MyDugsiStart learning

Surah Al-Qalam in Marathi: translation and audio

Surah 68 · القلم · The Pen · 52 verses

Surah Al-Qalam verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Qalam word by word in English.

Verse 1

نٓ ۚ وَٱلْقَلَمِ وَمَا يَسْطُرُونَ

Transliteration noon wal-qalami wamā yasṭurūna

Marathi १. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात.

Verse 2

مَآ أَنتَ بِنِعْمَةِ رَبِّكَ بِمَجْنُونٍ

Transliteration mā anta biniʿ'mati rabbika bimajnūnin

Marathi २. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत.

Verse 3

وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ

Transliteration wa-inna laka la-ajran ghayra mamnūnin

Marathi ३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे.

Verse 4

وَإِنَّكَ لَعَلَىٰ خُلُقٍ عَظِيمٍ

Transliteration wa-innaka laʿalā khuluqin ʿaẓīmin

Marathi ४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १

Verse 5

فَسَتُبْصِرُ وَيُبْصِرُونَ

Transliteration fasatub'ṣiru wayub'ṣirūna

Marathi ५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील

Verse 6

بِأَييِّكُمُ ٱلْمَفْتُونُ

Transliteration bi-ayyikumu l-maftūnu

Marathi ६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे.

Verse 7

إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِۦ وَهُوَ أَعْلَمُ بِٱلْمُهْتَدِينَ

Transliteration inna rabbaka huwa aʿlamu biman ḍalla ʿan sabīlihi wahuwa aʿlamu bil-muh'tadīna

Marathi ७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो.

Verse 8

فَلَا تُطِعِ ٱلْمُكَذِّبِينَ

Transliteration falā tuṭiʿi l-mukadhibīna

Marathi ८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका.

Verse 9

وَدُّوا۟ لَوْ تُدْهِنُ فَيُدْهِنُونَ

Transliteration waddū law tud'hinu fayud'hinūna

Marathi ९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील.

Verse 10

وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِينٍ

Transliteration walā tuṭiʿ kulla ḥallāfin mahīnin

Marathi १०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल.

Verse 11

هَمَّازٍ مَّشَّآءٍۭ بِنَمِيمٍ

Transliteration hammāzin mashāin binamīmin

Marathi ११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल.

Verse 12

مَّنَّاعٍ لِّلْخَيْرِ مُعْتَدٍ أَثِيمٍ

Transliteration mannāʿin lil'khayri muʿ'tadin athīmin

Marathi १२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल.

Verse 13

عُتُلٍّۭ بَعْدَ ذَٰلِكَ زَنِيمٍ

Transliteration ʿutullin baʿda dhālika zanīmin

Marathi १३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल.

Verse 14

أَن كَانَ ذَا مَالٍ وَبَنِينَ

Transliteration an kāna dhā mālin wabanīna

Marathi १४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे.

Verse 15

إِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِ ءَايَـٰتُنَا قَالَ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration idhā tut'lā ʿalayhi āyātunā qāla asāṭīru l-awalīna

Marathi १५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत.

Verse 16

سَنَسِمُهُۥ عَلَى ٱلْخُرْطُومِ

Transliteration sanasimuhu ʿalā l-khur'ṭūmi

Marathi १६. आम्हीही त्याच्या सोंडे (नाका) वर डाग देऊ.

Verse 17

إِنَّا بَلَوْنَـٰهُمْ كَمَا بَلَوْنَآ أَصْحَـٰبَ ٱلْجَنَّةِ إِذْ أَقْسَمُوا۟ لَيَصْرِمُنَّهَا مُصْبِحِينَ

Transliteration innā balawnāhum kamā balawnā aṣḥāba l-janati idh aqsamū layaṣrimunnahā muṣ'biḥīna

Marathi १७. निःसंशय, आम्ही त्यांची तशीच परीक्षा घेतली जशी आम्ही बागवाल्यांची घेतली होती, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळ होताच त्या (बागे) ची फळे तोडून घेऊ.

Verse 18

وَلَا يَسْتَثْنُونَ

Transliteration walā yastathnūna

Marathi १८. आणि इन्शा अल्लाह (जर अल्लाहने इच्छिले) म्हटले नाही.

Verse 19

فَطَافَ عَلَيْهَا طَآئِفٌ مِّن رَّبِّكَ وَهُمْ نَآئِمُونَ

Transliteration faṭāfa ʿalayhā ṭāifun min rabbika wahum nāimūna

Marathi १९. तेव्हा त्या (बागे) वर तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक आपत्ती चारी बाजूंनी फिरून गेली आणि ते झोपतच राहिले.

Verse 20

فَأَصْبَحَتْ كَٱلصَّرِيمِ

Transliteration fa-aṣbaḥat kal-ṣarīmi

Marathi २०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत.

Verse 21

فَتَنَادَوْا۟ مُصْبِحِينَ

Transliteration fatanādaw muṣ'biḥīna

Marathi २१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली

Verse 22

أَنِ ٱغْدُوا۟ عَلَىٰ حَرْثِكُمْ إِن كُنتُمْ صَـٰرِمِينَ

Transliteration ani igh'dū ʿalā ḥarthikum in kuntum ṣārimīna

Marathi २२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा.

Verse 23

فَٱنطَلَقُوا۟ وَهُمْ يَتَخَـٰفَتُونَ

Transliteration fa-inṭalaqū wahum yatakhāfatūna

Marathi २३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले

Verse 24

أَن لَّا يَدْخُلَنَّهَا ٱلْيَوْمَ عَلَيْكُم مِّسْكِينٌ

Transliteration an lā yadkhulannahā l-yawma ʿalaykum mis'kīnun

Marathi २४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये.

Verse 25

وَغَدَوْا۟ عَلَىٰ حَرْدٍ قَـٰدِرِينَ

Transliteration waghadaw ʿalā ḥardin qādirīna

Marathi २५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला.

Verse 26

فَلَمَّا رَأَوْهَا قَالُوٓا۟ إِنَّا لَضَآلُّونَ

Transliteration falammā ra-awhā qālū innā laḍāllūna

Marathi २६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो.

Verse 27

بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ

Transliteration bal naḥnu maḥrūmūna

Marathi २७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो.

Verse 28

قَالَ أَوْسَطُهُمْ أَلَمْ أَقُل لَّكُمْ لَوْلَا تُسَبِّحُونَ

Transliteration qāla awsaṭuhum alam aqul lakum lawlā tusabbiḥūna

Marathi २८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत?

Verse 29

قَالُوا۟ سُبْحَـٰنَ رَبِّنَآ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِينَ

Transliteration qālū sub'ḥāna rabbinā innā kunnā ẓālimīna

Marathi २९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो.

Verse 30

فَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَلَـٰوَمُونَ

Transliteration fa-aqbala baʿḍuhum ʿalā baʿḍin yatalāwamūna

Marathi ३०. मग ते एकमेकांकडे तोंड करून बरे-वाईट बोलू लागले.

Verse 31

قَالُوا۟ يَـٰوَيْلَنَآ إِنَّا كُنَّا طَـٰغِينَ

Transliteration qālū yāwaylanā innā kunnā ṭāghīna

Marathi ३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो.

Verse 32

عَسَىٰ رَبُّنَآ أَن يُبْدِلَنَا خَيْرًا مِّنْهَآ إِنَّآ إِلَىٰ رَبِّنَا رَٰغِبُونَ

Transliteration ʿasā rabbunā an yub'dilanā khayran min'hā innā ilā rabbinā rāghibūna

Marathi ३२. काय नवल की आमचा पालनकर्ता आम्हाला यापेक्षा चांगला मोबदला प्रदान करील. निःसंशय, आम्ही आता आपल्या पालनकर्त्याशीच आशा राखतो.

Verse 33

كَذَٰلِكَ ٱلْعَذَابُ ۖ وَلَعَذَابُ ٱلْـَٔاخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا۟ يَعْلَمُونَ

Transliteration kadhālika l-ʿadhābu walaʿadhābu l-ākhirati akbaru law kānū yaʿlamūna

Marathi ३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते).

Verse 34

إِنَّ لِلْمُتَّقِينَ عِندَ رَبِّهِمْ جَنَّـٰتِ ٱلنَّعِيمِ

Transliteration inna lil'muttaqīna ʿinda rabbihim jannāti l-naʿīmi

Marathi ३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत.

Verse 35

أَفَنَجْعَلُ ٱلْمُسْلِمِينَ كَٱلْمُجْرِمِينَ

Transliteration afanajʿalu l-mus'limīna kal-muj'rimīna

Marathi ३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू?

Verse 36

مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ

Transliteration mā lakum kayfa taḥkumūna

Marathi ३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात?

Verse 37

أَمْ لَكُمْ كِتَـٰبٌ فِيهِ تَدْرُسُونَ

Transliteration am lakum kitābun fīhi tadrusūna

Marathi ३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता?

Verse 38

إِنَّ لَكُمْ فِيهِ لَمَا تَخَيَّرُونَ

Transliteration inna lakum fīhi lamā takhayyarūna

Marathi ३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत?

Verse 39

أَمْ لَكُمْ أَيْمَـٰنٌ عَلَيْنَا بَـٰلِغَةٌ إِلَىٰ يَوْمِ ٱلْقِيَـٰمَةِ ۙ إِنَّ لَكُمْ لَمَا تَحْكُمُونَ

Transliteration am lakum aymānun ʿalaynā bālighatun ilā yawmi l-qiyāmati inna lakum lamā taḥkumūna

Marathi ३९. किंवा आमच्याकडून तुम्ही काही अशा शपथा घेतल्या आहेत, ज्या कयामत पर्यंत बाकी राहतील, की तुमच्यासाठी ते सर्व आहे, जे तुम्ही आपल्यातर्फे निर्धारित करून घ्यावे?

Verse 40

سَلْهُمْ أَيُّهُم بِذَٰلِكَ زَعِيمٌ

Transliteration salhum ayyuhum bidhālika zaʿīmun

Marathi ४०. त्यांना विचारा की त्यांच्यापैकी कोण या गोष्टीस जबाबदार (आणि दावेदार आहे?

Verse 41

أَمْ لَهُمْ شُرَكَآءُ فَلْيَأْتُوا۟ بِشُرَكَآئِهِمْ إِن كَانُوا۟ صَـٰدِقِينَ

Transliteration am lahum shurakāu falyatū bishurakāihim in kānū ṣādiqīna

Marathi ४१. काय त्यांचे काही भागीदार आहेत? (असे असेल) तर त्यांनी आपल्या आपल्या भागीदारांना घेऊन यावे, जर ते सच्चे आहेत.

Verse 42

يَوْمَ يُكْشَفُ عَن سَاقٍ وَيُدْعَوْنَ إِلَى ٱلسُّجُودِ فَلَا يَسْتَطِيعُونَ

Transliteration yawma yuk'shafu ʿan sāqin wayud'ʿawna ilā l-sujūdi falā yastaṭīʿūna

Marathi ४२. ज्या दिवशी पोटरी उघड केली जाईल, आणि सजदा करण्यासाठी त्यांना बोलाविले जाईल (परंतु ते सजदा) करू शकणार नाहीत.१

Verse 43

خَـٰشِعَةً أَبْصَـٰرُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ۖ وَقَدْ كَانُوا۟ يُدْعَوْنَ إِلَى ٱلسُّجُودِ وَهُمْ سَـٰلِمُونَ

Transliteration khāshiʿatan abṣāruhum tarhaquhum dhillatun waqad kānū yud'ʿawna ilā l-sujūdi wahum sālimūna

Marathi ४३. त्यांचे डोळे (नजरा) १ झुकलेले असतील, आणि त्यांच्यावर अपमान आच्छादित होत असेल, वस्तुतः यांना सजदा करण्याकरिता (त्या वेळीही) बोलाविले जात होते, जेव्हा ते धडधाकट होते.

Verse 44

فَذَرْنِى وَمَن يُكَذِّبُ بِهَـٰذَا ٱلْحَدِيثِ ۖ سَنَسْتَدْرِجُهُم مِّنْ حَيْثُ لَا يَعْلَمُونَ

Transliteration fadharnī waman yukadhibu bihādhā l-ḥadīthi sanastadrijuhum min ḥaythu lā yaʿlamūna

Marathi ४४. तेव्हा मला आणि या गोष्टीस खोटे ठरविणाऱ्यांना सोडून द्या. आम्ही त्यांना अशा प्रकारे हळू हळू खेचून घेऊ की त्यांना खबरही नसेल.

Verse 45

وَأُمْلِى لَهُمْ ۚ إِنَّ كَيْدِى مَتِينٌ

Transliteration wa-um'lī lahum inna kaydī matīnun

Marathi ४५. आणि मी त्यांना ढील देईन (सैल सोडेन), निःसंशय, माझी उपाययोजना मोठी मजबूत आहे.

Verse 46

أَمْ تَسْـَٔلُهُمْ أَجْرًا فَهُم مِّن مَّغْرَمٍ مُّثْقَلُونَ

Transliteration am tasaluhum ajran fahum min maghramin muth'qalūna

Marathi ४६. काय तुम्ही त्यांच्याकडून एखादे पारिश्रमिक इच्छिता, ज्याच्या ओझ्याने हे दबले जात असावेत?

Verse 47

أَمْ عِندَهُمُ ٱلْغَيْبُ فَهُمْ يَكْتُبُونَ

Transliteration am ʿindahumu l-ghaybu fahum yaktubūna

Marathi ४७. किंवा काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे, ज्यास हे लिहीत असावेत?

Verse 48

فَٱصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تَكُن كَصَاحِبِ ٱلْحُوتِ إِذْ نَادَىٰ وَهُوَ مَكْظُومٌ

Transliteration fa-iṣ'bir liḥuk'mi rabbika walā takun kaṣāḥibi l-ḥūti idh nādā wahuwa makẓūmun

Marathi ४८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची धैर्यपूर्वक प्रतीक्षा करा आणि मासेवाल्यासारखे होऊ नका, जेव्हा त्याने दुःखाच्या अवस्थेत (आपल्या पालनकर्त्यास) पुकारले.

Verse 49

لَّوْلَآ أَن تَدَٰرَكَهُۥ نِعْمَةٌ مِّن رَّبِّهِۦ لَنُبِذَ بِٱلْعَرَآءِ وَهُوَ مَذْمُومٌ

Transliteration lawlā an tadārakahu niʿ'matun min rabbihi lanubidha bil-ʿarāi wahuwa madhmūmun

Marathi ४९. जर त्यास त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या कृपेने प्राप्त करून घेतले नसते, तर निःसंशय, तो वाईट अवस्थेत उघड्या जमिनीवर टाकला गेला असता.

Verse 50

فَٱجْتَبَـٰهُ رَبُّهُۥ فَجَعَلَهُۥ مِنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration fa-ij'tabāhu rabbuhu fajaʿalahu mina l-ṣāliḥīna

Marathi ५०. मग त्याला त्याच्या पालनकर्त्याने निवडले आणि त्याला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील केले.

Verse 51

وَإِن يَكَادُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَيُزْلِقُونَكَ بِأَبْصَـٰرِهِمْ لَمَّا سَمِعُوا۟ ٱلذِّكْرَ وَيَقُولُونَ إِنَّهُۥ لَمَجْنُونٌ

Transliteration wa-in yakādu alladhīna kafarū layuz'liqūnaka bi-abṣārihim lammā samiʿū l-dhik'ra wayaqūlūna innahu lamajnūnun

Marathi ५१. आणि निकट आहे की (या) काफिरांनी आपल्या (तीक्ष्ण) नजरेने तुम्हाला घसरून टाकले.१ हे जेव्हा जेव्हा कुरआन ऐकतात आणि म्हणतात की हा तर खात्रीने वेडा आहे!

Verse 52

وَمَا هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā huwa illā dhik'run lil'ʿālamīna

Marathi ५२. आणि वास्तविक हा (कुरआन) तर समस्त जगातील लोकांकरिता पूर्ण बोध-उपदेश आहे.

Read Surah Al-Qalam in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.