Surah Saba in Marathi: translation and audio
Surah 34 · سبإ · Sheba · 54 verses
Surah Saba verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Saba word by word in English.
Verse 1
ٱلْحَمْدُ لِلَّهِ ٱلَّذِى لَهُۥ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ وَلَهُ ٱلْحَمْدُ فِى ٱلْـَٔاخِرَةِ ۚ وَهُوَ ٱلْحَكِيمُ ٱلْخَبِيرُ
Transliteration al-ḥamdu lillahi alladhī lahu mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi walahu l-ḥamdu fī l-ākhirati wahuwa l-ḥakīmu l-khabīru
Marathi १. समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो आकाशांच्या आणि जमिनीच्या समस्त वस्तूंचा स्वामी आहे आणि आखिरतमध्येही प्रशंसा त्याच्याचकरिता आहे. तो (मोठा) हिकमतशाली आणि (पूर्णतः) जाणकार आहे.
Verse 2
يَعْلَمُ مَا يَلِجُ فِى ٱلْأَرْضِ وَمَا يَخْرُجُ مِنْهَا وَمَا يَنزِلُ مِنَ ٱلسَّمَآءِ وَمَا يَعْرُجُ فِيهَا ۚ وَهُوَ ٱلرَّحِيمُ ٱلْغَفُورُ
Transliteration yaʿlamu mā yaliju fī l-arḍi wamā yakhruju min'hā wamā yanzilu mina l-samāi wamā yaʿruju fīhā wahuwa l-raḥīmu l-ghafūru
Marathi २. जे काही जमिनीत दाखल होते आणि जे काही तिच्यातून निघते आणि जे आकाशातून अवतरित होते आणि जे चढून त्यात जाते, ते सर्व काही तो जाणतो, आणि तो मोठा दया करणारा, मोठा माफ करणारा आहे.
Verse 3
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَا تَأْتِينَا ٱلسَّاعَةُ ۖ قُلْ بَلَىٰ وَرَبِّى لَتَأْتِيَنَّكُمْ عَـٰلِمِ ٱلْغَيْبِ ۖ لَا يَعْزُبُ عَنْهُ مِثْقَالُ ذَرَّةٍ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَلَا فِى ٱلْأَرْضِ وَلَآ أَصْغَرُ مِن ذَٰلِكَ وَلَآ أَكْبَرُ إِلَّا فِى كِتَـٰبٍ مُّبِينٍ
Transliteration waqāla alladhīna kafarū lā tatīnā l-sāʿatu qul balā warabbī latatiyannakum ʿālimi l-ghaybi lā yaʿzubu ʿanhu mith'qālu dharratin fī l-samāwāti walā fī l-arḍi walā aṣgharu min dhālika walā akbaru illā fī kitābin mubīnin
Marathi ३. आणि काफिर म्हणतात की आमच्यावर कयामत स्थापित होणार नाही. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याची शपथ! जो अपरोक्ष जाणणारा आहे की ती निश्चितच तुमच्यावर कायम होईल. अल्लाहपासून एका कणाइतकीही वस्तू लपलेली नाही, ना आकाशांमध्ये आणि ना धरतीत, किंबहुना त्याहूनही लहान आणि मोठी सर्व वस्तू (व गोष्टी) एका खुल्या (स्पष्ट) ग्रंथा विद्यमान आहेत.
Verse 4
لِّيَجْزِىَ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ لَهُم مَّغْفِرَةٌ وَرِزْقٌ كَرِيمٌ
Transliteration liyajziya alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti ulāika lahum maghfiratun wariz'qun karīmun
Marathi ४. यासाठी की त्याने (अल्लाहने) ईमान राखणाऱ्या आणि सदाचारी लोकांना चांगला मोबदला प्रदान करावा. हेच ते लोक होत, ज्यांच्याकरिता क्षमा, सन्मानपूर्ण आजिविका आहे.
Verse 5
وَٱلَّذِينَ سَعَوْ فِىٓ ءَايَـٰتِنَا مُعَـٰجِزِينَ أُو۟لَـٰٓئِكَ لَهُمْ عَذَابٌ مِّن رِّجْزٍ أَلِيمٌ
Transliteration wa-alladhīna saʿaw fī āyātinā muʿājizīna ulāika lahum ʿadhābun min rij'zin alīmun
Marathi ५. आणि आमच्या आयतींचा अवमान करण्यात ज्यांनी प्रयत्न केला आहे, तर ते असे लोक आहेत, ज्यांच्यासाठी अतिशय वाईट प्रकारचा सक्त अज़ाब आहे.
Verse 6
وَيَرَى ٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْعِلْمَ ٱلَّذِىٓ أُنزِلَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ هُوَ ٱلْحَقَّ وَيَهْدِىٓ إِلَىٰ صِرَٰطِ ٱلْعَزِيزِ ٱلْحَمِيدِ
Transliteration wayarā alladhīna ūtū l-ʿil'ma alladhī unzila ilayka min rabbika huwa l-ḥaqa wayahdī ilā ṣirāṭi l-ʿazīzi l-ḥamīdi
Marathi ६. आणि ज्यांना ज्ञान आहे ते पाहतील की जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाले आहे ते (परिपूर्ण) सत्य आहे आणि ते अल्लाहचा मार्ग दाखविते जो मोठा वर्चस्वशाली, प्रशंसनीय आहे.
Verse 7
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ هَلْ نَدُلُّكُمْ عَلَىٰ رَجُلٍ يُنَبِّئُكُمْ إِذَا مُزِّقْتُمْ كُلَّ مُمَزَّقٍ إِنَّكُمْ لَفِى خَلْقٍ جَدِيدٍ
Transliteration waqāla alladhīna kafarū hal nadullukum ʿalā rajulin yunabbi-ukum idhā muzziq'tum kulla mumazzaqin innakum lafī khalqin jadīdin
Marathi ७. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, या, आम्ही तुम्हाला एक असा मनुष्य दाखवावा, जो तुम्हाला ही खबर पोहचवित आहे की जेव्हा तुम्ही पूर्णपणे कण कण (चूर चूर) होऊन जाल, तेव्हा तुम्ही पुन्हा एका नव्या जीवनात याल.
Verse 8
أَفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا أَم بِهِۦ جِنَّةٌۢ ۗ بَلِ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ فِى ٱلْعَذَابِ وَٱلضَّلَـٰلِ ٱلْبَعِيدِ
Transliteration aftarā ʿalā l-lahi kadhiban am bihi jinnatun bali alladhīna lā yu'minūna bil-ākhirati fī l-ʿadhābi wal-ḍalāli l-baʿīdi
Marathi ८. (आम्ही नाही सांगत) की स्वतः त्यानेच अल्लाहवर असत्य रचले आहे किंवा त्याला वेड लागले आहे, किंबहुना (खरी गोष्ट अशी) की आखिरतवर ईमान न राखणारेच शिक्षा-यातनेत आणि दूरच्या मार्गभ्रष्टतेत पडले आहेत.
Verse 9
أَفَلَمْ يَرَوْا۟ إِلَىٰ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُم مِّنَ ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ ۚ إِن نَّشَأْ نَخْسِفْ بِهِمُ ٱلْأَرْضَ أَوْ نُسْقِطْ عَلَيْهِمْ كِسَفًا مِّنَ ٱلسَّمَآءِ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّكُلِّ عَبْدٍ مُّنِيبٍ
Transliteration afalam yaraw ilā mā bayna aydīhim wamā khalfahum mina l-samāi wal-arḍi in nasha nakhsif bihimu l-arḍa aw nus'qiṭ ʿalayhim kisafan mina l-samāi inna fī dhālika laāyatan likulli ʿabdin munībin
Marathi ९. तेव्हा काय ते आपल्या पुढे मागे आकाश व धरतीला पाहत नाहीत? जर आम्ही इच्छिले तर त्यांना जमिनीत धसवून टाकू किंवा त्यांच्यावर आकाशाचे तुकडे कोसळवू. निःसंशय यात फार मोठे प्रमाण आहे त्या प्रत्येक दासाकरिता, जो (मनापासून) रुजू करणारा असावा.
Verse 10
۞ وَلَقَدْ ءَاتَيْنَا دَاوُۥدَ مِنَّا فَضْلًا ۖ يَـٰجِبَالُ أَوِّبِى مَعَهُۥ وَٱلطَّيْرَ ۖ وَأَلَنَّا لَهُ ٱلْحَدِيدَ
Transliteration walaqad ātaynā dāwūda minnā faḍlan yājibālu awwibī maʿahu wal-ṭayra wa-alannā lahu l-ḥadīda
Marathi १०. आणि आम्ही दाऊदवर आपली कृपा केली. हे पर्वतांनो! त्यांच्यासोबत (तुम्हीही) माझी तस्बीह (गुणगान) करीत जा आणि पक्ष्यांना देखील (हाच आदेश आहे) आणि आम्ही त्यांच्याकरिता लोखंडास नरम केले.
Verse 11
أَنِ ٱعْمَلْ سَـٰبِغَـٰتٍ وَقَدِّرْ فِى ٱلسَّرْدِ ۖ وَٱعْمَلُوا۟ صَـٰلِحًا ۖ إِنِّى بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
Transliteration ani iʿ'mal sābighātin waqaddir fī l-sardi wa-iʿ'malū ṣāliḥan innī bimā taʿmalūna baṣīrun
Marathi ११. (यासाठी) की तुम्ही पूरे पूरे कवच (चिलखते) बनवा आणि त्यांच्या कड्या ठीक ठीक अनुमानाने राखा आणि तुम्ही सर्व नेकीची कामे करा (विश्वास राखा) मी तुमचे (प्रत्येक) कर्म पाहत आहे.
Verse 12
وَلِسُلَيْمَـٰنَ ٱلرِّيحَ غُدُوُّهَا شَهْرٌ وَرَوَاحُهَا شَهْرٌ ۖ وَأَسَلْنَا لَهُۥ عَيْنَ ٱلْقِطْرِ ۖ وَمِنَ ٱلْجِنِّ مَن يَعْمَلُ بَيْنَ يَدَيْهِ بِإِذْنِ رَبِّهِۦ ۖ وَمَن يَزِغْ مِنْهُمْ عَنْ أَمْرِنَا نُذِقْهُ مِنْ عَذَابِ ٱلسَّعِيرِ
Transliteration walisulaymāna l-rīḥa ghuduwwuhā shahrun warawāḥuhā shahrun wa-asalnā lahu ʿayna l-qiṭ'ri wamina l-jini man yaʿmalu bayna yadayhi bi-idh'ni rabbihi waman yazigh min'hum ʿan amrinā nudhiq'hu min ʿadhābi l-saʿīri
Marathi १२. आणि आम्ही हवेला सुलेमानच्या अधीन केले की सकाळची मजल तिची एक महिन्याची राहात असे आणि संध्याकाळची मजल देखील आणि आम्ही त्यांच्यासाठी तांब्याचा झरा प्रवाहित केला आणि त्यांच्या पालनकर्त्याच्या आदेशाने काही जिन्न देखील, जे त्यांच्या ताब्यात राहून त्यांच्याजवळ काम करीत असत आणि त्यांच्यापैकी जो कोणी आमच्या आदेशाची अवज्ञा करीत असे, आम्ही त्याला भडकत्या आगीच्या अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवित असू.
Verse 13
يَعْمَلُونَ لَهُۥ مَا يَشَآءُ مِن مَّحَـٰرِيبَ وَتَمَـٰثِيلَ وَجِفَانٍ كَٱلْجَوَابِ وَقُدُورٍ رَّاسِيَـٰتٍ ۚ ٱعْمَلُوٓا۟ ءَالَ دَاوُۥدَ شُكْرًا ۚ وَقَلِيلٌ مِّنْ عِبَادِىَ ٱلشَّكُورُ
Transliteration yaʿmalūna lahu mā yashāu min maḥārība watamāthīla wajifānin kal-jawābi waqudūrin rāsiyātin iʿ'malū āla dāwūda shuk'ran waqalīlun min ʿibādiya l-shakūru
Marathi १३. सुलेमान जे काही इच्छित असत ते (जिन्नात) तयार करून देत, जसे किल्ला, चित्र (स्मारक), तलावासारख्या पराती आणि चुलींवर कायम टिकून राहणाऱ्या डेगा (मोठे मोठे पातेले) हे दाऊदच्या वंशजांनो! त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता सत्कर्मे करा, माझ्या दासांपैकी कृतज्ञशील दास फार कमीच असतात.
Verse 14
فَلَمَّا قَضَيْنَا عَلَيْهِ ٱلْمَوْتَ مَا دَلَّهُمْ عَلَىٰ مَوْتِهِۦٓ إِلَّا دَآبَّةُ ٱلْأَرْضِ تَأْكُلُ مِنسَأَتَهُۥ ۖ فَلَمَّا خَرَّ تَبَيَّنَتِ ٱلْجِنُّ أَن لَّوْ كَانُوا۟ يَعْلَمُونَ ٱلْغَيْبَ مَا لَبِثُوا۟ فِى ٱلْعَذَابِ ٱلْمُهِينِ
Transliteration falammā qaḍaynā ʿalayhi l-mawta mā dallahum ʿalā mawtihi illā dābbatu l-arḍi takulu minsa-atahu falammā kharra tabayyanati l-jinu an law kānū yaʿlamūna l-ghayba mā labithū fī l-ʿadhābi l-muhīni
Marathi १४. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावर मृत्युचा आदेश पाठविला, तेव्हा ती खबर (जिन्नांना) कोणीही दिली नाही, वाळवीच्या किड्याखेरीज, जो त्यांची लाठी खात होता. तर जेव्हा (सुलेमान) खाली कोसळले, त्या क्षणी जिन्नांनी जाणून घेतले की जर ते अपरोक्ष ज्ञान बाळगत असते तर या अपमानाच्या शिक्षेत पडून राहिले नसते.१
Verse 15
لَقَدْ كَانَ لِسَبَإٍ فِى مَسْكَنِهِمْ ءَايَةٌ ۖ جَنَّتَانِ عَن يَمِينٍ وَشِمَالٍ ۖ كُلُوا۟ مِن رِّزْقِ رَبِّكُمْ وَٱشْكُرُوا۟ لَهُۥ ۚ بَلْدَةٌ طَيِّبَةٌ وَرَبٌّ غَفُورٌ
Transliteration laqad kāna lisaba-in fī maskanihim āyatun jannatāni ʿan yamīnin washimālin kulū min riz'qi rabbikum wa-ush'kurū lahu baldatun ṭayyibatun warabbun ghafūrun
Marathi १५. सबाच्या जनसमूहाकरिता, त्यांच्या वस्तींमध्येच (अल्लाहच्या सामर्थ्याची) निशाणी होती. त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला दोन बागा होत्या. (आम्ही त्यांना आदेश दिला होता की) आपल्या पालनकर्त्याने प्रदान केलेली आजिविका खा आणि त्याचे आभार मानत राहा. ही स्वच्छ - शुद्ध भूमी आहे आणि पालनकर्ता क्षमाशील आहे.
Verse 16
فَأَعْرَضُوا۟ فَأَرْسَلْنَا عَلَيْهِمْ سَيْلَ ٱلْعَرِمِ وَبَدَّلْنَـٰهُم بِجَنَّتَيْهِمْ جَنَّتَيْنِ ذَوَاتَىْ أُكُلٍ خَمْطٍ وَأَثْلٍ وَشَىْءٍ مِّن سِدْرٍ قَلِيلٍ
Transliteration fa-aʿraḍū fa-arsalnā ʿalayhim sayla l-ʿarimi wabaddalnāhum bijannatayhim jannatayni dhawātay ukulin khamṭin wa-athlin washayin min sid'rin qalīlin
Marathi १६. परंतु त्यांनी तोंड फिरविले, मग आम्ही त्यांच्यावर वेगवान महापुराचे (पाणी) पाठविले आणि त्यांच्या (हिरव्या टवटवीत) बागांऐवजी दोन (अशा) बागा दिल्या, ज्या स्वादात कडवट आणि अधिकांश झाडे-झुडपे आणि काही बोरींची झाडे असलेल्या होत्या.
Verse 17
ذَٰلِكَ جَزَيْنَـٰهُم بِمَا كَفَرُوا۟ ۖ وَهَلْ نُجَـٰزِىٓ إِلَّا ٱلْكَفُورَ
Transliteration dhālika jazaynāhum bimā kafarū wahal nujāzī illā l-kafūra
Marathi १७. आम्ही त्यांच्या कृतघ्नतेचा हा मोबदला त्यांना दिला. आम्ही (अशी सक्त) सजा मोठमोठ्या कृतघ्न लोकांनाच देतो.
Verse 18
وَجَعَلْنَا بَيْنَهُمْ وَبَيْنَ ٱلْقُرَى ٱلَّتِى بَـٰرَكْنَا فِيهَا قُرًى ظَـٰهِرَةً وَقَدَّرْنَا فِيهَا ٱلسَّيْرَ ۖ سِيرُوا۟ فِيهَا لَيَالِىَ وَأَيَّامًا ءَامِنِينَ
Transliteration wajaʿalnā baynahum wabayna l-qurā allatī bāraknā fīhā quran ẓāhiratan waqaddarnā fīhā l-sayra sīrū fīhā layāliya wa-ayyāman āminīna
Marathi १८. आणि आम्ही त्याच्या व त्या वस्तींच्या दरम्यान, ज्यांच्यात आम्ही सुख-समृद्धी प्रदान करून ठेवली होती. काही वस्त्या दुसऱ्या ठेवल्या होत्या, ज्या, मार्गावर दिसून येत होत्या आणि त्यांच्यात चालण्याची (प्रवासाची) ठिकाणे निश्चित केली होती, त्यात रात्री आणि दिवसा शांती सुरक्षापूर्वक हिंडत फिरत राहा.
Verse 19
فَقَالُوا۟ رَبَّنَا بَـٰعِدْ بَيْنَ أَسْفَارِنَا وَظَلَمُوٓا۟ أَنفُسَهُمْ فَجَعَلْنَـٰهُمْ أَحَادِيثَ وَمَزَّقْنَـٰهُمْ كُلَّ مُمَزَّقٍ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ
Transliteration faqālū rabbanā bāʿid bayna asfārinā waẓalamū anfusahum fajaʿalnāhum aḥādītha wamazzaqnāhum kulla mumazzaqin inna fī dhālika laāyātin likulli ṣabbārin shakūrin
Marathi १९. परंतु त्यांनी दुसऱ्यांदा दुआ (प्रार्थना) केली की हे आमच्या पालनकर्त्या! आमचे प्रवास दूर दूरपर्यंत कर आणि ज्याअर्थी त्यांनी स्वतः आपल्या हातांनी आपले वाईट करून घेतले, यास्तव आम्ही त्यांना (जुन्या) कहाणीच्या रूपात करून टाकले२ आणि त्यांचे तुकडे तुकडे करुन टाकलेत३ निःसंशय, प्रत्येक सहनशील आणि कृतज्ञशील माणसाकरिता या (घटने) त अनेक निशाण्या आहेत.
Verse 20
وَلَقَدْ صَدَّقَ عَلَيْهِمْ إِبْلِيسُ ظَنَّهُۥ فَٱتَّبَعُوهُ إِلَّا فَرِيقًا مِّنَ ٱلْمُؤْمِنِينَ
Transliteration walaqad ṣaddaqa ʿalayhim ib'līsu ẓannahu fa-ittabaʿūhu illā farīqan mina l-mu'minīna
Marathi २०. आणि सैतानाने त्यांच्याविषयी आपला इरादा (अनुमान) खरा करून दाखविला, हे लोक (सर्वच्या सर्व) त्याचे अनुयायी बनले, ईमान राखणाऱ्यांच्या एका गटाखेरीज.
Verse 21
وَمَا كَانَ لَهُۥ عَلَيْهِم مِّن سُلْطَـٰنٍ إِلَّا لِنَعْلَمَ مَن يُؤْمِنُ بِٱلْـَٔاخِرَةِ مِمَّنْ هُوَ مِنْهَا فِى شَكٍّ ۗ وَرَبُّكَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ حَفِيظٌ
Transliteration wamā kāna lahu ʿalayhim min sul'ṭānin illā linaʿlama man yu'minu bil-ākhirati mimman huwa min'hā fī shakkin warabbuka ʿalā kulli shayin ḥafīẓun
Marathi २१. आणि सैतानाचा त्यांच्यावर कोणताही दबाव (आणि जोर) नव्हता, परंतु अशासाठी की आम्ही त्या लोकांना, जे आखिरतवर ईमान राखतात, त्या लोकांमध्ये (चांगल्या प्रकारे) जाहीर करावे, जे त्याबाबत संशयग्रस्त आहेत, आणि तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा संरक्षक आहे.
Verse 22
قُلِ ٱدْعُوا۟ ٱلَّذِينَ زَعَمْتُم مِّن دُونِ ٱللَّهِ ۖ لَا يَمْلِكُونَ مِثْقَالَ ذَرَّةٍ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَلَا فِى ٱلْأَرْضِ وَمَا لَهُمْ فِيهِمَا مِن شِرْكٍ وَمَا لَهُۥ مِنْهُم مِّن ظَهِيرٍ
Transliteration quli id'ʿū alladhīna zaʿamtum min dūni l-lahi lā yamlikūna mith'qāla dharratin fī l-samāwāti walā fī l-arḍi wamā lahum fīhimā min shir'kin wamā lahu min'hum min ẓahīrin
Marathi २२. सांगा की अल्लाहखेरीज ज्यांचा ज्यांचा तुम्हाला (उपास्य असण्याचा) भ्रम आहे (त्या सर्वांना) हाक द्या. त्यांच्यापैकी ना कोणाला आकाशांमध्ये आणि धरतीत कणाइतकाही अधिकार आहे, ना त्यांचा या दोघांत कसलाही हिस्सा आहे आणि ना त्यांच्यापैकी कोणी अल्लाहचा सहभागी आहे.
Verse 23
وَلَا تَنفَعُ ٱلشَّفَـٰعَةُ عِندَهُۥٓ إِلَّا لِمَنْ أَذِنَ لَهُۥ ۚ حَتَّىٰٓ إِذَا فُزِّعَ عَن قُلُوبِهِمْ قَالُوا۟ مَاذَا قَالَ رَبُّكُمْ ۖ قَالُوا۟ ٱلْحَقَّ ۖ وَهُوَ ٱلْعَلِىُّ ٱلْكَبِيرُ
Transliteration walā tanfaʿu l-shafāʿatu ʿindahu illā liman adhina lahu ḥattā idhā fuzziʿa ʿan qulūbihim qālū mādhā qāla rabbukum qālū l-ḥaqa wahuwa l-ʿaliyu l-kabīru
Marathi २३. आणि शिफारस (ची दुआ - प्रार्थना) ही त्याच्यासमोर काही लाभ देत नाही, त्यांच्याखेरीज, ज्यांच्यासाठी अनुमानित असावी. येथेपर्यंत की, जेव्हा त्यांच्या हृदयातून भय-दहशत दूर केली जाते, तेव्हा ते विचारतात, तुमच्या पालनकर्त्याने काय सांगितले? उत्तर देतात की खरे सांगितले आणि तो मोठा उच्चतम आणि मोठा महान आहे.
Verse 24
۞ قُلْ مَن يَرْزُقُكُم مِّنَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ قُلِ ٱللَّهُ ۖ وَإِنَّآ أَوْ إِيَّاكُمْ لَعَلَىٰ هُدًى أَوْ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration qul man yarzuqukum mina l-samāwāti wal-arḍi quli l-lahu wa-innā aw iyyākum laʿalā hudan aw fī ḍalālin mubīnin
Marathi २४. त्यांना विचारा की तुम्हाला आकाशामधून आणि जमिनीतून आजिविका कोण पोहचवितो? (स्वतः) उत्तर द्या की (महान) अल्लाह! (ऐका) आम्ही अथवा तुम्ही, एक तर निश्चितपणे मार्गदर्शनावर आहे किंवा उघड मार्गभ्रष्टतेत आहे.
Verse 25
قُل لَّا تُسْـَٔلُونَ عَمَّآ أَجْرَمْنَا وَلَا نُسْـَٔلُ عَمَّا تَعْمَلُونَ
Transliteration qul lā tus'alūna ʿammā ajramnā walā nus'alu ʿammā taʿmalūna
Marathi २५. सांगा की आम्ही केलेल्या अपराधांबाबत तुम्हाला काही विचारले जाणार नाही आणि ना तुमच्या कर्मांसंबंधी आम्हाला विचारले जाईल.
Verse 26
قُلْ يَجْمَعُ بَيْنَنَا رَبُّنَا ثُمَّ يَفْتَحُ بَيْنَنَا بِٱلْحَقِّ وَهُوَ ٱلْفَتَّاحُ ٱلْعَلِيمُ
Transliteration qul yajmaʿu baynanā rabbunā thumma yaftaḥu baynanā bil-ḥaqi wahuwa l-fatāḥu l-ʿalīmu
Marathi २६. (त्यांना) खबरदार करा की आम्हा सर्वांना आमचा पालनकर्ता एकत्र करून मग आमच्या दरम्यान सत्यासह फैसला करील आणि तो फैसला करणारा, सर्व काही जाणणारा आहे.
Verse 27
قُلْ أَرُونِىَ ٱلَّذِينَ أَلْحَقْتُم بِهِۦ شُرَكَآءَ ۖ كَلَّا ۚ بَلْ هُوَ ٱللَّهُ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ
Transliteration qul arūniya alladhīna alḥaqtum bihi shurakāa kallā bal huwa l-lahu l-ʿazīzu l-ḥakīmu
Marathi २७. सांगा की बरे मलाही त्यांना दाखवा, ज्यांना तुम्ही अल्लाहचा सहभागी बनवून त्याच्यासोबत सामील करीत आहात. असे कदापि नाही, किंबहुना तोच अल्लाह आहे, जबरदस्त व हिकमतशाली.
Verse 28
وَمَآ أَرْسَلْنَـٰكَ إِلَّا كَآفَّةً لِّلنَّاسِ بَشِيرًا وَنَذِيرًا وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ
Transliteration wamā arsalnāka illā kāffatan lilnnāsi bashīran wanadhīran walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna
Marathi २८. आणि आम्ही तुम्हाला सर्व लोकांकरिता शुभ समाचार ऐकविणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे, परंतु (खरी गोष्ट अशी की) अधिकांश लोक जाणत नाहीत.
Verse 29
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلْوَعْدُ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration wayaqūlūna matā hādhā l-waʿdu in kuntum ṣādiqīna
Marathi २९. आणि विचारतात की तो वायदा केव्हा पूर्ण होईल? सच्चे असाल तर सांगा.
Verse 30
قُل لَّكُم مِّيعَادُ يَوْمٍ لَّا تَسْتَـْٔخِرُونَ عَنْهُ سَاعَةً وَلَا تَسْتَقْدِمُونَ
Transliteration qul lakum mīʿādu yawmin lā tastakhirūna ʿanhu sāʿatan walā tastaqdimūna
Marathi ३०. उत्तर द्या, वायद्याचा दिवस अगदी निश्चित आहे, ज्यापासून एक क्षण ना तुम्ही मागे हटू शकता, आणि ना पुढे जाऊ शकता.
Verse 31
وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَن نُّؤْمِنَ بِهَـٰذَا ٱلْقُرْءَانِ وَلَا بِٱلَّذِى بَيْنَ يَدَيْهِ ۗ وَلَوْ تَرَىٰٓ إِذِ ٱلظَّـٰلِمُونَ مَوْقُوفُونَ عِندَ رَبِّهِمْ يَرْجِعُ بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ ٱلْقَوْلَ يَقُولُ ٱلَّذِينَ ٱسْتُضْعِفُوا۟ لِلَّذِينَ ٱسْتَكْبَرُوا۟ لَوْلَآ أَنتُمْ لَكُنَّا مُؤْمِنِينَ
Transliteration waqāla alladhīna kafarū lan nu'mina bihādhā l-qur'āni walā bi-alladhī bayna yadayhi walaw tarā idhi l-ẓālimūna mawqūfūna ʿinda rabbihim yarjiʿu baʿḍuhum ilā baʿḍin l-qawla yaqūlu alladhīna us'tuḍ'ʿifū lilladhīna is'takbarū lawlā antum lakunnā mu'minīna
Marathi ३१. आणि काफिर (इन्कारी लोक) म्हणाले, आम्ही तर या कुरआनास मानणारे नाहीत, ना याच्या पूर्वीच्या ग्रंथांना आणि जर तुम्ही पाहिले असते, जेव्हा हे अत्याचारी आपल्या पालनकर्त्यासमोर उभे, एकमेकांवर दोषारोप ठेवत असतील. खालच्या दर्जाचे लोक, उच्च दर्जाच्या लोकांना म्हणतील, जर तुम्ही राहिले नसते तर (खात्रीने) आम्ही ईमान राखणारे असतो.
Verse 32
قَالَ ٱلَّذِينَ ٱسْتَكْبَرُوا۟ لِلَّذِينَ ٱسْتُضْعِفُوٓا۟ أَنَحْنُ صَدَدْنَـٰكُمْ عَنِ ٱلْهُدَىٰ بَعْدَ إِذْ جَآءَكُم ۖ بَلْ كُنتُم مُّجْرِمِينَ
Transliteration qāla alladhīna is'takbarū lilladhīna us'tuḍ'ʿifū anaḥnu ṣadadnākum ʿani l-hudā baʿda idh jāakum bal kuntum muj'rimīna
Marathi ३२. हे उच्च दर्जाचे लोक त्या दुर्बल लोकांना उत्तर देतील की, काय तुमच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला त्यापासून रोखले होते (नाही), उलट तुम्ही (स्वतः) अत्याचारी होते.
Verse 33
وَقَالَ ٱلَّذِينَ ٱسْتُضْعِفُوا۟ لِلَّذِينَ ٱسْتَكْبَرُوا۟ بَلْ مَكْرُ ٱلَّيْلِ وَٱلنَّهَارِ إِذْ تَأْمُرُونَنَآ أَن نَّكْفُرَ بِٱللَّهِ وَنَجْعَلَ لَهُۥٓ أَندَادًا ۚ وَأَسَرُّوا۟ ٱلنَّدَامَةَ لَمَّا رَأَوُا۟ ٱلْعَذَابَ وَجَعَلْنَا ٱلْأَغْلَـٰلَ فِىٓ أَعْنَاقِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ۚ هَلْ يُجْزَوْنَ إِلَّا مَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration waqāla alladhīna us'tuḍ'ʿifū lilladhīna is'takbarū bal makru al-layli wal-nahāri idh tamurūnanā an nakfura bil-lahi wanajʿala lahu andādan wa-asarrū l-nadāmata lammā ra-awū l-ʿadhāba wajaʿalnā l-aghlāla fī aʿnāqi alladhīna kafarū hal yuj'zawna illā mā kānū yaʿmalūna
Marathi ३३. (आणि याला उत्तर देताना) हे दुर्बल लोक त्या घमेंडी लोकांना सांगतील (मुळीच नाही) किंबहुना रात्रंदिवस लबाडीने आम्हाला, अल्लाहसोबत कुप्र करण्यास आणि त्याच्यासोबत सहभागी ठरविण्यास तुमचा आदेश देणे, आमच्या बेईमानीचे कारण ठरले आणि अज़ाबला (शिक्षा-यातनेला) पाहताच सर्वच्या सर्व मनातल्या मनात लज्जित होत असतील आणि काफिरांच्या गळ्यात आम्ही तौक (जोखड) टाकू, त्यांना केवळ त्यांच्या कृतकर्मांचा मोबदला दिला जाईल.
Verse 34
وَمَآ أَرْسَلْنَا فِى قَرْيَةٍ مِّن نَّذِيرٍ إِلَّا قَالَ مُتْرَفُوهَآ إِنَّا بِمَآ أُرْسِلْتُم بِهِۦ كَـٰفِرُونَ
Transliteration wamā arsalnā fī qaryatin min nadhīrin illā qāla mut'rafūhā innā bimā ur'sil'tum bihi kāfirūna
Marathi ३४. आणि आम्ही ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तेव्हा तिथल्या सुखसंपन्न अवस्थेच्या लोकांनी हेच म्हटले की ज्या गोष्टीसह तुम्ही पाठविले गेले आहात, आम्ही त्याचा इन्कार करणारे आहोत.
Verse 35
وَقَالُوا۟ نَحْنُ أَكْثَرُ أَمْوَٰلًا وَأَوْلَـٰدًا وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ
Transliteration waqālū naḥnu aktharu amwālan wa-awlādan wamā naḥnu bimuʿadhabīna
Marathi ३५. आणि म्हणाले की आम्ही धन-संपत्ती आणि संतती अधिक बाळगतो आणि आम्हाला अज़ाब (शिक्षा - यातना) दिलीच जाणार नाही.
Verse 36
قُلْ إِنَّ رَبِّى يَبْسُطُ ٱلرِّزْقَ لِمَن يَشَآءُ وَيَقْدِرُ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ
Transliteration qul inna rabbī yabsuṭu l-riz'qa liman yashāu wayaqdiru walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna
Marathi ३६. सांगा की माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (संकुचित) करतो, परंतु बहुतेक लोक हे जाणत नाहीत.
Verse 37
وَمَآ أَمْوَٰلُكُمْ وَلَآ أَوْلَـٰدُكُم بِٱلَّتِى تُقَرِّبُكُمْ عِندَنَا زُلْفَىٰٓ إِلَّا مَنْ ءَامَنَ وَعَمِلَ صَـٰلِحًا فَأُو۟لَـٰٓئِكَ لَهُمْ جَزَآءُ ٱلضِّعْفِ بِمَا عَمِلُوا۟ وَهُمْ فِى ٱلْغُرُفَـٰتِ ءَامِنُونَ
Transliteration wamā amwālukum walā awlādukum bi-allatī tuqarribukum ʿindanā zul'fā illā man āmana waʿamila ṣāliḥan fa-ulāika lahum jazāu l-ḍiʿ'fi bimā ʿamilū wahum fī l-ghurufāti āminūna
Marathi ३७. आणि तुमची धन-संपत्ती आणि संतती अशी गोष्ट नव्हे की तुम्हाला आमच्याजवळ (दर्जांनी) निकट करील, परंतु ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी त्यांच्या सत्कर्मांचा दुप्पट मोबदला आहे आणि ते निर्भय आणि समाधानी होऊन उंच महालांमध्ये राहतील.
Verse 38
وَٱلَّذِينَ يَسْعَوْنَ فِىٓ ءَايَـٰتِنَا مُعَـٰجِزِينَ أُو۟لَـٰٓئِكَ فِى ٱلْعَذَابِ مُحْضَرُونَ
Transliteration wa-alladhīna yasʿawna fī āyātinā muʿājizīna ulāika fī l-ʿadhābi muḥ'ḍarūna
Marathi ३८. आणि जे लोक आमच्या आयतींना अवमानित करण्याच्या धावपळीत मग्न राहतात तर अशाच लोकांना अज़ाब (शिक्षा-यातना) ग्रस्त करून हजर केले जाईल.
Verse 39
قُلْ إِنَّ رَبِّى يَبْسُطُ ٱلرِّزْقَ لِمَن يَشَآءُ مِنْ عِبَادِهِۦ وَيَقْدِرُ لَهُۥ ۚ وَمَآ أَنفَقْتُم مِّن شَىْءٍ فَهُوَ يُخْلِفُهُۥ ۖ وَهُوَ خَيْرُ ٱلرَّٰزِقِينَ
Transliteration qul inna rabbī yabsuṭu l-riz'qa liman yashāu min ʿibādihi wayaqdiru lahu wamā anfaqtum min shayin fahuwa yukh'lifuhu wahuwa khayru l-rāziqīna
Marathi ३९. सांगा की माझा पालनकर्ता आपल्या दासांपैकी ज्याच्यासाठी इच्छितो रोजी (आजिविका) व्यापक करतो, आणि ज्याच्यासाठी इच्छितो तंग (मोजून मापून) देतो आणि तुम्ही जे काही अल्लाहच्या मार्गात खर्च कराल, अल्लाह त्याचा (पुरेपूर) मोबदला प्रदान करील. तो तर सर्वांत उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करणारा आहे.
Verse 40
وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ يَقُولُ لِلْمَلَـٰٓئِكَةِ أَهَـٰٓؤُلَآءِ إِيَّاكُمْ كَانُوا۟ يَعْبُدُونَ
Transliteration wayawma yaḥshuruhum jamīʿan thumma yaqūlu lil'malāikati ahāulāi iyyākum kānū yaʿbudūna
Marathi ४०. आणि त्या सर्वांना अल्लाह त्या दिवशी एकत्र करून फरिश्त्यांना विचारेल, काय हे लोक तुमची उपासना करीत होते?
Verse 41
قَالُوا۟ سُبْحَـٰنَكَ أَنتَ وَلِيُّنَا مِن دُونِهِم ۖ بَلْ كَانُوا۟ يَعْبُدُونَ ٱلْجِنَّ ۖ أَكْثَرُهُم بِهِم مُّؤْمِنُونَ
Transliteration qālū sub'ḥānaka anta waliyyunā min dūnihim bal kānū yaʿbudūna l-jina aktharuhum bihim mu'minūna
Marathi ४१. ते म्हणतील, तू पवित्र आहेस, आणि आमचा मित्र - संरक्षक तर तू आहेस, हे लोक नव्हेत. हे तर जिन्नांची उपासना करत होते. यांच्यापैकी बहुतेकांचे त्यांच्यावरच ईमान होते.
Verse 42
فَٱلْيَوْمَ لَا يَمْلِكُ بَعْضُكُمْ لِبَعْضٍ نَّفْعًا وَلَا ضَرًّا وَنَقُولُ لِلَّذِينَ ظَلَمُوا۟ ذُوقُوا۟ عَذَابَ ٱلنَّارِ ٱلَّتِى كُنتُم بِهَا تُكَذِّبُونَ
Transliteration fal-yawma lā yamliku baʿḍukum libaʿḍin nafʿan walā ḍarran wanaqūlu lilladhīna ẓalamū dhūqū ʿadhāba l-nāri allatī kuntum bihā tukadhibūna
Marathi ४२. तेव्हा आज तुमच्यापैकी कोणीही, कोणाच्याहीकरिता (कशाही प्रकारे) लाभ - हानी (पोहचविण्या) चा मालक नसेल आणि आम्ही अत्याचारींना सांगू की त्या आगीची गोडी चाखा, जिला तुम्ही खोटे ठरवित राहिले.
Verse 43
وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُنَا بَيِّنَـٰتٍ قَالُوا۟ مَا هَـٰذَآ إِلَّا رَجُلٌ يُرِيدُ أَن يَصُدَّكُمْ عَمَّا كَانَ يَعْبُدُ ءَابَآؤُكُمْ وَقَالُوا۟ مَا هَـٰذَآ إِلَّآ إِفْكٌ مُّفْتَرًى ۚ وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلْحَقِّ لَمَّا جَآءَهُمْ إِنْ هَـٰذَآ إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ
Transliteration wa-idhā tut'lā ʿalayhim āyātunā bayyinātin qālū mā hādhā illā rajulun yurīdu an yaṣuddakum ʿammā kāna yaʿbudu ābāukum waqālū mā hādhā illā if'kun muf'taran waqāla alladhīna kafarū lil'ḥaqqi lammā jāahum in hādhā illā siḥ'run mubīnun
Marathi ४३. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या स्पष्ट आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा म्हणतात की हा असा मनुष्य आहे, जो तुम्हाला, तुमच्या वाडवडिलांच्या उपास्य दैवतांपासून रोखू इच्छितो (याखेरीज आणखी काही नाही) आणि असे म्हणतात की हा तर मनाने रचलेला आरोप आहे, आणि सत्य त्यांच्याजवळ येऊन पोहोचले तरीही इन्कार करणारे हेच म्हणत राहिले की ही तर उघड जादू आहे!
Verse 44
وَمَآ ءَاتَيْنَـٰهُم مِّن كُتُبٍ يَدْرُسُونَهَا ۖ وَمَآ أَرْسَلْنَآ إِلَيْهِمْ قَبْلَكَ مِن نَّذِيرٍ
Transliteration wamā ātaynāhum min kutubin yadrusūnahā wamā arsalnā ilayhim qablaka min nadhīrin
Marathi ४४. आणि या (मक्काच्या रहिवाशां) ना, आम्ही ना ग्रंथ प्रदान करून ठेवले आहेत, ज्यांना हे वाचत असावेत आणि ना त्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी खबरदार करणारा आला.
Verse 45
وَكَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ وَمَا بَلَغُوا۟ مِعْشَارَ مَآ ءَاتَيْنَـٰهُمْ فَكَذَّبُوا۟ رُسُلِى ۖ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ
Transliteration wakadhaba alladhīna min qablihim wamā balaghū miʿ'shāra mā ātaynāhum fakadhabū rusulī fakayfa kāna nakīri
Marathi ४५. आणि यांच्यापूर्वीच्या लोकांनीही आमच्या गोष्टींना खोटे ठरविले होते. आणि त्यांना आम्ही जे देऊन ठेवले होते, त्याच्या दहाव्या हिश्श्यापर्यंतही हे पोहचले नाहीत. तेव्हा, त्यांनी माझ्या पैगंबरांना खोटे ठरविले, (मग पाहा) माझ्या शिक्षा यातनेची किती (कठोर) अवस्था झाली.१
Verse 46
۞ قُلْ إِنَّمَآ أَعِظُكُم بِوَٰحِدَةٍ ۖ أَن تَقُومُوا۟ لِلَّهِ مَثْنَىٰ وَفُرَٰدَىٰ ثُمَّ تَتَفَكَّرُوا۟ ۚ مَا بِصَاحِبِكُم مِّن جِنَّةٍ ۚ إِنْ هُوَ إِلَّا نَذِيرٌ لَّكُم بَيْنَ يَدَىْ عَذَابٍ شَدِيدٍ
Transliteration qul innamā aʿiẓukum biwāḥidatin an taqūmū lillahi mathnā wafurādā thumma tatafakkarū mā biṣāḥibikum min jinnatin in huwa illā nadhīrun lakum bayna yaday ʿadhābin shadīdin
Marathi ४६. सांगा की मी तुम्हाला केवळ एकाच गोष्टीचा उपदेश करतो की तुम्ही अल्लाहकरिता (प्रामाणिकपणे, हट्ट सोडून) दोन दोन मिळून किंवा एकट्या एकट्याने उभे राहून विचार तर करा. तुमच्या या साथीदाराला काही वेड वगैरे लागले नाही. तो तर तुम्हाला एका मोठ्या (सक्त) शिक्षा - यातनेच्या येण्यापूर्वी सावध करणारा आहे.
Verse 47
قُلْ مَا سَأَلْتُكُم مِّنْ أَجْرٍ فَهُوَ لَكُمْ ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَى ٱللَّهِ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ شَهِيدٌ
Transliteration qul mā sa-altukum min ajrin fahuwa lakum in ajriya illā ʿalā l-lahi wahuwa ʿalā kulli shayin shahīdun
Marathi ४७. सांगा की जो मोबदला मी तुमच्याकडून मागेन, तो तुमच्याकरिता आहे. माझा मोबदला देण्याची जबाबदारी अल्लाहवर आहे, आणि तो प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे.
Verse 48
قُلْ إِنَّ رَبِّى يَقْذِفُ بِٱلْحَقِّ عَلَّـٰمُ ٱلْغُيُوبِ
Transliteration qul inna rabbī yaqdhifu bil-ḥaqi ʿallāmu l-ghuyūbi
Marathi ४८. सांगा, माझा पालनकर्ता सत्य (वहयी) अवतरित करतो. तो प्रत्येक लपलेली गोष्ट (गैब) जाणणारा आहे.
Verse 49
قُلْ جَآءَ ٱلْحَقُّ وَمَا يُبْدِئُ ٱلْبَـٰطِلُ وَمَا يُعِيدُ
Transliteration qul jāa l-ḥaqu wamā yub'di-u l-bāṭilu wamā yuʿīdu
Marathi ४९. सांगा, सत्य येऊन पोहोचले. असत्याने ना पहिल्यांदा डोके वर काढले आणि ना दुसऱ्यांदा डोके वर काढू शकेल.
Verse 50
قُلْ إِن ضَلَلْتُ فَإِنَّمَآ أَضِلُّ عَلَىٰ نَفْسِى ۖ وَإِنِ ٱهْتَدَيْتُ فَبِمَا يُوحِىٓ إِلَىَّ رَبِّىٓ ۚ إِنَّهُۥ سَمِيعٌ قَرِيبٌ
Transliteration qul in ḍalaltu fa-innamā aḍillu ʿalā nafsī wa-ini ih'tadaytu fabimā yūḥī ilayya rabbī innahu samīʿun qarībun
Marathi ५०. सांगा की जर मी मार्गभ्रष्ट होईन तर माझ्या मार्गभ्रष्टतेचे (संकट) माझ्यावरच आहे आणि जर मी सत्य मार्गावर आहे तर त्या वहयीमुळे जिला माझा पालनकर्ता माझ्यावर अवतरित करतो. तो मोठा ऐकणारा, अतिशय निकट आहे.
Verse 51
وَلَوْ تَرَىٰٓ إِذْ فَزِعُوا۟ فَلَا فَوْتَ وَأُخِذُوا۟ مِن مَّكَانٍ قَرِيبٍ
Transliteration walaw tarā idh faziʿū falā fawta wa-ukhidhū min makānin qarībin
Marathi ५१. आणि जर तुम्ही (ती वेळ) पाहाल जेव्हा हे काफिर घाबरलेल्या स्थितीत फिरतील, मग पळून निघून जाण्याची कोणतीही अवस्था (मार्ग) नसेल आणि जवळच्या ठिकाणाहून धरले जातील.
Verse 52
وَقَالُوٓا۟ ءَامَنَّا بِهِۦ وَأَنَّىٰ لَهُمُ ٱلتَّنَاوُشُ مِن مَّكَانٍۭ بَعِيدٍ
Transliteration waqālū āmannā bihi wa-annā lahumu l-tanāwushu min makānin baʿīdin
Marathi ५२. आणि त्या वेळी म्हणतील की आम्ही या (कुरआना) वर इमान राखले आहे, परंतु एवढ्या दूरच्या (अपेक्षित वस्तू) कशी हाती येऊ शकते?
Verse 53
وَقَدْ كَفَرُوا۟ بِهِۦ مِن قَبْلُ ۖ وَيَقْذِفُونَ بِٱلْغَيْبِ مِن مَّكَانٍۭ بَعِيدٍ
Transliteration waqad kafarū bihi min qablu wayaqdhifūna bil-ghaybi min makānin baʿīdin
Marathi ५३. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी याचा इन्कार केला होता आणि लांबूनच न पाहता अटकळीचे तीर चालवित राहिले.
Verse 54
وَحِيلَ بَيْنَهُمْ وَبَيْنَ مَا يَشْتَهُونَ كَمَا فُعِلَ بِأَشْيَاعِهِم مِّن قَبْلُ ۚ إِنَّهُمْ كَانُوا۟ فِى شَكٍّ مُّرِيبٍۭ
Transliteration waḥīla baynahum wabayna mā yashtahūna kamā fuʿila bi-ashyāʿihim min qablu innahum kānū fī shakkin murībin
Marathi ५४. आणि त्यांच्या व त्यांच्या इच्छा आकांक्षांच्या दरम्यान आड पडदा टाकला गेला, ज्या प्रकारे यापूर्वीही यांच्यासारख्यांशी केले गेले ते देखील (यांच्याप्रमाणेच) शंका संशयात पडले होते.
Read Surah Saba in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.