MyDugsiStart learning

Surah Ar-Rum in Marathi: translation and audio

Surah 30 · الروم · The Romans · 60 verses

Surah Ar-Rum verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Ar-Rum word by word in English.

Verse 1

الٓمٓ

Transliteration alif-lam-meem

Marathi १. अलिफ. लाम. मीम

Verse 2

غُلِبَتِ ٱلرُّومُ

Transliteration ghulibati l-rūmu

Marathi २. रोमन पराजित झाले.

Verse 3

فِىٓ أَدْنَى ٱلْأَرْضِ وَهُم مِّنۢ بَعْدِ غَلَبِهِمْ سَيَغْلِبُونَ

Transliteration fī adnā l-arḍi wahum min baʿdi ghalabihim sayaghlibūna

Marathi ३. जवळच्या प्रदेशात आणि ते पराजित झाल्यानंतर भविष्यात वर्चस्वशाली होतील.

Verse 4

فِى بِضْعِ سِنِينَ ۗ لِلَّهِ ٱلْأَمْرُ مِن قَبْلُ وَمِنۢ بَعْدُ ۚ وَيَوْمَئِذٍ يَفْرَحُ ٱلْمُؤْمِنُونَ

Transliteration fī biḍ'ʿi sinīna lillahi l-amru min qablu wamin baʿdu wayawma-idhin yafraḥu l-mu'minūna

Marathi ४. काही वर्षांच्या आतच, याच्यापूर्वी आणि यानंतरही अधिकार फक्त अल्लाहचाच आहे, आणि त्या दिवशी ईमान राखणारे खूश होतील.

Verse 5

بِنَصْرِ ٱللَّهِ ۚ يَنصُرُ مَن يَشَآءُ ۖ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلرَّحِيمُ

Transliteration binaṣri l-lahi yanṣuru man yashāu wahuwa l-ʿazīzu l-raḥīmu

Marathi ५. अल्लाहच्या मदतीने तो ज्याला इच्छितो मदत करतो, आणि खरा विजेता आणि वर्चस्वशाली आणि दयावान तोच आहे.

Verse 6

وَعْدَ ٱللَّهِ ۖ لَا يُخْلِفُ ٱللَّهُ وَعْدَهُۥ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration waʿda l-lahi lā yukh'lifu l-lahu waʿdahu walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi ६. अल्लाहचा वायदा आहे. अल्लाह आपल्या वायद्यांचा भंग करीत नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.

Verse 7

يَعْلَمُونَ ظَـٰهِرًا مِّنَ ٱلْحَيَوٰةِ ٱلدُّنْيَا وَهُمْ عَنِ ٱلْـَٔاخِرَةِ هُمْ غَـٰفِلُونَ

Transliteration yaʿlamūna ẓāhiran mina l-ḥayati l-dun'yā wahum ʿani l-ākhirati hum ghāfilūna

Marathi ७. ते तर (फक्त) ऐहिक जीवनाच्या बाह्य स्वरूपालाच जाणतात. आणि आखिरतपासून तर अगदी गाफील आहेत.

Verse 8

أَوَلَمْ يَتَفَكَّرُوا۟ فِىٓ أَنفُسِهِم ۗ مَّا خَلَقَ ٱللَّهُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَآ إِلَّا بِٱلْحَقِّ وَأَجَلٍ مُّسَمًّى ۗ وَإِنَّ كَثِيرًا مِّنَ ٱلنَّاسِ بِلِقَآئِ رَبِّهِمْ لَكَـٰفِرُونَ

Transliteration awalam yatafakkarū fī anfusihim mā khalaqa l-lahu l-samāwāti wal-arḍa wamā baynahumā illā bil-ḥaqi wa-ajalin musamman wa-inna kathīran mina l-nāsi biliqāi rabbihim lakāfirūna

Marathi ८. काय त्या लोकांनी आपल्या मनात यावर विचार नाही केला की अल्लाह ने आकाशांना व जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांना उत्तम अनुमानाने,१ निर्धारित वेळेपर्यंत (च) निर्माण केले आहे, तथापि अधिकांश लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करतात.

Verse 9

أَوَلَمْ يَسِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَيَنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ كَانُوٓا۟ أَشَدَّ مِنْهُمْ قُوَّةً وَأَثَارُوا۟ ٱلْأَرْضَ وَعَمَرُوهَآ أَكْثَرَ مِمَّا عَمَرُوهَا وَجَآءَتْهُمْ رُسُلُهُم بِٱلْبَيِّنَـٰتِ ۖ فَمَا كَانَ ٱللَّهُ لِيَظْلِمَهُمْ وَلَـٰكِن كَانُوٓا۟ أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ

Transliteration awalam yasīrū fī l-arḍi fayanẓurū kayfa kāna ʿāqibatu alladhīna min qablihim kānū ashadda min'hum quwwatan wa-athārū l-arḍa waʿamarūhā akthara mimmā ʿamarūhā wajāathum rusuluhum bil-bayināti famā kāna l-lahu liyaẓlimahum walākin kānū anfusahum yaẓlimūna

Marathi ९. काय त्यांनी जमिनीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा परिणाम (अंत) कसा (वाईट) झाला? ते यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होते आणि त्यांनी देखील जमीन पेरली-नांगरली होती आणि यांच्यापेक्षा जास्त आबादी केली होती. आणि त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) ईश-चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते. हे तर अशक्य होते की अल्लाहने त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला असता. परंतु (खरे पाहता) ते स्वतः आपल्या प्राणांवर अत्याचार करीत होते.

Verse 10

ثُمَّ كَانَ عَـٰقِبَةَ ٱلَّذِينَ أَسَـٰٓـُٔوا۟ ٱلسُّوٓأَىٰٓ أَن كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ وَكَانُوا۟ بِهَا يَسْتَهْزِءُونَ

Transliteration thumma kāna ʿāqibata alladhīna asāū l-sūā an kadhabū biāyāti l-lahi wakānū bihā yastahziūna

Marathi १०. मग शेवटी वाईट लोकांची परिणीती वाईट झाली, यासाठी की ते अल्लाहच्या आयतींना खोटे ठरवीत आणि त्यांची थट्टा उडवीत.

Verse 11

ٱللَّهُ يَبْدَؤُا۟ ٱلْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُۥ ثُمَّ إِلَيْهِ تُرْجَعُونَ

Transliteration al-lahu yabda-u l-khalqa thumma yuʿīduhu thumma ilayhi tur'jaʿūna

Marathi ११. अल्लाहच सृष्टी-निर्मितीचा आरंभ करतो, मग तोच तिला दुसऱ्यांदा निर्माण करील, मग तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.

Verse 12

وَيَوْمَ تَقُومُ ٱلسَّاعَةُ يُبْلِسُ ٱلْمُجْرِمُونَ

Transliteration wayawma taqūmu l-sāʿatu yub'lisu l-muj'rimūna

Marathi १२. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी अपराधी आश्चर्यचकित होतील.

Verse 13

وَلَمْ يَكُن لَّهُم مِّن شُرَكَآئِهِمْ شُفَعَـٰٓؤُا۟ وَكَانُوا۟ بِشُرَكَآئِهِمْ كَـٰفِرِينَ

Transliteration walam yakun lahum min shurakāihim shufaʿāu wakānū bishurakāihim kāfirīna

Marathi १३. आणि त्यांनी ठरविलेल्या सर्व सहभाग्यांपैकी एकही त्यांची शिफारस करणार नाही.१ आणि स्वतः हेदेखील आपल्या आराध्य दैवतांचा (सहभागी ईश्वरांचा) इन्कार करतील.

Verse 14

وَيَوْمَ تَقُومُ ٱلسَّاعَةُ يَوْمَئِذٍ يَتَفَرَّقُونَ

Transliteration wayawma taqūmu l-sāʿatu yawma-idhin yatafarraqūna

Marathi १४. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी (सर्व समूह) विभागले जातील.

Verse 15

فَأَمَّا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ فَهُمْ فِى رَوْضَةٍ يُحْبَرُونَ

Transliteration fa-ammā alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti fahum fī rawḍatin yuḥ'barūna

Marathi १५. मग जे ईमान बाळगून सत्कर्म करीत राहतील, त्यांना जन्नतमध्ये खूश केले जाईल.

Verse 16

وَأَمَّا ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَكَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا وَلِقَآئِ ٱلْـَٔاخِرَةِ فَأُو۟لَـٰٓئِكَ فِى ٱلْعَذَابِ مُحْضَرُونَ

Transliteration wa-ammā alladhīna kafarū wakadhabū biāyātinā waliqāi l-ākhirati fa-ulāika fī l-ʿadhābi muḥ'ḍarūna

Marathi १६. आणि ज्यांनी (कुप्र) इन्कार केला होता, आणि आमच्या आयतींना व आखिरतच्या भेटीला खोटे ठरविले होते, त्या सर्वांना शिक्षा - यातनाग्रस्त करून हजर केले जाईल.

Verse 17

فَسُبْحَـٰنَ ٱللَّهِ حِينَ تُمْسُونَ وَحِينَ تُصْبِحُونَ

Transliteration fasub'ḥāna l-lahi ḥīna tum'sūna waḥīna tuṣ'biḥūna

Marathi १७. तेव्हा अल्लाहची स्तुती-प्रशंसा करीत राहा, जेव्हा तुम्ही संध्याकाळ कराल आणि जेव्हा सकाळ कराल.

Verse 18

وَلَهُ ٱلْحَمْدُ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَعَشِيًّا وَحِينَ تُظْهِرُونَ

Transliteration walahu l-ḥamdu fī l-samāwāti wal-arḍi waʿashiyyan waḥīna tuẓ'hirūna

Marathi १८. आणि सर्व स्तुती- प्रशंसेस योग्य, आकाशात व जमिनीवर तोच आहे तिसऱ्या प्रहरी आणि दुपारच्या वेळीही त्याची पवित्रता वर्णन करा.

Verse 19

يُخْرِجُ ٱلْحَىَّ مِنَ ٱلْمَيِّتِ وَيُخْرِجُ ٱلْمَيِّتَ مِنَ ٱلْحَىِّ وَيُحْىِ ٱلْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ وَكَذَٰلِكَ تُخْرَجُونَ

Transliteration yukh'riju l-ḥaya mina l-mayiti wayukh'riju l-mayita mina l-ḥayi wayuḥ'yī l-arḍa baʿda mawtihā wakadhālika tukh'rajūna

Marathi १९. तोच जिविताला मेलेल्यातून बाहेर काढतो आणि मेलेल्यास, जिवितातून बाहेर काढतो, आणि तोच जमिनीला तिच्या मृत्यूनंतर जिवंत करतो. अशाच प्रकारे तुम्ही (देखील) बाहेर काढले जाल.

Verse 20

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦٓ أَنْ خَلَقَكُم مِّن تُرَابٍ ثُمَّ إِذَآ أَنتُم بَشَرٌ تَنتَشِرُونَ

Transliteration wamin āyātihi an khalaqakum min turābin thumma idhā antum basharun tantashirūna

Marathi २०. आणि अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहे की तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग आता मनुष्य बनून (चालत फिरत) पसरत आहात.

Verse 21

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦٓ أَنْ خَلَقَ لَكُم مِّنْ أَنفُسِكُمْ أَزْوَٰجًا لِّتَسْكُنُوٓا۟ إِلَيْهَا وَجَعَلَ بَيْنَكُم مَّوَدَّةً وَرَحْمَةً ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ

Transliteration wamin āyātihi an khalaqa lakum min anfusikum azwājan litaskunū ilayhā wajaʿala baynakum mawaddatan waraḥmatan inna fī dhālika laāyātin liqawmin yatafakkarūna

Marathi २१. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आहे की तुमच्याच (मानव) जातीमधून पत्न्या निर्माण केल्या, यासाठी की तुम्ही त्यांच्यापासून सुख शांती प्राप्त करावी. त्याने तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा निर्माण केली. निःसंशय, विचार चिंतन करणाऱ्यांकरिता यात अनेक निशाण्या आहेत.

Verse 22

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦ خَلْقُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَٱخْتِلَـٰفُ أَلْسِنَتِكُمْ وَأَلْوَٰنِكُمْ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّلْعَـٰلِمِينَ

Transliteration wamin āyātihi khalqu l-samāwāti wal-arḍi wa-ikh'tilāfu alsinatikum wa-alwānikum inna fī dhālika laāyātin lil'ʿālimīna

Marathi २२. आणि त्याच्या सामर्थ्याच्या निशाण्यांपैकी आकाशांची व जमिनीची निर्मिती, आणि तुमच्या भाषा आणि वर्णांची विभिन्नता (देखील) होय. बुद्धिमानांकरिता निश्चितच यात मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 23

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦ مَنَامُكُم بِٱلَّيْلِ وَٱلنَّهَارِ وَٱبْتِغَآؤُكُم مِّن فَضْلِهِۦٓ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يَسْمَعُونَ

Transliteration wamin āyātihi manāmukum bi-al-layli wal-nahāri wa-ib'tighāukum min faḍlihi inna fī dhālika laāyātin liqawmin yasmaʿūna

Marathi २३. आणि त्याच्या सामर्थ्याचा निशाण्यांपैकी तुमच्या रात्र आणि दिवसाच्या झोपेत आहे आणि त्याच्या कृपेला (अर्थात आजिविकेला) तुमचे शोधणे (ही) आहे. जे लोक कान लावून (लक्षपूर्वक) ऐकणारे आहेत, त्यांच्यासाठी यात मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 24

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦ يُرِيكُمُ ٱلْبَرْقَ خَوْفًا وَطَمَعًا وَيُنَزِّلُ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَيُحْىِۦ بِهِ ٱلْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَآ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يَعْقِلُونَ

Transliteration wamin āyātihi yurīkumu l-barqa khawfan waṭamaʿan wayunazzilu mina l-samāi māan fayuḥ'yī bihi l-arḍa baʿda mawtihā inna fī dhālika laāyātin liqawmin yaʿqilūna

Marathi २४. आणि त्याच्या निशाण्यांपैकी एक निशाणी ही देखील आहे की तो तुम्हाला भयभीत व आशावान बनविण्याकरिता विजेची चमक दाखवितो, आणि आकाशातून पाणी वर्षवितो आणि त्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो. यात देखील बुद्धिमान लोकांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 25

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦٓ أَن تَقُومَ ٱلسَّمَآءُ وَٱلْأَرْضُ بِأَمْرِهِۦ ۚ ثُمَّ إِذَا دَعَاكُمْ دَعْوَةً مِّنَ ٱلْأَرْضِ إِذَآ أَنتُمْ تَخْرُجُونَ

Transliteration wamin āyātihi an taqūma l-samāu wal-arḍu bi-amrihi thumma idhā daʿākum daʿwatan mina l-arḍi idhā antum takhrujūna

Marathi २५. आणि त्याची एक निशाणी ही देखील आहे की आकाश आणि धरती त्याच्या आदेशाने कायम आहेत, मग जेव्हा तो तुम्हाला हाक मारेल, केवळ एक वेळच्या पुकारण्यानेच तुम्ही सर्व जमिनीतून बाहेर पडाल.

Verse 26

وَلَهُۥ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ كُلٌّ لَّهُۥ قَـٰنِتُونَ

Transliteration walahu man fī l-samāwāti wal-arḍi kullun lahu qānitūna

Marathi २६. आणि आकाश व धरतीच्या समस्त वस्तूंचा तोच स्वामी (मालक) आहे आणि सर्वच्या सर्व त्याच्या हुकुमाच्या अधीन आहेत.

Verse 27

وَهُوَ ٱلَّذِى يَبْدَؤُا۟ ٱلْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُۥ وَهُوَ أَهْوَنُ عَلَيْهِ ۚ وَلَهُ ٱلْمَثَلُ ٱلْأَعْلَىٰ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ

Transliteration wahuwa alladhī yabda-u l-khalqa thumma yuʿīduhu wahuwa ahwanu ʿalayhi walahu l-mathalu l-aʿlā fī l-samāwāti wal-arḍi wahuwa l-ʿazīzu l-ḥakīmu

Marathi २७. आणि तोच आहे जो पहिल्यांदा सृष्टी निर्माण करतो, तोच पुन्हा दुसऱ्यांदा निर्माण करील आणि हे त्याच्याकरिता फारच सोपे आहे. त्याचीच उत्तम आणि उच्च गुणविशेषता आहे१ आकाशांमध्ये आणि धरतीतही. तो मोठा जबरदस्त बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे.

Verse 28

ضَرَبَ لَكُم مَّثَلًا مِّنْ أَنفُسِكُمْ ۖ هَل لَّكُم مِّن مَّا مَلَكَتْ أَيْمَـٰنُكُم مِّن شُرَكَآءَ فِى مَا رَزَقْنَـٰكُمْ فَأَنتُمْ فِيهِ سَوَآءٌ تَخَافُونَهُمْ كَخِيفَتِكُمْ أَنفُسَكُمْ ۚ كَذَٰلِكَ نُفَصِّلُ ٱلْـَٔايَـٰتِ لِقَوْمٍ يَعْقِلُونَ

Transliteration ḍaraba lakum mathalan min anfusikum hal lakum min mā malakat aymānukum min shurakāa fī mā razaqnākum fa-antum fīhi sawāon takhāfūnahum kakhīfatikum anfusakum kadhālika nufaṣṣilu l-āyāti liqawmin yaʿqilūna

Marathi २८. अल्लाहने एक उदाहरण स्वतः तुमचेच सांगितले. जे काही आम्ही तुम्हाला प्रदान केले आहे, काय त्यात तुमच्या दासांपैकी कोणी तुमचा भागीदार आहे की तुम्ही आणि तो यात समान पदाचे असावेत? १ आणि तुम्ही त्याचे भय अशा प्रकारे राखता, जसे स्वतः आपल्या लोकांचे? आम्ही बुद्धिमानांकरिता अशाच प्रकारे स्पष्टतः आयती निवेदन करतो.

Verse 29

بَلِ ٱتَّبَعَ ٱلَّذِينَ ظَلَمُوٓا۟ أَهْوَآءَهُم بِغَيْرِ عِلْمٍ ۖ فَمَن يَهْدِى مَنْ أَضَلَّ ٱللَّهُ ۖ وَمَا لَهُم مِّن نَّـٰصِرِينَ

Transliteration bali ittabaʿa alladhīna ẓalamū ahwāahum bighayri ʿil'min faman yahdī man aḍalla l-lahu wamā lahum min nāṣirīna

Marathi २९. खरी गोष्ट अशी की हे अत्याचारी ज्ञानाविना इच्छा-आकांक्षांचे भक्त आहेत, त्याला कोण मार्ग दाखविल ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील? त्यांना कोणी एकही मदत करणारा नाही.

Verse 30

فَأَقِمْ وَجْهَكَ لِلدِّينِ حَنِيفًا ۚ فِطْرَتَ ٱللَّهِ ٱلَّتِى فَطَرَ ٱلنَّاسَ عَلَيْهَا ۚ لَا تَبْدِيلَ لِخَلْقِ ٱللَّهِ ۚ ذَٰلِكَ ٱلدِّينُ ٱلْقَيِّمُ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration fa-aqim wajhaka lilddīni ḥanīfan fiṭ'rata l-lahi allatī faṭara l-nāsa ʿalayhā lā tabdīla likhalqi l-lahi dhālika l-dīnu l-qayimu walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi ३०. तेव्हा तुम्ही एकाग्रचित्त होऊन आपला चेहरा दीन (धर्मा) कडे केंद्रित करा. अल्लाहचा तो स्वाभाविक (धर्म) ज्यावर त्याने लोकांना निर्माण केले आहे. अल्लाहच्या रचनेत परिवर्तन नाही. हाच खरा दीन (धर्म) आहे. परंतु अधिकांश लोक समजत नाहीत.

Verse 31

۞ مُنِيبِينَ إِلَيْهِ وَٱتَّقُوهُ وَأَقِيمُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَلَا تَكُونُوا۟ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ

Transliteration munībīna ilayhi wa-ittaqūhu wa-aqīmū l-ṣalata walā takūnū mina l-mush'rikīna

Marathi ३१. (लोकांनो!) अल्लाहकडे आकर्षित होऊन त्याचे भय बाळगत राहा आणि नमाज कायम राखा आणि अनेक ईश्वरांची भक्ती करणाऱ्यांपैकी होऊ नका.

Verse 32

مِنَ ٱلَّذِينَ فَرَّقُوا۟ دِينَهُمْ وَكَانُوا۟ شِيَعًا ۖ كُلُّ حِزْبٍۭ بِمَا لَدَيْهِمْ فَرِحُونَ

Transliteration mina alladhīna farraqū dīnahum wakānū shiyaʿan kullu ḥiz'bin bimā ladayhim fariḥūna

Marathi ३२. त्या लोकांपैकी ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला क्षत-विक्षत करून टाकले आणि स्वतःही समूहा-समूहात विभाजित झाले. प्रत्येक समूह आपल्याजवळ जे आहे, त्यातच मग्न आहे.

Verse 33

وَإِذَا مَسَّ ٱلنَّاسَ ضُرٌّ دَعَوْا۟ رَبَّهُم مُّنِيبِينَ إِلَيْهِ ثُمَّ إِذَآ أَذَاقَهُم مِّنْهُ رَحْمَةً إِذَا فَرِيقٌ مِّنْهُم بِرَبِّهِمْ يُشْرِكُونَ

Transliteration wa-idhā massa l-nāsa ḍurrun daʿaw rabbahum munībīna ilayhi thumma idhā adhāqahum min'hu raḥmatan idhā farīqun min'hum birabbihim yush'rikūna

Marathi ३३. आणि लोकांना जेव्हा एखादे दुःख पोहचते, तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होऊन दुआ- प्रार्थना करू लागतात आणि जेव्हा तो आपल्यातर्फे दया-कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा त्यांच्यातला एक गट आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्याला त्याचा सहभागी ठरवू लागतो.

Verse 34

لِيَكْفُرُوا۟ بِمَآ ءَاتَيْنَـٰهُمْ ۚ فَتَمَتَّعُوا۟ فَسَوْفَ تَعْلَمُونَ

Transliteration liyakfurū bimā ātaynāhum fatamattaʿū fasawfa taʿlamūna

Marathi ३४. यासाठी की, जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे कृतघ्नता दाखवावी. ठीक आहे. तुम्ही लाभ उचलून घ्या. फार लवकर तुम्हाला माहीत पडेल.

Verse 35

أَمْ أَنزَلْنَا عَلَيْهِمْ سُلْطَـٰنًا فَهُوَ يَتَكَلَّمُ بِمَا كَانُوا۟ بِهِۦ يُشْرِكُونَ

Transliteration am anzalnā ʿalayhim sul'ṭānan fahuwa yatakallamu bimā kānū bihi yush'rikūna

Marathi ३५. काय आम्ही यांच्यावर एखादी सनद अवतरित केली आहे, जी त्यास निवेदिते, ज्यास हे अल्लाहसोबत सहभागी ठरवीत आहेत.

Verse 36

وَإِذَآ أَذَقْنَا ٱلنَّاسَ رَحْمَةً فَرِحُوا۟ بِهَا ۖ وَإِن تُصِبْهُمْ سَيِّئَةٌۢ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ إِذَا هُمْ يَقْنَطُونَ

Transliteration wa-idhā adhaqnā l-nāsa raḥmatan fariḥū bihā wa-in tuṣib'hum sayyi-atun bimā qaddamat aydīhim idhā hum yaqnaṭūna

Marathi ३६. आणि जेव्हा आम्ही लोकांना रहमत (दया-कृपे)ची गोडी चाखिवतो तेव्हा ते खूप आनंदित होतात आणि जर त्यांना आपल्या हातांच्या दुष्कर्मामुळे एखादे दुःख पोहचते, तेव्हा अचानक ते निराश होतात.

Verse 37

أَوَلَمْ يَرَوْا۟ أَنَّ ٱللَّهَ يَبْسُطُ ٱلرِّزْقَ لِمَن يَشَآءُ وَيَقْدِرُ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ

Transliteration awalam yaraw anna l-laha yabsuṭu l-riz'qa liman yashāu wayaqdiru inna fī dhālika laāyātin liqawmin yu'minūna

Marathi ३७. काय त्यांनी हे नाही पाहिले की अल्लाह ज्याला इच्छितो भरपूर आजिविका (रोजी) देतो आणि ज्याला इच्छितो कमी. यातही त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.

Verse 38

فَـَٔاتِ ذَا ٱلْقُرْبَىٰ حَقَّهُۥ وَٱلْمِسْكِينَ وَٱبْنَ ٱلسَّبِيلِ ۚ ذَٰلِكَ خَيْرٌ لِّلَّذِينَ يُرِيدُونَ وَجْهَ ٱللَّهِ ۖ وَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْمُفْلِحُونَ

Transliteration faāti dhā l-qur'bā ḥaqqahu wal-mis'kīna wa-ib'na l-sabīli dhālika khayrun lilladhīna yurīdūna wajha l-lahi wa-ulāika humu l-muf'liḥūna

Marathi ३८. यास्तव जवळच्या नातेवाईकाला, गरीबाला, प्रवाशाला, प्रत्येकाला त्याचा हक्क द्या. हे त्यांच्यासाठी अधिक चांगले आहे जे अल्लाहच्या मुखाचे दर्शन घेऊ इच्छितात. असेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत.

Verse 39

وَمَآ ءَاتَيْتُم مِّن رِّبًا لِّيَرْبُوَا۟ فِىٓ أَمْوَٰلِ ٱلنَّاسِ فَلَا يَرْبُوا۟ عِندَ ٱللَّهِ ۖ وَمَآ ءَاتَيْتُم مِّن زَكَوٰةٍ تُرِيدُونَ وَجْهَ ٱللَّهِ فَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْمُضْعِفُونَ

Transliteration wamā ātaytum min riban liyarbuwā fī amwāli l-nāsi falā yarbū ʿinda l-lahi wamā ātaytum min zakatin turīdūna wajha l-lahi fa-ulāika humu l-muḍ'ʿifūna

Marathi ३९. आणि तुम्ही जे काही व्याजाने देता की लोकांचे धन वाढत राहावे ते अल्लाहच्या येथे वाढत नाही आणि जे काही (सदका-दान आणि) जकात (कर्तव्य दान) तुम्ही अल्लाहचे मुख पाहण्या (मर्जी संपादण्या) करिता द्याल तर असेच लोक आपले (धन) वाढविणारे आहेत.

Verse 40

ٱللَّهُ ٱلَّذِى خَلَقَكُمْ ثُمَّ رَزَقَكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يُحْيِيكُمْ ۖ هَلْ مِن شُرَكَآئِكُم مَّن يَفْعَلُ مِن ذَٰلِكُم مِّن شَىْءٍ ۚ سُبْحَـٰنَهُۥ وَتَعَـٰلَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ

Transliteration al-lahu alladhī khalaqakum thumma razaqakum thumma yumītukum thumma yuḥ'yīkum hal min shurakāikum man yafʿalu min dhālikum min shayin sub'ḥānahu wataʿālā ʿammā yush'rikūna

Marathi ४०. अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग आजिविका प्रदान केली, मग मृत्यु देईल, पुन्हा दुसऱ्यांदा जिवंत करील. आता सांगा, तुम्ही ठरविलेल्या (अल्लाहच्या) सहभागींपैकी एक तरी असा आहे जो या गोष्टींपैकी काहीतरी करू शकत असेल. अल्लाहकरिता पवित्रता आणि श्रेष्ठता आहे अशा त्या प्रत्येक सहभागीपेक्षा, ज्याला हे लोक मनाने रचून घेतात.

Verse 41

ظَهَرَ ٱلْفَسَادُ فِى ٱلْبَرِّ وَٱلْبَحْرِ بِمَا كَسَبَتْ أَيْدِى ٱلنَّاسِ لِيُذِيقَهُم بَعْضَ ٱلَّذِى عَمِلُوا۟ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ

Transliteration ẓahara l-fasādu fī l-bari wal-baḥri bimā kasabat aydī l-nāsi liyudhīqahum baʿḍa alladhī ʿamilū laʿallahum yarjiʿūna

Marathi ४१. खुष्की आणि पाण्यात लोकांच्या दुष्कर्मांमुळे उत्पात (फसाद) पसरला, यासाठी की त्यांना, त्यांच्या काही दुष्कर्मांचे फळ अल्लाहने चाखवावे. (फार) संभव आहे की त्यांनी (दुष्कर्म करणे) थांबवावे.

Verse 42

قُلْ سِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَٱنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلَّذِينَ مِن قَبْلُ ۚ كَانَ أَكْثَرُهُم مُّشْرِكِينَ

Transliteration qul sīrū fī l-arḍi fa-unẓurū kayfa kāna ʿāqibatu alladhīna min qablu kāna aktharuhum mush'rikīna

Marathi ४२. तुम्ही सांगा, जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहा तरी की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा शेवट कसा झाला, ज्यांच्यात अधिकांश लोक अनेक ईश्वरांची पूजा करणारे होते.

Verse 43

فَأَقِمْ وَجْهَكَ لِلدِّينِ ٱلْقَيِّمِ مِن قَبْلِ أَن يَأْتِىَ يَوْمٌ لَّا مَرَدَّ لَهُۥ مِنَ ٱللَّهِ ۖ يَوْمَئِذٍ يَصَّدَّعُونَ

Transliteration fa-aqim wajhaka lilddīni l-qayimi min qabli an yatiya yawmun lā maradda lahu mina l-lahi yawma-idhin yaṣṣaddaʿūna

Marathi ४३. तेव्हा तुम्ही तुमचे तोंड त्या सरळ आणि सच्चा दीन (धर्मा) कडेच राखा, याआधी की तो दिवस यावा, ज्याचे परतणे अल्लाहतर्फे नाहीच. त्या दिवशी सर्व वेगवेगळे होतील.

Verse 44

مَن كَفَرَ فَعَلَيْهِ كُفْرُهُۥ ۖ وَمَنْ عَمِلَ صَـٰلِحًا فَلِأَنفُسِهِمْ يَمْهَدُونَ

Transliteration man kafara faʿalayhi kuf'ruhu waman ʿamila ṣāliḥan fali-anfusihim yamhadūna

Marathi ४४. (सत्याचा) इन्कार करणाऱ्यांवर त्यांचा इन्कार ओढवेल, आणि सत्कर्म करणारे आपल्याच विश्रामगृहाला सुंदर बनवित आहेत.

Verse 45

لِيَجْزِىَ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ مِن فَضْلِهِۦٓ ۚ إِنَّهُۥ لَا يُحِبُّ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration liyajziya alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti min faḍlihi innahu lā yuḥibbu l-kāfirīna

Marathi ४५. यासाठी की अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना फल प्रदान करावे. ज्याने ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिला तो काफिरांना दोस्त राखत नाही.

Verse 46

وَمِنْ ءَايَـٰتِهِۦٓ أَن يُرْسِلَ ٱلرِّيَاحَ مُبَشِّرَٰتٍ وَلِيُذِيقَكُم مِّن رَّحْمَتِهِۦ وَلِتَجْرِىَ ٱلْفُلْكُ بِأَمْرِهِۦ وَلِتَبْتَغُوا۟ مِن فَضْلِهِۦ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ

Transliteration wamin āyātihi an yur'sila l-riyāḥa mubashirātin waliyudhīqakum min raḥmatihi walitajriya l-ful'ku bi-amrihi walitabtaghū min faḍlihi walaʿallakum tashkurūna

Marathi ४६. आणि त्याच्या निशाण्यांपैकी शुभ समाचार देणाऱ्या वाऱ्यांना चालविणेही आहे, यासाठी की तुम्हाला आपल्या दया-कृपेची गोडी चाखवावी, आणि यासाठी की त्याच्या आदेशाने नौका चालवाव्यात आणि यासाठी की त्याच्या कृपेचा तुम्ही शोध घ्यावा, आणि यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.

Verse 47

وَلَقَدْ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ رُسُلًا إِلَىٰ قَوْمِهِمْ فَجَآءُوهُم بِٱلْبَيِّنَـٰتِ فَٱنتَقَمْنَا مِنَ ٱلَّذِينَ أَجْرَمُوا۟ ۖ وَكَانَ حَقًّا عَلَيْنَا نَصْرُ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration walaqad arsalnā min qablika rusulan ilā qawmihim fajāūhum bil-bayināti fa-intaqamnā mina alladhīna ajramū wakāna ḥaqqan ʿalaynā naṣru l-mu'minīna

Marathi ४७. आणि आम्ही तुमच्या पूर्वीही (आपल्या) पैगंबरांना त्यांच्या जनसमूहांकडे पाठविले, ते त्यांच्याजवळ प्रमाण (पुरावे) घेऊन आले, मग आम्ही तुमच्या अपराधांचा सूड (प्रतिशोध) घेतला. ईमान राखणाऱ्यांना मदत करणे आमच्यावर अनिवार्य आहे.

Verse 48

ٱللَّهُ ٱلَّذِى يُرْسِلُ ٱلرِّيَـٰحَ فَتُثِيرُ سَحَابًا فَيَبْسُطُهُۥ فِى ٱلسَّمَآءِ كَيْفَ يَشَآءُ وَيَجْعَلُهُۥ كِسَفًا فَتَرَى ٱلْوَدْقَ يَخْرُجُ مِنْ خِلَـٰلِهِۦ ۖ فَإِذَآ أَصَابَ بِهِۦ مَن يَشَآءُ مِنْ عِبَادِهِۦٓ إِذَا هُمْ يَسْتَبْشِرُونَ

Transliteration al-lahu alladhī yur'silu l-riyāḥa fatuthīru saḥāban fayabsuṭuhu fī l-samāi kayfa yashāu wayajʿaluhu kisafan fatarā l-wadqa yakhruju min khilālihi fa-idhā aṣāba bihi man yashāu min ʿibādihi idhā hum yastabshirūna

Marathi ४८. तो अल्लाहच होय जो वारे वाहवितो, ते ढगांना उचलतात, मग अल्लाह आपल्या मर्जीने त्यांना आकाशात पसरवितो आणि त्यांचे तुकडे तुकडे करतो, मग तुम्ही पाहता की त्यांच्यातून (पाण्याचे) थेंब बाहेर पडतात आणि ज्यांना अल्लाह इच्छितो, त्या दासांवर तो पर्जन्यवृष्टी करतो तेव्हा ते खूप आनंदित होतात.

Verse 49

وَإِن كَانُوا۟ مِن قَبْلِ أَن يُنَزَّلَ عَلَيْهِم مِّن قَبْلِهِۦ لَمُبْلِسِينَ

Transliteration wa-in kānū min qabli an yunazzala ʿalayhim min qablihi lamub'lisīna

Marathi ४९. आणि विश्वास करा की पाऊस त्यांच्यावर पडण्यापूर्वी ते निराश होत होते.

Verse 50

فَٱنظُرْ إِلَىٰٓ ءَاثَـٰرِ رَحْمَتِ ٱللَّهِ كَيْفَ يُحْىِ ٱلْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَآ ۚ إِنَّ ذَٰلِكَ لَمُحْىِ ٱلْمَوْتَىٰ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ

Transliteration fa-unẓur ilā āthāri raḥmati l-lahi kayfa yuḥ'yī l-arḍa baʿda mawtihā inna dhālika lamuḥ'yī l-mawtā wahuwa ʿalā kulli shayin qadīrun

Marathi ५०. तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कृपा-चिन्हांना पाहा की जमिनीच्या मृत्युनंतर कशा प्रकारे अल्लाह तिला (पुन्हा) जिवंत करतो. निःसंशय, तोच मेलेल्यांना (पुनश्च) जिवंत करणारा आहे आणि तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.

Verse 51

وَلَئِنْ أَرْسَلْنَا رِيحًا فَرَأَوْهُ مُصْفَرًّا لَّظَلُّوا۟ مِنۢ بَعْدِهِۦ يَكْفُرُونَ

Transliteration wala-in arsalnā rīḥan fara-awhu muṣ'farran laẓallū min baʿdihi yakfurūna

Marathi ५१. आणि जर आम्ही वेगवान वारा वाहवू आणि हे लोक आपल्या शेतीला (कोमेजलेली) पिवळी पडलेली पाहतील तर मग त्यानंतर ते कृतघ्नता दाखवू लागतील.

Verse 52

فَإِنَّكَ لَا تُسْمِعُ ٱلْمَوْتَىٰ وَلَا تُسْمِعُ ٱلصُّمَّ ٱلدُّعَآءَ إِذَا وَلَّوْا۟ مُدْبِرِينَ

Transliteration fa-innaka lā tus'miʿu l-mawtā walā tus'miʿu l-ṣuma l-duʿāa idhā wallaw mud'birīna

Marathi ५२. निःसंशय, तुम्ही मृतांना ऐकवू शकत नाही आणि ना बहिऱ्यांना (आपली) पुकार ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून वळले असतील.

Verse 53

وَمَآ أَنتَ بِهَـٰدِ ٱلْعُمْىِ عَن ضَلَـٰلَتِهِمْ ۖ إِن تُسْمِعُ إِلَّا مَن يُؤْمِنُ بِـَٔايَـٰتِنَا فَهُم مُّسْلِمُونَ

Transliteration wamā anta bihādi l-ʿum'yi ʿan ḍalālatihim in tus'miʿu illā man yu'minu biāyātinā fahum mus'limūna

Marathi ५३. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेतून काढून मार्गदर्शन करणारे आहात. तुम्ही तर केवळ अशाच लोकांना ऐकवू शकता जे आमच्या आयतींवर ईमान राखतात आणि ते आज्ञाधारकही आहेत.

Verse 54

۞ ٱللَّهُ ٱلَّذِى خَلَقَكُم مِّن ضَعْفٍ ثُمَّ جَعَلَ مِنۢ بَعْدِ ضَعْفٍ قُوَّةً ثُمَّ جَعَلَ مِنۢ بَعْدِ قُوَّةٍ ضَعْفًا وَشَيْبَةً ۚ يَخْلُقُ مَا يَشَآءُ ۖ وَهُوَ ٱلْعَلِيمُ ٱلْقَدِيرُ

Transliteration al-lahu alladhī khalaqakum min ḍaʿfin thumma jaʿala min baʿdi ḍaʿfin quwwatan thumma jaʿala min baʿdi quwwatin ḍaʿfan washaybatan yakhluqu mā yashāu wahuwa l-ʿalīmu l-qadīru

Marathi ५४. अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला कमजोर अवस्थेत निर्माण केले, मग त्या दुर्बलतेनंतर शक्ती-सामर्थ्य प्रदान केले, मग त्या शक्तीनंतर कमजोरी आणि म्हातारपण दिले. तो जे इच्छितो निर्माण करतो, तो सर्वांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सर्वांवर पूर्ण सामर्थ्य राखतो.

Verse 55

وَيَوْمَ تَقُومُ ٱلسَّاعَةُ يُقْسِمُ ٱلْمُجْرِمُونَ مَا لَبِثُوا۟ غَيْرَ سَاعَةٍ ۚ كَذَٰلِكَ كَانُوا۟ يُؤْفَكُونَ

Transliteration wayawma taqūmu l-sāʿatu yuq'simu l-muj'rimūna mā labithū ghayra sāʿatin kadhālika kānū yu'fakūna

Marathi ५५. आणि ज्या दिवशी कयामत येईल, अपराधी लोक शपथपूर्वक सांगतील की (जगात) एक क्षणाशिवाय जास्त राहिलो नाहीत. अशाच प्रकारे बहकलेलेच राहिले.

Verse 56

وَقَالَ ٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْعِلْمَ وَٱلْإِيمَـٰنَ لَقَدْ لَبِثْتُمْ فِى كِتَـٰبِ ٱللَّهِ إِلَىٰ يَوْمِ ٱلْبَعْثِ ۖ فَهَـٰذَا يَوْمُ ٱلْبَعْثِ وَلَـٰكِنَّكُمْ كُنتُمْ لَا تَعْلَمُونَ

Transliteration waqāla alladhīna ūtū l-ʿil'ma wal-īmāna laqad labith'tum fī kitābi l-lahi ilā yawmi l-baʿthi fahādhā yawmu l-baʿthi walākinnakum kuntum lā taʿlamūna

Marathi ५६. आणि ज्या लोकांना ज्ञान आणि ईमान प्रदान केले गेले, ते उत्तर देतील की, तुम्ही तर जसे की अल्लाहच्या ग्रंथात आहे, कयामतच्या दिवसापर्यंत राहिलात. आजचा हा दिवस कयामतचाच दिवस आहे. परंतु तुम्ही तर विश्वासच ठेवत नव्हते.

Verse 57

فَيَوْمَئِذٍ لَّا يَنفَعُ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ مَعْذِرَتُهُمْ وَلَا هُمْ يُسْتَعْتَبُونَ

Transliteration fayawma-idhin lā yanfaʿu alladhīna ẓalamū maʿdhiratuhum walā hum yus'taʿtabūna

Marathi ५७. तेव्हा त्या दिवशी अत्याचारी लोकांना त्यांचे प्रमाण-पुरावे काहीच उपयोगी पडणार नाहीत आणि ना त्यांच्याकडून क्षमा-याचनेची मागणी केली जाईल, ना कर्म मागितले जाईल.

Verse 58

وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِى هَـٰذَا ٱلْقُرْءَانِ مِن كُلِّ مَثَلٍ ۚ وَلَئِن جِئْتَهُم بِـَٔايَةٍ لَّيَقُولَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِنْ أَنتُمْ إِلَّا مُبْطِلُونَ

Transliteration walaqad ḍarabnā lilnnāsi fī hādhā l-qur'āni min kulli mathalin wala-in ji'tahum biāyatin layaqūlanna alladhīna kafarū in antum illā mub'ṭilūna

Marathi ५८. आणि निःसंशय, आम्ही या कुरआनात लोकांसमोर सर्व उदाहरणे प्रस्तुत केली आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ कोणतीही निशाणी आणाल तरी ते हेच म्हणतील की तुम्ही खोटे आहात.

Verse 59

كَذَٰلِكَ يَطْبَعُ ٱللَّهُ عَلَىٰ قُلُوبِ ٱلَّذِينَ لَا يَعْلَمُونَ

Transliteration kadhālika yaṭbaʿu l-lahu ʿalā qulūbi alladhīna lā yaʿlamūna

Marathi ५९. अल्लाह, त्या लोकांच्या हृदयांवर, जे समज बाळगत नाहीत, अशाच प्रकारे मोहर (सील) लावतो.

Verse 60

فَٱصْبِرْ إِنَّ وَعْدَ ٱللَّهِ حَقٌّ ۖ وَلَا يَسْتَخِفَّنَّكَ ٱلَّذِينَ لَا يُوقِنُونَ

Transliteration fa-iṣ'bir inna waʿda l-lahi ḥaqqun walā yastakhiffannaka alladhīna lā yūqinūna

Marathi ६०. यास्तव तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय, अल्लाहचा वायदा सच्चा आहे. तुम्हाला त्या लोकांनी हलके (अधीर) जाणू नये, जे विश्वास बाळगत नाहीत.

Read Surah Ar-Rum in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.