MyDugsiStart learning

Surah Al-Anbya in Marathi: translation and audio

Surah 21 · الأنبياء · The Prophets · 112 verses

Surah Al-Anbya verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Anbya word by word in English.

Verse 1

ٱقْتَرَبَ لِلنَّاسِ حِسَابُهُمْ وَهُمْ فِى غَفْلَةٍ مُّعْرِضُونَ

Transliteration iq'taraba lilnnāsi ḥisābuhum wahum fī ghaflatin muʿ'riḍūna

Marathi १. लोकांच्या हिशोबाची वेळ जवळ येऊन पोहोचली आहे. तरीही ते गफलती (च्या अवस्थे) त तोंड फिरवून आहेत.

Verse 2

مَا يَأْتِيهِم مِّن ذِكْرٍ مِّن رَّبِّهِم مُّحْدَثٍ إِلَّا ٱسْتَمَعُوهُ وَهُمْ يَلْعَبُونَ

Transliteration mā yatīhim min dhik'rin min rabbihim muḥ'dathin illā is'tamaʿūhu wahum yalʿabūna

Marathi २. त्यांच्याजवळ, त्यांच्या पालनकर्त्यातर्फे ज्या देखील नवनवीन शिकवणी येतात, त्यांना ते खेळण्या बागडण्यातच ऐकतात.

Verse 3

لَاهِيَةً قُلُوبُهُمْ ۗ وَأَسَرُّوا۟ ٱلنَّجْوَى ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ هَلْ هَـٰذَآ إِلَّا بَشَرٌ مِّثْلُكُمْ ۖ أَفَتَأْتُونَ ٱلسِّحْرَ وَأَنتُمْ تُبْصِرُونَ

Transliteration lāhiyatan qulūbuhum wa-asarrū l-najwā alladhīna ẓalamū hal hādhā illā basharun mith'lukum afatatūna l-siḥ'ra wa-antum tub'ṣirūna

Marathi ३. त्यांची मने पूर्णतः गाफील आहेत आणि त्या अत्याचारींनी हळू हळू कानगोष्टी केल्यात की तो तुमच्यासारखाच मनुष्य आहे, मग तुम्ही डोळ्यांदेखत जादूला बळी पडण्याचे कारण काय?

Verse 4

قَالَ رَبِّى يَعْلَمُ ٱلْقَوْلَ فِى ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ ۖ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ

Transliteration qāla rabbī yaʿlamu l-qawla fī l-samāi wal-arḍi wahuwa l-samīʿu l-ʿalīmu

Marathi ४. (पैगंबर) म्हणाले, माझा पालनकर्ता आकाशात व धरतीत असलेल्या प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो. तो खूप खूप ऐकणारा आणि जाणणारा आहे.

Verse 5

بَلْ قَالُوٓا۟ أَضْغَـٰثُ أَحْلَـٰمٍۭ بَلِ ٱفْتَرَىٰهُ بَلْ هُوَ شَاعِرٌ فَلْيَأْتِنَا بِـَٔايَةٍ كَمَآ أُرْسِلَ ٱلْأَوَّلُونَ

Transliteration bal qālū aḍghāthu aḥlāmin bali if'tarāhu bal huwa shāʿirun falyatinā biāyatin kamā ur'sila l-awalūna

Marathi ५. (एवढेच नव्हे तर) हे असेही म्हणतात की हा कुरआन गोंधळपूर्ण स्वप्नांचा संग्रह आहे, किंबहुना त्याने स्वतःच रचून घेतला आहे, किंबहुना तो कवी आहे अन्यथा त्याने आमच्यासमोर एखादी अशी निशाणी आणली असती, जसे पूर्वीच्या काळातील पैगंबर पाठविले गेले होते.

Verse 6

مَآ ءَامَنَتْ قَبْلَهُم مِّن قَرْيَةٍ أَهْلَكْنَـٰهَآ ۖ أَفَهُمْ يُؤْمِنُونَ

Transliteration mā āmanat qablahum min qaryatin ahlaknāhā afahum yu'minūna

Marathi ६. यांच्यापूर्वी जेवढ्या वस्त्या आम्ही नष्ट केल्या, त्या ईमानधारक नव्हत्या, तेव्हा आता काय हे ईमान राखतील?

Verse 7

وَمَآ أَرْسَلْنَا قَبْلَكَ إِلَّا رِجَالًا نُّوحِىٓ إِلَيْهِمْ ۖ فَسْـَٔلُوٓا۟ أَهْلَ ٱلذِّكْرِ إِن كُنتُمْ لَا تَعْلَمُونَ

Transliteration wamā arsalnā qablaka illā rijālan nūḥī ilayhim fasalū ahla l-dhik'ri in kuntum lā taʿlamūna

Marathi ७. तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर आम्ही पाठविले, ते सर्व मानव होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) अवतरित करीत असू तेव्हा तुम्ही ज्ञानी लोकांना विचारा, जर स्वतः तुम्हाला ज्ञान नसेल.

Verse 8

وَمَا جَعَلْنَـٰهُمْ جَسَدًا لَّا يَأْكُلُونَ ٱلطَّعَامَ وَمَا كَانُوا۟ خَـٰلِدِينَ

Transliteration wamā jaʿalnāhum jasadan lā yakulūna l-ṭaʿāma wamā kānū khālidīna

Marathi ८. आणि आम्ही त्यांना असे शरीर दिले नव्हते की भोजन करीत नसावेत आणि ना ते सदैव जिवंत राहणारे होते.

Verse 9

ثُمَّ صَدَقْنَـٰهُمُ ٱلْوَعْدَ فَأَنجَيْنَـٰهُمْ وَمَن نَّشَآءُ وَأَهْلَكْنَا ٱلْمُسْرِفِينَ

Transliteration thumma ṣadaqnāhumu l-waʿda fa-anjaynāhum waman nashāu wa-ahlaknā l-mus'rifīna

Marathi ९. मग आम्ही त्यांच्याशी केलेले सर्व वायदे खरे करून दाखविले, त्यांना आणि ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिले मुक्ती दिली आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना नष्ट करून टाकले.

Verse 10

لَقَدْ أَنزَلْنَآ إِلَيْكُمْ كِتَـٰبًا فِيهِ ذِكْرُكُمْ ۖ أَفَلَا تَعْقِلُونَ

Transliteration laqad anzalnā ilaykum kitāban fīhi dhik'rukum afalā taʿqilūna

Marathi १०. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे ग्रंथ अवतरित केला आहे, ज्यात तुमच्यासाठी बोध- उपदेश आहे. मग काय तरीही तुम्ही अकलेचा वापर करीत नाही?

Verse 11

وَكَمْ قَصَمْنَا مِن قَرْيَةٍ كَانَتْ ظَالِمَةً وَأَنشَأْنَا بَعْدَهَا قَوْمًا ءَاخَرِينَ

Transliteration wakam qaṣamnā min qaryatin kānat ẓālimatan wa-anshanā baʿdahā qawman ākharīna

Marathi ११. आणि अनेक अत्याचारी वस्तींना आम्ही नष्ट करून टाकले, मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरा जनसमूह निर्माण केला.

Verse 12

فَلَمَّآ أَحَسُّوا۟ بَأْسَنَآ إِذَا هُم مِّنْهَا يَرْكُضُونَ

Transliteration falammā aḥassū basanā idhā hum min'hā yarkuḍūna

Marathi १२. जेव्हा त्या लोकांनी आमच्या शिक्षा- यातनेची जाणीव करून घेतली तेव्हा त्याच्या प्रकोपापासून दूर पळू लागले.

Verse 13

لَا تَرْكُضُوا۟ وَٱرْجِعُوٓا۟ إِلَىٰ مَآ أُتْرِفْتُمْ فِيهِ وَمَسَـٰكِنِكُمْ لَعَلَّكُمْ تُسْـَٔلُونَ

Transliteration lā tarkuḍū wa-ir'jiʿū ilā mā ut'rif'tum fīhi wamasākinikum laʿallakum tus'alūna

Marathi १३. धावपळ करू नका आणि जिथे तुम्हाला सुख प्रदान केले गेले होते, तिथेच परत जा आणि आपल्या घरांकडे जा, यासाठी की तुम्हाला विचारणा केली जावी.

Verse 14

قَالُوا۟ يَـٰوَيْلَنَآ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِينَ

Transliteration qālū yāwaylanā innā kunnā ẓālimīna

Marathi १४. ते म्हणाले, आमचे वाईट होवो, निःसंशय आम्ही अत्याचारी होतो.

Verse 15

فَمَا زَالَت تِّلْكَ دَعْوَىٰهُمْ حَتَّىٰ جَعَلْنَـٰهُمْ حَصِيدًا خَـٰمِدِينَ

Transliteration famā zālat til'ka daʿwāhum ḥattā jaʿalnāhum ḥaṣīdan khāmidīna

Marathi १५. मग तर ते असेच म्हणत राहिले, येथपर्यंत की आम्ही त्यांना मुळासकट कापलेल्या शेतीसारखे आणि विझलेल्या आगीसारखे करून टाकले.

Verse 16

وَمَا خَلَقْنَا ٱلسَّمَآءَ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا لَـٰعِبِينَ

Transliteration wamā khalaqnā l-samāa wal-arḍa wamā baynahumā lāʿibīna

Marathi १६. आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ- तमाशाकरिता बनविले नाही.

Verse 17

لَوْ أَرَدْنَآ أَن نَّتَّخِذَ لَهْوًا لَّٱتَّخَذْنَـٰهُ مِن لَّدُنَّآ إِن كُنَّا فَـٰعِلِينَ

Transliteration law aradnā an nattakhidha lahwan la-ittakhadhnāhu min ladunnā in kunnā fāʿilīna

Marathi १७. जर आम्ही अशाच प्रकारे खेळ- तमाशा इच्छिला असता तर तो आपल्या जवळूनच बनविला असता, जर आम्ही असे करणारे असतो.

Verse 18

بَلْ نَقْذِفُ بِٱلْحَقِّ عَلَى ٱلْبَـٰطِلِ فَيَدْمَغُهُۥ فَإِذَا هُوَ زَاهِقٌ ۚ وَلَكُمُ ٱلْوَيْلُ مِمَّا تَصِفُونَ

Transliteration bal naqdhifu bil-ḥaqi ʿalā l-bāṭili fayadmaghuhu fa-idhā huwa zāhiqun walakumu l-waylu mimmā taṣifūna

Marathi १८. किंबहुना आम्ही सत्याला असत्यावर फेकून मारतो तेव्हा सत्य असत्याचा शिरच्छेद करते आणि ते त्याच क्षणी नाश पावते. तुम्ही ज्या गोष्टी रचता, त्या तुमच्यासाठी विनाशकारक आहेत.

Verse 19

وَلَهُۥ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَمَنْ عِندَهُۥ لَا يَسْتَكْبِرُونَ عَنْ عِبَادَتِهِۦ وَلَا يَسْتَحْسِرُونَ

Transliteration walahu man fī l-samāwāti wal-arḍi waman ʿindahu lā yastakbirūna ʿan ʿibādatihi walā yastaḥsirūna

Marathi १९. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, त्या (अल्लाह) चेच आहे आणि जे त्याच्या निकट आहेत ते त्याच्या उपासनेपासून ना विद्रोह करतात आणि ना थकतात.

Verse 20

يُسَبِّحُونَ ٱلَّيْلَ وَٱلنَّهَارَ لَا يَفْتُرُونَ

Transliteration yusabbiḥūna al-layla wal-nahāra lā yafturūna

Marathi २०. ते दिवस-रात्र त्याच्या पावित्र्याचे वर्णन करतात आणि किंचितही सुस्ती करत नाहीत.

Verse 21

أَمِ ٱتَّخَذُوٓا۟ ءَالِهَةً مِّنَ ٱلْأَرْضِ هُمْ يُنشِرُونَ

Transliteration ami ittakhadhū ālihatan mina l-arḍi hum yunshirūna

Marathi २१. त्या लोकांनी धरतीच्या (सृष्ट निर्मिती) मधून ज्यांना उपास्य बनवून ठेवले आहे, काय ते जिवंत करतात?

Verse 22

لَوْ كَانَ فِيهِمَآ ءَالِهَةٌ إِلَّا ٱللَّهُ لَفَسَدَتَا ۚ فَسُبْحَـٰنَ ٱللَّهِ رَبِّ ٱلْعَرْشِ عَمَّا يَصِفُونَ

Transliteration law kāna fīhimā ālihatun illā l-lahu lafasadatā fasub'ḥāna l-lahi rabbi l-ʿarshi ʿammā yaṣifūna

Marathi २२. जर आकाशात आणि धरतीत अल्लाहखेरीज दुसरीही उपास्ये असती तर या दोघांची उलटापालट झाली असती.१ तेव्हा अल्लाह अर्श (ईसिंहासना) चा स्वामी, त्या गुणवैशिट्यांपासून पवित्र आहे ज्या हे मूर्तीपूजक बोलतात.

Verse 23

لَا يُسْـَٔلُ عَمَّا يَفْعَلُ وَهُمْ يُسْـَٔلُونَ

Transliteration lā yus'alu ʿammā yafʿalu wahum yus'alūna

Marathi २३. आपल्या कामांकरिता तो (कोणासमोर) उत्तरयायी नाही, मात्र सर्वांना (त्याच्यासमोर) जाब द्यावा लागणार आहे.

Verse 24

أَمِ ٱتَّخَذُوا۟ مِن دُونِهِۦٓ ءَالِهَةً ۖ قُلْ هَاتُوا۟ بُرْهَـٰنَكُمْ ۖ هَـٰذَا ذِكْرُ مَن مَّعِىَ وَذِكْرُ مَن قَبْلِى ۗ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ ٱلْحَقَّ ۖ فَهُم مُّعْرِضُونَ

Transliteration ami ittakhadhū min dūnihi ālihatan qul hātū bur'hānakum hādhā dhik'ru man maʿiya wadhik'ru man qablī bal aktharuhum lā yaʿlamūna l-ḥaqa fahum muʿ'riḍūna

Marathi २४. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसरी उपास्ये बनवून घेतली आहेत, त्यांना सांगा, आणा, आपला पुरावा सादर करा. हा आहे माझ्यासोबत असलेल्यांचा ग्रंथ आणि माझ्यापूर्वीच्या लोकांचा पुरावा! परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक सत्यापासून अनभिज्ञ आहेत, याच कारणास्तव तोंड फिरवून आहेत.

Verse 25

وَمَآ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ مِن رَّسُولٍ إِلَّا نُوحِىٓ إِلَيْهِ أَنَّهُۥ لَآ إِلَـٰهَ إِلَّآ أَنَا۠ فَٱعْبُدُونِ

Transliteration wamā arsalnā min qablika min rasūlin illā nūḥī ilayhi annahu lā ilāha illā anā fa-uʿ'budūni

Marathi २५. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो देखील पैगंबर पाठविला, त्याच्याकडे हीच वहयी (ईशवाणी) अवतरित केली की माझ्याखेरीज कोणीही खराखुरा उपास्य नाही, तेव्हा तुम्ही सर्व माझीच उपासना करा.

Verse 26

وَقَالُوا۟ ٱتَّخَذَ ٱلرَّحْمَـٰنُ وَلَدًا ۗ سُبْحَـٰنَهُۥ ۚ بَلْ عِبَادٌ مُّكْرَمُونَ

Transliteration waqālū ittakhadha l-raḥmānu waladan sub'ḥānahu bal ʿibādun muk'ramūna

Marathi २६. आणि अनेकेश्वरवादी म्हणतात, रहमान (दयावंत अल्लाह) ला संतती आहे. (मुळीच नाही.) तो पवित्र आहे. किंबहुना ते (ज्यांना हे त्याचे पुत्र समजतात) त्याचे प्रतिष्ठित दास आहेत.

Verse 27

لَا يَسْبِقُونَهُۥ بِٱلْقَوْلِ وَهُم بِأَمْرِهِۦ يَعْمَلُونَ

Transliteration lā yasbiqūnahu bil-qawli wahum bi-amrihi yaʿmalūna

Marathi २७. त्याच्या (अल्लाहच्या) समोर पुढे होऊन बोलण्याचे साहस करीत नाही आणि त्याच्या आदेशाचे पालन करतात.

Verse 28

يَعْلَمُ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَلَا يَشْفَعُونَ إِلَّا لِمَنِ ٱرْتَضَىٰ وَهُم مِّنْ خَشْيَتِهِۦ مُشْفِقُونَ

Transliteration yaʿlamu mā bayna aydīhim wamā khalfahum walā yashfaʿūna illā limani ir'taḍā wahum min khashyatihi mush'fiqūna

Marathi २८. तो (अल्लाह) त्यांच्यापूर्वीच्या आणि नंतरच्या सर्व अवस्था जाणून आहे. आणि ते कोणाचीही शिफारस करीत नाही, त्याच्याखेरीज, ज्याच्याशी तो (अल्लहा) प्रसन्न असेल, ते तर स्वतः भयकंपित राहतात.

Verse 29

۞ وَمَن يَقُلْ مِنْهُمْ إِنِّىٓ إِلَـٰهٌ مِّن دُونِهِۦ فَذَٰلِكَ نَجْزِيهِ جَهَنَّمَ ۚ كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلظَّـٰلِمِينَ

Transliteration waman yaqul min'hum innī ilāhun min dūnihi fadhālika najzīhi jahannama kadhālika najzī l-ẓālimīna

Marathi २९. आणि त्यांच्यापैकी कोणी जर सांगेल की अल्लाहखेरीज मी इलाह (पूजनीय) आहे तर आम्ही त्याला जहन्नमची शिक्षा देऊ. जुलमी व अत्याचारींना आम्ही अशाच प्रकारे शिक्षा देतो.

Verse 30

أَوَلَمْ يَرَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ أَنَّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ كَانَتَا رَتْقًا فَفَتَقْنَـٰهُمَا ۖ وَجَعَلْنَا مِنَ ٱلْمَآءِ كُلَّ شَىْءٍ حَىٍّ ۖ أَفَلَا يُؤْمِنُونَ

Transliteration awalam yara alladhīna kafarū anna l-samāwāti wal-arḍa kānatā ratqan fafataqnāhumā wajaʿalnā mina l-māi kulla shayin ḥayyin afalā yu'minūna

Marathi ३०. काय इन्कार करणाऱ्यांनी हे नाही पाहिले की (हे) आकाश व धर्ताी (सर्व) आपसात जुळलेले होते, मग आम्ही त्यांना वेगळे वेगळे केले आणि प्रत्येक सजीवाला आम्ही पाण्यापासून निर्माण केले, मग काय हे लोक तरीही विश्वास करत नाहीत?

Verse 31

وَجَعَلْنَا فِى ٱلْأَرْضِ رَوَٰسِىَ أَن تَمِيدَ بِهِمْ وَجَعَلْنَا فِيهَا فِجَاجًا سُبُلًا لَّعَلَّهُمْ يَهْتَدُونَ

Transliteration wajaʿalnā fī l-arḍi rawāsiya an tamīda bihim wajaʿalnā fīhā fijājan subulan laʿallahum yahtadūna

Marathi ३१. आणि आम्ही जमिनीवर पर्वत रचले, यासाठी की तिने ईशनिर्मितीला हलवू न शकावे आणि आम्ही तिच्यात त्यांच्या दरम्यान रुंद रस्ते बनविले, यासाठी की लोकांना मार्ग लाभू शकावा.

Verse 32

وَجَعَلْنَا ٱلسَّمَآءَ سَقْفًا مَّحْفُوظًا ۖ وَهُمْ عَنْ ءَايَـٰتِهَا مُعْرِضُونَ

Transliteration wajaʿalnā l-samāa saqfan maḥfūẓan wahum ʿan āyātihā muʿ'riḍūna

Marathi ३२. आणि आकाशाला आम्ही एक सुरक्षित छत बनविले आहे. परंतु हे लोक त्याच्या निशाण्यांवर लक्ष देत नाही.

Verse 33

وَهُوَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلَّيْلَ وَٱلنَّهَارَ وَٱلشَّمْسَ وَٱلْقَمَرَ ۖ كُلٌّ فِى فَلَكٍ يَسْبَحُونَ

Transliteration wahuwa alladhī khalaqa al-layla wal-nahāra wal-shamsa wal-qamara kullun fī falakin yasbaḥūna

Marathi ३३. आणि तोच (अल्लाह) आहे, ज्याने रात्र व दिवसाला आणि सूर्य व चंद्राला बनविले. त्यांच्यापैकी प्रत्येक आपापल्या कक्षेत तरंगत आहे.१

Verse 34

وَمَا جَعَلْنَا لِبَشَرٍ مِّن قَبْلِكَ ٱلْخُلْدَ ۖ أَفَإِي۟ن مِّتَّ فَهُمُ ٱلْخَـٰلِدُونَ

Transliteration wamā jaʿalnā libasharin min qablika l-khul'da afa-in mitta fahumu l-khālidūna

Marathi ३४. आणि तुमच्यापूर्वी आम्ही कोणत्याही माणसाला चिरसजीवता दिली नाही, मग काय, जर तुम्ही मरण पावला तर हे सदैव काळ इथे राहतील? १

Verse 35

كُلُّ نَفْسٍ ذَآئِقَةُ ٱلْمَوْتِ ۗ وَنَبْلُوكُم بِٱلشَّرِّ وَٱلْخَيْرِ فِتْنَةً ۖ وَإِلَيْنَا تُرْجَعُونَ

Transliteration kullu nafsin dhāiqatu l-mawti wanablūkum bil-shari wal-khayri fit'natan wa-ilaynā tur'jaʿūna

Marathi ३५. प्रत्येक जीवाला मृत्युचा स्वाद चाखायचा आहे आणि आम्ही कसोटी घेण्याकरिता तुम्हाला चांगल्या- वाईट अवस्थेत टाकतो आणि तुम्ही सर्वच्या सर्व आमच्याचकडे परतून याल.

Verse 36

وَإِذَا رَءَاكَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَـٰذَا ٱلَّذِى يَذْكُرُ ءَالِهَتَكُمْ وَهُم بِذِكْرِ ٱلرَّحْمَـٰنِ هُمْ كَـٰفِرُونَ

Transliteration wa-idhā raāka alladhīna kafarū in yattakhidhūnaka illā huzuwan ahādhā alladhī yadhkuru ālihatakum wahum bidhik'ri l-raḥmāni hum kāfirūna

Marathi ३६. आणि ज्या लोकांनी कुप्र (अविश्वास) केला, ते जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुमची थट्टा उडवितात (सांगतात) की, हाच काय तो, जो तुमच्या दैवतांची चर्चा वाईटरित्या करतो? मात्र ते स्वतःच रहमान (दयावान अल्लाह) चा उल्लेख (महिमागान) करण्यास इन्कार करतात.

Verse 37

خُلِقَ ٱلْإِنسَـٰنُ مِنْ عَجَلٍ ۚ سَأُو۟رِيكُمْ ءَايَـٰتِى فَلَا تَسْتَعْجِلُونِ

Transliteration khuliqa l-insānu min ʿajalin sa-urīkum āyātī falā tastaʿjilūni

Marathi ३७. मानव जन्मजात उतावळा आहे. मी तुम्हाला आपल्या निशाण्या (चिन्हे) लवकरच दाखविन. तुम्ही माझ्याशी घाई करू नका.

Verse 38

وَيَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلْوَعْدُ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ

Transliteration wayaqūlūna matā hādhā l-waʿdu in kuntum ṣādiqīna

Marathi ३८. आणि म्हणतात की जर खरे असाल तर सांगा की तो वायदा (शिक्षा-यातनेचा) केव्हा पूर्ण होईल?

Verse 39

لَوْ يَعْلَمُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ حِينَ لَا يَكُفُّونَ عَن وُجُوهِهِمُ ٱلنَّارَ وَلَا عَن ظُهُورِهِمْ وَلَا هُمْ يُنصَرُونَ

Transliteration law yaʿlamu alladhīna kafarū ḥīna lā yakuffūna ʿan wujūhihimu l-nāra walā ʿan ẓuhūrihim walā hum yunṣarūna

Marathi ३९. जर या काफीर लोकांना जाणीव असती की त्या वेळी ना तर हे आगीला आपल्या चेहऱ्यांवरून हटवू शकतील आणि ना आपल्या पाठीवरून आणि ना यांची मदत केली जाईल.

Verse 40

بَلْ تَأْتِيهِم بَغْتَةً فَتَبْهَتُهُمْ فَلَا يَسْتَطِيعُونَ رَدَّهَا وَلَا هُمْ يُنظَرُونَ

Transliteration bal tatīhim baghtatan fatabhatuhum falā yastaṭīʿūna raddahā walā hum yunẓarūna

Marathi ४०. होय! वायद्याची वेळ (कयामतचा दिवस) त्यांच्याजवळ अचानक येऊन पोहोचेल आणि त्यांना आश्चर्यचकित करून सोडेल, मग ना तर हे ती वेळ टाळू शकतील आणि ना त्यांना किंचितही सवड दिली जाईल.

Verse 41

وَلَقَدِ ٱسْتُهْزِئَ بِرُسُلٍ مِّن قَبْلِكَ فَحَاقَ بِٱلَّذِينَ سَخِرُوا۟ مِنْهُم مَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ

Transliteration walaqadi us'tuh'zi-a birusulin min qablika faḥāqa bi-alladhīna sakhirū min'hum mā kānū bihi yastahziūna

Marathi ४१. आणि तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचीही थट्टा उडविली गेली तर ज्यांनी थट्टा उडवली, त्यांना त्याच गोष्टीने येऊन घेरले, जिची ते थट्टा उडवित होते.

Verse 42

قُلْ مَن يَكْلَؤُكُم بِٱلَّيْلِ وَٱلنَّهَارِ مِنَ ٱلرَّحْمَـٰنِ ۗ بَلْ هُمْ عَن ذِكْرِ رَبِّهِم مُّعْرِضُونَ

Transliteration qul man yakla-ukum bi-al-layli wal-nahāri mina l-raḥmāni bal hum ʿan dhik'ri rabbihim muʿ'riḍūna

Marathi ४२. त्यांना विचारा की रहमान (दयाळू अल्लाह) पासून रात्रंदिवस तुमचे रक्षण कोण करू शकतो? किंबहुना हे आपल्या पालनकर्त्याचे स्मरण (महिमागान) करण्यापासून परावृत्त झाले आहेत.

Verse 43

أَمْ لَهُمْ ءَالِهَةٌ تَمْنَعُهُم مِّن دُونِنَا ۚ لَا يَسْتَطِيعُونَ نَصْرَ أَنفُسِهِمْ وَلَا هُم مِّنَّا يُصْحَبُونَ

Transliteration am lahum ālihatun tamnaʿuhum min dūninā lā yastaṭīʿūna naṣra anfusihim walā hum minnā yuṣ'ḥabūna

Marathi ४३. काय आमच्याखेरीज त्यांचा दुसरा कोणी उपास्य आहे, जो त्यांना संकटापासून वाचवित असेल. कोणीही स्वतः आपली मदत करण्याचे सामर्थ्य बाळगत नाही आणि ना कोणी आमच्या विरोधात साथ देऊ शकतो.

Verse 44

بَلْ مَتَّعْنَا هَـٰٓؤُلَآءِ وَءَابَآءَهُمْ حَتَّىٰ طَالَ عَلَيْهِمُ ٱلْعُمُرُ ۗ أَفَلَا يَرَوْنَ أَنَّا نَأْتِى ٱلْأَرْضَ نَنقُصُهَا مِنْ أَطْرَافِهَآ ۚ أَفَهُمُ ٱلْغَـٰلِبُونَ

Transliteration bal mattaʿnā hāulāi waābāahum ḥattā ṭāla ʿalayhimu l-ʿumuru afalā yarawna annā natī l-arḍa nanquṣuhā min aṭrāfihā afahumu l-ghālibūna

Marathi ४४. किंबहुना आम्ही यांना आणि यांच्या बुजूर्ग लोकांना जीवनसामुग्री प्रदान केली, येथेपर्यंत की त्यांच्या आयुष्याची हद्द संपली. काय ते नाही पाहात की आम्ही जमिनीला तिच्या किनाऱ्याकडून घटवित चालत आलो आहोत? तर आता काय तेच वर्चस्वशाली आहेत?

Verse 45

قُلْ إِنَّمَآ أُنذِرُكُم بِٱلْوَحْىِ ۚ وَلَا يَسْمَعُ ٱلصُّمُّ ٱلدُّعَآءَ إِذَا مَا يُنذَرُونَ

Transliteration qul innamā undhirukum bil-waḥyi walā yasmaʿu l-ṣumu l-duʿāa idhā mā yundharūna

Marathi ४५. सांगा, मी तर केवळ तुम्हाला अल्लाहच्या वहयी (ईशवाणी) द्वारे सचेत करतो, परंतु बधीर माणसे हाक ऐकत नाहीत, जेव्हा त्यांना सावध केले जात असेल.

Verse 46

وَلَئِن مَّسَّتْهُمْ نَفْحَةٌ مِّنْ عَذَابِ رَبِّكَ لَيَقُولُنَّ يَـٰوَيْلَنَآ إِنَّا كُنَّا ظَـٰلِمِينَ

Transliteration wala-in massathum nafḥatun min ʿadhābi rabbika layaqūlunna yāwaylanā innā kunnā ẓālimīna

Marathi ४६. आणि जर त्यांना तुमच्या पालनकर्त्याच्या शिक्षा- यातनेची नुसती वाफ जरी लागली तर उद्‌गारतील, अरेरे! आमचा विनाश! निःसंशय आम्ही अत्याचारी होतो.

Verse 47

وَنَضَعُ ٱلْمَوَٰزِينَ ٱلْقِسْطَ لِيَوْمِ ٱلْقِيَـٰمَةِ فَلَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْـًٔا ۖ وَإِن كَانَ مِثْقَالَ حَبَّةٍ مِّنْ خَرْدَلٍ أَتَيْنَا بِهَا ۗ وَكَفَىٰ بِنَا حَـٰسِبِينَ

Transliteration wanaḍaʿu l-mawāzīna l-qis'ṭa liyawmi l-qiyāmati falā tuẓ'lamu nafsun shayan wa-in kāna mith'qāla ḥabbatin min khardalin ataynā bihā wakafā binā ḥāsibīna

Marathi ४७. आणि आम्ही कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान यथायोग्य वजन करणारा तराजू आणून ठेवू, मग कोणावर कशाही प्रकारचा जुलूम केला जाणार नाही आणि जर एक राईच्या दाण्याइतकेही कर्म असेल तर तेही आम्ही समोर आणू, आणि आम्ही हिशोब घेण्यासाठी पुरेसे आहोत.

Verse 48

وَلَقَدْ ءَاتَيْنَا مُوسَىٰ وَهَـٰرُونَ ٱلْفُرْقَانَ وَضِيَآءً وَذِكْرًا لِّلْمُتَّقِينَ

Transliteration walaqad ātaynā mūsā wahārūna l-fur'qāna waḍiyāan wadhik'ran lil'muttaqīna

Marathi ४८. आणि हे पूर्णतः सत्य आहे की आम्ही मूसा आणि हारून यांना निर्णय करणारा दिव्य आणि नेक सदाचारी लोकांकरिता बोध-उपदेशपूर्ण ग्रंथ प्रदान केला आहे.

Verse 49

ٱلَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُم بِٱلْغَيْبِ وَهُم مِّنَ ٱلسَّاعَةِ مُشْفِقُونَ

Transliteration alladhīna yakhshawna rabbahum bil-ghaybi wahum mina l-sāʿati mush'fiqūna

Marathi ४९. ते लोक, जे न पाहता आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि जे कयामत (च्या विचारा) ने भयकंपित राहतात.

Verse 50

وَهَـٰذَا ذِكْرٌ مُّبَارَكٌ أَنزَلْنَـٰهُ ۚ أَفَأَنتُمْ لَهُۥ مُنكِرُونَ

Transliteration wahādhā dhik'run mubārakun anzalnāhu afa-antum lahu munkirūna

Marathi ५०. आणि हा बोध- उपदेश आणि बरकतपूर्ण कुरआन आम्हीच अवतरित केला आहे. मग काय तरीही तुम्ही याचा इन्कार करता़?

Verse 51

۞ وَلَقَدْ ءَاتَيْنَآ إِبْرَٰهِيمَ رُشْدَهُۥ مِن قَبْلُ وَكُنَّا بِهِۦ عَـٰلِمِينَ

Transliteration walaqad ātaynā ib'rāhīma rush'dahu min qablu wakunnā bihi ʿālimīna

Marathi ५१. आणि निःसंशय, आम्ही याच्यापूर्वी इब्राहीमला सामंजस्य प्रदान केले होते, आणि त्याच्या अवस्थेशी चांगल्या प्रकारे परिचित होतो.

Verse 52

إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِۦ مَا هَـٰذِهِ ٱلتَّمَاثِيلُ ٱلَّتِىٓ أَنتُمْ لَهَا عَـٰكِفُونَ

Transliteration idh qāla li-abīhi waqawmihi mā hādhihi l-tamāthīlu allatī antum lahā ʿākifūna

Marathi ५२. जेव्हा ते आपल्या पित्यास आणि आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की या मूर्त्या, ज्यांचे तुम्ही पुजारी बनून बसला आहात, हे काय आहे?

Verse 53

قَالُوا۟ وَجَدْنَآ ءَابَآءَنَا لَهَا عَـٰبِدِينَ

Transliteration qālū wajadnā ābāanā lahā ʿābidīna

Marathi ५३. ते म्हणाले, आम्हाला आमचे वाडवडील यांचीच उपासना करताना आढळले आहेत.१

Verse 54

قَالَ لَقَدْ كُنتُمْ أَنتُمْ وَءَابَآؤُكُمْ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ

Transliteration qāla laqad kuntum antum waābāukum fī ḍalālin mubīnin

Marathi ५४. इब्राहीम म्हणाले, मग तर तुम्ही आणि तुमचे वाडवडील उघड अशा मार्गभ्रष्टतेत होते.

Verse 55

قَالُوٓا۟ أَجِئْتَنَا بِٱلْحَقِّ أَمْ أَنتَ مِنَ ٱللَّـٰعِبِينَ

Transliteration qālū aji'tanā bil-ḥaqi am anta mina l-lāʿibīna

Marathi ५५. लोक म्हणाले, काय तुम्ही खरोखर सत्य घेऊन आला आहात की उगाच थट्टा-मस्करी करत आहात?

Verse 56

قَالَ بَل رَّبُّكُمْ رَبُّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ٱلَّذِى فَطَرَهُنَّ وَأَنَا۠ عَلَىٰ ذَٰلِكُم مِّنَ ٱلشَّـٰهِدِينَ

Transliteration qāla bal rabbukum rabbu l-samāwāti wal-arḍi alladhī faṭarahunna wa-anā ʿalā dhālikum mina l-shāhidīna

Marathi ५६. इब्राहीम म्हणाले, (नव्हे) किंबहुना, खरोखर तुमचा स्वामी व पालनकर्ता आकाशांचा आणि जमिनीचा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्याने त्यां ना निर्माण केले आहे आणि मी तर याच गोष्टीचा साक्षी (आणि मानणारा) आहे.

Verse 57

وَتَٱللَّهِ لَأَكِيدَنَّ أَصْنَـٰمَكُم بَعْدَ أَن تُوَلُّوا۟ مُدْبِرِينَ

Transliteration watal-lahi la-akīdanna aṣnāmakum baʿda an tuwallū mud'birīna

Marathi ५७. आणि अल्लाहची शपथ, मी तुमच्या या उपास्यांचा इलाज जरूर करेन जेव्हा तुम्ही पाठ फिरवून चालते व्हाल.

Verse 58

فَجَعَلَهُمْ جُذَٰذًا إِلَّا كَبِيرًا لَّهُمْ لَعَلَّهُمْ إِلَيْهِ يَرْجِعُونَ

Transliteration fajaʿalahum judhādhan illā kabīran lahum laʿallahum ilayhi yarjiʿūna

Marathi ५८. तेव्हा त्यांनी त्या सर्वांचे तुकडे तुकडे करून टाकले, केवळ मोठ्या मूर्तीला सोडून दिले, तेही अशासाठी की, त्या लोकांनी त्याच्याकडे वळावे.

Verse 59

قَالُوا۟ مَن فَعَلَ هَـٰذَا بِـَٔالِهَتِنَآ إِنَّهُۥ لَمِنَ ٱلظَّـٰلِمِينَ

Transliteration qālū man faʿala hādhā biālihatinā innahu lamina l-ẓālimīna

Marathi ५९. ते म्हणाले की आमच्या दैवतांची ही दुर्दशा कोणी केली, असा मनुष्य खात्रीने अत्याचारी असेल.

Verse 60

قَالُوا۟ سَمِعْنَا فَتًى يَذْكُرُهُمْ يُقَالُ لَهُۥٓ إِبْرَٰهِيمُ

Transliteration qālū samiʿ'nā fatan yadhkuruhum yuqālu lahu ib'rāhīmu

Marathi ६०. म्हणाले की आम्ही एका तरुणाला यांच्याविषयी बोलताना ऐकले होते ज्याला इब्राहीम म्हटले जाते.

Verse 61

قَالُوا۟ فَأْتُوا۟ بِهِۦ عَلَىٰٓ أَعْيُنِ ٱلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَشْهَدُونَ

Transliteration qālū fatū bihi ʿalā aʿyuni l-nāsi laʿallahum yashhadūna

Marathi ६१. ते म्हणाले, तर त्याला सर्वांच्या डोळ्यांसमोर घेऊन या, यासाठी की सर्वांनी त्याला पाहून घ्यावे.

Verse 62

قَالُوٓا۟ ءَأَنتَ فَعَلْتَ هَـٰذَا بِـَٔالِهَتِنَا يَـٰٓإِبْرَٰهِيمُ

Transliteration qālū a-anta faʿalta hādhā biālihatinā yāib'rāhīmu

Marathi ६२. म्हणू लागले, हे इब्राहीम! काय तूच आमच्या दैवतांची ही दुर्दशा केली आहेस?

Verse 63

قَالَ بَلْ فَعَلَهُۥ كَبِيرُهُمْ هَـٰذَا فَسْـَٔلُوهُمْ إِن كَانُوا۟ يَنطِقُونَ

Transliteration qāla bal faʿalahu kabīruhum hādhā fasalūhum in kānū yanṭiqūna

Marathi ६३. इब्राहीम यांनी उत्तर दिले, किंबहुना हे काम तर त्यांच्यातल्या मोठ्या दैवताने केले आहे. तुम्ही आपल्या दैवतांनाच विचारा, जर ते बोलत असतील.

Verse 64

فَرَجَعُوٓا۟ إِلَىٰٓ أَنفُسِهِمْ فَقَالُوٓا۟ إِنَّكُمْ أَنتُمُ ٱلظَّـٰلِمُونَ

Transliteration farajaʿū ilā anfusihim faqālū innakum antumu l-ẓālimūna

Marathi ६४. यास्तव त्यांनी आपल्या मनात मान्य केले आणि (मनातल्या मनात) म्हणाले, खरोखर, तुम्ही स्वतः अत्याचारी आहात.

Verse 65

ثُمَّ نُكِسُوا۟ عَلَىٰ رُءُوسِهِمْ لَقَدْ عَلِمْتَ مَا هَـٰٓؤُلَآءِ يَنطِقُونَ

Transliteration thumma nukisū ʿalā ruūsihim laqad ʿalim'ta mā hāulāi yanṭiqūna

Marathi ६५. मग माना खाली घालून (काही विचार करून जरी त्यांनी मान्य केले होते, तरीही म्हणाले) तुम्ही चांगले जाणता की हे बोलत नाहीत.

Verse 66

قَالَ أَفَتَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَنفَعُكُمْ شَيْـًٔا وَلَا يَضُرُّكُمْ

Transliteration qāla afataʿbudūna min dūni l-lahi mā lā yanfaʿukum shayan walā yaḍurrukum

Marathi ६६. (इब्राहीम) त्याच क्षणी म्हणाले, अरेरे! काय तुम्ही अशांची उपासना करता, जे तुम्हाला ना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना हानी!

Verse 67

أُفٍّ لَّكُمْ وَلِمَا تَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ ۖ أَفَلَا تَعْقِلُونَ

Transliteration uffin lakum walimā taʿbudūna min dūni l-lahi afalā taʿqilūna

Marathi ६७. धिःक्कार असो तुमचा आणि त्यांचा, ज्यांची तुम्ही अल्लाहखेरीज उपासना करता, काय तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही?

Verse 68

قَالُوا۟ حَرِّقُوهُ وَٱنصُرُوٓا۟ ءَالِهَتَكُمْ إِن كُنتُمْ فَـٰعِلِينَ

Transliteration qālū ḥarriqūhu wa-unṣurū ālihatakum in kuntum fāʿilīna

Marathi ६८. ते म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर याला जाळून टाका आणि आपल्या उपास्यांची मदत करा.

Verse 69

قُلْنَا يَـٰنَارُ كُونِى بَرْدًا وَسَلَـٰمًا عَلَىٰٓ إِبْرَٰهِيمَ

Transliteration qul'nā yānāru kūnī bardan wasalāman ʿalā ib'rāhīma

Marathi ६९. आम्ही फर्माविले, हे अग्नी! तू इब्राहीमकरिता सलामतीपूर्वक थंड हो.

Verse 70

وَأَرَادُوا۟ بِهِۦ كَيْدًا فَجَعَلْنَـٰهُمُ ٱلْأَخْسَرِينَ

Transliteration wa-arādū bihi kaydan fajaʿalnāhumu l-akhsarīna

Marathi ७०. त्या लोकांनी इब्राहीमचे वाईट इच्छिले असले तरी आम्ही त्यांनाच असफल केले.

Verse 71

وَنَجَّيْنَـٰهُ وَلُوطًا إِلَى ٱلْأَرْضِ ٱلَّتِى بَـٰرَكْنَا فِيهَا لِلْعَـٰلَمِينَ

Transliteration wanajjaynāhu walūṭan ilā l-arḍi allatī bāraknā fīhā lil'ʿālamīna

Marathi ७१. आणि आम्ही (इब्राहीम) आणि लूतला वाचवून त्या भूभागाकडे नेले, ज्यात आम्ही साऱ्या जगाकरिता सुख-समृद्धी ठेवली होती.

Verse 72

وَوَهَبْنَا لَهُۥٓ إِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ نَافِلَةً ۖ وَكُلًّا جَعَلْنَا صَـٰلِحِينَ

Transliteration wawahabnā lahu is'ḥāqa wayaʿqūba nāfilatan wakullan jaʿalnā ṣāliḥīna

Marathi ७२. आणि आम्ही त्यांना इसहाक प्रदान केला आणि त्यावर आणखी याकूब आणि प्रत्येकाला नेक सदाचारी बनविले.

Verse 73

وَجَعَلْنَـٰهُمْ أَئِمَّةً يَهْدُونَ بِأَمْرِنَا وَأَوْحَيْنَآ إِلَيْهِمْ فِعْلَ ٱلْخَيْرَٰتِ وَإِقَامَ ٱلصَّلَوٰةِ وَإِيتَآءَ ٱلزَّكَوٰةِ ۖ وَكَانُوا۟ لَنَا عَـٰبِدِينَ

Transliteration wajaʿalnāhum a-immatan yahdūna bi-amrinā wa-awḥaynā ilayhim fiʿ'la l-khayrāti wa-iqāma l-ṣalati waītāa l-zakati wakānū lanā ʿābidīna

Marathi ७३. आणि आम्ही त्यांना इमाम (पेशवा) बनविले, यासाठी की आमच्या हुकुमानुसार लोकांना मार्गदर्शन करावे आणि आम्ही त्यांच्याकडे सत्कर्म करण्याची, नमाज कायम करण्याची आणि जकात अदा करण्याची वहयी (प्रकाशना) केली आणि ते सर्वच्या सर्व आमचे उपासक होते.

Verse 74

وَلُوطًا ءَاتَيْنَـٰهُ حُكْمًا وَعِلْمًا وَنَجَّيْنَـٰهُ مِنَ ٱلْقَرْيَةِ ٱلَّتِى كَانَت تَّعْمَلُ ٱلْخَبَـٰٓئِثَ ۗ إِنَّهُمْ كَانُوا۟ قَوْمَ سَوْءٍ فَـٰسِقِينَ

Transliteration walūṭan ātaynāhu ḥuk'man waʿil'man wanajjaynāhu mina l-qaryati allatī kānat taʿmalu l-khabāitha innahum kānū qawma sawin fāsiqīna

Marathi ७४. आणि आम्ही लूतलाही हिकमत आणि ज्ञान प्रदान केले आणि त्यांची त्या वस्तीपासून सुटका केली, जिथले लोक घाणेरड्या कामांमध्ये लिप्त होते आणि वस्तुतः ते मोठे वाईट अपराधी लोक होते.

Verse 75

وَأَدْخَلْنَـٰهُ فِى رَحْمَتِنَآ ۖ إِنَّهُۥ مِنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration wa-adkhalnāhu fī raḥmatinā innahu mina l-ṣāliḥīna

Marathi ७५. आणि आम्ही त्यांना (लूतला) आपल्या दया-कृपेत सामील करून घेतले. निःसंशय ते नेक- सदाचारी लोकांपैकी होते.

Verse 76

وَنُوحًا إِذْ نَادَىٰ مِن قَبْلُ فَٱسْتَجَبْنَا لَهُۥ فَنَجَّيْنَـٰهُ وَأَهْلَهُۥ مِنَ ٱلْكَرْبِ ٱلْعَظِيمِ

Transliteration wanūḥan idh nādā min qablu fa-is'tajabnā lahu fanajjaynāhu wa-ahlahu mina l-karbi l-ʿaẓīmi

Marathi ७६. आणि नूहचा तो काळ (आठवा) जेव्हा त्यांनी यापूर्वी दुआ (विनंती) केली. आम्ही त्यांची दुआ कबूल केली आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला फार मोठ्या दुःखातून सोडविले.

Verse 77

وَنَصَرْنَـٰهُ مِنَ ٱلْقَوْمِ ٱلَّذِينَ كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَآ ۚ إِنَّهُمْ كَانُوا۟ قَوْمَ سَوْءٍ فَأَغْرَقْنَـٰهُمْ أَجْمَعِينَ

Transliteration wanaṣarnāhu mina l-qawmi alladhīna kadhabū biāyātinā innahum kānū qawma sawin fa-aghraqnāhum ajmaʿīna

Marathi ७७. आणि त्या जनसमूहाच्या विरोधात त्यांची मदत केली, ज्याने आमच्या आयतींना खोटे ठरविले होते. वास्तविक ते फार वाईट लोक होते, तेव्हा आम्ही त्या सर्वांना बुडवून टाकले.

Verse 78

وَدَاوُۥدَ وَسُلَيْمَـٰنَ إِذْ يَحْكُمَانِ فِى ٱلْحَرْثِ إِذْ نَفَشَتْ فِيهِ غَنَمُ ٱلْقَوْمِ وَكُنَّا لِحُكْمِهِمْ شَـٰهِدِينَ

Transliteration wadāwūda wasulaymāna idh yaḥkumāni fī l-ḥarthi idh nafashat fīhi ghanamu l-qawmi wakunnā liḥuk'mihim shāhidīna

Marathi ७८. आणि दाऊद आणि सुलेमान यांचेही (स्मरण करा) जेव्हा ते शेताबाबत निर्णय करीत होते की काही लोकांच्या शेळ्या त्या शेतात घुसून चरल्या आणि त्यांच्या निर्णयात आम्ही हजर होतो.

Verse 79

فَفَهَّمْنَـٰهَا سُلَيْمَـٰنَ ۚ وَكُلًّا ءَاتَيْنَا حُكْمًا وَعِلْمًا ۚ وَسَخَّرْنَا مَعَ دَاوُۥدَ ٱلْجِبَالَ يُسَبِّحْنَ وَٱلطَّيْرَ ۚ وَكُنَّا فَـٰعِلِينَ

Transliteration fafahhamnāhā sulaymāna wakullan ātaynā ḥuk'man waʿil'man wasakharnā maʿa dāwūda l-jibāla yusabbiḥ'na wal-ṭayra wakunnā fāʿilīna

Marathi ७९. तेव्हा आम्ही त्याचा यथार्थ फैसला सुलेमानला समजावून दिला. निःसंशय आम्ही प्रत्येकाला हिकमत आणि ज्ञान प्रदान केले होते आणि पर्वतांना दाऊदच्या अधीन केले होते जे अल्लाहची तस्बीह (महिमागान) करीत असत, आणि पक्ष्यांनाही असेच आम्ही करणारे होतो.

Verse 80

وَعَلَّمْنَـٰهُ صَنْعَةَ لَبُوسٍ لَّكُمْ لِتُحْصِنَكُم مِّنۢ بَأْسِكُمْ ۖ فَهَلْ أَنتُمْ شَـٰكِرُونَ

Transliteration waʿallamnāhu ṣanʿata labūsin lakum lituḥ'ṣinakum min basikum fahal antum shākirūna

Marathi ८०. आणि आम्ही दाऊदला तुमच्यासाठी युद्धाचा पोषाख (चिलखत) बनविणे शिकविले, यासाठी की युद्धा (च्या हानी) पासून तुमचे रक्षण करू शकावे, मग काय तुम्ही आता कृतज्ञशील व्हाल?

Verse 81

وَلِسُلَيْمَـٰنَ ٱلرِّيحَ عَاصِفَةً تَجْرِى بِأَمْرِهِۦٓ إِلَى ٱلْأَرْضِ ٱلَّتِى بَـٰرَكْنَا فِيهَا ۚ وَكُنَّا بِكُلِّ شَىْءٍ عَـٰلِمِينَ

Transliteration walisulaymāna l-rīḥa ʿāṣifatan tajrī bi-amrihi ilā l-arḍi allatī bāraknā fīhā wakunnā bikulli shayin ʿālimīna

Marathi ८१. आणि आम्ही वेगवान हवेला सुलेमानच्या अधीन केले, जी त्यांच्या आदेशानुसार अशा जमिनीकडे वाहत असे, जिच्यात आम्ही समृद्धी (बरकत) राखली होती, आणि आम्ही प्रत्येक गोष्टीला जाणतो.

Verse 82

وَمِنَ ٱلشَّيَـٰطِينِ مَن يَغُوصُونَ لَهُۥ وَيَعْمَلُونَ عَمَلًا دُونَ ذَٰلِكَ ۖ وَكُنَّا لَهُمْ حَـٰفِظِينَ

Transliteration wamina l-shayāṭīni man yaghūṣūna lahu wayaʿmalūna ʿamalan dūna dhālika wakunnā lahum ḥāfiẓīna

Marathi ८२. आणि (अशाच प्रकारे) अनेक सैतानांना देखील (त्यांचे ताबेदार बनविले होते) जे सुलेमानच्या हुकुमानुसार (समुद्रात) बुडी घेत असत आणि याशिवाय इतर अनेक कामे करीत असत आणि त्यांचे रक्षणकर्ता आम्हीच होतो.

Verse 83

۞ وَأَيُّوبَ إِذْ نَادَىٰ رَبَّهُۥٓ أَنِّى مَسَّنِىَ ٱلضُّرُّ وَأَنتَ أَرْحَمُ ٱلرَّٰحِمِينَ

Transliteration wa-ayyūba idh nādā rabbahu annī massaniya l-ḍuru wa-anta arḥamu l-rāḥimīna

Marathi ८३. आणि अय्यूब (च्या त्या अवस्थेची आठवण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला हा रोग लागला आहे आणि तू सर्व दया करणाऱ्यांपेक्षा जास्त दया करणारा आहेस.

Verse 84

فَٱسْتَجَبْنَا لَهُۥ فَكَشَفْنَا مَا بِهِۦ مِن ضُرٍّ ۖ وَءَاتَيْنَـٰهُ أَهْلَهُۥ وَمِثْلَهُم مَّعَهُمْ رَحْمَةً مِّنْ عِندِنَا وَذِكْرَىٰ لِلْعَـٰبِدِينَ

Transliteration fa-is'tajabnā lahu fakashafnā mā bihi min ḍurrin waātaynāhu ahlahu wamith'lahum maʿahum raḥmatan min ʿindinā wadhik'rā lil'ʿābidīna

Marathi ८४. तेव्हा आम्ही त्यांची (प्रार्थना) ऐकली आणि जे दुःख त्यांना होते ते दूर केले आणि त्यांना त्यांचे कुटुंब प्रदान केले, किंबहुना, त्यांना आपल्या खास दया कृपेने१ त्यासोबत तसेच आणखीही दिले, यासाठी की उपासना करणाऱ्यांकरिता उपदेशकारक ठरावे.

Verse 85

وَإِسْمَـٰعِيلَ وَإِدْرِيسَ وَذَا ٱلْكِفْلِ ۖ كُلٌّ مِّنَ ٱلصَّـٰبِرِينَ

Transliteration wa-is'māʿīla wa-id'rīsa wadhā l-kif'li kullun mina l-ṣābirīna

Marathi ८५. आणि इस्माईल आणि इदरीस आणि जुलकिफ्ल हे सर्व धीर-संयम राखणारे होते.

Verse 86

وَأَدْخَلْنَـٰهُمْ فِى رَحْمَتِنَآ ۖ إِنَّهُم مِّنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration wa-adkhalnāhum fī raḥmatinā innahum mina l-ṣāliḥīna

Marathi ८६. आम्ही त्यांना आपल्या दया-कृपेत दाखल करून घेतले, ते सर्व नेक- सदाचारी लोक होते.

Verse 87

وَذَا ٱلنُّونِ إِذ ذَّهَبَ مُغَـٰضِبًا فَظَنَّ أَن لَّن نَّقْدِرَ عَلَيْهِ فَنَادَىٰ فِى ٱلظُّلُمَـٰتِ أَن لَّآ إِلَـٰهَ إِلَّآ أَنتَ سُبْحَـٰنَكَ إِنِّى كُنتُ مِنَ ٱلظَّـٰلِمِينَ

Transliteration wadhā l-nūni idh dhahaba mughāḍiban faẓanna an lan naqdira ʿalayhi fanādā fī l-ẓulumāti an lā ilāha illā anta sub'ḥānaka innī kuntu mina l-ẓālimīna

Marathi ८७. आणि मासळीवाल्या (यूनुस अलै.) ची (आठवण करा) जेव्हा ते नाराज होऊन निघून गेले आणि असे समजत होते की आम्ही त्यांना धरणार नाही. शेवटी त्यांनी त्या अंधारांमधून पुकारले, हे उपासनीय (अल्लाह)! तुझ्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तू पवित्र आहेस. निश्चितच मी अत्याचारी लोकांपैकी आहे.

Verse 88

فَٱسْتَجَبْنَا لَهُۥ وَنَجَّيْنَـٰهُ مِنَ ٱلْغَمِّ ۚ وَكَذَٰلِكَ نُـۨجِى ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration fa-is'tajabnā lahu wanajjaynāhu mina l-ghami wakadhālika nunjī l-mu'minīna

Marathi ८८. तेव्हा आम्ही त्यांची पुकार (विनंती) मान्य केली आणि त्यांना दुःखातून मुक्त केले आणि आम्ही अशा प्रकारे ईमान राखणाऱ्यांना वाचवितो.

Verse 89

وَزَكَرِيَّآ إِذْ نَادَىٰ رَبَّهُۥ رَبِّ لَا تَذَرْنِى فَرْدًا وَأَنتَ خَيْرُ ٱلْوَٰرِثِينَ

Transliteration wazakariyyā idh nādā rabbahu rabbi lā tadharnī fardan wa-anta khayru l-wārithīna

Marathi ८९. आणि जकरियाचे (स्मरण करा) जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की हे माझ्या पालनकर्त्या! मला तू एकटा सोडू नको. तू सर्वांत उत्तम वारस आहेस.

Verse 90

فَٱسْتَجَبْنَا لَهُۥ وَوَهَبْنَا لَهُۥ يَحْيَىٰ وَأَصْلَحْنَا لَهُۥ زَوْجَهُۥٓ ۚ إِنَّهُمْ كَانُوا۟ يُسَـٰرِعُونَ فِى ٱلْخَيْرَٰتِ وَيَدْعُونَنَا رَغَبًا وَرَهَبًا ۖ وَكَانُوا۟ لَنَا خَـٰشِعِينَ

Transliteration fa-is'tajabnā lahu wawahabnā lahu yaḥyā wa-aṣlaḥnā lahu zawjahu innahum kānū yusāriʿūna fī l-khayrāti wayadʿūnanā raghaban warahaban wakānū lanā khāshiʿīna

Marathi ९०. तेव्हा आम्ही त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्यांना यहया (नावाचा पुत्र) प्रदान केला, आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्यासाठी यथायोग्य बनविले. हे नेक- सदाचारी लोक सत्कर्मांकडे लवकर धाव घेत, आणि आम्हाला मोठ्या आवडीने भय राखून पुकारत असत, आणि आमच्या समोर मोठ्या नम्रतेने राहात असत.

Verse 91

وَٱلَّتِىٓ أَحْصَنَتْ فَرْجَهَا فَنَفَخْنَا فِيهَا مِن رُّوحِنَا وَجَعَلْنَـٰهَا وَٱبْنَهَآ ءَايَةً لِّلْعَـٰلَمِينَ

Transliteration wa-allatī aḥṣanat farjahā fanafakhnā fīhā min rūḥinā wajaʿalnāhā wa-ib'nahā āyatan lil'ʿālamīna

Marathi ९१. आणि ती (सत्शील स्त्री) जिने आपल्या शील-अब्रुचे रक्षण केले, आम्ही तिच्यात आपला आत्मा फुंकला आणि स्वतः तिला आणि तिच्या पुत्राला साऱ्या जगाकरिता निशाणी (चिन्ह) बनविले.

Verse 92

إِنَّ هَـٰذِهِۦٓ أُمَّتُكُمْ أُمَّةً وَٰحِدَةً وَأَنَا۠ رَبُّكُمْ فَٱعْبُدُونِ

Transliteration inna hādhihi ummatukum ummatan wāḥidatan wa-anā rabbukum fa-uʿ'budūni

Marathi ९२. हा तुमचा समूह आहे, जो वास्तविक एकच समूह आहे आणि मी तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे, यास्तव तुम्ही सर्व माझीच उपासना करा.

Verse 93

وَتَقَطَّعُوٓا۟ أَمْرَهُم بَيْنَهُمْ ۖ كُلٌّ إِلَيْنَا رَٰجِعُونَ

Transliteration wataqaṭṭaʿū amrahum baynahum kullun ilaynā rājiʿūna

Marathi ९३. परंतु लोकांनी आपसात आपल्या दीन (धर्मा) मध्ये गट बनवून घेतले (तथापि) सर्वांना आमच्याकडे परतून यायचे आहे.१

Verse 94

فَمَن يَعْمَلْ مِنَ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَا كُفْرَانَ لِسَعْيِهِۦ وَإِنَّا لَهُۥ كَـٰتِبُونَ

Transliteration faman yaʿmal mina l-ṣāliḥāti wahuwa mu'minun falā kuf'rāna lisaʿyihi wa-innā lahu kātibūna

Marathi ९४. मग जो कोणी सत्कर्म करेल आणि तो ईमानधारकही असेल तर त्याच्या प्रयत्नांची काहीच उपेक्षा होणार नाही. आम्ही तर त्याचे लिहिणारे आहोत.

Verse 95

وَحَرَٰمٌ عَلَىٰ قَرْيَةٍ أَهْلَكْنَـٰهَآ أَنَّهُمْ لَا يَرْجِعُونَ

Transliteration waḥarāmun ʿalā qaryatin ahlaknāhā annahum lā yarjiʿūna

Marathi ९५. आणि ज्या वस्तीला आम्ही नष्ट करून टाकले, तिच्याकरिता अनिवार्य आहे की तिथले लोक परतून येणार नाहीत.

Verse 96

حَتَّىٰٓ إِذَا فُتِحَتْ يَأْجُوجُ وَمَأْجُوجُ وَهُم مِّن كُلِّ حَدَبٍ يَنسِلُونَ

Transliteration ḥattā idhā futiḥat yajūju wamajūju wahum min kulli ḥadabin yansilūna

Marathi ९६. येथेपर्यंत की याजूज आणि माजूज बंधनमुक्त केले जातील आणि ते प्रत्येक उताराकडून धावत येतील.

Verse 97

وَٱقْتَرَبَ ٱلْوَعْدُ ٱلْحَقُّ فَإِذَا هِىَ شَـٰخِصَةٌ أَبْصَـٰرُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ يَـٰوَيْلَنَا قَدْ كُنَّا فِى غَفْلَةٍ مِّنْ هَـٰذَا بَلْ كُنَّا ظَـٰلِمِينَ

Transliteration wa-iq'taraba l-waʿdu l-ḥaqu fa-idhā hiya shākhiṣatun abṣāru alladhīna kafarū yāwaylanā qad kunnā fī ghaflatin min hādhā bal kunnā ẓālimīna

Marathi ९७. आणि सच्चा वायदा जवळ येऊन ठेपेल, त्या वेळी काफिर लोकांचे डोळे विस्फारलेलेच राहतील की अरेरे! आम्ही या अवस्थेपासून गाफील होतो, किंबहुना खरे पाहता आम्ही अत्याचारी होतो.

Verse 98

إِنَّكُمْ وَمَا تَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ حَصَبُ جَهَنَّمَ أَنتُمْ لَهَا وَٰرِدُونَ

Transliteration innakum wamā taʿbudūna min dūni l-lahi ḥaṣabu jahannama antum lahā wāridūna

Marathi ९८. तुम्ही आणि ते, ज्यांची अल्लाहखेरीज तुम्ही उपासना करता, सर्व जहन्नमचे इंधन बनाल, तुम्ही सर्व त्या (जहन्नम) मध्ये जाणार आहात.

Verse 99

لَوْ كَانَ هَـٰٓؤُلَآءِ ءَالِهَةً مَّا وَرَدُوهَا ۖ وَكُلٌّ فِيهَا خَـٰلِدُونَ

Transliteration law kāna hāulāi ālihatan mā waradūhā wakullun fīhā khālidūna

Marathi ९९. जर ते (सच्चे) उपास्य असते तर जहन्नममध्ये दाखल झाले नसते, आणि सर्वच्या सर्व त्यातच नेहमी राहणार आहेत.

Verse 100

لَهُمْ فِيهَا زَفِيرٌ وَهُمْ فِيهَا لَا يَسْمَعُونَ

Transliteration lahum fīhā zafīrun wahum fīhā lā yasmaʿūna

Marathi १००. ते त्या ठिकाणी मोठमोठ्याने ओरडत असतील आणि तिथे काहीच ऐकू शकणार नाहीत.

Verse 101

إِنَّ ٱلَّذِينَ سَبَقَتْ لَهُم مِّنَّا ٱلْحُسْنَىٰٓ أُو۟لَـٰٓئِكَ عَنْهَا مُبْعَدُونَ

Transliteration inna alladhīna sabaqat lahum minnā l-ḥus'nā ulāika ʿanhā mub'ʿadūna

Marathi १०१. परंतु ज्यांच्यासाठी आमच्यातर्फे पहिल्यापासूनच सत्कर्म निश्चित आहे, ते सर्व जहन्नमपासून दूरच ठेवले जातील.

Verse 102

لَا يَسْمَعُونَ حَسِيسَهَا ۖ وَهُمْ فِى مَا ٱشْتَهَتْ أَنفُسُهُمْ خَـٰلِدُونَ

Transliteration lā yasmaʿūna ḥasīsahā wahum fī mā ish'tahat anfusuhum khālidūna

Marathi १०२. ते तर, जहन्नमची चाहूलही ऐकू शकणार नाहीत आणि आपल्या मनोवांछित वस्तूंसह सदैव राहणारे असतील.

Verse 103

لَا يَحْزُنُهُمُ ٱلْفَزَعُ ٱلْأَكْبَرُ وَتَتَلَقَّىٰهُمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ هَـٰذَا يَوْمُكُمُ ٱلَّذِى كُنتُمْ تُوعَدُونَ

Transliteration lā yaḥzunuhumu l-fazaʿu l-akbaru watatalaqqāhumu l-malāikatu hādhā yawmukumu alladhī kuntum tūʿadūna

Marathi १०३. ती भयंकर दहशतही त्यांना उदास करू शकणार नाही आणि फरिश्ते त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील की हाच तुमचा तो दिवस आहे, ज्याचा तुम्हाला वायदा दिला जात राहिला.

Verse 104

يَوْمَ نَطْوِى ٱلسَّمَآءَ كَطَىِّ ٱلسِّجِلِّ لِلْكُتُبِ ۚ كَمَا بَدَأْنَآ أَوَّلَ خَلْقٍ نُّعِيدُهُۥ ۚ وَعْدًا عَلَيْنَآ ۚ إِنَّا كُنَّا فَـٰعِلِينَ

Transliteration yawma naṭwī l-samāa kaṭayyi l-sijili lil'kutubi kamā badanā awwala khalqin nuʿīduhu waʿdan ʿalaynā innā kunnā fāʿilīna

Marathi १०४. ज्या दिवशी आम्ही आकाशाला अशा प्रकारे गुंडाळून टाकू, ज्या प्रकारे रोलचे कागद (पत्रिका) गुंडाळले जातात. ज्या प्रकारे पहिल्या खेपेस आम्ही निर्माण केले होते, त्याच प्रकारे दुसऱ्यांदा निर्माण करू. हा आमचा मजबूत वायदा आहे आणि हे आम्ही निश्चितच करू.

Verse 105

وَلَقَدْ كَتَبْنَا فِى ٱلزَّبُورِ مِنۢ بَعْدِ ٱلذِّكْرِ أَنَّ ٱلْأَرْضَ يَرِثُهَا عِبَادِىَ ٱلصَّـٰلِحُونَ

Transliteration walaqad katabnā fī l-zabūri min baʿdi l-dhik'ri anna l-arḍa yarithuhā ʿibādiya l-ṣāliḥūna

Marathi १०५. आणि आम्ही जबूर (ग्रंथा) मध्ये सावधगिरीचा इशारा आणि बोध- उपदेशानंतर हे लिहिले आहे की धरतीचे वारस माझे नेक-सदाचारी दास असतील.

Verse 106

إِنَّ فِى هَـٰذَا لَبَلَـٰغًا لِّقَوْمٍ عَـٰبِدِينَ

Transliteration inna fī hādhā labalāghan liqawmin ʿābidīna

Marathi १०६. उपासना करणाऱ्या दासांकरिता तर यात एक मोठी खबर आहे.

Verse 107

وَمَآ أَرْسَلْنَـٰكَ إِلَّا رَحْمَةً لِّلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā arsalnāka illā raḥmatan lil'ʿālamīna

Marathi १०७. आणि आम्ही तुम्हाला समस्त विश्वाकरिता दया-कृपा बनवून पाठविले आहे.

Verse 108

قُلْ إِنَّمَا يُوحَىٰٓ إِلَىَّ أَنَّمَآ إِلَـٰهُكُمْ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ ۖ فَهَلْ أَنتُم مُّسْلِمُونَ

Transliteration qul innamā yūḥā ilayya annamā ilāhukum ilāhun wāḥidun fahal antum mus'limūna

Marathi १०८. सांगा की माझ्याकडे तर वहयी (ईशवाणी) केली जाते की तुम्हा सर्वांचा उपास्य (अल्लाह) एकच आहे. तर काय तुम्हीही त्याचे मानणारे आहात?

Verse 109

فَإِن تَوَلَّوْا۟ فَقُلْ ءَاذَنتُكُمْ عَلَىٰ سَوَآءٍ ۖ وَإِنْ أَدْرِىٓ أَقَرِيبٌ أَم بَعِيدٌ مَّا تُوعَدُونَ

Transliteration fa-in tawallaw faqul ādhantukum ʿalā sawāin wa-in adrī aqarībun am baʿīdun mā tūʿadūna

Marathi १०९. मग जर तो तोंड फिरविल तर सांगा की मी तुम्हाला समानरित्या सचेत केले आहे. आणि मला नाही माहीत की, ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की लांब आहे.

Verse 110

إِنَّهُۥ يَعْلَمُ ٱلْجَهْرَ مِنَ ٱلْقَوْلِ وَيَعْلَمُ مَا تَكْتُمُونَ

Transliteration innahu yaʿlamu l-jahra mina l-qawli wayaʿlamu mā taktumūna

Marathi ११०. निःसंशय (अल्लाह) तुमच्या उघड गोष्टींनाही जाणतो, तसेच जे काही तुम्ही लपविता ते देखील जाणतो.

Verse 111

وَإِنْ أَدْرِى لَعَلَّهُۥ فِتْنَةٌ لَّكُمْ وَمَتَـٰعٌ إِلَىٰ حِينٍ

Transliteration wa-in adrī laʿallahu fit'natun lakum wamatāʿun ilā ḥīnin

Marathi १११. आणि मला याचेही ज्ञान नाही. संभवतः ही तुमची कसोटी असेल आणि एका निर्धारित अवधीपर्यंतचा लाभ असेल.

Verse 112

قَـٰلَ رَبِّ ٱحْكُم بِٱلْحَقِّ ۗ وَرَبُّنَا ٱلرَّحْمَـٰنُ ٱلْمُسْتَعَانُ عَلَىٰ مَا تَصِفُونَ

Transliteration qāla rabbi uḥ'kum bil-ḥaqi warabbunā l-raḥmānu l-mus'taʿānu ʿalā mā taṣifūna

Marathi ११२. (पैगंबर) स्वतः म्हणाले, हे पालनकर्त्या! न्यायपूर्वक फैसला कर आणि आमचा पालनकर्ता अंतिशय दया करणारा आहे, ज्याच्याकडून मदत मागितली जाते त्या गोष्टीबद्दल, ज्या तुम्ही सांगत आहात.

Read Surah Al-Anbya in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.