Surah Al-'Ankabut in Marathi: translation and audio
Surah 29 · العنكبوت · The Spider · 69 verses
Surah Al-'Ankabut verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-'Ankabut word by word in English.
Verse 1
الٓمٓ
Transliteration alif-lam-meem
Marathi १. अलिफ - लाम - मीम.
Verse 2
أَحَسِبَ ٱلنَّاسُ أَن يُتْرَكُوٓا۟ أَن يَقُولُوٓا۟ ءَامَنَّا وَهُمْ لَا يُفْتَنُونَ
Transliteration aḥasiba l-nāsu an yut'rakū an yaqūlū āmannā wahum lā yuf'tanūna
Marathi २. काय लोकांनी असे समजून घेतले आहे की त्यांच्या केवळ या बोलण्यावर की आम्ही ईमान राखले आहे, त्यांना परीक्षा घेतल्याविना असेच सोडून दिले जाईल?१
Verse 3
وَلَقَدْ فَتَنَّا ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۖ فَلَيَعْلَمَنَّ ٱللَّهُ ٱلَّذِينَ صَدَقُوا۟ وَلَيَعْلَمَنَّ ٱلْكَـٰذِبِينَ
Transliteration walaqad fatannā alladhīna min qablihim falayaʿlamanna l-lahu alladhīna ṣadaqū walayaʿlamanna l-kādhibīna
Marathi ३. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचीही आम्ही चांगल्या प्रकारे कसोटी घेतली. निःसंशय, अल्लाह त्यांनाही जाणून घेईल, जे खरे बोलतात, आणि त्यांनाही जाणून घेईल जे खोटारडे आहेत.
Verse 4
أَمْ حَسِبَ ٱلَّذِينَ يَعْمَلُونَ ٱلسَّيِّـَٔاتِ أَن يَسْبِقُونَا ۚ سَآءَ مَا يَحْكُمُونَ
Transliteration am ḥasiba alladhīna yaʿmalūna l-sayiāti an yasbiqūnā sāa mā yaḥkumūna
Marathi ४. काय जे लोक दुष्कर्म करीत आहेत, त्यांनी असे समजून घेतले आहेत की ते आमच्या काबूतून बाहेर जातील? कसा वाईट विचार हे लोक करीत आहेत!
Verse 5
مَن كَانَ يَرْجُوا۟ لِقَآءَ ٱللَّهِ فَإِنَّ أَجَلَ ٱللَّهِ لَـَٔاتٍ ۚ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ
Transliteration man kāna yarjū liqāa l-lahi fa-inna ajala l-lahi laātin wahuwa l-samīʿu l-ʿalīmu
Marathi ५. ज्याला अल्लाहच्या भेटीची अपेक्षा असेल, तर अल्लाहची निर्धारित केलेली वेळ निश्चितच येणार आहे. तो सर्व काही ऐकणारा, सर्व काही जाणणारा आहे.
Verse 6
وَمَن جَـٰهَدَ فَإِنَّمَا يُجَـٰهِدُ لِنَفْسِهِۦٓ ۚ إِنَّ ٱللَّهَ لَغَنِىٌّ عَنِ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration waman jāhada fa-innamā yujāhidu linafsihi inna l-laha laghaniyyun ʿani l-ʿālamīna
Marathi ६. आणि प्रत्येक प्रयत्न करणारा आपल्या स्वतःच्याच भल्याकरिता प्रयत्न करतो. निःसंशय अल्लाह समस्त जगवाल्यांपासून निःस्पृह आहे. १
Verse 7
وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَنُكَفِّرَنَّ عَنْهُمْ سَيِّـَٔاتِهِمْ وَلَنَجْزِيَنَّهُمْ أَحْسَنَ ٱلَّذِى كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration wa-alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti lanukaffiranna ʿanhum sayyiātihim walanajziyannahum aḥsana alladhī kānū yaʿmalūna
Marathi ७. आणि ज्यांनी ईमान बाळगले आणि (पैगंबर आचरणच्या दृष्टीने) सत्कर्म केले, आम्ही त्यांच्या सर्व अपराधांना त्यांच्यापासून दूर करू, आणि त्यांच्या नेक कामांचा चांगला मोबदला प्रदान करू.
Verse 8
وَوَصَّيْنَا ٱلْإِنسَـٰنَ بِوَٰلِدَيْهِ حُسْنًا ۖ وَإِن جَـٰهَدَاكَ لِتُشْرِكَ بِى مَا لَيْسَ لَكَ بِهِۦ عِلْمٌ فَلَا تُطِعْهُمَآ ۚ إِلَىَّ مَرْجِعُكُمْ فَأُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
Transliteration wawaṣṣaynā l-insāna biwālidayhi ḥus'nan wa-in jāhadāka litush'rika bī mā laysa laka bihi ʿil'mun falā tuṭiʿ'humā ilayya marjiʿukum fa-unabbi-ukum bimā kuntum taʿmalūna
Marathi ८. आम्ही प्रत्येक माणसाला आपल्या माता-पित्याशी सद्वर्तन करण्याची शिकवण दिली आहे. तथापि जर ते हा प्रयत्न करतील की तुम्ही माझ्यासोबत त्याला सहभागी करून घ्यावे, ज्याचे तुम्हाला ज्ञान नाही तर त्यांचे म्हणणे मान्य करू नका. तुम्हा सर्वांना परतून माझ्याचकडे यायचे आहे, मग मी त्या प्रत्येक गोष्टीशी, जी तुम्ही करीत होते अवगत करवीन.
Verse 9
وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَنُدْخِلَنَّهُمْ فِى ٱلصَّـٰلِحِينَ
Transliteration wa-alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti lanud'khilannahum fī l-ṣāliḥīna
Marathi ९. आणि ज्या लोकांनी ईमान कबूल केले, आणि सत्मर्क करीत राहिले त्यांना आम्ही आपल्या नेक (सदाचारी) दासांमध्ये सामील करू.
Verse 10
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يَقُولُ ءَامَنَّا بِٱللَّهِ فَإِذَآ أُوذِىَ فِى ٱللَّهِ جَعَلَ فِتْنَةَ ٱلنَّاسِ كَعَذَابِ ٱللَّهِ وَلَئِن جَآءَ نَصْرٌ مِّن رَّبِّكَ لَيَقُولُنَّ إِنَّا كُنَّا مَعَكُمْ ۚ أَوَلَيْسَ ٱللَّهُ بِأَعْلَمَ بِمَا فِى صُدُورِ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration wamina l-nāsi man yaqūlu āmannā bil-lahi fa-idhā ūdhiya fī l-lahi jaʿala fit'nata l-nāsi kaʿadhābi l-lahi wala-in jāa naṣrun min rabbika layaqūlunna innā kunnā maʿakum awalaysa l-lahu bi-aʿlama bimā fī ṣudūri l-ʿālamīna
Marathi १०. आणि काही लोक असेही आहेत, जे तोंडाने म्हणतात की आम्ही ईमान राखले आहे. परंतु जेव्हा अल्लाहच्या मार्गात एखाद्या दुःखाचा सामना होतो, तेव्हा लोकांकडून दिला जाणाऱ्या कष्ट- यातनेला अल्लाहच्या शिक्षा- यातनेसमान ठरवितात, परंतु जर अल्लाहची मदत येऊन पोहचली तर तेव्हा म्हणू लागतात की आम्ही तर तुमच्याच साथीला आहोत, काय समस्त विश्वा (माणसांच्या) मनात जे काही आहे, ते अल्लाह जाणत नाही?
Verse 11
وَلَيَعْلَمَنَّ ٱللَّهُ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَلَيَعْلَمَنَّ ٱلْمُنَـٰفِقِينَ
Transliteration walayaʿlamanna l-lahu alladhīna āmanū walayaʿlamanna l-munāfiqīna
Marathi ११. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, अल्लाह त्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही आणि ईमानधारक असण्याचे ढोंग रचणाऱ्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही.
Verse 12
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱتَّبِعُوا۟ سَبِيلَنَا وَلْنَحْمِلْ خَطَـٰيَـٰكُمْ وَمَا هُم بِحَـٰمِلِينَ مِنْ خَطَـٰيَـٰهُم مِّن شَىْءٍ ۖ إِنَّهُمْ لَكَـٰذِبُونَ
Transliteration waqāla alladhīna kafarū lilladhīna āmanū ittabiʿū sabīlanā walnaḥmil khaṭāyākum wamā hum biḥāmilīna min khaṭāyāhum min shayin innahum lakādhibūna
Marathi १२. आणि काफिर (सत्य विरोधक) ईमान राखणाऱ्यांना म्हणाले, तुम्ही आमच्या मार्गाचे अनुसरण करा, तुमचे अपराध आम्ही आपल्या (शिरा) वर घेऊ, वास्तविक ते त्यांच्या अपराधांपैकी काही एक आपल्यावर घेणार नाहीत. ते तर अगदी खोटारडे आहेत.
Verse 13
وَلَيَحْمِلُنَّ أَثْقَالَهُمْ وَأَثْقَالًا مَّعَ أَثْقَالِهِمْ ۖ وَلَيُسْـَٔلُنَّ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ عَمَّا كَانُوا۟ يَفْتَرُونَ
Transliteration walayaḥmilunna athqālahum wa-athqālan maʿa athqālihim walayus'alunna yawma l-qiyāmati ʿammā kānū yaftarūna
Marathi १३. (एवढे निश्चित की) हे आपले ओझे उचलतील आणि आपल्या ओझ्यांसोबत इतर ओझे देखील, आणि ते जे काही असत्य रचत आहेत त्या सर्वांबाबत त्यांना विचारणा केली जाईल.
Verse 14
وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا إِلَىٰ قَوْمِهِۦ فَلَبِثَ فِيهِمْ أَلْفَ سَنَةٍ إِلَّا خَمْسِينَ عَامًا فَأَخَذَهُمُ ٱلطُّوفَانُ وَهُمْ ظَـٰلِمُونَ
Transliteration walaqad arsalnā nūḥan ilā qawmihi falabitha fīhim alfa sanatin illā khamsīna ʿāman fa-akhadhahumu l-ṭūfānu wahum ẓālimūna
Marathi १४. आणि आम्ही नूह (अलै.) ला त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले, ते त्यांच्या दरम्यान साडे नऊशे वर्षांपर्यंत राहिले, मग त्यांना वादळाने येऊन धरले आणि ते होतेच मोठे अत्याचारी.
Verse 15
فَأَنجَيْنَـٰهُ وَأَصْحَـٰبَ ٱلسَّفِينَةِ وَجَعَلْنَـٰهَآ ءَايَةً لِّلْعَـٰلَمِينَ
Transliteration fa-anjaynāhu wa-aṣḥāba l-safīnati wajaʿalnāhā āyatan lil'ʿālamīna
Marathi १५. मग आम्ही त्यांना आणि नौकावाल्यांना मुक्ती दिली, आणि आम्ही या घटनेला संपूर्ण जगाकरिता बोधचिन्ह बनविले.
Verse 16
وَإِبْرَٰهِيمَ إِذْ قَالَ لِقَوْمِهِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ وَٱتَّقُوهُ ۖ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ
Transliteration wa-ib'rāhīma idh qāla liqawmihi uʿ'budū l-laha wa-ittaqūhu dhālikum khayrun lakum in kuntum taʿlamūna
Marathi १६. आणि इब्राहीम (अलै.) देखील आपल्या जनसमूहास म्हणाले की अल्लाहची उपासना करा आणि त्याचे भय बाळगून राहा, जर तुम्ही अक्कलवान असाल तर, हेच तुमच्यासाठी अधिक चांगले आहे.
Verse 17
إِنَّمَا تَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ أَوْثَـٰنًا وَتَخْلُقُونَ إِفْكًا ۚ إِنَّ ٱلَّذِينَ تَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَا يَمْلِكُونَ لَكُمْ رِزْقًا فَٱبْتَغُوا۟ عِندَ ٱللَّهِ ٱلرِّزْقَ وَٱعْبُدُوهُ وَٱشْكُرُوا۟ لَهُۥٓ ۖ إِلَيْهِ تُرْجَعُونَ
Transliteration innamā taʿbudūna min dūni l-lahi awthānan watakhluqūna if'kan inna alladhīna taʿbudūna min dūni l-lahi lā yamlikūna lakum riz'qan fa-ib'taghū ʿinda l-lahi l-riz'qa wa-uʿ'budūhu wa-ush'kurū lahu ilayhi tur'jaʿūna
Marathi १७. तुम्ही तर अल्लाहला सोडून मूर्तीची पूजा करीत आहात, आणि खोट्या गोष्टी मनाने रचून घेता. (ऐका) तुम्ही अल्लाहऐवजी ज्यांची ज्यांची पूजा अर्चना करीत आहात, ते तर तुमच्या आजिविकेचे मालक नाहीत, तेव्हा तुम्ही अल्लाहकडेच रोजी (आजिविका) मागितली पाहिजे. आणि त्याचीच उपासना करा आणि त्याच्याशीच कृतज्ञशील राहा आणि त्याच्याचकडे तुम्ही परतविले जाल.
Verse 18
وَإِن تُكَذِّبُوا۟ فَقَدْ كَذَّبَ أُمَمٌ مِّن قَبْلِكُمْ ۖ وَمَا عَلَى ٱلرَّسُولِ إِلَّا ٱلْبَلَـٰغُ ٱلْمُبِينُ
Transliteration wa-in tukadhibū faqad kadhaba umamun min qablikum wamā ʿalā l-rasūli illā l-balāghu l-mubīnu
Marathi १८. आणि जर तुम्ही खोटे ठरवाल तर तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले आहे, आणि पैगंबराचे कर्तव्य तर केवळ स्पष्टरित्या पोहचवून देणेच आहे.
Verse 19
أَوَلَمْ يَرَوْا۟ كَيْفَ يُبْدِئُ ٱللَّهُ ٱلْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُۥٓ ۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٌ
Transliteration awalam yaraw kayfa yub'di-u l-lahu l-khalqa thumma yuʿīduhu inna dhālika ʿalā l-lahi yasīrun
Marathi १९. काय त्यांनी नाही पाहिले की अल्लाहने सृष्टी-निर्मितीची उत्पत्ती कशा प्रकारे केली, मग अल्लाह तिची पुनरावृत्ती करील. हे तर अल्लाहकरिता फार सोपे आहे.
Verse 20
قُلْ سِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَٱنظُرُوا۟ كَيْفَ بَدَأَ ٱلْخَلْقَ ۚ ثُمَّ ٱللَّهُ يُنشِئُ ٱلنَّشْأَةَ ٱلْـَٔاخِرَةَ ۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration qul sīrū fī l-arḍi fa-unẓurū kayfa bada-a l-khalqa thumma l-lahu yunshi-u l-nashata l-ākhirata inna l-laha ʿalā kulli shayin qadīrun
Marathi २०. सांगा, जमिनीवर हिंडून फिरून पाहा की कशा प्रकारे अल्लाहने सर्वांत प्रथम निर्मितीला उत्पन्न केले, मग अल्लाहच दुसरी नवी उत्पत्ती करेल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
Verse 21
يُعَذِّبُ مَن يَشَآءُ وَيَرْحَمُ مَن يَشَآءُ ۖ وَإِلَيْهِ تُقْلَبُونَ
Transliteration yuʿadhibu man yashāu wayarḥamu man yashāu wa-ilayhi tuq'labūna
Marathi २१. तो ज्याला इच्छिल अज़ाब देईल आणि ज्यावर इच्छिल दया करील, सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
Verse 22
وَمَآ أَنتُم بِمُعْجِزِينَ فِى ٱلْأَرْضِ وَلَا فِى ٱلسَّمَآءِ ۖ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِن وَلِىٍّ وَلَا نَصِيرٍ
Transliteration wamā antum bimuʿ'jizīna fī l-arḍi walā fī l-samāi wamā lakum min dūni l-lahi min waliyyin walā naṣīrin
Marathi २२. तुम्ही ना जमिनीवर अल्लाहला विवश (लाचार) करू शकता, ना आकाशात, अल्लाहखेरीज तुमचा कोणी ना संरक्षक आहे ना सहाय्यक.
Verse 23
وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ وَلِقَآئِهِۦٓ أُو۟لَـٰٓئِكَ يَئِسُوا۟ مِن رَّحْمَتِى وَأُو۟لَـٰٓئِكَ لَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ
Transliteration wa-alladhīna kafarū biāyāti l-lahi waliqāihi ulāika ya-isū min raḥmatī wa-ulāika lahum ʿadhābun alīmun
Marathi २३. आणि जे लोक अल्लाहच्या आयतींना आणि त्याच्या भेटीला खोटे ठरवितात त्यांनी माझ्या दया- कृपेची आस राखू नये आणि त्याच्याकरिता दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे.
Verse 24
فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِۦٓ إِلَّآ أَن قَالُوا۟ ٱقْتُلُوهُ أَوْ حَرِّقُوهُ فَأَنجَىٰهُ ٱللَّهُ مِنَ ٱلنَّارِ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ
Transliteration famā kāna jawāba qawmihi illā an qālū uq'tulūhu aw ḥarriqūhu fa-anjāhu l-lahu mina l-nāri inna fī dhālika laāyātin liqawmin yu'minūna
Marathi २४. त्याच्या जनसमूहाचे उत्तर याखेरीज दुसरे काही नव्हते की ते म्हणाले, याला मारून टाका किंवा याला जाळून टाका. शेवटी अल्लाहने त्यांना आगीपासून वाचविले. यात ईमान राखणाऱ्यांकरिता अनेक निशाण्या आहेत.
Verse 25
وَقَالَ إِنَّمَا ٱتَّخَذْتُم مِّن دُونِ ٱللَّهِ أَوْثَـٰنًا مَّوَدَّةَ بَيْنِكُمْ فِى ٱلْحَيَوٰةِ ٱلدُّنْيَا ۖ ثُمَّ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ يَكْفُرُ بَعْضُكُم بِبَعْضٍ وَيَلْعَنُ بَعْضُكُم بَعْضًا وَمَأْوَىٰكُمُ ٱلنَّارُ وَمَا لَكُم مِّن نَّـٰصِرِينَ
Transliteration waqāla innamā ittakhadhtum min dūni l-lahi awthānan mawaddata baynikum fī l-ḥayati l-dun'yā thumma yawma l-qiyāmati yakfuru baʿḍukum bibaʿḍin wayalʿanu baʿḍukum baʿḍan wamawākumu l-nāru wamā lakum min nāṣirīna
Marathi २५. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की तुम्ही अल्लाहऐवजी ज्या मूर्ती (दैवतां) ची पूजा अर्चना केली आहे त्यांना तुम्ही आपल्या ऐहिक मैत्रीचे कारण बनविले आहे. तुम्ही सर्व कयामतच्या दिवशी एकमेकांचा इन्कार करू लागाल आणि एकमेकांना धिःक्कारू लागाल आणि तुम्हा सर्रांचे ठिकाण जहन्नमध्ये असेल, आणि कोणी तुमची मदत करणाराही नसेल.
Verse 26
۞ فَـَٔامَنَ لَهُۥ لُوطٌ ۘ وَقَالَ إِنِّى مُهَاجِرٌ إِلَىٰ رَبِّىٓ ۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ
Transliteration faāmana lahu lūṭun waqāla innī muhājirun ilā rabbī innahu huwa l-ʿazīzu l-ḥakīmu
Marathi २६. तेव्हा त्याच्या (हजरत इब्राहीम अलै.) वर (हजरत) लूत (अलै.) यांनी ईमान राखले आणि म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्याकडे हिजरत (स्थलांतर) करणारा आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धी-कौशल्य) बाळगणारा आहे.
Verse 27
وَوَهَبْنَا لَهُۥٓ إِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ وَجَعَلْنَا فِى ذُرِّيَّتِهِ ٱلنُّبُوَّةَ وَٱلْكِتَـٰبَ وَءَاتَيْنَـٰهُ أَجْرَهُۥ فِى ٱلدُّنْيَا ۖ وَإِنَّهُۥ فِى ٱلْـَٔاخِرَةِ لَمِنَ ٱلصَّـٰلِحِينَ
Transliteration wawahabnā lahu is'ḥāqa wayaʿqūba wajaʿalnā fī dhurriyyatihi l-nubuwata wal-kitāba waātaynāhu ajrahu fī l-dun'yā wa-innahu fī l-ākhirati lamina l-ṣāliḥīna
Marathi २७. आणि आम्ही त्याला (इब्राहीम अलै. यांना) इसहाक आणि याकूब प्रदान केले, आणि आम्ही प्रेषित्व आणि ग्रंथ त्यांच्या वंशात राखला, आणि आम्ही या जगातही त्यांना चांगला मोबदला दिला आणि आखिरतमध्ये तर ते सदाचारी लोकांपैकी आहेत.
Verse 28
وَلُوطًا إِذْ قَالَ لِقَوْمِهِۦٓ إِنَّكُمْ لَتَأْتُونَ ٱلْفَـٰحِشَةَ مَا سَبَقَكُم بِهَا مِنْ أَحَدٍ مِّنَ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration walūṭan idh qāla liqawmihi innakum latatūna l-fāḥishata mā sabaqakum bihā min aḥadin mina l-ʿālamīna
Marathi २८. आणि (हजरत) लूत (अलै.) यांचाही (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले की तुम्ही तर असे निर्लज्जपणाचे काम करता जे तुमच्यापूर्वी संपूर्ण जगापैकी कोणीही केले नाही.
Verse 29
أَئِنَّكُمْ لَتَأْتُونَ ٱلرِّجَالَ وَتَقْطَعُونَ ٱلسَّبِيلَ وَتَأْتُونَ فِى نَادِيكُمُ ٱلْمُنكَرَ ۖ فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِۦٓ إِلَّآ أَن قَالُوا۟ ٱئْتِنَا بِعَذَابِ ٱللَّهِ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
Transliteration a-innakum latatūna l-rijāla wataqṭaʿūna l-sabīla watatūna fī nādīkumu l-munkara famā kāna jawāba qawmihi illā an qālū i'tinā biʿadhābi l-lahi in kunta mina l-ṣādiqīna
Marathi २९. काय तुम्ही (कामवासना पूर्तीकरिता) पुरुषांजवळ येता, आणि वाटमार करतात आणि आपल्या आम सभामध्ये निर्लज्जतेचे काम करता? तेव्हा त्याच्या उत्तरादाखल त्यांच्या जनसमूहाने याखेरीज दुसरे काही सांगितले नाही की पुरे कर, जर सच्चा आहेस तर आमच्यावर अल्लाहचा अज़ाब (शिक्षा) आणून दाखव.
Verse 30
قَالَ رَبِّ ٱنصُرْنِى عَلَى ٱلْقَوْمِ ٱلْمُفْسِدِينَ
Transliteration qāla rabbi unṣur'nī ʿalā l-qawmi l-muf'sidīna
Marathi ३०. (हजरत) लूत (अलै.) यांनी दुआ (प्रार्थना) केली की, हे माझ्या पालनकर्त्या! या दुराचारी लोकांच्या विरोधात माझी मदत कर.
Verse 31
وَلَمَّا جَآءَتْ رُسُلُنَآ إِبْرَٰهِيمَ بِٱلْبُشْرَىٰ قَالُوٓا۟ إِنَّا مُهْلِكُوٓا۟ أَهْلِ هَـٰذِهِ ٱلْقَرْيَةِ ۖ إِنَّ أَهْلَهَا كَانُوا۟ ظَـٰلِمِينَ
Transliteration walammā jāat rusulunā ib'rāhīma bil-bush'rā qālū innā muh'likū ahli hādhihi l-qaryati inna ahlahā kānū ẓālimīna
Marathi ३१. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते (हजरत) इब्राहीम (अलै.) जवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले तेव्हा म्हणाले, आम्ही या वस्तीच्या लोकांचा नाश करणार आहोत. निःसंशय इथले रहिवाशी मोठे अत्याचारी आहेत.
Verse 32
قَالَ إِنَّ فِيهَا لُوطًا ۚ قَالُوا۟ نَحْنُ أَعْلَمُ بِمَن فِيهَا ۖ لَنُنَجِّيَنَّهُۥ وَأَهْلَهُۥٓ إِلَّا ٱمْرَأَتَهُۥ كَانَتْ مِنَ ٱلْغَـٰبِرِينَ
Transliteration qāla inna fīhā lūṭan qālū naḥnu aʿlamu biman fīhā lanunajjiyannahu wa-ahlahu illā im'ra-atahu kānat mina l-ghābirīna
Marathi ३२. (हजरत) इब्राहीम) म्हणाले, त्या वस्तीत तर लूत (अलै.) आहेत. फरिश्ते म्हणाले, इथे जे आहेत, त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो लूत आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीखेरीज, आम्ही वाचवू. निःसंशय ती स्त्री मागे राहणाऱ्यांपैकी आहे.
Verse 33
وَلَمَّآ أَن جَآءَتْ رُسُلُنَا لُوطًا سِىٓءَ بِهِمْ وَضَاقَ بِهِمْ ذَرْعًا وَقَالُوا۟ لَا تَخَفْ وَلَا تَحْزَنْ ۖ إِنَّا مُنَجُّوكَ وَأَهْلَكَ إِلَّا ٱمْرَأَتَكَ كَانَتْ مِنَ ٱلْغَـٰبِرِينَ
Transliteration walammā an jāat rusulunā lūṭan sīa bihim waḍāqa bihim dharʿan waqālū lā takhaf walā taḥzan innā munajjūka wa-ahlaka illā im'ra-ataka kānat mina l-ghābirīna
Marathi ३३. आणि मग जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूत (अलै.) जवळ पोहोचले, तेव्हा ते त्यांच्यामुळे दुःखी कष्टी झाले आणि मनातल्या मनात शोकाकुल झाले. संदेशवाहक म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि दुःखी होऊ नका, आम्ही तुम्हाला तुमच्या कुटुंबासहित सुरक्षित ठेवू तुमच्या पत्ीला सोडून, कारण ती अज़ाब (शिक्षे) साठी बाकी राहणाऱ्यांपैकी असेल.
Verse 34
إِنَّا مُنزِلُونَ عَلَىٰٓ أَهْلِ هَـٰذِهِ ٱلْقَرْيَةِ رِجْزًا مِّنَ ٱلسَّمَآءِ بِمَا كَانُوا۟ يَفْسُقُونَ
Transliteration innā munzilūna ʿalā ahli hādhihi l-qaryati rij'zan mina l-samāi bimā kānū yafsuqūna
Marathi ३४. आम्ही या वस्तीच्या लोकांवर आकाशातून अज़ाब उतरविणार आहोत, या कारणास्तव की हे दुराचारी होत आहेत.
Verse 35
وَلَقَد تَّرَكْنَا مِنْهَآ ءَايَةًۢ بَيِّنَةً لِّقَوْمٍ يَعْقِلُونَ
Transliteration walaqad taraknā min'hā āyatan bayyinatan liqawmin yaʿqilūna
Marathi ३५. आणि आम्ही या वस्तीला स्पष्ट बोध ग्रहण करण्यासाठी चिन्ह बनविले त्या लोकांकरिता जे बुद्धी बाळगतात.
Verse 36
وَإِلَىٰ مَدْيَنَ أَخَاهُمْ شُعَيْبًا فَقَالَ يَـٰقَوْمِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ وَٱرْجُوا۟ ٱلْيَوْمَ ٱلْـَٔاخِرَ وَلَا تَعْثَوْا۟ فِى ٱلْأَرْضِ مُفْسِدِينَ
Transliteration wa-ilā madyana akhāhum shuʿayban faqāla yāqawmi uʿ'budū l-laha wa-ir'jū l-yawma l-ākhira walā taʿthaw fī l-arḍi muf'sidīna
Marathi ३६. आणि मदयनकडे (आम्ही) त्यांचे भाऊ शुऐब (अलै.) यांना पाठविले. ते म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, कयामतच्या दिवसाची आशा बाळगा आणि जमिनीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका.
Verse 37
فَكَذَّبُوهُ فَأَخَذَتْهُمُ ٱلرَّجْفَةُ فَأَصْبَحُوا۟ فِى دَارِهِمْ جَـٰثِمِينَ
Transliteration fakadhabūhu fa-akhadhathumu l-rajfatu fa-aṣbaḥū fī dārihim jāthimīna
Marathi ३७. तरीही त्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, शेवटी भूकंपाने त्यांना धरले आणि ते आपल्या घरांमध्ये बसल्या बसल्या मृत झाले.
Verse 38
وَعَادًا وَثَمُودَا۟ وَقَد تَّبَيَّنَ لَكُم مِّن مَّسَـٰكِنِهِمْ ۖ وَزَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيْطَـٰنُ أَعْمَـٰلَهُمْ فَصَدَّهُمْ عَنِ ٱلسَّبِيلِ وَكَانُوا۟ مُسْتَبْصِرِينَ
Transliteration waʿādan wathamūdā waqad tabayyana lakum min masākinihim wazayyana lahumu l-shayṭānu aʿmālahum faṣaddahum ʿani l-sabīli wakānū mus'tabṣirīna
Marathi ३८. आणि आम्ही ‘आद’ आणि ‘समूद’ (जनसमूहा) च्या लोकांनाही (नष्ट केले) ज्यांचे काही भग्न अवशेष तुमच्यासमोर हजर आहेत. आणि सैतानाने त्यांच्या दुष्कर्माला सुशोभित करून दाखविले होते आणि त्यांना सन्मार्गापासून रोखले होते. यानंतर की हे डोळे राखणारे आणि चलाख होते.
Verse 39
وَقَـٰرُونَ وَفِرْعَوْنَ وَهَـٰمَـٰنَ ۖ وَلَقَدْ جَآءَهُم مُّوسَىٰ بِٱلْبَيِّنَـٰتِ فَٱسْتَكْبَرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ وَمَا كَانُوا۟ سَـٰبِقِينَ
Transliteration waqārūna wafir'ʿawna wahāmāna walaqad jāahum mūsā bil-bayināti fa-is'takbarū fī l-arḍi wamā kānū sābiqīna
Marathi ३९. आणि कारुन, फिरऔन आणि हामानला देखील. त्याच्याजवळ (हजरत) मूसा उघड स्वरूपाचे चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते तरीही त्यांनी धरतीवर घमेंड केली, तथापि आमच्या पुढे जाणारे होऊ शकले नाहीत.
Verse 40
فَكُلًّا أَخَذْنَا بِذَنۢبِهِۦ ۖ فَمِنْهُم مَّنْ أَرْسَلْنَا عَلَيْهِ حَاصِبًا وَمِنْهُم مَّنْ أَخَذَتْهُ ٱلصَّيْحَةُ وَمِنْهُم مَّنْ خَسَفْنَا بِهِ ٱلْأَرْضَ وَمِنْهُم مَّنْ أَغْرَقْنَا ۚ وَمَا كَانَ ٱللَّهُ لِيَظْلِمَهُمْ وَلَـٰكِن كَانُوٓا۟ أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ
Transliteration fakullan akhadhnā bidhanbihi famin'hum man arsalnā ʿalayhi ḥāṣiban wamin'hum man akhadhathu l-ṣayḥatu wamin'hum man khasafnā bihi l-arḍa wamin'hum man aghraqnā wamā kāna l-lahu liyaẓlimahum walākin kānū anfusahum yaẓlimūna
Marathi ४०. मग तर आम्ही प्रत्येकाला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा देण्यासाठी धरले. त्यांच्यापैकी काहींवर आम्ही दगडांचा वर्षाव केला, त्यांच्यापैकी काहींना भयंकर चित्काराने घेरले, त्यांच्यापैकी काहींना आम्ही जमिनीत धसवले आणि त्याच्यापैकी काहींना आम्ही पाण्यात बुडविले. अल्लाह असा नाही की त्यांच्यावर अत्याचार करील, उलट तेच लोक आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करीत होते.
Verse 41
مَثَلُ ٱلَّذِينَ ٱتَّخَذُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ أَوْلِيَآءَ كَمَثَلِ ٱلْعَنكَبُوتِ ٱتَّخَذَتْ بَيْتًا ۖ وَإِنَّ أَوْهَنَ ٱلْبُيُوتِ لَبَيْتُ ٱلْعَنكَبُوتِ ۖ لَوْ كَانُوا۟ يَعْلَمُونَ
Transliteration mathalu alladhīna ittakhadhū min dūni l-lahi awliyāa kamathali l-ʿankabūti ittakhadhat baytan wa-inna awhana l-buyūti labaytu l-ʿankabūti law kānū yaʿlamūna
Marathi ४१. ज्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसऱ्यांना वली (दैवत) ठरवून घेतले आहे, त्यांचे उदाहरण कोष्टी किटकासारखे आहे कारण तोही एक घर बनवितो, वास्तविक सर्व घरांपेक्षा जास्त कमजोर घर कोष्टी किटकाचे घर आहे. त्यांनी हे जाणून घेतले असते तर बरे झाले असते!
Verse 42
إِنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ مَا يَدْعُونَ مِن دُونِهِۦ مِن شَىْءٍ ۚ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ
Transliteration inna l-laha yaʿlamu mā yadʿūna min dūnihi min shayin wahuwa l-ʿazīzu l-ḥakīmu
Marathi ४२. अल्लाह समस्त वस्तूंना जाणतो, ज्यांना ते त्याच्याखेरीज पुकारत आहेत. आणि तो मोठा जबरदस्त आणि बुद्धी कौशल्य बाळगणारा आहे.
Verse 43
وَتِلْكَ ٱلْأَمْثَـٰلُ نَضْرِبُهَا لِلنَّاسِ ۖ وَمَا يَعْقِلُهَآ إِلَّا ٱلْعَـٰلِمُونَ
Transliteration watil'ka l-amthālu naḍribuhā lilnnāsi wamā yaʿqiluhā illā l-ʿālimūna
Marathi ४३. आणि आम्ही ही उदाहरण लोकांकरिता निवेदन करीत आहोत आणि यांना केवळ तेच लोक समजतात जे ज्ञान राखतात.
Verse 44
خَلَقَ ٱللَّهُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ بِٱلْحَقِّ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّلْمُؤْمِنِينَ
Transliteration khalaqa l-lahu l-samāwāti wal-arḍa bil-ḥaqi inna fī dhālika laāyatan lil'mu'minīna
Marathi ४४. अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला सत्यासह निर्माण केले आहे ईमान राखणाऱ्यांकरिता यात फार मोठी निशाणी आहे.
Verse 45
ٱتْلُ مَآ أُوحِىَ إِلَيْكَ مِنَ ٱلْكِتَـٰبِ وَأَقِمِ ٱلصَّلَوٰةَ ۖ إِنَّ ٱلصَّلَوٰةَ تَنْهَىٰ عَنِ ٱلْفَحْشَآءِ وَٱلْمُنكَرِ ۗ وَلَذِكْرُ ٱللَّهِ أَكْبَرُ ۗ وَٱللَّهُ يَعْلَمُ مَا تَصْنَعُونَ
Transliteration ut'lu mā ūḥiya ilayka mina l-kitābi wa-aqimi l-ṣalata inna l-ṣalata tanhā ʿani l-faḥshāi wal-munkari waladhik'ru l-lahi akbaru wal-lahu yaʿlamu mā taṣnaʿūna
Marathi ४५. जो ग्रंथ तुमच्याकडे वहयी (अवतरित) केला गेला आहे, त्याचे पठण करा१ आणि नमाज कायम करा (नियमितपणे पढत राहा) निःसंशय नमाज, निर्लज्जता आणि दुष्कर्मापासून रोखते२ आणि निःसंशय अल्लाहचे नामःस्मरण फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते जाणतो.
Verse 46
۞ وَلَا تُجَـٰدِلُوٓا۟ أَهْلَ ٱلْكِتَـٰبِ إِلَّا بِٱلَّتِى هِىَ أَحْسَنُ إِلَّا ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ مِنْهُمْ ۖ وَقُولُوٓا۟ ءَامَنَّا بِٱلَّذِىٓ أُنزِلَ إِلَيْنَا وَأُنزِلَ إِلَيْكُمْ وَإِلَـٰهُنَا وَإِلَـٰهُكُمْ وَٰحِدٌ وَنَحْنُ لَهُۥ مُسْلِمُونَ
Transliteration walā tujādilū ahla l-kitābi illā bi-allatī hiya aḥsanu illā alladhīna ẓalamū min'hum waqūlū āmannā bi-alladhī unzila ilaynā wa-unzila ilaykum wa-ilāhunā wa-ilāhukum wāḥidun wanaḥnu lahu mus'limūna
Marathi ४६. आणि ग्रंथधारकांशी खूप चांगल्या रितीने वादविवाद करा, अशा लोकांखेरीज, जे त्यांच्यात अत्याचारी आहेत. आणि स्पष्ट ऐलान करा की आम्ही तर त्या ग्रंथावरही ईमान राखतो, जो आमच्यावर अवतरित केला गेला आहे आणि त्यावरही, जो तुमच्यावर अवतरित केला गेला. आमचा आणि तुमचा पालनकर्ता एकच आहे. आम्ही सर्व त्याचेच आज्ञाधारक आहोत.
Verse 47
وَكَذَٰلِكَ أَنزَلْنَآ إِلَيْكَ ٱلْكِتَـٰبَ ۚ فَٱلَّذِينَ ءَاتَيْنَـٰهُمُ ٱلْكِتَـٰبَ يُؤْمِنُونَ بِهِۦ ۖ وَمِنْ هَـٰٓؤُلَآءِ مَن يُؤْمِنُ بِهِۦ ۚ وَمَا يَجْحَدُ بِـَٔايَـٰتِنَآ إِلَّا ٱلْكَـٰفِرُونَ
Transliteration wakadhālika anzalnā ilayka l-kitāba fa-alladhīna ātaynāhumu l-kitāba yu'minūna bihi wamin hāulāi man yu'minu bihi wamā yajḥadu biāyātinā illā l-kāfirūna
Marathi ४७. आणि आम्ही त्याच प्रकारे तुमच्याकडे आपला ग्रंथ अवतरित केला आहे, यास्तव ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते त्यावर ईमान राखतात आणि त्यांच्यापैकी काही त्यावर ईमान राखतात आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ काफिरच करतात.
Verse 48
وَمَا كُنتَ تَتْلُوا۟ مِن قَبْلِهِۦ مِن كِتَـٰبٍ وَلَا تَخُطُّهُۥ بِيَمِينِكَ ۖ إِذًا لَّٱرْتَابَ ٱلْمُبْطِلُونَ
Transliteration wamā kunta tatlū min qablihi min kitābin walā takhuṭṭuhu biyamīnika idhan la-ir'tāba l-mub'ṭilūna
Marathi ४८. आणि यापूर्वी तर तुम्ही एखादा ग्रंथ वाचत होते आणि ना एखादा ग्रंथ आपल्या हाताने लिहित होते की (ज्यामुळे) असत्याचे पुजारी शंका संशयात पडले असते.
Verse 49
بَلْ هُوَ ءَايَـٰتٌۢ بَيِّنَـٰتٌ فِى صُدُورِ ٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْعِلْمَ ۚ وَمَا يَجْحَدُ بِـَٔايَـٰتِنَآ إِلَّا ٱلظَّـٰلِمُونَ
Transliteration bal huwa āyātun bayyinātun fī ṣudūri alladhīna ūtū l-ʿil'ma wamā yajḥadu biāyātinā illā l-ẓālimūna
Marathi ४९. वास्तविक या (कुरआनाच्या) दिव्य (स्पष्ट) आयती आहेत, ज्या विद्वानांच्या हृदयात सुरक्षित आहेत. आमच्या आयतींचा इन्कार करणारा, अत्याचारीखेरीज दुसरा कोणी नाही.
Verse 50
وَقَالُوا۟ لَوْلَآ أُنزِلَ عَلَيْهِ ءَايَـٰتٌ مِّن رَّبِّهِۦ ۖ قُلْ إِنَّمَا ٱلْـَٔايَـٰتُ عِندَ ٱللَّهِ وَإِنَّمَآ أَنَا۠ نَذِيرٌ مُّبِينٌ
Transliteration waqālū lawlā unzila ʿalayhi āyātun min rabbihi qul innamā l-āyātu ʿinda l-lahi wa-innamā anā nadhīrun mubīnun
Marathi ५०. आणि ते म्हणाले, याच्यावर काही निशाण्या याच्या पालनकर्त्यातर्फे का नाही अवतरित केल्या गेल्या? (तुम्ही) सांगा, निशाण्या तर सर्व अल्लाहजवळ आहेत. माझी योग्यता तर केवळ स्पष्टतः खबरदार (सावध) करणाऱ्याची आहे.
Verse 51
أَوَلَمْ يَكْفِهِمْ أَنَّآ أَنزَلْنَا عَلَيْكَ ٱلْكِتَـٰبَ يُتْلَىٰ عَلَيْهِمْ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَرَحْمَةً وَذِكْرَىٰ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ
Transliteration awalam yakfihim annā anzalnā ʿalayka l-kitāba yut'lā ʿalayhim inna fī dhālika laraḥmatan wadhik'rā liqawmin yu'minūna
Marathi ५१. काय त्यांच्यासाठी हे निशाण पुरेसे नाही की आम्ही तुमच्यावर आपला ग्रंथ अवतरित केला, जो त्यांना वाचून ऐकविला जात आहे. यात (अल्लाहची) दया-कृपाही आहे आणि बोध उपदेशही, त्या लोकांसाठी जे ईमान राखणारे आहेत.
Verse 52
قُلْ كَفَىٰ بِٱللَّهِ بَيْنِى وَبَيْنَكُمْ شَهِيدًا ۖ يَعْلَمُ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۗ وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ بِٱلْبَـٰطِلِ وَكَفَرُوا۟ بِٱللَّهِ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْخَـٰسِرُونَ
Transliteration qul kafā bil-lahi baynī wabaynakum shahīdan yaʿlamu mā fī l-samāwāti wal-arḍi wa-alladhīna āmanū bil-bāṭili wakafarū bil-lahi ulāika humu l-khāsirūna
Marathi ५२. त्यांना सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे. तो तर आकाश आणि जमिनीच्या प्रत्येक वस्तूला जाणणारा आहे. जे लोक असत्याला मानणारे आहेत आणि अल्लाहशी कुप्र (इन्कार) करणारे आहेत, ते फार मोठ्या नुकसानात आहेत.
Verse 53
وَيَسْتَعْجِلُونَكَ بِٱلْعَذَابِ ۚ وَلَوْلَآ أَجَلٌ مُّسَمًّى لَّجَآءَهُمُ ٱلْعَذَابُ وَلَيَأْتِيَنَّهُم بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ
Transliteration wayastaʿjilūnaka bil-ʿadhābi walawlā ajalun musamman lajāahumu l-ʿadhābu walayatiyannahum baghtatan wahum lā yashʿurūna
Marathi ५३. आणि हे लोक तुमच्याजवळ शिक्षा-यातनेची घाई माजवित आहेत. जर माझ्यातर्फे एक निश्चित वेळ ठरविली गेली नसती तर आतापर्यंत त्यांच्याजवळ शिक्षा-यातना येऊन पोहचली असती. एवढे मात्र निश्चित की अचानक त्यांच्या नकळत अज़ाब त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल.
Verse 54
يَسْتَعْجِلُونَكَ بِٱلْعَذَابِ وَإِنَّ جَهَنَّمَ لَمُحِيطَةٌۢ بِٱلْكَـٰفِرِينَ
Transliteration yastaʿjilūnaka bil-ʿadhābi wa-inna jahannama lamuḥīṭatun bil-kāfirīna
Marathi ५४. हे लोक अज़ाब (शिक्षे) साठी घाई माजवित आहेत, आणि (समाधान राखा) जहन्नम काफिरांना घेरून टाकणार आहे.
Verse 55
يَوْمَ يَغْشَىٰهُمُ ٱلْعَذَابُ مِن فَوْقِهِمْ وَمِن تَحْتِ أَرْجُلِهِمْ وَيَقُولُ ذُوقُوا۟ مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
Transliteration yawma yaghshāhumu l-ʿadhābu min fawqihim wamin taḥti arjulihim wayaqūlu dhūqū mā kuntum taʿmalūna
Marathi ५५. त्या दिवशी त्यांना, त्यांच्या वरून आणि खालून अज़ाब झाकत असेल आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्माविल, आता आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखा.
Verse 56
يَـٰعِبَادِىَ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِنَّ أَرْضِى وَٰسِعَةٌ فَإِيَّـٰىَ فَٱعْبُدُونِ
Transliteration yāʿibādiya alladhīna āmanū inna arḍī wāsiʿatun fa-iyyāya fa-uʿ'budūni
Marathi ५६. हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! माझी जमीन फार विस्तृत आहे. तेव्हा तुम्ही माझीच उपासना करा.
Verse 57
كُلُّ نَفْسٍ ذَآئِقَةُ ٱلْمَوْتِ ۖ ثُمَّ إِلَيْنَا تُرْجَعُونَ
Transliteration kullu nafsin dhāiqatu l-mawti thumma ilaynā tur'jaʿūna
Marathi ५७. प्रत्येक जीवाला मृत्युची गोडी चाखायची आहे आणि तुम्ही सर्व आमच्याचकडे परतविले जाल.
Verse 58
وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ لَنُبَوِّئَنَّهُم مِّنَ ٱلْجَنَّةِ غُرَفًا تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَا ۚ نِعْمَ أَجْرُ ٱلْعَـٰمِلِينَ
Transliteration wa-alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti lanubawwi-annahum mina l-janati ghurafan tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā niʿ'ma ajru l-ʿāmilīna
Marathi ५८. आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना आम्ही निश्चितपणे जन्नतच्या उंच महालांमध्ये जागा देऊ, ज्यांच्या खालून नद्या वाहत आहे, जिथे ते सदैवकाळ राहतील. (चांगले) कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे!
Verse 59
ٱلَّذِينَ صَبَرُوا۟ وَعَلَىٰ رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ
Transliteration alladhīna ṣabarū waʿalā rabbihim yatawakkalūna
Marathi ५९. ते, ज्यांनी धीर - संयम राखला आणि जे आपल्या पालनकर्त्यावर भरवसा ठेवतात.
Verse 60
وَكَأَيِّن مِّن دَآبَّةٍ لَّا تَحْمِلُ رِزْقَهَا ٱللَّهُ يَرْزُقُهَا وَإِيَّاكُمْ ۚ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ
Transliteration waka-ayyin min dābbatin lā taḥmilu riz'qahā l-lahu yarzuquhā wa-iyyākum wahuwa l-samīʿu l-ʿalīmu
Marathi ६०. आणि कित्येक प्राणी असे आहेत, जे आपली आजिविका उचलून फिरत नाही. त्या सर्वांना आणि तुम्हालाही अल्लाहच आजिविका प्रदान करतो. तो सर्व काही ऐकणारा, जाणणारा आहे.
Verse 61
وَلَئِن سَأَلْتَهُم مَّنْ خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَسَخَّرَ ٱلشَّمْسَ وَٱلْقَمَرَ لَيَقُولُنَّ ٱللَّهُ ۖ فَأَنَّىٰ يُؤْفَكُونَ
Transliteration wala-in sa-altahum man khalaqa l-samāwāti wal-arḍa wasakhara l-shamsa wal-qamara layaqūlunna l-lahu fa-annā yu'fakūna
Marathi ६१. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाश व जमिनीचा निर्माण करणारा आणि सूर्य व चंद्राला कामास लावणारा कोण आहे, तर ते हेच उत्तर देतील की अल्लाह! तेव्हा मग कोठे उलट जात आहात?
Verse 62
ٱللَّهُ يَبْسُطُ ٱلرِّزْقَ لِمَن يَشَآءُ مِنْ عِبَادِهِۦ وَيَقْدِرُ لَهُۥٓ ۚ إِنَّ ٱللَّهَ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌ
Transliteration al-lahu yabsuṭu l-riz'qa liman yashāu min ʿibādihi wayaqdiru lahu inna l-laha bikulli shayin ʿalīmun
Marathi ६२. अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, अधिक आजिविका प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो कमी. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.
Verse 63
وَلَئِن سَأَلْتَهُم مَّن نَّزَّلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَحْيَا بِهِ ٱلْأَرْضَ مِنۢ بَعْدِ مَوْتِهَا لَيَقُولُنَّ ٱللَّهُ ۚ قُلِ ٱلْحَمْدُ لِلَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْقِلُونَ
Transliteration wala-in sa-altahum man nazzala mina l-samāi māan fa-aḥyā bihi l-arḍa min baʿdi mawtihā layaqūlunna l-lahu quli l-ḥamdu lillahi bal aktharuhum lā yaʿqilūna
Marathi ६३. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशातून पाण्याचा वर्षाव करून, जमिनीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करणारा कोण आहे, तेव्हा निश्चितच त्यांचे उत्तर हेच असेल की अल्लाह! तुम्ही सांगा की समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, किंबहुना त्यांच्यात अधिकांश लोक निर्बोध आहेत. (आकलन अककल राखत नाही)
Verse 64
وَمَا هَـٰذِهِ ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَآ إِلَّا لَهْوٌ وَلَعِبٌ ۚ وَإِنَّ ٱلدَّارَ ٱلْـَٔاخِرَةَ لَهِىَ ٱلْحَيَوَانُ ۚ لَوْ كَانُوا۟ يَعْلَمُونَ
Transliteration wamā hādhihi l-ḥayatu l-dun'yā illā lahwun walaʿibun wa-inna l-dāra l-ākhirata lahiya l-ḥayawānu law kānū yaʿlamūna
Marathi ६४. आणि या जगाचे जीवन तर केवळ मनोरंजन आणि खेळ क्रीडा आहे परंतु खरे जीवन तर आखिरतचे घर आहे. या लोकांनी हे जाणले असते तर बरे झाले असते!
Verse 65
فَإِذَا رَكِبُوا۟ فِى ٱلْفُلْكِ دَعَوُا۟ ٱللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ ٱلدِّينَ فَلَمَّا نَجَّىٰهُمْ إِلَى ٱلْبَرِّ إِذَا هُمْ يُشْرِكُونَ
Transliteration fa-idhā rakibū fī l-ful'ki daʿawū l-laha mukh'liṣīna lahu l-dīna falammā najjāhum ilā l-bari idhā hum yush'rikūna
Marathi ६५. जेव्हा हे लोक नौकेत स्वार होतात, तेव्हा अल्लाहलाच पुकारतात, त्याच्यासाठी उपासनेला खासकरून, मग जेव्हा तो त्यांना खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा लगेच शिर्क (अनेकईश्वरउपासना) करू लागतात.
Verse 66
لِيَكْفُرُوا۟ بِمَآ ءَاتَيْنَـٰهُمْ وَلِيَتَمَتَّعُوا۟ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
Transliteration liyakfurū bimā ātaynāhum waliyatamattaʿū fasawfa yaʿlamūna
Marathi ६६. यासाठी की आम्ही केलेल्या उपकारांशी कृतघ्न व्हावे आणि लाभ घेत राहावा. आता लवकरच त्यांना कळून येईल.
Verse 67
أَوَلَمْ يَرَوْا۟ أَنَّا جَعَلْنَا حَرَمًا ءَامِنًا وَيُتَخَطَّفُ ٱلنَّاسُ مِنْ حَوْلِهِمْ ۚ أَفَبِٱلْبَـٰطِلِ يُؤْمِنُونَ وَبِنِعْمَةِ ٱللَّهِ يَكْفُرُونَ
Transliteration awalam yaraw annā jaʿalnā ḥaraman āminan wayutakhaṭṭafu l-nāsu min ḥawlihim afabil-bāṭili yu'minūna wabiniʿ'mati l-lahi yakfurūna
Marathi ६७. काय हे नाही पाहत की आम्ही हरमला शांतीचे स्तळ बनविले, वस्तुतः त्यांच्या जवळच्या इलाक्यातून लोक अपहृत केले जातात. काय हे असत्यावर तर विश्वास ठेवतात आणि अल्लाहच्या कृपा- देणग्यांवर कृतघ्नता दाखवितात?
Verse 68
وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ ٱفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا أَوْ كَذَّبَ بِٱلْحَقِّ لَمَّا جَآءَهُۥٓ ۚ أَلَيْسَ فِى جَهَنَّمَ مَثْوًى لِّلْكَـٰفِرِينَ
Transliteration waman aẓlamu mimmani if'tarā ʿalā l-lahi kadhiban aw kadhaba bil-ḥaqi lammā jāahu alaysa fī jahannama mathwan lil'kāfirīna
Marathi ६८. आणि त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहशी छोट्या गोष्टीचा संबंध जोडेल किंवा सत्य त्याच्याजवळ येऊन पोहचले असता, तो त्याला खोटे असल्याचे सांगेल. काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नममध्ये नसेल?
Verse 69
وَٱلَّذِينَ جَـٰهَدُوا۟ فِينَا لَنَهْدِيَنَّهُمْ سُبُلَنَا ۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَمَعَ ٱلْمُحْسِنِينَ
Transliteration wa-alladhīna jāhadū fīnā lanahdiyannahum subulanā wa-inna l-laha lamaʿa l-muḥ'sinīna
Marathi ६९. आणि जे लोक आमच्या मार्गात दुःख सहन करतात, आम्ही त्यांना आपला मार्ग अवश्य दाखवू. निःसंशय, अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांचा सोबती आहे.
Read Surah Al-'Ankabut in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.