MyDugsiStart learning

Surah At-Taghabun in Marathi: translation and audio

Surah 64 · التغابن · The Mutual Disillusion · 18 verses

Surah At-Taghabun verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah At-Taghabun word by word in English.

Verse 1

يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ ۖ لَهُ ٱلْمُلْكُ وَلَهُ ٱلْحَمْدُ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ

Transliteration yusabbiḥu lillahi mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi lahu l-mul'ku walahu l-ḥamdu wahuwa ʿalā kulli shayin qadīrun

Marathi १. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहची पवित्रता वर्णन करते, त्याचीच राज्य-सत्ता आहे आणि त्याचीच स्तुती-प्रशंसा आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.

Verse 2

هُوَ ٱلَّذِى خَلَقَكُمْ فَمِنكُمْ كَافِرٌ وَمِنكُم مُّؤْمِنٌ ۚ وَٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ

Transliteration huwa alladhī khalaqakum faminkum kāfirun waminkum mu'minun wal-lahu bimā taʿmalūna baṣīrun

Marathi २. त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे, मग तुमच्यापैकी काही काफिर (इन्कारी) आहेत आणि काही ईमान राखणारे आहेत आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे.

Verse 3

خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ بِٱلْحَقِّ وَصَوَّرَكُمْ فَأَحْسَنَ صُوَرَكُمْ ۖ وَإِلَيْهِ ٱلْمَصِيرُ

Transliteration khalaqa l-samāwāti wal-arḍa bil-ḥaqi waṣawwarakum fa-aḥsana ṣuwarakum wa-ilayhi l-maṣīru

Marathi ३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह (बुद्धिकौशल्याने) निर्माण केले, त्यानेच तुमचे चेहरे मोहरे बनविले आणि खूप सुंदर बनविले आणि त्याच्याचकडे परतायचे आहे.

Verse 4

يَعْلَمُ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعْلِنُونَ ۚ وَٱللَّهُ عَلِيمٌۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

Transliteration yaʿlamu mā fī l-samāwāti wal-arḍi wayaʿlamu mā tusirrūna wamā tuʿ'linūna wal-lahu ʿalīmun bidhāti l-ṣudūri

Marathi ४. तो आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व वस्तूंचे ज्ञान राखतो, आणि जे काही तुम्ही लपविता आणि जाहीर करता ते सर्व तो जाणतो. अल्लाह तर छातीतल्या (मनातल्या) गोष्टी देखील जाणतो.

Verse 5

أَلَمْ يَأْتِكُمْ نَبَؤُا۟ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ مِن قَبْلُ فَذَاقُوا۟ وَبَالَ أَمْرِهِمْ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ

Transliteration alam yatikum naba-u alladhīna kafarū min qablu fadhāqū wabāla amrihim walahum ʿadhābun alīmun

Marathi ५. काय तुम्हाला या पूर्वीच्या काफिरांची खबर नाही पोहचली, ज्यांनी आपल्या कर्मांच्या परिणामांचा स्वाद चाखला, आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा यातना आहे.

Verse 6

ذَٰلِكَ بِأَنَّهُۥ كَانَت تَّأْتِيهِمْ رُسُلُهُم بِٱلْبَيِّنَـٰتِ فَقَالُوٓا۟ أَبَشَرٌ يَهْدُونَنَا فَكَفَرُوا۟ وَتَوَلَّوا۟ ۚ وَّٱسْتَغْنَى ٱللَّهُ ۚ وَٱللَّهُ غَنِىٌّ حَمِيدٌ

Transliteration dhālika bi-annahu kānat tatīhim rusuluhum bil-bayināti faqālū abasharun yahdūnanā fakafarū watawallaw wa-is'taghnā l-lahu wal-lahu ghaniyyun ḥamīdun

Marathi ६. हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर स्पष्ट प्रमाण (पुरावे) घेऊन आले तेव्हा ते म्हणाले की काय एक मनुष्य आम्हाला मार्गदर्शन करील?१ आणि इन्कार केला व तोंड फिरविले आणि अल्लाहने त्यांची पर्वा केली नाही, आणि अल्लाह तर आहेच मोठा निःस्पृह, सर्वगुण संपन्न.

Verse 7

زَعَمَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ أَن لَّن يُبْعَثُوا۟ ۚ قُلْ بَلَىٰ وَرَبِّى لَتُبْعَثُنَّ ثُمَّ لَتُنَبَّؤُنَّ بِمَا عَمِلْتُمْ ۚ وَذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٌ

Transliteration zaʿama alladhīna kafarū an lan yub'ʿathū qul balā warabbī latub'ʿathunna thumma latunabba-unna bimā ʿamil'tum wadhālika ʿalā l-lahi yasīrun

Marathi ७. त्या काफिर (इन्कारी) लोकांनी असे गृहीत धरले आहे की त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही. तुम्ही सांगा की का नाही? अल्लाहची शपथ! तुम्हाला अवश्य पुन्हा जिवंत केले जाईल, मग जे काही (कर्म) तुम्ही केले आहे त्याची खबर तुम्हाला दिली जाईल आणि अल्लाहकरिता हे फारच सोपे आहे.

Verse 8

فَـَٔامِنُوا۟ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَٱلنُّورِ ٱلَّذِىٓ أَنزَلْنَا ۚ وَٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرٌ

Transliteration faāminū bil-lahi warasūlihi wal-nūri alladhī anzalnā wal-lahu bimā taʿmalūna khabīrun

Marathi ८. तेव्हा तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या दिव्य तेजावर जो आम्ही अवतरित केला आहे, ईमान राखा, आणि अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला (चांगल्या प्रकारे) जाणून आहे.

Verse 9

يَوْمَ يَجْمَعُكُمْ لِيَوْمِ ٱلْجَمْعِ ۖ ذَٰلِكَ يَوْمُ ٱلتَّغَابُنِ ۗ وَمَن يُؤْمِنۢ بِٱللَّهِ وَيَعْمَلْ صَـٰلِحًا يُكَفِّرْ عَنْهُ سَيِّـَٔاتِهِۦ وَيُدْخِلْهُ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَآ أَبَدًا ۚ ذَٰلِكَ ٱلْفَوْزُ ٱلْعَظِيمُ

Transliteration yawma yajmaʿukum liyawmi l-jamʿi dhālika yawmu l-taghābuni waman yu'min bil-lahi wayaʿmal ṣāliḥan yukaffir ʿanhu sayyiātihi wayud'khil'hu jannātin tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā abadan dhālika l-fawzu l-ʿaẓīmu

Marathi ९. ज्या दिवशी अल्लाह तुम्हा सर्वांना, त्या एकत्रित केले जाण्याच्या दिवशी एकत्र करील, तोच पराजय आणि विजयाचा दिवस आहे, आणि जो (मनुष्य) अल्लाहवर ईमान राखून सत्कर्म करील, अल्लाह त्याच्यापासून त्याची दुष्कर्मे दूर करील आणि त्याला जन्नतीमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, ज्यांच्यात ते सदैवकाळ राहतील. हीच फार मोठी सफलता आहे.

Verse 10

وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَكَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَآ أُو۟لَـٰٓئِكَ أَصْحَـٰبُ ٱلنَّارِ خَـٰلِدِينَ فِيهَا ۖ وَبِئْسَ ٱلْمَصِيرُ

Transliteration wa-alladhīna kafarū wakadhabū biāyātinā ulāika aṣḥābu l-nāri khālidīna fīhā wabi'sa l-maṣīru

Marathi १०. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, ते सर्वच जहन्नममध्ये जाणारे आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. ते मोठे वाईट ठिकाण आहे.

Verse 11

مَآ أَصَابَ مِن مُّصِيبَةٍ إِلَّا بِإِذْنِ ٱللَّهِ ۗ وَمَن يُؤْمِنۢ بِٱللَّهِ يَهْدِ قَلْبَهُۥ ۚ وَٱللَّهُ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌ

Transliteration mā aṣāba min muṣībatin illā bi-idh'ni l-lahi waman yu'min bil-lahi yahdi qalbahu wal-lahu bikulli shayin ʿalīmun

Marathi ११. कोणतेही संकट अल्लाहच्या आज्ञेविना पोहचू शकत नाही आणि जो कोणी अल्लाहवर ईमान राखतो, अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.

Verse 12

وَأَطِيعُوا۟ ٱللَّهَ وَأَطِيعُوا۟ ٱلرَّسُولَ ۚ فَإِن تَوَلَّيْتُمْ فَإِنَّمَا عَلَىٰ رَسُولِنَا ٱلْبَلَـٰغُ ٱلْمُبِينُ

Transliteration wa-aṭīʿū l-laha wa-aṭīʿū l-rasūla fa-in tawallaytum fa-innamā ʿalā rasūlinā l-balāghu l-mubīnu

Marathi १२. (लोकांनो!) अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबराचे आज्ञापालन करा, मग जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर आमच्या पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टपणे (संदेश) पोहचविणे आहे.

Verse 13

ٱللَّهُ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۚ وَعَلَى ٱللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ ٱلْمُؤْمِنُونَ

Transliteration al-lahu lā ilāha illā huwa waʿalā l-lahi falyatawakkali l-mu'minūna

Marathi १३. अल्लाहखेरीज कोणीही सच्चा माबूद (खरा उपास्य) नाही, आणि ईमान राखणाऱ्यांनी केवळ अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे.

Verse 14

يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِنَّ مِنْ أَزْوَٰجِكُمْ وَأَوْلَـٰدِكُمْ عَدُوًّا لَّكُمْ فَٱحْذَرُوهُمْ ۚ وَإِن تَعْفُوا۟ وَتَصْفَحُوا۟ وَتَغْفِرُوا۟ فَإِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration yāayyuhā alladhīna āmanū inna min azwājikum wa-awlādikum ʿaduwwan lakum fa-iḥ'dharūhum wa-in taʿfū wataṣfaḥū wataghfirū fa-inna l-laha ghafūrun raḥīmun

Marathi १४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या काही पत्न्या आणि संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, तेव्हा त्यांच्यापासून सतर्क राहा आणि जर तुम्ही माफ कराल, व सोडून द्याल आणि माफ कराल तर अल्लाह माफ करणारा, दयाळू आहे.

Verse 15

إِنَّمَآ أَمْوَٰلُكُمْ وَأَوْلَـٰدُكُمْ فِتْنَةٌ ۚ وَٱللَّهُ عِندَهُۥٓ أَجْرٌ عَظِيمٌ

Transliteration innamā amwālukum wa-awlādukum fit'natun wal-lahu ʿindahu ajrun ʿaẓīmun

Marathi १५. तुमची धन-संपत्ती आणि तुमची संतती (तर खात्रीने) तुमची कसोटी आहे१ आणि फार मोठा मोबदला, अल्लाहजवळ आहे.

Verse 16

فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ مَا ٱسْتَطَعْتُمْ وَٱسْمَعُوا۟ وَأَطِيعُوا۟ وَأَنفِقُوا۟ خَيْرًا لِّأَنفُسِكُمْ ۗ وَمَن يُوقَ شُحَّ نَفْسِهِۦ فَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْمُفْلِحُونَ

Transliteration fa-ittaqū l-laha mā is'taṭaʿtum wa-is'maʿū wa-aṭīʿū wa-anfiqū khayran li-anfusikum waman yūqa shuḥḥa nafsihi fa-ulāika humu l-muf'liḥūna

Marathi १६. तेव्हा यथासंभव अल्लाहचे भय बाळगत राहा आणि ऐकत व आज्ञापालन करीत राहा, आणि (अल्लाहच्या मार्गात) दान करीत राहा, जे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जे लोक आपल्या मनाच्या लालसेपासून सुरक्षित ठेवले गेले, तेच सफल आहेत.

Verse 17

إِن تُقْرِضُوا۟ ٱللَّهَ قَرْضًا حَسَنًا يُضَـٰعِفْهُ لَكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ۚ وَٱللَّهُ شَكُورٌ حَلِيمٌ

Transliteration in tuq'riḍū l-laha qarḍan ḥasanan yuḍāʿif'hu lakum wayaghfir lakum wal-lahu shakūrun ḥalīmun

Marathi १७. जर तुम्ही अल्लाहला चांगले कर्ज द्याल (अर्थात त्याच्या मार्गात खर्च कराल) तर तो ते तुमच्यासाठी वाढवित जाईल आणि तुमचे अपराधही माफ करील. आणि अल्लाह मोठा कदर करणारा आणि सहन करणारा आहे.

Verse 18

عَـٰلِمُ ٱلْغَيْبِ وَٱلشَّهَـٰدَةِ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ

Transliteration ʿālimu l-ghaybi wal-shahādati l-ʿazīzu l-ḥakīmu

Marathi १८. तो लपलेल्या आणि उघड गोष्टी जाणणारा, जबरदस्त व हिकमतशाली आहे.

Read Surah At-Taghabun in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.