MyDugsiStart learning

Surah An-Nahl in Marathi: translation and audio

Surah 16 · النحل · The Bee · 128 verses

Surah An-Nahl verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah An-Nahl word by word in English.

Verse 1

أَتَىٰٓ أَمْرُ ٱللَّهِ فَلَا تَسْتَعْجِلُوهُ ۚ سُبْحَـٰنَهُۥ وَتَعَـٰلَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ

Transliteration atā amru l-lahi falā tastaʿjilūhu sub'ḥānahu wataʿālā ʿammā yush'rikūna

Marathi १. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला, आता याची घाई माजवू नका समस्त पवित्रता त्याच्यासाठी आहे, तो सर्वांत महान आहे, त्या सर्वांपेक्षा ज्यांना हे अल्लाहच्या जवळ भागीदार असल्याचे सांगतात.

Verse 2

يُنَزِّلُ ٱلْمَلَـٰٓئِكَةَ بِٱلرُّوحِ مِنْ أَمْرِهِۦ عَلَىٰ مَن يَشَآءُ مِنْ عِبَادِهِۦٓ أَنْ أَنذِرُوٓا۟ أَنَّهُۥ لَآ إِلَـٰهَ إِلَّآ أَنَا۠ فَٱتَّقُونِ

Transliteration yunazzilu l-malāikata bil-rūḥi min amrihi ʿalā man yashāu min ʿibādihi an andhirū annahu lā ilāha illā anā fa-ittaqūni

Marathi २. तोच फरिश्त्यांना आपली वहयी (प्रकाशना) देऊन आपल्या आदेशाद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याच्यावर इच्छितो उतरवितो, यासाठी की, तुम्ही, लोकांना सचेत करावे की माझ्याशिवाय दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही, यास्तव तुम्ही माझे भय राखा.

Verse 3

خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ بِٱلْحَقِّ ۚ تَعَـٰلَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ

Transliteration khalaqa l-samāwāti wal-arḍa bil-ḥaqi taʿālā ʿammā yush'rikūna

Marathi ३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह निर्माण केले. तो तर त्याहून उच्चतम आहे जे अनेकेश्वरवादी करतात.

Verse 4

خَلَقَ ٱلْإِنسَـٰنَ مِن نُّطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُّبِينٌ

Transliteration khalaqa l-insāna min nuṭ'fatin fa-idhā huwa khaṣīmun mubīnun

Marathi ४. त्याने मानवांना वीर्यापासून निर्माण केले, मग तो उघड भांडखोर बनला.

Verse 5

وَٱلْأَنْعَـٰمَ خَلَقَهَا ۗ لَكُمْ فِيهَا دِفْءٌ وَمَنَـٰفِعُ وَمِنْهَا تَأْكُلُونَ

Transliteration wal-anʿāma khalaqahā lakum fīhā dif'on wamanāfiʿu wamin'hā takulūna

Marathi ५. त्यानेच जनावरे निर्माण केलीत, ज्यात तुमच्यासाठी उष्णता देणारे कपडे आहेत. इतरही अनेक फायदे आहेत आणि काही तुमच्या खाण्यासाठी उपयोगी पडतात.

Verse 6

وَلَكُمْ فِيهَا جَمَالٌ حِينَ تُرِيحُونَ وَحِينَ تَسْرَحُونَ

Transliteration walakum fīhā jamālun ḥīna turīḥūna waḥīna tasraḥūna

Marathi ६. आणि त्यांच्यात तुमच्यासाठी शोभाही आहे जेव्हा त्यांना चारून आणाल तेव्हाही आणि जेव्हा चारण्यासाठी न्याल तेव्हाही.

Verse 7

وَتَحْمِلُ أَثْقَالَكُمْ إِلَىٰ بَلَدٍ لَّمْ تَكُونُوا۟ بَـٰلِغِيهِ إِلَّا بِشِقِّ ٱلْأَنفُسِ ۚ إِنَّ رَبَّكُمْ لَرَءُوفٌ رَّحِيمٌ

Transliteration wataḥmilu athqālakum ilā baladin lam takūnū bālighīhi illā bishiqqi l-anfusi inna rabbakum laraūfun raḥīmun

Marathi ७. आणि ते तुमचे ओझे त्या शहरांपर्यंत उचलून नेतात, जिथे तुम्ही जीव अर्धा केल्याविना पोहचू शकत नव्हते. निःसंशय, तुमचा पालनकर्ता अतिशय स्नेहशील आणि खूप खूप दया करणारा आहे.

Verse 8

وَٱلْخَيْلَ وَٱلْبِغَالَ وَٱلْحَمِيرَ لِتَرْكَبُوهَا وَزِينَةً ۚ وَيَخْلُقُ مَا لَا تَعْلَمُونَ

Transliteration wal-khayla wal-bighāla wal-ḥamīra litarkabūhā wazīnatan wayakhluqu mā lā taʿlamūna

Marathi ८. आणि घोड्यांना, खच्चरांना, गाढवांना (त्यानेच निर्माण केले) यासाठी की तुम्ही त्यांना वाहनाच्या स्वरूपात वापरात आणावे आणि ते शोभा सजावटीचे साधनही आहेत. इतरही तो अशा वस्तू निर्माण करतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत.

Verse 9

وَعَلَى ٱللَّهِ قَصْدُ ٱلسَّبِيلِ وَمِنْهَا جَآئِرٌ ۚ وَلَوْ شَآءَ لَهَدَىٰكُمْ أَجْمَعِينَ

Transliteration waʿalā l-lahi qaṣdu l-sabīli wamin'hā jāirun walaw shāa lahadākum ajmaʿīna

Marathi ९. आणि अल्लाहपर्यंत पोहचण्याचा मार्ग सरळ मार्ग आहे आणि काही वाकडे मार्गही आहेत आणि त्याने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना सरळ मार्गास लावले असते.

Verse 10

هُوَ ٱلَّذِىٓ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً ۖ لَّكُم مِّنْهُ شَرَابٌ وَمِنْهُ شَجَرٌ فِيهِ تُسِيمُونَ

Transliteration huwa alladhī anzala mina l-samāi māan lakum min'hu sharābun wamin'hu shajarun fīhi tusīmūna

Marathi १०. तोच तुमच्या फायद्याकरिता आकाशातून पर्जन्य वृष्टी करतो जे तुम्ही पीता ही आणि त्याद्वारे उगवलेल्या झाडांना तुम्ही आपल्या जनावरांनना चारतात.

Verse 11

يُنۢبِتُ لَكُم بِهِ ٱلزَّرْعَ وَٱلزَّيْتُونَ وَٱلنَّخِيلَ وَٱلْأَعْنَـٰبَ وَمِن كُلِّ ٱلثَّمَرَٰتِ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ

Transliteration yunbitu lakum bihi l-zarʿa wal-zaytūna wal-nakhīla wal-aʿnāba wamin kulli l-thamarāti inna fī dhālika laāyatan liqawmin yatafakkarūna

Marathi ११. याच्याचद्वारे तो तुमच्यासाठी शेती आणि जैतून आणि खजूर आणि द्राक्ष व सर्व प्रकारची फळे उगवितो. निःसंशय, चिंतन करणाऱ्या लोकांसाठी यात मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 12

وَسَخَّرَ لَكُمُ ٱلَّيْلَ وَٱلنَّهَارَ وَٱلشَّمْسَ وَٱلْقَمَرَ ۖ وَٱلنُّجُومُ مُسَخَّرَٰتٌۢ بِأَمْرِهِۦٓ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يَعْقِلُونَ

Transliteration wasakhara lakumu al-layla wal-nahāra wal-shamsa wal-qamara wal-nujūmu musakharātun bi-amrihi inna fī dhālika laāyātin liqawmin yaʿqilūna

Marathi १२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला आणि सूर्य व चंद्राला तुमच्या सेवेत लावले आहे आणि तारे देखील त्याच्याच हुकुमाच्या अधीन आहेत. निःसंशय, यात बुद्धिमानांकरिता अनेक प्रकारच्या निशाण्या आहेत.

Verse 13

وَمَا ذَرَأَ لَكُمْ فِى ٱلْأَرْضِ مُخْتَلِفًا أَلْوَٰنُهُۥٓ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَذَّكَّرُونَ

Transliteration wamā dhara-a lakum fī l-arḍi mukh'talifan alwānuhu inna fī dhālika laāyatan liqawmin yadhakkarūna

Marathi १३. आणि इतरही (विविध प्रकारच्या) अनेक रंग रूप असलेल्या वस्तू त्याने तुमच्यासाठी धरतीत पसरवून ठेवल्या आहेत. निःसंशय, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता यात मोठ्या जबरदस्त निशाण्या आहेत.

Verse 14

وَهُوَ ٱلَّذِى سَخَّرَ ٱلْبَحْرَ لِتَأْكُلُوا۟ مِنْهُ لَحْمًا طَرِيًّا وَتَسْتَخْرِجُوا۟ مِنْهُ حِلْيَةً تَلْبَسُونَهَا وَتَرَى ٱلْفُلْكَ مَوَاخِرَ فِيهِ وَلِتَبْتَغُوا۟ مِن فَضْلِهِۦ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ

Transliteration wahuwa alladhī sakhara l-baḥra litakulū min'hu laḥman ṭariyyan watastakhrijū min'hu ḥil'yatan talbasūnahā watarā l-ful'ka mawākhira fīhi walitabtaghū min faḍlihi walaʿallakum tashkurūna

Marathi १४. आणि समुद्रांनाही तुमच्या अधीन करून ठेवले आहे की तुम्ही यातून निघालेले ताजे मांस खावे आणि यातून आपल्या अंगावर घालण्याकरिता दागिने काढू शकावे, आणि तुम्ही पाहाल की नावा यात पाण्याला चिरत चालतात आणि यासाठीही की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि संभवतः तुम्ही कृतज्ञताही व्यक्त करावी.

Verse 15

وَأَلْقَىٰ فِى ٱلْأَرْضِ رَوَٰسِىَ أَن تَمِيدَ بِكُمْ وَأَنْهَـٰرًا وَسُبُلًا لَّعَلَّكُمْ تَهْتَدُونَ

Transliteration wa-alqā fī l-arḍi rawāsiya an tamīda bikum wa-anhāran wasubulan laʿallakum tahtadūna

Marathi १५. आणि त्याने धरतीवर पर्वत गाडले आहेत, यासाठी की तिने तुमच्यासह हलू नये आणि नद्या व मार्ग बनविले, यासाठी की तुम्ही उद्दिष्टाप्रत पोहचावे.

Verse 16

وَعَلَـٰمَـٰتٍ ۚ وَبِٱلنَّجْمِ هُمْ يَهْتَدُونَ

Transliteration waʿalāmātin wabil-najmi hum yahtadūna

Marathi १६. दुसऱ्याही अनेक निशाण्या (निर्धारीत केल्या) आणि ताऱ्यांद्वारेही लोक मार्ग प्राप्त करून घेतात.

Verse 17

أَفَمَن يَخْلُقُ كَمَن لَّا يَخْلُقُ ۗ أَفَلَا تَذَكَّرُونَ

Transliteration afaman yakhluqu kaman lā yakhluqu afalā tadhakkarūna

Marathi १७. तर काय तो, जो निर्माण करतो, त्याच्या समान आहे, जो निर्माण करू शकत नाही? काय तुम्ही कधीच विचार करीत नाही?

Verse 18

وَإِن تَعُدُّوا۟ نِعْمَةَ ٱللَّهِ لَا تُحْصُوهَآ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَغَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration wa-in taʿuddū niʿ'mata l-lahi lā tuḥ'ṣūhā inna l-laha laghafūrun raḥīmun

Marathi १८. आणि जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांचा हिशोब (गणना) करू पाहाल तर तुम्ही तो कधीच करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोफा माफ करणारा दया करणारा आहे.

Verse 19

وَٱللَّهُ يَعْلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعْلِنُونَ

Transliteration wal-lahu yaʿlamu mā tusirrūna wamā tuʿ'linūna

Marathi १९. आणि जे काही तुम्ही लपवाल किंवा उघड कराल, अल्लाह सर्व काही जाणतो.

Verse 20

وَٱلَّذِينَ يَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَا يَخْلُقُونَ شَيْـًٔا وَهُمْ يُخْلَقُونَ

Transliteration wa-alladhīna yadʿūna min dūni l-lahi lā yakhluqūna shayan wahum yukh'laqūna

Marathi २०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीज ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, उलट हे स्वतः निर्माण केले गेले आहेत.

Verse 21

أَمْوَٰتٌ غَيْرُ أَحْيَآءٍ ۖ وَمَا يَشْعُرُونَ أَيَّانَ يُبْعَثُونَ

Transliteration amwātun ghayru aḥyāin wamā yashʿurūna ayyāna yub'ʿathūna

Marathi २१. मेलेले आहेत, जिवंत नाहीत. त्यांना तर हेही माहीत नाही की केव्हा (जिवंत करून) उठवले जातील.

Verse 22

إِلَـٰهُكُمْ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ ۚ فَٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ قُلُوبُهُم مُّنكِرَةٌ وَهُم مُّسْتَكْبِرُونَ

Transliteration ilāhukum ilāhun wāḥidun fa-alladhīna lā yu'minūna bil-ākhirati qulūbuhum munkiratun wahum mus'takbirūna

Marathi २२. तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाह एकटा आहे, आणि आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांची मने भ्रष्ट आहेत. आणि ते स्वतः गर्विष्ठ आहेत.

Verse 23

لَا جَرَمَ أَنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ ۚ إِنَّهُۥ لَا يُحِبُّ ٱلْمُسْتَكْبِرِينَ

Transliteration lā jarama anna l-laha yaʿlamu mā yusirrūna wamā yuʿ'linūna innahu lā yuḥibbu l-mus'takbirīna

Marathi २३. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह, त्या प्रत्येक गोष्टीला, जिला ते लपवितात आणि जिला जाहीर करतात, चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह घमेंडी लोकांना पसंत करीत नाही.

Verse 24

وَإِذَا قِيلَ لَهُم مَّاذَآ أَنزَلَ رَبُّكُمْ ۙ قَالُوٓا۟ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration wa-idhā qīla lahum mādhā anzala rabbukum qālū asāṭīru l-awalīna

Marathi २४. आणि त्यांना जेव्हा विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरीत केले आहे, तेव्हा उत्तर देतात की पूर्वीच्या लोकांच्या कथा कहाण्या आहेत.

Verse 25

لِيَحْمِلُوٓا۟ أَوْزَارَهُمْ كَامِلَةً يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ ۙ وَمِنْ أَوْزَارِ ٱلَّذِينَ يُضِلُّونَهُم بِغَيْرِ عِلْمٍ ۗ أَلَا سَآءَ مَا يَزِرُونَ

Transliteration liyaḥmilū awzārahum kāmilatan yawma l-qiyāmati wamin awzāri alladhīna yuḍillūnahum bighayri ʿil'min alā sāa mā yazirūna

Marathi २५. (याचाच परिणाम असेल) की कयामतच्या दिवशी हे लोक आपल्या पूर्ण ओझ्यासह, त्यांच्या ओझ्याचेही भागीदार ठरतील, ज्यांना ज्ञानाविना पथभ्रष्ट करीत राहिले, पाहा तर किती वाीट ओझे उचलत आहेत.

Verse 26

قَدْ مَكَرَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ فَأَتَى ٱللَّهُ بُنْيَـٰنَهُم مِّنَ ٱلْقَوَاعِدِ فَخَرَّ عَلَيْهِمُ ٱلسَّقْفُ مِن فَوْقِهِمْ وَأَتَىٰهُمُ ٱلْعَذَابُ مِنْ حَيْثُ لَا يَشْعُرُونَ

Transliteration qad makara alladhīna min qablihim fa-atā l-lahu bun'yānahum mina l-qawāʿidi fakharra ʿalayhimu l-saqfu min fawqihim wa-atāhumu l-ʿadhābu min ḥaythu lā yashʿurūna

Marathi २६. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कावेबाजपणा केला. (शेवटी) अल्लाहने त्यांच्या (कट-कारस्थानाच्या) घरांना मुळा (पाया) पासून उखडून टाकले आणि त्यांच्या (डोक्यांवर) छत वरून कोसळले आणि त्यांच्याजव अज़ाब (शिक्षा-यातना) अशा ठिकाणाहून आला, जे ठिकाण त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते.

Verse 27

ثُمَّ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ يُخْزِيهِمْ وَيَقُولُ أَيْنَ شُرَكَآءِىَ ٱلَّذِينَ كُنتُمْ تُشَـٰٓقُّونَ فِيهِمْ ۚ قَالَ ٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْعِلْمَ إِنَّ ٱلْخِزْىَ ٱلْيَوْمَ وَٱلسُّوٓءَ عَلَى ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration thumma yawma l-qiyāmati yukh'zīhim wayaqūlu ayna shurakāiya alladhīna kuntum tushāqqūna fīhim qāla alladhīna ūtū l-ʿil'ma inna l-khiz'ya l-yawma wal-sūa ʿalā l-kāfirīna

Marathi २७. मग कयामतच्या दिवशीही सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना अपमानित करील आणि फर्माविल की माझे ते भागीदार कोठे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही लढत झगडत होते. ज्यांना ज्ञान दिले गेले होते, ते उत्तर देतील की आज तर इन्कार करणाऱ्यांना अपमान आणि वाईटपणाने चांगली मिठी मारली.

Verse 28

ٱلَّذِينَ تَتَوَفَّىٰهُمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ ظَالِمِىٓ أَنفُسِهِمْ ۖ فَأَلْقَوُا۟ ٱلسَّلَمَ مَا كُنَّا نَعْمَلُ مِن سُوٓءٍۭ ۚ بَلَىٰٓ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمٌۢ بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration alladhīna tatawaffāhumu l-malāikatu ẓālimī anfusihim fa-alqawū l-salama mā kunnā naʿmalu min sūin balā inna l-laha ʿalīmun bimā kuntum taʿmalūna

Marathi २८. ते लोक, जे आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करतात, फरिश्ते जेव्हा त्यांचा प्राण काढू लागतात तेव्हा त्या वेळी ते झुकतात की आम्ही वाईट आचरण करीत नव्हतो, का नाही? अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही तुम्ही करीत होते.

Verse 29

فَٱدْخُلُوٓا۟ أَبْوَٰبَ جَهَنَّمَ خَـٰلِدِينَ فِيهَا ۖ فَلَبِئْسَ مَثْوَى ٱلْمُتَكَبِّرِينَ

Transliteration fa-ud'khulū abwāba jahannama khālidīna fīhā falabi'sa mathwā l-mutakabirīna

Marathi २९. तेव्हा आता तुम्ही नेहमी करीत जहन्नमच्या दरवाजातून (जहन्नममध्ये) प्रवेश करा. तर किती वाईट ठिकाण आहे घमेंड करणाऱ्यांचे.

Verse 30

۞ وَقِيلَ لِلَّذِينَ ٱتَّقَوْا۟ مَاذَآ أَنزَلَ رَبُّكُمْ ۚ قَالُوا۟ خَيْرًا ۗ لِّلَّذِينَ أَحْسَنُوا۟ فِى هَـٰذِهِ ٱلدُّنْيَا حَسَنَةٌ ۚ وَلَدَارُ ٱلْـَٔاخِرَةِ خَيْرٌ ۚ وَلَنِعْمَ دَارُ ٱلْمُتَّقِينَ

Transliteration waqīla lilladhīna ittaqaw mādhā anzala rabbukum qālū khayran lilladhīna aḥsanū fī hādhihi l-dun'yā ḥasanatun waladāru l-ākhirati khayrun walaniʿ'ma dāru l-mutaqīna

Marathi ३०. आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांना विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरित केले आहे, तेव्हा ते उत्तर देतात की उत्तमात उत्तम. ज्या लोकांनी सत्कर्मे केलीत, त्यांच्यासाठी या जगात भलाई आहे, आणि निःसंशय आखिरतचे घर तर फार उत्तम आहे. आणि किती चांगले घर आहे, अल्लाहचे भय राखणाऱ्यांचे.

Verse 31

جَنَّـٰتُ عَدْنٍ يَدْخُلُونَهَا تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ ۖ لَهُمْ فِيهَا مَا يَشَآءُونَ ۚ كَذَٰلِكَ يَجْزِى ٱللَّهُ ٱلْمُتَّقِينَ

Transliteration jannātu ʿadnin yadkhulūnahā tajrī min taḥtihā l-anhāru lahum fīhā mā yashāūna kadhālika yajzī l-lahu l-mutaqīna

Marathi ३१. सदैव काळ राहणाऱ्या बागांमध्ये जातील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ते जे मागतील ते तिथे त्यांच्यासाठी हजर असेल. अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना अल्लाह असाच मोबदला प्रदान करतो.

Verse 32

ٱلَّذِينَ تَتَوَفَّىٰهُمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ طَيِّبِينَ ۙ يَقُولُونَ سَلَـٰمٌ عَلَيْكُمُ ٱدْخُلُوا۟ ٱلْجَنَّةَ بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration alladhīna tatawaffāhumu l-malāikatu ṭayyibīna yaqūlūna salāmun ʿalaykumu ud'khulū l-janata bimā kuntum taʿmalūna

Marathi ३२. ते लोक, ज्याचा प्राण फरिश्ते अशा अवस्थेत काढतात की ते स्वच्छ पवित्र असावेत, म्हणतात की तुमच्यासाठी सलामतीच सलामती आहे. आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जन्नतमध्ये जा, जे तुम्ही करीत होते.

Verse 33

هَلْ يَنظُرُونَ إِلَّآ أَن تَأْتِيَهُمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ أَوْ يَأْتِىَ أَمْرُ رَبِّكَ ۚ كَذَٰلِكَ فَعَلَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ وَمَا ظَلَمَهُمُ ٱللَّهُ وَلَـٰكِن كَانُوٓا۟ أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ

Transliteration hal yanẓurūna illā an tatiyahumu l-malāikatu aw yatiya amru rabbika kadhālika faʿala alladhīna min qablihim wamā ẓalamahumu l-lahu walākin kānū anfusahum yaẓlimūna

Marathi ३३. काय हे याच गोष्टीची वाट पाहात आहेत की त्यांच्याजवळ फरिश्ते यावेत किंवा तुमच्या पालनकर्त्याचा आदेश यावा? त्या लोकांनीही असेच केले, जे यांच्यापूर्वी होऊन गेलेत. अल्लाहने त्यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही, उलट ते स्वतःच आपल्या प्राणांवर अत्याचार करीत राहिले.

Verse 34

فَأَصَابَهُمْ سَيِّـَٔاتُ مَا عَمِلُوا۟ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ

Transliteration fa-aṣābahum sayyiātu mā ʿamilū waḥāqa bihim mā kānū bihi yastahziūna

Marathi ३४. तेव्हा त्यांच्या दुष्कर्मांचा मोबदला त्यांना मिळाला आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित होते, तिने त्यांना येऊन घेरले.

Verse 35

وَقَالَ ٱلَّذِينَ أَشْرَكُوا۟ لَوْ شَآءَ ٱللَّهُ مَا عَبَدْنَا مِن دُونِهِۦ مِن شَىْءٍ نَّحْنُ وَلَآ ءَابَآؤُنَا وَلَا حَرَّمْنَا مِن دُونِهِۦ مِن شَىْءٍ ۚ كَذَٰلِكَ فَعَلَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۚ فَهَلْ عَلَى ٱلرُّسُلِ إِلَّا ٱلْبَلَـٰغُ ٱلْمُبِينُ

Transliteration waqāla alladhīna ashrakū law shāa l-lahu mā ʿabadnā min dūnihi min shayin naḥnu walā ābāunā walā ḥarramnā min dūnihi min shayin kadhālika faʿala alladhīna min qablihim fahal ʿalā l-rusuli illā l-balāghu l-mubīnu

Marathi ३५. आणि अनेकेश्वरवादी म्हणाले, जर अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमचे वाडवडील त्याच्याखेरीज दुसऱ्याचे उपासक झाले नसते, ना त्याच्या हुकुमाविना एखाद्या वस्तूला हराम (अवैध) ठरविले असते. हेच आचरण त्यांच्या पूर्वीच्या लोकांचेही राहिले, तेव्हा पैगंबरांची जबाबदारी केवळ स्पष्ट संदेश पोहचविण्याची आहे.

Verse 36

وَلَقَدْ بَعَثْنَا فِى كُلِّ أُمَّةٍ رَّسُولًا أَنِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ وَٱجْتَنِبُوا۟ ٱلطَّـٰغُوتَ ۖ فَمِنْهُم مَّنْ هَدَى ٱللَّهُ وَمِنْهُم مَّنْ حَقَّتْ عَلَيْهِ ٱلضَّلَـٰلَةُ ۚ فَسِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَٱنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلْمُكَذِّبِينَ

Transliteration walaqad baʿathnā fī kulli ummatin rasūlan ani uʿ'budū l-laha wa-ij'tanibū l-ṭāghūta famin'hum man hadā l-lahu wamin'hum man ḥaqqat ʿalayhi l-ḍalālatu fasīrū fī l-arḍi fa-unẓurū kayfa kāna ʿāqibatu l-mukadhibīna

Marathi ३६. आणि आम्ही प्रत्येक जनसमूहात पैगंबर पाठविले की (लोक हो!) केवळ अल्लाहची उपासना करा आणि तागूत (अल्लाहखेरीजची सर्व असत्य उपास्ये) पासून दूर राहा, तर काही लोकांना अल्लाहने मार्गदर्शन प्रदान केले आणि काहींवर मार्गभ्रष्टता सिद्ध झाली. आता तुम्ही स्वतः धरतीवर हिंडून फिरून पाहा की खोटे ठरविणाऱ्यांचा शेवट कसा झाला!

Verse 37

إِن تَحْرِصْ عَلَىٰ هُدَىٰهُمْ فَإِنَّ ٱللَّهَ لَا يَهْدِى مَن يُضِلُّ ۖ وَمَا لَهُم مِّن نَّـٰصِرِينَ

Transliteration in taḥriṣ ʿalā hudāhum fa-inna l-laha lā yahdī man yuḍillu wamā lahum min nāṣirīna

Marathi ३७. तरीही तुम्ही त्यांना मार्गदर्शन लाभावे अशी इच्छा बाळगत राहिले परंतु अल्लाह ज्याला मार्गभ्रष्ट करतो, त्याला सन्मार्ग दाखवित नाही, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता असतो.

Verse 38

وَأَقْسَمُوا۟ بِٱللَّهِ جَهْدَ أَيْمَـٰنِهِمْ ۙ لَا يَبْعَثُ ٱللَّهُ مَن يَمُوتُ ۚ بَلَىٰ وَعْدًا عَلَيْهِ حَقًّا وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration wa-aqsamū bil-lahi jahda aymānihim lā yabʿathu l-lahu man yamūtu balā waʿdan ʿalayhi ḥaqqan walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi ३८. आणि ते लोक मोठमोठ्या शपथा घेऊन सांगतात की मेलेल्या लोकांना अल्लाह जिवंत करणार नाही. का नाही, (अवश्य जिवंत करेल) हा तर त्याचा अगदी सच्चा आणि पक्का वायदा आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

Verse 39

لِيُبَيِّنَ لَهُمُ ٱلَّذِى يَخْتَلِفُونَ فِيهِ وَلِيَعْلَمَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ أَنَّهُمْ كَانُوا۟ كَـٰذِبِينَ

Transliteration liyubayyina lahumu alladhī yakhtalifūna fīhi waliyaʿlama alladhīna kafarū annahum kānū kādhibīna

Marathi ३९. अशासाठीही की, हे लोक ज्या गोष्टीत मतभेद करीत होते, तिला अल्लाहने स्पष्ट करून सांगावे आणि यासाठीही इन्कार करणाऱ्यांनी स्वतः आपण खोटे असल्याचे जाणून घ्यावे.

Verse 40

إِنَّمَا قَوْلُنَا لِشَىْءٍ إِذَآ أَرَدْنَـٰهُ أَن نَّقُولَ لَهُۥ كُن فَيَكُونُ

Transliteration innamā qawlunā lishayin idhā aradnāhu an naqūla lahu kun fayakūnu

Marathi ४०. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा आम्हाला केवळ इतकेच सांगावे लागते की घडून ये आणि ती गोष्ट घडून येते.

Verse 41

وَٱلَّذِينَ هَاجَرُوا۟ فِى ٱللَّهِ مِنۢ بَعْدِ مَا ظُلِمُوا۟ لَنُبَوِّئَنَّهُمْ فِى ٱلدُّنْيَا حَسَنَةً ۖ وَلَأَجْرُ ٱلْـَٔاخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا۟ يَعْلَمُونَ

Transliteration wa-alladhīna hājarū fī l-lahi min baʿdi mā ẓulimū lanubawwi-annahum fī l-dun'yā ḥasanatan wala-ajru l-ākhirati akbaru law kānū yaʿlamūna

Marathi ४१. आणि ज्या लोकांनी अत्याचार सहन केल्यानंतर, अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, आम्ही त्यांना सर्वांत उत्तम जागा या जगात प्रदान करू आणि आखिरतचा मोबदला तर अतिशय मोठा आहे. लोकांनी हे जाणून घेतले असते तर किती बरे झाले असते!

Verse 42

ٱلَّذِينَ صَبَرُوا۟ وَعَلَىٰ رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ

Transliteration alladhīna ṣabarū waʿalā rabbihim yatawakkalūna

Marathi ४२. ज्या लोकांनी धीर संयम राखला, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा करीत राहिले.

Verse 43

وَمَآ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ إِلَّا رِجَالًا نُّوحِىٓ إِلَيْهِمْ ۚ فَسْـَٔلُوٓا۟ أَهْلَ ٱلذِّكْرِ إِن كُنتُمْ لَا تَعْلَمُونَ

Transliteration wamā arsalnā min qablika illā rijālan nūḥī ilayhim fasalū ahla l-dhik'ri in kuntum lā taʿlamūna

Marathi ४३. आणि तुमच्या पूर्वीही आम्ही पुरुषांनाच (पैगंबर म्हणून) पाठवित राहिलो, ज्यांच्याकडे वहयी (प्रकाशना) अवतरित करीत होतो. जर तुम्ही जाणत नसाल तर ज्ञानी लोकांना विचारा.१

Verse 44

بِٱلْبَيِّنَـٰتِ وَٱلزُّبُرِ ۗ وَأَنزَلْنَآ إِلَيْكَ ٱلذِّكْرَ لِتُبَيِّنَ لِلنَّاسِ مَا نُزِّلَ إِلَيْهِمْ وَلَعَلَّهُمْ يَتَفَكَّرُونَ

Transliteration bil-bayināti wal-zuburi wa-anzalnā ilayka l-dhik'ra litubayyina lilnnāsi mā nuzzila ilayhim walaʿallahum yatafakkarūna

Marathi ४४. निशाण्या आणि ग्रंथांसह. हे स्मरण (ग्रंथ) आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे की लोकांकडे जे उतरविले गेले आहे, तुम्ही त्यांना ते स्पष्टपणे सांगावे, कदाचित त्यांनी विचारा चिंतन करावे.

Verse 45

أَفَأَمِنَ ٱلَّذِينَ مَكَرُوا۟ ٱلسَّيِّـَٔاتِ أَن يَخْسِفَ ٱللَّهُ بِهِمُ ٱلْأَرْضَ أَوْ يَأْتِيَهُمُ ٱلْعَذَابُ مِنْ حَيْثُ لَا يَشْعُرُونَ

Transliteration afa-amina alladhīna makarū l-sayiāti an yakhsifa l-lahu bihimu l-arḍa aw yatiyahumu l-ʿadhābu min ḥaythu lā yashʿurūna

Marathi ४५. वाईट कावेबाज करणारे, काय या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की अल्लाह त्यांना जमिनीत धसवून टाकील किंवा त्यांच्याजवळ अशा ठिकाणाहून अज़ाब (शिक्षा-यातना) यावी, ज्या ठिकाणाची त्यांना शंका आणि कल्पनाही नसावी.

Verse 46

أَوْ يَأْخُذَهُمْ فِى تَقَلُّبِهِمْ فَمَا هُم بِمُعْجِزِينَ

Transliteration aw yakhudhahum fī taqallubihim famā hum bimuʿ'jizīna

Marathi ४६. किंवा त्यांना चालता फिरता धरून घ्यावे, हे कोणत्याही प्रकारे अल्लाहला विवश (लाचार) करू शकत नाही.

Verse 47

أَوْ يَأْخُذَهُمْ عَلَىٰ تَخَوُّفٍ فَإِنَّ رَبَّكُمْ لَرَءُوفٌ رَّحِيمٌ

Transliteration aw yakhudhahum ʿalā takhawwufin fa-inna rabbakum laraūfun raḥīmun

Marathi ४७. किंवा त्यांना भय दाखवून पकडीत घ्यावे, निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा करुणाशील आणि मोठा दयाशील आहे.

Verse 48

أَوَلَمْ يَرَوْا۟ إِلَىٰ مَا خَلَقَ ٱللَّهُ مِن شَىْءٍ يَتَفَيَّؤُا۟ ظِلَـٰلُهُۥ عَنِ ٱلْيَمِينِ وَٱلشَّمَآئِلِ سُجَّدًا لِّلَّهِ وَهُمْ دَٰخِرُونَ

Transliteration awalam yaraw ilā mā khalaqa l-lahu min shayin yatafayya-u ẓilāluhu ʿani l-yamīni wal-shamāili sujjadan lillahi wahum dākhirūna

Marathi ४८. काय त्यांनी अल्लाहच्या निर्मितीपैकी कोणालाही पाहिले नाही की त्याची सावली उजव्या-डाव्या बाजूकडे झुकून अल्लाहसमोर सजदा करते, आणि आपली लाचारी व्यक्त करते.

Verse 49

وَلِلَّهِ يَسْجُدُ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ مِن دَآبَّةٍ وَٱلْمَلَـٰٓئِكَةُ وَهُمْ لَا يَسْتَكْبِرُونَ

Transliteration walillahi yasjudu mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi min dābbatin wal-malāikatu wahum lā yastakbirūna

Marathi ४९. आणि निःसंशय, आकाशांमधील आणि धरतीचे समस्त सजीव आणि फरिश्ते, सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर सजदा करतात आणि किंचितही घमेंड करीत नाही.

Verse 50

يَخَافُونَ رَبَّهُم مِّن فَوْقِهِمْ وَيَفْعَلُونَ مَا يُؤْمَرُونَ ۩

Transliteration yakhāfūna rabbahum min fawqihim wayafʿalūna mā yu'marūna

Marathi ५०. आणि आपल्या पालनकर्त्याशी, जो त्यांच्यावरती आहे, थरथर कापत राहतात आणि जो आदेश मिळेल, त्याचे पालन करण्यात मग्न राहतात.

Verse 51

۞ وَقَالَ ٱللَّهُ لَا تَتَّخِذُوٓا۟ إِلَـٰهَيْنِ ٱثْنَيْنِ ۖ إِنَّمَا هُوَ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ ۖ فَإِيَّـٰىَ فَٱرْهَبُونِ

Transliteration waqāla l-lahu lā tattakhidhū ilāhayni ith'nayni innamā huwa ilāhun wāḥidun fa-iyyāya fa-ir'habūni

Marathi ५१. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगून टाकले आहे की दोन माबूद (उपास्ये) बनवू नका. माबूद तर तोच फक्त एकटा आहे, तेव्हा तुम्ही सर्व केवळ माझेच भय राखा.

Verse 52

وَلَهُۥ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَلَهُ ٱلدِّينُ وَاصِبًا ۚ أَفَغَيْرَ ٱللَّهِ تَتَّقُونَ

Transliteration walahu mā fī l-samāwāti wal-arḍi walahu l-dīnu wāṣiban afaghayra l-lahi tattaqūna

Marathi ५२. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, सर्व त्याचेच आहे, आणि त्याचीच उपासना नेहमी अनिवार्य आहे. काय तरीही तुम्ही त्याच्याखेरीज दुसऱ्यांचे भय बाळगता?

Verse 53

وَمَا بِكُم مِّن نِّعْمَةٍ فَمِنَ ٱللَّهِ ۖ ثُمَّ إِذَا مَسَّكُمُ ٱلضُّرُّ فَإِلَيْهِ تَجْـَٔرُونَ

Transliteration wamā bikum min niʿ'matin famina l-lahi thumma idhā massakumu l-ḍuru fa-ilayhi tajarūna

Marathi ५३. आणि तुमच्याजवळ जेवढ्या देखील अल्लाहच्या कृपा देणग्या आहेत सर्व त्यानेच प्रदान केलेल्या आहेत. आता जेव्हा देखील तुम्हाला एखादी कष्ट-यातना आल्यास त्याच्याचकडे दुआ-प्रार्थना करता.

Verse 54

ثُمَّ إِذَا كَشَفَ ٱلضُّرَّ عَنكُمْ إِذَا فَرِيقٌ مِّنكُم بِرَبِّهِمْ يُشْرِكُونَ

Transliteration thumma idhā kashafa l-ḍura ʿankum idhā farīqun minkum birabbihim yush'rikūna

Marathi ५४. आणि जेव्हा मात्र त्याने ती कष्ट-यातना तुमच्यापासून दूर केली तेव्हा तुमच्यापैकी काही लोक आपल्या पालनकर्त्यासोबत भागीदार बनवू लागतात.

Verse 55

لِيَكْفُرُوا۟ بِمَآ ءَاتَيْنَـٰهُمْ ۚ فَتَمَتَّعُوا۟ ۖ فَسَوْفَ تَعْلَمُونَ

Transliteration liyakfurū bimā ātaynāhum fatamattaʿū fasawfa taʿlamūna

Marathi ५५. यासाठी की आम्ही प्रदान केलेल्या देणग्यांशी कृतघ्नता दाखवावी (ठीक आहे) थोडा लाभ प्राप्त करून घ्या. शेवटी तुम्हाला माहीतच पडेल.

Verse 56

وَيَجْعَلُونَ لِمَا لَا يَعْلَمُونَ نَصِيبًا مِّمَّا رَزَقْنَـٰهُمْ ۗ تَٱللَّهِ لَتُسْـَٔلُنَّ عَمَّا كُنتُمْ تَفْتَرُونَ

Transliteration wayajʿalūna limā lā yaʿlamūna naṣīban mimmā razaqnāhum tal-lahi latus'alunna ʿammā kuntum taftarūna

Marathi ५६. आणि ज्याला ते जाणतही नाही, त्याचा हिस्सा आम्ही दिलेल्या वस्तूंमध्ये निश्चित करतात, अल्लाहची शपथ! तुमच्या या आरोपाबद्दल तुम्हाला अवश्य विचारणा होईल.

Verse 57

وَيَجْعَلُونَ لِلَّهِ ٱلْبَنَـٰتِ سُبْحَـٰنَهُۥ ۙ وَلَهُم مَّا يَشْتَهُونَ

Transliteration wayajʿalūna lillahi l-banāti sub'ḥānahu walahum mā yashtahūna

Marathi ५७. आणि ते पवित्र अल्लाहकरीता मुली निर्धारीत करतात, आणि स्वतःसाठी ते, जे त्यांच्या इच्छेनुसार असेल.

Verse 58

وَإِذَا بُشِّرَ أَحَدُهُم بِٱلْأُنثَىٰ ظَلَّ وَجْهُهُۥ مُسْوَدًّا وَهُوَ كَظِيمٌ

Transliteration wa-idhā bushira aḥaduhum bil-unthā ẓalla wajhuhu mus'waddan wahuwa kaẓīmun

Marathi ५८. आणि त्यांच्यापैकी जेव्हा एखाद्याला मुलगी झाल्याची खबर दिली जाते तेव्हा त्याचे तोंड काळवंडते आणि तो मनातल्या मनात कुढू लागतो.

Verse 59

يَتَوَٰرَىٰ مِنَ ٱلْقَوْمِ مِن سُوٓءِ مَا بُشِّرَ بِهِۦٓ ۚ أَيُمْسِكُهُۥ عَلَىٰ هُونٍ أَمْ يَدُسُّهُۥ فِى ٱلتُّرَابِ ۗ أَلَا سَآءَ مَا يَحْكُمُونَ

Transliteration yatawārā mina l-qawmi min sūi mā bushira bihi ayum'sikuhu ʿalā hūnin am yadussuhu fī l-turābi alā sāa mā yaḥkumūna

Marathi ५९. या वाईट बातमीमुळे, लोकांपासून तोंड लपवित फिरतो विचार करतो काय या अपमानाला सोबतच राहू द्यावी की हिला मातीत गाडून टाकावे किती वाईट निर्णय घेतात हे!

Verse 60

لِلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ مَثَلُ ٱلسَّوْءِ ۖ وَلِلَّهِ ٱلْمَثَلُ ٱلْأَعْلَىٰ ۚ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ

Transliteration lilladhīna lā yu'minūna bil-ākhirati mathalu l-sawi walillahi l-mathalu l-aʿlā wahuwa l-ʿazīzu l-ḥakīmu

Marathi ६०. आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांचेच वाईट उदाहरण आहे. अल्लाहकरिता तर अतिशय उच्च उदाहरण आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.

Verse 61

وَلَوْ يُؤَاخِذُ ٱللَّهُ ٱلنَّاسَ بِظُلْمِهِم مَّا تَرَكَ عَلَيْهَا مِن دَآبَّةٍ وَلَـٰكِن يُؤَخِّرُهُمْ إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّى ۖ فَإِذَا جَآءَ أَجَلُهُمْ لَا يَسْتَـْٔخِرُونَ سَاعَةً ۖ وَلَا يَسْتَقْدِمُونَ

Transliteration walaw yuākhidhu l-lahu l-nāsa biẓul'mihim mā taraka ʿalayhā min dābbatin walākin yu-akhiruhum ilā ajalin musamman fa-idhā jāa ajaluhum lā yastakhirūna sāʿatan walā yastaqdimūna

Marathi ६१. आणि जर लोकांच्या दुराचाराबद्दल अल्लाहने त्यांना पकडीत घेणे सुरू केले असते तर धरतीवर एक देखील जीव वाचला नसता, परंतु तो तर त्यांना एका निर्धारीत अवधीपर्यंत ढील (सवड) देतो, मग जेव्हा त्यांची ती वेळ येते तेव्हा ते एक क्षण ना मागे राहू शकतात आणि ना पुढे जाऊ शकतात.

Verse 62

وَيَجْعَلُونَ لِلَّهِ مَا يَكْرَهُونَ وَتَصِفُ أَلْسِنَتُهُمُ ٱلْكَذِبَ أَنَّ لَهُمُ ٱلْحُسْنَىٰ ۖ لَا جَرَمَ أَنَّ لَهُمُ ٱلنَّارَ وَأَنَّهُم مُّفْرَطُونَ

Transliteration wayajʿalūna lillahi mā yakrahūna wataṣifu alsinatuhumu l-kadhiba anna lahumu l-ḥus'nā lā jarama anna lahumu l-nāra wa-annahum muf'raṭūna

Marathi ६२. आणि ते स्वतःसाठी जे अप्रिय समजतात, ते अल्लाहसाठी सिद्ध करतात आणि त्यांच्या जीभा खोट्या गोष्टींचे वर्णन करतात की त्यांच्यासाठी भलाई आहे?(मुळीच नाही), वास्तविक त्यांच्यासाठी आग आहे आणि हे लोक, जहन्नमी लोकांच्या पुढे पुढे जाणारे आहेत.

Verse 63

تَٱللَّهِ لَقَدْ أَرْسَلْنَآ إِلَىٰٓ أُمَمٍ مِّن قَبْلِكَ فَزَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيْطَـٰنُ أَعْمَـٰلَهُمْ فَهُوَ وَلِيُّهُمُ ٱلْيَوْمَ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ

Transliteration tal-lahi laqad arsalnā ilā umamin min qablika fazayyana lahumu l-shayṭānu aʿmālahum fahuwa waliyyuhumu l-yawma walahum ʿadhābun alīmun

Marathi ६३. अल्लाहची शपथ! आम्ही तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांकडेही आपले पैगंबर पाठविले, परंतु सैतानाने त्यांच्या दुष्कर्मांना त्यांच्या नजरेत चांगले ठरविले. तो सैतान आज देखील त्यांचा दोस्त बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे.

Verse 64

وَمَآ أَنزَلْنَا عَلَيْكَ ٱلْكِتَـٰبَ إِلَّا لِتُبَيِّنَ لَهُمُ ٱلَّذِى ٱخْتَلَفُوا۟ فِيهِ ۙ وَهُدًى وَرَحْمَةً لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ

Transliteration wamā anzalnā ʿalayka l-kitāba illā litubayyina lahumu alladhī ikh'talafū fīhi wahudan waraḥmatan liqawmin yu'minūna

Marathi ६४. आणि हा ग्रंथ आम्ही तुमच्यावर अशासाठी अवतरित केला आहे की तुम्ही ती प्रत्येक गोष्ट उघड करावी, ज्याबाबत ते मतभेद करीत आहेत आणि हा ग्रंथ ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि दया आहे.

Verse 65

وَٱللَّهُ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَحْيَا بِهِ ٱلْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَآ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَسْمَعُونَ

Transliteration wal-lahu anzala mina l-samāi māan fa-aḥyā bihi l-arḍa baʿda mawtihā inna fī dhālika laāyatan liqawmin yasmaʿūna

Marathi ६५. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आकाशातून पर्जन्य वृष्टी करून, त्याद्वआरे धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ऐकतील.

Verse 66

وَإِنَّ لَكُمْ فِى ٱلْأَنْعَـٰمِ لَعِبْرَةً ۖ نُّسْقِيكُم مِّمَّا فِى بُطُونِهِۦ مِنۢ بَيْنِ فَرْثٍ وَدَمٍ لَّبَنًا خَالِصًا سَآئِغًا لِّلشَّـٰرِبِينَ

Transliteration wa-inna lakum fī l-anʿāmi laʿib'ratan nus'qīkum mimmā fī buṭūnihi min bayni farthin wadamin labanan khāliṣan sāighan lilshāribīna

Marathi ६६. आणि तुमच्यासाठी तर जनावरांमध्येही मोठा बोध आहे की आम्ही तुम्हाला त्याच्या पोटात जे काही आहे, त्याच्यातूनच शेण आणि रक्ताच्या मधून शुद्ध निर्भेळ दूध पाजतो, जे पिणाऱ्यांसाठी सहजपणे पचवले जाते.

Verse 67

وَمِن ثَمَرَٰتِ ٱلنَّخِيلِ وَٱلْأَعْنَـٰبِ تَتَّخِذُونَ مِنْهُ سَكَرًا وَرِزْقًا حَسَنًا ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَعْقِلُونَ

Transliteration wamin thamarāti l-nakhīli wal-aʿnābi tattakhidhūna min'hu sakaran wariz'qan ḥasanan inna fī dhālika laāyatan liqawmin yaʿqilūna

Marathi ६७. आणि खजुरीच्या व द्राक्षांच्या वृक्षांच्या फळांपासून तुम्ही मद्य तयार करता आणि उत्तम अन्न-सामुग्रीही. निःसंशय अक्कल राखणाऱ्या लोकांकरिता यातही फार मोठी निशाणी आहे.

Verse 68

وَأَوْحَىٰ رَبُّكَ إِلَى ٱلنَّحْلِ أَنِ ٱتَّخِذِى مِنَ ٱلْجِبَالِ بُيُوتًا وَمِنَ ٱلشَّجَرِ وَمِمَّا يَعْرِشُونَ

Transliteration wa-awḥā rabbuka ilā l-naḥli ani ittakhidhī mina l-jibāli buyūtan wamina l-shajari wamimmā yaʿrishūna

Marathi ६८. आणि तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीलाही प्रेरणा दिली की पर्वतांवर, झाडांवर आणि लोकांनी बनविलेल्या उंच उंच इमारतींवर आपले घर (पोळे) बनव.

Verse 69

ثُمَّ كُلِى مِن كُلِّ ٱلثَّمَرَٰتِ فَٱسْلُكِى سُبُلَ رَبِّكِ ذُلُلًا ۚ يَخْرُجُ مِنۢ بُطُونِهَا شَرَابٌ مُّخْتَلِفٌ أَلْوَٰنُهُۥ فِيهِ شِفَآءٌ لِّلنَّاسِ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ

Transliteration thumma kulī min kulli l-thamarāti fa-us'lukī subula rabbiki dhululan yakhruju min buṭūnihā sharābun mukh'talifun alwānuhu fīhi shifāon lilnnāsi inna fī dhālika laāyatan liqawmin yatafakkarūna

Marathi ६९. आणि प्रत्येक प्रकारचे फळ खा आणि आपल्या (पालनकर्त्याच्या) सहज सुलभ मार्गांवर चालत फिरत राहा. त्यांच्या पोटातून पेयद्रव बाहेर पडतो, ज्याचे अनेक रंग आहेत, आणि ज्यात लोकांसाठी स्वास्थ्य आहे. विचार-चिंतन करणाऱ्यांसाठी यातही फार मोठी निशाणी आहे.

Verse 70

وَٱللَّهُ خَلَقَكُمْ ثُمَّ يَتَوَفَّىٰكُمْ ۚ وَمِنكُم مَّن يُرَدُّ إِلَىٰٓ أَرْذَلِ ٱلْعُمُرِ لِكَىْ لَا يَعْلَمَ بَعْدَ عِلْمٍ شَيْـًٔا ۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمٌ قَدِيرٌ

Transliteration wal-lahu khalaqakum thumma yatawaffākum waminkum man yuraddu ilā ardhali l-ʿumuri likay lā yaʿlama baʿda ʿil'min shayan inna l-laha ʿalīmun qadīrun

Marathi ७०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेच तुम्हा सर्वांना निर्माण केले आहे. तोच नंतर तुम्हाला मृत्यु देईल, आणि तुमच्यात काही असेही आहेत जे अतिशय वाईट वया (खूप म्हातारवया) कडे परतविले जातात, की खूप काही जाणून घेतल्यानंतरही न जाणावे. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सामर्थ्य राखणारा आहे.

Verse 71

وَٱللَّهُ فَضَّلَ بَعْضَكُمْ عَلَىٰ بَعْضٍ فِى ٱلرِّزْقِ ۚ فَمَا ٱلَّذِينَ فُضِّلُوا۟ بِرَآدِّى رِزْقِهِمْ عَلَىٰ مَا مَلَكَتْ أَيْمَـٰنُهُمْ فَهُمْ فِيهِ سَوَآءٌ ۚ أَفَبِنِعْمَةِ ٱللَّهِ يَجْحَدُونَ

Transliteration wal-lahu faḍḍala baʿḍakum ʿalā baʿḍin fī l-riz'qi famā alladhīna fuḍḍilū birāddī riz'qihim ʿalā mā malakat aymānuhum fahum fīhi sawāon afabiniʿ'mati l-lahi yajḥadūna

Marathi ७१. आणि अल्लाहनेच तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर रोजी (अन्न सामुग्री) मध्ये वृद्धी प्रदान केली आहे, तथापि त्यांना जास्त प्रदान केले गेले आहे ते आपली आजिविका, आपल्या अधीन असलेल्या दासां (नोकरा) ना देत नाहीत की ते आणि हे त्यात सम समान होतील. काय हे लोक अल्लाहच्या उपकारांचा इन्कार करीत आहेत?

Verse 72

وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّنْ أَنفُسِكُمْ أَزْوَٰجًا وَجَعَلَ لَكُم مِّنْ أَزْوَٰجِكُم بَنِينَ وَحَفَدَةً وَرَزَقَكُم مِّنَ ٱلطَّيِّبَـٰتِ ۚ أَفَبِٱلْبَـٰطِلِ يُؤْمِنُونَ وَبِنِعْمَتِ ٱللَّهِ هُمْ يَكْفُرُونَ

Transliteration wal-lahu jaʿala lakum min anfusikum azwājan wajaʿala lakum min azwājikum banīna waḥafadatan warazaqakum mina l-ṭayibāti afabil-bāṭili yu'minūna wabiniʿ'mati l-lahi hum yakfurūna

Marathi ७२. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्यामधूनच तुमच्या पत्न्या निर्माण केल्या आणि तुमच्या पत्न्यांपासून तुमचे पुत्र आणि नातू निर्माण केले आणि तुम्हाला उत्तमोत्तम वस्तू खायला दिल्या, तर काय, असे असतानाही लोक असत्यावर ईमान राखतील? आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या कृपा देणग्यांशी कृतघ्नता दाखवतील?

Verse 73

وَيَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَمْلِكُ لَهُمْ رِزْقًا مِّنَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ شَيْـًٔا وَلَا يَسْتَطِيعُونَ

Transliteration wayaʿbudūna min dūni l-lahi mā lā yamliku lahum riz'qan mina l-samāwāti wal-arḍi shayan walā yastaṭīʿūna

Marathi ७३. आणि ते अल्लाहशिवाय त्यांची उपासना करतात, जे आकाशांमधून आणि जमिनीतून त्यांना किंचितही रोजी देऊ शकत नाही आणि कसलेही सामर्थ्य बाळगत नाही.

Verse 74

فَلَا تَضْرِبُوا۟ لِلَّهِ ٱلْأَمْثَالَ ۚ إِنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ وَأَنتُمْ لَا تَعْلَمُونَ

Transliteration falā taḍribū lillahi l-amthāla inna l-laha yaʿlamu wa-antum lā taʿlamūna

Marathi ७४. तेव्हा, सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता उदाहरण बनवू नका, अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुम्ही नाही जाणत.

Verse 75

۞ ضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا عَبْدًا مَّمْلُوكًا لَّا يَقْدِرُ عَلَىٰ شَىْءٍ وَمَن رَّزَقْنَـٰهُ مِنَّا رِزْقًا حَسَنًا فَهُوَ يُنفِقُ مِنْهُ سِرًّا وَجَهْرًا ۖ هَلْ يَسْتَوُۥنَ ۚ ٱلْحَمْدُ لِلَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ

Transliteration ḍaraba l-lahu mathalan ʿabdan mamlūkan lā yaqdiru ʿalā shayin waman razaqnāhu minnā riz'qan ḥasanan fahuwa yunfiqu min'hu sirran wajahran hal yastawūna l-ḥamdu lillahi bal aktharuhum lā yaʿlamūna

Marathi ७५. अल्लाह एक उदाहरण सांगत आहे की एक गुलाम आहे दुसऱ्याच्या मालकीचा, जो कसलाही अधिकार राखत नाही आणि एक दुसरा मनुष्य आहे, ज्याला आम्ही आपल्या जवळून फार उत्तम धन देऊन ठेवले आहे. ज्यातून तो लपवून आणि उघडपणे खर्च करतो, काय हे दोन्ही जण समान ठरू शकतात? अल्लाहकरिताच समस्त स्तुती- प्रशंसा आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जाणत नाहीत.

Verse 76

وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا رَّجُلَيْنِ أَحَدُهُمَآ أَبْكَمُ لَا يَقْدِرُ عَلَىٰ شَىْءٍ وَهُوَ كَلٌّ عَلَىٰ مَوْلَىٰهُ أَيْنَمَا يُوَجِّههُّ لَا يَأْتِ بِخَيْرٍ ۖ هَلْ يَسْتَوِى هُوَ وَمَن يَأْمُرُ بِٱلْعَدْلِ ۙ وَهُوَ عَلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ

Transliteration waḍaraba l-lahu mathalan rajulayni aḥaduhumā abkamu lā yaqdiru ʿalā shayin wahuwa kallun ʿalā mawlāhu aynamā yuwajjihhu lā yati bikhayrin hal yastawī huwa waman yamuru bil-ʿadli wahuwa ʿalā ṣirāṭin mus'taqīmin

Marathi ७६. आणि अल्लाह एक दुसरे उदाहरण सांगतो दोन माणसांचे, ज्यांच्यापैकी एक मुका आहे आणि कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही, किंबहुना तो आपल्या मालकावर ओझे आहे, मालक त्याला कोठेही पाठविल पण तो कसलाही भलेपणा आणत नाही. काय हा आणि तो, जो न्यायाचा आदेश देतो आणि सरळ मार्गावरही चालतो, समान असू शकतात?

Verse 77

وَلِلَّهِ غَيْبُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَمَآ أَمْرُ ٱلسَّاعَةِ إِلَّا كَلَمْحِ ٱلْبَصَرِ أَوْ هُوَ أَقْرَبُ ۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ

Transliteration walillahi ghaybu l-samāwāti wal-arḍi wamā amru l-sāʿati illā kalamḥi l-baṣari aw huwa aqrabu inna l-laha ʿalā kulli shayin qadīrun

Marathi ७७. आणि आकाशांच्या व धरतीच्या (सर्व) लपलेल्या वस्तूंचे ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे, आणि कयामतची बाब देखील अशीच आहे, जणू पापणीचे झपकणे, किंबहुना याहूनही अधिक जवळ. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य राखतो.

Verse 78

وَٱللَّهُ أَخْرَجَكُم مِّنۢ بُطُونِ أُمَّهَـٰتِكُمْ لَا تَعْلَمُونَ شَيْـًٔا وَجَعَلَ لَكُمُ ٱلسَّمْعَ وَٱلْأَبْصَـٰرَ وَٱلْأَفْـِٔدَةَ ۙ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ

Transliteration wal-lahu akhrajakum min buṭūni ummahātikum lā taʿlamūna shayan wajaʿala lakumu l-samʿa wal-abṣāra wal-afidata laʿallakum tashkurūna

Marathi ७८. आणि अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून बाहेर काढले की त्या वेळी तुम्ही काहीच जाणत नव्हते. त्यानेच तुमचे कान आणि डोळे आणि हृदय बनविले, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकावे.

Verse 79

أَلَمْ يَرَوْا۟ إِلَى ٱلطَّيْرِ مُسَخَّرَٰتٍ فِى جَوِّ ٱلسَّمَآءِ مَا يُمْسِكُهُنَّ إِلَّا ٱللَّهُ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ

Transliteration alam yaraw ilā l-ṭayri musakharātin fī jawwi l-samāi mā yum'sikuhunna illā l-lahu inna fī dhālika laāyātin liqawmin yu'minūna

Marathi ७९. काय त्या लोकांनी पक्ष्यांना नाही पाहिले, जे आदेशआनुसार आकाशात नियंत्रित आहेत, ज्यांना अल्लाहखेरीज दुसऱ्या कुणी धरून ठेवले नाही. निःसंशय, यात ईमान राखणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 80

وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّنۢ بُيُوتِكُمْ سَكَنًا وَجَعَلَ لَكُم مِّن جُلُودِ ٱلْأَنْعَـٰمِ بُيُوتًا تَسْتَخِفُّونَهَا يَوْمَ ظَعْنِكُمْ وَيَوْمَ إِقَامَتِكُمْ ۙ وَمِنْ أَصْوَافِهَا وَأَوْبَارِهَا وَأَشْعَارِهَآ أَثَـٰثًا وَمَتَـٰعًا إِلَىٰ حِينٍ

Transliteration wal-lahu jaʿala lakum min buyūtikum sakanan wajaʿala lakum min julūdi l-anʿāmi buyūtan tastakhiffūnahā yawma ẓaʿnikum wayawma iqāmatikum wamin aṣwāfihā wa-awbārihā wa-ashʿārihā athāthan wamatāʿan ilā ḥīnin

Marathi ८०. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्या घरांमध्ये निवासाचे स्थान बनविले आहे आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांच्या कातडीची घरे (तंबू) बनविले, जी तुम्हाला हलकी दिसून येतात, आपल्या प्रस्थानाच्या दिवशी आणि आपल्या पडाव टाकण्याच्या दिवशीही आणि त्यांची लोकर, लव (रोये) आणि केसांपासूनही त्याने अनेकविध वस्तू आणि एका निर्धारीत वेळेपर्यंत लाभदायक वस्तू आणि बनविल्या.

Verse 81

وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّمَّا خَلَقَ ظِلَـٰلًا وَجَعَلَ لَكُم مِّنَ ٱلْجِبَالِ أَكْنَـٰنًا وَجَعَلَ لَكُمْ سَرَٰبِيلَ تَقِيكُمُ ٱلْحَرَّ وَسَرَٰبِيلَ تَقِيكُم بَأْسَكُمْ ۚ كَذَٰلِكَ يُتِمُّ نِعْمَتَهُۥ عَلَيْكُمْ لَعَلَّكُمْ تُسْلِمُونَ

Transliteration wal-lahu jaʿala lakum mimmā khalaqa ẓilālan wajaʿala lakum mina l-jibāli aknānan wajaʿala lakum sarābīla taqīkumu l-ḥara wasarābīla taqīkum basakum kadhālika yutimmu niʿ'matahu ʿalaykum laʿallakum tus'limūna

Marathi ८१. आणि अल्लाहनेच तुमच्यासाठी आपल्या निर्माण केलेल्या वस्तूंमधून सावली बनविली आहे, आणि त्यानेच तुमच्यासाठी पर्वतांमध्ये गुहा बनविली आणि त्यानेच तुमच्यासाठी कपडे बनविले आहेत, जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित राखतील आणि अशी चिलखते देखील जी तुम्हाला युद्ध-प्रसंगी उपयोगी पडतील. तो अशा प्रकारे आपली कृपा देणगी पुरेपूर प्रदान करीत आहे, यासाठी की तुम्ही त्याचे आज्ञधारक व्हावे.

Verse 82

فَإِن تَوَلَّوْا۟ فَإِنَّمَا عَلَيْكَ ٱلْبَلَـٰغُ ٱلْمُبِينُ

Transliteration fa-in tawallaw fa-innamā ʿalayka l-balāghu l-mubīnu

Marathi ८२. तरीही जर हे तोंड फिरवूनच राहतील तर तुमची जबाबदारी केवळ साफ आणि स्पष्टपणे पोहचवून देणे एवढीच आहे.

Verse 83

يَعْرِفُونَ نِعْمَتَ ٱللَّهِ ثُمَّ يُنكِرُونَهَا وَأَكْثَرُهُمُ ٱلْكَـٰفِرُونَ

Transliteration yaʿrifūna niʿ'mata l-lahi thumma yunkirūnahā wa-aktharuhumu l-kāfirūna

Marathi ८३. अल्लाहच्या कृपा देणगींना हे जाणत व ओळखत असतानाही त्यांच्या इन्कार करीत आहेत, किंबहुना त्यांच्यातले बहुतेक जण तर कृतघ्न आहेत.

Verse 84

وَيَوْمَ نَبْعَثُ مِن كُلِّ أُمَّةٍ شَهِيدًا ثُمَّ لَا يُؤْذَنُ لِلَّذِينَ كَفَرُوا۟ وَلَا هُمْ يُسْتَعْتَبُونَ

Transliteration wayawma nabʿathu min kulli ummatin shahīdan thumma lā yu'dhanu lilladhīna kafarū walā hum yus'taʿtabūna

Marathi ८४. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहातून साक्षी उभा करू, मग इन्कारी लोकांना ना अनुमती दिली जाईल आणि ना त्यांना क्षमा-याचना करण्यास सांगितले जाईल.

Verse 85

وَإِذَا رَءَا ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ ٱلْعَذَابَ فَلَا يُخَفَّفُ عَنْهُمْ وَلَا هُمْ يُنظَرُونَ

Transliteration wa-idhā raā alladhīna ẓalamū l-ʿadhāba falā yukhaffafu ʿanhum walā hum yunẓarūna

Marathi ८५. आणि जेव्हा हे अत्याचारी लोक अज़ाब (शिक्षा-यातना) पाहून घेतील, मग ना तो त्याच्यावरून सौम्य केला जाईल आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल.

Verse 86

وَإِذَا رَءَا ٱلَّذِينَ أَشْرَكُوا۟ شُرَكَآءَهُمْ قَالُوا۟ رَبَّنَا هَـٰٓؤُلَآءِ شُرَكَآؤُنَا ٱلَّذِينَ كُنَّا نَدْعُوا۟ مِن دُونِكَ ۖ فَأَلْقَوْا۟ إِلَيْهِمُ ٱلْقَوْلَ إِنَّكُمْ لَكَـٰذِبُونَ

Transliteration wa-idhā raā alladhīna ashrakū shurakāahum qālū rabbanā hāulāi shurakāunā alladhīna kunnā nadʿū min dūnika fa-alqaw ilayhimu l-qawla innakum lakādhibūna

Marathi ८६. आणि जेव्हा अल्लाहचा सहभागी ठरविणारे आपल्या सहभागींना पाहतील तेव्हा म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते आमचे सहभागी, ज्यांना आम्ही तुला सोडून पुकारत असू, मग ते त्यांना उत्तर देतील की तुम्ही पूर्णतः खोटारडे आहात.

Verse 87

وَأَلْقَوْا۟ إِلَى ٱللَّهِ يَوْمَئِذٍ ٱلسَّلَمَ ۖ وَضَلَّ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَفْتَرُونَ

Transliteration wa-alqaw ilā l-lahi yawma-idhin l-salama waḍalla ʿanhum mā kānū yaftarūna

Marathi ८७. आणि त्या दिवशी ते सर्व (लाचार होऊन) अल्लाहसमोर आज्ञाधारक होणे मान्य करतील आणि यापूर्वी, ज्या खोट्या गोष्टी ते रचत होते, त्या सर्व त्यांच्यापासून हरवतील.

Verse 88

ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَصَدُّوا۟ عَن سَبِيلِ ٱللَّهِ زِدْنَـٰهُمْ عَذَابًا فَوْقَ ٱلْعَذَابِ بِمَا كَانُوا۟ يُفْسِدُونَ

Transliteration alladhīna kafarū waṣaddū ʿan sabīli l-lahi zid'nāhum ʿadhāban fawqa l-ʿadhābi bimā kānū yuf'sidūna

Marathi ८८. ज्या लोकांनी इन्कार केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले, आम्ही त्यांना अज़ाबवर अज़ाब वाढवित जाऊ. हा मोबदला असेल त्यांच्या उपद्रवकारितेचा!

Verse 89

وَيَوْمَ نَبْعَثُ فِى كُلِّ أُمَّةٍ شَهِيدًا عَلَيْهِم مِّنْ أَنفُسِهِمْ ۖ وَجِئْنَا بِكَ شَهِيدًا عَلَىٰ هَـٰٓؤُلَآءِ ۚ وَنَزَّلْنَا عَلَيْكَ ٱلْكِتَـٰبَ تِبْيَـٰنًا لِّكُلِّ شَىْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً وَبُشْرَىٰ لِلْمُسْلِمِينَ

Transliteration wayawma nabʿathu fī kulli ummatin shahīdan ʿalayhim min anfusihim waji'nā bika shahīdan ʿalā hāulāi wanazzalnā ʿalayka l-kitāba tib'yānan likulli shayin wahudan waraḥmatan wabush'rā lil'mus'limīna

Marathi ८९. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहात त्यांच्यातूनच त्यांच्यावर साक्ष देणारा बनवून आणू आणि आम्ही तुमच्यावर हा ग्रंथ अवतरित केला आहे ज्यात प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट वर्णन आहे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन, दया आणि खूशखबर आहे.

Verse 90

۞ إِنَّ ٱللَّهَ يَأْمُرُ بِٱلْعَدْلِ وَٱلْإِحْسَـٰنِ وَإِيتَآئِ ذِى ٱلْقُرْبَىٰ وَيَنْهَىٰ عَنِ ٱلْفَحْشَآءِ وَٱلْمُنكَرِ وَٱلْبَغْىِ ۚ يَعِظُكُمْ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ

Transliteration inna l-laha yamuru bil-ʿadli wal-iḥ'sāni waītāi dhī l-qur'bā wayanhā ʿani l-faḥshāi wal-munkari wal-baghyi yaʿiẓukum laʿallakum tadhakkarūna

Marathi ९०. निःसंशय, अल्लाह न्यायाचा, भलेपणाचा आणि जवळच्या नातेवाईकांशी चांगले वर्तन करण्याचा आदेश देतो, आणि निर्लज्जतेच्या कामांपासून आणि वाईट गोष्टींपासून आणि अत्याचारापासून रोखतो. तो स्वतः तुम्हाला उपदेश करीत आहे, यासाठी की तुम्ही बोध प्राप्त करावा.

Verse 91

وَأَوْفُوا۟ بِعَهْدِ ٱللَّهِ إِذَا عَـٰهَدتُّمْ وَلَا تَنقُضُوا۟ ٱلْأَيْمَـٰنَ بَعْدَ تَوْكِيدِهَا وَقَدْ جَعَلْتُمُ ٱللَّهَ عَلَيْكُمْ كَفِيلًا ۚ إِنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ مَا تَفْعَلُونَ

Transliteration wa-awfū biʿahdi l-lahi idhā ʿāhadttum walā tanquḍū l-aymāna baʿda tawkīdihā waqad jaʿaltumu l-laha ʿalaykum kafīlan inna l-laha yaʿlamu mā tafʿalūna

Marathi ९१. आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा, जेव्हा तुम्ही आपसात वायदे आणि वचन-करार कराल आणि शपथांना, त्यांच्या मजबूतीनंतर तोडू नका, ज्याअर्थी तुम्ही अल्लाहला आपला जामीन ठरवून घेतले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

Verse 92

وَلَا تَكُونُوا۟ كَٱلَّتِى نَقَضَتْ غَزْلَهَا مِنۢ بَعْدِ قُوَّةٍ أَنكَـٰثًا تَتَّخِذُونَ أَيْمَـٰنَكُمْ دَخَلًۢا بَيْنَكُمْ أَن تَكُونَ أُمَّةٌ هِىَ أَرْبَىٰ مِنْ أُمَّةٍ ۚ إِنَّمَا يَبْلُوكُمُ ٱللَّهُ بِهِۦ ۚ وَلَيُبَيِّنَنَّ لَكُمْ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ مَا كُنتُمْ فِيهِ تَخْتَلِفُونَ

Transliteration walā takūnū ka-allatī naqaḍat ghazlahā min baʿdi quwwatin ankāthan tattakhidhūna aymānakum dakhalan baynakum an takūna ummatun hiya arbā min ummatin innamā yablūkumu l-lahu bihi walayubayyinanna lakum yawma l-qiyāmati mā kuntum fīhi takhtalifūna

Marathi ९२. आणि त्या (स्त्री) सारखे होऊ नका, जिने आपले सूत मजबूत कातल्यानंतर तुकडे तुकडे करून टाकले की तुम्ही आपल्या शपथांना आपसात छळ-कपटाचे निमित्त बनवावे, यासाठी की एक गट दुसऱ्या गटापेक्षा उच्च ठरावा. खरी गोष्ट हीच की या वायद्याद्वारे अल्लाह तुमची परीक्षा घेत आहे. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्यासाठी कयामतच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला स्पष्ट करून सांगेल, जिच्याबाबत तुम्ही मतभेद करीत होते.

Verse 93

وَلَوْ شَآءَ ٱللَّهُ لَجَعَلَكُمْ أُمَّةً وَٰحِدَةً وَلَـٰكِن يُضِلُّ مَن يَشَآءُ وَيَهْدِى مَن يَشَآءُ ۚ وَلَتُسْـَٔلُنَّ عَمَّا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration walaw shāa l-lahu lajaʿalakum ummatan wāḥidatan walākin yuḍillu man yashāu wayahdī man yashāu walatus'alunna ʿammā kuntum taʿmalūna

Marathi ९३. आणि अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकाच मताचे बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, त्याबाबत विचारणा केली जाणार आहे.

Verse 94

وَلَا تَتَّخِذُوٓا۟ أَيْمَـٰنَكُمْ دَخَلًۢا بَيْنَكُمْ فَتَزِلَّ قَدَمٌۢ بَعْدَ ثُبُوتِهَا وَتَذُوقُوا۟ ٱلسُّوٓءَ بِمَا صَدَدتُّمْ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۖ وَلَكُمْ عَذَابٌ عَظِيمٌ

Transliteration walā tattakhidhū aymānakum dakhalan baynakum fatazilla qadamun baʿda thubūtihā watadhūqū l-sūa bimā ṣadadttum ʿan sabīli l-lahi walakum ʿadhābun ʿaẓīmun

Marathi ९४. आणि तुम्ही आपल्या शपथांना आपसातील वैर-द्वेषाचे साधन बनवू नका, अन्यथा तुमची पावले आपल्या मजबुती (स्थिरते) नंतर डळमळू लागतील आणि तुम्हाला सक्त शिक्षा-यातना चाखावी लागेल, कारण की तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखले आणि तुम्हाला जास्त कठोर शिक्षा-यातना होईल.

Verse 95

وَلَا تَشْتَرُوا۟ بِعَهْدِ ٱللَّهِ ثَمَنًا قَلِيلًا ۚ إِنَّمَا عِندَ ٱللَّهِ هُوَ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ

Transliteration walā tashtarū biʿahdi l-lahi thamanan qalīlan innamā ʿinda l-lahi huwa khayrun lakum in kuntum taʿlamūna

Marathi ९५. आणि तुम्ही अल्लाहच्या वायद्यास थोड्याशा किंमतीवर विकत जाऊ नका. लक्षात ठेवा, अल्लाहच्या जवळची वस्तूच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल.

Verse 96

مَا عِندَكُمْ يَنفَدُ ۖ وَمَا عِندَ ٱللَّهِ بَاقٍ ۗ وَلَنَجْزِيَنَّ ٱلَّذِينَ صَبَرُوٓا۟ أَجْرَهُم بِأَحْسَنِ مَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration mā ʿindakum yanfadu wamā ʿinda l-lahi bāqin walanajziyanna alladhīna ṣabarū ajrahum bi-aḥsani mā kānū yaʿmalūna

Marathi ९६. तुमच्याजवळ जे काही आहे, ते सर्व नाश पावणारे आहे आणि अल्लाहजवळ जे काही आहे नेहमी राहणारे आहे आणि सबुरी राखणाऱ्यांना आम्ही चांगल्या कर्माचा चांगला मोबदला अवश्य प्रदान करू.

Verse 97

مَنْ عَمِلَ صَـٰلِحًا مِّن ذَكَرٍ أَوْ أُنثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَنُحْيِيَنَّهُۥ حَيَوٰةً طَيِّبَةً ۖ وَلَنَجْزِيَنَّهُمْ أَجْرَهُم بِأَحْسَنِ مَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration man ʿamila ṣāliḥan min dhakarin aw unthā wahuwa mu'minun falanuḥ'yiyannahu ḥayatan ṭayyibatan walanajziyannahum ajrahum bi-aḥsani mā kānū yaʿmalūna

Marathi ९७. जो मनुष्य सत्कर्म करील, पुरुष असो किंवा स्त्री, आणि ईमान राखणाराही असेल, तर आम्ही त्याला निःसंशय उत्तम जीवन प्रदान करू आणि त्यांच्या नेकीच्या कर्मांचा उत्तम मोबदलाही त्यांना अवश्य प्रदान करू.

Verse 98

فَإِذَا قَرَأْتَ ٱلْقُرْءَانَ فَٱسْتَعِذْ بِٱللَّهِ مِنَ ٱلشَّيْطَـٰنِ ٱلرَّجِيمِ

Transliteration fa-idhā qarata l-qur'āna fa-is'taʿidh bil-lahi mina l-shayṭāni l-rajīmi

Marathi ९८. कुरआन पठण करताना, धिःक्कारलेल्या सैतानापासून अल्लाहचे शरण मागत जा.

Verse 99

إِنَّهُۥ لَيْسَ لَهُۥ سُلْطَـٰنٌ عَلَى ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَلَىٰ رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ

Transliteration innahu laysa lahu sul'ṭānun ʿalā alladhīna āmanū waʿalā rabbihim yatawakkalūna

Marathi ९९. (निश्चितच) त्याचा जोर अशा लोकांवर कधीही चालत नाही, जे ईमान राखतात, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात.

Verse 100

إِنَّمَا سُلْطَـٰنُهُۥ عَلَى ٱلَّذِينَ يَتَوَلَّوْنَهُۥ وَٱلَّذِينَ هُم بِهِۦ مُشْرِكُونَ

Transliteration innamā sul'ṭānuhu ʿalā alladhīna yatawallawnahu wa-alladhīna hum bihi mush'rikūna

Marathi १००. मात्र, अशा लोकांवर त्याचा प्रभाव जरूर आहे, जे त्याच्याशी मैत्री ठेवतात आणि त्याला अल्लाहचा भागीदार बनवितात.

Verse 101

وَإِذَا بَدَّلْنَآ ءَايَةً مَّكَانَ ءَايَةٍ ۙ وَٱللَّهُ أَعْلَمُ بِمَا يُنَزِّلُ قَالُوٓا۟ إِنَّمَآ أَنتَ مُفْتَرٍۭ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ

Transliteration wa-idhā baddalnā āyatan makāna āyatin wal-lahu aʿlamu bimā yunazzilu qālū innamā anta muf'tarin bal aktharuhum lā yaʿlamūna

Marathi १०१. आणि जेव्हा आम्ही एखाद्या आयतीच्या जागी दुसरी आयत बदलतो आणि जे काही अल्लाह अवतरित करतो, ते तो चांगल्या प्रकारे जाणतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तर हे स्वतः रचून आणता, वास्तविक त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत.

Verse 102

قُلْ نَزَّلَهُۥ رُوحُ ٱلْقُدُسِ مِن رَّبِّكَ بِٱلْحَقِّ لِيُثَبِّتَ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَهُدًى وَبُشْرَىٰ لِلْمُسْلِمِينَ

Transliteration qul nazzalahu rūḥu l-qudusi min rabbika bil-ḥaqi liyuthabbita alladhīna āmanū wahudan wabush'rā lil'mus'limīna

Marathi १०२. तुम्ही सांगा की त्यास तुमच्या पालनकर्त्यातर्फे जिब्रील सत्यासह घेऊन आले आहेत, यासाठी की ईमान राखणाऱ्यांना अल्लाहने स्थैर्य प्रदान करावे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन आणि खूशखबर ठरावी.

Verse 103

وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّهُمْ يَقُولُونَ إِنَّمَا يُعَلِّمُهُۥ بَشَرٌ ۗ لِّسَانُ ٱلَّذِى يُلْحِدُونَ إِلَيْهِ أَعْجَمِىٌّ وَهَـٰذَا لِسَانٌ عَرَبِىٌّ مُّبِينٌ

Transliteration walaqad naʿlamu annahum yaqūlūna innamā yuʿallimuhu basharun lisānu alladhī yul'ḥidūna ilayhi aʿjamiyyun wahādhā lisānun ʿarabiyyun mubīnun

Marathi १०३. आणि आम्हाला चांगले माहीत आहे, जे इन्कारी म्हणतात की त्यांना तर एक माणूस शिकवितो ज्या माणसाकडे यांचा इशारा आहे तो तर ग़ैरअरबी (अजमी) आहे आणि हा कुरआन तर स्पष्ट अरबी भाषेत आहे.

Verse 104

إِنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ لَا يَهْدِيهِمُ ٱللَّهُ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ

Transliteration inna alladhīna lā yu'minūna biāyāti l-lahi lā yahdīhimu l-lahu walahum ʿadhābun alīmun

Marathi १०४. जे लोक अल्लाहच्या आयतींवर ईमान राखत नाही, त्यांना अल्लाहतर्फेही मार्गदर्शन लाभत नाही आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे.

Verse 105

إِنَّمَا يَفْتَرِى ٱلْكَذِبَ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ ۖ وَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْكَـٰذِبُونَ

Transliteration innamā yaftarī l-kadhiba alladhīna lā yu'minūna biāyāti l-lahi wa-ulāika humu l-kādhibūna

Marathi १०५. खोटा आरोप तर तेच ठेवतात, ज्यांचे अल्लाहच्या आयतींवर ईमान नसते आणि हेच लोक खोटे आहेत.

Verse 106

مَن كَفَرَ بِٱللَّهِ مِنۢ بَعْدِ إِيمَـٰنِهِۦٓ إِلَّا مَنْ أُكْرِهَ وَقَلْبُهُۥ مُطْمَئِنٌّۢ بِٱلْإِيمَـٰنِ وَلَـٰكِن مَّن شَرَحَ بِٱلْكُفْرِ صَدْرًا فَعَلَيْهِمْ غَضَبٌ مِّنَ ٱللَّهِ وَلَهُمْ عَذَابٌ عَظِيمٌ

Transliteration man kafara bil-lahi min baʿdi īmānihi illā man uk'riha waqalbuhu muṭ'ma-innun bil-īmāni walākin man sharaḥa bil-kuf'ri ṣadran faʿalayhim ghaḍabun mina l-lahi walahum ʿadhābun ʿaẓīmun

Marathi १०६. जो मनुष्य आपल्या ईमानानंतर अल्लाहशी इन्कार करील, त्याच्याखेरीज, ज्याला तसे करण्यास भाग पाडले जावे आणि त्याचे मन मात्र ईमानावर कायम असावे, परंतु जे लोक अगदी मोकळ्या मनाने कुप्र (इन्कार) करतील तर अशा लोकांवर अल्लाहचा प्रकोप आहे आणि अशाच लोकांसाठी भयंकर शिक्षा यातना आहे.

Verse 107

ذَٰلِكَ بِأَنَّهُمُ ٱسْتَحَبُّوا۟ ٱلْحَيَوٰةَ ٱلدُّنْيَا عَلَى ٱلْـَٔاخِرَةِ وَأَنَّ ٱللَّهَ لَا يَهْدِى ٱلْقَوْمَ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration dhālika bi-annahumu is'taḥabbū l-ḥayata l-dun'yā ʿalā l-ākhirati wa-anna l-laha lā yahdī l-qawma l-kāfirīna

Marathi १०७. हे अशासाठी की त्यांनी ऐहिक जीवनाला मरणोत्तर जीवनापेक्षा अधिक चांगले समजून घेतले. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह इन्कार करणाऱ्या लोकांना मार्ग दाखवित नाही.

Verse 108

أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ طَبَعَ ٱللَّهُ عَلَىٰ قُلُوبِهِمْ وَسَمْعِهِمْ وَأَبْصَـٰرِهِمْ ۖ وَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْغَـٰفِلُونَ

Transliteration ulāika alladhīna ṭabaʿa l-lahu ʿalā qulūbihim wasamʿihim wa-abṣārihim wa-ulāika humu l-ghāfilūna

Marathi १०८. हे असे लोक होते, ज्यांच्या हृदयांवर आणि ज्यांच्या कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि हेच लोक गाफील आहेत.

Verse 109

لَا جَرَمَ أَنَّهُمْ فِى ٱلْـَٔاخِرَةِ هُمُ ٱلْخَـٰسِرُونَ

Transliteration lā jarama annahum fī l-ākhirati humu l-khāsirūna

Marathi १०९. निःसंशय, हेच लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये फार मोठे नुकसान उचलणार आहेत.

Verse 110

ثُمَّ إِنَّ رَبَّكَ لِلَّذِينَ هَاجَرُوا۟ مِنۢ بَعْدِ مَا فُتِنُوا۟ ثُمَّ جَـٰهَدُوا۟ وَصَبَرُوٓا۟ إِنَّ رَبَّكَ مِنۢ بَعْدِهَا لَغَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration thumma inna rabbaka lilladhīna hājarū min baʿdi mā futinū thumma jāhadū waṣabarū inna rabbaka min baʿdihā laghafūrun raḥīmun

Marathi ११०. मग ज्या लोकांनी कसोटीत टाकले गेल्यानंतर (धार्मिक कारणांनी) देशत्याग केला, मग जिहाद केला आणि धीर-संयम दाखविला, निःसंशय, तुमचा पालनकर्ता, या गोष्टीनंतर त्यांना माफ करणारा आणि दया करणारा आहे.

Verse 111

۞ يَوْمَ تَأْتِى كُلُّ نَفْسٍ تُجَـٰدِلُ عَن نَّفْسِهَا وَتُوَفَّىٰ كُلُّ نَفْسٍ مَّا عَمِلَتْ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ

Transliteration yawma tatī kullu nafsin tujādilu ʿan nafsihā watuwaffā kullu nafsin mā ʿamilat wahum lā yuẓ'lamūna

Marathi १११. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य स्वतःसाठी वादविवाद घालत येईल आणि प्रत्येकाला त्याच्या कृत कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि लोकांवर किंचितही अत्याचार केला जाणार नाही.

Verse 112

وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا قَرْيَةً كَانَتْ ءَامِنَةً مُّطْمَئِنَّةً يَأْتِيهَا رِزْقُهَا رَغَدًا مِّن كُلِّ مَكَانٍ فَكَفَرَتْ بِأَنْعُمِ ٱللَّهِ فَأَذَٰقَهَا ٱللَّهُ لِبَاسَ ٱلْجُوعِ وَٱلْخَوْفِ بِمَا كَانُوا۟ يَصْنَعُونَ

Transliteration waḍaraba l-lahu mathalan qaryatan kānat āminatan muṭ'ma-innatan yatīhā riz'quhā raghadan min kulli makānin fakafarat bi-anʿumi l-lahi fa-adhāqahā l-lahu libāsa l-jūʿi wal-khawfi bimā kānū yaṣnaʿūna

Marathi ११२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या वस्तीचे उदाहरण सादर करतो, जी सुख-शांतीपूर्वक होती. तिची रोजी (आजिविवका) तिच्याजवळ सुसंपन्नतेसह सर्व मार्गांनी चालून येत होती, मग त्या वस्तीने अल्लाहच्या कृपा देणग्यांचा इन्कार केला, तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने तिला भूक आणि भयाचा स्वाद चाखविला. हा मोबदला होता त्यांच्या वाईट कर्मांचा.

Verse 113

وَلَقَدْ جَآءَهُمْ رَسُولٌ مِّنْهُمْ فَكَذَّبُوهُ فَأَخَذَهُمُ ٱلْعَذَابُ وَهُمْ ظَـٰلِمُونَ

Transliteration walaqad jāahum rasūlun min'hum fakadhabūhu fa-akhadhahumu l-ʿadhābu wahum ẓālimūna

Marathi ११३. आणि त्यांच्याजवळ, त्यांच्यामधूनच पैगंबर येऊन पोहोचला, तरीही त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा अज़ाब (शिक्षा-यातना) ने त्यांना येऊन धरले आणि ते होतेच अत्याचारी.

Verse 114

فَكُلُوا۟ مِمَّا رَزَقَكُمُ ٱللَّهُ حَلَـٰلًا طَيِّبًا وَٱشْكُرُوا۟ نِعْمَتَ ٱللَّهِ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ

Transliteration fakulū mimmā razaqakumu l-lahu ḥalālan ṭayyiban wa-ush'kurū niʿ'mata l-lahi in kuntum iyyāhu taʿbudūna

Marathi ११४. आणि जी काही हलाल (उचित) आणि पाक रोजी (आजिविका) अल्लाहने तुम्हाला देऊन ठेवली आहे, ती खा आणि अल्लाहच्या देणगी (नेमत) बद्दल कृतज्ञता व्यक्त करा, जर तुम्ही त्याचीच उपासना करत असाल.

Verse 115

إِنَّمَا حَرَّمَ عَلَيْكُمُ ٱلْمَيْتَةَ وَٱلدَّمَ وَلَحْمَ ٱلْخِنزِيرِ وَمَآ أُهِلَّ لِغَيْرِ ٱللَّهِ بِهِۦ ۖ فَمَنِ ٱضْطُرَّ غَيْرَ بَاغٍ وَلَا عَادٍ فَإِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration innamā ḥarrama ʿalaykumu l-maytata wal-dama walaḥma l-khinzīri wamā uhilla lighayri l-lahi bihi famani uḍ'ṭurra ghayra bāghin walā ʿādin fa-inna l-laha ghafūrun raḥīmun

Marathi ११५. तुमच्याकरिता केवळ मेलेले आणि रक्त आणि डुकराचे मांस आणि ज्या वस्तूवर अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेतले जाईल, हराम आहे. तरीही जर एखादा मनुष्य लाचार केला जावा आणि तो अत्याचारी नसावा आणि ना मर्यादेचे उल्लंघन करणारा असावा तर निःसंशय अल्लाह माफ करणारा आणि खूप दया करणारा आहे.

Verse 116

وَلَا تَقُولُوا۟ لِمَا تَصِفُ أَلْسِنَتُكُمُ ٱلْكَذِبَ هَـٰذَا حَلَـٰلٌ وَهَـٰذَا حَرَامٌ لِّتَفْتَرُوا۟ عَلَى ٱللَّهِ ٱلْكَذِبَ ۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَفْتَرُونَ عَلَى ٱللَّهِ ٱلْكَذِبَ لَا يُفْلِحُونَ

Transliteration walā taqūlū limā taṣifu alsinatukumu l-kadhiba hādhā ḥalālun wahādhā ḥarāmun litaftarū ʿalā l-lahi l-kadhiba inna alladhīna yaftarūna ʿalā l-lahi l-kadhiba lā yuf'liḥūna

Marathi ११६. आणि एखाद्या वस्तूला आपल्या तोंडाने खोटेच सांगत जाऊ नका की ही हलाल आहे आणि ही हराम आहे की (अशाने) अल्लाहवर खोटा आरोप लावाल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहवर खोटा आरोप रचणारे सफलतेपासून वंचितच राहतात.

Verse 117

مَتَـٰعٌ قَلِيلٌ وَلَهُمْ عَذَابٌ أَلِيمٌ

Transliteration matāʿun qalīlun walahum ʿadhābun alīmun

Marathi ११७. त्यांना फार कमी लाभ प्राप्त होतो आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्ष-यातना) आहे.

Verse 118

وَعَلَى ٱلَّذِينَ هَادُوا۟ حَرَّمْنَا مَا قَصَصْنَا عَلَيْكَ مِن قَبْلُ ۖ وَمَا ظَلَمْنَـٰهُمْ وَلَـٰكِن كَانُوٓا۟ أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ

Transliteration waʿalā alladhīna hādū ḥarramnā mā qaṣaṣnā ʿalayka min qablu wamā ẓalamnāhum walākin kānū anfusahum yaẓlimūna

Marathi ११८. आणि यहूदी लोकांवर आम्ही जे काही हराम केले होते, ते आम्ही यापूर्वीच तुम्हाला ऐकविले आहे. आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही किंबहुना ते स्वतःच आपल्या प्राणांवर जुलूम करीत राहिले.

Verse 119

ثُمَّ إِنَّ رَبَّكَ لِلَّذِينَ عَمِلُوا۟ ٱلسُّوٓءَ بِجَهَـٰلَةٍ ثُمَّ تَابُوا۟ مِنۢ بَعْدِ ذَٰلِكَ وَأَصْلَحُوٓا۟ إِنَّ رَبَّكَ مِنۢ بَعْدِهَا لَغَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration thumma inna rabbaka lilladhīna ʿamilū l-sūa bijahālatin thumma tābū min baʿdi dhālika wa-aṣlaḥū inna rabbaka min baʿdihā laghafūrun raḥīmun

Marathi ११९. की जो कोणी अज्ञानाने वाईट कर्म करील, मग त्यानंतर तौबा (क्षमा-याचना) करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणाही करून घेईल तर मग तुमचा पालनकर्ता निश्चितच मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणारा आहे.

Verse 120

إِنَّ إِبْرَٰهِيمَ كَانَ أُمَّةً قَانِتًا لِّلَّهِ حَنِيفًا وَلَمْ يَكُ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ

Transliteration inna ib'rāhīma kāna ummatan qānitan lillahi ḥanīfan walam yaku mina l-mush'rikīna

Marathi १२०. निःसंशय, इब्राहीम (मुस्लिम जनसमूहाचे) प्रमुख आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे मोठे आज्ञाधारक, सगळीकडून अलग होऊन फक्त एक अल्लाहचे झाले होते आणि अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते.

Verse 121

شَاكِرًا لِّأَنْعُمِهِ ۚ ٱجْتَبَىٰهُ وَهَدَىٰهُ إِلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ

Transliteration shākiran li-anʿumihi ij'tabāhu wahadāhu ilā ṣirāṭin mus'taqīmin

Marathi १२१. सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रदान केलेल्या कृपा देणग्यांबद्दल कृतज्ञशील होते. अल्लाहने त्यांना निवडून घेतले होते आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला होता.

Verse 122

وَءَاتَيْنَـٰهُ فِى ٱلدُّنْيَا حَسَنَةً ۖ وَإِنَّهُۥ فِى ٱلْـَٔاخِرَةِ لَمِنَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration waātaynāhu fī l-dun'yā ḥasanatan wa-innahu fī l-ākhirati lamina l-ṣāliḥīna

Marathi १२२. आणि आम्ही त्यांना या जगातही भलाई प्रदान केली आणि निःसंशय आखिरतमध्येही ते नेक सदाचारी लोकांपैकी आहेत.

Verse 123

ثُمَّ أَوْحَيْنَآ إِلَيْكَ أَنِ ٱتَّبِعْ مِلَّةَ إِبْرَٰهِيمَ حَنِيفًا ۖ وَمَا كَانَ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ

Transliteration thumma awḥaynā ilayka ani ittabiʿ millata ib'rāhīma ḥanīfan wamā kāna mina l-mush'rikīna

Marathi १२३. मग आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की तुम्ही इब्राहीमच्याच मार्गाचे अनुसरण करा, जे सर्वांपासून अलग होऊन एक अल्लाहचे झाले होते आणि ते अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते.

Verse 124

إِنَّمَا جُعِلَ ٱلسَّبْتُ عَلَى ٱلَّذِينَ ٱخْتَلَفُوا۟ فِيهِ ۚ وَإِنَّ رَبَّكَ لَيَحْكُمُ بَيْنَهُمْ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ فِيمَا كَانُوا۟ فِيهِ يَخْتَلِفُونَ

Transliteration innamā juʿila l-sabtu ʿalā alladhīna ikh'talafū fīhi wa-inna rabbaka layaḥkumu baynahum yawma l-qiyāmati fīmā kānū fīhi yakhtalifūna

Marathi १२४. शनिवारच्या दिवसाचे महत्त्व तर फक्त त्या लोकांकरिता अत्यावश्य ठरविले गेले होते, ज्यांनी त्यात मतभेद केला होता. वास्तविक तुमचा पालनकर्ता स्वतःच त्यांच्यात त्यांच्या मतभेदाचा फैसला कयामतच्या दिवशी करेल.

Verse 125

ٱدْعُ إِلَىٰ سَبِيلِ رَبِّكَ بِٱلْحِكْمَةِ وَٱلْمَوْعِظَةِ ٱلْحَسَنَةِ ۖ وَجَـٰدِلْهُم بِٱلَّتِى هِىَ أَحْسَنُ ۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِۦ ۖ وَهُوَ أَعْلَمُ بِٱلْمُهْتَدِينَ

Transliteration ud'ʿu ilā sabīli rabbika bil-ḥik'mati wal-mawʿiẓati l-ḥasanati wajādil'hum bi-allatī hiya aḥsanu inna rabbaka huwa aʿlamu biman ḍalla ʿan sabīlihi wahuwa aʿlamu bil-muh'tadīna

Marathi १२५. आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना हिकमतीने आणि उत्तम अशा शिकवणीसह बोलवा आणि त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोला. निःसंशय तुमचा पालनकर्ता, आपल्या मार्गापासून भटकलेल्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांनाही तो पूर्णतः जाणून आहे.

Verse 126

وَإِنْ عَاقَبْتُمْ فَعَاقِبُوا۟ بِمِثْلِ مَا عُوقِبْتُم بِهِۦ ۖ وَلَئِن صَبَرْتُمْ لَهُوَ خَيْرٌ لِّلصَّـٰبِرِينَ

Transliteration wa-in ʿāqabtum faʿāqibū bimith'li mā ʿūqib'tum bihi wala-in ṣabartum lahuwa khayrun lilṣṣābirīna

Marathi १२६. आणि (एखाद्याशी) सूड घ्यायचाच असेल तर अगदी तेवढाच घ्या जेवढे दुःख तुम्हाला पोहचविले गेले असेल आणि जर सबुरी राखाला तर निःसंशय सबुरी राखणाऱ्यांसाठी हेच उत्तम आहे.

Verse 127

وَٱصْبِرْ وَمَا صَبْرُكَ إِلَّا بِٱللَّهِ ۚ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَلَا تَكُ فِى ضَيْقٍ مِّمَّا يَمْكُرُونَ

Transliteration wa-iṣ'bir wamā ṣabruka illā bil-lahi walā taḥzan ʿalayhim walā taku fī ḍayqin mimmā yamkurūna

Marathi १२७. तुम्ही धीर-संयम राखा. अल्लाहच्या दयेविना तुम्ही धीर-संयम राखूच शकत नाही आणि त्यांच्या अवस्थेने दुःखी कष्टी होऊ नका आणि जो कावेबाजपणा हे करतात, त्यामुळे मन संकुचित करू नका.

Verse 128

إِنَّ ٱللَّهَ مَعَ ٱلَّذِينَ ٱتَّقَوا۟ وَّٱلَّذِينَ هُم مُّحْسِنُونَ

Transliteration inna l-laha maʿa alladhīna ittaqaw wa-alladhīna hum muḥ'sinūna

Marathi १२८. निःसंशय, जे लोक अल्लाहचे भय राखून, दुराचारापासून दूर राहतात आणि सत्कर्म करीत राहतात, अल्लाह त्यांच्या पाठीशी आहे.

Read Surah An-Nahl in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.