MyDugsiStart learning

Surah Fussilat in Marathi: translation and audio

Surah 41 · فصلت · Explained in Detail · 54 verses

Surah Fussilat verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Fussilat word by word in English.

Verse 1

حمٓ

Transliteration hha-meem

Marathi १. हा. मीम.

Verse 2

تَنزِيلٌ مِّنَ ٱلرَّحْمَـٰنِ ٱلرَّحِيمِ

Transliteration tanzīlun mina l-raḥmāni l-raḥīmi

Marathi २. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे.

Verse 3

كِتَـٰبٌ فُصِّلَتْ ءَايَـٰتُهُۥ قُرْءَانًا عَرَبِيًّا لِّقَوْمٍ يَعْلَمُونَ

Transliteration kitābun fuṣṣilat āyātuhu qur'ānan ʿarabiyyan liqawmin yaʿlamūna

Marathi ३. (असा) ग्रंथ आहे, ज्याच्या आयतीं (सूत्रां) चा स्पष्ट तपशील दिला गेला आहे (अशा स्थितीत की) कुरआन अरबी भाषेत आहे, त्या लोकांसाठी जे जाणतात.

Verse 4

بَشِيرًا وَنَذِيرًا فَأَعْرَضَ أَكْثَرُهُمْ فَهُمْ لَا يَسْمَعُونَ

Transliteration bashīran wanadhīran fa-aʿraḍa aktharuhum fahum lā yasmaʿūna

Marathi ४. शुभ समाचार ऐकविणारा आणि भय दाखविणारा आहे. तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोकांनी तोंड फिरविले आणि ते ऐकतही नाहीत.

Verse 5

وَقَالُوا۟ قُلُوبُنَا فِىٓ أَكِنَّةٍ مِّمَّا تَدْعُونَآ إِلَيْهِ وَفِىٓ ءَاذَانِنَا وَقْرٌ وَمِنۢ بَيْنِنَا وَبَيْنِكَ حِجَابٌ فَٱعْمَلْ إِنَّنَا عَـٰمِلُونَ

Transliteration waqālū qulūbunā fī akinnatin mimmā tadʿūnā ilayhi wafī ādhāninā waqrun wamin bayninā wabaynika ḥijābun fa-iʿ'mal innanā ʿāmilūna

Marathi ५. आणि ते म्हणाले, तुम्ही ज्या गोष्टीकडे आम्हाला बोलावित आहात, त्यापासून आमची हृदये पडद्यात आहेत. आमच्या कानात बधीरता आहे (किंवा काही ऐकायला येत नाही) आणि आमच्या व तुमच्या दरम्यान एक आड-पडदा आहे. तेव्हा तुम्ही आपले काम करत जा, आम्हीही निश्चित आपले काम करीत राहू.

Verse 6

قُلْ إِنَّمَآ أَنَا۠ بَشَرٌ مِّثْلُكُمْ يُوحَىٰٓ إِلَىَّ أَنَّمَآ إِلَـٰهُكُمْ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ فَٱسْتَقِيمُوٓا۟ إِلَيْهِ وَٱسْتَغْفِرُوهُ ۗ وَوَيْلٌ لِّلْمُشْرِكِينَ

Transliteration qul innamā anā basharun mith'lukum yūḥā ilayya annamā ilāhukum ilāhun wāḥidun fa-is'taqīmū ilayhi wa-is'taghfirūhu wawaylun lil'mush'rikīna

Marathi ६. (तुम्ही) सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. माझ्यावर वहयी (प्रकाशना) केली जात आहे की तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ एक अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे ध्यान केंद्रित करा आणि त्याच्याकडे अपराधांची क्षमा मागा आणि त्या अनेक ईश्वरांच्या उपासकांकरिता सर्वनाश आहे.

Verse 7

ٱلَّذِينَ لَا يُؤْتُونَ ٱلزَّكَوٰةَ وَهُم بِٱلْـَٔاخِرَةِ هُمْ كَـٰفِرُونَ

Transliteration alladhīna lā yu'tūna l-zakata wahum bil-ākhirati hum kāfirūna

Marathi ७. जे जकात देत नाहीत आणि आखिरतचाही इन्कार करतात.

Verse 8

إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَهُمْ أَجْرٌ غَيْرُ مَمْنُونٍ

Transliteration inna alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti lahum ajrun ghayru mamnūnin

Marathi ८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्याकरिता असीम व अमर्याद मोबदला आहे.

Verse 9

۞ قُلْ أَئِنَّكُمْ لَتَكْفُرُونَ بِٱلَّذِى خَلَقَ ٱلْأَرْضَ فِى يَوْمَيْنِ وَتَجْعَلُونَ لَهُۥٓ أَندَادًا ۚ ذَٰلِكَ رَبُّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration qul a-innakum latakfurūna bi-alladhī khalaqa l-arḍa fī yawmayni watajʿalūna lahu andādan dhālika rabbu l-ʿālamīna

Marathi ९. (तुम्ही सांगा की, काय तुम्ही त्या (अल्लाह) चा इन्कार करता, आणि त्याचे सहभागी ठरविता, ज्याने दोन दिवसांत जमिनीला निर्माण केले. सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता तोच आहे.

Verse 10

وَجَعَلَ فِيهَا رَوَٰسِىَ مِن فَوْقِهَا وَبَـٰرَكَ فِيهَا وَقَدَّرَ فِيهَآ أَقْوَٰتَهَا فِىٓ أَرْبَعَةِ أَيَّامٍ سَوَآءً لِّلسَّآئِلِينَ

Transliteration wajaʿala fīhā rawāsiya min fawqihā wabāraka fīhā waqaddara fīhā aqwātahā fī arbaʿati ayyāmin sawāan lilssāilīna

Marathi १०. आणि त्याने जमिनीत तिच्यावरूनच पर्वत रोवले आणि तिच्यात समृद्धी राखली आणि तिच्यात राहणाऱ्यांच्या आहारा (अन्न सामुग्री) चेही अनुमान तिच्यातच केले, केवळ चार दिवसांतच. विचारणा (किंवा याचना) करणाऱ्यांकरिता समानरित्या.

Verse 11

ثُمَّ ٱسْتَوَىٰٓ إِلَى ٱلسَّمَآءِ وَهِىَ دُخَانٌ فَقَالَ لَهَا وَلِلْأَرْضِ ٱئْتِيَا طَوْعًا أَوْ كَرْهًا قَالَتَآ أَتَيْنَا طَآئِعِينَ

Transliteration thumma is'tawā ilā l-samāi wahiya dukhānun faqāla lahā walil'arḍi i'tiyā ṭawʿan aw karhan qālatā ataynā ṭāiʿīna

Marathi ११. मग आकाशाकडे उचावला जे धूरासारखे होते, तेव्हा त्याला आणि जमिनीला आदेश दिला की तुम्ही दोघे या इच्छेने किंवा अनिच्छेने दोघांना निवेदन केले की आम्ही राजीखुशीने हजर आहोत.

Verse 12

فَقَضَىٰهُنَّ سَبْعَ سَمَـٰوَاتٍ فِى يَوْمَيْنِ وَأَوْحَىٰ فِى كُلِّ سَمَآءٍ أَمْرَهَا ۚ وَزَيَّنَّا ٱلسَّمَآءَ ٱلدُّنْيَا بِمَصَـٰبِيحَ وَحِفْظًا ۚ ذَٰلِكَ تَقْدِيرُ ٱلْعَزِيزِ ٱلْعَلِيمِ

Transliteration faqaḍāhunna sabʿa samāwātin fī yawmayni wa-awḥā fī kulli samāin amrahā wazayyannā l-samāa l-dun'yā bimaṣābīḥa waḥif'ẓan dhālika taqdīru l-ʿazīzi l-ʿalīmi

Marathi १२. तेव्हा दोन दिवसांत सात आकाश बनविलेत. प्रत्येक आकाशात त्याच्या योग्य आदेशांची वहयी पाठविली आणि आम्ही या जगाच्या आकाशाला ताऱ्यांनी सुशोभित केले व त्याचे रक्षण केले. ही योजना प्रभुत्वशाली व सर्वज्ञ अशा अल्लाहची आहे.

Verse 13

فَإِنْ أَعْرَضُوا۟ فَقُلْ أَنذَرْتُكُمْ صَـٰعِقَةً مِّثْلَ صَـٰعِقَةِ عَادٍ وَثَمُودَ

Transliteration fa-in aʿraḍū faqul andhartukum ṣāʿiqatan mith'la ṣāʿiqati ʿādin wathamūda

Marathi १३. आणि तरीही जर हे तोंड फिरवित असतील तर सांगा की मी तुम्हाला त्या वीजेच्या कडाडण्या (आकाशिय अज़ाब) चे भय दाखवितो, जो आद जनसमूह आणि समूद जनसमूहावर कोसळलेल्या, वीजेच्या कडाडण्यासमान असेल.

Verse 14

إِذْ جَآءَتْهُمُ ٱلرُّسُلُ مِنۢ بَيْنِ أَيْدِيهِمْ وَمِنْ خَلْفِهِمْ أَلَّا تَعْبُدُوٓا۟ إِلَّا ٱللَّهَ ۖ قَالُوا۟ لَوْ شَآءَ رَبُّنَا لَأَنزَلَ مَلَـٰٓئِكَةً فَإِنَّا بِمَآ أُرْسِلْتُم بِهِۦ كَـٰفِرُونَ

Transliteration idh jāathumu l-rusulu min bayni aydīhim wamin khalfihim allā taʿbudū illā l-laha qālū law shāa rabbunā la-anzala malāikatan fa-innā bimā ur'sil'tum bihi kāfirūna

Marathi १४. त्याच्याजवळ जेव्हा त्यांच्या पुढून-मागून पैगंबर आले की तुम्ही अल्लाहखेरीज कोणाचीही उपासना करू नका, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जर आमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते, त्याने फरिश्त्यांना पाठविले असते. आम्ही तर तुमच्या प्रेषित्वाचा पूर्णतः इन्कार करतो.

Verse 15

فَأَمَّا عَادٌ فَٱسْتَكْبَرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ بِغَيْرِ ٱلْحَقِّ وَقَالُوا۟ مَنْ أَشَدُّ مِنَّا قُوَّةً ۖ أَوَلَمْ يَرَوْا۟ أَنَّ ٱللَّهَ ٱلَّذِى خَلَقَهُمْ هُوَ أَشَدُّ مِنْهُمْ قُوَّةً ۖ وَكَانُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا يَجْحَدُونَ

Transliteration fa-ammā ʿādun fa-is'takbarū fī l-arḍi bighayri l-ḥaqi waqālū man ashaddu minnā quwwatan awalam yaraw anna l-laha alladhī khalaqahum huwa ashaddu min'hum quwwatan wakānū biāyātinā yajḥadūna

Marathi १५. तर जेव्हा आदने अकारण धरतीवर घमेंड करायला सुरुवात केली आणि म्हणू लागले की आमच्याहून शक्तिशाली कोण आहे, काय त्यांना हे दिसून येत नाही की ज्याने त्यांना निर्माण केले आहे, तो त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ते (शेवटपर्यर्ंत) आमच्या आयतींचा इन्कारच करीत राहिले.

Verse 16

فَأَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا صَرْصَرًا فِىٓ أَيَّامٍ نَّحِسَاتٍ لِّنُذِيقَهُمْ عَذَابَ ٱلْخِزْىِ فِى ٱلْحَيَوٰةِ ٱلدُّنْيَا ۖ وَلَعَذَابُ ٱلْـَٔاخِرَةِ أَخْزَىٰ ۖ وَهُمْ لَا يُنصَرُونَ

Transliteration fa-arsalnā ʿalayhim rīḥan ṣarṣaran fī ayyāmin naḥisātin linudhīqahum ʿadhāba l-khiz'yi fī l-ḥayati l-dun'yā walaʿadhābu l-ākhirati akhzā wahum lā yunṣarūna

Marathi १६. तेव्हा शेवटी आम्ही त्यांच्यावर एक सोसाट्याचे वादळ अशुभ दिवसात पाठविले, यासाठी की त्यांना ऐहिक जीवनात अपमानदायक शिक्षा - यातनेची गोडी चाखवावी, (विश्वास करा) की आखिरतचा अज़ाब, यापेक्षा जास्त अपमानित करणारा आहे आणि त्यांना मदतही केली जाणार नाही.

Verse 17

وَأَمَّا ثَمُودُ فَهَدَيْنَـٰهُمْ فَٱسْتَحَبُّوا۟ ٱلْعَمَىٰ عَلَى ٱلْهُدَىٰ فَأَخَذَتْهُمْ صَـٰعِقَةُ ٱلْعَذَابِ ٱلْهُونِ بِمَا كَانُوا۟ يَكْسِبُونَ

Transliteration wa-ammā thamūdu fahadaynāhum fa-is'taḥabbū l-ʿamā ʿalā l-hudā fa-akhadhathum ṣāʿiqatu l-ʿadhābi l-hūni bimā kānū yaksibūna

Marathi १७. आणि राहिलेत समूद, तर आम्ही त्यांनाही मार्गदर्शन केले, परंतु त्यांनी मार्गदर्शनाच्या तुलनेत आंधळेपणास जास्त महत्व दिले. ज्यामुळे त्यांना (पूर्णपणे) अपमानदायक शिक्षेच्या कडाडण्याने त्यांच्या करतूतींपायी धरले.

Verse 18

وَنَجَّيْنَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَكَانُوا۟ يَتَّقُونَ

Transliteration wanajjaynā alladhīna āmanū wakānū yattaqūna

Marathi १८. आणि ईमान राखणाऱ्यांना व अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांना आम्ही (पूर्णतः) वाचविले.

Verse 19

وَيَوْمَ يُحْشَرُ أَعْدَآءُ ٱللَّهِ إِلَى ٱلنَّارِ فَهُمْ يُوزَعُونَ

Transliteration wayawma yuḥ'sharu aʿdāu l-lahi ilā l-nāri fahum yūzaʿūna

Marathi १९. आणि ज्या दिवशी अल्लाहचे वैरी जहन्नमकडे आणले जातील, आणि त्या (सर्वां) ना एकत्रित केले जाईल.

Verse 20

حَتَّىٰٓ إِذَا مَا جَآءُوهَا شَهِدَ عَلَيْهِمْ سَمْعُهُمْ وَأَبْصَـٰرُهُمْ وَجُلُودُهُم بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration ḥattā idhā mā jāūhā shahida ʿalayhim samʿuhum wa-abṣāruhum wajulūduhum bimā kānū yaʿmalūna

Marathi २०. येथेपर्यंत की जेव्हा जहन्नमच्या अगदी जवळ येऊन पोहचतील तेव्हा त्यांच्यावर त्यांचे कान आणि त्यांचे डोळे व त्यांच्या त्वचा त्यांच्या कर्मांची साक्ष देतील.

Verse 21

وَقَالُوا۟ لِجُلُودِهِمْ لِمَ شَهِدتُّمْ عَلَيْنَا ۖ قَالُوٓا۟ أَنطَقَنَا ٱللَّهُ ٱلَّذِىٓ أَنطَقَ كُلَّ شَىْءٍ وَهُوَ خَلَقَكُمْ أَوَّلَ مَرَّةٍ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ

Transliteration waqālū lijulūdihim lima shahidttum ʿalaynā qālū anṭaqanā l-lahu alladhī anṭaqa kulla shayin wahuwa khalaqakum awwala marratin wa-ilayhi tur'jaʿūna

Marathi २१. आणि आपल्या त्वचांना म्हणतील की तुम्ही आमच्याविरूद्ध साक्ष का दिली, ते उत्तर देतील की आम्हाला त्या अल्लाहने बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले, ज्याने प्रत्येक वस्तूला बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले आहे. त्यानेच पहिल्यांदा तुम्हाला निर्माण केले आणि त्याच्याच कडे तुम्ही सर्व परतविले जाल.

Verse 22

وَمَا كُنتُمْ تَسْتَتِرُونَ أَن يَشْهَدَ عَلَيْكُمْ سَمْعُكُمْ وَلَآ أَبْصَـٰرُكُمْ وَلَا جُلُودُكُمْ وَلَـٰكِن ظَنَنتُمْ أَنَّ ٱللَّهَ لَا يَعْلَمُ كَثِيرًا مِّمَّا تَعْمَلُونَ

Transliteration wamā kuntum tastatirūna an yashhada ʿalaykum samʿukum walā abṣārukum walā julūdukum walākin ẓanantum anna l-laha lā yaʿlamu kathīran mimmā taʿmalūna

Marathi २२. आणि तुम्ही (आपली दुष्कर्मे) या कारणाने लपवून ठेवतच नव्हते की तुमच्यावर तुमचे कान, तुमचे डोळे आणि तुमच्या त्वचा साक्ष देतील आणि तुम्ही असे समजत राहिलात की तुम्ही जे काही करीत आहात, त्यापैकी बहुतेक कर्मांशी अल्लाह अनभिज्ञ आहे.

Verse 23

وَذَٰلِكُمْ ظَنُّكُمُ ٱلَّذِى ظَنَنتُم بِرَبِّكُمْ أَرْدَىٰكُمْ فَأَصْبَحْتُم مِّنَ ٱلْخَـٰسِرِينَ

Transliteration wadhālikum ẓannukumu alladhī ẓanantum birabbikum ardākum fa-aṣbaḥtum mina l-khāsirīna

Marathi २३. आणि तुमच्या या कुविचारांनी, जे तुम्ही आपल्या पालनकर्त्याविषयी केलेले होते, तुमचा सर्वनाश केला आणि शेवटी तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी झालात.

Verse 24

فَإِن يَصْبِرُوا۟ فَٱلنَّارُ مَثْوًى لَّهُمْ ۖ وَإِن يَسْتَعْتِبُوا۟ فَمَا هُم مِّنَ ٱلْمُعْتَبِينَ

Transliteration fa-in yaṣbirū fal-nāru mathwan lahum wa-in yastaʿtibū famā hum mina l-muʿ'tabīna

Marathi २४. आता जर हे सहनशीलता राखतील, तरीही त्यांचे ठिकाण जहन्नमच आहे आणि जर हे तौबा (क्षमा-याचना) ही करू इच्छितील, तरीही त्यांना माफ केले जाणार नाही.

Verse 25

۞ وَقَيَّضْنَا لَهُمْ قُرَنَآءَ فَزَيَّنُوا۟ لَهُم مَّا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَحَقَّ عَلَيْهِمُ ٱلْقَوْلُ فِىٓ أُمَمٍ قَدْ خَلَتْ مِن قَبْلِهِم مِّنَ ٱلْجِنِّ وَٱلْإِنسِ ۖ إِنَّهُمْ كَانُوا۟ خَـٰسِرِينَ

Transliteration waqayyaḍnā lahum quranāa fazayyanū lahum mā bayna aydīhim wamā khalfahum waḥaqqa ʿalayhimu l-qawlu fī umamin qad khalat min qablihim mina l-jini wal-insi innahum kānū khāsirīna

Marathi २५. आणि आम्ही त्यांचे काही साथीदार निर्धारित केलेले होते, ज्यांनी त्यांच्या पुढच्या मागच्या कर्मांना त्यांच्या नजरेत सुंदर सुशोभित बनवून ठेवले होते, आणि त्यांच्या बाबतीतही अल्लाहचा वायदा त्या जनसमूहांसोबत पूर्ण झाल, जे त्यांच्यापूर्वी जिन्नांचे आणि मानवांचे होऊन गेले आहेत. निःसंशय ते नुकसान उचलणारे सिद्ध ठरले.

Verse 26

وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَا تَسْمَعُوا۟ لِهَـٰذَا ٱلْقُرْءَانِ وَٱلْغَوْا۟ فِيهِ لَعَلَّكُمْ تَغْلِبُونَ

Transliteration waqāla alladhīna kafarū lā tasmaʿū lihādhā l-qur'āni wal-ghaw fīhi laʿallakum taghlibūna

Marathi २६. आणि काफिर म्हणाले, या कुरआनास ऐकूच नका (त्याचे पठण होत असताना) आणि वाह्यात बडबड करा, नवल नव्हे की तुम्ही वरचढ ठराल.

Verse 27

فَلَنُذِيقَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ عَذَابًا شَدِيدًا وَلَنَجْزِيَنَّهُمْ أَسْوَأَ ٱلَّذِى كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration falanudhīqanna alladhīna kafarū ʿadhāban shadīdan walanajziyannahum aswa-a alladhī kānū yaʿmalūna

Marathi २७. तर निःसंशय, आम्ही त्या काफिरांना सक्त अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवू आणि त्यांना त्यांच्या अतिशय वाईट कर्माचा मोबदला (निश्चितच) देऊ.

Verse 28

ذَٰلِكَ جَزَآءُ أَعْدَآءِ ٱللَّهِ ٱلنَّارُ ۖ لَهُمْ فِيهَا دَارُ ٱلْخُلْدِ ۖ جَزَآءًۢ بِمَا كَانُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا يَجْحَدُونَ

Transliteration dhālika jazāu aʿdāi l-lahi l-nāru lahum fīhā dāru l-khul'di jazāan bimā kānū biāyātinā yajḥadūna

Marathi २८. अल्लाहच्या शत्रूंचा मोबदला (शिक्षा) जहन्नमची हीच आग आहे, ज्यात त्यांचे नेहमीचे घर आहे. (हा) मोबदला आहे, आमच्या आयतींचा इन्कार करणाऱ्यांचा.

Verse 29

وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ رَبَّنَآ أَرِنَا ٱلَّذَيْنِ أَضَلَّانَا مِنَ ٱلْجِنِّ وَٱلْإِنسِ نَجْعَلْهُمَا تَحْتَ أَقْدَامِنَا لِيَكُونَا مِنَ ٱلْأَسْفَلِينَ

Transliteration waqāla alladhīna kafarū rabbanā arinā alladhayni aḍallānā mina l-jini wal-insi najʿalhumā taḥta aqdāminā liyakūnā mina l-asfalīna

Marathi २९. आणि काफिर लोक म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला जिन्न आणि मानवांच्या त्या (दोन्ही समूहां) ना दाखव, ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केले, (यासाठी की) आम्ही त्यांना आपला पायाखाली तुडवावे यासाठी की ते खूप खाली (सक्त शिक्षा - यातनाग्रस्त) व्हावेत.

Verse 30

إِنَّ ٱلَّذِينَ قَالُوا۟ رَبُّنَا ٱللَّهُ ثُمَّ ٱسْتَقَـٰمُوا۟ تَتَنَزَّلُ عَلَيْهِمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ أَلَّا تَخَافُوا۟ وَلَا تَحْزَنُوا۟ وَأَبْشِرُوا۟ بِٱلْجَنَّةِ ٱلَّتِى كُنتُمْ تُوعَدُونَ

Transliteration inna alladhīna qālū rabbunā l-lahu thumma is'taqāmū tatanazzalu ʿalayhimu l-malāikatu allā takhāfū walā taḥzanū wa-abshirū bil-janati allatī kuntum tūʿadūna

Marathi ३०. वास्तविक ज्या लोकांनी असे म्हटले की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे, मग त्यावर अटळ राहिले१ तर त्यांच्याजवळ फरिश्ते (हे सांगत) येतात की तुम्ही मुळीच भयभीत आणि दुःखी होऊ नका. (किंबहुना) त्या जहन्नतचा शुभ समाचार ऐकवा, जिचा तुम्हाला वायदा दिला गेला आहे.

Verse 31

نَحْنُ أَوْلِيَآؤُكُمْ فِى ٱلْحَيَوٰةِ ٱلدُّنْيَا وَفِى ٱلْـَٔاخِرَةِ ۖ وَلَكُمْ فِيهَا مَا تَشْتَهِىٓ أَنفُسُكُمْ وَلَكُمْ فِيهَا مَا تَدَّعُونَ

Transliteration naḥnu awliyāukum fī l-ḥayati l-dun'yā wafī l-ākhirati walakum fīhā mā tashtahī anfusukum walakum fīhā mā taddaʿūna

Marathi ३१. तुमच्या ऐहिक जीवनातही आम्ही तुमचे मित्र व मदत करणारे होतो आणि आखिरतमध्येही राहू. ज्या गोष्टीची तुमच्या मनाला इच्छा होईल आणि जे काही मागाल, ते सर्व तुमच्यासाठी (जन्नतमध्ये हजर) आहे.

Verse 32

نُزُلًا مِّنْ غَفُورٍ رَّحِيمٍ

Transliteration nuzulan min ghafūrin raḥīmin

Marathi ३२. मोठा माफ करणाऱ्या, मोठा मेहेरबान अशा (अल्लाह) तर्फे हे सर्व काही पाहुणचाराच्या स्वरूपात आहे.

Verse 33

وَمَنْ أَحْسَنُ قَوْلًا مِّمَّن دَعَآ إِلَى ٱللَّهِ وَعَمِلَ صَـٰلِحًا وَقَالَ إِنَّنِى مِنَ ٱلْمُسْلِمِينَ

Transliteration waman aḥsanu qawlan mimman daʿā ilā l-lahi waʿamila ṣāliḥan waqāla innanī mina l-mus'limīna

Marathi ३३. आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट बोलणारा कोण आहे, जो अल्लाहकडे बोलाविल, सत्कर्म करील आणि असे म्हणेल की मी खात्रीने मुस्लिमांपैकी आहे.

Verse 34

وَلَا تَسْتَوِى ٱلْحَسَنَةُ وَلَا ٱلسَّيِّئَةُ ۚ ٱدْفَعْ بِٱلَّتِى هِىَ أَحْسَنُ فَإِذَا ٱلَّذِى بَيْنَكَ وَبَيْنَهُۥ عَدَٰوَةٌ كَأَنَّهُۥ وَلِىٌّ حَمِيمٌ

Transliteration walā tastawī l-ḥasanatu walā l-sayi-atu id'faʿ bi-allatī hiya aḥsanu fa-idhā alladhī baynaka wabaynahu ʿadāwatun ka-annahu waliyyun ḥamīmun

Marathi ३४. आणि सत्कर्म व दुष्कर्म समान असू शकत नाही, वाईट गोष्टीचे भलेपणाने निवारण करा, मग तोच, ज्याच्या व तुमच्या दरम्यान शत्रूता आहे, असा होईल जणू जीवलग मित्र.१

Verse 35

وَمَا يُلَقَّىٰهَآ إِلَّا ٱلَّذِينَ صَبَرُوا۟ وَمَا يُلَقَّىٰهَآ إِلَّا ذُو حَظٍّ عَظِيمٍ

Transliteration wamā yulaqqāhā illā alladhīna ṣabarū wamā yulaqqāhā illā dhū ḥaẓẓin ʿaẓīmin

Marathi ३५. आणि ही गोष्ट त्यांच्याच सद्‌भाग्यात असते, जे धीर - संयम राखतात आणि तिला मोठ्या भाग्यवानांखेरीज कोणीही प्राप्त करू शकत नाही.

Verse 36

وَإِمَّا يَنزَغَنَّكَ مِنَ ٱلشَّيْطَـٰنِ نَزْغٌ فَٱسْتَعِذْ بِٱللَّهِ ۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ

Transliteration wa-immā yanzaghannaka mina l-shayṭāni nazghun fa-is'taʿidh bil-lahi innahu huwa l-samīʿu l-ʿalīmu

Marathi ३६. आणि जर सैतानाकडून एखादी शंका निर्माण झाली तर अल्लाहचे शरण मागा. निःसंशय, तो मोठा ऐकणारा, जाणणारा आहे.

Verse 37

وَمِنْ ءَايَـٰتِهِ ٱلَّيْلُ وَٱلنَّهَارُ وَٱلشَّمْسُ وَٱلْقَمَرُ ۚ لَا تَسْجُدُوا۟ لِلشَّمْسِ وَلَا لِلْقَمَرِ وَٱسْجُدُوا۟ لِلَّهِ ٱلَّذِى خَلَقَهُنَّ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ

Transliteration wamin āyātihi al-laylu wal-nahāru wal-shamsu wal-qamaru lā tasjudū lilshamsi walā lil'qamari wa-us'judū lillahi alladhī khalaqahunna in kuntum iyyāhu taʿbudūna

Marathi ३७. आणि दिवस-रात्र आणि सूर्य व चंद्र देखील त्याच्या निशाण्यांपैकी आहेत. तुम्ही सूर्य आणि चंद्रासमोर नतमस्तक होऊ नका, किंबहुना आपला माथा त्या अल्लाहसमोर टेकवा, ज्याने त्या सर्वांना निर्माण केले आहे, जर तुम्हाला त्याचीच उपासना करायची आहे.

Verse 38

فَإِنِ ٱسْتَكْبَرُوا۟ فَٱلَّذِينَ عِندَ رَبِّكَ يُسَبِّحُونَ لَهُۥ بِٱلَّيْلِ وَٱلنَّهَارِ وَهُمْ لَا يَسْـَٔمُونَ ۩

Transliteration fa-ini is'takbarū fa-alladhīna ʿinda rabbika yusabbiḥūna lahu bi-al-layli wal-nahāri wahum lā yasamūna

Marathi ३८. तरीही जर ते घमेंड करतील तर ते (फरिश्ते) जे तुमच्या पालनकर्त्याच्या निकट आहेत, ते तर रात्रंदिवस त्याच्या पावित्र्याचा जाप करीत राहतात आणि (कधीही) थकत नाहीत.

Verse 39

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦٓ أَنَّكَ تَرَى ٱلْأَرْضَ خَـٰشِعَةً فَإِذَآ أَنزَلْنَا عَلَيْهَا ٱلْمَآءَ ٱهْتَزَّتْ وَرَبَتْ ۚ إِنَّ ٱلَّذِىٓ أَحْيَاهَا لَمُحْىِ ٱلْمَوْتَىٰٓ ۚ إِنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ

Transliteration wamin āyātihi annaka tarā l-arḍa khāshiʿatan fa-idhā anzalnā ʿalayhā l-māa ih'tazzat warabat inna alladhī aḥyāhā lamuḥ'yī l-mawtā innahu ʿalā kulli shayin qadīrun

Marathi ३९. आणि त्या (अल्लाह) च्या निशाण्यांपैकी (हेही) आहे की तुम्ही जमिनीला दाबली गेलेली (कोरडी पडलेली) पाहता, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पर्जन्यवृष्टी करतो, तेव्हा ती हिरवी टवटवीत होऊन वाढीस लागते, ज्याने तिला जिवंत केले तोच खात्रीने मृतांनाही जिवंत करणारा आहे. निःसंशय तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.

Verse 40

إِنَّ ٱلَّذِينَ يُلْحِدُونَ فِىٓ ءَايَـٰتِنَا لَا يَخْفَوْنَ عَلَيْنَآ ۗ أَفَمَن يُلْقَىٰ فِى ٱلنَّارِ خَيْرٌ أَم مَّن يَأْتِىٓ ءَامِنًا يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ ۚ ٱعْمَلُوا۟ مَا شِئْتُمْ ۖ إِنَّهُۥ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ

Transliteration inna alladhīna yul'ḥidūna fī āyātinā lā yakhfawna ʿalaynā afaman yul'qā fī l-nāri khayrun am man yatī āminan yawma l-qiyāmati iʿ'malū mā shi'tum innahu bimā taʿmalūna baṣīrun

Marathi ४०. निःसंशय, जे लोक आमच्या आयतींमध्ये वाकडेपणा आणतात ते (काही) आमच्यापासून लपलेले नाहीत. (जरा सांगा) जो आगीत टाकला जावा, तो चांगला आहे किंवा तो, जो शांतिपूर्वक कयामतच्या दिवशी यावा. तुम्ही वाटेल ते करीत राहा. तो तुमचे सर्व केले करविले पाहात आहे.

Verse 41

إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِٱلذِّكْرِ لَمَّا جَآءَهُمْ ۖ وَإِنَّهُۥ لَكِتَـٰبٌ عَزِيزٌ

Transliteration inna alladhīna kafarū bil-dhik'ri lammā jāahum wa-innahu lakitābun ʿazīzun

Marathi ४१. ज्या लोकांनी आपल्याजवळ कुरआन पोहोचल्यानंतरही त्याचा इन्कार केला (तेदेखील) आमच्यापासून लपलेले नाहीत निःसंशय, हा मोठा भव्य-दिव्य (सन्मानपूर्ण) ग्रंथ आहे.

Verse 42

لَّا يَأْتِيهِ ٱلْبَـٰطِلُ مِنۢ بَيْنِ يَدَيْهِ وَلَا مِنْ خَلْفِهِۦ ۖ تَنزِيلٌ مِّنْ حَكِيمٍ حَمِيدٍ

Transliteration lā yatīhi l-bāṭilu min bayni yadayhi walā min khalfihi tanzīlun min ḥakīmin ḥamīdin

Marathi ४२. असत्य, त्याच्या जवळूनही जाऊ शकत नाही, ना त्याच्यापुढून, आणि ना त्याच्या मागून हा (ग्रंथ) त्या (अल्लाह) कडून अवतरित केला गेला आहे, जो मोठा हिकमतशाली आणि गुणसंपन्न आहे.

Verse 43

مَّا يُقَالُ لَكَ إِلَّا مَا قَدْ قِيلَ لِلرُّسُلِ مِن قَبْلِكَ ۚ إِنَّ رَبَّكَ لَذُو مَغْفِرَةٍ وَذُو عِقَابٍ أَلِيمٍ

Transliteration mā yuqālu laka illā mā qad qīla lilrrusuli min qablika inna rabbaka ladhū maghfiratin wadhū ʿiqābin alīmin

Marathi ४३. (हे पैगंबर!) तुम्हालाही तेच सांगितले जात आहे, जे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांनाही सांगितले गेले आहे. निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दुःखदायक शिक्षा - यातना देणारा आहे.

Verse 44

وَلَوْ جَعَلْنَـٰهُ قُرْءَانًا أَعْجَمِيًّا لَّقَالُوا۟ لَوْلَا فُصِّلَتْ ءَايَـٰتُهُۥٓ ۖ ءَا۬عْجَمِىٌّ وَعَرَبِىٌّ ۗ قُلْ هُوَ لِلَّذِينَ ءَامَنُوا۟ هُدًى وَشِفَآءٌ ۖ وَٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ فِىٓ ءَاذَانِهِمْ وَقْرٌ وَهُوَ عَلَيْهِمْ عَمًى ۚ أُو۟لَـٰٓئِكَ يُنَادَوْنَ مِن مَّكَانٍۭ بَعِيدٍ

Transliteration walaw jaʿalnāhu qur'ānan aʿjamiyyan laqālū lawlā fuṣṣilat āyātuhu āʿ'jamiyyun waʿarabiyyun qul huwa lilladhīna āmanū hudan washifāon wa-alladhīna lā yu'minūna fī ādhānihim waqrun wahuwa ʿalayhim ʿaman ulāika yunādawna min makānin baʿīdin

Marathi ४४. आणि जर आम्ही त्याला अरबीऐवजी दुसऱ्या भाषेचा कुरआन बनविले असते, तर म्हणाले असते की याच्या आयती (वचने) स्पष्टपणे का नाही सांगितली गेलीत? हे काय की ग्रंथ अरबीऐवजी दुसऱ्या भाषेत आणि तुम्ही अरबी रसूल? (तुम्ही) सांगा की हा (ग्रंथ) ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन व रोगमुक्ती आहे आणि जे ईमान राखत नाहीत तर त्यांच्या कानांमध्ये बधीरता आहे आणि हा त्यांच्यासाठी अंधत्व आहे. हे असे लोक आहेत, ज्यांना दूरच्या ठिकाणापासून पुकारले जात आहे.

Verse 45

وَلَقَدْ ءَاتَيْنَا مُوسَى ٱلْكِتَـٰبَ فَٱخْتُلِفَ فِيهِ ۗ وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِن رَّبِّكَ لَقُضِىَ بَيْنَهُمْ ۚ وَإِنَّهُمْ لَفِى شَكٍّ مِّنْهُ مُرِيبٍ

Transliteration walaqad ātaynā mūsā l-kitāba fa-ukh'tulifa fīhi walawlā kalimatun sabaqat min rabbika laquḍiya baynahum wa-innahum lafī shakkin min'hu murībin

Marathi ४५. आणि निःसंशय, आम्ही मूसा (अलै.) ला ग्रंथ प्रदान केला होता तेव्हा त्याच्यातही मतभेद केला गेला आणि जर ती गोष्ट नसती जी तुमच्या पालनकर्त्यातर्फे या आधीच निश्चित झालेली आहे, तर त्यांच्या दरम्यान (केव्हाच) फैसला झाला असता. हे लोक तर त्याच्याविषयी सक्त बेचैन करणाऱ्या संशयात आहेत.

Verse 46

مَّنْ عَمِلَ صَـٰلِحًا فَلِنَفْسِهِۦ ۖ وَمَنْ أَسَآءَ فَعَلَيْهَا ۗ وَمَا رَبُّكَ بِظَلَّـٰمٍ لِّلْعَبِيدِ

Transliteration man ʿamila ṣāliḥan falinafsihi waman asāa faʿalayhā wamā rabbuka biẓallāmin lil'ʿabīdi

Marathi ४६. जो मनुष्य सत्कर्म करेल, ते तो आपल्या फायद्याकरिता आणि जो दुष्कर्म करेल तर त्या (पापा) चे ओझे त्याच्यावरच आहे आणि तुमचा पालनकर्ता दासांवर अत्याचार करणारा नाही.

Verse 47

۞ إِلَيْهِ يُرَدُّ عِلْمُ ٱلسَّاعَةِ ۚ وَمَا تَخْرُجُ مِن ثَمَرَٰتٍ مِّنْ أَكْمَامِهَا وَمَا تَحْمِلُ مِنْ أُنثَىٰ وَلَا تَضَعُ إِلَّا بِعِلْمِهِۦ ۚ وَيَوْمَ يُنَادِيهِمْ أَيْنَ شُرَكَآءِى قَالُوٓا۟ ءَاذَنَّـٰكَ مَا مِنَّا مِن شَهِيدٍ

Transliteration ilayhi yuraddu ʿil'mu l-sāʿati wamā takhruju min thamarātin min akmāmihā wamā taḥmilu min unthā walā taḍaʿu illā biʿil'mihi wayawma yunādīhim ayna shurakāī qālū ādhannāka mā minnā min shahīdin

Marathi ४७. कयामतचे ज्ञान अल्लाहकडेच परतविले जाते आणि जे जे फळ आपल्या गाभ्यांमधून (बोंडामधून) बाहेर पडते आणि जी मादी गर्भवती असते आणि ज्या बाळाला ती जन्म देते, त्या सर्वांचे ज्ञान त्याला आहे, आणि ज्या दिवशी अल्लाह त्या (अनेकेश्वर उपासकांना) बोलावून विचारेल की माझे सहभागी कोठे आहेत? ते उत्तर देतील की आम्ही तर सांगून टाकले की आमच्यापैकी कोणीही त्याचा साक्षी नाही.

Verse 48

وَضَلَّ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَدْعُونَ مِن قَبْلُ ۖ وَظَنُّوا۟ مَا لَهُم مِّن مَّحِيصٍ

Transliteration waḍalla ʿanhum mā kānū yadʿūna min qablu waẓannū mā lahum min maḥīṣin

Marathi ४८. आणि हे ज्यांची भक्ती - आराधना यापूर्वी करीत होते, ते सर्व त्यांच्या नजरेतून नाहीसे झाले आणि त्यांनी समजून घेतले की आता त्यांच्या सुटकेचा (मार्ग) नाही.

Verse 49

لَّا يَسْـَٔمُ ٱلْإِنسَـٰنُ مِن دُعَآءِ ٱلْخَيْرِ وَإِن مَّسَّهُ ٱلشَّرُّ فَيَـُٔوسٌ قَنُوطٌ

Transliteration lā yasamu l-insānu min duʿāi l-khayri wa-in massahu l-sharu fayaūsun qanūṭun

Marathi ४९. भलेपणाची याचना करण्यापासून मनुष्य थकत नाही, आणि जर त्याला एखादा त्रास किंवा यातना पोहचते, तेव्हा हताश आणि नाउमेद होतो.

Verse 50

وَلَئِنْ أَذَقْنَـٰهُ رَحْمَةً مِّنَّا مِنۢ بَعْدِ ضَرَّآءَ مَسَّتْهُ لَيَقُولَنَّ هَـٰذَا لِى وَمَآ أَظُنُّ ٱلسَّاعَةَ قَآئِمَةً وَلَئِن رُّجِعْتُ إِلَىٰ رَبِّىٓ إِنَّ لِى عِندَهُۥ لَلْحُسْنَىٰ ۚ فَلَنُنَبِّئَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِمَا عَمِلُوا۟ وَلَنُذِيقَنَّهُم مِّنْ عَذَابٍ غَلِيظٍ

Transliteration wala-in adhaqnāhu raḥmatan minnā min baʿdi ḍarrāa massathu layaqūlanna hādhā lī wamā aẓunnu l-sāʿata qāimatan wala-in rujiʿ'tu ilā rabbī inna lī ʿindahu lalḥus'nā falanunabbi-anna alladhīna kafarū bimā ʿamilū walanudhīqannahum min ʿadhābin ghalīẓin

Marathi ५०. आणि जी कष्ट - यातना त्याला पोहचली आहे, त्यानंतर जर आम्ही त्याला एखाद्या दया - कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा तो उद्‌गारतो, मी तर यास पात्र होतोच आणि मला नाही वाटत की कयामत प्रस्थापित होईल आणि जर मला आपल्या पालनकर्त्याकडे परतविले गेलेच, तरीही खात्रीने त्याच्याजवळही माझ्यासाठी भलाईच असेल. निःसंशय, आम्ही त्या काफिरांना त्यांच्या कर्मांशी अवगत करू, आणि त्यांना कठोर शिक्षा - यातनेची गोडी चाखवू.

Verse 51

وَإِذَآ أَنْعَمْنَا عَلَى ٱلْإِنسَـٰنِ أَعْرَضَ وَنَـَٔا بِجَانِبِهِۦ وَإِذَا مَسَّهُ ٱلشَّرُّ فَذُو دُعَآءٍ عَرِيضٍ

Transliteration wa-idhā anʿamnā ʿalā l-insāni aʿraḍa wanaā bijānibihi wa-idhā massahu l-sharu fadhū duʿāin ʿarīḍin

Marathi ५१. आणि जेव्हा आम्ही माणसावर आपला उपकार करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि बाजू बदलून घेतो आणि जेव्हा त्याच्यावर दुःख कोसळले तेव्हा मात्र लांबलचक दुआ (प्रार्थना) करणारा बनतो.

Verse 52

قُلْ أَرَءَيْتُمْ إِن كَانَ مِنْ عِندِ ٱللَّهِ ثُمَّ كَفَرْتُم بِهِۦ مَنْ أَضَلُّ مِمَّنْ هُوَ فِى شِقَاقٍۭ بَعِيدٍ

Transliteration qul ara-aytum in kāna min ʿindi l-lahi thumma kafartum bihi man aḍallu mimman huwa fī shiqāqin baʿīdin

Marathi ५२. (तुम्ही) सांगा, बरे हे तर सांगा की जर हा कुरआन अल्लाहतर्फे आलेला असेल, मग तुम्ही त्यास मानले नाही तर त्याच्यापेक्षा अधिक पथभ्रष्ट आणखी कोण असेल, जो (सत्याचा) विरोध करण्यात दूर निघून जावा.

Verse 53

سَنُرِيهِمْ ءَايَـٰتِنَا فِى ٱلْـَٔافَاقِ وَفِىٓ أَنفُسِهِمْ حَتَّىٰ يَتَبَيَّنَ لَهُمْ أَنَّهُ ٱلْحَقُّ ۗ أَوَلَمْ يَكْفِ بِرَبِّكَ أَنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ شَهِيدٌ

Transliteration sanurīhim āyātinā fī l-āfāqi wafī anfusihim ḥattā yatabayyana lahum annahu l-ḥaqu awalam yakfi birabbika annahu ʿalā kulli shayin shahīdun

Marathi ५३. लवकरच आम्ही त्यांना आपल्या निशाण्या जगाच्या किनाऱ्यां (क्षितिजां) मध्येही दाखवू आणि स्वतः त्यांच्या अस्तित्वातही, येथे पर्यर्ंत की त्यांना स्पष्टतः कळून यावे की सत्य हेच आहे. काय तुमच्या पालनकर्त्याचे प्रत्येक गोष्टीशी अवगत असणे पुरेसे नाही?

Verse 54

أَلَآ إِنَّهُمْ فِى مِرْيَةٍ مِّن لِّقَآءِ رَبِّهِمْ ۗ أَلَآ إِنَّهُۥ بِكُلِّ شَىْءٍ مُّحِيطٌۢ

Transliteration alā innahum fī mir'yatin min liqāi rabbihim alā innahu bikulli shayin muḥīṭun

Marathi ५४. विश्वास करा की हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर हजर होण्याबाबत साशंक आहेत. लक्षात ठेवा, अल्लाहने समस्त गोष्टींना घेरून ठेवले आहे.

Read Surah Fussilat in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.