MyDugsiStart learning

Surah An-Najm in Marathi: translation and audio

Surah 53 · النجم · The Star · 62 verses

Surah An-Najm verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah An-Najm word by word in English.

Verse 1

وَٱلنَّجْمِ إِذَا هَوَىٰ

Transliteration wal-najmi idhā hawā

Marathi १. ताऱ्याची शपथ आहे, जेव्हा तो कोसळेल.

Verse 2

مَا ضَلَّ صَاحِبُكُمْ وَمَا غَوَىٰ

Transliteration mā ḍalla ṣāḥibukum wamā ghawā

Marathi २. की तुमचा साथीदार ना वाट चुकलेला आहे, ना तो वाकड्या मार्गावर आहे.

Verse 3

وَمَا يَنطِقُ عَنِ ٱلْهَوَىٰٓ

Transliteration wamā yanṭiqu ʿani l-hawā

Marathi ३. आणि ना आपल्या मर्जीने तो काही बोलतो.

Verse 4

إِنْ هُوَ إِلَّا وَحْىٌ يُوحَىٰ

Transliteration in huwa illā waḥyun yūḥā

Marathi ४. ती तर केवळ वहयी (आकाशवाणी) आहे, जी अवतरित केली जाते.

Verse 5

عَلَّمَهُۥ شَدِيدُ ٱلْقُوَىٰ

Transliteration ʿallamahu shadīdu l-quwā

Marathi ५. त्याला पूर्ण सामर्थ्यशाली फरिश्त्याने शिकविले आहे.

Verse 6

ذُو مِرَّةٍ فَٱسْتَوَىٰ

Transliteration dhū mirratin fa-is'tawā

Marathi ६. जो मोठा शक्तिशाली आहे, मग तो सरळ उभा राहिला.

Verse 7

وَهُوَ بِٱلْأُفُقِ ٱلْأَعْلَىٰ

Transliteration wahuwa bil-ufuqi l-aʿlā

Marathi ७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता.

Verse 8

ثُمَّ دَنَا فَتَدَلَّىٰ

Transliteration thumma danā fatadallā

Marathi ८. मग जवळ आला आणि अवतरला.

Verse 9

فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ

Transliteration fakāna qāba qawsayni aw adnā

Marathi ९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी.

Verse 10

فَأَوْحَىٰٓ إِلَىٰ عَبْدِهِۦ مَآ أَوْحَىٰ

Transliteration fa-awḥā ilā ʿabdihi mā awḥā

Marathi १०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला.

Verse 11

مَا كَذَبَ ٱلْفُؤَادُ مَا رَأَىٰٓ

Transliteration mā kadhaba l-fuādu mā raā

Marathi ११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले.

Verse 12

أَفَتُمَـٰرُونَهُۥ عَلَىٰ مَا يَرَىٰ

Transliteration afatumārūnahu ʿalā mā yarā

Marathi १२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात.

Verse 13

وَلَقَدْ رَءَاهُ نَزْلَةً أُخْرَىٰ

Transliteration walaqad raāhu nazlatan ukh'rā

Marathi १३. त्याला तर आणखी एका वेळी पाहिले होते.

Verse 14

عِندَ سِدْرَةِ ٱلْمُنتَهَىٰ

Transliteration ʿinda sid'rati l-muntahā

Marathi १४. ‘सिदरतुल मुन्तहा’च्या जवळ.

Verse 15

عِندَهَا جَنَّةُ ٱلْمَأْوَىٰٓ

Transliteration ʿindahā jannatu l-mawā

Marathi १५. त्याच्याच निकट ‘जन्नतुल मावा’ आहे.

Verse 16

إِذْ يَغْشَى ٱلسِّدْرَةَ مَا يَغْشَىٰ

Transliteration idh yaghshā l-sid'rata mā yaghshā

Marathi १६. जेव्हा सिदरला लपवून घेत होती, ती वस्तू, जी त्यावर आच्छादित होत होती.

Verse 17

مَا زَاغَ ٱلْبَصَرُ وَمَا طَغَىٰ

Transliteration mā zāgha l-baṣaru wamā ṭaghā

Marathi १७. ना तर दृष्टी वळली, ना मर्यादेच्या पुढे गेली.

Verse 18

لَقَدْ رَأَىٰ مِنْ ءَايَـٰتِ رَبِّهِ ٱلْكُبْرَىٰٓ

Transliteration laqad raā min āyāti rabbihi l-kub'rā

Marathi १८. निश्चितच त्याने आपल्या पालनकर्त्याच्या मोठमोठ्या निशाण्यांपैकी काही निशाण्या पाहिल्या होत्या.

Verse 19

أَفَرَءَيْتُمُ ٱللَّـٰتَ وَٱلْعُزَّىٰ

Transliteration afara-aytumu l-lāta wal-ʿuzā

Marathi १९. काय तुम्ही ‘लात’ आणि ‘उज्जा’ला पाहिले?

Verse 20

وَمَنَوٰةَ ٱلثَّالِثَةَ ٱلْأُخْرَىٰٓ

Transliteration wamanata l-thālithata l-ukh'rā

Marathi २०. आणि तिसऱ्या अंतिम ‘मनात’ला?१

Verse 21

أَلَكُمُ ٱلذَّكَرُ وَلَهُ ٱلْأُنثَىٰ

Transliteration alakumu l-dhakaru walahu l-unthā

Marathi २१. काय तुमच्यासाठी पुत्र आणि त्या (अल्लाह) साठी कन्या आहेत?

Verse 22

تِلْكَ إِذًا قِسْمَةٌ ضِيزَىٰٓ

Transliteration til'ka idhan qis'matun ḍīzā

Marathi २२. ही तर मोठी अन्यायपूर्ण वाटणी आहे!

Verse 23

إِنْ هِىَ إِلَّآ أَسْمَآءٌ سَمَّيْتُمُوهَآ أَنتُمْ وَءَابَآؤُكُم مَّآ أَنزَلَ ٱللَّهُ بِهَا مِن سُلْطَـٰنٍ ۚ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا ٱلظَّنَّ وَمَا تَهْوَى ٱلْأَنفُسُ ۖ وَلَقَدْ جَآءَهُم مِّن رَّبِّهِمُ ٱلْهُدَىٰٓ

Transliteration in hiya illā asmāon sammaytumūhā antum waābāukum mā anzala l-lahu bihā min sul'ṭānin in yattabiʿūna illā l-ẓana wamā tahwā l-anfusu walaqad jāahum min rabbihimu l-hudā

Marathi २३. वास्तविक ती केवळ नावे आहेत, जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी त्यांना ठेवली आहेत. अल्लाहने त्यांची कोणतीही सनद अवतरित केली नाही. हे लोक तर केवळ अटकळ (भ्रम) आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांमागे लागले आहेत. आणि निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे त्यांच्याजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचले आहे.

Verse 24

أَمْ لِلْإِنسَـٰنِ مَا تَمَنَّىٰ

Transliteration am lil'insāni mā tamannā

Marathi २४. काय प्रत्येक मनुष्य जी कामना देखील करील ती त्याला साध्य होईल?

Verse 25

فَلِلَّهِ ٱلْـَٔاخِرَةُ وَٱلْأُولَىٰ

Transliteration falillahi l-ākhiratu wal-ūlā

Marathi २५. अल्लाहकरिताच आहे हे विश्व आणि ती आखिरत.

Verse 26

۞ وَكَم مِّن مَّلَكٍ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ لَا تُغْنِى شَفَـٰعَتُهُمْ شَيْـًٔا إِلَّا مِنۢ بَعْدِ أَن يَأْذَنَ ٱللَّهُ لِمَن يَشَآءُ وَيَرْضَىٰٓ

Transliteration wakam min malakin fī l-samāwāti lā tugh'nī shafāʿatuhum shayan illā min baʿdi an yadhana l-lahu liman yashāu wayarḍā

Marathi २६. आणखी कितीतरी फरिश्ते आकाशांमध्ये आहेत, ज्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की अल्लाह आपल्या इच्छेने व आपल्या खुशीने ज्याला इच्छिल आज्ञा (अनुमती) देईल.१

Verse 27

إِنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ لَيُسَمُّونَ ٱلْمَلَـٰٓئِكَةَ تَسْمِيَةَ ٱلْأُنثَىٰ

Transliteration inna alladhīna lā yu'minūna bil-ākhirati layusammūna l-malāikata tasmiyata l-unthā

Marathi २७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात.

Verse 28

وَمَا لَهُم بِهِۦ مِنْ عِلْمٍ ۖ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا ٱلظَّنَّ ۖ وَإِنَّ ٱلظَّنَّ لَا يُغْنِى مِنَ ٱلْحَقِّ شَيْـًٔا

Transliteration wamā lahum bihi min ʿil'min in yattabiʿūna illā l-ẓana wa-inna l-ẓana lā yugh'nī mina l-ḥaqi shayan

Marathi २८. वास्तविक त्यांना याचे काहीच ज्ञान नाही. ते केवळ आपल्या भ्रमाच्या मागे लागले आहेत आणि निःसंशय, भ्रम (आणि अनुमान) सत्यासमोर काहीच उपयोगी पडत नाही.

Verse 29

فَأَعْرِضْ عَن مَّن تَوَلَّىٰ عَن ذِكْرِنَا وَلَمْ يُرِدْ إِلَّا ٱلْحَيَوٰةَ ٱلدُّنْيَا

Transliteration fa-aʿriḍ ʿan man tawallā ʿan dhik'rinā walam yurid illā l-ḥayata l-dun'yā

Marathi २९. तेव्हा तुम्ही त्याच्याकडून तोंड फिरवून घ्या, जो आमच्या स्मरणांपासून तोंड फिरविल आणि ज्यांचा उद्देश केवळ ऐहिक जीवनाखेरीज काही नसावा.

Verse 30

ذَٰلِكَ مَبْلَغُهُم مِّنَ ٱلْعِلْمِ ۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِۦ وَهُوَ أَعْلَمُ بِمَنِ ٱهْتَدَىٰ

Transliteration dhālika mablaghuhum mina l-ʿil'mi inna rabbaka huwa aʿlamu biman ḍalla ʿan sabīlihi wahuwa aʿlamu bimani ih'tadā

Marathi ३०. हीच त्यांच्या ज्ञानाची सीमा आहे. तुमचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्या मार्गापासून विचलित झाला आहे आणि तोच चांगल्या प्रकारे जाणतो त्याला देखील, जो सन्मार्गावर आहे.

Verse 31

وَلِلَّهِ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ لِيَجْزِىَ ٱلَّذِينَ أَسَـٰٓـُٔوا۟ بِمَا عَمِلُوا۟ وَيَجْزِىَ ٱلَّذِينَ أَحْسَنُوا۟ بِٱلْحُسْنَى

Transliteration walillahi mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi liyajziya alladhīna asāū bimā ʿamilū wayajziya alladhīna aḥsanū bil-ḥus'nā

Marathi ३१. आणि अल्लाहचेच आहे, जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे, यासाठी की त्याने (अल्लाहने) दुष्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा मोबदला द्यावा आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला द्यावा.

Verse 32

ٱلَّذِينَ يَجْتَنِبُونَ كَبَـٰٓئِرَ ٱلْإِثْمِ وَٱلْفَوَٰحِشَ إِلَّا ٱللَّمَمَ ۚ إِنَّ رَبَّكَ وَٰسِعُ ٱلْمَغْفِرَةِ ۚ هُوَ أَعْلَمُ بِكُمْ إِذْ أَنشَأَكُم مِّنَ ٱلْأَرْضِ وَإِذْ أَنتُمْ أَجِنَّةٌ فِى بُطُونِ أُمَّهَـٰتِكُمْ ۖ فَلَا تُزَكُّوٓا۟ أَنفُسَكُمْ ۖ هُوَ أَعْلَمُ بِمَنِ ٱتَّقَىٰٓ

Transliteration alladhīna yajtanibūna kabāira l-ith'mi wal-fawāḥisha illā l-lamama inna rabbaka wāsiʿu l-maghfirati huwa aʿlamu bikum idh ansha-akum mina l-arḍi wa-idh antum ajinnatun fī buṭūni ummahātikum falā tuzakkū anfusakum huwa aʿlamu bimani ittaqā

Marathi ३२. जे लोक मोठमोठे अपराध आणि उघड निर्लज्जतेच्या कृत्यांपासून दूर राहतात, याखेरीज की काही लहान सहान अपराध त्यांच्याकडून घडतात, निःसंशय, (अशा लोकांसाठी) तुमच्या पालनकर्त्याची क्षमाशीलता अति विशाल आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, जेव्हा त्याने तुम्हाला जमिनीतून निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या मातांच्या गर्भात मूल (अर्भक) होते तेव्हा तुम्ही आपले पावित्र्य स्वतः सांगू नका. तोच नेक - सदाचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.

Verse 33

أَفَرَءَيْتَ ٱلَّذِى تَوَلَّىٰ

Transliteration afara-ayta alladhī tawallā

Marathi ३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले,

Verse 34

وَأَعْطَىٰ قَلِيلًا وَأَكْدَىٰٓ

Transliteration wa-aʿṭā qalīlan wa-akdā

Marathi ३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला.

Verse 35

أَعِندَهُۥ عِلْمُ ٱلْغَيْبِ فَهُوَ يَرَىٰٓ

Transliteration aʿindahu ʿil'mu l-ghaybi fahuwa yarā

Marathi ३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे?

Verse 36

أَمْ لَمْ يُنَبَّأْ بِمَا فِى صُحُفِ مُوسَىٰ

Transliteration am lam yunabba bimā fī ṣuḥufi mūsā

Marathi ३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती.

Verse 37

وَإِبْرَٰهِيمَ ٱلَّذِى وَفَّىٰٓ

Transliteration wa-ib'rāhīma alladhī waffā

Marathi ३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती.

Verse 38

أَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ

Transliteration allā taziru wāziratun wiz'ra ukh'rā

Marathi ३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही.

Verse 39

وَأَن لَّيْسَ لِلْإِنسَـٰنِ إِلَّا مَا سَعَىٰ

Transliteration wa-an laysa lil'insāni illā mā saʿā

Marathi ३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला.

Verse 40

وَأَنَّ سَعْيَهُۥ سَوْفَ يُرَىٰ

Transliteration wa-anna saʿyahu sawfa yurā

Marathi ४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल.

Verse 41

ثُمَّ يُجْزَىٰهُ ٱلْجَزَآءَ ٱلْأَوْفَىٰ

Transliteration thumma yuj'zāhu l-jazāa l-awfā

Marathi ४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल.

Verse 42

وَأَنَّ إِلَىٰ رَبِّكَ ٱلْمُنتَهَىٰ

Transliteration wa-anna ilā rabbika l-muntahā

Marathi ४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे.

Verse 43

وَأَنَّهُۥ هُوَ أَضْحَكَ وَأَبْكَىٰ

Transliteration wa-annahu huwa aḍḥaka wa-abkā

Marathi ४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो.

Verse 44

وَأَنَّهُۥ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا

Transliteration wa-annahu huwa amāta wa-aḥyā

Marathi ४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो.

Verse 45

وَأَنَّهُۥ خَلَقَ ٱلزَّوْجَيْنِ ٱلذَّكَرَ وَٱلْأُنثَىٰ

Transliteration wa-annahu khalaqa l-zawjayni l-dhakara wal-unthā

Marathi ४५. आणि हे की त्यानेच जोडा अर्थात नर - मादी निर्माण केला.

Verse 46

مِن نُّطْفَةٍ إِذَا تُمْنَىٰ

Transliteration min nuṭ'fatin idhā tum'nā

Marathi ४६. वीर्यापासून जेव्हा तो टपकविला जातो.

Verse 47

وَأَنَّ عَلَيْهِ ٱلنَّشْأَةَ ٱلْأُخْرَىٰ

Transliteration wa-anna ʿalayhi l-nashata l-ukh'rā

Marathi ४७. आणि हे की दुसऱ्यांदा जिवंत करणे त्याचीच जबाबदारी आहे.

Verse 48

وَأَنَّهُۥ هُوَ أَغْنَىٰ وَأَقْنَىٰ

Transliteration wa-annahu huwa aghnā wa-aqnā

Marathi ४८. आणि हे की तोच धनवान बनवितो आणि धन देतो.

Verse 49

وَأَنَّهُۥ هُوَ رَبُّ ٱلشِّعْرَىٰ

Transliteration wa-annahu huwa rabbu l-shiʿ'rā

Marathi ४९. आणि हे की तोच शेअरा (ताऱ्या) चा स्वामी व पालनकर्ता आहे.

Verse 50

وَأَنَّهُۥٓ أَهْلَكَ عَادًا ٱلْأُولَىٰ

Transliteration wa-annahu ahlaka ʿādan l-ūlā

Marathi ५०. आणि हे की त्यानेच पहिल्या आदला नष्ट केले आहे,

Verse 51

وَثَمُودَا۟ فَمَآ أَبْقَىٰ

Transliteration wathamūdā famā abqā

Marathi ५१. आणि समूदला देखील, (ज्यापैकी) एकालाही शिल्लक ठेवले नाही.

Verse 52

وَقَوْمَ نُوحٍ مِّن قَبْلُ ۖ إِنَّهُمْ كَانُوا۟ هُمْ أَظْلَمَ وَأَطْغَىٰ

Transliteration waqawma nūḥin min qablu innahum kānū hum aẓlama wa-aṭghā

Marathi ५२. आणि त्याच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाला. निःसंशय, ते मोठे अत्याचारी आणि उध्दट लोक होते.

Verse 53

وَٱلْمُؤْتَفِكَةَ أَهْوَىٰ

Transliteration wal-mu'tafikata ahwā

Marathi ५३. आणि ‘मुतफिका’ (शहर किंवा पालथ्या पडलेल्या वस्त्यांना) त्यानेच पालथे घातले.

Verse 54

فَغَشَّىٰهَا مَا غَشَّىٰ

Transliteration faghashāhā mā ghashā

Marathi ५४. मग त्यांच्यावर आच्छादित केले, जे काही आच्छादित केले.

Verse 55

فَبِأَىِّ ءَالَآءِ رَبِّكَ تَتَمَارَىٰ

Transliteration fabi-ayyi ālāi rabbika tatamārā

Marathi ५५. तेव्हा हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या कृपा देणगी (नेमत) बद्दल वाद करशील?

Verse 56

هَـٰذَا نَذِيرٌ مِّنَ ٱلنُّذُرِ ٱلْأُولَىٰٓ

Transliteration hādhā nadhīrun mina l-nudhuri l-ūlā

Marathi ५६. हे (पैगंबर) खबरदार करणारे आहेत, पूर्वी होऊन गेलेल्या खबरदार करणाऱ्यांपैकी.

Verse 57

أَزِفَتِ ٱلْـَٔازِفَةُ

Transliteration azifati l-āzifatu

Marathi ५७. येणारी वेळ (घटिका) जवळ येऊन ठेपली आहे.

Verse 58

لَيْسَ لَهَا مِن دُونِ ٱللَّهِ كَاشِفَةٌ

Transliteration laysa lahā min dūni l-lahi kāshifatun

Marathi ५८. अल्लाहशिवाय तिला जाहीर करणारा अन्य कोणी नाही.

Verse 59

أَفَمِنْ هَـٰذَا ٱلْحَدِيثِ تَعْجَبُونَ

Transliteration afamin hādhā l-ḥadīthi taʿjabūna

Marathi ५९. तेव्हा काय तुम्ही या गोष्टीवर आश्चर्य करता?

Verse 60

وَتَضْحَكُونَ وَلَا تَبْكُونَ

Transliteration wataḍḥakūna walā tabkūna

Marathi ६०. आणि हसत आहात, रडत नाही?

Verse 61

وَأَنتُمْ سَـٰمِدُونَ

Transliteration wa-antum sāmidūna

Marathi ६१. (किंबहुना) तुम्ही खेळत आहात!

Verse 62

فَٱسْجُدُوا۟ لِلَّهِ وَٱعْبُدُوا۟ ۩

Transliteration fa-us'judū lillahi wa-uʿ'budū

Marathi ६२. आता अल्लाहसमोर सजदे करा (माथा टेका) आणि (त्याचीच) उपासना करा.

Read Surah An-Najm in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.