Surah Al-Hajj in Marathi: translation and audio
Surah 22 · الحج · The Pilgrimage · 78 verses
Surah Al-Hajj verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Hajj word by word in English.
Verse 1
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ٱتَّقُوا۟ رَبَّكُمْ ۚ إِنَّ زَلْزَلَةَ ٱلسَّاعَةِ شَىْءٌ عَظِيمٌ
Transliteration yāayyuhā l-nāsu ittaqū rabbakum inna zalzalata l-sāʿati shayon ʿaẓīmun
Marathi १. लोक हो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा, निःसंशय कयामतचा भूकंप फार जबरदस्त गोष्ट आहे.
Verse 2
يَوْمَ تَرَوْنَهَا تَذْهَلُ كُلُّ مُرْضِعَةٍ عَمَّآ أَرْضَعَتْ وَتَضَعُ كُلُّ ذَاتِ حَمْلٍ حَمْلَهَا وَتَرَى ٱلنَّاسَ سُكَـٰرَىٰ وَمَا هُم بِسُكَـٰرَىٰ وَلَـٰكِنَّ عَذَابَ ٱللَّهِ شَدِيدٌ
Transliteration yawma tarawnahā tadhhalu kullu mur'ḍiʿatin ʿammā arḍaʿat wataḍaʿu kullu dhāti ḥamlin ḥamlahā watarā l-nāsa sukārā wamā hum bisukārā walākinna ʿadhāba l-lahi shadīdun
Marathi २. ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल, प्रत्येक दूध पाजणारी माता आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरेल आणि सर्व गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल, आणि तुम्ही पाहाल की लोक मदहोश दिसून येतील, वास्तविक मदहोश नसतील, परंतु अल्लाहचा अज़ाब (शिक्षा- यातना) मोठा कठोर आहे.
Verse 3
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يُجَـٰدِلُ فِى ٱللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَيَتَّبِعُ كُلَّ شَيْطَـٰنٍ مَّرِيدٍ
Transliteration wamina l-nāsi man yujādilu fī l-lahi bighayri ʿil'min wayattabiʿu kulla shayṭānin marīdin
Marathi ३. आणि काही लोक अल्लाहविषयी अज्ञानपूर्ण गोष्टी बोलतात, आणि प्रत्येक उदंड सैतानाचे अनुसरण करतात.
Verse 4
كُتِبَ عَلَيْهِ أَنَّهُۥ مَن تَوَلَّاهُ فَأَنَّهُۥ يُضِلُّهُۥ وَيَهْدِيهِ إِلَىٰ عَذَابِ ٱلسَّعِيرِ
Transliteration kutiba ʿalayhi annahu man tawallāhu fa-annahu yuḍilluhu wayahdīhi ilā ʿadhābi l-saʿīri
Marathi ४. ज्याच्याबद्दल अल्लाहचा फैसला लिहिला गेला आहे की जो कोणी त्याच्याशी दोस्ती करेल, तो त्याला मार्गभ्रष्ट करेल आणि त्याला आगीच्या शिक्षा-यातनेकडे नेईल.
Verse 5
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِن كُنتُمْ فِى رَيْبٍ مِّنَ ٱلْبَعْثِ فَإِنَّا خَلَقْنَـٰكُم مِّن تُرَابٍ ثُمَّ مِن نُّطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ مِن مُّضْغَةٍ مُّخَلَّقَةٍ وَغَيْرِ مُخَلَّقَةٍ لِّنُبَيِّنَ لَكُمْ ۚ وَنُقِرُّ فِى ٱلْأَرْحَامِ مَا نَشَآءُ إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّى ثُمَّ نُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِتَبْلُغُوٓا۟ أَشُدَّكُمْ ۖ وَمِنكُم مَّن يُتَوَفَّىٰ وَمِنكُم مَّن يُرَدُّ إِلَىٰٓ أَرْذَلِ ٱلْعُمُرِ لِكَيْلَا يَعْلَمَ مِنۢ بَعْدِ عِلْمٍ شَيْـًٔا ۚ وَتَرَى ٱلْأَرْضَ هَامِدَةً فَإِذَآ أَنزَلْنَا عَلَيْهَا ٱلْمَآءَ ٱهْتَزَّتْ وَرَبَتْ وَأَنۢبَتَتْ مِن كُلِّ زَوْجٍۭ بَهِيجٍ
Transliteration yāayyuhā l-nāsu in kuntum fī raybin mina l-baʿthi fa-innā khalaqnākum min turābin thumma min nuṭ'fatin thumma min ʿalaqatin thumma min muḍ'ghatin mukhallaqatin waghayri mukhallaqatin linubayyina lakum wanuqirru fī l-arḥāmi mā nashāu ilā ajalin musamman thumma nukh'rijukum ṭif'lan thumma litablughū ashuddakum waminkum man yutawaffā waminkum man yuraddu ilā ardhali l-ʿumuri likaylā yaʿlama min baʿdi ʿil'min shayan watarā l-arḍa hāmidatan fa-idhā anzalnā ʿalayhā l-māa ih'tazzat warabat wa-anbatat min kulli zawjin bahījin
Marathi ५. लोकांनो! जर तुम्हाला मेल्यानंतर (पुन्हा) जिवंत होण्याबाबत शंका आहे, तर विचार करा, आम्ही तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग जमलेल्या रक्तापासून, आणि मांसाच्या तुकड्यापासून जे रूप दिले गेले होते आणि विनारूपही होते. हे आम्ही तुमच्यावर स्पष्ट करतो आणि आम्ही ज्याला इच्छितो एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या उदरात ठेवतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपाने या जगात आणतो मग यासाठी की तुम्ही आपल्या पूर्ण तरुणपणास पोहचावे, तुमच्यापैकी काही असे आहेत जे मरण पावतात आणि काही जीर्ण वयाकडे पुन्हा परतविले जातात की ते एका गोष्टीशी परिचित झाल्यानंतर दुसऱ्यांदा अनभिज्ञ व्हावेत. तुम्ही पाहता की जमीन नापीक आणि कोरडी आहे, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पाऊस पाडतो तेव्हा ती चेतनामय होते आणि फुगते आणि प्रत्येक प्रकारची सुंदर वनस्पती उगविते.
Verse 6
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلْحَقُّ وَأَنَّهُۥ يُحْىِ ٱلْمَوْتَىٰ وَأَنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration dhālika bi-anna l-laha huwa l-ḥaqu wa-annahu yuḥ'yī l-mawtā wa-annahu ʿalā kulli shayin qadīrun
Marathi ६. हे अशासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि तोच मेलेल्यांना जिवंत करतो आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
Verse 7
وَأَنَّ ٱلسَّاعَةَ ءَاتِيَةٌ لَّا رَيْبَ فِيهَا وَأَنَّ ٱللَّهَ يَبْعَثُ مَن فِى ٱلْقُبُورِ
Transliteration wa-anna l-sāʿata ātiyatun lā rayba fīhā wa-anna l-laha yabʿathu man fī l-qubūri
Marathi ७. आणि हे की कयामत निश्चितच येणार आहे, ज्याबाबत कसलीही शंका नाही आणि अगदी खात्रीने अल्लाह कबरीत असलेल्यांना दुसऱ्यांदा जिवंत करेल.
Verse 8
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يُجَـٰدِلُ فِى ٱللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَلَا هُدًى وَلَا كِتَـٰبٍ مُّنِيرٍ
Transliteration wamina l-nāsi man yujādilu fī l-lahi bighayri ʿil'min walā hudan walā kitābin munīrin
Marathi ८. आणि काही लोक अल्लाहविषयी ज्ञानाविना, आणि मार्गदर्शनाविना आणि कोणत्याही दिव्य ग्रंथाविना वाद घालतात.
Verse 9
ثَانِىَ عِطْفِهِۦ لِيُضِلَّ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۖ لَهُۥ فِى ٱلدُّنْيَا خِزْىٌ ۖ وَنُذِيقُهُۥ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ عَذَابَ ٱلْحَرِيقِ
Transliteration thāniya ʿiṭ'fihi liyuḍilla ʿan sabīli l-lahi lahu fī l-dun'yā khiz'yun wanudhīquhu yawma l-qiyāmati ʿadhāba l-ḥarīqi
Marathi ९. आपला पैलू वळवून घेणारा बनून (ताठरपणे) यासाठी की अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करावे तो या जगातही अपमानित होईल, आणि कयामतच्या दिवशीही आम्ही त्याला जहन्नमच्या आगीत जळण्याची शिक्षा - यातना चाखवू.
Verse 10
ذَٰلِكَ بِمَا قَدَّمَتْ يَدَاكَ وَأَنَّ ٱللَّهَ لَيْسَ بِظَلَّـٰمٍ لِّلْعَبِيدِ
Transliteration dhālika bimā qaddamat yadāka wa-anna l-laha laysa biẓallāmin lil'ʿabīdi
Marathi १०. हे त्या कर्मांपायी, जी तुझ्या हातांनी पुढे पाठविली होती, मात्र विश्वास राखा की अल्लाह आपल्या दासांवर अत्याचार करणारा नाही.
Verse 11
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يَعْبُدُ ٱللَّهَ عَلَىٰ حَرْفٍ ۖ فَإِنْ أَصَابَهُۥ خَيْرٌ ٱطْمَأَنَّ بِهِۦ ۖ وَإِنْ أَصَابَتْهُ فِتْنَةٌ ٱنقَلَبَ عَلَىٰ وَجْهِهِۦ خَسِرَ ٱلدُّنْيَا وَٱلْـَٔاخِرَةَ ۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلْخُسْرَانُ ٱلْمُبِينُ
Transliteration wamina l-nāsi man yaʿbudu l-laha ʿalā ḥarfin fa-in aṣābahu khayrun iṭ'ma-anna bihi wa-in aṣābathu fit'natun inqalaba ʿalā wajhihi khasira l-dun'yā wal-ākhirata dhālika huwa l-khus'rānu l-mubīnu
Marathi ११. आणि काही लोक असेही आहेत, जे एका किनाऱ्याला राहून अल्लाहची उपासना करतात, जर काही लाभ झाला तर समाधानी होतात, आणि जर एखादे दुःख वाट्याला आले तर त्याच क्षणी माघारी फिरतात. त्यांनी इहलोक आणि परलोक दोघांचे नुकसान उचलले. वस्तुतः हेच उघड नुकसान आहे.
Verse 12
يَدْعُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَضُرُّهُۥ وَمَا لَا يَنفَعُهُۥ ۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلضَّلَـٰلُ ٱلْبَعِيدُ
Transliteration yadʿū min dūni l-lahi mā lā yaḍurruhu wamā lā yanfaʿuhu dhālika huwa l-ḍalālu l-baʿīdu
Marathi १२. ते अल्लाहखेरीज त्यांना पुकारतात जे ना नुकसान पोहचवू शकतात ना फायदा. हीच ती दूरची मार्गभ्रष्टता आहे.
Verse 13
يَدْعُوا۟ لَمَن ضَرُّهُۥٓ أَقْرَبُ مِن نَّفْعِهِۦ ۚ لَبِئْسَ ٱلْمَوْلَىٰ وَلَبِئْسَ ٱلْعَشِيرُ
Transliteration yadʿū laman ḍarruhu aqrabu min nafʿihi labi'sa l-mawlā walabi'sa l-ʿashīru
Marathi १३. अशाला पुकारतात ज्यांचे नुकसान, लाभापेक्षा अधिक जवळ आहे निःसंशय मोठे वाईट संरक्षक आहेत आणि वाईट दोस्त.
Verse 14
إِنَّ ٱللَّهَ يُدْخِلُ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ ۚ إِنَّ ٱللَّهَ يَفْعَلُ مَا يُرِيدُ
Transliteration inna l-laha yud'khilu alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti jannātin tajrī min taḥtihā l-anhāru inna l-laha yafʿalu mā yurīdu
Marathi १४. निःसंशय, ईमान (राखून) सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह, अशा जन्नतमध्ये दाखल करील जिच्या खाली प्रवाह वाहत असतील. अल्लाह जे इच्छितो ते निश्चित करतो.
Verse 15
مَن كَانَ يَظُنُّ أَن لَّن يَنصُرَهُ ٱللَّهُ فِى ٱلدُّنْيَا وَٱلْـَٔاخِرَةِ فَلْيَمْدُدْ بِسَبَبٍ إِلَى ٱلسَّمَآءِ ثُمَّ لْيَقْطَعْ فَلْيَنظُرْ هَلْ يُذْهِبَنَّ كَيْدُهُۥ مَا يَغِيظُ
Transliteration man kāna yaẓunnu an lan yanṣurahu l-lahu fī l-dun'yā wal-ākhirati falyamdud bisababin ilā l-samāi thumma l'yaqṭaʿ falyanẓur hal yudh'hibanna kayduhu mā yaghīẓu
Marathi १५. ज्याला हे वाटत असेल की अल्लाह आपल्या पैगंबरांची मदत दोन्ही लोकात (इहलोक आणि परलोक) करणार नाही, तर त्याने उंच जागी एक दोर बांधून (आपल्या गळ्यात फास टाकून घ्यावा) आणि गळा घोटून घ्यावा, मग पाहावे की त्याच्या चतुराईने ती गोष्ट दूर होते जी त्याला कासाविस करीत आहे.
Verse 16
وَكَذَٰلِكَ أَنزَلْنَـٰهُ ءَايَـٰتٍۭ بَيِّنَـٰتٍ وَأَنَّ ٱللَّهَ يَهْدِى مَن يُرِيدُ
Transliteration wakadhālika anzalnāhu āyātin bayyinātin wa-anna l-laha yahdī man yurīdu
Marathi १६. आणि आम्ही अशआच प्रकारे या कुरआनाला स्पष्ट आयतींमध्ये अवतरित केले आहे आणि अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गदर्शन करतो.
Verse 17
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَٱلَّذِينَ هَادُوا۟ وَٱلصَّـٰبِـِٔينَ وَٱلنَّصَـٰرَىٰ وَٱلْمَجُوسَ وَٱلَّذِينَ أَشْرَكُوٓا۟ إِنَّ ٱللَّهَ يَفْصِلُ بَيْنَهُمْ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ ۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ شَهِيدٌ
Transliteration inna alladhīna āmanū wa-alladhīna hādū wal-ṣābiīna wal-naṣārā wal-majūsa wa-alladhīna ashrakū inna l-laha yafṣilu baynahum yawma l-qiyāmati inna l-laha ʿalā kulli shayin shahīdun
Marathi १७. ईमान राखणारे, आणि यहूदी (ज्यू) आणि विधर्मी आणि ख्रिश्चन आणि अग्नीपूजक आणि अनेकेश्वरवादी या सर्वांच्या दरम्यान अल्लाह स्वतः निर्णय करील. अल्लाह प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे.
Verse 18
أَلَمْ تَرَ أَنَّ ٱللَّهَ يَسْجُدُ لَهُۥ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَن فِى ٱلْأَرْضِ وَٱلشَّمْسُ وَٱلْقَمَرُ وَٱلنُّجُومُ وَٱلْجِبَالُ وَٱلشَّجَرُ وَٱلدَّوَآبُّ وَكَثِيرٌ مِّنَ ٱلنَّاسِ ۖ وَكَثِيرٌ حَقَّ عَلَيْهِ ٱلْعَذَابُ ۗ وَمَن يُهِنِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِن مُّكْرِمٍ ۚ إِنَّ ٱللَّهَ يَفْعَلُ مَا يَشَآءُ ۩
Transliteration alam tara anna l-laha yasjudu lahu man fī l-samāwāti waman fī l-arḍi wal-shamsu wal-qamaru wal-nujūmu wal-jibālu wal-shajaru wal-dawābu wakathīrun mina l-nāsi wakathīrun ḥaqqa ʿalayhi l-ʿadhābu waman yuhini l-lahu famā lahu min muk'rimin inna l-laha yafʿalu mā yashāu
Marathi १८. काय तुम्ही नाही पाहात की अल्लाहच्या समोरच सजदा करतात जे आकाशात आहेत आणि जमिनीवर आहेत. त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, वृक्ष, पशू आणि सजीव१ आणि अनेक मानव देखील. होय बहुतेक असेही आहेत, ज्यांना (अल्लाहची) शिक्षा- यातना लागू झाली आहे आणि ज्याला अल्लाह अपमानित करेल, त्याला मान-प्रतिष्ठा देणारा कोणी नाही, अल्लाह जे इच्छितो ते करतो.
Verse 19
۞ هَـٰذَانِ خَصْمَانِ ٱخْتَصَمُوا۟ فِى رَبِّهِمْ ۖ فَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ قُطِّعَتْ لَهُمْ ثِيَابٌ مِّن نَّارٍ يُصَبُّ مِن فَوْقِ رُءُوسِهِمُ ٱلْحَمِيمُ
Transliteration hādhāni khaṣmāni ikh'taṣamū fī rabbihim fa-alladhīna kafarū quṭṭiʿat lahum thiyābun min nārin yuṣabbu min fawqi ruūsihimu l-ḥamīmu
Marathi १९. हे दोन्ही आपल्या पालनकर्त्याविषयी मतभेद राखणारे आहेत, तेव्हा इन्कारी लोकांकरिता आगीचे कपडे, माप घेऊन कापले जातील, आणि त्यांच्या डोक्यांवर उकळत्या पाण्याची धार सोडली जाईल.
Verse 20
يُصْهَرُ بِهِۦ مَا فِى بُطُونِهِمْ وَٱلْجُلُودُ
Transliteration yuṣ'haru bihi mā fī buṭūnihim wal-julūdu
Marathi २०. ज्याद्वारे त्याच्या पोटातील सर्व वस्तू आणि चामडी वगैरे गळून पडेल.
Verse 21
وَلَهُم مَّقَـٰمِعُ مِنْ حَدِيدٍ
Transliteration walahum maqāmiʿu min ḥadīdin
Marathi २१. आणि त्यांना शिक्षा- यातना देण्यासाठी लोखंडी हातोडे आहेत.
Verse 22
كُلَّمَآ أَرَادُوٓا۟ أَن يَخْرُجُوا۟ مِنْهَا مِنْ غَمٍّ أُعِيدُوا۟ فِيهَا وَذُوقُوا۟ عَذَابَ ٱلْحَرِيقِ
Transliteration kullamā arādū an yakhrujū min'hā min ghammin uʿīdū fīhā wadhūqū ʿadhāba l-ḥarīqi
Marathi २२. हे जेव्हा जेव्हा तिथल्या दुःख-यातनेपासून पळ काढण्याचा इरादा करतील, तिथे (पुन्हा) परतविले जातील आणि (त्यांना सांगितले जाईल) जळण्याच्या शिक्षेची गोडी चाखा.
Verse 23
إِنَّ ٱللَّهَ يُدْخِلُ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ يُحَلَّوْنَ فِيهَا مِنْ أَسَاوِرَ مِن ذَهَبٍ وَلُؤْلُؤًا ۖ وَلِبَاسُهُمْ فِيهَا حَرِيرٌ
Transliteration inna l-laha yud'khilu alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti jannātin tajrī min taḥtihā l-anhāru yuḥallawna fīhā min asāwira min dhahabin walu'lu-an walibāsuhum fīhā ḥarīrun
Marathi २३. निःसंशय, ईमान राखणाऱ्या आणि सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. जिथे त्यांना सोन्याची कांकणे घातली जातील आणि अस्सल मोतीही, त्या ठिकाणी त्यांचे वस्त्र निर्भेळ रेशमाचे असेल.
Verse 24
وَهُدُوٓا۟ إِلَى ٱلطَّيِّبِ مِنَ ٱلْقَوْلِ وَهُدُوٓا۟ إِلَىٰ صِرَٰطِ ٱلْحَمِيدِ
Transliteration wahudū ilā l-ṭayibi mina l-qawli wahudū ilā ṣirāṭi l-ḥamīdi
Marathi २४. आणि त्यांना पवित्र वचनाचा मार्ग दाखविला गेला आणि प्रशंसनीय (अल्लाहचे) मार्गदर्शन दिले गेले.
Verse 25
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ وَٱلْمَسْجِدِ ٱلْحَرَامِ ٱلَّذِى جَعَلْنَـٰهُ لِلنَّاسِ سَوَآءً ٱلْعَـٰكِفُ فِيهِ وَٱلْبَادِ ۚ وَمَن يُرِدْ فِيهِ بِإِلْحَادٍۭ بِظُلْمٍ نُّذِقْهُ مِنْ عَذَابٍ أَلِيمٍ
Transliteration inna alladhīna kafarū wayaṣuddūna ʿan sabīli l-lahi wal-masjidi l-ḥarāmi alladhī jaʿalnāhu lilnnāsi sawāan l-ʿākifu fīhi wal-bādi waman yurid fīhi bi-il'ḥādin biẓul'min nudhiq'hu min ʿadhābin alīmin
Marathi २५. ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखू लागले आणि त्या आदरणीय मस्जिदीपासूनही, जिला आम्ही समस्त लोकांकरिता एकसमान केले आहे, मग तिथले रहिवाशी असोत किंवा बाहेरून आलेले असोत, जो देखील अत्याचारपूर्वक त्या ठिकाणी मार्गभ्रष्ट होण्याचा विचार करील, आम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची गोडी चाखवू.
Verse 26
وَإِذْ بَوَّأْنَا لِإِبْرَٰهِيمَ مَكَانَ ٱلْبَيْتِ أَن لَّا تُشْرِكْ بِى شَيْـًٔا وَطَهِّرْ بَيْتِىَ لِلطَّآئِفِينَ وَٱلْقَآئِمِينَ وَٱلرُّكَّعِ ٱلسُّجُودِ
Transliteration wa-idh bawwanā li-ib'rāhīma makāna l-bayti an lā tush'rik bī shayan waṭahhir baytiya lilṭṭāifīna wal-qāimīna wal-rukaʿi l-sujūdi
Marathi २६. आणि जेव्हा आम्ही इब्राहीमकरिता काबागृहाचे स्थान निश्चित केले (या अटीवर) की माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सामील करू नका आणि माझ्या घराला तवाफ (प्रदक्षिणा) करणाऱ्या, उभे राहणाऱ्या, रुकूअ आणि सजदा करणाऱ्यांकरिता स्वच्छ- शुद्ध राखा.
Verse 27
وَأَذِّن فِى ٱلنَّاسِ بِٱلْحَجِّ يَأْتُوكَ رِجَالًا وَعَلَىٰ كُلِّ ضَامِرٍ يَأْتِينَ مِن كُلِّ فَجٍّ عَمِيقٍ
Transliteration wa-adhin fī l-nāsi bil-ḥaji yatūka rijālan waʿalā kulli ḍāmirin yatīna min kulli fajjin ʿamīqin
Marathi २७. आणि लोकांमध्ये हजचे ऐलान करा, लोक तुमच्याजवळ पायी चालतही येतील आणि दुबळ्या रोडावलेल्या उंटावरही दूरदूरच्या सर्व मार्गांनी येतील.
Verse 28
لِّيَشْهَدُوا۟ مَنَـٰفِعَ لَهُمْ وَيَذْكُرُوا۟ ٱسْمَ ٱللَّهِ فِىٓ أَيَّامٍ مَّعْلُومَـٰتٍ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِيمَةِ ٱلْأَنْعَـٰمِ ۖ فَكُلُوا۟ مِنْهَا وَأَطْعِمُوا۟ ٱلْبَآئِسَ ٱلْفَقِيرَ
Transliteration liyashhadū manāfiʿa lahum wayadhkurū is'ma l-lahi fī ayyāmin maʿlūmātin ʿalā mā razaqahum min bahīmati l-anʿāmi fakulū min'hā wa-aṭʿimū l-bāisa l-faqīra
Marathi २८. यासाठी की त्यांनी आपला लाभ प्राप्त करून घेण्यासाठी यावे आणि त्या निर्धारीत दिवसामध्ये अल्लाहचे नामःस्मरण करावे त्या चार पायांच्या पाळीव पशूंवर, तेव्हा तुम्ही स्वतः देखील खा आणि उपाशीपोटी असलेल्या गरीबांनाही खाऊ घाला.
Verse 29
ثُمَّ لْيَقْضُوا۟ تَفَثَهُمْ وَلْيُوفُوا۟ نُذُورَهُمْ وَلْيَطَّوَّفُوا۟ بِٱلْبَيْتِ ٱلْعَتِيقِ
Transliteration thumma l'yaqḍū tafathahum walyūfū nudhūrahum walyaṭṭawwafū bil-bayti l-ʿatīqi
Marathi २९. मग त्यांनी आपला मळ- घाण दूर करावी आणि आपला नवस पूर्ण करावा आणि अल्लाहच्या जुन्या घराला प्रदक्षिणा करावी.
Verse 30
ذَٰلِكَ وَمَن يُعَظِّمْ حُرُمَـٰتِ ٱللَّهِ فَهُوَ خَيْرٌ لَّهُۥ عِندَ رَبِّهِۦ ۗ وَأُحِلَّتْ لَكُمُ ٱلْأَنْعَـٰمُ إِلَّا مَا يُتْلَىٰ عَلَيْكُمْ ۖ فَٱجْتَنِبُوا۟ ٱلرِّجْسَ مِنَ ٱلْأَوْثَـٰنِ وَٱجْتَنِبُوا۟ قَوْلَ ٱلزُّورِ
Transliteration dhālika waman yuʿaẓẓim ḥurumāti l-lahi fahuwa khayrun lahu ʿinda rabbihi wa-uḥillat lakumu l-anʿāmu illā mā yut'lā ʿalaykum fa-ij'tanibū l-rij'sa mina l-awthāni wa-ij'tanibū qawla l-zūri
Marathi ३०. हे आहेत (हजचे धार्मिक विधी) आणि जो, अल्लाहने निर्धारित केलेल्या प्रतिष्ठापूर्ण गोष्टींचा आदर राखेल तर हे त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता उत्तम आहे आणि तुमच्यासाठी गुरे-ढोरे हलाल (वैध) ठरविले गेले आहेत, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांचा आदेश तुम्हाला ऐकविला गेला आहे, यास्तव मूर्तींच्या मलीनतेपासून दूर राहा, आणि खोटे बोलण्यापासूनही अलिप्त राहा.
Verse 31
حُنَفَآءَ لِلَّهِ غَيْرَ مُشْرِكِينَ بِهِۦ ۚ وَمَن يُشْرِكْ بِٱللَّهِ فَكَأَنَّمَا خَرَّ مِنَ ٱلسَّمَآءِ فَتَخْطَفُهُ ٱلطَّيْرُ أَوْ تَهْوِى بِهِ ٱلرِّيحُ فِى مَكَانٍ سَحِيقٍ
Transliteration ḥunafāa lillahi ghayra mush'rikīna bihi waman yush'rik bil-lahi faka-annamā kharra mina l-samāi fatakhṭafuhu l-ṭayru aw tahwī bihi l-rīḥu fī makānin saḥīqin
Marathi ३१. अल्लाहच्या तौहीद (एकेश्वरवादा) ला मान्य करीत, त्याच्यासोबत दुसऱ्या कुणाला सहभागी न ठरवित. (ऐका) अल्लाहचा सहभागी ठरविणारा जणू आकाशातून खाली कोसळला, आता एक तर त्याला पक्षी उचलून नेतील किंवा हवा एखाद्या दूरच्या ठिकाणी फेकून देईल.
Verse 32
ذَٰلِكَ وَمَن يُعَظِّمْ شَعَـٰٓئِرَ ٱللَّهِ فَإِنَّهَا مِن تَقْوَى ٱلْقُلُوبِ
Transliteration dhālika waman yuʿaẓẓim shaʿāira l-lahi fa-innahā min taqwā l-qulūbi
Marathi ३२. (ही आहे वस्तुस्थिती) तेव्हा जो कोणी अल्लाहच्या निशाण्यांचा (प्रतीकांचा) आदर-सन्मान राखेल, तर त्याच्या मनातील अल्लाहच्या भयाचे हेच कारण आहे.
Verse 33
لَكُمْ فِيهَا مَنَـٰفِعُ إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّى ثُمَّ مَحِلُّهَآ إِلَى ٱلْبَيْتِ ٱلْعَتِيقِ
Transliteration lakum fīhā manāfiʿu ilā ajalin musamman thumma maḥilluhā ilā l-bayti l-ʿatīqi
Marathi ३३. त्यांच्यात तुमच्यासाठी एका निर्धारित अवधीपर्यंत लाभ आहे, मग त्यांच्या कुर्बानी (बळी चढविण्या) ची जागा काबागृहात आहे.
Verse 34
وَلِكُلِّ أُمَّةٍ جَعَلْنَا مَنسَكًا لِّيَذْكُرُوا۟ ٱسْمَ ٱللَّهِ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِيمَةِ ٱلْأَنْعَـٰمِ ۗ فَإِلَـٰهُكُمْ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ فَلَهُۥٓ أَسْلِمُوا۟ ۗ وَبَشِّرِ ٱلْمُخْبِتِينَ
Transliteration walikulli ummatin jaʿalnā mansakan liyadhkurū is'ma l-lahi ʿalā mā razaqahum min bahīmati l-anʿāmi fa-ilāhukum ilāhun wāḥidun falahu aslimū wabashiri l-mukh'bitīna
Marathi ३४. आणि प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही कुर्बानीची एक पद्धत निश्चित केली आहे, यासाठी की त्यांनी त्या चतुष्पाद पशूंवर अल्लाहचे नाव घ्यावे, जे अल्लाहने त्यांना प्रदान करून ठेवले आहेत. (लक्षात घ्या) तुम्हा सर्वांचा खराखुरा उपास्य (आराध्य दैवत) फक्त एकच आहे, तुम्ही त्याच्या अधीन आणि आज्ञाधारक व्हा, विनम्रता अंगिकारणाऱ्यांना खूशखबरी द्या.
Verse 35
ٱلَّذِينَ إِذَا ذُكِرَ ٱللَّهُ وَجِلَتْ قُلُوبُهُمْ وَٱلصَّـٰبِرِينَ عَلَىٰ مَآ أَصَابَهُمْ وَٱلْمُقِيمِى ٱلصَّلَوٰةِ وَمِمَّا رَزَقْنَـٰهُمْ يُنفِقُونَ
Transliteration alladhīna idhā dhukira l-lahu wajilat qulūbuhum wal-ṣābirīna ʿalā mā aṣābahum wal-muqīmī l-ṣalati wamimmā razaqnāhum yunfiqūna
Marathi ३५. त्यांची अवस्था अशी आहे की जेव्हा त्यांच्या समोर अल्लाहचे नामःस्मरण केले जाते, तेव्हा त्यांच्या हृदयाचा थरकाप होतो, जेव्हा त्याच्यावर संकट येते तेव्हा त्या संकटात धीर- संयम राखतात, ते नमाज कायम करणारे आहेत, आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून देत ही राहतात .
Verse 36
وَٱلْبُدْنَ جَعَلْنَـٰهَا لَكُم مِّن شَعَـٰٓئِرِ ٱللَّهِ لَكُمْ فِيهَا خَيْرٌ ۖ فَٱذْكُرُوا۟ ٱسْمَ ٱللَّهِ عَلَيْهَا صَوَآفَّ ۖ فَإِذَا وَجَبَتْ جُنُوبُهَا فَكُلُوا۟ مِنْهَا وَأَطْعِمُوا۟ ٱلْقَانِعَ وَٱلْمُعْتَرَّ ۚ كَذَٰلِكَ سَخَّرْنَـٰهَا لَكُمْ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ
Transliteration wal-bud'na jaʿalnāhā lakum min shaʿāiri l-lahi lakum fīhā khayrun fa-udh'kurū is'ma l-lahi ʿalayhā ṣawāffa fa-idhā wajabat junūbuhā fakulū min'hā wa-aṭʿimū l-qāniʿa wal-muʿ'tara kadhālika sakharnāhā lakum laʿallakum tashkurūna
Marathi ३६. कुर्बानीच्या उंटाला आम्ही तुमच्यासाठी अल्लाहच्या निशाण्यांपैकी ठरविले आहे. त्यांच्यात तुमच्यासाठी लाभ आहे, तेव्हा त्यांना उभे करून त्यांच्यावर अल्लाहचे नाव घ्या, मग जेव्हा त्यांचे अंग जमिनीला लागेल तेव्हा ते तुम्हीही खा आणि गोरगरीब व याचकांना आणि जो याचक नसेल त्यालाही खाऊ घाला. अशा प्रकारे आम्ही चतुष्पाद (पाळीव) पशूंना तुमच्या अधीन केले आहे, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.
Verse 37
لَن يَنَالَ ٱللَّهَ لُحُومُهَا وَلَا دِمَآؤُهَا وَلَـٰكِن يَنَالُهُ ٱلتَّقْوَىٰ مِنكُمْ ۚ كَذَٰلِكَ سَخَّرَهَا لَكُمْ لِتُكَبِّرُوا۟ ٱللَّهَ عَلَىٰ مَا هَدَىٰكُمْ ۗ وَبَشِّرِ ٱلْمُحْسِنِينَ
Transliteration lan yanāla l-laha luḥūmuhā walā dimāuhā walākin yanāluhu l-taqwā minkum kadhālika sakharahā lakum litukabbirū l-laha ʿalā mā hadākum wabashiri l-muḥ'sinīna
Marathi ३७. अल्लाहला कुर्बानीच्या जनावरांचे ना मांस पोहचते ना त्यांचे रक्त किंबहुना त्याला तुमच्या मनात असलेले अल्लाहचे भय पोहोचते, त्याचप्रमाणे अल्लाहने त्या जनावरांना तुमचे आज्ञाधारक (ताबेदार) बनविले आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या मार्गदर्शना (च्या आभारा) त त्याची महानता वर्णन करावी आणि सत्कर्म करणाऱ्यांना खूशखबरी ऐकवा.
Verse 38
۞ إِنَّ ٱللَّهَ يُدَٰفِعُ عَنِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ كُلَّ خَوَّانٍ كَفُورٍ
Transliteration inna l-laha yudāfiʿu ʿani alladhīna āmanū inna l-laha lā yuḥibbu kulla khawwānin kafūrin
Marathi ३८. निःसंशय, सच्चा ईमानधारकांच्या शत्रूंना अल्लाह स्वतः हटवितो, कोणताही विश्वासघातकी कृतघ्न अल्लाहला पसत नाही.
Verse 39
أُذِنَ لِلَّذِينَ يُقَـٰتَلُونَ بِأَنَّهُمْ ظُلِمُوا۟ ۚ وَإِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ نَصْرِهِمْ لَقَدِيرٌ
Transliteration udhina lilladhīna yuqātalūna bi-annahum ẓulimū wa-inna l-laha ʿalā naṣrihim laqadīrun
Marathi ३९. ज्या (मुसलमानां) शी (काफिर) लढाई करीत आहेत त्यांना देखील लढण्याची अनुमती दिली कारण ते अत्याचारपीडित आहेत. निःसंशय त्यांच्या मदतीकरिता अल्लाह परिपूर्ण सामर्थ्य राखतो.
Verse 40
ٱلَّذِينَ أُخْرِجُوا۟ مِن دِيَـٰرِهِم بِغَيْرِ حَقٍّ إِلَّآ أَن يَقُولُوا۟ رَبُّنَا ٱللَّهُ ۗ وَلَوْلَا دَفْعُ ٱللَّهِ ٱلنَّاسَ بَعْضَهُم بِبَعْضٍ لَّهُدِّمَتْ صَوَٰمِعُ وَبِيَعٌ وَصَلَوَٰتٌ وَمَسَـٰجِدُ يُذْكَرُ فِيهَا ٱسْمُ ٱللَّهِ كَثِيرًا ۗ وَلَيَنصُرَنَّ ٱللَّهُ مَن يَنصُرُهُۥٓ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِىٌّ عَزِيزٌ
Transliteration alladhīna ukh'rijū min diyārihim bighayri ḥaqqin illā an yaqūlū rabbunā l-lahu walawlā dafʿu l-lahi l-nāsa baʿḍahum bibaʿḍin lahuddimat ṣawāmiʿu wabiyaʿun waṣalawātun wamasājidu yudh'karu fīhā us'mu l-lahi kathīran walayanṣuranna l-lahu man yanṣuruhu inna l-laha laqawiyyun ʿazīzun
Marathi ४०. हे असे लोक आहेत, ज्यांना विनाकारण आपल्या घराबाहेर काढले गेले केवळ त्यांच्या या बोलण्यावर की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे. जर अल्लाह लोकांना आपसात एकमेकांद्वारे हटवित राहिला नसता तर उपासनास्थळ आणि चर्च आणि मशीदी, आणि यहूदी लोकांची प्रार्थनास्थळे आणि त्या मशीदी देखील केव्हाच पाडल्या गेल्या असत्या जिथे फार मोठ्या प्रमाणात अल्लाहचे नामःस्मरण केले जाते. जो अल्लाहची मदत करेल अल्लाह देखील त्याची मदत अवश्य करेल. िंनिःसंशय अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.
Verse 41
ٱلَّذِينَ إِن مَّكَّنَّـٰهُمْ فِى ٱلْأَرْضِ أَقَامُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتَوُا۟ ٱلزَّكَوٰةَ وَأَمَرُوا۟ بِٱلْمَعْرُوفِ وَنَهَوْا۟ عَنِ ٱلْمُنكَرِ ۗ وَلِلَّهِ عَـٰقِبَةُ ٱلْأُمُورِ
Transliteration alladhīna in makkannāhum fī l-arḍi aqāmū l-ṣalata waātawū l-zakata wa-amarū bil-maʿrūfi wanahaw ʿani l-munkari walillahi ʿāqibatu l-umūri
Marathi ४१. हे लोक आहेत की जर आम्ही यांचे पाय जमिनीवर मजबूत केले (अर्थात चांगले स्थैर्य प्रदान केले) तर हे नित्यनेमाने नमाज अदा करतील आणि जकात देतील आणि चांगल्या कामांचा आदेश देतील आणि वाईट कामांची मनाई करतील आणि सर्व कामांचा परिणाम अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे.
Verse 42
وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدْ كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَعَادٌ وَثَمُودُ
Transliteration wa-in yukadhibūka faqad kadhabat qablahum qawmu nūḥin waʿādun wathamūdu
Marathi ४२. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील (तर आश्चर्याची बाब नव्हे) तर यांच्यापूर्वी नूहचा जनसमूह आणि आद व समूद
Verse 43
وَقَوْمُ إِبْرَٰهِيمَ وَقَوْمُ لُوطٍ
Transliteration waqawmu ib'rāhīma waqawmu lūṭin
Marathi ४३. आणि इब्राहीमचा जनसमूह आणि लूतचा जनसमूह.
Verse 44
وَأَصْحَـٰبُ مَدْيَنَ ۖ وَكُذِّبَ مُوسَىٰ فَأَمْلَيْتُ لِلْكَـٰفِرِينَ ثُمَّ أَخَذْتُهُمْ ۖ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ
Transliteration wa-aṣḥābu madyana wakudhiba mūsā fa-amlaytu lil'kāfirīna thumma akhadhtuhum fakayfa kāna nakīri
Marathi ४४. आणि मदयनच्या लोकांनीही आपल्या आपल्या पैगंबरांना खोटे ठरविले आहे. मूसा यांनाही खोटे ठरविले गेले आहे, तेव्हा मी इन्कारी लोकांना थोडी संधी दिली, मग त्यांना पकडले. मग पाहा कशी होती माझी शिक्षा- यातना!
Verse 45
فَكَأَيِّن مِّن قَرْيَةٍ أَهْلَكْنَـٰهَا وَهِىَ ظَالِمَةٌ فَهِىَ خَاوِيَةٌ عَلَىٰ عُرُوشِهَا وَبِئْرٍ مُّعَطَّلَةٍ وَقَصْرٍ مَّشِيدٍ
Transliteration faka-ayyin min qaryatin ahlaknāhā wahiya ẓālimatun fahiya khāwiyatun ʿalā ʿurūshihā wabi'rin muʿaṭṭalatin waqaṣrin mashīdin
Marathi ४५. अशा अनेक वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही नष्ट करून टाकले यासाठी की त्या अत्याचारी होत्या, तेव्हा त्या आपल्या छतांसह पालथ्या पडल्या आहेत आणि बहुतेक आबाद विहीरी निकामी पडल्या आहेत आणि कितीतरी पक्के उंच किल्ले ओसाड पडले आहेत.
Verse 46
أَفَلَمْ يَسِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَتَكُونَ لَهُمْ قُلُوبٌ يَعْقِلُونَ بِهَآ أَوْ ءَاذَانٌ يَسْمَعُونَ بِهَا ۖ فَإِنَّهَا لَا تَعْمَى ٱلْأَبْصَـٰرُ وَلَـٰكِن تَعْمَى ٱلْقُلُوبُ ٱلَّتِى فِى ٱلصُّدُورِ
Transliteration afalam yasīrū fī l-arḍi fatakūna lahum qulūbun yaʿqilūna bihā aw ādhānun yasmaʿūna bihā fa-innahā lā taʿmā l-abṣāru walākin taʿmā l-qulūbu allatī fī l-ṣudūri
Marathi ४६. काय त्यांनी धरतीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्या हृदयांनी या गोष्टी समजून घेतल्या असत्या किंवा कानांनी या (घटना) ऐकल्या असत्या. खरी गोष्ट अशी की केवळ डोळेच आंधळे नसतात किंबहुना ती हृदये (सुद्धा) आंधळी असतात, जी उरात आहेत.
Verse 47
وَيَسْتَعْجِلُونَكَ بِٱلْعَذَابِ وَلَن يُخْلِفَ ٱللَّهُ وَعْدَهُۥ ۚ وَإِنَّ يَوْمًا عِندَ رَبِّكَ كَأَلْفِ سَنَةٍ مِّمَّا تَعُدُّونَ
Transliteration wayastaʿjilūnaka bil-ʿadhābi walan yukh'lifa l-lahu waʿdahu wa-inna yawman ʿinda rabbika ka-alfi sanatin mimmā taʿuddūna
Marathi ४७. आणि ते तुमच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा- यातनेची घाई करीत आहेत. अल्लाह आपले वचन कदापि टाळणार नाही. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याजवळ एक दिवस, तुमच्या (काल) गणनेनुसार एक हजार वर्षांचा आहे.
Verse 48
وَكَأَيِّن مِّن قَرْيَةٍ أَمْلَيْتُ لَهَا وَهِىَ ظَالِمَةٌ ثُمَّ أَخَذْتُهَا وَإِلَىَّ ٱلْمَصِيرُ
Transliteration waka-ayyin min qaryatin amlaytu lahā wahiya ẓālimatun thumma akhadhtuhā wa-ilayya l-maṣīru
Marathi ४८. आणि कित्येक अत्याचारी वस्तींना आम्ही ढील (सूट) दिली मग शेवटी त्यांना पकडीत घेतले आणि माझ्याचकडे परतून यायचे आहे.
Verse 49
قُلْ يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِنَّمَآ أَنَا۠ لَكُمْ نَذِيرٌ مُّبِينٌ
Transliteration qul yāayyuhā l-nāsu innamā anā lakum nadhīrun mubīnun
Marathi ४९. ऐलान करा की, लोक हो! मी तुम्हाला उघडरित्या सावधान करणारा आहे.
Verse 50
فَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَهُم مَّغْفِرَةٌ وَرِزْقٌ كَرِيمٌ
Transliteration fa-alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti lahum maghfiratun wariz'qun karīmun
Marathi ५०. तेव्हा ज्या लोकांनी ई्मान राखले आहे आणि सत्कर्मे केली आहेत त्यांच्यासाठी मोक्षप्राप्ती आहे आणि मान-सन्मानपूर्ण आजिविका.
Verse 51
وَٱلَّذِينَ سَعَوْا۟ فِىٓ ءَايَـٰتِنَا مُعَـٰجِزِينَ أُو۟لَـٰٓئِكَ أَصْحَـٰبُ ٱلْجَحِيمِ
Transliteration wa-alladhīna saʿaw fī āyātinā muʿājizīna ulāika aṣḥābu l-jaḥīmi
Marathi ५१. आणि जे लोक आमच्या आयतींचा अवमान करण्यामागे लागेले आहेत, तेच जहन्नमी आहेत.
Verse 52
وَمَآ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ مِن رَّسُولٍ وَلَا نَبِىٍّ إِلَّآ إِذَا تَمَنَّىٰٓ أَلْقَى ٱلشَّيْطَـٰنُ فِىٓ أُمْنِيَّتِهِۦ فَيَنسَخُ ٱللَّهُ مَا يُلْقِى ٱلشَّيْطَـٰنُ ثُمَّ يُحْكِمُ ٱللَّهُ ءَايَـٰتِهِۦ ۗ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
Transliteration wamā arsalnā min qablika min rasūlin walā nabiyyin illā idhā tamannā alqā l-shayṭānu fī um'niyyatihi fayansakhu l-lahu mā yul'qī l-shayṭānu thumma yuḥ'kimu l-lahu āyātihi wal-lahu ʿalīmun ḥakīmun
Marathi ५२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो रसूल आणि नबी पाठविला (त्याच्यासोबत हे हमखास घडले की) जेव्हा तो आपल्या मनात एखादी इच्छा धरू लागला, सैतानाने त्याच्या मनोकामनेत काही मिसळून दिले तेव्हा सैतानाच्या भेसळीला अल्लाह दूर करतो, मग आपल्या वचनांना मजबूत करतो. सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा, किमत बाळगणारा आहे.
Verse 53
لِّيَجْعَلَ مَا يُلْقِى ٱلشَّيْطَـٰنُ فِتْنَةً لِّلَّذِينَ فِى قُلُوبِهِم مَّرَضٌ وَٱلْقَاسِيَةِ قُلُوبُهُمْ ۗ وَإِنَّ ٱلظَّـٰلِمِينَ لَفِى شِقَاقٍۭ بَعِيدٍ
Transliteration liyajʿala mā yul'qī l-shayṭānu fit'natan lilladhīna fī qulūbihim maraḍun wal-qāsiyati qulūbuhum wa-inna l-ẓālimīna lafī shiqāqin baʿīdin
Marathi ५३. हे यासाठी की सैतानाच्या भेसळीला अल्लाहने त्या लोकांच्या कसोटीची सामुग्री बनवावे, ज्यांच्या मनात रोग आहे आणि ज्यांची मने कठोर आहेत. निःसंशय अत्याचारी लोक सक्त विरोधात आहेत.
Verse 54
وَلِيَعْلَمَ ٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْعِلْمَ أَنَّهُ ٱلْحَقُّ مِن رَّبِّكَ فَيُؤْمِنُوا۟ بِهِۦ فَتُخْبِتَ لَهُۥ قُلُوبُهُمْ ۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَهَادِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration waliyaʿlama alladhīna ūtū l-ʿil'ma annahu l-ḥaqu min rabbika fayu'minū bihi fatukh'bita lahu qulūbuhum wa-inna l-laha lahādi alladhīna āmanū ilā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi ५४. आणि यासाठीही की ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे, त्यांनी विश्वास करून घ्यावा की हे तुमच्या पालनकर्त्याच्याच तर्फे पूर्ण सत्य आहे, मग त्यांनी त्यावर ईमान राखावे आणि त्यांची हृदये त्याकडे झुकावित. निःसंशय अल्लाह ईमान राखणाऱ्यांना सत्य मार्गाकडे मार्गदर्शन करणारच आहे.
Verse 55
وَلَا يَزَالُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ فِى مِرْيَةٍ مِّنْهُ حَتَّىٰ تَأْتِيَهُمُ ٱلسَّاعَةُ بَغْتَةً أَوْ يَأْتِيَهُمْ عَذَابُ يَوْمٍ عَقِيمٍ
Transliteration walā yazālu alladhīna kafarū fī mir'yatin min'hu ḥattā tatiyahumu l-sāʿatu baghtatan aw yatiyahum ʿadhābu yawmin ʿaqīmin
Marathi ५५. आणि इन्कारी (काफिर) लोक अल्लाहच्या वहयीबाबत नेहमी संशयग्रस्तच राहतील, येथपर्यंत की अचानक त्यांच्या डोक्यावर कयामत येऊन पोहचावी किंवा त्यांच्याजवळ त्या दिवसाची शिक्षा- यातना येऊन पोहचावी, ज्यात किंचितही भलाई नाही.
Verse 56
ٱلْمُلْكُ يَوْمَئِذٍ لِّلَّهِ يَحْكُمُ بَيْنَهُمْ ۚ فَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ فِى جَنَّـٰتِ ٱلنَّعِيمِ
Transliteration al-mul'ku yawma-idhin lillahi yaḥkumu baynahum fa-alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti fī jannāti l-naʿīmi
Marathi ५६. त्या दिवशी केवळ अल्लाहचीच राज्यसत्ता असेल, तोच त्यांच्या दरम्यान फैसला करेल. ईमान राखणारे आणि नेक-सदाचारी लोक तर अल्लाहच्या देण्यांनी युक्त अशा जन्नतमध्ये असतील.
Verse 57
وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَكَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا فَأُو۟لَـٰٓئِكَ لَهُمْ عَذَابٌ مُّهِينٌ
Transliteration wa-alladhīna kafarū wakadhabū biāyātinā fa-ulāika lahum ʿadhābun muhīnun
Marathi ५७. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, त्यांच्यासाठी अपमानदायक शिक्षा यातना आहे.
Verse 58
وَٱلَّذِينَ هَاجَرُوا۟ فِى سَبِيلِ ٱللَّهِ ثُمَّ قُتِلُوٓا۟ أَوْ مَاتُوا۟ لَيَرْزُقَنَّهُمُ ٱللَّهُ رِزْقًا حَسَنًا ۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ خَيْرُ ٱلرَّٰزِقِينَ
Transliteration wa-alladhīna hājarū fī sabīli l-lahi thumma qutilū aw mātū layarzuqannahumu l-lahu riz'qan ḥasanan wa-inna l-laha lahuwa khayru l-rāziqīna
Marathi ५८. आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, मग ते शहीद केले गेले किंवा मरण पावले, अल्लाह त्यांना उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करेल आणि निःसंशय अल्लाह सर्वोत्तम रोजी प्रदान करणारा आहे.
Verse 59
لَيُدْخِلَنَّهُم مُّدْخَلًا يَرْضَوْنَهُۥ ۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَعَلِيمٌ حَلِيمٌ
Transliteration layud'khilannahum mud'khalan yarḍawnahu wa-inna l-laha laʿalīmun ḥalīmun
Marathi ५९. अल्लाहा त्यांना अशा ठिकाणी पोहचविल की ते त्या ठिकाणाने आनंदित होतील. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सहनशील आहे.
Verse 60
۞ ذَٰلِكَ وَمَنْ عَاقَبَ بِمِثْلِ مَا عُوقِبَ بِهِۦ ثُمَّ بُغِىَ عَلَيْهِ لَيَنصُرَنَّهُ ٱللَّهُ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَعَفُوٌّ غَفُورٌ
Transliteration dhālika waman ʿāqaba bimith'li mā ʿūqiba bihi thumma bughiya ʿalayhi layanṣurannahu l-lahu inna l-laha laʿafuwwun ghafūrun
Marathi ६०. हा आहे (त्या लोकांचा मोबदला) आणि एखाद्याने त्याच प्रकारे बदला घ्यावा, ज्या प्रकारे त्याच्याशी केले गेले, मात्र जर त्याच्यावर अतिरेक झाला असेल तर निःसंशय अल्लाह स्वतः त्याची मदत करेल. निश्चितच अल्लाह माफ करणारा आणि क्षमाशील आहे.
Verse 61
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ يُولِجُ ٱلَّيْلَ فِى ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِى ٱلَّيْلِ وَأَنَّ ٱللَّهَ سَمِيعٌۢ بَصِيرٌ
Transliteration dhālika bi-anna l-laha yūliju al-layla fī l-nahāri wayūliju l-nahāra fī al-layli wa-anna l-laha samīʿun baṣīrun
Marathi ६१. हे अशासाठी की अल्लाह रात्रीला दिवसात दाखल करतो, आणि दिवसाला रात्रीत नेतो आणि निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.
Verse 62
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلْحَقُّ وَأَنَّ مَا يَدْعُونَ مِن دُونِهِۦ هُوَ ٱلْبَـٰطِلُ وَأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلْعَلِىُّ ٱلْكَبِيرُ
Transliteration dhālika bi-anna l-laha huwa l-ḥaqu wa-anna mā yadʿūna min dūnihi huwa l-bāṭilu wa-anna l-laha huwa l-ʿaliyu l-kabīru
Marathi ६२. हे सर्व यासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि त्याच्याखेरीज ज्याला देखील हे पुकारतात ते असत्य (मिथ्या) आहे आणि निःसंशय, अल्लाह अतिउच्च महानता बाळगणारा आहे.
Verse 63
أَلَمْ تَرَ أَنَّ ٱللَّهَ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَتُصْبِحُ ٱلْأَرْضُ مُخْضَرَّةً ۗ إِنَّ ٱللَّهَ لَطِيفٌ خَبِيرٌ
Transliteration alam tara anna l-laha anzala mina l-samāi māan fatuṣ'biḥu l-arḍu mukh'ḍarratan inna l-laha laṭīfun khabīrun
Marathi ६३. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी वर्षवितो तेव्हा धरती हिरवी टवटवीत होते. निःसंशय अल्लाह मोठा मेहेरबान आणि जाणणारा आहे.
Verse 64
لَّهُۥ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ ۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ ٱلْغَنِىُّ ٱلْحَمِيدُ
Transliteration lahu mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi wa-inna l-laha lahuwa l-ghaniyu l-ḥamīdu
Marathi ६४. आकाशांमध्ये व धरतीत जे काही आहे सर्व त्याचेच आहे आणि निःसंशय अल्लाह अगदी निःस्पृह, गुणवैशिट्यांनी युक्त, आणि प्रशंसनीय आहे.
Verse 65
أَلَمْ تَرَ أَنَّ ٱللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِى ٱلْأَرْضِ وَٱلْفُلْكَ تَجْرِى فِى ٱلْبَحْرِ بِأَمْرِهِۦ وَيُمْسِكُ ٱلسَّمَآءَ أَن تَقَعَ عَلَى ٱلْأَرْضِ إِلَّا بِإِذْنِهِۦٓ ۗ إِنَّ ٱللَّهَ بِٱلنَّاسِ لَرَءُوفٌ رَّحِيمٌ
Transliteration alam tara anna l-laha sakhara lakum mā fī l-arḍi wal-ful'ka tajrī fī l-baḥri bi-amrihi wayum'siku l-samāa an taqaʿa ʿalā l-arḍi illā bi-idh'nihi inna l-laha bil-nāsi laraūfun raḥīmun
Marathi ६५. काही तुम्ही नाही पाहिले की अल्लाहनेच धरतीच्या समस्त वस्तू तुमच्या अधीन केल्या आहेत आणि त्याच्या आदेशाने समुद्रात चालणाऱ्या नौका देखील. त्यानेच आकाशाला सावरून ठेवले आहे की धरतीवर त्याच्या हुकुमाविना कोसळून न पडावे. निःसंशय अल्लाह, लोकांसाठी मोठा स्नेहशील, दया करणारा आहे.
Verse 66
وَهُوَ ٱلَّذِىٓ أَحْيَاكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يُحْيِيكُمْ ۗ إِنَّ ٱلْإِنسَـٰنَ لَكَفُورٌ
Transliteration wahuwa alladhī aḥyākum thumma yumītukum thumma yuḥ'yīkum inna l-insāna lakafūrun
Marathi ६६. आणि त्यानेच तुम्हाला जिवंत केले, मग तोच तुम्हाला मृत्यु देईल, मग तोच तुम्हाला (पुन्हा) जिवंत करील. यात शंका नाही की मनुष्य मोठा कृतघ्न आहे.
Verse 67
لِّكُلِّ أُمَّةٍ جَعَلْنَا مَنسَكًا هُمْ نَاسِكُوهُ ۖ فَلَا يُنَـٰزِعُنَّكَ فِى ٱلْأَمْرِ ۚ وَٱدْعُ إِلَىٰ رَبِّكَ ۖ إِنَّكَ لَعَلَىٰ هُدًى مُّسْتَقِيمٍ
Transliteration likulli ummatin jaʿalnā mansakan hum nāsikūhu falā yunāziʿunnaka fī l-amri wa-ud'ʿu ilā rabbika innaka laʿalā hudan mus'taqīmin
Marathi ६७. प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही उपासनेची एक पद्धत निर्धारित केली आहे, जिचे ते पालन करणारे आहेत, तेव्हा त्यांनी तुमच्याशी या संदर्भात वाद घालू नये. तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना बोलवा. निःसंशय, तुम्ही सरळ, सत्य मार्गावर आहात.
Verse 68
وَإِن جَـٰدَلُوكَ فَقُلِ ٱللَّهُ أَعْلَمُ بِمَا تَعْمَلُونَ
Transliteration wa-in jādalūka faquli l-lahu aʿlamu bimā taʿmalūna
Marathi ६८. आणि तरीही जर हे लोक तुमच्याशी वाद घालू लागतील तर तुम्ही सांगा की तुमच्या कर्मांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणून आहे.
Verse 69
ٱللَّهُ يَحْكُمُ بَيْنَكُمْ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ فِيمَا كُنتُمْ فِيهِ تَخْتَلِفُونَ
Transliteration al-lahu yaḥkumu baynakum yawma l-qiyāmati fīmā kuntum fīhi takhtalifūna
Marathi ६९. तुमच्या समस्त मतभेदांचा फैसला कयामतच्या दिवशी अल्लाह स्वतः करेल.
Verse 70
أَلَمْ تَعْلَمْ أَنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ مَا فِى ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ ۗ إِنَّ ذَٰلِكَ فِى كِتَـٰبٍ ۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٌ
Transliteration alam taʿlam anna l-laha yaʿlamu mā fī l-samāi wal-arḍi inna dhālika fī kitābin inna dhālika ʿalā l-lahi yasīrun
Marathi ७०. काय तुम्ही नाही जाणले की आकाश आणि धरतीच्या प्रत्येक वस्तूचे अल्लाहला ज्ञान आहे, हे सर्व एका लिखित ग्रंथात सुरक्षित आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता हे काम फार सोपे आहे.
Verse 71
وَيَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَمْ يُنَزِّلْ بِهِۦ سُلْطَـٰنًا وَمَا لَيْسَ لَهُم بِهِۦ عِلْمٌ ۗ وَمَا لِلظَّـٰلِمِينَ مِن نَّصِيرٍ
Transliteration wayaʿbudūna min dūni l-lahi mā lam yunazzil bihi sul'ṭānan wamā laysa lahum bihi ʿil'mun wamā lilẓẓālimīna min naṣīrin
Marathi ७१. आणि हे अल्लाहखेरीज अशांची उपासना करीत आहेत, ज्यांच्याकरिता अल्लाहने कोणतेही प्रमाण अवतरित केले नाही आणि ना ते स्वतः याचे काही ज्ञान बाळगतात, अत्याचारींचा कोणी सहाय्यक नाही.
Verse 72
وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُنَا بَيِّنَـٰتٍ تَعْرِفُ فِى وُجُوهِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ٱلْمُنكَرَ ۖ يَكَادُونَ يَسْطُونَ بِٱلَّذِينَ يَتْلُونَ عَلَيْهِمْ ءَايَـٰتِنَا ۗ قُلْ أَفَأُنَبِّئُكُم بِشَرٍّ مِّن ذَٰلِكُمُ ۗ ٱلنَّارُ وَعَدَهَا ٱللَّهُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ۖ وَبِئْسَ ٱلْمَصِيرُ
Transliteration wa-idhā tut'lā ʿalayhim āyātunā bayyinātin taʿrifu fī wujūhi alladhīna kafarū l-munkara yakādūna yasṭūna bi-alladhīna yatlūna ʿalayhim āyātinā qul afa-unabbi-ukum bisharrin min dhālikumu l-nāru waʿadahā l-lahu alladhīna kafarū wabi'sa l-maṣīru
Marathi ७२. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या वाणीच्या स्पष्ट आयतींचे पठण केले जाते, तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची लक्षणे स्पष्टपणे पाहता. ते तर आमच्या आयती ऐकणाऱ्यांवर हल्ला करण्याच्या बेतात असतात. सांगा, काय मी तुम्हाला याहून वाईट बातमी सांगू. ती आग आहे, जिचा वायदा अल्लाहने इन्कारी लोकांशी करून ठेवला आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.
Verse 73
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ضُرِبَ مَثَلٌ فَٱسْتَمِعُوا۟ لَهُۥٓ ۚ إِنَّ ٱلَّذِينَ تَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَن يَخْلُقُوا۟ ذُبَابًا وَلَوِ ٱجْتَمَعُوا۟ لَهُۥ ۖ وَإِن يَسْلُبْهُمُ ٱلذُّبَابُ شَيْـًٔا لَّا يَسْتَنقِذُوهُ مِنْهُ ۚ ضَعُفَ ٱلطَّالِبُ وَٱلْمَطْلُوبُ
Transliteration yāayyuhā l-nāsu ḍuriba mathalun fa-is'tamiʿū lahu inna alladhīna tadʿūna min dūni l-lahi lan yakhluqū dhubāban walawi ij'tamaʿū lahu wa-in yaslub'humu l-dhubābu shayan lā yastanqidhūhu min'hu ḍaʿufa l-ṭālibu wal-maṭlūbu
Marathi ७३. लोक हो! एक उदाहरण दिले जात आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. अल्लाहखेरीज तुम्ही ज्यांना ज्यांना (उपास्य समजून) पुकारत राहिला आहात, ते एक माशी देखील निर्माण करू शकत नाही. जर सर्वच्या सर्व एकत्र होतील, किंबहुना जर माशी यांच्याकडून एखादी वस्तू घेऊन पळेल तर हे त्या वस्तूला तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मोठा कमकुवत आहे मागणारा आणि खूप दुबळा आहे तो ज्याच्याकडे मागितले जात आहे.
Verse 74
مَا قَدَرُوا۟ ٱللَّهَ حَقَّ قَدْرِهِۦٓ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِىٌّ عَزِيزٌ
Transliteration mā qadarū l-laha ḥaqqa qadrihi inna l-laha laqawiyyun ʿazīzun
Marathi ७४. त्यांनी अल्लाहच्या महानतेनुसार त्याचे महत्त्व जाणलेच नाही, निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि वर्चस्वशाली आहे.
Verse 75
ٱللَّهُ يَصْطَفِى مِنَ ٱلْمَلَـٰٓئِكَةِ رُسُلًا وَمِنَ ٱلنَّاسِ ۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِيعٌۢ بَصِيرٌ
Transliteration al-lahu yaṣṭafī mina l-malāikati rusulan wamina l-nāsi inna l-laha samīʿun baṣīrun
Marathi ७५. फरिश्त्यांमधून आणि मानवांमधून रसूल (संदेशवाहक) अल्लाहच निवडतो. निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.
Verse 76
يَعْلَمُ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ ۗ وَإِلَى ٱللَّهِ تُرْجَعُ ٱلْأُمُورُ
Transliteration yaʿlamu mā bayna aydīhim wamā khalfahum wa-ilā l-lahi tur'jaʿu l-umūru
Marathi ७६. तो चांगल्या प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुढे आहे आणि जे काही त्यांच्या मागे आहे आणि अल्लाहच्याचकडे सर्व व्यवहार परतविले जातात.
Verse 77
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱرْكَعُوا۟ وَٱسْجُدُوا۟ وَٱعْبُدُوا۟ رَبَّكُمْ وَٱفْعَلُوا۟ ٱلْخَيْرَ لَعَلَّكُمْ تُفْلِحُونَ ۩
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū ir'kaʿū wa-us'judū wa-uʿ'budū rabbakum wa-if'ʿalū l-khayra laʿallakum tuf'liḥūna
Marathi ७७. हे ईमान राखणाऱ्यांनो! रुकुअ, सजदा करीत राहा आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा आणि सत्कर्म करीत राहा, यासाठी की तुम्ही सफल व्हावे.
Verse 78
وَجَـٰهِدُوا۟ فِى ٱللَّهِ حَقَّ جِهَادِهِۦ ۚ هُوَ ٱجْتَبَىٰكُمْ وَمَا جَعَلَ عَلَيْكُمْ فِى ٱلدِّينِ مِنْ حَرَجٍ ۚ مِّلَّةَ أَبِيكُمْ إِبْرَٰهِيمَ ۚ هُوَ سَمَّىٰكُمُ ٱلْمُسْلِمِينَ مِن قَبْلُ وَفِى هَـٰذَا لِيَكُونَ ٱلرَّسُولُ شَهِيدًا عَلَيْكُمْ وَتَكُونُوا۟ شُهَدَآءَ عَلَى ٱلنَّاسِ ۚ فَأَقِيمُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُوا۟ ٱلزَّكَوٰةَ وَٱعْتَصِمُوا۟ بِٱللَّهِ هُوَ مَوْلَىٰكُمْ ۖ فَنِعْمَ ٱلْمَوْلَىٰ وَنِعْمَ ٱلنَّصِيرُ
Transliteration wajāhidū fī l-lahi ḥaqqa jihādihi huwa ij'tabākum wamā jaʿala ʿalaykum fī l-dīni min ḥarajin millata abīkum ib'rāhīma huwa sammākumu l-mus'limīna min qablu wafī hādhā liyakūna l-rasūlu shahīdan ʿalaykum watakūnū shuhadāa ʿalā l-nāsi fa-aqīmū l-ṣalata waātū l-zakata wa-iʿ'taṣimū bil-lahi huwa mawlākum faniʿ'ma l-mawlā waniʿ'ma l-naṣīru
Marathi ७८. आणि अल्लाहच्या मार्गात तसेच जिहाद (धर्मयुद्ध) करा, जसा जिहादचा हक्क आहे. त्याने तुम्हाला निवडले आहे आणि तुमच्यावर दीन (धर्मा) संदर्भात कसलीही कमतरता राखली नाही. तुमचे पिता इब्राहीमचा दीन (धर्म कायम राखा) त्याच (अल्लाहने) ने तुमचे नाव मुस्लिम ठेवले आहे. या (कुरआना) पूर्वी आणि याच्यातही, यासाठी की पैगंबर तुमच्यावर साक्षी असावा आणि तुम्ही लोकांवर साक्षी व्हावे. तेव्हा तुमचे हे कर्तव्य ठरते की नमाज कायम करा आणि जकात (धर्मदान) अदा करीत राहा आणि अल्लाहला दृढतापूर्वक धरा, तोच तुमचा संरक्षक आणि स्वामी आहे, तेव्हा किती चांगला स्वामी आणि किती चांगला सहाय्य करणारा.
Read Surah Al-Hajj in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.