Surah Al-Ahqaf in Marathi: translation and audio
Surah 46 · الأحقاف · The Wind-Curved Sandhills · 35 verses
Surah Al-Ahqaf verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Ahqaf word by word in English.
Verse 1
حمٓ
Transliteration hha-meem
Marathi १. हा मीम.
Verse 2
تَنزِيلُ ٱلْكِتَـٰبِ مِنَ ٱللَّهِ ٱلْعَزِيزِ ٱلْحَكِيمِ
Transliteration tanzīlu l-kitābi mina l-lahi l-ʿazīzi l-ḥakīmi
Marathi २. या ग्रंथाला अवतरित करणे, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे आहे.
Verse 3
مَا خَلَقْنَا ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَآ إِلَّا بِٱلْحَقِّ وَأَجَلٍ مُّسَمًّى ۚ وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ عَمَّآ أُنذِرُوا۟ مُعْرِضُونَ
Transliteration mā khalaqnā l-samāwāti wal-arḍa wamā baynahumā illā bil-ḥaqi wa-ajalin musamman wa-alladhīna kafarū ʿammā undhirū muʿ'riḍūna
Marathi ३. आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्या दोघांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना अति उत्तम योजनेसह निर्धारित अवधीकरिता बनविले आहे आणि काफिर लोकांना ज्या गोष्टीचे भय दाखविले जाते तिच्यापासून तोंड फिरवितात.
Verse 4
قُلْ أَرَءَيْتُم مَّا تَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ أَرُونِى مَاذَا خَلَقُوا۟ مِنَ ٱلْأَرْضِ أَمْ لَهُمْ شِرْكٌ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ ۖ ٱئْتُونِى بِكِتَـٰبٍ مِّن قَبْلِ هَـٰذَآ أَوْ أَثَـٰرَةٍ مِّنْ عِلْمٍ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration qul ara-aytum mā tadʿūna min dūni l-lahi arūnī mādhā khalaqū mina l-arḍi am lahum shir'kun fī l-samāwāti i'tūnī bikitābin min qabli hādhā aw athāratin min ʿil'min in kuntum ṣādiqīna
Marathi ४. (तुम्ही) सांगा की, बरे ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, मलाही दाखवा की त्यांनी जमिनीचा कोणता हिस्सा बनविला आहे किंवा आकाशांमध्ये त्यांचा कोणता हिस्सा आहे? जर तुम्ही सच्चे असाल तर याच्या पूर्वीचाच एवादा ग्रंथ किंवा एखादे ज्ञान, जे उद्धृत केले जात असेल, माझ्याजवळ आणा.
Verse 5
وَمَنْ أَضَلُّ مِمَّن يَدْعُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ مَن لَّا يَسْتَجِيبُ لَهُۥٓ إِلَىٰ يَوْمِ ٱلْقِيَـٰمَةِ وَهُمْ عَن دُعَآئِهِمْ غَـٰفِلُونَ
Transliteration waman aḍallu mimman yadʿū min dūni l-lahi man lā yastajību lahu ilā yawmi l-qiyāmati wahum ʿan duʿāihim ghāfilūna
Marathi ५. आणि त्याहून जास्त मार्गभ्रष्ट दुसरा कोण असेल, जो अल्लाहखेरीज अशांना पुकारतो, जे कयामतपर्यंत त्याची दुआ - प्रार्थना कबूल करू शकणार नाहीत, उलट त्याच्या पुकारण्यापासून गाफीलच असावेत.
Verse 6
وَإِذَا حُشِرَ ٱلنَّاسُ كَانُوا۟ لَهُمْ أَعْدَآءً وَكَانُوا۟ بِعِبَادَتِهِمْ كَـٰفِرِينَ
Transliteration wa-idhā ḥushira l-nāsu kānū lahum aʿdāan wakānū biʿibādatihim kāfirīna
Marathi ६. आणि जेव्हा लोकांना एकत्र केले जाईल, तेव्हा हे त्यांचे वैरी होतील आणि यांच्या उपासनेचा साफ इन्कार करतील.
Verse 7
وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُنَا بَيِّنَـٰتٍ قَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلْحَقِّ لَمَّا جَآءَهُمْ هَـٰذَا سِحْرٌ مُّبِينٌ
Transliteration wa-idhā tut'lā ʿalayhim āyātunā bayyinātin qāla alladhīna kafarū lil'ḥaqqi lammā jāahum hādhā siḥ'run mubīnun
Marathi ७. आणि जेव्हा त्यांना आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा काफिर लोक सत्य गोष्टीस, जेव्हा ती त्यांच्याप्रत येऊन पोहोचली, सांगतात की ही तर उघड जादू आहे.
Verse 8
أَمْ يَقُولُونَ ٱفْتَرَىٰهُ ۖ قُلْ إِنِ ٱفْتَرَيْتُهُۥ فَلَا تَمْلِكُونَ لِى مِنَ ٱللَّهِ شَيْـًٔا ۖ هُوَ أَعْلَمُ بِمَا تُفِيضُونَ فِيهِ ۖ كَفَىٰ بِهِۦ شَهِيدًۢا بَيْنِى وَبَيْنَكُمْ ۖ وَهُوَ ٱلْغَفُورُ ٱلرَّحِيمُ
Transliteration am yaqūlūna if'tarāhu qul ini if'taraytuhu falā tamlikūna lī mina l-lahi shayan huwa aʿlamu bimā tufīḍūna fīhi kafā bihi shahīdan baynī wabaynakum wahuwa l-ghafūru l-raḥīmu
Marathi ८. काय ते असे म्हणतात की ते तर त्याने स्वतः बनविले आहे. (तुम्ही) सांगा की जर मीच ते बनवून आणले आहे तर तुम्ही माझ्यासाठी अल्लाहतर्फे कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही. तुम्ही या कुरआनाविषयी जे काही सांगत ऐकत आहात, ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. माझ्या आणि तुमच्या दरम्यान साक्ष देण्यास तोच पुरेसा आहे आणि तो मोठा माफ करणारा, मोठा दयावान आहे.
Verse 9
قُلْ مَا كُنتُ بِدْعًا مِّنَ ٱلرُّسُلِ وَمَآ أَدْرِى مَا يُفْعَلُ بِى وَلَا بِكُمْ ۖ إِنْ أَتَّبِعُ إِلَّا مَا يُوحَىٰٓ إِلَىَّ وَمَآ أَنَا۠ إِلَّا نَذِيرٌ مُّبِينٌ
Transliteration qul mā kuntu bid'ʿan mina l-rusuli wamā adrī mā yuf'ʿalu bī walā bikum in attabiʿu illā mā yūḥā ilayya wamā anā illā nadhīrun mubīnun
Marathi ९. (तुम्ही) सांगा की मी काही अगदी नवीन पैगंबर तर नाही आणि ना मला हे माहीत की माझ्याशी व तुमच्याशी कसा व्यवहार केला जाईल. मी तर फक्त त्याच गोष्टीचे अनुसरण करतो, जी माझ्याकडे वहयी केली जाते आणि मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे.
Verse 10
قُلْ أَرَءَيْتُمْ إِن كَانَ مِنْ عِندِ ٱللَّهِ وَكَفَرْتُم بِهِۦ وَشَهِدَ شَاهِدٌ مِّنۢ بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ عَلَىٰ مِثْلِهِۦ فَـَٔامَنَ وَٱسْتَكْبَرْتُمْ ۖ إِنَّ ٱللَّهَ لَا يَهْدِى ٱلْقَوْمَ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration qul ara-aytum in kāna min ʿindi l-lahi wakafartum bihi washahida shāhidun min banī is'rāīla ʿalā mith'lihi faāmana wa-is'takbartum inna l-laha lā yahdī l-qawma l-ẓālimīna
Marathi १०. (तुम्ही) सांगा की जर हा कुरआन अल्लाहतर्फे असेल आणि तुम्ही त्यास मान्य केले नसेल आणि इस्राइलच्या संततीचा एक साक्षी त्यासारखी साक्षही देऊन चुकला असेल आणि त्याने ईमानही राखले असेल आणि तुम्ही विद्रोह केला असेल तर निःसंशय, अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
Verse 11
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَوْ كَانَ خَيْرًا مَّا سَبَقُونَآ إِلَيْهِ ۚ وَإِذْ لَمْ يَهْتَدُوا۟ بِهِۦ فَسَيَقُولُونَ هَـٰذَآ إِفْكٌ قَدِيمٌ
Transliteration waqāla alladhīna kafarū lilladhīna āmanū law kāna khayran mā sabaqūnā ilayhi wa-idh lam yahtadū bihi fasayaqūlūna hādhā if'kun qadīmun
Marathi ११. आणि काफिर (इन्कारी) लोक ईमान राखणाऱ्यांविषयी म्हणाले की जर हा (धर्म) चांगला असता तर हे लोक त्याच्याकडे आमच्या आधी जाऊ शकले नसते आणि ज्याअर्थी त्यांनी कुरआनापासून मार्गदर्शन प्राप्त केले नाही, तेव्हा असे म्हणतील की हे जुने असत्य आहे.
Verse 12
وَمِن قَبْلِهِۦ كِتَـٰبُ مُوسَىٰٓ إِمَامًا وَرَحْمَةً ۚ وَهَـٰذَا كِتَـٰبٌ مُّصَدِّقٌ لِّسَانًا عَرَبِيًّا لِّيُنذِرَ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ وَبُشْرَىٰ لِلْمُحْسِنِينَ
Transliteration wamin qablihi kitābu mūsā imāman waraḥmatan wahādhā kitābun muṣaddiqun lisānan ʿarabiyyan liyundhira alladhīna ẓalamū wabush'rā lil'muḥ'sinīna
Marathi १२. आणि याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ मार्गदर्शक व दया म्हणून होता, आणि हा ग्रंथ त्याचे सत्य-समर्थन करणारा आहे अरबी भाषेत, यासाठी की अत्याचारी लोकांना भय दाखवावे आणि अल्लाहचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी शुभ समाचार ठरावा.
Verse 13
إِنَّ ٱلَّذِينَ قَالُوا۟ رَبُّنَا ٱللَّهُ ثُمَّ ٱسْتَقَـٰمُوا۟ فَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ
Transliteration inna alladhīna qālū rabbunā l-lahu thumma is'taqāmū falā khawfun ʿalayhim walā hum yaḥzanūna
Marathi १३. निःसंशय, ज्या लोकांनी सांगितले की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे, मग त्यावर अटळ राहिलेत तर अशा लोकांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील.
Verse 14
أُو۟لَـٰٓئِكَ أَصْحَـٰبُ ٱلْجَنَّةِ خَـٰلِدِينَ فِيهَا جَزَآءًۢ بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration ulāika aṣḥābu l-janati khālidīna fīhā jazāan bimā kānū yaʿmalūna
Marathi १४. हे तर जन्नतमध्ये जाणारे लोक आहेत, जे सदैव तिच्यातच राहतील, त्या कर्मांच्या मोबदल्यात जे ते करीत होते.
Verse 15
وَوَصَّيْنَا ٱلْإِنسَـٰنَ بِوَٰلِدَيْهِ إِحْسَـٰنًا ۖ حَمَلَتْهُ أُمُّهُۥ كُرْهًا وَوَضَعَتْهُ كُرْهًا ۖ وَحَمْلُهُۥ وَفِصَـٰلُهُۥ ثَلَـٰثُونَ شَهْرًا ۚ حَتَّىٰٓ إِذَا بَلَغَ أَشُدَّهُۥ وَبَلَغَ أَرْبَعِينَ سَنَةً قَالَ رَبِّ أَوْزِعْنِىٓ أَنْ أَشْكُرَ نِعْمَتَكَ ٱلَّتِىٓ أَنْعَمْتَ عَلَىَّ وَعَلَىٰ وَٰلِدَىَّ وَأَنْ أَعْمَلَ صَـٰلِحًا تَرْضَىٰهُ وَأَصْلِحْ لِى فِى ذُرِّيَّتِىٓ ۖ إِنِّى تُبْتُ إِلَيْكَ وَإِنِّى مِنَ ٱلْمُسْلِمِينَ
Transliteration wawaṣṣaynā l-insāna biwālidayhi iḥ'sānan ḥamalathu ummuhu kur'han wawaḍaʿathu kur'han waḥamluhu wafiṣāluhu thalāthūna shahran ḥattā idhā balagha ashuddahu wabalagha arbaʿīna sanatan qāla rabbi awziʿ'nī an ashkura niʿ'mataka allatī anʿamta ʿalayya waʿalā wālidayya wa-an aʿmala ṣāliḥan tarḍāhu wa-aṣliḥ lī fī dhurriyyatī innī tub'tu ilayka wa-innī mina l-mus'limīna
Marathi १५. आणि आम्ही माणसाला, आपल्या माता-पित्याशी सद्वर्तन करण्याचा आदेश दिला आहे. त्याच्या मातेने त्याला कष्ट-यातना झेलून उदरात ठेवले आणि यातना सहन करून त्याला जन्म दिला.१ त्याची गर्भधारणा आणि त्याचे दूध सोडविण्याची मुदत तीस महिन्यांची आहे.येथेपर्यर्ंत की जेव्हा तो आपल्या पूर्ण वयास (तरुण वयास) आणि चाळीस वर्षांच्या वयास पोहचला, तेव्हा म्हणू लागला, हे माझ्या पालनकर्त्या! मला तौफीक (सुबुद्धी) दे की मी तुझ्या त्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकावे, जी तू मला आणि माझ्या माता-पित्यास प्रदान केली आहे आणि हे की मी अशी सत्कर्मे करावीत, ज्यांनी तू प्रसन्न व्हावे आणि तू माझ्या संततीलाही नेक सदाचारी बनव. मी तुझ्याकडे लक्ष केंद्रित करतो आणि मी मुस्लिमांपैकी आहे.
Verse 16
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ نَتَقَبَّلُ عَنْهُمْ أَحْسَنَ مَا عَمِلُوا۟ وَنَتَجَاوَزُ عَن سَيِّـَٔاتِهِمْ فِىٓ أَصْحَـٰبِ ٱلْجَنَّةِ ۖ وَعْدَ ٱلصِّدْقِ ٱلَّذِى كَانُوا۟ يُوعَدُونَ
Transliteration ulāika alladhīna nataqabbalu ʿanhum aḥsana mā ʿamilū wanatajāwazu ʿan sayyiātihim fī aṣḥābi l-janati waʿda l-ṣid'qi alladhī kānū yūʿadūna
Marathi १६. हेच ते लोक होत, ज्यांची सत्कर्मे आम्ही कबूल करतो आणि दुष्कर्मांना माफ करतो, (हे) जन्नतमध्ये दाखल होणाऱ्या लोकांपैकी आहेत, त्या सच्चा वायद्यानुसार, जो त्यांच्याशी केला जात होता.
Verse 17
وَٱلَّذِى قَالَ لِوَٰلِدَيْهِ أُفٍّ لَّكُمَآ أَتَعِدَانِنِىٓ أَنْ أُخْرَجَ وَقَدْ خَلَتِ ٱلْقُرُونُ مِن قَبْلِى وَهُمَا يَسْتَغِيثَانِ ٱللَّهَ وَيْلَكَ ءَامِنْ إِنَّ وَعْدَ ٱللَّهِ حَقٌّ فَيَقُولُ مَا هَـٰذَآ إِلَّآ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ
Transliteration wa-alladhī qāla liwālidayhi uffin lakumā ataʿidāninī an ukh'raja waqad khalati l-qurūnu min qablī wahumā yastaghīthāni l-laha waylaka āmin inna waʿda l-lahi ḥaqqun fayaqūlu mā hādhā illā asāṭīru l-awalīna
Marathi १७. आणि ज्याने आपल्या माता-पित्यास म्हटले की, धिःक्कार असो तुमचा (मी तुमच्यापासून अगदी बेजार झालो) तुम्ही मला हेच सांगत राहाल की (मी मेल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा) जिवंत केला जाईल, माझ्यापूर्वीही अनेक जनसमूह होऊन गेलेत. ते दोघे अल्लाहच्या दरबारात विनंती (गाऱ्हाणे) करतात, (आणि म्हणतात) वाईट होवो तुझे, तू ईमान राखणारा हो, निःसंशय, अल्लाहचा वायदा सच्चा आहे, तो उत्तर देतो की हे तर केवळ पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचे किस्से आहेत.
Verse 18
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ حَقَّ عَلَيْهِمُ ٱلْقَوْلُ فِىٓ أُمَمٍ قَدْ خَلَتْ مِن قَبْلِهِم مِّنَ ٱلْجِنِّ وَٱلْإِنسِ ۖ إِنَّهُمْ كَانُوا۟ خَـٰسِرِينَ
Transliteration ulāika alladhīna ḥaqqa ʿalayhimu l-qawlu fī umamin qad khalat min qablihim mina l-jini wal-insi innahum kānū khāsirīna
Marathi १८. (हेच) ते लोक होत, ज्यांच्यावर अल्लाह (च्या अज़ाब) चे फर्मान लागू झाले त्या जिन्न आणि मानवांच्या समूहांसोबत, जे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेत हे निश्चितपणे तोट्यात राहिले.
Verse 19
وَلِكُلٍّ دَرَجَـٰتٌ مِّمَّا عَمِلُوا۟ ۖ وَلِيُوَفِّيَهُمْ أَعْمَـٰلَهُمْ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ
Transliteration walikullin darajātun mimmā ʿamilū waliyuwaffiyahum aʿmālahum wahum lā yuẓ'lamūna
Marathi १९. आणि प्रत्येकाला आपापल्या आचरणानुसार दर्जा मिळेल, यासाठी की त्यांना त्यांच्या कर्मांचा पुरेपूर मोबदला द्यावा आणि त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला जाणार नाही.
Verse 20
وَيَوْمَ يُعْرَضُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ عَلَى ٱلنَّارِ أَذْهَبْتُمْ طَيِّبَـٰتِكُمْ فِى حَيَاتِكُمُ ٱلدُّنْيَا وَٱسْتَمْتَعْتُم بِهَا فَٱلْيَوْمَ تُجْزَوْنَ عَذَابَ ٱلْهُونِ بِمَا كُنتُمْ تَسْتَكْبِرُونَ فِى ٱلْأَرْضِ بِغَيْرِ ٱلْحَقِّ وَبِمَا كُنتُمْ تَفْسُقُونَ
Transliteration wayawma yuʿ'raḍu alladhīna kafarū ʿalā l-nāri adhhabtum ṭayyibātikum fī ḥayātikumu l-dun'yā wa-is'tamtaʿtum bihā fal-yawma tuj'zawna ʿadhāba l-hūni bimā kuntum tastakbirūna fī l-arḍi bighayri l-ḥaqi wabimā kuntum tafsuqūna
Marathi २०. आणि ज्या दिवशी काफिरांना जहन्नमच्या किनाऱ्याशी आणले जाईल, (तेव्हा सांगितले जाईल) की तुम्ही आपली सत्कर्मे ऐहिक जीवनातच संपवून टाकलीत आणि त्यांच्यापासून लाभ प्राप्त करून घेतला, तेव्हा आज तुम्हाला अपमानदायक शिक्षा-यातनेचा दंड दिला जाईल, या कारणाने की तुम्ही धरतीवर अहंकार करीत होते आणि या कारणानेही की तुम्ही आदेशाचे पालन करीत नव्हते.
Verse 21
۞ وَٱذْكُرْ أَخَا عَادٍ إِذْ أَنذَرَ قَوْمَهُۥ بِٱلْأَحْقَافِ وَقَدْ خَلَتِ ٱلنُّذُرُ مِنۢ بَيْنِ يَدَيْهِ وَمِنْ خَلْفِهِۦٓ أَلَّا تَعْبُدُوٓا۟ إِلَّا ٱللَّهَ إِنِّىٓ أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
Transliteration wa-udh'kur akhā ʿādin idh andhara qawmahu bil-aḥqāfi waqad khalati l-nudhuru min bayni yadayhi wamin khalfihi allā taʿbudū illā l-laha innī akhāfu ʿalaykum ʿadhāba yawmin ʿaẓīmin
Marathi २१. आणि आदच्या भावाचे स्मरण करा, जेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना अहकाफमध्ये (वाळूच्या टेकडीवर) खबरदार केले, आणि निःसंशय, त्याच्या पूर्वीही भय दाखविणारे होऊन गेलेत आणि त्याच्या नंतरही की तुम्ही अल्लाहखेरीज दुसऱ्यांची उपासना करू नका. निःसंशय, मला तुमच्याबद्दल मोठ्या दिवसाच्या अज़ाबचे भय वाटते.
Verse 22
قَالُوٓا۟ أَجِئْتَنَا لِتَأْفِكَنَا عَنْ ءَالِهَتِنَا فَأْتِنَا بِمَا تَعِدُنَآ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
Transliteration qālū aji'tanā litafikanā ʿan ālihatinā fatinā bimā taʿidunā in kunta mina l-ṣādiqīna
Marathi २२. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की काय तुम्ही आमच्याजवळ अशासाठी आलात की आम्हाला आमच्या दैवतांची पूजा अर्चना करण्यापासून रोखावे, तेव्हा जर तुम्ही सच्चे असाल तर ज्या शिक्षा - यातनां (अज़ाब) चा तुम्ही वायदा करीत आहात, त्या आमच्यावर आणून सोडा.
Verse 23
قَالَ إِنَّمَا ٱلْعِلْمُ عِندَ ٱللَّهِ وَأُبَلِّغُكُم مَّآ أُرْسِلْتُ بِهِۦ وَلَـٰكِنِّىٓ أَرَىٰكُمْ قَوْمًا تَجْهَلُونَ
Transliteration qāla innamā l-ʿil'mu ʿinda l-lahi wa-uballighukum mā ur'sil'tu bihi walākinnī arākum qawman tajhalūna
Marathi २३. (हजरत हूद) म्हणाले, (याचे) ज्ञान तर अल्लाहजवळ आहे. मला तर जो संदेश देऊन पाठविले गेले आहे, तोच तुम्हाला मी पोहचवित आहे, परंतु मी असे पाहतो की तुम्ही मूर्खपणा करीत आहात.
Verse 24
فَلَمَّا رَأَوْهُ عَارِضًا مُّسْتَقْبِلَ أَوْدِيَتِهِمْ قَالُوا۟ هَـٰذَا عَارِضٌ مُّمْطِرُنَا ۚ بَلْ هُوَ مَا ٱسْتَعْجَلْتُم بِهِۦ ۖ رِيحٌ فِيهَا عَذَابٌ أَلِيمٌ
Transliteration falammā ra-awhu ʿāriḍan mus'taqbila awdiyatihim qālū hādhā ʿāriḍun mum'ṭirunā bal huwa mā is'taʿjaltum bihi rīḥun fīhā ʿadhābun alīmun
Marathi २४. मग जेव्हा त्यांनी अज़ाब (शिक्षा - यातने) ला ढगाच्या स्वरूपात पाहिले आपल्या मैदानांकडे येत असलेला, तेव्हा म्हणू लागले की हा ढग आमच्यावर पाऊस पाडणार आहे (नव्हे), किंबहुना, वस्तुतः हा ढग तो (प्रकोप) आहे ज्याची तुम्ही घाई माजवित होते. ही हवा (वादळ) आहे ज्यात दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) आहे.
Verse 25
تُدَمِّرُ كُلَّ شَىْءٍۭ بِأَمْرِ رَبِّهَا فَأَصْبَحُوا۟ لَا يُرَىٰٓ إِلَّا مَسَـٰكِنُهُمْ ۚ كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْقَوْمَ ٱلْمُجْرِمِينَ
Transliteration tudammiru kulla shayin bi-amri rabbihā fa-aṣbaḥū lā yurā illā masākinuhum kadhālika najzī l-qawma l-muj'rimīna
Marathi २५. जी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने, प्रत्येक वस्तूंचा विध्वंस करून टाकील, तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली की त्यांच्या घरांखेरीज दुसरे काही दिसून येत नव्हते. अपराध्यांच्या समूहाला आम्ही अशाच प्रकारे शिक्षा देतो.
Verse 26
وَلَقَدْ مَكَّنَّـٰهُمْ فِيمَآ إِن مَّكَّنَّـٰكُمْ فِيهِ وَجَعَلْنَا لَهُمْ سَمْعًا وَأَبْصَـٰرًا وَأَفْـِٔدَةً فَمَآ أَغْنَىٰ عَنْهُمْ سَمْعُهُمْ وَلَآ أَبْصَـٰرُهُمْ وَلَآ أَفْـِٔدَتُهُم مِّن شَىْءٍ إِذْ كَانُوا۟ يَجْحَدُونَ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration walaqad makkannāhum fīmā in makkannākum fīhi wajaʿalnā lahum samʿan wa-abṣāran wa-afidatan famā aghnā ʿanhum samʿuhum walā abṣāruhum walā afidatuhum min shayin idh kānū yajḥadūna biāyāti l-lahi waḥāqa bihim mā kānū bihi yastahziūna
Marathi २६. आणि निश्चितपणे आम्ही (आदच्या समुदायाला) ते शक्ती-सामर्थ्य प्रदान केले होते, जे तुम्हाला दिलेच नाही आणि आम्ही त्यांना कान, डोळे आणि हृदयेही देऊन ठेवली होती, परंतु त्यांच्या कांनानी, डोळ्यांनी आणि हृदयांनी त्यांना काहीच लाभ पोहचविला नाही. जेव्हा ते अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित असत, तीच त्यांच्यावर उलटली.
Verse 27
وَلَقَدْ أَهْلَكْنَا مَا حَوْلَكُم مِّنَ ٱلْقُرَىٰ وَصَرَّفْنَا ٱلْـَٔايَـٰتِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ
Transliteration walaqad ahlaknā mā ḥawlakum mina l-qurā waṣarrafnā l-āyāti laʿallahum yarjiʿūna
Marathi २७. आणि निःसंशय, आम्ही तुमच्या जवळपास (प्रदेशा) च्या वस्त्यांचा नायनाट करून टाकला, आणि (अनेक प्रकारे) आम्ही आपल्या निशाण्या सादर केल्या, यासाठी की त्यांनी (अल्लाहकडे) वळावे.
Verse 28
فَلَوْلَا نَصَرَهُمُ ٱلَّذِينَ ٱتَّخَذُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ قُرْبَانًا ءَالِهَةًۢ ۖ بَلْ ضَلُّوا۟ عَنْهُمْ ۚ وَذَٰلِكَ إِفْكُهُمْ وَمَا كَانُوا۟ يَفْتَرُونَ
Transliteration falawlā naṣarahumu alladhīna ittakhadhū min dūni l-lahi qur'bānan ālihatan bal ḍallū ʿanhum wadhālika if'kuhum wamā kānū yaftarūna
Marathi २८. तेव्हा अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करण्याकरिता त्यांनी ज्यांना ज्यांना उपास्य (दैवत) बनवून ठेवले होते, त्यांनी त्यांची मदत का नाही केली, किंबहुना ते तर त्यांच्यापासून हरवले गेलेत (वस्तुतः) हे त्यांचे केवळ असत्य आणि (पूर्णतः) मिथ्यारोप होता.
Verse 29
وَإِذْ صَرَفْنَآ إِلَيْكَ نَفَرًا مِّنَ ٱلْجِنِّ يَسْتَمِعُونَ ٱلْقُرْءَانَ فَلَمَّا حَضَرُوهُ قَالُوٓا۟ أَنصِتُوا۟ ۖ فَلَمَّا قُضِىَ وَلَّوْا۟ إِلَىٰ قَوْمِهِم مُّنذِرِينَ
Transliteration wa-idh ṣarafnā ilayka nafaran mina l-jini yastamiʿūna l-qur'āna falammā ḥaḍarūhu qālū anṣitū falammā quḍiya wallaw ilā qawmihim mundhirīna
Marathi २९. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही जिन्नांचा एक समूह तुमच्याकडे वळविला, यासाठी की त्यांनी कुरआन ऐकावे, तर जेव्हा ते पैगंबरांजवळ पोहचले, तेव्हा (एकमेकांना) म्हणू लागले की गप्प राहा. मग जेव्हा पठण समाप्त झाले तेव्हा आपल्या जनसमूहाच्या लोकांना खबरदार करण्याकरिता परतले.
Verse 30
قَالُوا۟ يَـٰقَوْمَنَآ إِنَّا سَمِعْنَا كِتَـٰبًا أُنزِلَ مِنۢ بَعْدِ مُوسَىٰ مُصَدِّقًا لِّمَا بَيْنَ يَدَيْهِ يَهْدِىٓ إِلَى ٱلْحَقِّ وَإِلَىٰ طَرِيقٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration qālū yāqawmanā innā samiʿ'nā kitāban unzila min baʿdi mūsā muṣaddiqan limā bayna yadayhi yahdī ilā l-ḥaqi wa-ilā ṭarīqin mus'taqīmin
Marathi ३०. म्हणाले, हे आमच्या जनसमूहाच्या लोकांनो! आम्ही खात्रीने तो ग्रंथ ऐकला आहे, जो मूसा (अलै.) नंतर अवतरित केला गेला आहे, जो आपल्या पूर्वीच्या ग्रंथाची पुष्टी करणारा आहे, जो सत्य-धर्म आणि सरळ मार्गाकडे मार्गदर्शन करतो.
Verse 31
يَـٰقَوْمَنَآ أَجِيبُوا۟ دَاعِىَ ٱللَّهِ وَءَامِنُوا۟ بِهِۦ يَغْفِرْ لَكُم مِّن ذُنُوبِكُمْ وَيُجِرْكُم مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ
Transliteration yāqawmanā ajībū dāʿiya l-lahi waāminū bihi yaghfir lakum min dhunūbikum wayujir'kum min ʿadhābin alīmin
Marathi ३१. हे आमच्या जातीसमूहाच्या लोकांनो! अल्लाहकडे बोलविणाऱ्याचे म्हणणे मान्य करा, त्याच्यावर ईमान राखा, तर (अल्लाह) तुमचे काही अपराध माफ करील आणि तुम्हाला दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातने) पासून वाचवील.
Verse 32
وَمَن لَّا يُجِبْ دَاعِىَ ٱللَّهِ فَلَيْسَ بِمُعْجِزٍ فِى ٱلْأَرْضِ وَلَيْسَ لَهُۥ مِن دُونِهِۦٓ أَوْلِيَآءُ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration waman lā yujib dāʿiya l-lahi falaysa bimuʿ'jizin fī l-arḍi walaysa lahu min dūnihi awliyāu ulāika fī ḍalālin mubīnin
Marathi ३२. आणि जो मनुष्य अल्लाहकडे बोलविणाऱ्याचे म्हणणे मानणार नाही तर तो जमिनीवर कोठेही (पळून जाऊन अल्लाहला) लाचार करू शकत नाही आणि ना अल्लाहखेरीज त्याला कोणी मदत करणारा असेल, हे लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत.
Verse 33
أَوَلَمْ يَرَوْا۟ أَنَّ ٱللَّهَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَلَمْ يَعْىَ بِخَلْقِهِنَّ بِقَـٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يُحْـِۧىَ ٱلْمَوْتَىٰ ۚ بَلَىٰٓ إِنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration awalam yaraw anna l-laha alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa walam yaʿya bikhalqihinna biqādirin ʿalā an yuḥ'yiya l-mawtā balā innahu ʿalā kulli shayin qadīrun
Marathi ३३. काय ते नाही पाहत की ज्या अल्लाहने आकाशांना व धरतीला निर्माण केले आहे आणि त्यांची निर्मिती करून तो थकला नाही, तो निःसंशय मृतांना जिवंत करण्याचे सामर्थ्य बाळगतो, का नव्हे? निःसंशय, तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
Verse 34
وَيَوْمَ يُعْرَضُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ عَلَى ٱلنَّارِ أَلَيْسَ هَـٰذَا بِٱلْحَقِّ ۖ قَالُوا۟ بَلَىٰ وَرَبِّنَا ۚ قَالَ فَذُوقُوا۟ ٱلْعَذَابَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ
Transliteration wayawma yuʿ'raḍu alladhīna kafarū ʿalā l-nāri alaysa hādhā bil-ḥaqi qālū balā warabbinā qāla fadhūqū l-ʿadhāba bimā kuntum takfurūna
Marathi ३४. आणि ते लोक ज्यांनी कुप्र (इन्कार) केला ज्या दिवशी जहन्नमच्या समोर आणले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) की काय हे सत्य नाही? तेव्हा ते उत्तर देतील की होय, का नव्हे? शपथ आहे आमच्या पालनकर्त्याची (हे अगदी सत्य आहे). (अल्लाह) फर्माविल की आता आपल्या इन्काराच्या मोबदल्यात अज़ाबचा स्वाद चाखा.
Verse 35
فَٱصْبِرْ كَمَا صَبَرَ أُو۟لُوا۟ ٱلْعَزْمِ مِنَ ٱلرُّسُلِ وَلَا تَسْتَعْجِل لَّهُمْ ۚ كَأَنَّهُمْ يَوْمَ يَرَوْنَ مَا يُوعَدُونَ لَمْ يَلْبَثُوٓا۟ إِلَّا سَاعَةً مِّن نَّهَارٍۭ ۚ بَلَـٰغٌ ۚ فَهَلْ يُهْلَكُ إِلَّا ٱلْقَوْمُ ٱلْفَـٰسِقُونَ
Transliteration fa-iṣ'bir kamā ṣabara ulū l-ʿazmi mina l-rusuli walā tastaʿjil lahum ka-annahum yawma yarawna mā yūʿadūna lam yalbathū illā sāʿatan min nahārin balāghun fahal yuh'laku illā l-qawmu l-fāsiqūna
Marathi ३५. तेव्हा (हे पैगंबरा!) तुम्ही असे धैर्य राखा, जसे धैर्य दृढसंकल्प आणि साहस बाळगणाऱ्या पैगंबरांनी राखले, आणि त्यांच्यासाठी (शिक्षा मागण्यात) घाई करू नका. हे ज्या दिवशी तो अज़ाब पाहून घेतील ज्याचा वायदा त्यांना दिला जात आहे, तेव्हा (त्यांना हे जाणवू लागेल की) दिवसाची एक घटिका मात्र (ते जगात) राहिले होते. हे आहे संदेश पोहचविणे. दुराचारी लोकांखेरीज कोणी नष्ट केला जाणार नाही.
Read Surah Al-Ahqaf in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.