Surah Al-Hijr in Marathi: translation and audio
Surah 15 · الحجر · The Rocky Tract · 99 verses
Surah Al-Hijr verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Hijr word by word in English.
Verse 1
الٓر ۚ تِلْكَ ءَايَـٰتُ ٱلْكِتَـٰبِ وَقُرْءَانٍ مُّبِينٍ
Transliteration alif-lam-ra til'ka āyātu l-kitābi waqur'ānin mubīnin
Marathi १. अलिफ. लाम. रॉ या (अल्लाहच्या) ग्रंथाच्या आयती आहेत आणि स्पष्ट अशा कुरआनाच्या.
Verse 2
رُّبَمَا يَوَدُّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَوْ كَانُوا۟ مُسْلِمِينَ
Transliteration rubamā yawaddu alladhīna kafarū law kānū mus'limīna
Marathi २. अशीही वेळ येईल जेव्हा इन्कार करणारे आपल्या ईमानधारक होण्याची इच्छा करतील.
Verse 3
ذَرْهُمْ يَأْكُلُوا۟ وَيَتَمَتَّعُوا۟ وَيُلْهِهِمُ ٱلْأَمَلُ ۖ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
Transliteration dharhum yakulū wayatamattaʿū wayul'hihimu l-amalu fasawfa yaʿlamūna
Marathi ३. तुम्ही त्यांना खाण्यात, लाभ उचलण्यात आणि (खोट्या) अपेक्षा बाळगण्यात मग्न असलेले सोडा. ते स्वतः लवकरच जाणून घेतील.
Verse 4
وَمَآ أَهْلَكْنَا مِن قَرْيَةٍ إِلَّا وَلَهَا كِتَابٌ مَّعْلُومٌ
Transliteration wamā ahlaknā min qaryatin illā walahā kitābun maʿlūmun
Marathi ४. आणि कोणत्याही वस्तीला आम्ही नष्ट केले नाही, परंतु हे की तिच्याकरिता निश्चित असे लिखित होते.
Verse 5
مَّا تَسْبِقُ مِنْ أُمَّةٍ أَجَلَهَا وَمَا يَسْتَـْٔخِرُونَ
Transliteration mā tasbiqu min ummatin ajalahā wamā yastakhirūna
Marathi ५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१
Verse 6
وَقَالُوا۟ يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِى نُزِّلَ عَلَيْهِ ٱلذِّكْرُ إِنَّكَ لَمَجْنُونٌ
Transliteration waqālū yāayyuhā alladhī nuzzila ʿalayhi l-dhik'ru innaka lamajnūnun
Marathi ६. आणि ते म्हणाले, हे माणसा! ज्यावर कुरआन अवतरित केले गेले आहे निश्चितच तू एखादा वेडा आहे.
Verse 7
لَّوْ مَا تَأْتِينَا بِٱلْمَلَـٰٓئِكَةِ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
Transliteration law mā tatīnā bil-malāikati in kunta mina l-ṣādiqīna
Marathi ७. जर तू अगदी सच्चा आहे तर मग आमच्याजवळ फरिश्त्यांना का नाही आणत?
Verse 8
مَا نُنَزِّلُ ٱلْمَلَـٰٓئِكَةَ إِلَّا بِٱلْحَقِّ وَمَا كَانُوٓا۟ إِذًا مُّنظَرِينَ
Transliteration mā nunazzilu l-malāikata illā bil-ḥaqi wamā kānū idhan munẓarīna
Marathi ८. आम्ही फरिश्त्यांना सत्यासहच अवतरित करतो. आणि अशा वेळी त्यांना सवड दिली जात नाही.
Verse 9
إِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا ٱلذِّكْرَ وَإِنَّا لَهُۥ لَحَـٰفِظُونَ
Transliteration innā naḥnu nazzalnā l-dhik'ra wa-innā lahu laḥāfiẓūna
Marathi ९. निःसंशय आम्हीच या कुरआनाला अवतरित केले आहे आणि आम्हीच त्याचे संरक्षक आहोत.
Verse 10
وَلَقَدْ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ فِى شِيَعِ ٱلْأَوَّلِينَ
Transliteration walaqad arsalnā min qablika fī shiyaʿi l-awalīna
Marathi १०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या जनसमूहांमध्येही आपले पैगंबर पाठवित राहिलो.
Verse 11
وَمَا يَأْتِيهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration wamā yatīhim min rasūlin illā kānū bihi yastahziūna
Marathi ११. आणि (तथापि) जो पैगंबरदेखील त्यांच्याजवळ आला, त्याची ते थट्टाच उडवित राहिले.
Verse 12
كَذَٰلِكَ نَسْلُكُهُۥ فِى قُلُوبِ ٱلْمُجْرِمِينَ
Transliteration kadhālika naslukuhu fī qulūbi l-muj'rimīna
Marathi १२. अपराधी लोकांच्या मनात आम्ही अशाच प्रकारे हेच रचत असतो.
Verse 13
لَا يُؤْمِنُونَ بِهِۦ ۖ وَقَدْ خَلَتْ سُنَّةُ ٱلْأَوَّلِينَ
Transliteration lā yu'minūna bihi waqad khalat sunnatu l-awalīna
Marathi १३. ते याच्यावर ईमान राखत नाही आणि निःसंशय पूर्वीच्या लोकांची हीच पद्धत राहिली आहे.
Verse 14
وَلَوْ فَتَحْنَا عَلَيْهِم بَابًا مِّنَ ٱلسَّمَآءِ فَظَلُّوا۟ فِيهِ يَعْرُجُونَ
Transliteration walaw fataḥnā ʿalayhim bāban mina l-samāi faẓallū fīhi yaʿrujūna
Marathi १४. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी आकाशात (जाण्याचा) दरवाजाही उघडून दिला आणि ते तिथे चढूही लागले.
Verse 15
لَقَالُوٓا۟ إِنَّمَا سُكِّرَتْ أَبْصَـٰرُنَا بَلْ نَحْنُ قَوْمٌ مَّسْحُورُونَ
Transliteration laqālū innamā sukkirat abṣārunā bal naḥnu qawmun masḥūrūna
Marathi १५. तरीही हेच म्हणतील की आमची नजरबंदी केली गेली आहे, किंबहुना आमच्यावर जादूटोणा केला गेला आहे.
Verse 16
وَلَقَدْ جَعَلْنَا فِى ٱلسَّمَآءِ بُرُوجًا وَزَيَّنَّـٰهَا لِلنَّـٰظِرِينَ
Transliteration walaqad jaʿalnā fī l-samāi burūjan wazayyannāhā lilnnāẓirīna
Marathi १६. आणि निःसंशय, आम्ही आकाशात बुरुज (राशी) बनविले आहेत आणि पाहणाऱ्यांकरिता याला सुशोभित केले आहे.
Verse 17
وَحَفِظْنَـٰهَا مِن كُلِّ شَيْطَـٰنٍ رَّجِيمٍ
Transliteration waḥafiẓ'nāhā min kulli shayṭānin rajīmin
Marathi १७. आणि धिःक्कारलेल्या प्रत्येक सैतानापासून याला सुरक्षित ठेवले आहे.
Verse 18
إِلَّا مَنِ ٱسْتَرَقَ ٱلسَّمْعَ فَأَتْبَعَهُۥ شِهَابٌ مُّبِينٌ
Transliteration illā mani is'taraqa l-samʿa fa-atbaʿahu shihābun mubīnun
Marathi १८. तथापि, जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो, भडकत्या आगीचा निखारा त्याच्या पाठीशी लागतो.
Verse 19
وَٱلْأَرْضَ مَدَدْنَـٰهَا وَأَلْقَيْنَا فِيهَا رَوَٰسِىَ وَأَنۢبَتْنَا فِيهَا مِن كُلِّ شَىْءٍ مَّوْزُونٍ
Transliteration wal-arḍa madadnāhā wa-alqaynā fīhā rawāsiya wa-anbatnā fīhā min kulli shayin mawzūnin
Marathi १९. आणि जमिनीला आम्ही पसरवून दिले आहे आणि तिच्यावर पर्वत ठेवले आहेत आणि तिच्यात प्रत्येक वस्तू आम्ही निश्चित प्रमाणात उगविली आहे.
Verse 20
وَجَعَلْنَا لَكُمْ فِيهَا مَعَـٰيِشَ وَمَن لَّسْتُمْ لَهُۥ بِرَٰزِقِينَ
Transliteration wajaʿalnā lakum fīhā maʿāyisha waman lastum lahu birāziqīna
Marathi २०. आणि तिच्यातच आम्ही तुमच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था केली आहे आणि (त्यांच्यासाठीही) ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाहीत.
Verse 21
وَإِن مِّن شَىْءٍ إِلَّا عِندَنَا خَزَآئِنُهُۥ وَمَا نُنَزِّلُهُۥٓ إِلَّا بِقَدَرٍ مَّعْلُومٍ
Transliteration wa-in min shayin illā ʿindanā khazāinuhu wamā nunazziluhu illā biqadarin maʿlūmin
Marathi २१. आणि जेवढ्या म्हणून चीज-वस्तू आहेत, त्या सर्वांचा खजिना आमच्याजवळ आहे, आणि आम्ही प्रत्येक वस्तू तिच्या निर्धारित प्रमाणात उतरवितो.
Verse 22
وَأَرْسَلْنَا ٱلرِّيَـٰحَ لَوَٰقِحَ فَأَنزَلْنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَسْقَيْنَـٰكُمُوهُ وَمَآ أَنتُمْ لَهُۥ بِخَـٰزِنِينَ
Transliteration wa-arsalnā l-riyāḥa lawāqiḥa fa-anzalnā mina l-samāi māan fa-asqaynākumūhu wamā antum lahu bikhāzinīna
Marathi २२. आणि आम्ही वजनदार वाऱ्यांना पाठिवतो, मग आकाशातून पर्जन्य वृष्टी करून तुम्हाला तृप्त करतो आणि तुम्ही त्याचा संग्रह करून ठेवणारे नाहीत.
Verse 23
وَإِنَّا لَنَحْنُ نُحْىِۦ وَنُمِيتُ وَنَحْنُ ٱلْوَٰرِثُونَ
Transliteration wa-innā lanaḥnu nuḥ'yī wanumītu wanaḥnu l-wārithūna
Marathi २३. आणि आम्हीच जीवन देतो आणि मृत्युही देतो आणि (शेवटी) आम्हीच वारस आहोत.
Verse 24
وَلَقَدْ عَلِمْنَا ٱلْمُسْتَقْدِمِينَ مِنكُمْ وَلَقَدْ عَلِمْنَا ٱلْمُسْتَـْٔخِرِينَ
Transliteration walaqad ʿalim'nā l-mus'taqdimīna minkum walaqad ʿalim'nā l-mus'takhirīna
Marathi २४. आणि तुमच्यापैकी पुढे जाणाऱ्यांना आणि मागे राहणाऱ्यांनाही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 25
وَإِنَّ رَبَّكَ هُوَ يَحْشُرُهُمْ ۚ إِنَّهُۥ حَكِيمٌ عَلِيمٌ
Transliteration wa-inna rabbaka huwa yaḥshuruhum innahu ḥakīmun ʿalīmun
Marathi २५. आणि तुमचा पालनकर्ता समस्त लोकांना एकत्रित करेल. निःसंशय तो मोठा तत्त्वदर्शी, मोठा ज्ञानी आहे.
Verse 26
وَلَقَدْ خَلَقْنَا ٱلْإِنسَـٰنَ مِن صَلْصَـٰلٍ مِّنْ حَمَإٍ مَّسْنُونٍ
Transliteration walaqad khalaqnā l-insāna min ṣalṣālin min ḥama-in masnūnin
Marathi २६. आणि निःसंशय, आम्ही मानवाला खनकणाऱ्या (कोरड्या) मातीपासून, जी सडलेल्या गाऱ्याची होती, निर्माण केले आहे.
Verse 27
وَٱلْجَآنَّ خَلَقْنَـٰهُ مِن قَبْلُ مِن نَّارِ ٱلسَّمُومِ
Transliteration wal-jāna khalaqnāhu min qablu min nāri l-samūmi
Marathi २७. आणि त्याच्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्निशिखेपासून निर्माण केले.
Verse 28
وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَـٰٓئِكَةِ إِنِّى خَـٰلِقٌۢ بَشَرًا مِّن صَلْصَـٰلٍ مِّنْ حَمَإٍ مَّسْنُونٍ
Transliteration wa-idh qāla rabbuka lil'malāikati innī khāliqun basharan min ṣalṣālin min ḥama-in masnūnin
Marathi २८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे.
Verse 29
فَإِذَا سَوَّيْتُهُۥ وَنَفَخْتُ فِيهِ مِن رُّوحِى فَقَعُوا۟ لَهُۥ سَـٰجِدِينَ
Transliteration fa-idhā sawwaytuhu wanafakhtu fīhi min rūḥī faqaʿū lahu sājidīna
Marathi २९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका)
Verse 30
فَسَجَدَ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ كُلُّهُمْ أَجْمَعُونَ
Transliteration fasajada l-malāikatu kulluhum ajmaʿūna
Marathi ३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला.
Verse 31
إِلَّآ إِبْلِيسَ أَبَىٰٓ أَن يَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِينَ
Transliteration illā ib'līsa abā an yakūna maʿa l-sājidīna
Marathi ३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला.
Verse 32
قَالَ يَـٰٓإِبْلِيسُ مَا لَكَ أَلَّا تَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِينَ
Transliteration qāla yāib'līsu mā laka allā takūna maʿa l-sājidīna
Marathi ३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही?
Verse 33
قَالَ لَمْ أَكُن لِّأَسْجُدَ لِبَشَرٍ خَلَقْتَهُۥ مِن صَلْصَـٰلٍ مِّنْ حَمَإٍ مَّسْنُونٍ
Transliteration qāla lam akun li-asjuda libasharin khalaqtahu min ṣalṣālin min ḥama-in masnūnin
Marathi ३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे.
Verse 34
قَالَ فَٱخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ
Transliteration qāla fa-ukh'ruj min'hā fa-innaka rajīmun
Marathi ३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस.
Verse 35
وَإِنَّ عَلَيْكَ ٱللَّعْنَةَ إِلَىٰ يَوْمِ ٱلدِّينِ
Transliteration wa-inna ʿalayka l-laʿnata ilā yawmi l-dīni
Marathi ३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे.
Verse 36
قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِىٓ إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ
Transliteration qāla rabbi fa-anẓir'nī ilā yawmi yub'ʿathūna
Marathi ३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल.
Verse 37
قَالَ فَإِنَّكَ مِنَ ٱلْمُنظَرِينَ
Transliteration qāla fa-innaka mina l-munẓarīna
Marathi ३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे.
Verse 38
إِلَىٰ يَوْمِ ٱلْوَقْتِ ٱلْمَعْلُومِ
Transliteration ilā yawmi l-waqti l-maʿlūmi
Marathi ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची.
Verse 39
قَالَ رَبِّ بِمَآ أَغْوَيْتَنِى لَأُزَيِّنَنَّ لَهُمْ فِى ٱلْأَرْضِ وَلَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
Transliteration qāla rabbi bimā aghwaytanī la-uzayyinanna lahum fī l-arḍi wala-ugh'wiyannahum ajmaʿīna
Marathi ३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन.
Verse 40
إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ ٱلْمُخْلَصِينَ
Transliteration illā ʿibādaka min'humu l-mukh'laṣīna
Marathi ४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे.
Verse 41
قَالَ هَـٰذَا صِرَٰطٌ عَلَىَّ مُسْتَقِيمٌ
Transliteration qāla hādhā ṣirāṭun ʿalayya mus'taqīmun
Marathi ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे.
Verse 42
إِنَّ عِبَادِى لَيْسَ لَكَ عَلَيْهِمْ سُلْطَـٰنٌ إِلَّا مَنِ ٱتَّبَعَكَ مِنَ ٱلْغَاوِينَ
Transliteration inna ʿibādī laysa laka ʿalayhim sul'ṭānun illā mani ittabaʿaka mina l-ghāwīna
Marathi ४२. माझ्या (निवडक) दासांवर तुझा कोणताही प्रभाव पडणार नाही, मात्र जे वाट चुकलेले लोक आहेत, तेच तुझे अनुसरण करतील.
Verse 43
وَإِنَّ جَهَنَّمَ لَمَوْعِدُهُمْ أَجْمَعِينَ
Transliteration wa-inna jahannama lamawʿiduhum ajmaʿīna
Marathi ४३. आणि निःसंशय, त्या सर्वांच्या वायद्याचे स्थान जहन्नम आहे.
Verse 44
لَهَا سَبْعَةُ أَبْوَٰبٍ لِّكُلِّ بَابٍ مِّنْهُمْ جُزْءٌ مَّقْسُومٌ
Transliteration lahā sabʿatu abwābin likulli bābin min'hum juz'on maqsūmun
Marathi ४४. ज्याला सात दरवाजे आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांचा एक हिस्सा विभाजित आहे.
Verse 45
إِنَّ ٱلْمُتَّقِينَ فِى جَنَّـٰتٍ وَعُيُونٍ
Transliteration inna l-mutaqīna fī jannātin waʿuyūnin
Marathi ४५. निःसंशय, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे लोक बागांमध्ये आणि झऱ्यां (प्रवाहां) मध्ये असतील.
Verse 46
ٱدْخُلُوهَا بِسَلَـٰمٍ ءَامِنِينَ
Transliteration ud'khulūhā bisalāmin āminīna
Marathi ४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा.
Verse 47
وَنَزَعْنَا مَا فِى صُدُورِهِم مِّنْ غِلٍّ إِخْوَٰنًا عَلَىٰ سُرُرٍ مُّتَقَـٰبِلِينَ
Transliteration wanazaʿnā mā fī ṣudūrihim min ghillin ikh'wānan ʿalā sururin mutaqābilīna
Marathi ४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील.
Verse 48
لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُم مِّنْهَا بِمُخْرَجِينَ
Transliteration lā yamassuhum fīhā naṣabun wamā hum min'hā bimukh'rajīna
Marathi ४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील.
Verse 49
۞ نَبِّئْ عِبَادِىٓ أَنِّىٓ أَنَا ٱلْغَفُورُ ٱلرَّحِيمُ
Transliteration nabbi ʿibādī annī anā l-ghafūru l-raḥīmu
Marathi ४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे.
Verse 50
وَأَنَّ عَذَابِى هُوَ ٱلْعَذَابُ ٱلْأَلِيمُ
Transliteration wa-anna ʿadhābī huwa l-ʿadhābu l-alīmu
Marathi ५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे.
Verse 51
وَنَبِّئْهُمْ عَن ضَيْفِ إِبْرَٰهِيمَ
Transliteration wanabbi'hum ʿan ḍayfi ib'rāhīma
Marathi ५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा.
Verse 52
إِذْ دَخَلُوا۟ عَلَيْهِ فَقَالُوا۟ سَلَـٰمًا قَالَ إِنَّا مِنكُمْ وَجِلُونَ
Transliteration idh dakhalū ʿalayhi faqālū salāman qāla innā minkum wajilūna
Marathi ५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१
Verse 53
قَالُوا۟ لَا تَوْجَلْ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَـٰمٍ عَلِيمٍ
Transliteration qālū lā tawjal innā nubashiruka bighulāmin ʿalīmin
Marathi ५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो.
Verse 54
قَالَ أَبَشَّرْتُمُونِى عَلَىٰٓ أَن مَّسَّنِىَ ٱلْكِبَرُ فَبِمَ تُبَشِّرُونَ
Transliteration qāla abashartumūnī ʿalā an massaniya l-kibaru fabima tubashirūna
Marathi ५४. इब्राहीम म्हणाले, काय या वृद्धावस्थेने स्पर्श केल्यानंतर तुम्ही मला ही शुभ वार्ता देता! ही आनंदाची बातमी तुम्ही कशी काय देत आहात?
Verse 55
قَالُوا۟ بَشَّرْنَـٰكَ بِٱلْحَقِّ فَلَا تَكُن مِّنَ ٱلْقَـٰنِطِينَ
Transliteration qālū basharnāka bil-ḥaqi falā takun mina l-qāniṭīna
Marathi ५५. फरिश्ते म्हणाले, आम्ही तुम्हाला अगदी खरी शुभवार्ता ऐकवित आहोत. तुम्ही निराश लोकांमध्ये सामील होऊ नका.
Verse 56
قَالَ وَمَن يَقْنَطُ مِن رَّحْمَةِ رَبِّهِۦٓ إِلَّا ٱلضَّآلُّونَ
Transliteration qāla waman yaqnaṭu min raḥmati rabbihi illā l-ḍālūna
Marathi ५६. म्हणाले, आपल्या पालनकर्त्याच्या दया कृपेपासून केवळ ते (मार्गभ्रष्ट आणि) बहकलेले लोकच निराश होतात.
Verse 57
قَالَ فَمَا خَطْبُكُمْ أَيُّهَا ٱلْمُرْسَلُونَ
Transliteration qāla famā khaṭbukum ayyuhā l-mur'salūna
Marathi ५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे?
Verse 58
قَالُوٓا۟ إِنَّآ أُرْسِلْنَآ إِلَىٰ قَوْمٍ مُّجْرِمِينَ
Transliteration qālū innā ur'sil'nā ilā qawmin muj'rimīna
Marathi ५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे.
Verse 59
إِلَّآ ءَالَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمْ أَجْمَعِينَ
Transliteration illā āla lūṭin innā lamunajjūhum ajmaʿīna
Marathi ५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू.
Verse 60
إِلَّا ٱمْرَأَتَهُۥ قَدَّرْنَآ ۙ إِنَّهَا لَمِنَ ٱلْغَـٰبِرِينَ
Transliteration illā im'ra-atahu qaddarnā innahā lamina l-ghābirīna
Marathi ६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे.
Verse 61
فَلَمَّا جَآءَ ءَالَ لُوطٍ ٱلْمُرْسَلُونَ
Transliteration falammā jāa āla lūṭin l-mur'salūna
Marathi ६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले.
Verse 62
قَالَ إِنَّكُمْ قَوْمٌ مُّنكَرُونَ
Transliteration qāla innakum qawmun munkarūna
Marathi ६२. तेव्हा लूत म्हणाले, तुम्ही लोक तर काहीसे अनोळखी वाटतात.
Verse 63
قَالُوا۟ بَلْ جِئْنَـٰكَ بِمَا كَانُوا۟ فِيهِ يَمْتَرُونَ
Transliteration qālū bal ji'nāka bimā kānū fīhi yamtarūna
Marathi ६३. ते म्हणाले, (नाही) किंबहुना आम्ही तुमच्याजवळ ती वस्तू घेऊन आलो आहोत, जिच्या बाबतीत हे लोक संशय करीत आहेत.
Verse 64
وَأَتَيْنَـٰكَ بِٱلْحَقِّ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ
Transliteration wa-ataynāka bil-ḥaqi wa-innā laṣādiqūna
Marathi ६४. आणि आम्ही तर तुझ्याजवळ (उघड) सत्य घेऊन आलो आहोत, आणि आम्ही आहोतही पुरेपुरे सच्चे!
Verse 65
فَأَسْرِ بِأَهْلِكَ بِقِطْعٍ مِّنَ ٱلَّيْلِ وَٱتَّبِعْ أَدْبَـٰرَهُمْ وَلَا يَلْتَفِتْ مِنكُمْ أَحَدٌ وَٱمْضُوا۟ حَيْثُ تُؤْمَرُونَ
Transliteration fa-asri bi-ahlika biqiṭ'ʿin mina al-layli wa-ittabiʿ adbārahum walā yaltafit minkum aḥadun wa-im'ḍū ḥaythu tu'marūna
Marathi ६५. आता तुम्ही आपल्या कुटुंबासह या रात्रीच्या एखाद्या भागात निघून जा. तुम्ही स्वतः त्यांच्या मागे राहा (आणि सावधान!) तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये आणि ज्या ठिकाणी जायचा तुम्हाला आदेश दिला जात आहे, तिथे चालत जा.
Verse 66
وَقَضَيْنَآ إِلَيْهِ ذَٰلِكَ ٱلْأَمْرَ أَنَّ دَابِرَ هَـٰٓؤُلَآءِ مَقْطُوعٌ مُّصْبِحِينَ
Transliteration waqaḍaynā ilayhi dhālika l-amra anna dābira hāulāi maqṭūʿun muṣ'biḥīna
Marathi ६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील.
Verse 67
وَجَآءَ أَهْلُ ٱلْمَدِينَةِ يَسْتَبْشِرُونَ
Transliteration wajāa ahlu l-madīnati yastabshirūna
Marathi ६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले.
Verse 68
قَالَ إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ ضَيْفِى فَلَا تَفْضَحُونِ
Transliteration qāla inna hāulāi ḍayfī falā tafḍaḥūni
Marathi ६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका.
Verse 69
وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَلَا تُخْزُونِ
Transliteration wa-ittaqū l-laha walā tukh'zūni
Marathi ६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका.
Verse 70
قَالُوٓا۟ أَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration qālū awalam nanhaka ʿani l-ʿālamīna
Marathi ७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती?
Verse 71
قَالَ هَـٰٓؤُلَآءِ بَنَاتِىٓ إِن كُنتُمْ فَـٰعِلِينَ
Transliteration qāla hāulāi banātī in kuntum fāʿilīna
Marathi ७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१
Verse 72
لَعَمْرُكَ إِنَّهُمْ لَفِى سَكْرَتِهِمْ يَعْمَهُونَ
Transliteration laʿamruka innahum lafī sakratihim yaʿmahūna
Marathi ७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते.
Verse 73
فَأَخَذَتْهُمُ ٱلصَّيْحَةُ مُشْرِقِينَ
Transliteration fa-akhadhathumu l-ṣayḥatu mush'riqīna
Marathi ७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले.
Verse 74
فَجَعَلْنَا عَـٰلِيَهَا سَافِلَهَا وَأَمْطَرْنَا عَلَيْهِمْ حِجَارَةً مِّن سِجِّيلٍ
Transliteration fajaʿalnā ʿāliyahā sāfilahā wa-amṭarnā ʿalayhim ḥijāratan min sijjīlin
Marathi ७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला.
Verse 75
إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّلْمُتَوَسِّمِينَ
Transliteration inna fī dhālika laāyātin lil'mutawassimīna
Marathi ७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत.
Verse 76
وَإِنَّهَا لَبِسَبِيلٍ مُّقِيمٍ
Transliteration wa-innahā labisabīlin muqīmin
Marathi ७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते.
Verse 77
إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّلْمُؤْمِنِينَ
Transliteration inna fī dhālika laāyatan lil'mu'minīna
Marathi ७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे.
Verse 78
وَإِن كَانَ أَصْحَـٰبُ ٱلْأَيْكَةِ لَظَـٰلِمِينَ
Transliteration wa-in kāna aṣḥābu l-aykati laẓālimīna
Marathi ७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते.
Verse 79
فَٱنتَقَمْنَا مِنْهُمْ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٍ مُّبِينٍ
Transliteration fa-intaqamnā min'hum wa-innahumā labi-imāmin mubīnin
Marathi ७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत.
Verse 80
وَلَقَدْ كَذَّبَ أَصْحَـٰبُ ٱلْحِجْرِ ٱلْمُرْسَلِينَ
Transliteration walaqad kadhaba aṣḥābu l-ḥij'ri l-mur'salīna
Marathi ८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले.
Verse 81
وَءَاتَيْنَـٰهُمْ ءَايَـٰتِنَا فَكَانُوا۟ عَنْهَا مُعْرِضِينَ
Transliteration waātaynāhum āyātinā fakānū ʿanhā muʿ'riḍīna
Marathi ८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले.
Verse 82
وَكَانُوا۟ يَنْحِتُونَ مِنَ ٱلْجِبَالِ بُيُوتًا ءَامِنِينَ
Transliteration wakānū yanḥitūna mina l-jibāli buyūtan āminīna
Marathi ८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता.
Verse 83
فَأَخَذَتْهُمُ ٱلصَّيْحَةُ مُصْبِحِينَ
Transliteration fa-akhadhathumu l-ṣayḥatu muṣ'biḥīna
Marathi ८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले.
Verse 84
فَمَآ أَغْنَىٰ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَكْسِبُونَ
Transliteration famā aghnā ʿanhum mā kānū yaksibūna
Marathi ८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही.
Verse 85
وَمَا خَلَقْنَا ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَآ إِلَّا بِٱلْحَقِّ ۗ وَإِنَّ ٱلسَّاعَةَ لَـَٔاتِيَةٌ ۖ فَٱصْفَحِ ٱلصَّفْحَ ٱلْجَمِيلَ
Transliteration wamā khalaqnā l-samāwāti wal-arḍa wamā baynahumā illā bil-ḥaqi wa-inna l-sāʿata laātiyatun fa-iṣ'faḥi l-ṣafḥa l-jamīla
Marathi ८५. आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या.
Verse 86
إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلْخَلَّـٰقُ ٱلْعَلِيمُ
Transliteration inna rabbaka huwa l-khalāqu l-ʿalīmu
Marathi ८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे.
Verse 87
وَلَقَدْ ءَاتَيْنَـٰكَ سَبْعًا مِّنَ ٱلْمَثَانِى وَٱلْقُرْءَانَ ٱلْعَظِيمَ
Transliteration walaqad ātaynāka sabʿan mina l-mathānī wal-qur'āna l-ʿaẓīma
Marathi ८७. निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे.
Verse 88
لَا تَمُدَّنَّ عَيْنَيْكَ إِلَىٰ مَا مَتَّعْنَا بِهِۦٓ أَزْوَٰجًا مِّنْهُمْ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَٱخْفِضْ جَنَاحَكَ لِلْمُؤْمِنِينَ
Transliteration lā tamuddanna ʿaynayka ilā mā mattaʿnā bihi azwājan min'hum walā taḥzan ʿalayhim wa-ikh'fiḍ janāḥaka lil'mu'minīna
Marathi ८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या).
Verse 89
وَقُلْ إِنِّىٓ أَنَا ٱلنَّذِيرُ ٱلْمُبِينُ
Transliteration waqul innī anā l-nadhīru l-mubīnu
Marathi ८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे.
Verse 90
كَمَآ أَنزَلْنَا عَلَى ٱلْمُقْتَسِمِينَ
Transliteration kamā anzalnā ʿalā l-muq'tasimīna
Marathi ९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला.
Verse 91
ٱلَّذِينَ جَعَلُوا۟ ٱلْقُرْءَانَ عِضِينَ
Transliteration alladhīna jaʿalū l-qur'āna ʿiḍīna
Marathi ९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले.
Verse 92
فَوَرَبِّكَ لَنَسْـَٔلَنَّهُمْ أَجْمَعِينَ
Transliteration fawarabbika lanasalannahum ajmaʿīna
Marathi ९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू.
Verse 93
عَمَّا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration ʿammā kānū yaʿmalūna
Marathi ९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते.
Verse 94
فَٱصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ ٱلْمُشْرِكِينَ
Transliteration fa-iṣ'daʿ bimā tu'maru wa-aʿriḍ ʿani l-mush'rikīna
Marathi ९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या.
Verse 95
إِنَّا كَفَيْنَـٰكَ ٱلْمُسْتَهْزِءِينَ
Transliteration innā kafaynāka l-mus'tahziīna
Marathi ९५. तुमच्याशी ते लोक थट्टा मस्करी करतात त्यांच्या (शिक्षे) करिता आम्ही पर्याप्त आहोत.
Verse 96
ٱلَّذِينَ يَجْعَلُونَ مَعَ ٱللَّهِ إِلَـٰهًا ءَاخَرَ ۚ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
Transliteration alladhīna yajʿalūna maʿa l-lahi ilāhan ākhara fasawfa yaʿlamūna
Marathi ९६. जे लोक अल्लाहच्या सोबत आणखी इतर उपास्ये बनवितात, त्यांना लवकरच माहीत पडेल.
Verse 97
وَلَقَدْ نَعْلَمُ أَنَّكَ يَضِيقُ صَدْرُكَ بِمَا يَقُولُونَ
Transliteration walaqad naʿlamu annaka yaḍīqu ṣadruka bimā yaqūlūna
Marathi ९७. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच पोहचते.
Verse 98
فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَكُن مِّنَ ٱلسَّـٰجِدِينَ
Transliteration fasabbiḥ biḥamdi rabbika wakun mina l-sājidīna
Marathi ९८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याची महानता आणि स्तुती प्रशंसाचे वर्णन करीत राहा आणि नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील व्हा.
Verse 99
وَٱعْبُدْ رَبَّكَ حَتَّىٰ يَأْتِيَكَ ٱلْيَقِينُ
Transliteration wa-uʿ'bud rabbaka ḥattā yatiyaka l-yaqīnu
Marathi ९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे.
Read Surah Al-Hijr in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.