلَّ قَبْلَهُمْ أَكْثَرُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration walaqad ḍalla qablahum aktharu l-awalīna

Marathi ७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत.

Verse 72

وَلَقَدْ أَرْسَلْنَا فِيهِم مُّنذِرِينَ

Transliteration walaqad arsalnā fīhim mundhirīna

Marathi ७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते.

Verse 73

فَٱنظُرْ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلْمُنذَرِينَ

Transliteration fa-unẓur kayfa kāna ʿāqibatu l-mundharīna

Marathi ७३. आता तुम्ही पाहा की ज्यांना (अल्लाहच्या अज़ाबचे) भय दाखविले गेले होते, त्यांचा शेवट कसा झाला.

Verse 74

إِلَّا عِبَادَ ٱللَّهِ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration illā ʿibāda l-lahi l-mukh'laṣīna

Marathi ७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

Verse 75

وَلَقَدْ نَادَىٰنَا نُوحٌ فَلَنِعْمَ ٱلْمُجِيبُونَ

Transliteration walaqad nādānā nūḥun falaniʿ'ma l-mujībūna

Marathi ७५. आम्हाला नूहने पुकारले तर पाहा की आम्ही किती चांगले दुआ (प्रार्थना) कबूल करणारे आहोत.

Verse 76

وَنَجَّيْنَـٰهُ وَأَهْلَهُۥ مِنَ ٱلْكَرْبِ ٱلْعَظِيمِ

Transliteration wanajjaynāhu wa-ahlahu mina l-karbi l-ʿaẓīmi

Marathi ७६. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या घोर संकटापासून वाचविले.

Verse 77

وَجَعَلْنَا ذُرِّيَّتَهُۥ هُمُ ٱلْبَاقِينَ

Transliteration wajaʿalnā dhurriyyatahu humu l-bāqīna

Marathi ७७. आणि त्याच्या संततीला आम्ही बाकी राहणारी बनविले.

Verse 78

وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِى ٱلْـَٔاخِرِينَ

Transliteration wataraknā ʿalayhi fī l-ākhirīna

Marathi ७८. आणि आम्ही त्याचे स्मरण (चर्चा) नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवले.

Verse 79

سَلَـٰمٌ عَلَىٰ نُوحٍ فِى ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration salāmun ʿalā nūḥin fī l-ʿālamīna

Marathi ७९. नूह (अले.) वर साऱ्या जगात सलाम असो.

Verse 80

إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration innā kadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi ८०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

Verse 81

إِنَّهُۥ مِنْ عِبَادِنَا ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration innahu min ʿibādinā l-mu'minīna

Marathi ८१. निःसंशय, तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता.

Verse 82

ثُمَّ أَغْرَقْنَا ٱلْـَٔاخَرِينَ

Transliteration thumma aghraqnā l-ākharīna

Marathi ८२. मग इतर लोकांना आम्ही बुडवून टाकले.

Verse 83

۞ وَإِنَّ مِن شِيعَتِهِۦ لَإِبْرَٰهِيمَ

Transliteration wa-inna min shīʿatihi la-ib'rāhīma

Marathi ८३. आणि त्याच्या (नूहच्या) मागे येणाऱ्यांपैकीच इब्राहीमही होते.

Verse 84

إِذْ جَآءَ رَبَّهُۥ بِقَلْبٍ سَلِيمٍ

Transliteration idh jāa rabbahu biqalbin salīmin

Marathi ८४. जेव्हा ते आपल्या पालनकर्त्याजवळ शुद्ध (निर्दोष) अंतःकरणासह आले.

Verse 85

إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِۦ مَاذَا تَعْبُدُونَ

Transliteration idh qāla li-abīhi waqawmihi mādhā taʿbudūna

Marathi ८५. ते आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले की तुम्ही कशाची भक्ती आराधना करीत आहात?

Verse 86

أَئِفْكًا ءَالِهَةً دُونَ ٱللَّهِ تُرِيدُونَ

Transliteration a-if'kan ālihatan dūna l-lahi turīdūna

Marathi ८६. काय तुम्ही अल्लाहखेरीज मनाने रचलेली उपास्ये इच्छिता?

Verse 87

فَمَا ظَنُّكُم بِرَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration famā ẓannukum birabbi l-ʿālamīna

Marathi ८७. तर मग (सांगा की) तुम्ही सर्व विश्वांच्या पालनकर्त्याला काय समजून घेतले आहे?

Verse 88

فَنَظَرَ نَظْرَةً فِى ٱلنُّجُومِ

Transliteration fanaẓara naẓratan fī l-nujūmi

Marathi ८८. आता (इब्राहीमने) एक नजर ताऱ्यांवर टाकली.

Verse 89

فَقَالَ إِنِّى سَقِيمٌ

Transliteration faqāla innī saqīmun

Marathi ८९. आणि म्हणाले की मी तर आजारी आहे.

Verse 90

فَتَوَلَّوْا۟ عَنْهُ مُدْبِرِينَ

Transliteration fatawallaw ʿanhu mud'birīna

Marathi ९०. यावर सर्वजण त्याच्यापासून तोंड फिरवित परत चालले गेले.

Verse 91

فَرَاغَ إِلَىٰٓ ءَالِهَتِهِمْ فَقَالَ أَلَا تَأْكُلُونَ

Transliteration farāgha ilā ālihatihim faqāla alā takulūna

Marathi ९१. ते (इब्राहीम) हळूच त्यांच्या उपास्यां (देवतां) जवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाहीत?

Verse 92

مَا لَكُمْ لَا تَنطِقُونَ

Transliteration mā lakum lā tanṭiqūna

Marathi ९२. तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही बोलत सुद्धा नाहीत!

Verse 93

فَرَاغَ عَلَيْهِمْ ضَرْبًۢا بِٱلْيَمِينِ

Transliteration farāgha ʿalayhim ḍarban bil-yamīni

Marathi ९३. मग तर (पूर्ण शक्तीने) उजव्या हाताने त्यांना मारण्यास तुटून पडले.

Verse 94

فَأَقْبَلُوٓا۟ إِلَيْهِ يَزِفُّونَ

Transliteration fa-aqbalū ilayhi yaziffūna

Marathi ९४. ते (अनेकेश्वरवादी) धावत पळत त्यांच्याकडे आले.

Verse 95

قَالَ أَتَعْبُدُونَ مَا تَنْحِتُونَ

Transliteration qāla ataʿbudūna mā tanḥitūna

Marathi ९५. तेव्हा ते (इब्राहीम) म्हणाले की तुम्ही अशांची पूजा करता, ज्यांना तुम्ही स्वतः बनविता.

Verse 96

وَٱللَّهُ خَلَقَكُمْ وَمَا تَعْمَلُونَ

Transliteration wal-lahu khalaqakum wamā taʿmalūna

Marathi ९६. वास्तविक तुम्हाला आणि तुम्ही बनविलेल्या वस्तूंना अल्लाहनेच निर्माण केले आहे.

Verse 97

قَالُوا۟ ٱبْنُوا۟ لَهُۥ بُنْيَـٰنًا فَأَلْقُوهُ فِى ٱلْجَحِيمِ

Transliteration qālū ib'nū lahu bun'yānan fa-alqūhu fī l-jaḥīmi

Marathi ९७. ते (लोक) म्हणाले, याच्यासाठी एक घर (अग्निकुंड) तयार करा आणि त्या (धगधगत्या) आगीत याला टाकून द्या.

Verse 98

فَأَرَادُوا۟ بِهِۦ كَيْدًا فَجَعَلْنَـٰهُمُ ٱلْأَسْفَلِينَ

Transliteration fa-arādū bihi kaydan fajaʿalnāhumu l-asfalīna

Marathi ९८. त्यांनी तर त्याच्या (इब्राहीम) शी डाव खेळी इच्छिले, परंतु आम्ही त्यांनाच तोंडघशी पाडले.

Verse 99

وَقَالَ إِنِّى ذَاهِبٌ إِلَىٰ رَبِّى سَيَهْدِينِ

Transliteration waqāla innī dhāhibun ilā rabbī sayahdīni

Marathi ९९. आणि (इब्राहीम) म्हणाले की मी तर (हिजरत- देशत्याग) करून आपल्या पालनर्त्याकडे जाणार आहे, तो निश्चितच मला मार्ग दाखविल.

Verse 100

رَبِّ هَبْ لِى مِنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration rabbi hab lī mina l-ṣāliḥīna

Marathi १००. हे माझ्या पालनकर्त्या! मला नेक सदाचारी पुत्र प्रदान कर.

Verse 101

فَبَشَّرْنَـٰهُ بِغُلَـٰمٍ حَلِيمٍ

Transliteration fabasharnāhu bighulāmin ḥalīmin

Marathi १०१. तेव्हा आम्ही त्याला एक सहनशील पुत्र (प्राप्ती) ची शुभवार्ता दिली.

Verse 102

فَلَمَّا بَلَغَ مَعَهُ ٱلسَّعْىَ قَالَ يَـٰبُنَىَّ إِنِّىٓ أَرَىٰ فِى ٱلْمَنَامِ أَنِّىٓ أَذْبَحُكَ فَٱنظُرْ مَاذَا تَرَىٰ ۚ قَالَ يَـٰٓأَبَتِ ٱفْعَلْ مَا تُؤْمَرُ ۖ سَتَجِدُنِىٓ إِن شَآءَ ٱللَّهُ مِنَ ٱلصَّـٰبِرِينَ

Transliteration falammā balagha maʿahu l-saʿya qāla yābunayya innī arā fī l-manāmi annī adhbaḥuka fa-unẓur mādhā tarā qāla yāabati if'ʿal mā tu'maru satajidunī in shāa l-lahu mina l-ṣābirīna

Marathi १०२. मग तेव्हा (बालक) या वयास पोहचले की त्याच्यासोबत हिंडू फिरू शकेल, तेव्हा (इब्राहीम) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! मी स्वप्नात स्वतःला तुझे बलिदान (कुर्बानी) करताना पाहत आहे. आता तूच सांग, तुझा काय विचार आहे?१ पुत्राने उत्तर दिले, हे पिता! जो आदेश (अल्लाहतर्फे) दिला जात आहे, त्याचे पालन करा. अल्लाहने इच्छिले तर मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळेल.

Verse 103

فَلَمَّآ أَسْلَمَا وَتَلَّهُۥ لِلْجَبِينِ

Transliteration falammā aslamā watallahu lil'jabīni

Marathi १०३. अर्थात जेव्हा दोघांनी स्वीकार केला आणि त्या (पित्या) ने त्या (पुत्रा) ला माथा टेकलेल्या अवस्थेत खाली पाडले.

Verse 104

وَنَـٰدَيْنَـٰهُ أَن يَـٰٓإِبْرَٰهِيمُ

Transliteration wanādaynāhu an yāib'rāhīmu

Marathi १०४. तेव्हा आम्ही हाक मारली, हे इब्राहीम!

Verse 105

قَدْ صَدَّقْتَ ٱلرُّءْيَآ ۚ إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration qad ṣaddaqta l-ru'yā innā kadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi १०५. निःसंशय, तुम्ही स्वप्नाला खरे करून दाखविले. निःसंशय, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

Verse 106

إِنَّ هَـٰذَا لَهُوَ ٱلْبَلَـٰٓؤُا۟ ٱلْمُبِينُ

Transliteration inna hādhā lahuwa l-balāu l-mubīnu

Marathi १०६. वास्तविक ही उघड अशी कसोटी होती.

Verse 107

وَفَدَيْنَـٰهُ بِذِبْحٍ عَظِيمٍ

Transliteration wafadaynāhu bidhib'ḥin ʿaẓīmin

Marathi १०७. आणि आम्ही एक मोठा जबीहा (बळी), त्याच्या फिदिया (मुक्तीधन) स्वरूपात दिला.२

Verse 108

وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِى ٱلْـَٔاخِرِينَ

Transliteration wataraknā ʿalayhi fī l-ākhirīna

Marathi १०८. आणि आम्ही त्यांची शुभ चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली.

Verse 109

سَلَـٰمٌ عَلَىٰٓ إِبْرَٰهِيمَ

Transliteration salāmun ʿalā ib'rāhīma

Marathi १०९. इब्राहीमवर सलाम असो.

Verse 110

كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration kadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi ११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

Verse 111

إِنَّهُۥ مِنْ عِبَادِنَا ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration innahu min ʿibādinā l-mu'minīna

Marathi १११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता.

Verse 112

وَبَشَّرْنَـٰهُ بِإِسْحَـٰقَ نَبِيًّا مِّنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration wabasharnāhu bi-is'ḥāqa nabiyyan mina l-ṣāliḥīna

Marathi ११२. आणि आम्ही त्याला पैगंबर इसहाकचा शुभ समाचार दिला, जो नेक सदाचारी लोकांपैकी असेल.

Verse 113

وَبَـٰرَكْنَا عَلَيْهِ وَعَلَىٰٓ إِسْحَـٰقَ ۚ وَمِن ذُرِّيَّتِهِمَا مُحْسِنٌ وَظَالِمٌ لِّنَفْسِهِۦ مُبِينٌ

Transliteration wabāraknā ʿalayhi waʿalā is'ḥāqa wamin dhurriyyatihimā muḥ'sinun waẓālimun linafsihi mubīnun

Marathi ११३. आणि आम्ही इब्राहीम व इसहाकवर अनेक (प्रकारची) समृद्धी अवतरित केली आणि या दोघांच्या संततीत काही तर भाग्यशाली आहेत आणि काही आपल्या प्राणांवर उघड अत्याचार करतात.

Verse 114

وَلَقَدْ مَنَنَّا عَلَىٰ مُوسَىٰ وَهَـٰرُونَ

Transliteration walaqad manannā ʿalā mūsā wahārūna

Marathi ११४. आणि निश्चितच आम्ही मूसा आणि हारूनवर मोठा उपकार केला.

Verse 115

وَنَجَّيْنَـٰهُمَا وَقَوْمَهُمَا مِنَ ٱلْكَرْبِ ٱلْعَظِيمِ

Transliteration wanajjaynāhumā waqawmahumā mina l-karbi l-ʿaẓīmi

Marathi ११५. आणि त्यांची आणि त्यांच्या जनसमूहाची फार मोठ्या दुःख-यातनेतून सुटका केली.

Verse 116

وَنَصَرْنَـٰهُمْ فَكَانُوا۟ هُمُ ٱلْغَـٰلِبِينَ

Transliteration wanaṣarnāhum fakānū humu l-ghālibīna

Marathi ११६. आणि त्यांची मदत केली, तेव्हा तेच वर्चस्वशाली (विजयी) राहिले.

Verse 117

وَءَاتَيْنَـٰهُمَا ٱلْكِتَـٰبَ ٱلْمُسْتَبِينَ

Transliteration waātaynāhumā l-kitāba l-mus'tabīna

Marathi ११७. आणि आम्ही त्यांना (स्पष्ट आणि) दिव्य ग्रंथ प्रदान केला.

Verse 118

وَهَدَيْنَـٰهُمَا ٱلصِّرَٰطَ ٱلْمُسْتَقِيمَ

Transliteration wahadaynāhumā l-ṣirāṭa l-mus'taqīma

Marathi ११८. आणि त्या दोघांना सरळ मार्गावर स्थिर (बाकी) ठेवले.

Verse 119

وَتَرَكْنَا عَلَيْهِمَا فِى ٱلْـَٔاخِرِينَ

Transliteration wataraknā ʿalayhimā fī l-ākhirīna

Marathi ११९. आणि आम्ही त्या दोघांकरिता नंतर येणाऱ्यांमध्ये ही गोष्ट बाकी ठेवली.

Verse 120

سَلَـٰمٌ عَلَىٰ مُوسَىٰ وَهَـٰرُونَ

Transliteration salāmun ʿalā mūsā wahārūna

Marathi १२०. मूसा आणि हारूनवर सलाम असोे.

Verse 121

إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration innā kadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi १२१. निःसंशय, आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करीत असतो.

Verse 122

إِنَّهُمَا مِنْ عِبَادِنَا ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration innahumā min ʿibādinā l-mu'minīna

Marathi १२२. निःसंशय, हे दोघे आमच्या ईमानधारक दासांपैकी होते.

Verse 123

وَإِنَّ إِلْيَاسَ لَمِنَ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration wa-inna il'yāsa lamina l-mur'salīna

Marathi १२३. आणि निःसंशय, इलियास देखील पैगंबरांपैकी होते.

Verse 124

إِذْ قَالَ لِقَوْمِهِۦٓ أَلَا تَتَّقُونَ

Transliteration idh qāla liqawmihi alā tattaqūna

Marathi १२४. जेव्हा ते आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, तुम्ही अल्लाहचे भय नाही बाळगत.

Verse 125

أَتَدْعُونَ بَعْلًا وَتَذَرُونَ أَحْسَنَ ٱلْخَـٰلِقِينَ

Transliteration atadʿūna baʿlan watadharūna aḥsana l-khāliqīna

Marathi १२५. काय तुम्ही (वअ्‌ल) नावाच्या मूर्तीला पुकारता आणि सर्वांत उत्तम अशा निर्माणकर्त्याला सोडून देता?

Verse 126

ٱللَّهَ رَبَّكُمْ وَرَبَّ ءَابَآئِكُمُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration al-laha rabbakum warabba ābāikumu l-awalīna

Marathi १२६. अल्लाह, जो तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व वाडवडिलांचा स्वामी व पालनकर्ता आहे.

Verse 127

فَكَذَّبُوهُ فَإِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ

Transliteration fakadhabūhu fa-innahum lamuḥ'ḍarūna

Marathi १२७. परंतु जनसमूहाच्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, तेव्हा ते अवश्य (शिक्षा - यातनाग्रस्त अवस्थेत) हजर केले जातील.

Verse 128

إِلَّا عِبَادَ ٱللَّهِ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration illā ʿibāda l-lahi l-mukh'laṣīna

Marathi १२८. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

Verse 129

وَتَرَكْنَا عَلَيْهِ فِى ٱلْـَٔاخِرِينَ

Transliteration wataraknā ʿalayhi fī l-ākhirīna

Marathi १२९. आणि आम्ही (इलियासची) शुभा चर्चा नंतरच्या लोकांमध्ये बाकी ठेवली.

Verse 130

سَلَـٰمٌ عَلَىٰٓ إِلْ يَاسِينَ

Transliteration salāmun ʿalā il yāsīna

Marathi १३०. इलियासवर सलाम असो.

Verse 131

إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration innā kadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi १३१. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो.

Verse 132

إِنَّهُۥ مِنْ عِبَادِنَا ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration innahu min ʿibādinā l-mu'minīna

Marathi १३२. निःसंशय, तो आमच्या ईमानधारक दासांपैकी होता.१

Verse 133

وَإِنَّ لُوطًا لَّمِنَ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration wa-inna lūṭan lamina l-mur'salīna

Marathi १३३. निःसंशय, लूत (अलै.) पैगंबरांपैकी होते.

Verse 134

إِذْ نَجَّيْنَـٰهُ وَأَهْلَهُۥٓ أَجْمَعِينَ

Transliteration idh najjaynāhu wa-ahlahu ajmaʿīna

Marathi १३४. आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना मुक्ती प्रदान केली.

Verse 135

إِلَّا عَجُوزًا فِى ٱلْغَـٰبِرِينَ

Transliteration illā ʿajūzan fī l-ghābirīna

Marathi १३५. मात्र त्या म्हातारीखेरीज, जी मागे राहणाऱ्यांमध्ये राहिली.

Verse 136

ثُمَّ دَمَّرْنَا ٱلْـَٔاخَرِينَ

Transliteration thumma dammarnā l-ākharīna

Marathi १३६. मग आम्ही इतर सर्वांचा सर्वनाश केला.

Verse 137

وَإِنَّكُمْ لَتَمُرُّونَ عَلَيْهِم مُّصْبِحِينَ

Transliteration wa-innakum latamurrūna ʿalayhim muṣ'biḥīna

Marathi १३७. आणि तुम्ही तर सकाळ झाल्यावर त्यांच्या वस्त्यांवरून जाता.

Verse 138

وَبِٱلَّيْلِ ۗ أَفَلَا تَعْقِلُونَ

Transliteration wabi-al-layli afalā taʿqilūna

Marathi १३८. आणि रात्री देखील, मग काय तरीही समजून घेत नाही?

Verse 139

وَإِنَّ يُونُسَ لَمِنَ ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration wa-inna yūnusa lamina l-mur'salīna

Marathi १३९. आणि निःसंशय, यूनुस देखील पैगंबरांपैकी होते.

Verse 140

إِذْ أَبَقَ إِلَى ٱلْفُلْكِ ٱلْمَشْحُونِ

Transliteration idh abaqa ilā l-ful'ki l-mashḥūni

Marathi १४०. जेव्हा ते पळून जाऊन भरेलल्या नौकेजवळ पोहोचले.

Verse 141

فَسَاهَمَ فَكَانَ مِنَ ٱلْمُدْحَضِينَ

Transliteration fasāhama fakāna mina l-mud'ḥaḍīna

Marathi १४१. मग (फासा टाकून) नाव काढले गेले, तेव्हा हे पराभूत झाले.

Verse 142

فَٱلْتَقَمَهُ ٱلْحُوتُ وَهُوَ مُلِيمٌ

Transliteration fal-taqamahu l-ḥūtu wahuwa mulīmun

Marathi १४२. मग त्यांना माशाने गिळून टाकले आणि ते स्वतःचाच धिःक्कार करू लागले.

Verse 143

فَلَوْلَآ أَنَّهُۥ كَانَ مِنَ ٱلْمُسَبِّحِينَ

Transliteration falawlā annahu kāna mina l-musabiḥīna

Marathi १४३. तेव्हा जर ते तस्बीह (अल्लाहचे गुणगान) करणाऱ्यांपैकी नसते.

Verse 144

لَلَبِثَ فِى بَطْنِهِۦٓ إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ

Transliteration lalabitha fī baṭnihi ilā yawmi yub'ʿathūna

Marathi १४४. तर लोकांना उठविले जाण्याच्या दिवसापर्यंत माशाच्या पोटातच राहिले असते.

Verse 145

۞ فَنَبَذْنَـٰهُ بِٱلْعَرَآءِ وَهُوَ سَقِيمٌ

Transliteration fanabadhnāhu bil-ʿarāi wahuwa saqīmun

Marathi १४५. तर आम्ही त्याला सपाट मैदानात टाकून दिले, आणि त्या वेळी तो आजारी होता.

Verse 146

وَأَنۢبَتْنَا عَلَيْهِ شَجَرَةً مِّن يَقْطِينٍ

Transliteration wa-anbatnā ʿalayhi shajaratan min yaqṭīnin

Marathi १४६. आणि त्याच्यावर सावली करणारे एक वेलीचे झाड उगविले.

Verse 147

وَأَرْسَلْنَـٰهُ إِلَىٰ مِا۟ئَةِ أَلْفٍ أَوْ يَزِيدُونَ

Transliteration wa-arsalnāhu ilā mi-ati alfin aw yazīdūna

Marathi १४७. आणि आम्ही त्यांना एक लाख, किंबहुना त्याहून जास्त लोकांकडे पाठविले.

Verse 148

فَـَٔامَنُوا۟ فَمَتَّعْنَـٰهُمْ إِلَىٰ حِينٍ

Transliteration faāmanū famattaʿnāhum ilā ḥīnin

Marathi १४८. तेव्हा त्यांनी ईमान राखले आणि आम्ही एका ठराविक मुदतपर्यंत त्यांना सुख सुविधा प्रदान केली.

Verse 149

فَٱسْتَفْتِهِمْ أَلِرَبِّكَ ٱلْبَنَاتُ وَلَهُمُ ٱلْبَنُونَ

Transliteration fa-is'taftihim alirabbika l-banātu walahumu l-banūna

Marathi १४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत?

Verse 150

أَمْ خَلَقْنَا ٱلْمَلَـٰٓئِكَةَ إِنَـٰثًا وَهُمْ شَـٰهِدُونَ

Transliteration am khalaqnā l-malāikata ināthan wahum shāhidūna

Marathi १५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले?

Verse 151

أَلَآ إِنَّهُم مِّنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ

Transliteration alā innahum min if'kihim layaqūlūna

Marathi १५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत.

Verse 152

وَلَدَ ٱللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَـٰذِبُونَ

Transliteration walada l-lahu wa-innahum lakādhibūna

Marathi १५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत.

Verse 153

أَصْطَفَى ٱلْبَنَاتِ عَلَى ٱلْبَنِينَ

Transliteration aṣṭafā l-banāti ʿalā l-banīna

Marathi १५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले?

Verse 154

مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ

Transliteration mā lakum kayfa taḥkumūna

Marathi १५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता?

Verse 155

أَفَلَا تَذَكَّرُونَ

Transliteration afalā tadhakkarūna

Marathi १५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही?

Verse 156

أَمْ لَكُمْ سُلْطَـٰنٌ مُّبِينٌ

Transliteration am lakum sul'ṭānun mubīnun

Marathi १५६. किंवा तुमच्याजवळ (त्याविषयी) एखादे स्पष्ट प्रमाण आहे?

Verse 157

فَأْتُوا۟ بِكِتَـٰبِكُمْ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ

Transliteration fatū bikitābikum in kuntum ṣādiqīna

Marathi १५७. तर मग जा, सच्चे असाल तर आपलाच ग्रंथ घेऊन या.

Verse 158

وَجَعَلُوا۟ بَيْنَهُۥ وَبَيْنَ ٱلْجِنَّةِ نَسَبًا ۚ وَلَقَدْ عَلِمَتِ ٱلْجِنَّةُ إِنَّهُمْ لَمُحْضَرُونَ

Transliteration wajaʿalū baynahu wabayna l-jinati nasaban walaqad ʿalimati l-jinatu innahum lamuḥ'ḍarūna

Marathi १५८. आणि त्या लोकांनी तर अल्लाह आणि जिन्नांच्या दरम्यानही नाते कायम केले आहे, आणि वास्तविक जिन्न लोक स्वतः हे ज्ञान बाळगतात की ते (अशी श्रद्धा राखणारे अज़ाबच्या समोर) प्रस्तुत केले जातील.

Verse 159

سُبْحَـٰنَ ٱللَّهِ عَمَّا يَصِفُونَ

Transliteration sub'ḥāna l-lahi ʿammā yaṣifūna

Marathi १५९. हे, जे काही (अल्लाहविषयी) सांगत आहेत, त्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाह पवित्र (अलिप्त) आहे.

Verse 160

إِلَّا عِبَادَ ٱللَّهِ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration illā ʿibāda l-lahi l-mukh'laṣīna

Marathi १६०. मात्र अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज.

Verse 161

فَإِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ

Transliteration fa-innakum wamā taʿbudūna

Marathi १६१. विश्वास करा की तुम्ही सर्व आणि तुमची (खोटी) उपास्ये.

Verse 162

مَآ أَنتُمْ عَلَيْهِ بِفَـٰتِنِينَ

Transliteration mā antum ʿalayhi bifātinīna

Marathi १६२. कोणा एकालाही बहकवू शकत नाही.

Verse 163

إِلَّا مَنْ هُوَ صَالِ ٱلْجَحِيمِ

Transliteration illā man huwa ṣāli l-jaḥīmi

Marathi १६३. मात्र त्यांच्याखेरीज, जे जहन्नममध्ये जाणारच आहेत.

Verse 164

وَمَا مِنَّآ إِلَّا لَهُۥ مَقَامٌ مَّعْلُومٌ

Transliteration wamā minnā illā lahu maqāmun maʿlūmun

Marathi १६४. (फरिश्त्यांचे कथन आहे) की आमच्यापैकी प्रत्येकाचे स्थान निर्धारित आहे.

Verse 165

وَإِنَّا لَنَحْنُ ٱلصَّآفُّونَ

Transliteration wa-innā lanaḥnu l-ṣāfūna

Marathi १६५. आणि आम्ही (अल्लाहच्या आज्ञापालनात) पंक्तिबद्ध (रांगांनी) उभे आहोत.

Verse 166

وَإِنَّا لَنَحْنُ ٱلْمُسَبِّحُونَ

Transliteration wa-innā lanaḥnu l-musabiḥūna

Marathi १६६. आणि त्याची तस्बीह (पावित्र्यगान) करीत आहोत.

Verse 167

وَإِن كَانُوا۟ لَيَقُولُونَ

Transliteration wa-in kānū layaqūlūna

Marathi १६७. आणि काफिर तर म्हणत असत

Verse 168

لَوْ أَنَّ عِندَنَا ذِكْرًا مِّنَ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration law anna ʿindanā dhik'ran mina l-awalīna

Marathi १६८. की जर आमच्याजवळ पूर्वीच्या लोकांची स्मृती असती

Verse 169

لَكُنَّا عِبَادَ ٱللَّهِ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration lakunnā ʿibāda l-lahi l-mukh'laṣīna

Marathi १६९. तर आम्ही देखील अल्लाहचे निवडक दास बनलो असतो.

Verse 170

فَكَفَرُوا۟ بِهِۦ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ

Transliteration fakafarū bihi fasawfa yaʿlamūna

Marathi १७०. परंतु मग त्यांनी या (कुरआना) चा इन्कार केला, तेव्हा त्यांना लवकरच कळून येईल.

Verse 171

وَلَقَدْ سَبَقَتْ كَلِمَتُنَا لِعِبَادِنَا ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration walaqad sabaqat kalimatunā liʿibādinā l-mur'salīna

Marathi १७१. आणि निःसंशय, आमचा वायदा आधीच आपल्या पैगंबरांकरिता लागू झालेला आहे

Verse 172

إِنَّهُمْ لَهُمُ ٱلْمَنصُورُونَ

Transliteration innahum lahumu l-manṣūrūna

Marathi १७२. की निःसंशय, त्याच लोकांची मदत केली जाईल.

Verse 173

وَإِنَّ جُندَنَا لَهُمُ ٱلْغَـٰلِبُونَ

Transliteration wa-inna jundanā lahumu l-ghālibūna

Marathi १७३. आणि आमचे सैन्य वर्चस्वशाली (आणि श्रेष्ठतम) राहील.

Verse 174

فَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ

Transliteration fatawalla ʿanhum ḥattā ḥīnin

Marathi १७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या.

Verse 175

وَأَبْصِرْهُمْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ

Transliteration wa-abṣir'hum fasawfa yub'ṣirūna

Marathi १७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील.

Verse 176

أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ

Transliteration afabiʿadhābinā yastaʿjilūna

Marathi १७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत.

Verse 177

فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَآءَ صَبَاحُ ٱلْمُنذَرِينَ

Transliteration fa-idhā nazala bisāḥatihim fasāa ṣabāḥu l-mundharīna

Marathi १७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल.

Verse 178

وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ

Transliteration watawalla ʿanhum ḥattā ḥīnin

Marathi १७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा.

Verse 179

وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ

Transliteration wa-abṣir fasawfa yub'ṣirūna

Marathi १७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील.

Verse 180

سُبْحَـٰنَ رَبِّكَ رَبِّ ٱلْعِزَّةِ عَمَّا يَصِفُونَ

Transliteration sub'ḥāna rabbika rabbi l-ʿizati ʿammā yaṣifūna

Marathi १८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात.

Verse 181

وَسَلَـٰمٌ عَلَى ٱلْمُرْسَلِينَ

Transliteration wasalāmun ʿalā l-mur'salīna

Marathi १८१. आणि पैगंबरांवर सलाम आहे.

Verse 182

وَٱلْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration wal-ḥamdu lillahi rabbi l-ʿālamīna

Marathi १८२. आणि समस्त प्रशंसा, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहकरिता आहे.

Read Surah As-Saffat in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.