MyDugsiStart learning

Surah Al-Anfal in Marathi: translation and audio

Surah 8 · الأنفال · The Spoils of War · 75 verses

Surah Al-Anfal verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Anfal word by word in English.

Verse 1

يَسْـَٔلُونَكَ عَنِ ٱلْأَنفَالِ ۖ قُلِ ٱلْأَنفَالُ لِلَّهِ وَٱلرَّسُولِ ۖ فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَأَصْلِحُوا۟ ذَاتَ بَيْنِكُمْ ۖ وَأَطِيعُوا۟ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥٓ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ

Transliteration yasalūnaka ʿani l-anfāli quli l-anfālu lillahi wal-rasūli fa-ittaqū l-laha wa-aṣliḥū dhāta baynikum wa-aṭīʿū l-laha warasūlahu in kuntum mu'minīna

Marathi १. हे लोक तुम्हाला प्राप्त झालेल्या धन-संपत्तीविषयी विचारतात, तुम्ही सांगा की युद्धात प्राप्त झालेली धन-संपत्ती अल्लाहची आहे, आणि पैगंबराची आहे. यास्तव तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि आपले आपसातील नातेसंबंध सुधारून घ्या आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा, जर तुम्ही ईमान राखणारे असाल.

Verse 2

إِنَّمَا ٱلْمُؤْمِنُونَ ٱلَّذِينَ إِذَا ذُكِرَ ٱللَّهُ وَجِلَتْ قُلُوبُهُمْ وَإِذَا تُلِيَتْ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُهُۥ زَادَتْهُمْ إِيمَـٰنًا وَعَلَىٰ رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ

Transliteration innamā l-mu'minūna alladhīna idhā dhukira l-lahu wajilat qulūbuhum wa-idhā tuliyat ʿalayhim āyātuhu zādathum īmānan waʿalā rabbihim yatawakkalūna

Marathi २. ईमान राखणारेच असे असतात की जेव्हा अल्लाहचे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये भयभीत होतात, आणि जेव्हा अल्लाहच्या आयती त्यांना वाचून ऐकविल्या जातात तर त्या आयती त्यांच्या ईमानास वृद्धिंगत करतात आणि ते लोक आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात.

Verse 3

ٱلَّذِينَ يُقِيمُونَ ٱلصَّلَوٰةَ وَمِمَّا رَزَقْنَـٰهُمْ يُنفِقُونَ

Transliteration alladhīna yuqīmūna l-ṣalata wamimmā razaqnāhum yunfiqūna

Marathi ३. जे नमाज नियमितपणे पढतात आणि आम्ही जे काही त्यांना दिले आहे, त्यातून खर्च करतात.

Verse 4

أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْمُؤْمِنُونَ حَقًّا ۚ لَّهُمْ دَرَجَـٰتٌ عِندَ رَبِّهِمْ وَمَغْفِرَةٌ وَرِزْقٌ كَرِيمٌ

Transliteration ulāika humu l-mu'minūna ḥaqqan lahum darajātun ʿinda rabbihim wamaghfiratun wariz'qun karīmun

Marathi ४. सच्चे ईमान राखणारे हेच लोक आहेत. त्यांच्याकरिता मोठे दर्जे आहेत त्यांच्या पालनकर्त्याजवळ आणि क्षमा आणि मान सन्मानपूर्ण रोजी (आजीविका) आहे.

Verse 5

كَمَآ أَخْرَجَكَ رَبُّكَ مِنۢ بَيْتِكَ بِٱلْحَقِّ وَإِنَّ فَرِيقًا مِّنَ ٱلْمُؤْمِنِينَ لَكَـٰرِهُونَ

Transliteration kamā akhrajaka rabbuka min baytika bil-ḥaqi wa-inna farīqan mina l-mu'minīna lakārihūna

Marathi ५. जसे की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्या घरापासून सत्यासह तुम्हाला बाहेर काढले आणि ईमानधारकांच्या एका गटाला हे असह्य वाटत होते.

Verse 6

يُجَـٰدِلُونَكَ فِى ٱلْحَقِّ بَعْدَ مَا تَبَيَّنَ كَأَنَّمَا يُسَاقُونَ إِلَى ٱلْمَوْتِ وَهُمْ يَنظُرُونَ

Transliteration yujādilūnaka fī l-ḥaqi baʿdamā tabayyana ka-annamā yusāqūna ilā l-mawti wahum yanẓurūna

Marathi ६. स्पष्ट कळून आल्यानंतर ते सत्याविषयी तुमच्याशी वाद घालत होते जणू काही ते मृत्युकडे हांकले जात असावेत आणि (त्याला) पाहत असावेत.

Verse 7

وَإِذْ يَعِدُكُمُ ٱللَّهُ إِحْدَى ٱلطَّآئِفَتَيْنِ أَنَّهَا لَكُمْ وَتَوَدُّونَ أَنَّ غَيْرَ ذَاتِ ٱلشَّوْكَةِ تَكُونُ لَكُمْ وَيُرِيدُ ٱللَّهُ أَن يُحِقَّ ٱلْحَقَّ بِكَلِمَـٰتِهِۦ وَيَقْطَعَ دَابِرَ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration wa-idh yaʿidukumu l-lahu iḥ'dā l-ṭāifatayni annahā lakum watawaddūna anna ghayra dhāti l-shawkati takūnu lakum wayurīdu l-lahu an yuḥiqqa l-ḥaqa bikalimātihi wayaqṭaʿa dābira l-kāfirīna

Marathi ७. आणि तुम्ही लोक त्या वेळेची आठवण करा, जेव्हा अल्लाह तुमच्याशी त्या दोन गटांपैकी एकाचा वायदा करीत होता की जो तुमच्या हाती लागेल आणि तुम्ही या आशेवर होते की शस्त्रे नसलेला गट तुमच्या हाती लागावा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहला मान्य होते की आपल्या हुकूमाने सत्याचे सत्य असणे सिद्ध करून द्यावे आणि त्या इन्कारी लोकांच्या मुळावर घाव घालावा.

Verse 8

لِيُحِقَّ ٱلْحَقَّ وَيُبْطِلَ ٱلْبَـٰطِلَ وَلَوْ كَرِهَ ٱلْمُجْرِمُونَ

Transliteration liyuḥiqqa l-ḥaqa wayub'ṭila l-bāṭila walaw kariha l-muj'rimūna

Marathi ८. यासाठी की सत्याचे सत्य असणे आणि असत्याचे असत्य असणे सिद्ध करावे, मग या अपराधी लोकांना अप्रिय का वाटेना.

Verse 9

إِذْ تَسْتَغِيثُونَ رَبَّكُمْ فَٱسْتَجَابَ لَكُمْ أَنِّى مُمِدُّكُم بِأَلْفٍ مِّنَ ٱلْمَلَـٰٓئِكَةِ مُرْدِفِينَ

Transliteration idh tastaghīthūna rabbakum fa-is'tajāba lakum annī mumiddukum bi-alfin mina l-malāikati mur'difīna

Marathi ९. त्या वेळेची आठवण करा, जेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्यास दुआ (प्रार्थना) करीत होते, मग सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुमची दुआ कबूल केली की मी तुमची एक हजार फरिश्त्यांद्वारे मदत करीन जे लागोपाठ येत जातील.

Verse 10

وَمَا جَعَلَهُ ٱللَّهُ إِلَّا بُشْرَىٰ وَلِتَطْمَئِنَّ بِهِۦ قُلُوبُكُمْ ۚ وَمَا ٱلنَّصْرُ إِلَّا مِنْ عِندِ ٱللَّهِ ۚ إِنَّ ٱللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٌ

Transliteration wamā jaʿalahu l-lahu illā bush'rā walitaṭma-inna bihi qulūbukum wamā l-naṣru illā min ʿindi l-lahi inna l-laha ʿazīzun ḥakīmun

Marathi १०. आणि अल्लाहनेही मदत केवळ या कारणास्तव केली की शुभ समाचार ठरावा आणि तुमच्या हृदयांना शांती समाधान लाभावे आणि विजय फक्त अल्लाहतर्फे आहे. निःसंशय अल्लाह अतिशय शक्तिशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.

Verse 11

إِذْ يُغَشِّيكُمُ ٱلنُّعَاسَ أَمَنَةً مِّنْهُ وَيُنَزِّلُ عَلَيْكُم مِّنَ ٱلسَّمَآءِ مَآءً لِّيُطَهِّرَكُم بِهِۦ وَيُذْهِبَ عَنكُمْ رِجْزَ ٱلشَّيْطَـٰنِ وَلِيَرْبِطَ عَلَىٰ قُلُوبِكُمْ وَيُثَبِّتَ بِهِ ٱلْأَقْدَامَ

Transliteration idh yughashīkumu l-nuʿāsa amanatan min'hu wayunazzilu ʿalaykum mina l-samāi māan liyuṭahhirakum bihi wayudh'hiba ʿankum rij'za l-shayṭāni waliyarbiṭa ʿalā qulūbikum wayuthabbita bihi l-aqdāma

Marathi ११. त्या वेळेची आठवण करा जेव्हा (अल्लाह) तुमच्यावर झोपेची गुंगी चढवित होता, आपल्याकडून शांती समाधान प्रदान करण्यासाठी आणि तुमच्यावर आकाशातून पर्जन्यवृष्टी करीत होता की या पाण्याद्वारे तुम्हाला पाक (स्वच्छ-शुद्ध) करावे आणि तुमच्यापासून सैतानी शंका-कुशंका दूर कराव्यात आणि तुमच्या हृदयांना मजबूत करावे आणि तुमचे पाय चांगले स्थिर करावेत.

Verse 12

إِذْ يُوحِى رَبُّكَ إِلَى ٱلْمَلَـٰٓئِكَةِ أَنِّى مَعَكُمْ فَثَبِّتُوا۟ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ۚ سَأُلْقِى فِى قُلُوبِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ٱلرُّعْبَ فَٱضْرِبُوا۟ فَوْقَ ٱلْأَعْنَاقِ وَٱضْرِبُوا۟ مِنْهُمْ كُلَّ بَنَانٍ

Transliteration idh yūḥī rabbuka ilā l-malāikati annī maʿakum fathabbitū alladhīna āmanū sa-ul'qī fī qulūbi alladhīna kafarū l-ruʿ'ba fa-iḍ'ribū fawqa l-aʿnāqi wa-iḍ'ribū min'hum kulla banānin

Marathi १२. त्या वेळेची आठवण करा, जेव्हा तुमचा पालनकर्ता फरिश्त्यांना आदेश देत होता की मी तुमच्या सोबतीला आहे, यास्तव तुम्ही ईमानधारकांचे साहस वाढवा. मी आताच काफिरांच्या मनात भय टाकतो. यास्तव तुम्ही मानांवर घाव घाला आणि त्यांच्या एक एक सांध्यावर प्रहार करा.

Verse 13

ذَٰلِكَ بِأَنَّهُمْ شَآقُّوا۟ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ ۚ وَمَن يُشَاقِقِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ فَإِنَّ ٱللَّهَ شَدِيدُ ٱلْعِقَابِ

Transliteration dhālika bi-annahum shāqqū l-laha warasūlahu waman yushāqiqi l-laha warasūlahu fa-inna l-laha shadīdu l-ʿiqābi

Marathi १३. ही या गोष्टीची शिक्षा आहे की त्यांनी अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला आणि जे लोक अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह सक्त सजा देणारा आहे.

Verse 14

ذَٰلِكُمْ فَذُوقُوهُ وَأَنَّ لِلْكَـٰفِرِينَ عَذَابَ ٱلنَّارِ

Transliteration dhālikum fadhūqūhu wa-anna lil'kāfirīna ʿadhāba l-nāri

Marathi १४. तेव्हा या शिक्षेची गोडी चाखा आणि लक्षात ठेवा की काफिरांकरिता (इन्कारी लोकांकरिता) आगीची शिक्षा-यातना ठरलेलीच आहे.

Verse 15

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِذَا لَقِيتُمُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ زَحْفًا فَلَا تُوَلُّوهُمُ ٱلْأَدْبَارَ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū idhā laqītumu alladhīna kafarū zaḥfan falā tuwallūhumu l-adbāra

Marathi १५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही काफिरांशी लढण्यास भिडाल, तेव्हा त्यांच्याकडून पाठ फिरवू नका.

Verse 16

وَمَن يُوَلِّهِمْ يَوْمَئِذٍ دُبُرَهُۥٓ إِلَّا مُتَحَرِّفًا لِّقِتَالٍ أَوْ مُتَحَيِّزًا إِلَىٰ فِئَةٍ فَقَدْ بَآءَ بِغَضَبٍ مِّنَ ٱللَّهِ وَمَأْوَىٰهُ جَهَنَّمُ ۖ وَبِئْسَ ٱلْمَصِيرُ

Transliteration waman yuwallihim yawma-idhin duburahu illā mutaḥarrifan liqitālin aw mutaḥayyizan ilā fi-atin faqad bāa bighaḍabin mina l-lahi wamawāhu jahannamu wabi'sa l-maṣīru

Marathi १६. आणि जो मनुष्य त्याप्रसंगी त्यांच्याकडून पाठ फिरविल, परंतु जर कोणी लढण्याचा पवित्रा बदलत असेल किंवा जो आपल्या समूहाकडे आश्रय घेण्यासाठी येत असेल (तर गोष्ट वेगळी) मात्र जो दुसरा असे करील तर तो अल्लाहचा प्रकोप ओढवून घेईल आणि त्याचे ठिकाण जहन्नम असेल, आणि ते अतिशय वाईट ठिकाण आहे.

Verse 17

فَلَمْ تَقْتُلُوهُمْ وَلَـٰكِنَّ ٱللَّهَ قَتَلَهُمْ ۚ وَمَا رَمَيْتَ إِذْ رَمَيْتَ وَلَـٰكِنَّ ٱللَّهَ رَمَىٰ ۚ وَلِيُبْلِىَ ٱلْمُؤْمِنِينَ مِنْهُ بَلَآءً حَسَنًا ۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ

Transliteration falam taqtulūhum walākinna l-laha qatalahum wamā ramayta idh ramayta walākinna l-laha ramā waliyub'liya l-mu'minīna min'hu balāan ḥasanan inna l-laha samīʿun ʿalīmun

Marathi १७. तेव्हा तुम्ही त्यांना ठार मारले नाही, किंबहुना अल्लाहने त्यांना ठार केले आणि तुम्ही (मूठभर धूळ) नाही फेकली, परंतु अल्लाहने फेकली, आणि यासाठी की ईमानधारकांना आपल्यातर्फे, त्यांच्या प्रयत्नाचा फार मोठा मोबदला प्रदान करावा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह खूप ऐकणारा, खूप जाणणारा आहे.

Verse 18

ذَٰلِكُمْ وَأَنَّ ٱللَّهَ مُوهِنُ كَيْدِ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration dhālikum wa-anna l-laha mūhinu kaydi l-kāfirīna

Marathi १८. (एक गोष्ट तर) ही झाली (दुसरी गोष्ट अशी) की सर्वश्रेष्ठ अल्लाहला काफिरांचे कट कारस्थान असफल करायचे होते.

Verse 19

إِن تَسْتَفْتِحُوا۟ فَقَدْ جَآءَكُمُ ٱلْفَتْحُ ۖ وَإِن تَنتَهُوا۟ فَهُوَ خَيْرٌ لَّكُمْ ۖ وَإِن تَعُودُوا۟ نَعُدْ وَلَن تُغْنِىَ عَنكُمْ فِئَتُكُمْ شَيْـًٔا وَلَوْ كَثُرَتْ وَأَنَّ ٱللَّهَ مَعَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration in tastaftiḥū faqad jāakumu l-fatḥu wa-in tantahū fahuwa khayrun lakum wa-in taʿūdū naʿud walan tugh'niya ʿankum fi-atukum shayan walaw kathurat wa-anna l-laha maʿa l-mu'minīna

Marathi १९. जर तुम्ही लोक निर्णय इच्छित असाल तर तो निर्णय तुमच्यासमोर आहे, आणि जर थांबाल तर हे तुमच्यासाठी फार उत्तम आहे आणि जर तुम्हीदेखील तेच काम कराल तर आम्हीदेखील तेच काम करू, मग तुमचा समुदाय तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही, मग संख्येने कितीही मोठा असो. खरी गोष्ट ही आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाह ईमान राखणाऱ्यांच्या सोबत आहे.

Verse 20

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ أَطِيعُوا۟ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ وَلَا تَوَلَّوْا۟ عَنْهُ وَأَنتُمْ تَسْمَعُونَ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū aṭīʿū l-laha warasūlahu walā tawallaw ʿanhu wa-antum tasmaʿūna

Marathi २०. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे आणि त्याच्या पैगंबराचे फर्मान माना आणि त्या (फर्मानाला कबूल करण्या) पासून तोंड फिरवू नका, ऐकून आणि जाणून घेतानाही.

Verse 21

وَلَا تَكُونُوا۟ كَٱلَّذِينَ قَالُوا۟ سَمِعْنَا وَهُمْ لَا يَسْمَعُونَ

Transliteration walā takūnū ka-alladhīna qālū samiʿ'nā wahum lā yasmaʿūna

Marathi २१. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, जे दावा तर करतात की आम्ही ऐकले, वास्तविक त्यांनी काहीच ऐकले नाही.

Verse 22

۞ إِنَّ شَرَّ ٱلدَّوَآبِّ عِندَ ٱللَّهِ ٱلصُّمُّ ٱلْبُكْمُ ٱلَّذِينَ لَا يَعْقِلُونَ

Transliteration inna sharra l-dawābi ʿinda l-lahi l-ṣumu l-buk'mu alladhīna lā yaʿqilūna

Marathi २२. निःसंशय समस्त प्राणीमात्रात अल्लाहच्या जवळ अतिशय वाईट ते लोक आहेत, जे बहीरे आहेत, मुके आहेत, जे किंचितही समजून घेत नाहीत.

Verse 23

وَلَوْ عَلِمَ ٱللَّهُ فِيهِمْ خَيْرًا لَّأَسْمَعَهُمْ ۖ وَلَوْ أَسْمَعَهُمْ لَتَوَلَّوا۟ وَّهُم مُّعْرِضُونَ

Transliteration walaw ʿalima l-lahu fīhim khayran la-asmaʿahum walaw asmaʿahum latawallaw wahum muʿ'riḍūna

Marathi २३. आणि जर अल्लाहला त्यांच्यात काही चांगुलपणा आढळला असता तर त्यांना श्रवणशक्ती प्रदान केली असती आणि जर त्यांना आता ऐकवीलही तरी ते तोंड फिरवतील दुर्लक्ष करीत.

Verse 24

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱسْتَجِيبُوا۟ لِلَّهِ وَلِلرَّسُولِ إِذَا دَعَاكُمْ لِمَا يُحْيِيكُمْ ۖ وَٱعْلَمُوٓا۟ أَنَّ ٱللَّهَ يَحُولُ بَيْنَ ٱلْمَرْءِ وَقَلْبِهِۦ وَأَنَّهُۥٓ إِلَيْهِ تُحْشَرُونَ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū is'tajībū lillahi walilrrasūli idhā daʿākum limā yuḥ'yīkum wa-iʿ'lamū anna l-laha yaḥūlu bayna l-mari waqalbihi wa-annahu ilayhi tuḥ'sharūna

Marathi २४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशांचे अनुसरण करा, जेव्हा पैगंबर तुम्हाला तुमच्या जीवनदायी विषयाकडे बोलावित असतील आणि स्मरण राखा की अल्लाह मानवाच्या आणि त्याच्या हृदयाच्या दरम्यान आड बनतो आणि निःसंशय तुम्हाला अल्लाहच्याच जवळ एकत्र व्हायचे आहे.

Verse 25

وَٱتَّقُوا۟ فِتْنَةً لَّا تُصِيبَنَّ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ مِنكُمْ خَآصَّةً ۖ وَٱعْلَمُوٓا۟ أَنَّ ٱللَّهَ شَدِيدُ ٱلْعِقَابِ

Transliteration wa-ittaqū fit'natan lā tuṣībanna alladhīna ẓalamū minkum khāṣṣatan wa-iʿ'lamū anna l-laha shadīdu l-ʿiqābi

Marathi २५. आणि तुम्ही अशा संकटापासून स्वतःला वाचवा, जे विशेषतः अशाच लोकांवर कोसळणार नाही जे तुमच्यापैकी त्या अपराधआंचे दोषी आहेत आणि हे जाणून असा की सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा सक्त शिक्षा देणारा आहे.

Verse 26

وَٱذْكُرُوٓا۟ إِذْ أَنتُمْ قَلِيلٌ مُّسْتَضْعَفُونَ فِى ٱلْأَرْضِ تَخَافُونَ أَن يَتَخَطَّفَكُمُ ٱلنَّاسُ فَـَٔاوَىٰكُمْ وَأَيَّدَكُم بِنَصْرِهِۦ وَرَزَقَكُم مِّنَ ٱلطَّيِّبَـٰتِ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ

Transliteration wa-udh'kurū idh antum qalīlun mus'taḍʿafūna fī l-arḍi takhāfūna an yatakhaṭṭafakumu l-nāsu faāwākum wa-ayyadakum binaṣrihi warazaqakum mina l-ṭayibāti laʿallakum tashkurūna

Marathi २६. आणि त्या अवस्थेचे स्मरण करा, जेव्हा तुम्ही धरतीवर थोडे होते कमजोर दुबळे मानले जात होते. या भयाने राहत होते की लोकांनी कदाचित तुम्हाला लुटून न घ्यावे, तेव्हा अल्लाहने तुम्हाला राहायला जागा दिली आणि तुम्हाला आपल्या मदतीने सामर्थ्य प्रदान केले, आणि तुम्हाला स्वच्छ शुद्ध अन्न-सामुग्री प्रदान केली, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.

Verse 27

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا تَخُونُوا۟ ٱللَّهَ وَٱلرَّسُولَ وَتَخُونُوٓا۟ أَمَـٰنَـٰتِكُمْ وَأَنتُمْ تَعْلَمُونَ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā takhūnū l-laha wal-rasūla watakhūnū amānātikum wa-antum taʿlamūna

Marathi २७. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाह आणि पैगंबराचा हक्क मारू नका आणि आपल्या सुरक्षित चीज-वस्तूंमध्ये विश्वासघात करू नका आणि तुम्ही चांगले जाणता.

Verse 28

وَٱعْلَمُوٓا۟ أَنَّمَآ أَمْوَٰلُكُمْ وَأَوْلَـٰدُكُمْ فِتْنَةٌ وَأَنَّ ٱللَّهَ عِندَهُۥٓ أَجْرٌ عَظِيمٌ

Transliteration wa-iʿ'lamū annamā amwālukum wa-awlādukum fit'natun wa-anna l-laha ʿindahu ajrun ʿaẓīmun

Marathi २८. आणि तुम्ही ही गोष्ट जाणून असा की तुमचे धन आणि तुमची संतती एक कसोटी म्हणून आहे.१ (आणि हेही जाणून असा की) सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या जवळ फार मोठा मोबदला आहे.

Verse 29

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِن تَتَّقُوا۟ ٱللَّهَ يَجْعَل لَّكُمْ فُرْقَانًا وَيُكَفِّرْ عَنكُمْ سَيِّـَٔاتِكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ۗ وَٱللَّهُ ذُو ٱلْفَضْلِ ٱلْعَظِيمِ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū in tattaqū l-laha yajʿal lakum fur'qānan wayukaffir ʿankum sayyiātikum wayaghfir lakum wal-lahu dhū l-faḍli l-ʿaẓīmi

Marathi २९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगत राहाल, तर अल्लाह तुम्हाला एक निर्णयाची गोष्ट प्रदान करील आणि तुमच्यापासून तुमचे अपराध दूर करील, आणि तुम्हाला माफ करील आणि अल्लाह मोठा कृपाशील आहे.

Verse 30

وَإِذْ يَمْكُرُ بِكَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِيُثْبِتُوكَ أَوْ يَقْتُلُوكَ أَوْ يُخْرِجُوكَ ۚ وَيَمْكُرُونَ وَيَمْكُرُ ٱللَّهُ ۖ وَٱللَّهُ خَيْرُ ٱلْمَـٰكِرِينَ

Transliteration wa-idh yamkuru bika alladhīna kafarū liyuth'bitūka aw yaqtulūka aw yukh'rijūka wayamkurūna wayamkuru l-lahu wal-lahu khayru l-mākirīna

Marathi ३०. आणि त्या घटनेचाही उल्लेख करा, जेव्हा काफिर (इन्कारी) लोक तुमच्याविषयी कट-कारस्थान रचत होते की तुम्हाला कैदी बनवून घ्यावे किंवा तुम्हाला ठार करावे किंवा तुम्हाला देशाबाहेर घालवावे आणि ते आपला कट रचत होते आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आपली योजना आखत होता आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वांत उत्तम योजना बनविणारा आहे.

Verse 31

وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُنَا قَالُوا۟ قَدْ سَمِعْنَا لَوْ نَشَآءُ لَقُلْنَا مِثْلَ هَـٰذَآ ۙ إِنْ هَـٰذَآ إِلَّآ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration wa-idhā tut'lā ʿalayhim āyātunā qālū qad samiʿ'nā law nashāu laqul'nā mith'la hādhā in hādhā illā asāṭīru l-awalīna

Marathi ३१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा म्हणतात की आम्ही ऐकले, जर आम्ही इच्छिले तर आम्हीदेखील याच्यासारखेच सांगून दाखवू. हे तर काहीच नाही फक्त पूर्वजांच्या पुरावा नसलेल्या गोष्टी आहेत.

Verse 32

وَإِذْ قَالُوا۟ ٱللَّهُمَّ إِن كَانَ هَـٰذَا هُوَ ٱلْحَقَّ مِنْ عِندِكَ فَأَمْطِرْ عَلَيْنَا حِجَارَةً مِّنَ ٱلسَّمَآءِ أَوِ ٱئْتِنَا بِعَذَابٍ أَلِيمٍ

Transliteration wa-idh qālū l-lahuma in kāna hādhā huwa l-ḥaqa min ʿindika fa-amṭir ʿalaynā ḥijāratan mina l-samāi awi i'tinā biʿadhābin alīmin

Marathi ३२. आणि जेव्हा ते लोक म्हणाले, हे अल्लाह! जर हा कुरआन खरोखरच तुझ्यातर्फे आहे तर आमच्यावर आकाशातून दगडांचा वर्षाव कर किंवा आमच्यावर एखादा दुःखदायक अज़ाब उतरव.

Verse 33

وَمَا كَانَ ٱللَّهُ لِيُعَذِّبَهُمْ وَأَنتَ فِيهِمْ ۚ وَمَا كَانَ ٱللَّهُ مُعَذِّبَهُمْ وَهُمْ يَسْتَغْفِرُونَ

Transliteration wamā kāna l-lahu liyuʿadhibahum wa-anta fīhim wamā kāna l-lahu muʿadhibahum wahum yastaghfirūna

Marathi ३३. आणि अल्लाह असे नाही करणार की त्यांच्यात तुम्ही असताना त्यांना शिक्षा-यातना देईल, आणि अल्लाह त्यांना शिक्षा देणार नाही, या अवस्थेत की ते क्षमा-याचनाही करीत असावेत.

Verse 34

وَمَا لَهُمْ أَلَّا يُعَذِّبَهُمُ ٱللَّهُ وَهُمْ يَصُدُّونَ عَنِ ٱلْمَسْجِدِ ٱلْحَرَامِ وَمَا كَانُوٓا۟ أَوْلِيَآءَهُۥٓ ۚ إِنْ أَوْلِيَآؤُهُۥٓ إِلَّا ٱلْمُتَّقُونَ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ

Transliteration wamā lahum allā yuʿadhibahumu l-lahu wahum yaṣuddūna ʿani l-masjidi l-ḥarāmi wamā kānū awliyāahu in awliyāuhu illā l-mutaqūna walākinna aktharahum lā yaʿlamūna

Marathi ३४. आणि त्यांच्यात असे काय आहे की, अल्लाहने त्यांना शिक्षा न द्यावी? असे असतानाही की ते लोकांना मसजिदे हराम (काबागृहा) पासून रोखतात, वास्तविक ते या मस्जिदीची देखभाल करणारे नाहीत. तिचे संरक्षक अल्लाहच्या आज्ञधारक दासांखेरीज कोणीही नाही, परंतु त्यांच्यातले अधिकांश लोक हे जाणत नाहीत.

Verse 35

وَمَا كَانَ صَلَاتُهُمْ عِندَ ٱلْبَيْتِ إِلَّا مُكَآءً وَتَصْدِيَةً ۚ فَذُوقُوا۟ ٱلْعَذَابَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ

Transliteration wamā kāna ṣalātuhum ʿinda l-bayti illā mukāan wataṣdiyatan fadhūqū l-ʿadhāba bimā kuntum takfurūna

Marathi ३५. आणि त्यांची नमाज काबागृहाजवळ फक्त हीच होती, शिट्या वाजविणे, टाळ्या वाजविणे. तेव्हा आपल्या इन्कारापायी या शिक्षा-यातनेचा स्वाद चाखा.

Verse 36

إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ يُنفِقُونَ أَمْوَٰلَهُمْ لِيَصُدُّوا۟ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۚ فَسَيُنفِقُونَهَا ثُمَّ تَكُونُ عَلَيْهِمْ حَسْرَةً ثُمَّ يُغْلَبُونَ ۗ وَٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِلَىٰ جَهَنَّمَ يُحْشَرُونَ

Transliteration inna alladhīna kafarū yunfiqūna amwālahum liyaṣuddū ʿan sabīli l-lahi fasayunfiqūnahā thumma takūnu ʿalayhim ḥasratan thumma yugh'labūna wa-alladhīna kafarū ilā jahannama yuḥ'sharūna

Marathi ३६. निःसंशय हे इन्कारी लोक आपले धन अशासाठी खर्च करीत आहेत की अल्लाहच्या मार्गापासून रोखावे तर हे लोक आपले धन असेच खर्च करत राहतील, मग ते धन त्यांच्यासाठी पश्चात्तापाचे कारण ठरेल, मग पराभूत होतील आणि काफिरांना जहन्नमकडे एकत्र केले जाईल.

Verse 37

لِيَمِيزَ ٱللَّهُ ٱلْخَبِيثَ مِنَ ٱلطَّيِّبِ وَيَجْعَلَ ٱلْخَبِيثَ بَعْضَهُۥ عَلَىٰ بَعْضٍ فَيَرْكُمَهُۥ جَمِيعًا فَيَجْعَلَهُۥ فِى جَهَنَّمَ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْخَـٰسِرُونَ

Transliteration liyamīza l-lahu l-khabītha mina l-ṭayibi wayajʿala l-khabītha baʿḍahu ʿalā baʿḍin fayarkumahu jamīʿan fayajʿalahu fī jahannama ulāika humu l-khāsirūna

Marathi ३७. यासाठी की अल्लाहने नापाक (अस्वच्छ-अशुद्ध) लोकांना पाक (स्वच्छ शुद्ध) लोकांपासून वेगळे करावे आणि नापाक लोकांची एकमेकांशी भेट करून द्यावी, मग त्या सर्वांना एकत्र करावे, मग त्या सर्वांना जहन्नममध्ये टाकावे. असे लोक पूर्णतः तोट्यात आहेत.

Verse 38

قُل لِّلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِن يَنتَهُوا۟ يُغْفَرْ لَهُم مَّا قَدْ سَلَفَ وَإِن يَعُودُوا۟ فَقَدْ مَضَتْ سُنَّتُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration qul lilladhīna kafarū in yantahū yugh'far lahum mā qad salafa wa-in yaʿūdū faqad maḍat sunnatu l-awalīna

Marathi ३८. तुम्ही इन्कारी लोकांना सांगा की जर हे लोक (अशी हरकत) थांबवतील तर यांचे सर्व अपराध, जे पूर्वी केले आहेत, माफ केले जातील, आणि जर आपली तीच रीत कायम राखतील तर पूर्वीच्या (काफिरांसाठी) नियम लागू झालेलाच आहे.

Verse 39

وَقَـٰتِلُوهُمْ حَتَّىٰ لَا تَكُونَ فِتْنَةٌ وَيَكُونَ ٱلدِّينُ كُلُّهُۥ لِلَّهِ ۚ فَإِنِ ٱنتَهَوْا۟ فَإِنَّ ٱللَّهَ بِمَا يَعْمَلُونَ بَصِيرٌ

Transliteration waqātilūhum ḥattā lā takūna fit'natun wayakūna l-dīnu kulluhu lillahi fa-ini intahaw fa-inna l-laha bimā yaʿmalūna baṣīrun

Marathi ३९. आणि तुम्ही त्यांच्याशी त्या वेळेपर्यंत संघर्ष करीत राहा की त्यांच्या श्रद्धेत बिघाड शिल्लक न राहावा आणि धर्म अल्लाहचाच व्हावा. मग जर हे (हरकती) थांबवतील तर अल्लाह त्यांच्या कर्मांना चांगल्या प्रकारे पाहतो.

Verse 40

وَإِن تَوَلَّوْا۟ فَٱعْلَمُوٓا۟ أَنَّ ٱللَّهَ مَوْلَىٰكُمْ ۚ نِعْمَ ٱلْمَوْلَىٰ وَنِعْمَ ٱلنَّصِيرُ

Transliteration wa-in tawallaw fa-iʿ'lamū anna l-laha mawlākum niʿ'ma l-mawlā waniʿ'ma l-naṣīru

Marathi ४०. आणि जर तोंड फिरवतील तर विश्वास ठेवा की सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमचा मित्र आहे. तो अतिशय चांगला मित्र आणि चांगला मदत करणारा आहे.

Verse 41

۞ وَٱعْلَمُوٓا۟ أَنَّمَا غَنِمْتُم مِّن شَىْءٍ فَأَنَّ لِلَّهِ خُمُسَهُۥ وَلِلرَّسُولِ وَلِذِى ٱلْقُرْبَىٰ وَٱلْيَتَـٰمَىٰ وَٱلْمَسَـٰكِينِ وَٱبْنِ ٱلسَّبِيلِ إِن كُنتُمْ ءَامَنتُم بِٱللَّهِ وَمَآ أَنزَلْنَا عَلَىٰ عَبْدِنَا يَوْمَ ٱلْفُرْقَانِ يَوْمَ ٱلْتَقَى ٱلْجَمْعَانِ ۗ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ

Transliteration wa-iʿ'lamū annamā ghanim'tum min shayin fa-anna lillahi khumusahu walilrrasūli walidhī l-qur'bā wal-yatāmā wal-masākīni wa-ib'ni l-sabīli in kuntum āmantum bil-lahi wamā anzalnā ʿalā ʿabdinā yawma l-fur'qāni yawma l-taqā l-jamʿāni wal-lahu ʿalā kulli shayin qadīrun

Marathi ४१. आणि जाणून घ्या की, युद्धात हस्तगत केलेला कोणत्याही प्रकारचा माल (धन-संपदा) तुम्ही प्राप्त कराल तर त्याचा पाचवा हिस्सा तर अल्लाह आणि रसूल आणि नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीब, आणि प्रवाशांकरिता आहे. जर तुम्ही अल्लाहवर ईमान राखले आहे आणि त्यावर जे आम्ही आपल्या दासावर त्या दिवशी अवतरित केले, जो सत्य आणि असत्याच्या दरम्यान अलगावाचा होता, ज्या दिवशी दोन्ही सैन्ये आपसात भिडली होती आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे. १

Verse 42

إِذْ أَنتُم بِٱلْعُدْوَةِ ٱلدُّنْيَا وَهُم بِٱلْعُدْوَةِ ٱلْقُصْوَىٰ وَٱلرَّكْبُ أَسْفَلَ مِنكُمْ ۚ وَلَوْ تَوَاعَدتُّمْ لَٱخْتَلَفْتُمْ فِى ٱلْمِيعَـٰدِ ۙ وَلَـٰكِن لِّيَقْضِىَ ٱللَّهُ أَمْرًا كَانَ مَفْعُولًا لِّيَهْلِكَ مَنْ هَلَكَ عَنۢ بَيِّنَةٍ وَيَحْيَىٰ مَنْ حَىَّ عَنۢ بَيِّنَةٍ ۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَسَمِيعٌ عَلِيمٌ

Transliteration idh antum bil-ʿud'wati l-dun'yā wahum bil-ʿud'wati l-quṣ'wā wal-rakbu asfala minkum walaw tawāʿadttum la-ikh'talaftum fī l-mīʿādi walākin liyaqḍiya l-lahu amran kāna mafʿūlan liyahlika man halaka ʿan bayyinatin wayaḥyā man ḥayya ʿan bayyinatin wa-inna l-laha lasamīʿun ʿalīmun

Marathi ४२. जेव्हा तुम्ही जवळच्या किनाऱ्यावर आणि ते दूरच्या किनाऱ्यावर होते आणि काफिला तुमच्यापासून (फार) खाली होता, जर तुम्ही आपसात वायदा केला असता तर ठरलेल्या वेळेवर पोहोचण्यात मतभेद केला असता, तथापि अल्लाहला एक काम करूनच टाकायचे होते, जे ठरले गेले होते, यासाठी की, जो नष्ट होईल, तो प्रमाणावर (अर्थात ठरलेले जाणून) नष्ट व्हावा आणि जो जिवंत राहील, तोदेखील प्रमाणावर (सत्य ओळखून) जिवंत राहावा, आणि अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा, जाणणारा आहे.

Verse 43

إِذْ يُرِيكَهُمُ ٱللَّهُ فِى مَنَامِكَ قَلِيلًا ۖ وَلَوْ أَرَىٰكَهُمْ كَثِيرًا لَّفَشِلْتُمْ وَلَتَنَـٰزَعْتُمْ فِى ٱلْأَمْرِ وَلَـٰكِنَّ ٱللَّهَ سَلَّمَ ۗ إِنَّهُۥ عَلِيمٌۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

Transliteration idh yurīkahumu l-lahu fī manāmika qalīlan walaw arākahum kathīran lafashil'tum walatanāzaʿtum fī l-amri walākinna l-laha sallama innahu ʿalīmun bidhāti l-ṣudūri

Marathi ४३. जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नात अल्लाहने त्यांची संख्या कमी दाखवली. जर त्यांना जास्त दाखविले असते तर तुम्ही भ्याड बनले असते आणि याबाबत आपसात मतभेद करू लागले असते, परंतु अल्लाहने (यापासून) वाचविले. निःसंशय अल्लाह छातीतल्या (मनात लपलेल्या) गोष्टीही जाणणारा आहे.

Verse 44

وَإِذْ يُرِيكُمُوهُمْ إِذِ ٱلْتَقَيْتُمْ فِىٓ أَعْيُنِكُمْ قَلِيلًا وَيُقَلِّلُكُمْ فِىٓ أَعْيُنِهِمْ لِيَقْضِىَ ٱللَّهُ أَمْرًا كَانَ مَفْعُولًا ۗ وَإِلَى ٱللَّهِ تُرْجَعُ ٱلْأُمُورُ

Transliteration wa-idh yurīkumūhum idhi l-taqaytum fī aʿyunikum qalīlan wayuqallilukum fī aʿyunihim liyaqḍiya l-lahu amran kāna mafʿūlan wa-ilā l-lahi tur'jaʿu l-umūru

Marathi ४४. आणि जेव्हा त्याने भेट होतेवेळी त्यांना तुमच्या नजरेत फार कमी (संख्येने) दाखविले आणि तुम्हाला त्यांच्या नजरेत कमी दाखविले अशासाठी की अल्लाहने ते कार्य तडीस न्यावे, जे करायचेच होते आणि सर्व कार्ये अल्लाहकडेच वळविली जातात.

Verse 45

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِذَا لَقِيتُمْ فِئَةً فَٱثْبُتُوا۟ وَٱذْكُرُوا۟ ٱللَّهَ كَثِيرًا لَّعَلَّكُمْ تُفْلِحُونَ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū idhā laqītum fi-atan fa-uth'butū wa-udh'kurū l-laha kathīran laʿallakum tuf'liḥūna

Marathi ४५. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही एखाद्या (शत्रू) सैन्याशी भिडाल, तेव्हा अटळ राहा आणि अल्लाहचे जास्तीत जास्त स्मरण करा, यासाठी की तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी.

Verse 46

وَأَطِيعُوا۟ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ وَلَا تَنَـٰزَعُوا۟ فَتَفْشَلُوا۟ وَتَذْهَبَ رِيحُكُمْ ۖ وَٱصْبِرُوٓا۟ ۚ إِنَّ ٱللَّهَ مَعَ ٱلصَّـٰبِرِينَ

Transliteration wa-aṭīʿū l-laha warasūlahu walā tanāzaʿū fatafshalū watadhhaba rīḥukum wa-iṣ'birū inna l-laha maʿa l-ṣābirīna

Marathi ४६. आणि अल्लाहचे आणि त्याच्या रसूल (पैगंबर) चे आज्ञापालन करीत राहा, आपसात मतभेद ठेवू नका, अन्यथा भ्याड व भित्रे व्हाल, आणि तुमचा पाया डळमळीत होईल आणि तुमचा जोम नाहीसा होईल आणि धैर्य-संयम व विश्वास राखा. निःसंशय अल्लाह धीर-संयम राखणाऱ्यांच्या पाठीशी आहे.

Verse 47

وَلَا تَكُونُوا۟ كَٱلَّذِينَ خَرَجُوا۟ مِن دِيَـٰرِهِم بَطَرًا وَرِئَآءَ ٱلنَّاسِ وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۚ وَٱللَّهُ بِمَا يَعْمَلُونَ مُحِيطٌ

Transliteration walā takūnū ka-alladhīna kharajū min diyārihim baṭaran wariāa l-nāsi wayaṣuddūna ʿan sabīli l-lahi wal-lahu bimā yaʿmalūna muḥīṭun

Marathi ४७. आणि त्या लोकांसारखे होऊ नका, जे मोठी घमेंड दाखवित आणि लोकांमध्ये अभिमान व अहंकार करीत आपल्या घरापासून चालले होते आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखत होते. जे काही ते करीत आहेत अल्लाह त्यास घेरून टाकणारा आहे.

Verse 48

وَإِذْ زَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيْطَـٰنُ أَعْمَـٰلَهُمْ وَقَالَ لَا غَالِبَ لَكُمُ ٱلْيَوْمَ مِنَ ٱلنَّاسِ وَإِنِّى جَارٌ لَّكُمْ ۖ فَلَمَّا تَرَآءَتِ ٱلْفِئَتَانِ نَكَصَ عَلَىٰ عَقِبَيْهِ وَقَالَ إِنِّى بَرِىٓءٌ مِّنكُمْ إِنِّىٓ أَرَىٰ مَا لَا تَرَوْنَ إِنِّىٓ أَخَافُ ٱللَّهَ ۚ وَٱللَّهُ شَدِيدُ ٱلْعِقَابِ

Transliteration wa-idh zayyana lahumu l-shayṭānu aʿmālahum waqāla lā ghāliba lakumu l-yawma mina l-nāsi wa-innī jārun lakum falammā tarāati l-fi-atāni nakaṣa ʿalā ʿaqibayhi waqāla innī barīon minkum innī arā mā lā tarawna innī akhāfu l-laha wal-lahu shadīdu l-ʿiqābi

Marathi ४८. आणि जेव्हा त्यांच्या कर्मांना सैतान त्यांना सुशोभित करून दाखवित होता आणि सांगत होता की माणसांपैकी कोणीही आज तुमच्यावर वर्चस्वशाली होऊ शकत नाही. मी स्वतः तुमचा समर्थक आहे, परंतु जेव्हा दोन्ही गट जाहीर झाले, तेव्हा आपल्या उलटपावली फिराला आणि म्हणू लागला की मी तर तुमच्यापासून वेगळा आहे, विभक्त आहे. मी ते काही पाहत आहे जे तुम्ही पाहत नाही. मी अल्लाहचे भय बाळगतो आणि अल्लाह मोठा सक्त अज़ाब देणारा आहे.

Verse 49

إِذْ يَقُولُ ٱلْمُنَـٰفِقُونَ وَٱلَّذِينَ فِى قُلُوبِهِم مَّرَضٌ غَرَّ هَـٰٓؤُلَآءِ دِينُهُمْ ۗ وَمَن يَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ فَإِنَّ ٱللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٌ

Transliteration idh yaqūlu l-munāfiqūna wa-alladhīna fī qulūbihim maraḍun gharra hāulāi dīnuhum waman yatawakkal ʿalā l-lahi fa-inna l-laha ʿazīzun ḥakīmun

Marathi ४९. जेव्हा मुनाफिक (ढोंगी) लोक म्हणत होते आणि तेदेखील, ज्यांच्या मनात रोग होता की त्यांना तर त्यांच्या धर्माने धोक्यात टाकले आहे. आणि जो मनुष्यदेखील अल्लाहवर भरोसा करील तर सर्वश्रेष्ठ अल्लाह निश्चितच मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे.

Verse 50

وَلَوْ تَرَىٰٓ إِذْ يَتَوَفَّى ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ۙ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ يَضْرِبُونَ وُجُوهَهُمْ وَأَدْبَـٰرَهُمْ وَذُوقُوا۟ عَذَابَ ٱلْحَرِيقِ

Transliteration walaw tarā idh yatawaffā alladhīna kafarū l-malāikatu yaḍribūna wujūhahum wa-adbārahum wadhūqū ʿadhāba l-ḥarīqi

Marathi ५०. आणि तुम्ही जर ते दृश्य पाहिले असते जेव्हा फरिश्ते काफिरांचे (ईमान न राखणाऱ्यांचे) प्राण काढतात, त्यांच्या तोंडावर आणि कमरेवर मारतात (आणि म्हणतात) तुम्ही जळण्याच्या शिक्षेची गोडी चाखा.

Verse 51

ذَٰلِكَ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيكُمْ وَأَنَّ ٱللَّهَ لَيْسَ بِظَلَّـٰمٍ لِّلْعَبِيدِ

Transliteration dhālika bimā qaddamat aydīkum wa-anna l-laha laysa biẓallāmin lil'ʿabīdi

Marathi ५१. हे त्या कर्मांमुळे, जी तुमच्या हातांनी पूर्वीच पाठवून ठेवलीत. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या दासांवर किंचितही जुलूम- अत्याचार करीत नाही.

Verse 52

كَدَأْبِ ءَالِ فِرْعَوْنَ ۙ وَٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ كَفَرُوا۟ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ فَأَخَذَهُمُ ٱللَّهُ بِذُنُوبِهِمْ ۗ إِنَّ ٱللَّهَ قَوِىٌّ شَدِيدُ ٱلْعِقَابِ

Transliteration kadabi āli fir'ʿawna wa-alladhīna min qablihim kafarū biāyāti l-lahi fa-akhadhahumu l-lahu bidhunūbihim inna l-laha qawiyyun shadīdu l-ʿiqābi

Marathi ५२. फिरऔनच्या अनुयायींच्या अवस्थेसारखे आणि त्यांच्या बुजूर्ग लोकांच्या की त्यांनी अल्लाहच्या आयतींवर विश्वास ठेवला नाही, तेव्हा अल्लाहने त्यांच्या अपराधांपायी त्यांना धरले. निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि त्याची शिक्षा मोठी सक्त आहे.

Verse 53

ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ لَمْ يَكُ مُغَيِّرًا نِّعْمَةً أَنْعَمَهَا عَلَىٰ قَوْمٍ حَتَّىٰ يُغَيِّرُوا۟ مَا بِأَنفُسِهِمْ ۙ وَأَنَّ ٱللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ

Transliteration dhālika bi-anna l-laha lam yaku mughayyiran niʿ'matan anʿamahā ʿalā qawmin ḥattā yughayyirū mā bi-anfusihim wa-anna l-laha samīʿun ʿalīmun

Marathi ५३. हे अशासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाह असा नाही की एखाद्या जनसमूहावर एखादी कृपा देणगी (नेमत) प्रदान करून पुन्हा बदलून टाकील, जोपर्यंत तो स्वतः आपल्या त्या अवस्थेला बदलून टाकत नाही, जी त्यांची स्वतःची होती१ आणि हे की सर्वश्रेष्ठ अल्लाह ऐकणारा जाणणारा आहे.

Verse 54

كَدَأْبِ ءَالِ فِرْعَوْنَ ۙ وَٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِ رَبِّهِمْ فَأَهْلَكْنَـٰهُم بِذُنُوبِهِمْ وَأَغْرَقْنَآ ءَالَ فِرْعَوْنَ ۚ وَكُلٌّ كَانُوا۟ ظَـٰلِمِينَ

Transliteration kadabi āli fir'ʿawna wa-alladhīna min qablihim kadhabū biāyāti rabbihim fa-ahlaknāhum bidhunūbihim wa-aghraqnā āla fir'ʿawna wakullun kānū ẓālimīna

Marathi ५४. फिरऔनचे लोक आणि त्याच्या पूर्वीच्या लोकांप्रमाणे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या गोष्टींना खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्याच्या अपराधांपायी त्यांना बरबाद करून टाकले आणि फिरऔनवाल्यांना बुडवून टाकले आणि हे सर्व अत्याचारी होते.

Verse 55

إِنَّ شَرَّ ٱلدَّوَآبِّ عِندَ ٱللَّهِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ فَهُمْ لَا يُؤْمِنُونَ

Transliteration inna sharra l-dawābi ʿinda l-lahi alladhīna kafarū fahum lā yu'minūna

Marathi ५५. समस्त सजीवांमध्ये सर्वाधिक वाईट अल्लाहच्या जवळ ते लोक आहेत जे कुप्र (इन्कार) करतात, मग ते ईमान राखत नाहीत.

Verse 56

ٱلَّذِينَ عَـٰهَدتَّ مِنْهُمْ ثُمَّ يَنقُضُونَ عَهْدَهُمْ فِى كُلِّ مَرَّةٍ وَهُمْ لَا يَتَّقُونَ

Transliteration alladhīna ʿāhadtta min'hum thumma yanquḍūna ʿahdahum fī kulli marratin wahum lā yattaqūna

Marathi ५६. ज्यांच्याकडून तुम्ही वचन घेतले, तरीही ते दरवेळेस आपल्या वचनाचा भंग करतात आणि कधीही अल्लाहचे भय राखून वागत नाही.

Verse 57

فَإِمَّا تَثْقَفَنَّهُمْ فِى ٱلْحَرْبِ فَشَرِّدْ بِهِم مَّنْ خَلْفَهُمْ لَعَلَّهُمْ يَذَّكَّرُونَ

Transliteration fa-immā tathqafannahum fī l-ḥarbi fasharrid bihim man khalfahum laʿallahum yadhakkarūna

Marathi ५७. यास्तव जेव्हा तुम्ही त्याच्यावर युद्धात वर्चस्वशाली ठराल, तेव्हा त्यांना असा जबरदस्त मार द्या की त्यांच्या मागे असलेल्यांनीही पळ काढावा. कदाचित त्यांनी बोध ग्रहण करावा.

Verse 58

وَإِمَّا تَخَافَنَّ مِن قَوْمٍ خِيَانَةً فَٱنۢبِذْ إِلَيْهِمْ عَلَىٰ سَوَآءٍ ۚ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ ٱلْخَآئِنِينَ

Transliteration wa-immā takhāfanna min qawmin khiyānatan fa-inbidh ilayhim ʿalā sawāin inna l-laha lā yuḥibbu l-khāinīna

Marathi ५८. आणि जर तुम्हाला एखाद्या जनसमूहाकडून धोका किंवा दगाबाजी केली जाण्याचे भय असेल तर समानतेच्या स्थितीत त्यांचा समझोता तोडून टाका. अल्लाह विश्वासघात (अपहार) करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.

Verse 59

وَلَا يَحْسَبَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ سَبَقُوٓا۟ ۚ إِنَّهُمْ لَا يُعْجِزُونَ

Transliteration walā yaḥsabanna alladhīna kafarū sabaqū innahum lā yuʿ'jizūna

Marathi ५९. आणि इन्कारी लोकांनी हा विचार करू नये की ते पळ काढतील. यात शंका नाही की ते लाचार व अगतिक करू शकत नाही.

Verse 60

وَأَعِدُّوا۟ لَهُم مَّا ٱسْتَطَعْتُم مِّن قُوَّةٍ وَمِن رِّبَاطِ ٱلْخَيْلِ تُرْهِبُونَ بِهِۦ عَدُوَّ ٱللَّهِ وَعَدُوَّكُمْ وَءَاخَرِينَ مِن دُونِهِمْ لَا تَعْلَمُونَهُمُ ٱللَّهُ يَعْلَمُهُمْ ۚ وَمَا تُنفِقُوا۟ مِن شَىْءٍ فِى سَبِيلِ ٱللَّهِ يُوَفَّ إِلَيْكُمْ وَأَنتُمْ لَا تُظْلَمُونَ

Transliteration wa-aʿiddū lahum mā is'taṭaʿtum min quwwatin wamin ribāṭi l-khayli tur'hibūna bihi ʿaduwwa l-lahi waʿaduwwakum waākharīna min dūnihim lā taʿlamūnahumu l-lahu yaʿlamuhum wamā tunfiqū min shayin fī sabīli l-lahi yuwaffa ilaykum wa-antum lā tuẓ'lamūna

Marathi ६०. आणि तुम्ही त्यांच्याशी लढण्याकरिता आपल्या क्षमतेनुसार सामर्थ्य तयार करा आणि घोडे तयार ठेवण्याचेही की त्याद्वारे तुम्ही अल्लाहच्या शत्रूंना आणि आपल्या शत्रूंना भयभीत करू शकावे, आणि त्यांच्याखेरीज इतरांनाही, ज्यांना तुम्ही जाणत नाहीत, अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि जे काही अल्लाहच्या मार्गात खर्च कराल ते तुम्हाला पुरेपूर दिले जाईल आणि तुमच्या हक्काचे नुकसान केले जाणार नाही.

Verse 61

۞ وَإِن جَنَحُوا۟ لِلسَّلْمِ فَٱجْنَحْ لَهَا وَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ ۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ

Transliteration wa-in janaḥū lilssalmi fa-ij'naḥ lahā watawakkal ʿalā l-lahi innahu huwa l-samīʿu l-ʿalīmu

Marathi ६१. आणि जर ते समझोत्याकडे झुकतील, तर तुम्हीही समझोत्याकडे झुका आणि अल्लाहवर भरोसा ठेवा. निःसंशय अल्लाह ऐकणारा जाणणारा आहे.

Verse 62

وَإِن يُرِيدُوٓا۟ أَن يَخْدَعُوكَ فَإِنَّ حَسْبَكَ ٱللَّهُ ۚ هُوَ ٱلَّذِىٓ أَيَّدَكَ بِنَصْرِهِۦ وَبِٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration wa-in yurīdū an yakhdaʿūka fa-inna ḥasbaka l-lahu huwa alladhī ayyadaka binaṣrihi wabil-mu'minīna

Marathi ६२. आणि जर ते तुमच्याशी धोकेबाजी करू इच्छितील तर अल्लाह तुमच्यासाठी पुरेसा आहे. त्यानेच आपल्या मदतीद्वारे आणि ईमानधारकांद्वारे तुम्हाला समर्थन दिले आहे.

Verse 63

وَأَلَّفَ بَيْنَ قُلُوبِهِمْ ۚ لَوْ أَنفَقْتَ مَا فِى ٱلْأَرْضِ جَمِيعًا مَّآ أَلَّفْتَ بَيْنَ قُلُوبِهِمْ وَلَـٰكِنَّ ٱللَّهَ أَلَّفَ بَيْنَهُمْ ۚ إِنَّهُۥ عَزِيزٌ حَكِيمٌ

Transliteration wa-allafa bayna qulūbihim law anfaqta mā fī l-arḍi jamīʿan mā allafta bayna qulūbihim walākinna l-laha allafa baynahum innahu ʿazīzun ḥakīmun

Marathi ६३. आणि त्यांच्या मनात एकमेकांचे प्रेमही त्यानेच निर्माण केले आहे. जर तुम्ही धरतीच्या समस्त चीज-वस्तू खर्च केल्या असत्या, तरीही त्याच्या मनात प्रेम-भावना निर्माण करू शकत नव्हते, परंतु अल्लाहनेच त्यांच्या मनात प्रेम टाकले. निःसंशय तो वर्चस्वशाली हिकमत बाळगणारा आहे.

Verse 64

يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ حَسْبُكَ ٱللَّهُ وَمَنِ ٱتَّبَعَكَ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration yāayyuhā l-nabiyu ḥasbuka l-lahu wamani ittabaʿaka mina l-mu'minīna

Marathi ६४. हे पैगंबर! तुमच्यासाठी आणि तुमचे अनुसरण करणाऱ्या ईमानधारकांसाठी अल्लाह पुरेसा आहे.

Verse 65

يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ حَرِّضِ ٱلْمُؤْمِنِينَ عَلَى ٱلْقِتَالِ ۚ إِن يَكُن مِّنكُمْ عِشْرُونَ صَـٰبِرُونَ يَغْلِبُوا۟ مِا۟ئَتَيْنِ ۚ وَإِن يَكُن مِّنكُم مِّا۟ئَةٌ يَغْلِبُوٓا۟ أَلْفًا مِّنَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَّا يَفْقَهُونَ

Transliteration yāayyuhā l-nabiyu ḥarriḍi l-mu'minīna ʿalā l-qitāli in yakun minkum ʿish'rūna ṣābirūna yaghlibū mi-atayni wa-in yakun minkum mi-atun yaghlibū alfan mina alladhīna kafarū bi-annahum qawmun lā yafqahūna

Marathi ६५. हे पैगंबर! ईमानधारकांना जिहाद (धर्मयुद्धा) साठी प्रोत्साहित करा. जर तुमच्यापैकी वीस धैर्यशालीही असतील तर ते दोनशे जणांवर वर्चस्वशाली राहतील आणि जर तुमच्यापैकी शंभर असतील तर एक हजार ईमान न राखणाऱ्यांवर वर्चस्वशाली राहतील. या कारणाने की ते नासमज लोक आहेत.

Verse 66

ٱلْـَٔـٰنَ خَفَّفَ ٱللَّهُ عَنكُمْ وَعَلِمَ أَنَّ فِيكُمْ ضَعْفًا ۚ فَإِن يَكُن مِّنكُم مِّا۟ئَةٌ صَابِرَةٌ يَغْلِبُوا۟ مِا۟ئَتَيْنِ ۚ وَإِن يَكُن مِّنكُمْ أَلْفٌ يَغْلِبُوٓا۟ أَلْفَيْنِ بِإِذْنِ ٱللَّهِ ۗ وَٱللَّهُ مَعَ ٱلصَّـٰبِرِينَ

Transliteration al-āna khaffafa l-lahu ʿankum waʿalima anna fīkum ḍaʿfan fa-in yakun minkum mi-atun ṣābiratun yaghlibū mi-atayni wa-in yakun minkum alfun yaghlibū alfayni bi-idh'ni l-lahi wal-lahu maʿa l-ṣābirīna

Marathi ६६. आता अल्लाह तुमचे ओझे हलके करतो. तो चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या दुर्बलता आहे, तेव्हा जर तुमच्यापैकी शंभर धैर्यशील असतील तर ते दोनशे जणांवर वर्चस्वशाली राहतील. आणि जर तुमच्यापैकी एक हजार असतील तर ते अल्लाहच्या हुकुमाने दोन हजार (शत्रूंवर) वर्चस्वशाली असतील आणि अल्लाह धैय-संयम राखणाऱ्या लोकांच्या सोबत आहे.

Verse 67

مَا كَانَ لِنَبِىٍّ أَن يَكُونَ لَهُۥٓ أَسْرَىٰ حَتَّىٰ يُثْخِنَ فِى ٱلْأَرْضِ ۚ تُرِيدُونَ عَرَضَ ٱلدُّنْيَا وَٱللَّهُ يُرِيدُ ٱلْـَٔاخِرَةَ ۗ وَٱللَّهُ عَزِيزٌ حَكِيمٌ

Transliteration mā kāna linabiyyin an yakūna lahu asrā ḥattā yuth'khina fī l-arḍi turīdūna ʿaraḍa l-dun'yā wal-lahu yurīdu l-ākhirata wal-lahu ʿazīzun ḥakīmun

Marathi ६७. पैगंबरांच्या हाती कैदी असायला नको, जोपर्यंत देशात हिंसक युद्ध न व्हावे. तुम्ही तर या जगाचे धन इच्छिता आणि अल्लाहचा इरादा आखिरतचा आहे आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.

Verse 68

لَّوْلَا كِتَـٰبٌ مِّنَ ٱللَّهِ سَبَقَ لَمَسَّكُمْ فِيمَآ أَخَذْتُمْ عَذَابٌ عَظِيمٌ

Transliteration lawlā kitābun mina l-lahi sabaqa lamassakum fīmā akhadhtum ʿadhābun ʿaẓīmun

Marathi ६८. जर पूर्वीपासूनच अल्लाहतर्फे हे लिखित नसते तर जे काही तुम्ही घेतले आहे, त्याच्याविषयी तुम्हाला एखादी सक्त शिक्षा झाली असती.

Verse 69

فَكُلُوا۟ مِمَّا غَنِمْتُمْ حَلَـٰلًا طَيِّبًا ۚ وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ ۚ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration fakulū mimmā ghanim'tum ḥalālan ṭayyiban wa-ittaqū l-laha inna l-laha ghafūrun raḥīmun

Marathi ६९. आणि जे हलाल आणि स्वच्छ शुद्ध धन युद्धाद्वारे प्राप्त करून घ्याल ते खा आणि अल्लाहचे भय बाळगून राहा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.

Verse 70

يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ قُل لِّمَن فِىٓ أَيْدِيكُم مِّنَ ٱلْأَسْرَىٰٓ إِن يَعْلَمِ ٱللَّهُ فِى قُلُوبِكُمْ خَيْرًا يُؤْتِكُمْ خَيْرًا مِّمَّآ أُخِذَ مِنكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ۗ وَٱللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration yāayyuhā l-nabiyu qul liman fī aydīkum mina l-asrā in yaʿlami l-lahu fī qulūbikum khayran yu'tikum khayran mimmā ukhidha minkum wayaghfir lakum wal-lahu ghafūrun raḥīmun

Marathi ७०. हे पैगंबर! आपल्या हाताखालच्या कैद्यांना सांगा की जर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या मनात नेक इरादा पाहील तर जे काही तुमच्याडून घेतले गेले आहे, त्याहून चांगले तुम्हाला प्रदान करील आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.

Verse 71

وَإِن يُرِيدُوا۟ خِيَانَتَكَ فَقَدْ خَانُوا۟ ٱللَّهَ مِن قَبْلُ فَأَمْكَنَ مِنْهُمْ ۗ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ

Transliteration wa-in yurīdū khiyānataka faqad khānū l-laha min qablu fa-amkana min'hum wal-lahu ʿalīmun ḥakīmun

Marathi ७१. आणि जर ते तुमच्याशी विश्वासघात करण्याचा इरादा करतील, तर यांनी याच्यापूर्वी खुद्द अल्लाहशी विश्वासघात केलेला आहे. शेवटी त्याने त्यांना कैद करविले आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वज्ञ, हिकमतशाही आहे.

Verse 72

إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَهَاجَرُوا۟ وَجَـٰهَدُوا۟ بِأَمْوَٰلِهِمْ وَأَنفُسِهِمْ فِى سَبِيلِ ٱللَّهِ وَٱلَّذِينَ ءَاوَوا۟ وَّنَصَرُوٓا۟ أُو۟لَـٰٓئِكَ بَعْضُهُمْ أَوْلِيَآءُ بَعْضٍ ۚ وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَلَمْ يُهَاجِرُوا۟ مَا لَكُم مِّن وَلَـٰيَتِهِم مِّن شَىْءٍ حَتَّىٰ يُهَاجِرُوا۟ ۚ وَإِنِ ٱسْتَنصَرُوكُمْ فِى ٱلدِّينِ فَعَلَيْكُمُ ٱلنَّصْرُ إِلَّا عَلَىٰ قَوْمٍۭ بَيْنَكُمْ وَبَيْنَهُم مِّيثَـٰقٌ ۗ وَٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ

Transliteration inna alladhīna āmanū wahājarū wajāhadū bi-amwālihim wa-anfusihim fī sabīli l-lahi wa-alladhīna āwaw wanaṣarū ulāika baʿḍuhum awliyāu baʿḍin wa-alladhīna āmanū walam yuhājirū mā lakum min walāyatihim min shayin ḥattā yuhājirū wa-ini is'tanṣarūkum fī l-dīni faʿalaykumu l-naṣru illā ʿalā qawmin baynakum wabaynahum mīthāqun wal-lahu bimā taʿmalūna baṣīrun

Marathi ७२. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि अल्लाहसाठी देशत्याग केला अर्थात हिजरत केली आणि जिहाद केले धनाने व मनाने अल्लाहच्या मार्गात, आणि ज्यांनी अशा लोकांना आश्रय दिला, आणि त्यांना मदत केली तर ते एकमेकांचे आपसात मित्र आहेत आणि ज्यांनी ईमान राखले, पण देशत्याग केला नाही तर तुमच्याशी त्यांची किंचितही मैत्री नाही, परंतु जर ते धर्माच्या बाबतीत तुमच्याकडे मदत मागतील तर त्यांना मदत करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे, मात्र त्या लोकांखेरीज, की तुमच्या व त्यांच्या दरम्यान प्रतिज्ञा करार झाला आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे.

Verse 73

وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بَعْضُهُمْ أَوْلِيَآءُ بَعْضٍ ۚ إِلَّا تَفْعَلُوهُ تَكُن فِتْنَةٌ فِى ٱلْأَرْضِ وَفَسَادٌ كَبِيرٌ

Transliteration wa-alladhīna kafarū baʿḍuhum awliyāu baʿḍin illā tafʿalūhu takun fit'natun fī l-arḍi wafasādun kabīrun

Marathi ७३. आणि काफिर (ईमान न राखणारे) एकमेकांचे मित्र आहेत, जर तुम्ही असे केले नाही तर देशात उपद्रव पसरेल आणि मोठा उत्पात निर्माण होईल.

Verse 74

وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَهَاجَرُوا۟ وَجَـٰهَدُوا۟ فِى سَبِيلِ ٱللَّهِ وَٱلَّذِينَ ءَاوَوا۟ وَّنَصَرُوٓا۟ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْمُؤْمِنُونَ حَقًّا ۚ لَّهُم مَّغْفِرَةٌ وَرِزْقٌ كَرِيمٌ

Transliteration wa-alladhīna āmanū wahājarū wajāhadū fī sabīli l-lahi wa-alladhīna āwaw wanaṣarū ulāika humu l-mu'minūna ḥaqqan lahum maghfiratun wariz'qun karīmun

Marathi ७४. ज्या लोकांनी ईमान राखले आणि देशत्याग केला आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद केले आणि ज्यांनी अशा लोकांना आश्रय दिला, आणि मदत पोहचविली तर हेच लोक सच्चे ईमानधारक आहेत, त्यांच्यासाठी क्षमा आणि मान-सन्मानपूर्ण रोजी (आजीविका) आहे.

Verse 75

وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مِنۢ بَعْدُ وَهَاجَرُوا۟ وَجَـٰهَدُوا۟ مَعَكُمْ فَأُو۟لَـٰٓئِكَ مِنكُمْ ۚ وَأُو۟لُوا۟ ٱلْأَرْحَامِ بَعْضُهُمْ أَوْلَىٰ بِبَعْضٍ فِى كِتَـٰبِ ٱللَّهِ ۗ إِنَّ ٱللَّهَ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌۢ

Transliteration wa-alladhīna āmanū min baʿdu wahājarū wajāhadū maʿakum fa-ulāika minkum wa-ulū l-arḥāmi baʿḍuhum awlā bibaʿḍin fī kitābi l-lahi inna l-laha bikulli shayin ʿalīmun

Marathi ७५. आणि ज्या लोकांनी यानंतर ईमान राखले आणि देशत्याग केला आणि तुमच्या सोबतीने जिहाद केला तर असे लोकही तुमच्यापैकीच आहेत आणि नातेवाईक त्यांच्यापैकी आपसात एकमेकांच्या जास्त निकट आहेत, अल्लाहच्या आदेशान्वये. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा आहे.

Read Surah Al-Anfal in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.