MyDugsiStart learning

Surah Yusuf in Marathi: translation and audio

Surah 12 · يوسف · Joseph · 111 verses

Surah Yusuf verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Yusuf word by word in English.

Verse 1

الٓر ۚ تِلْكَ ءَايَـٰتُ ٱلْكِتَـٰبِ ٱلْمُبِينِ

Transliteration alif-lam-ra til'ka āyātu l-kitābi l-mubīni

Marathi १. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत.

Verse 2

إِنَّآ أَنزَلْنَـٰهُ قُرْءَٰنًا عَرَبِيًّا لَّعَلَّكُمْ تَعْقِلُونَ

Transliteration innā anzalnāhu qur'ānan ʿarabiyyan laʿallakum taʿqilūna

Marathi २. निःसंशय, आम्ही हे अरबी कुरआन अवतरीत केले आहे, यासाठी की तुम्ही समजू शकावे.

Verse 3

نَحْنُ نَقُصُّ عَلَيْكَ أَحْسَنَ ٱلْقَصَصِ بِمَآ أَوْحَيْنَآ إِلَيْكَ هَـٰذَا ٱلْقُرْءَانَ وَإِن كُنتَ مِن قَبْلِهِۦ لَمِنَ ٱلْغَـٰفِلِينَ

Transliteration naḥnu naquṣṣu ʿalayka aḥsana l-qaṣaṣi bimā awḥaynā ilayka hādhā l-qur'āna wa-in kunta min qablihi lamina l-ghāfilīna

Marathi ३. आम्ही तुमच्यासमोर सर्वांत उत्तम निवेदन प्रस्तुत करतो, या कारणास्तव की आम्ही आपल्याकडे हा कुरआन वहयी (अवतरित संदेशा) द्वारे उतरविला आहे आणि निःसंशय याच्यापूर्वी तुम्ही न जाणणाऱ्यांपैकी होते.१

Verse 4

إِذْ قَالَ يُوسُفُ لِأَبِيهِ يَـٰٓأَبَتِ إِنِّى رَأَيْتُ أَحَدَ عَشَرَ كَوْكَبًا وَٱلشَّمْسَ وَٱلْقَمَرَ رَأَيْتُهُمْ لِى سَـٰجِدِينَ

Transliteration idh qāla yūsufu li-abīhi yāabati innī ra-aytu aḥada ʿashara kawkaban wal-shamsa wal-qamara ra-aytuhum lī sājidīna

Marathi ४. जेव्हा यूसुफ आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! मी अकरा ताऱ्यांना आणि सूर्य-चंद्राला पाहिले की ते सर्व मला सजदा करीत आहेत.

Verse 5

قَالَ يَـٰبُنَىَّ لَا تَقْصُصْ رُءْيَاكَ عَلَىٰٓ إِخْوَتِكَ فَيَكِيدُوا۟ لَكَ كَيْدًا ۖ إِنَّ ٱلشَّيْطَـٰنَ لِلْإِنسَـٰنِ عَدُوٌّ مُّبِينٌ

Transliteration qāla yābunayya lā taqṣuṣ ru'yāka ʿalā ikh'watika fayakīdū laka kaydan inna l-shayṭāna lil'insāni ʿaduwwun mubīnun

Marathi ५. (याकूब) म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आपल्या या स्वप्नाची चर्चा आपल्या भावांजवळ करू नकोस, असे न व्हावे की त्यांनी तुझ्याशी काही कपट करावे. सैतान तर मानवाचा उघड शत्रू आहे.

Verse 6

وَكَذَٰلِكَ يَجْتَبِيكَ رَبُّكَ وَيُعَلِّمُكَ مِن تَأْوِيلِ ٱلْأَحَادِيثِ وَيُتِمُّ نِعْمَتَهُۥ عَلَيْكَ وَعَلَىٰٓ ءَالِ يَعْقُوبَ كَمَآ أَتَمَّهَا عَلَىٰٓ أَبَوَيْكَ مِن قَبْلُ إِبْرَٰهِيمَ وَإِسْحَـٰقَ ۚ إِنَّ رَبَّكَ عَلِيمٌ حَكِيمٌ

Transliteration wakadhālika yajtabīka rabbuka wayuʿallimuka min tawīli l-aḥādīthi wayutimmu niʿ'matahu ʿalayka waʿalā āli yaʿqūba kamā atammahā ʿalā abawayka min qablu ib'rāhīma wa-is'ḥāqa inna rabbaka ʿalīmun ḥakīmun

Marathi ६. आणि अशा प्रकारे तुमचा पालनकर्ता तुमची निवड करेल आणि तुम्हाला घटना व मामल्याचा खुलासा (अर्थात स्वप्नफल) सांगण्याची शिकवण देईल आणि आपली कृपा-देणगी तुम्हाला पूर्णतः प्रदान करील, आणि याकूबच्या परिवारालाही, जशी त्याने यापूर्वी तुमच्या दोन पूर्वजांना अर्थात इब्राहीम आणि इसहाकलाही भरपूर कृपा-देणगी प्रदान केली. निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाही आहे.

Verse 7

۞ لَّقَدْ كَانَ فِى يُوسُفَ وَإِخْوَتِهِۦٓ ءَايَـٰتٌ لِّلسَّآئِلِينَ

Transliteration laqad kāna fī yūsufa wa-ikh'watihi āyātun lilssāilīna

Marathi ७. निःसंशय, यूसुफ आणि त्याच्या भावांमध्ये विचारणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.

Verse 8

إِذْ قَالُوا۟ لَيُوسُفُ وَأَخُوهُ أَحَبُّ إِلَىٰٓ أَبِينَا مِنَّا وَنَحْنُ عُصْبَةٌ إِنَّ أَبَانَا لَفِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ

Transliteration idh qālū layūsufu wa-akhūhu aḥabbu ilā abīnā minnā wanaḥnu ʿuṣ'batun inna abānā lafī ḍalālin mubīnin

Marathi ८. जेव्हा यूसुफचे भाऊ म्हणाले, यूसुफ आणि त्याचा भाऊ आमच्या पित्याला आमच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत, वास्तविक आम्ही लोक एक शक्तिशाली जमात आहोत. निश्चितच आमचे पिता स्पष्ट चूक करीत आहेत.

Verse 9

ٱقْتُلُوا۟ يُوسُفَ أَوِ ٱطْرَحُوهُ أَرْضًا يَخْلُ لَكُمْ وَجْهُ أَبِيكُمْ وَتَكُونُوا۟ مِنۢ بَعْدِهِۦ قَوْمًا صَـٰلِحِينَ

Transliteration uq'tulū yūsufa awi iṭ'raḥūhu arḍan yakhlu lakum wajhu abīkum watakūnū min baʿdihi qawman ṣāliḥīna

Marathi ९. यूसुफची हत्या करून टाका किंवा त्याला एखाद्या (अज्ञात) स्थळी पोहचवा, यासाठी की तुमच्या पित्याचे ध्यान तुमच्याकडे व्हावे. त्यानंतर तुम्ही नेक सदाचारी व्हा.

Verse 10

قَالَ قَآئِلٌ مِّنْهُمْ لَا تَقْتُلُوا۟ يُوسُفَ وَأَلْقُوهُ فِى غَيَـٰبَتِ ٱلْجُبِّ يَلْتَقِطْهُ بَعْضُ ٱلسَّيَّارَةِ إِن كُنتُمْ فَـٰعِلِينَ

Transliteration qāla qāilun min'hum lā taqtulū yūsufa wa-alqūhu fī ghayābati l-jubi yaltaqiṭ'hu baʿḍu l-sayārati in kuntum fāʿilīna

Marathi १०. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, यूसुफची हत्या करू नका, किंबहुना त्याला एखाद्या ओसाड विहिरीच्या तळाशी टाकून द्या, यासाठी की त्याला एखाद्या प्रवाशी काफिल्याने उचलून न्यावे. जर तुम्हाला काही करायचेच आहे तर असेच करा.

Verse 11

قَالُوا۟ يَـٰٓأَبَانَا مَا لَكَ لَا تَأْمَ۫نَّا عَلَىٰ يُوسُفَ وَإِنَّا لَهُۥ لَنَـٰصِحُونَ

Transliteration qālū yāabānā mā laka lā tamannā ʿalā yūsufa wa-innā lahu lanāṣiḥūna

Marathi ११. ते म्हणाले, हे पिता! शेवटी तुम्ही यूसुफच्या बाबतीत आमच्यावर विश्वास का नाही ठेवत, आम्ही तर त्याचे हितचिंतक आहोत.

Verse 12

أَرْسِلْهُ مَعَنَا غَدًا يَرْتَعْ وَيَلْعَبْ وَإِنَّا لَهُۥ لَحَـٰفِظُونَ

Transliteration arsil'hu maʿanā ghadan yartaʿ wayalʿab wa-innā lahu laḥāfiẓūna

Marathi १२. उद्या तुम्ही त्याला अवश्य आमच्यासोबत पाठवा, यासाठी की त्याने खूप खावे प्यावे आणि खेळावे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो.

Verse 13

قَالَ إِنِّى لَيَحْزُنُنِىٓ أَن تَذْهَبُوا۟ بِهِۦ وَأَخَافُ أَن يَأْكُلَهُ ٱلذِّئْبُ وَأَنتُمْ عَنْهُ غَـٰفِلُونَ

Transliteration qāla innī layaḥzununī an tadhhabū bihi wa-akhāfu an yakulahu l-dhi'bu wa-antum ʿanhu ghāfilūna

Marathi १३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील.

Verse 14

قَالُوا۟ لَئِنْ أَكَلَهُ ٱلذِّئْبُ وَنَحْنُ عُصْبَةٌ إِنَّآ إِذًا لَّخَـٰسِرُونَ

Transliteration qālū la-in akalahu l-dhi'bu wanaḥnu ʿuṣ'batun innā idhan lakhāsirūna

Marathi १४. त्यांनी उत्तर दिले, आमच्यासारख्या मोठ्या शक्तिशाली समूहाच्या उपस्थितीत जर त्याला लांडगा खाऊन टाकील तर आम्ही अगदी निकामी ठरू.

Verse 15

فَلَمَّا ذَهَبُوا۟ بِهِۦ وَأَجْمَعُوٓا۟ أَن يَجْعَلُوهُ فِى غَيَـٰبَتِ ٱلْجُبِّ ۚ وَأَوْحَيْنَآ إِلَيْهِ لَتُنَبِّئَنَّهُم بِأَمْرِهِمْ هَـٰذَا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ

Transliteration falammā dhahabū bihi wa-ajmaʿū an yajʿalūhu fī ghayābati l-jubi wa-awḥaynā ilayhi latunabbi-annahum bi-amrihim hādhā wahum lā yashʿurūna

Marathi १५. मग जेव्हा त्याला घेऊन निघाले आणि सर्वांनी मिळून दृढनिश्चय केला की त्याला ओसाड व खूप खोल अशा विहिरीच्या तळाशी फेकून द्यावे. आम्ही यूसुफकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली की निःसंशय (आता ती वेळ येत आहे) की तुम्ही त्यांना या गोष्टीची खबर अशा स्थितीत सांगाल की ते जाणतही नसतील.

Verse 16

وَجَآءُوٓ أَبَاهُمْ عِشَآءً يَبْكُونَ

Transliteration wajāū abāhum ʿishāan yabkūna

Marathi १६. आणि रात्री (इशा) च्या वेळेस (ते सर्व) आपल्या पित्याजवळ रडत रडत पोहोचले.

Verse 17

قَالُوا۟ يَـٰٓأَبَانَآ إِنَّا ذَهَبْنَا نَسْتَبِقُ وَتَرَكْنَا يُوسُفَ عِندَ مَتَـٰعِنَا فَأَكَلَهُ ٱلذِّئْبُ ۖ وَمَآ أَنتَ بِمُؤْمِنٍ لَّنَا وَلَوْ كُنَّا صَـٰدِقِينَ

Transliteration qālū yāabānā innā dhahabnā nastabiqu wataraknā yūsufa ʿinda matāʿinā fa-akalahu l-dhi'bu wamā anta bimu'minin lanā walaw kunnā ṣādiqīna

Marathi १७. आणि म्हणू लागले की प्रिय पिता! आम्ही आपसात धावण्याच्या शर्यतीत लागलो, आणि यूसुफला आमच्या सामानाजवळ सोडले तेव्हा लांडग्याने त्याला खाऊन टाकले. तुम्ही तर आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, मग आम्ही पुरेपूर सच्चे असलो तरी.

Verse 18

وَجَآءُو عَلَىٰ قَمِيصِهِۦ بِدَمٍ كَذِبٍ ۚ قَالَ بَلْ سَوَّلَتْ لَكُمْ أَنفُسُكُمْ أَمْرًا ۖ فَصَبْرٌ جَمِيلٌ ۖ وَٱللَّهُ ٱلْمُسْتَعَانُ عَلَىٰ مَا تَصِفُونَ

Transliteration wajāū ʿalā qamīṣihi bidamin kadhibin qāla bal sawwalat lakum anfusukum amran faṣabrun jamīlun wal-lahu l-mus'taʿānu ʿalā mā taṣifūna

Marathi १८. आणि यूसुफचा सदरा खोट्या रक्ताने भिजवून आणला. (पिता) म्हणाले, (असे नाही घडले) किंबहुना तुम्ही आपल्या मनाने एक गोष्ट रचली आहे, आता सबुरी करणेच उत्तम आहे आणि तुमच्या मनगढत गोष्टींवर अल्लाहशीच मदतीची प्रार्थना (दुआ) आहे.

Verse 19

وَجَآءَتْ سَيَّارَةٌ فَأَرْسَلُوا۟ وَارِدَهُمْ فَأَدْلَىٰ دَلْوَهُۥ ۖ قَالَ يَـٰبُشْرَىٰ هَـٰذَا غُلَـٰمٌ ۚ وَأَسَرُّوهُ بِضَـٰعَةً ۚ وَٱللَّهُ عَلِيمٌۢ بِمَا يَعْمَلُونَ

Transliteration wajāat sayyāratun fa-arsalū wāridahum fa-adlā dalwahu qāla yābush'rā hādhā ghulāmun wa-asarrūhu biḍāʿatan wal-lahu ʿalīmun bimā yaʿmalūna

Marathi १९. आणि एक प्रवासी काफिला आला आणि त्यांनी आपल्या पाणी आणणाऱ्याला पाठविले, त्याने आपला डोल (बादली) विहीरीत टाकला, उद्‌गारला, वाहवा! काय आनंदाची गोष्ट आहे! हा तर एक बालक आहे. त्यांनी त्याला व्यापार-सामुग्री समजून लपविले आणि जे काही ते करीत होते, अल्लाह चांगले जाणून होता.

Verse 20

وَشَرَوْهُ بِثَمَنٍۭ بَخْسٍ دَرَٰهِمَ مَعْدُودَةٍ وَكَانُوا۟ فِيهِ مِنَ ٱلزَّٰهِدِينَ

Transliteration washarawhu bithamanin bakhsin darāhima maʿdūdatin wakānū fīhi mina l-zāhidīna

Marathi २०. आणि त्यांनी त्याला फारच थोड्या किंमतीत (अर्थात) काही मोजक्या दिरमांवर विकून टाकले. ते तर यूसुफच्या बाबतीत अधिक रुचिहीन होते.

Verse 21

وَقَالَ ٱلَّذِى ٱشْتَرَىٰهُ مِن مِّصْرَ لِٱمْرَأَتِهِۦٓ أَكْرِمِى مَثْوَىٰهُ عَسَىٰٓ أَن يَنفَعَنَآ أَوْ نَتَّخِذَهُۥ وَلَدًا ۚ وَكَذَٰلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِى ٱلْأَرْضِ وَلِنُعَلِّمَهُۥ مِن تَأْوِيلِ ٱلْأَحَادِيثِ ۚ وَٱللَّهُ غَالِبٌ عَلَىٰٓ أَمْرِهِۦ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration waqāla alladhī ish'tarāhu min miṣ'ra li-im'ra-atihi akrimī mathwāhu ʿasā an yanfaʿanā aw nattakhidhahu waladan wakadhālika makkannā liyūsufa fī l-arḍi walinuʿallimahu min tawīli l-aḥādīthi wal-lahu ghālibun ʿalā amrihi walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi २१. आणि मिस्र देशाच्या लोकांपैकी, ज्याने त्याला खरेदी केले होते, तो आपल्या पत्नीस म्हणाला की याला आदर-सन्मानपूर्वक ठेवा. संभवतः हा आम्हाला लाभ पोहचवील किंवा आम्ही याला आपला पुत्रच बनवून घेऊ. अशा प्रकारे आम्ही (मिस्रच्या) धरतीवर यूसुफचे पाय स्थिर केले, यासाठी की आम्ही त्याला स्वप्नाचा खुलासा सांगण्याचे काही ज्ञान शिकवावे अल्लाह आपल्या इराद्याला पूर्ण करण्याचे सामर्थ्य राखतो, परंतु अधिकांश लोक अनभिज्ञ असतात.

Verse 22

وَلَمَّا بَلَغَ أَشُدَّهُۥٓ ءَاتَيْنَـٰهُ حُكْمًا وَعِلْمًا ۚ وَكَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration walammā balagha ashuddahu ātaynāhu ḥuk'man waʿil'man wakadhālika najzī l-muḥ'sinīna

Marathi २२. आणि जेव्हा (यूसुफ) पूर्ण तारुण्यावस्थेस पोहोचले, आम्ही त्यांना फैसला करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान प्रदान केले, आम्ही भलाई करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला देतो.

Verse 23

وَرَٰوَدَتْهُ ٱلَّتِى هُوَ فِى بَيْتِهَا عَن نَّفْسِهِۦ وَغَلَّقَتِ ٱلْأَبْوَٰبَ وَقَالَتْ هَيْتَ لَكَ ۚ قَالَ مَعَاذَ ٱللَّهِ ۖ إِنَّهُۥ رَبِّىٓ أَحْسَنَ مَثْوَاىَ ۖ إِنَّهُۥ لَا يُفْلِحُ ٱلظَّـٰلِمُونَ

Transliteration warāwadathu allatī huwa fī baytihā ʿan nafsihi waghallaqati l-abwāba waqālat hayta laka qāla maʿādha l-lahi innahu rabbī aḥsana mathwāya innahu lā yuf'liḥu l-ẓālimūna

Marathi २३. आणि त्या स्त्रीने, जिच्या घरी यूसुफ होते, यूसुफला फुसलावणे सुरू केले, जेणेकरून त्याने आपल्या मनावर ताबा ठेवणे सोडून द्यावे आणि दार बंद करून ती म्हणू लागली, या (जवळ) या. (यूसुफ) म्हणाले, अल्लाह रक्षण करो! तो माझा पालनकर्ता आहे. त्याने मला खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहे. निश्चितच अन्याय करणाऱ्यांचे कदापि भले होत नाही.

Verse 24

وَلَقَدْ هَمَّتْ بِهِۦ ۖ وَهَمَّ بِهَا لَوْلَآ أَن رَّءَا بُرْهَـٰنَ رَبِّهِۦ ۚ كَذَٰلِكَ لِنَصْرِفَ عَنْهُ ٱلسُّوٓءَ وَٱلْفَحْشَآءَ ۚ إِنَّهُۥ مِنْ عِبَادِنَا ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration walaqad hammat bihi wahamma bihā lawlā an raā bur'hāna rabbihi kadhālika linaṣrifa ʿanhu l-sūa wal-faḥshāa innahu min ʿibādinā l-mukh'laṣīna

Marathi २४. आणि त्या स्त्रीने यूसुफची इच्छा धरली आणि यूसुफनेही तिची इच्छा धरली असती जर त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे प्रमाण पाहून घेतले नसते. असेच घडले, यासाठी की आम्ही यूसुफपासून दुष्कर्म आणि निर्लज्जता दूर करावी. निःसंशय ते आमच्या निवडक दासांपैकी होते.

Verse 25

وَٱسْتَبَقَا ٱلْبَابَ وَقَدَّتْ قَمِيصَهُۥ مِن دُبُرٍ وَأَلْفَيَا سَيِّدَهَا لَدَا ٱلْبَابِ ۚ قَالَتْ مَا جَزَآءُ مَنْ أَرَادَ بِأَهْلِكَ سُوٓءًا إِلَّآ أَن يُسْجَنَ أَوْ عَذَابٌ أَلِيمٌ

Transliteration wa-is'tabaqā l-bāba waqaddat qamīṣahu min duburin wa-alfayā sayyidahā ladā l-bābi qālat mā jazāu man arāda bi-ahlika sūan illā an yus'jana aw ʿadhābun alīmun

Marathi २५. आणि दोघेजण दाराकडे धावले. त्या स्त्रीने यूसुफचे वस्त्र (सदरा) मागच्या बाजूने ओढून फाडले आणि त्या स्त्रीचा पती दोघांना दाराशीच मिळाला, तेव्हा ती म्हणू लागली की जो मनुष्य तुमच्या पत्नीशी वाईट इच्छा धरेल, त्याची शिक्षा हीच आहे की त्याला कैदी बनविले जावे किंवा दुसरी एखादी कठोर शिक्षा दिली जावी.

Verse 26

قَالَ هِىَ رَٰوَدَتْنِى عَن نَّفْسِى ۚ وَشَهِدَ شَاهِدٌ مِّنْ أَهْلِهَآ إِن كَانَ قَمِيصُهُۥ قُدَّ مِن قُبُلٍ فَصَدَقَتْ وَهُوَ مِنَ ٱلْكَـٰذِبِينَ

Transliteration qāla hiya rāwadatnī ʿan nafsī washahida shāhidun min ahlihā in kāna qamīṣuhu qudda min qubulin faṣadaqat wahuwa mina l-kādhibīna

Marathi २६. (यूसुफ) म्हणाले, ही स्त्रीच मला फूस लावून (माझ्या मनोकामनाच्या रक्षणात बेपर्वा करू) इच्छित होती आणि स्त्रीच्या समाजाच्या एका माणसाने साक्ष दिली की जर त्याचा सदरा पुढच्या बाजूने फाटला असेल तर स्त्री (आपल्या कथनात) खरी आहे आणि यूसुफ खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे.

Verse 27

وَإِن كَانَ قَمِيصُهُۥ قُدَّ مِن دُبُرٍ فَكَذَبَتْ وَهُوَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ

Transliteration wa-in kāna qamīṣuhu qudda min duburin fakadhabat wahuwa mina l-ṣādiqīna

Marathi २७. आणि जर त्याचा सदरा मागच्या बाजूने फाडला गेला आहे, तर स्त्री खोटी आहे आणि यूसुफ खऱ्यांपैकी आहे.

Verse 28

فَلَمَّا رَءَا قَمِيصَهُۥ قُدَّ مِن دُبُرٍ قَالَ إِنَّهُۥ مِن كَيْدِكُنَّ ۖ إِنَّ كَيْدَكُنَّ عَظِيمٌ

Transliteration falammā raā qamīṣahu qudda min duburin qāla innahu min kaydikunna inna kaydakunna ʿaẓīmun

Marathi २८. तर पतीने जेव्हा पाहिले की सदरा मागच्या बाजूने फाटला आहे, तेव्हा स्पष्ट सांगितले की ही तर तुम्हा स्त्रियांची चाल आहे. निःसंशय तुमचे डावपेच मोठे भारी आहेत.

Verse 29

يُوسُفُ أَعْرِضْ عَنْ هَـٰذَا ۚ وَٱسْتَغْفِرِى لِذَنۢبِكِ ۖ إِنَّكِ كُنتِ مِنَ ٱلْخَاطِـِٔينَ

Transliteration yūsufu aʿriḍ ʿan hādhā wa-is'taghfirī lidhanbiki innaki kunti mina l-khāṭiīna

Marathi २९. यूसुफ, आता या गोष्टीला दृष्टीआड करा आणि (हे स्त्री!) आपल्या अपराधांची क्षमा माग. निःसंशय तू अपराध्यांपैकी आहेस.

Verse 30

۞ وَقَالَ نِسْوَةٌ فِى ٱلْمَدِينَةِ ٱمْرَأَتُ ٱلْعَزِيزِ تُرَٰوِدُ فَتَىٰهَا عَن نَّفْسِهِۦ ۖ قَدْ شَغَفَهَا حُبًّا ۖ إِنَّا لَنَرَىٰهَا فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ

Transliteration waqāla nis'watun fī l-madīnati im'ra-atu l-ʿazīzi turāwidu fatāhā ʿan nafsihi qad shaghafahā ḥubban innā lanarāhā fī ḍalālin mubīnin

Marathi ३०. आणि मग शहरातल्या स्त्रियांमध्ये चर्चा होऊ लागली की अजीजची पत्नी आपल्या (तरुण) गुलामाला आपली गरज पूर्ण करण्यासाठी बहकविण्यात व फुसलाविण्यात लागलेली असते. तिच्या मनात यूसुफचे प्रेम (ठाण मांडून) बसले आहे. आमच्या मते तर ती उघड चूक करीत आहे.

Verse 31

فَلَمَّا سَمِعَتْ بِمَكْرِهِنَّ أَرْسَلَتْ إِلَيْهِنَّ وَأَعْتَدَتْ لَهُنَّ مُتَّكَـًٔا وَءَاتَتْ كُلَّ وَٰحِدَةٍ مِّنْهُنَّ سِكِّينًا وَقَالَتِ ٱخْرُجْ عَلَيْهِنَّ ۖ فَلَمَّا رَأَيْنَهُۥٓ أَكْبَرْنَهُۥ وَقَطَّعْنَ أَيْدِيَهُنَّ وَقُلْنَ حَـٰشَ لِلَّهِ مَا هَـٰذَا بَشَرًا إِنْ هَـٰذَآ إِلَّا مَلَكٌ كَرِيمٌ

Transliteration falammā samiʿat bimakrihinna arsalat ilayhinna wa-aʿtadat lahunna muttaka-an waātat kulla wāḥidatin min'hunna sikkīnan waqālati ukh'ruj ʿalayhinna falammā ra-aynahu akbarnahu waqaṭṭaʿna aydiyahunna waqul'na ḥāsha lillahi mā hādhā basharan in hādhā illā malakun karīmun

Marathi ३१. तिने जेव्हा त्यांची ही कुत्सित निंदा ऐकली, तेव्हा त्यांना (भोजनासाठी) आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी एका सभेचा इतमामही केला आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला एक एक चाकू दिला आणि म्हणाली, हे यूसुफ! यांच्या समोर या. त्या स्त्रियांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा खूप मोठे जाणले आणि (नकळत) आपले हात कापून घेतले आणि त्या उद्‌गारल्या, पाकी (पवित्रता) अल्लाहकरिता आहे. ऱ मनुष्य कदापि नाही. हा तर खात्रीने कोणी फार मोठा फरिश्ता आहे.

Verse 32

قَالَتْ فَذَٰلِكُنَّ ٱلَّذِى لُمْتُنَّنِى فِيهِ ۖ وَلَقَدْ رَٰوَدتُّهُۥ عَن نَّفْسِهِۦ فَٱسْتَعْصَمَ ۖ وَلَئِن لَّمْ يَفْعَلْ مَآ ءَامُرُهُۥ لَيُسْجَنَنَّ وَلَيَكُونًا مِّنَ ٱلصَّـٰغِرِينَ

Transliteration qālat fadhālikunna alladhī lum'tunnanī fīhi walaqad rāwadttuhu ʿan nafsihi fa-is'taʿṣama wala-in lam yafʿal mā āmuruhu layus'jananna walayakūnan mina l-ṣāghirīna

Marathi ३२. (त्या वेळी मिस्रच्या अजीजची पत्नी) म्हणाली, हाच तो, ज्याच्याविषयी तुम्ही मला बरे-वाईट बोलत होत्या. मी सर्व प्रकारे याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करू इच्छिले, परंतु हा निष्कलंक राहिला आणि जे काही मी याला सांगत आहे, जर ते हा करणार नाही तर निश्चितच याला कैदी बनविले जाईल आणि खात्रीने हा मोठा अपमानित होईल.

Verse 33

قَالَ رَبِّ ٱلسِّجْنُ أَحَبُّ إِلَىَّ مِمَّا يَدْعُونَنِىٓ إِلَيْهِ ۖ وَإِلَّا تَصْرِفْ عَنِّى كَيْدَهُنَّ أَصْبُ إِلَيْهِنَّ وَأَكُن مِّنَ ٱلْجَـٰهِلِينَ

Transliteration qāla rabbi l-sij'nu aḥabbu ilayya mimmā yadʿūnanī ilayhi wa-illā taṣrif ʿannī kaydahunna aṣbu ilayhinna wa-akun mina l-jāhilīna

Marathi ३३. यूसुफ म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! ज्या गोष्टीकडे या स्त्रिया मला बोलावित आहेत, त्यापेक्षा कारागृह मला जास्त प्रिय आहे. जर तू यांचे कपट (मोहजाल) माझ्यापासून दूर केले नाहीस तर मी यांच्याकडे आकर्षित होईन आणि अगदी मूर्खांमध्ये सामील होईन.

Verse 34

فَٱسْتَجَابَ لَهُۥ رَبُّهُۥ فَصَرَفَ عَنْهُ كَيْدَهُنَّ ۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ

Transliteration fa-is'tajāba lahu rabbuhu faṣarafa ʿanhu kaydahunna innahu huwa l-samīʿu l-ʿalīmu

Marathi ३४. त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या कपटापासून यूसुफला वाचविले. निःसंशय तो ऐकणारा आणि जाणणारा आहे.

Verse 35

ثُمَّ بَدَا لَهُم مِّنۢ بَعْدِ مَا رَأَوُا۟ ٱلْـَٔايَـٰتِ لَيَسْجُنُنَّهُۥ حَتَّىٰ حِينٍ

Transliteration thumma badā lahum min baʿdi mā ra-awū l-āyāti layasjununnahu ḥattā ḥīnin

Marathi ३५. मग त्या सर्व निशाण्यांना पाहून घेतल्यावर त्यांना हेच भले वाटले की यूसुफला काही काळ कारागृहात ठेवावे.

Verse 36

وَدَخَلَ مَعَهُ ٱلسِّجْنَ فَتَيَانِ ۖ قَالَ أَحَدُهُمَآ إِنِّىٓ أَرَىٰنِىٓ أَعْصِرُ خَمْرًا ۖ وَقَالَ ٱلْـَٔاخَرُ إِنِّىٓ أَرَىٰنِىٓ أَحْمِلُ فَوْقَ رَأْسِى خُبْزًا تَأْكُلُ ٱلطَّيْرُ مِنْهُ ۖ نَبِّئْنَا بِتَأْوِيلِهِۦٓ ۖ إِنَّا نَرَىٰكَ مِنَ ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration wadakhala maʿahu l-sij'na fatayāni qāla aḥaduhumā innī arānī aʿṣiru khamran waqāla l-ākharu innī arānī aḥmilu fawqa rasī khub'zan takulu l-ṭayru min'hu nabbi'nā bitawīlihi innā narāka mina l-muḥ'sinīna

Marathi ३६. आणि त्यांच्यासोबत इतर दोन तरुण कारागृहात आले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, मी स्वप्नात स्वतःला दारु गाळताना पाहिले आहे, आणि दुसरा म्हणाला, मी स्वप्नात काय पाहतो की मी आपल्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत, ज्यांना पक्षी खात आहेत. तुम्ही याचा अर्थ (खुलासा) आम्हाला सांगावा. आम्हाला तर तुम्ही गुणवान दिसता.

Verse 37

قَالَ لَا يَأْتِيكُمَا طَعَامٌ تُرْزَقَانِهِۦٓ إِلَّا نَبَّأْتُكُمَا بِتَأْوِيلِهِۦ قَبْلَ أَن يَأْتِيَكُمَا ۚ ذَٰلِكُمَا مِمَّا عَلَّمَنِى رَبِّىٓ ۚ إِنِّى تَرَكْتُ مِلَّةَ قَوْمٍ لَّا يُؤْمِنُونَ بِٱللَّهِ وَهُم بِٱلْـَٔاخِرَةِ هُمْ كَـٰفِرُونَ

Transliteration qāla lā yatīkumā ṭaʿāmun tur'zaqānihi illā nabbatukumā bitawīlihi qabla an yatiyakumā dhālikumā mimmā ʿallamanī rabbī innī taraktu millata qawmin lā yu'minūna bil-lahi wahum bil-ākhirati hum kāfirūna

Marathi ३७. (यूसुफ) म्हणाले, तुम्हाला जे भोजन दिले जाते, ते तुमच्याजवळ पोहचण्यापूर्वीच मी तुम्हाला त्याचा खुलासा सांगेने, हे सर्व काही त्या ज्ञानामुळे आहे जे मला माझ्या पालनकर्त्याने शिकविले आहे. मी त्या लोकांचा दीन (धर्म) सोडला आहे, जे अल्लाहवर ईमान राखत नाही आणि आखिरतलाही मान्य करीत नाही.

Verse 38

وَٱتَّبَعْتُ مِلَّةَ ءَابَآءِىٓ إِبْرَٰهِيمَ وَإِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ ۚ مَا كَانَ لَنَآ أَن نُّشْرِكَ بِٱللَّهِ مِن شَىْءٍ ۚ ذَٰلِكَ مِن فَضْلِ ٱللَّهِ عَلَيْنَا وَعَلَى ٱلنَّاسِ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَشْكُرُونَ

Transliteration wa-ittabaʿtu millata ābāī ib'rāhīma wa-is'ḥāqa wayaʿqūba mā kāna lanā an nush'rika bil-lahi min shayin dhālika min faḍli l-lahi ʿalaynā waʿalā l-nāsi walākinna akthara l-nāsi lā yashkurūna

Marathi ३८. मी आपल्या पित्या आणि पूर्वजांच्या (धर्मा) चा अनुयायी आहे. अर्थात इसहाक आणि याकूब (च्या दीन) चा. आम्हाला हे कधीही मान्य नाही की आम्ही अल्लाहसोबत अन्य एखाद्याला सहभागी ठरवावे. आमच्यावर आणि इतर सर्व लोकांवर अल्लाहची ही विशेष कृपा आहे. परंतु अधिकांश लोक कृतघ्न असतात.

Verse 39

يَـٰصَـٰحِبَىِ ٱلسِّجْنِ ءَأَرْبَابٌ مُّتَفَرِّقُونَ خَيْرٌ أَمِ ٱللَّهُ ٱلْوَٰحِدُ ٱلْقَهَّارُ

Transliteration yāṣāḥibayi l-sij'ni a-arbābun mutafarriqūna khayrun ami l-lahu l-wāḥidu l-qahāru

Marathi ३९. हे माझ्या कारागृहातील साथीदारांनो! काय अनेक प्रकारची अनेक उपास्ये चांगली आहेत की एक जबरदस्त शक्तिशाली अल्लाह चांगला?

Verse 40

مَا تَعْبُدُونَ مِن دُونِهِۦٓ إِلَّآ أَسْمَآءً سَمَّيْتُمُوهَآ أَنتُمْ وَءَابَآؤُكُم مَّآ أَنزَلَ ٱللَّهُ بِهَا مِن سُلْطَـٰنٍ ۚ إِنِ ٱلْحُكْمُ إِلَّا لِلَّهِ ۚ أَمَرَ أَلَّا تَعْبُدُوٓا۟ إِلَّآ إِيَّاهُ ۚ ذَٰلِكَ ٱلدِّينُ ٱلْقَيِّمُ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration mā taʿbudūna min dūnihi illā asmāan sammaytumūhā antum waābāukum mā anzala l-lahu bihā min sul'ṭānin ini l-ḥuk'mu illā lillahi amara allā taʿbudū illā iyyāhu dhālika l-dīnu l-qayimu walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi ४०. त्याच्याखेरीज ज्यांची उपासना तुम्ही करीत आहात ते सर्व नावापुरतेच आहेत, ज्यांना तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी मनाने रचून घेतले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहने यांचा कोणताही पुरावा अवतरित केला नाही. फैसला देणे अल्लाहचेच काम आहे. त्याचा आदेश आहे की तुम्ही सर्व त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती- उपासना करू नका. हाच सत्य धर्म आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

Verse 41

يَـٰصَـٰحِبَىِ ٱلسِّجْنِ أَمَّآ أَحَدُكُمَا فَيَسْقِى رَبَّهُۥ خَمْرًا ۖ وَأَمَّا ٱلْـَٔاخَرُ فَيُصْلَبُ فَتَأْكُلُ ٱلطَّيْرُ مِن رَّأْسِهِۦ ۚ قُضِىَ ٱلْأَمْرُ ٱلَّذِى فِيهِ تَسْتَفْتِيَانِ

Transliteration yāṣāḥibayi l-sij'ni ammā aḥadukumā fayasqī rabbahu khamran wa-ammā l-ākharu fayuṣ'labu fatakulu l-ṭayru min rasihi quḍiya l-amru alladhī fīhi tastaftiyāni

Marathi ४१. हे कारागृहातील माझ्या साथीदारांनो! तुम्हा दोघांपैकी एक तर आपल्या स्वामीला मद्य पाजण्यासाठी नियुक्त केला जाईल, परंतु दुसऱ्याला फासावर लटकविले जाईल आणि पक्षी त्याचे डोके टोच मारून मारून खातील. तुम्ही दोघे ज्याविषयी विचारत होते त्याचा फैसला झाला.

Verse 42

وَقَالَ لِلَّذِى ظَنَّ أَنَّهُۥ نَاجٍ مِّنْهُمَا ٱذْكُرْنِى عِندَ رَبِّكَ فَأَنسَىٰهُ ٱلشَّيْطَـٰنُ ذِكْرَ رَبِّهِۦ فَلَبِثَ فِى ٱلسِّجْنِ بِضْعَ سِنِينَ

Transliteration waqāla lilladhī ẓanna annahu nājin min'humā udh'kur'nī ʿinda rabbika fa-ansāhu l-shayṭānu dhik'ra rabbihi falabitha fī l-sij'ni biḍ'ʿa sinīna

Marathi ४२. आणि ज्याच्याविषयी यूसुफची कल्पना होती की दोघांपैकी ज्याला सुटका मिळेल, त्याला म्हणाले, आपल्या राजाजवळ माझीही चर्चा कर. मग सैतानाने त्याला राजाजवळ बोलण्याचा विसर पाडला आणि यूसुफला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले.

Verse 43

وَقَالَ ٱلْمَلِكُ إِنِّىٓ أَرَىٰ سَبْعَ بَقَرَٰتٍ سِمَانٍ يَأْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَسَبْعَ سُنۢبُلَـٰتٍ خُضْرٍ وَأُخَرَ يَابِسَـٰتٍ ۖ يَـٰٓأَيُّهَا ٱلْمَلَأُ أَفْتُونِى فِى رُءْيَـٰىَ إِن كُنتُمْ لِلرُّءْيَا تَعْبُرُونَ

Transliteration waqāla l-maliku innī arā sabʿa baqarātin simānin yakuluhunna sabʿun ʿijāfun wasabʿa sunbulātin khuḍ'rin wa-ukhara yābisātin yāayyuhā l-mala-u aftūnī fī ru'yāya in kuntum lilrru'yā taʿburūna

Marathi ४३. आणि राजाने सांगितले, मी स्वप्न पाहिले की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात हिरवी कणसे आहेत तर दुसरी सात कणसे अगदी सुकलेली. हे दरबारी लोकांनो! माझ्या या स्वप्नाचा खुलासा सांगा, जर तुम्ही स्वप्नफल सांगू शकत असाल.

Verse 44

قَالُوٓا۟ أَضْغَـٰثُ أَحْلَـٰمٍ ۖ وَمَا نَحْنُ بِتَأْوِيلِ ٱلْأَحْلَـٰمِ بِعَـٰلِمِينَ

Transliteration qālū aḍghāthu aḥlāmin wamā naḥnu bitawīli l-aḥlāmi biʿālimīna

Marathi ४४. दरबारी लोकांनी उत्तर दिले, ही तर विसकटलेल्या (विचारांची) स्वप्ने आहेत आणि अशा प्रकारच्या व्यग्रचित्त स्वप्नांचा खुलासा आम्ही जाणत नाही.

Verse 45

وَقَالَ ٱلَّذِى نَجَا مِنْهُمَا وَٱدَّكَرَ بَعْدَ أُمَّةٍ أَنَا۠ أُنَبِّئُكُم بِتَأْوِيلِهِۦ فَأَرْسِلُونِ

Transliteration waqāla alladhī najā min'humā wa-iddakara baʿda ummatin anā unabbi-ukum bitawīlihi fa-arsilūni

Marathi ४५. आणि त्या कैद्यांपैकी सुटका झालेल्याला अकस्मात आठवण झाली, आणि तो म्हणू लागला, मी तुम्हाला याचा खुलासा येऊन सांगतो. मला जाण्याची परवानगी द्यावी.

Verse 46

يُوسُفُ أَيُّهَا ٱلصِّدِّيقُ أَفْتِنَا فِى سَبْعِ بَقَرَٰتٍ سِمَانٍ يَأْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَسَبْعِ سُنۢبُلَـٰتٍ خُضْرٍ وَأُخَرَ يَابِسَـٰتٍ لَّعَلِّىٓ أَرْجِعُ إِلَى ٱلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَعْلَمُونَ

Transliteration yūsufu ayyuhā l-ṣidīqu aftinā fī sabʿi baqarātin simānin yakuluhunna sabʿun ʿijāfun wasabʿi sunbulātin khuḍ'rin wa-ukhara yābisātin laʿallī arjiʿu ilā l-nāsi laʿallahum yaʿlamūna

Marathi ४६. हे यूसुफ! हे अगदी सच्चे यूसुफ! तुम्ही आम्हाला या स्वप्नाचा खुलासा सांगा की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात अगदी हिरवी कणसे आहेत आणि दुसरी सात कणसे अगदी सुकलेली आहेत. यासाठी की मी परत जाऊन त्या लोकांना सांगावे की त्या सर्वांनी जाणून घ्यावे.

Verse 47

قَالَ تَزْرَعُونَ سَبْعَ سِنِينَ دَأَبًا فَمَا حَصَدتُّمْ فَذَرُوهُ فِى سُنۢبُلِهِۦٓ إِلَّا قَلِيلًا مِّمَّا تَأْكُلُونَ

Transliteration qāla tazraʿūna sabʿa sinīna da-aban famā ḥaṣadttum fadharūhu fī sunbulihi illā qalīlan mimmā takulūna

Marathi ४७. (यूसुफ यांनी) उत्तर दिले की तुम्ही सतत सात वर्षे सवयीनुसार धान्य पेरा आणि (पीक आल्यावर) त्याची कापणी करून कणसांसमेत राहू द्या. आपल्या खाण्यासाठी थोड्या संख्येशिवाय.

Verse 48

ثُمَّ يَأْتِى مِنۢ بَعْدِ ذَٰلِكَ سَبْعٌ شِدَادٌ يَأْكُلْنَ مَا قَدَّمْتُمْ لَهُنَّ إِلَّا قَلِيلًا مِّمَّا تُحْصِنُونَ

Transliteration thumma yatī min baʿdi dhālika sabʿun shidādun yakul'na mā qaddamtum lahunna illā qalīlan mimmā tuḥ'ṣinūna

Marathi ४८. त्यानंतरची सात वर्षे मोठ्या दुष्काळाची येतील ती ते धान्य खाऊन टाकतील जे तुम्ही त्यांच्यासाठी जमा करून ठेवले होते. त्याशिवाय जे थोडेसे तुम्ही रोखून ठेवाल.

Verse 49

ثُمَّ يَأْتِى مِنۢ بَعْدِ ذَٰلِكَ عَامٌ فِيهِ يُغَاثُ ٱلنَّاسُ وَفِيهِ يَعْصِرُونَ

Transliteration thumma yatī min baʿdi dhālika ʿāmun fīhi yughāthu l-nāsu wafīhi yaʿṣirūna

Marathi ४९. मग याच्यानंतर जे वर्ष येईल, त्यात लोकांसाठी खूप पाऊस पडेल आणि त्यात ते (द्राक्षाचा रसदेखील) खूप गाळतील.

Verse 50

وَقَالَ ٱلْمَلِكُ ٱئْتُونِى بِهِۦ ۖ فَلَمَّا جَآءَهُ ٱلرَّسُولُ قَالَ ٱرْجِعْ إِلَىٰ رَبِّكَ فَسْـَٔلْهُ مَا بَالُ ٱلنِّسْوَةِ ٱلَّـٰتِى قَطَّعْنَ أَيْدِيَهُنَّ ۚ إِنَّ رَبِّى بِكَيْدِهِنَّ عَلِيمٌ

Transliteration waqāla l-maliku i'tūnī bihi falammā jāahu l-rasūlu qāla ir'jiʿ ilā rabbika fasalhu mā bālu l-nis'wati allātī qaṭṭaʿna aydiyahunna inna rabbī bikaydihinna ʿalīmun

Marathi ५०. आणि राजा म्हणाला, त्याला (यूसुफला) माझ्याजवळ आणा. जेव्हा संदेश पोहचविणारा यूसुफजवळ पोहोचला तेव्हा यूसुफ म्हणाले, आपल्या राजाकडे परत जा आणि त्यांना विचारा की त्या स्त्रियांची खरी कहाणी काय आहे, ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. त्यांचे कपट चांगल्या प्रकारे जाणणारा माझा पालनकर्ताच आहे.

Verse 51

قَالَ مَا خَطْبُكُنَّ إِذْ رَٰوَدتُّنَّ يُوسُفَ عَن نَّفْسِهِۦ ۚ قُلْنَ حَـٰشَ لِلَّهِ مَا عَلِمْنَا عَلَيْهِ مِن سُوٓءٍ ۚ قَالَتِ ٱمْرَأَتُ ٱلْعَزِيزِ ٱلْـَٔـٰنَ حَصْحَصَ ٱلْحَقُّ أَنَا۠ رَٰوَدتُّهُۥ عَن نَّفْسِهِۦ وَإِنَّهُۥ لَمِنَ ٱلصَّـٰدِقِينَ

Transliteration qāla mā khaṭbukunna idh rāwadttunna yūsufa ʿan nafsihi qul'na ḥāsha lillahi mā ʿalim'nā ʿalayhi min sūin qālati im'ra-atu l-ʿazīzi l-āna ḥaṣḥaṣa l-ḥaqu anā rāwadttuhu ʿan nafsihi wa-innahu lamina l-ṣādiqīna

Marathi ५१. (राजाने) विचारले, हे स्त्रियांनो! त्या वेळची खरी कहाणी काय आहे, जेव्हा तुम्ही कपट करून यूसुफला त्याच्या मनापासून बहकवू इच्छित होत्या? त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की (अल्लाह जाणतो) आम्ही यूसुफमध्ये कोणातही वाईट गुण पाहिला नाही, मग तर अजीजची पत्नीही उद्‌गारली, आता तर सत्य उघडकीस आलेच आहे. मीच त्याला बहकविणयाचा प्रयत्न केला होता त्याच्या मनापासून (विचलित करण्याचा) आणि निःसंशय तो खऱ्या लोकांपैकी आहे.

Verse 52

ذَٰلِكَ لِيَعْلَمَ أَنِّى لَمْ أَخُنْهُ بِٱلْغَيْبِ وَأَنَّ ٱللَّهَ لَا يَهْدِى كَيْدَ ٱلْخَآئِنِينَ

Transliteration dhālika liyaʿlama annī lam akhun'hu bil-ghaybi wa-anna l-laha lā yahdī kayda l-khāinīna

Marathi ५२. हे या कारणास्तव की (अजीज) ला माहीत व्हावे की मी त्याच्याशी विश्वासघात केला नाही आणि हेही की अल्लाह कपट करणाऱ्यांचा डाव सफल होऊ देत नाही.

Verse 53

۞ وَمَآ أُبَرِّئُ نَفْسِىٓ ۚ إِنَّ ٱلنَّفْسَ لَأَمَّارَةٌۢ بِٱلسُّوٓءِ إِلَّا مَا رَحِمَ رَبِّىٓ ۚ إِنَّ رَبِّى غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration wamā ubarri-u nafsī inna l-nafsa la-ammāratun bil-sūi illā mā raḥima rabbī inna rabbī ghafūrun raḥīmun

Marathi ५३. आणि मी आपल्या मनाच्या पावित्र्याचे वर्णन करीत नाही, निःसंशय, मन तर वाईट गोष्टीचीच प्रेरणार देणारे आहे, परंतु हे की माझा पालनकर्ताच आपली दया- कृपा करील. निश्चितच माझा पालनकर्ता माफ करणारा, दया करणारा आहे.

Verse 54

وَقَالَ ٱلْمَلِكُ ٱئْتُونِى بِهِۦٓ أَسْتَخْلِصْهُ لِنَفْسِى ۖ فَلَمَّا كَلَّمَهُۥ قَالَ إِنَّكَ ٱلْيَوْمَ لَدَيْنَا مَكِينٌ أَمِينٌ

Transliteration waqāla l-maliku i'tūnī bihi astakhliṣ'hu linafsī falammā kallamahu qāla innaka l-yawma ladaynā makīnun amīnun

Marathi ५४. आणि बादशहा म्हणाला, त्याला माझ्या समोर आणा की मी त्याला आपल्या व्यक्तिगत कामांकरिता नेमून घ्यावे. मग जेव्हा त्याच्याशी वार्तालाप करू लागला, तेव्हा म्हणाला, तुम्ही आजपासून आमचे येथे सन्मानित आणि विश्वसनीय (अमानतदार) आहात.

Verse 55

قَالَ ٱجْعَلْنِى عَلَىٰ خَزَآئِنِ ٱلْأَرْضِ ۖ إِنِّى حَفِيظٌ عَلِيمٌ

Transliteration qāla ij'ʿalnī ʿalā khazāini l-arḍi innī ḥafīẓun ʿalīmun

Marathi ५५. (यूसुफ) म्हणाले, तुम्ही मला देशाच्या खजीन्यावर नियुक्त करा. मी संरक्षक आणि जाणकार आहे.

Verse 56

وَكَذَٰلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِى ٱلْأَرْضِ يَتَبَوَّأُ مِنْهَا حَيْثُ يَشَآءُ ۚ نُصِيبُ بِرَحْمَتِنَا مَن نَّشَآءُ ۖ وَلَا نُضِيعُ أَجْرَ ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration wakadhālika makkannā liyūsufa fī l-arḍi yatabawwa-u min'hā ḥaythu yashāu nuṣību biraḥmatinā man nashāu walā nuḍīʿu ajra l-muḥ'sinīna

Marathi ५६. आणि अशा प्रकारे आम्ही यूसुफला देशाचा सूत्रधार बनविले की त्याने वाटेल तिथे राहावे. आम्ही ज्याला इच्छितो, त्याच्यापर्यंत आपली दया- कृपा पोहचवितो, आणि आम्ही सत्कर्म करणाऱ्यांच्या आचरणाचे फळ वाया जाऊ देत नाही.

Verse 57

وَلَأَجْرُ ٱلْـَٔاخِرَةِ خَيْرٌ لِّلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَكَانُوا۟ يَتَّقُونَ

Transliteration wala-ajru l-ākhirati khayrun lilladhīna āmanū wakānū yattaqūna

Marathi ५७. आणि निःसंशय ईमान राखणाऱ्यांचा आणि दुराचारापासून दूर राहणाऱ्यांचा आखिरतचा मोबदला कितीतरी चांगला आहे.

Verse 58

وَجَآءَ إِخْوَةُ يُوسُفَ فَدَخَلُوا۟ عَلَيْهِ فَعَرَفَهُمْ وَهُمْ لَهُۥ مُنكِرُونَ

Transliteration wajāa ikh'watu yūsufa fadakhalū ʿalayhi faʿarafahum wahum lahu munkirūna

Marathi ५८. आणि यूसुफचे भाऊ आले आणि यूसुफजवळ गेले तेव्हा यूसुफने त्यांना ओळखून घेतले, परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.

Verse 59

وَلَمَّا جَهَّزَهُم بِجَهَازِهِمْ قَالَ ٱئْتُونِى بِأَخٍ لَّكُم مِّنْ أَبِيكُمْ ۚ أَلَا تَرَوْنَ أَنِّىٓ أُوفِى ٱلْكَيْلَ وَأَنَا۠ خَيْرُ ٱلْمُنزِلِينَ

Transliteration walammā jahhazahum bijahāzihim qāla i'tūnī bi-akhin lakum min abīkum alā tarawna annī ūfī l-kayla wa-anā khayru l-munzilīna

Marathi ५९. आणि जेव्हा त्यांचे सामान तयार केले गेले तेव्हा यूसुफ म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ आपल्या त्या भावाला आणा, जो तुमच्या पित्यापासून आहे, काय तुम्ही नाही पाहिले की मी मापही पुरेपूर देतो आणि अतिथीचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करणाऱ्यांपैकी आहे.

Verse 60

فَإِن لَّمْ تَأْتُونِى بِهِۦ فَلَا كَيْلَ لَكُمْ عِندِى وَلَا تَقْرَبُونِ

Transliteration fa-in lam tatūnī bihi falā kayla lakum ʿindī walā taqrabūni

Marathi ६०. परंतु जर तुम्ही त्याला माझ्याजवळ आणले नाही तर माझ्याकडून तुम्हाला कसलेही माप मिळणार नाही, किंबहुना तुम्ही माझ्याजवळही येऊ शकणार नाहीत.

Verse 61

قَالُوا۟ سَنُرَٰوِدُ عَنْهُ أَبَاهُ وَإِنَّا لَفَـٰعِلُونَ

Transliteration qālū sanurāwidu ʿanhu abāhu wa-innā lafāʿilūna

Marathi ६१. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याच्या पित्याशी या संदर्भात गोडीगुलाबीने बोलून पूर्ण प्रयत्न करू.

Verse 62

وَقَالَ لِفِتْيَـٰنِهِ ٱجْعَلُوا۟ بِضَـٰعَتَهُمْ فِى رِحَالِهِمْ لَعَلَّهُمْ يَعْرِفُونَهَآ إِذَا ٱنقَلَبُوٓا۟ إِلَىٰٓ أَهْلِهِمْ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ

Transliteration waqāla lifit'yānihi ij'ʿalū biḍāʿatahum fī riḥālihim laʿallahum yaʿrifūnahā idhā inqalabū ilā ahlihim laʿallahum yarjiʿūna

Marathi ६२. आणि आपल्या सेवकांना सांगितले की त्यांचा माल (धन) त्यांच्याच पोत्यांमध्ये ठेवून द्या की जेव्हा परतून आपल्या कुटुंबात जातील तेव्हा आपले धन ओळखून घेतील, फार शक्य आहे की ते पुन्हा येतील.

Verse 63

فَلَمَّا رَجَعُوٓا۟ إِلَىٰٓ أَبِيهِمْ قَالُوا۟ يَـٰٓأَبَانَا مُنِعَ مِنَّا ٱلْكَيْلُ فَأَرْسِلْ مَعَنَآ أَخَانَا نَكْتَلْ وَإِنَّا لَهُۥ لَحَـٰفِظُونَ

Transliteration falammā rajaʿū ilā abīhim qālū yāabānā muniʿa minnā l-kaylu fa-arsil maʿanā akhānā naktal wa-innā lahu laḥāfiẓūna

Marathi ६३. जेव्हा ते लोक परतून आपल्या पित्याजवळ गेले तेव्हा म्हणू लागले, आम्हाला तर धान्य देण्यावर प्रतिबंध घातला गेला. आता तुम्ही आमच्यासोबत भावाला पाठवा की आम्ही माप भरून आणावे. आम्ही त्याच्या रक्षणाची हमी देतो.

Verse 64

قَالَ هَلْ ءَامَنُكُمْ عَلَيْهِ إِلَّا كَمَآ أَمِنتُكُمْ عَلَىٰٓ أَخِيهِ مِن قَبْلُ ۖ فَٱللَّهُ خَيْرٌ حَـٰفِظًا ۖ وَهُوَ أَرْحَمُ ٱلرَّٰحِمِينَ

Transliteration qāla hal āmanukum ʿalayhi illā kamā amintukum ʿalā akhīhi min qablu fal-lahu khayrun ḥāfiẓan wahuwa arḥamu l-rāḥimīna

Marathi ६४. (याकूब) म्हणाले, काय मी याच्या बाबतीत तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू जसा यापूर्वी याच्या भावाबाबत विश्वास ठेवला? सर्वश्रेष्ठ अल्लाहच सर्वांत उत्तम संरक्षक आहे आणि तो समस्त कृपावानांमध्ये जास्त कृपावान आहे.

Verse 65

وَلَمَّا فَتَحُوا۟ مَتَـٰعَهُمْ وَجَدُوا۟ بِضَـٰعَتَهُمْ رُدَّتْ إِلَيْهِمْ ۖ قَالُوا۟ يَـٰٓأَبَانَا مَا نَبْغِى ۖ هَـٰذِهِۦ بِضَـٰعَتُنَا رُدَّتْ إِلَيْنَا ۖ وَنَمِيرُ أَهْلَنَا وَنَحْفَظُ أَخَانَا وَنَزْدَادُ كَيْلَ بَعِيرٍ ۖ ذَٰلِكَ كَيْلٌ يَسِيرٌ

Transliteration walammā fataḥū matāʿahum wajadū biḍāʿatahum ruddat ilayhim qālū yāabānā mā nabghī hādhihi biḍāʿatunā ruddat ilaynā wanamīru ahlanā wanaḥfaẓu akhānā wanazdādu kayla baʿīrin dhālika kaylun yasīrun

Marathi ६५. आणि जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा त्यात त्यांना आपली रक्कम आढळली, जी त्यांना परत केली गेली होती. म्हणाले, हे पिता! आम्हाला आणखी काय पाहिजे? ही आमची रक्कम आम्हाला परत केली गेली आहे आणि आम्ही आपल्या कुटुंबाकरिता धान्य आणून देऊ आणि आपल्या भावाचे रक्षण करू आणि एक उंटाचे माप जास्त आणू. हे माप तर जास्त सोपे आहे.

Verse 66

قَالَ لَنْ أُرْسِلَهُۥ مَعَكُمْ حَتَّىٰ تُؤْتُونِ مَوْثِقًا مِّنَ ٱللَّهِ لَتَأْتُنَّنِى بِهِۦٓ إِلَّآ أَن يُحَاطَ بِكُمْ ۖ فَلَمَّآ ءَاتَوْهُ مَوْثِقَهُمْ قَالَ ٱللَّهُ عَلَىٰ مَا نَقُولُ وَكِيلٌ

Transliteration qāla lan ur'silahu maʿakum ḥattā tu'tūni mawthiqan mina l-lahi latatunnanī bihi illā an yuḥāṭa bikum falammā ātawhu mawthiqahum qāla l-lahu ʿalā mā naqūlu wakīlun

Marathi ६६. (याकूब) म्हणाले, मी तर त्याला तुमच्यासोबत कधीही पाठविणार नाही, जोपर्यंत तुम्ही अल्लाहला मध्यस्थी ठेवून मला वचन द्याल की तुम्ही त्याला माझ्याजवळ पोचवाल, याखेरीज की तुम्ही सर्व कैदी बनविले जाल. जेव्हा त्यांनी पक्के वचन दिले तेव्हा ते म्हणाले की आम्ही जे काही बोलत आहोत, अल्लाह त्याचा संरक्षक आहे.

Verse 67

وَقَالَ يَـٰبَنِىَّ لَا تَدْخُلُوا۟ مِنۢ بَابٍ وَٰحِدٍ وَٱدْخُلُوا۟ مِنْ أَبْوَٰبٍ مُّتَفَرِّقَةٍ ۖ وَمَآ أُغْنِى عَنكُم مِّنَ ٱللَّهِ مِن شَىْءٍ ۖ إِنِ ٱلْحُكْمُ إِلَّا لِلَّهِ ۖ عَلَيْهِ تَوَكَّلْتُ ۖ وَعَلَيْهِ فَلْيَتَوَكَّلِ ٱلْمُتَوَكِّلُونَ

Transliteration waqāla yābaniyya lā tadkhulū min bābin wāḥidin wa-ud'khulū min abwābin mutafarriqatin wamā ugh'nī ʿankum mina l-lahi min shayin ini l-ḥuk'mu illā lillahi ʿalayhi tawakkaltu waʿalayhi falyatawakkali l-mutawakilūna

Marathi ६७. आणि (याकूब) म्हणाले, हे माझ्या मुलांनो! तुम्ही सर्व एकाच दारातून प्रवेश करू नका, किंबहुना अनेक दारांमधून वेगवेगळे होऊन प्रवेश करा. मी अल्लाहतर्फे आलेल्या कोणत्याही गोष्टीला तुमच्या वरून टाळू शकत नाही. आदेश केवळ अल्लाहचाच चालतो, माझा संपूर्ण विश्वास त्याच्यावरच आहे आणि प्रत्येक भरोसा ठेवणाऱ्याने त्याच्यावरच भरोसा ठेवला पाहिजे.

Verse 68

وَلَمَّا دَخَلُوا۟ مِنْ حَيْثُ أَمَرَهُمْ أَبُوهُم مَّا كَانَ يُغْنِى عَنْهُم مِّنَ ٱللَّهِ مِن شَىْءٍ إِلَّا حَاجَةً فِى نَفْسِ يَعْقُوبَ قَضَىٰهَا ۚ وَإِنَّهُۥ لَذُو عِلْمٍ لِّمَا عَلَّمْنَـٰهُ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعْلَمُونَ

Transliteration walammā dakhalū min ḥaythu amarahum abūhum mā kāna yugh'nī ʿanhum mina l-lahi min shayin illā ḥājatan fī nafsi yaʿqūba qaḍāhā wa-innahu ladhū ʿil'min limā ʿallamnāhu walākinna akthara l-nāsi lā yaʿlamūna

Marathi ६८. आणि जेव्हा ते त्याच मार्गांनी, ज्यांचा आदेश त्यांच्या पित्याने दिला होता, गेले, काहीच नव्हते की अल्लाहने जी गोष्ट निश्चित केली आहे, तिच्यापासून ते त्यांना किंचितही वाचवतील. तथापि याकूबच्या मनात एक विचार आला, जो त्याने पूर्ण केला. निःसंशय ते आम्ही शिकविलेल्या त्या ज्ञानाने संपन्न होते, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत.

Verse 69

وَلَمَّا دَخَلُوا۟ عَلَىٰ يُوسُفَ ءَاوَىٰٓ إِلَيْهِ أَخَاهُ ۖ قَالَ إِنِّىٓ أَنَا۠ أَخُوكَ فَلَا تَبْتَئِسْ بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ

Transliteration walammā dakhalū ʿalā yūsufa āwā ilayhi akhāhu qāla innī anā akhūka falā tabta-is bimā kānū yaʿmalūna

Marathi ६९. आणि ते सर्व यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा यूसुफने आपल्या भावाला आपल्याजवळ बसविले आणि म्हटले, मी तुझा भाऊ (यूसुफ) आहे, आतापावेतो हे जे काही करत राहिले, त्याबद्दल दुःख करू नकोस.

Verse 70

فَلَمَّا جَهَّزَهُم بِجَهَازِهِمْ جَعَلَ ٱلسِّقَايَةَ فِى رَحْلِ أَخِيهِ ثُمَّ أَذَّنَ مُؤَذِّنٌ أَيَّتُهَا ٱلْعِيرُ إِنَّكُمْ لَسَـٰرِقُونَ

Transliteration falammā jahhazahum bijahāzihim jaʿala l-siqāyata fī raḥli akhīhi thumma adhana mu-adhinun ayyatuhā l-ʿīru innakum lasāriqūna

Marathi ७०. मग जेव्हा त्यांचे सामान (धान्याने भरून) तयार केले तेव्हा आपल्या भावाच्या सामानात आपला पाणी पिण्याचा प्याला ठेवून दिला, मग एका ऐलान करणाऱ्याने ऐलान केले, हे काफिलावाल्यांनो! तुम्ही लोक तर चोर आहात!

Verse 71

قَالُوا۟ وَأَقْبَلُوا۟ عَلَيْهِم مَّاذَا تَفْقِدُونَ

Transliteration qālū wa-aqbalū ʿalayhim mādhā tafqidūna

Marathi ७१. त्यांनी त्याच्याकडे तोंड फिरवून म्हटले, तुमची कोणती वस्तू हरवली आहे?

Verse 72

قَالُوا۟ نَفْقِدُ صُوَاعَ ٱلْمَلِكِ وَلِمَن جَآءَ بِهِۦ حِمْلُ بَعِيرٍ وَأَنَا۠ بِهِۦ زَعِيمٌ

Transliteration qālū nafqidu ṣuwāʿa l-maliki waliman jāa bihi ḥim'lu baʿīrin wa-anā bihi zaʿīmun

Marathi ७२. उत्तर दिले की शाही प्याला हरवला आहे, जो तो घेऊन येईल त्याला एक उंटाचे ओझे इतके धान्य मिळेल. या वचनाची मी हमी देतो.

Verse 73

قَالُوا۟ تَٱللَّهِ لَقَدْ عَلِمْتُم مَّا جِئْنَا لِنُفْسِدَ فِى ٱلْأَرْضِ وَمَا كُنَّا سَـٰرِقِينَ

Transliteration qālū tal-lahi laqad ʿalim'tum mā ji'nā linuf'sida fī l-arḍi wamā kunnā sāriqīna

Marathi ७३. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही देशात उपद्रव निर्माण करण्यासाठी आलो नाहीत आणि ना आम्ही चोर आहोत.

Verse 74

قَالُوا۟ فَمَا جَزَٰٓؤُهُۥٓ إِن كُنتُمْ كَـٰذِبِينَ

Transliteration qālū famā jazāuhu in kuntum kādhibīna

Marathi ७४. ते म्हणाले, बरे चोरीची काय शिक्षा आहे जर तुम्ही खोटे ठराल.

Verse 75

قَالُوا۟ جَزَٰٓؤُهُۥ مَن وُجِدَ فِى رَحْلِهِۦ فَهُوَ جَزَٰٓؤُهُۥ ۚ كَذَٰلِكَ نَجْزِى ٱلظَّـٰلِمِينَ

Transliteration qālū jazāuhu man wujida fī raḥlihi fahuwa jazāuhu kadhālika najzī l-ẓālimīna

Marathi ७५. उत्तर दिले, याची शिक्षा हीच की ज्याच्या सामान्यात तो प्याला आढळून येईल तोच त्याच्या बदली आहे. आम्ही तर अत्याचारींना हीच शिक्षा देत असतो.

Verse 76

فَبَدَأَ بِأَوْعِيَتِهِمْ قَبْلَ وِعَآءِ أَخِيهِ ثُمَّ ٱسْتَخْرَجَهَا مِن وِعَآءِ أَخِيهِ ۚ كَذَٰلِكَ كِدْنَا لِيُوسُفَ ۖ مَا كَانَ لِيَأْخُذَ أَخَاهُ فِى دِينِ ٱلْمَلِكِ إِلَّآ أَن يَشَآءَ ٱللَّهُ ۚ نَرْفَعُ دَرَجَـٰتٍ مَّن نَّشَآءُ ۗ وَفَوْقَ كُلِّ ذِى عِلْمٍ عَلِيمٌ

Transliteration fabada-a bi-awʿiyatihim qabla wiʿāi akhīhi thumma is'takhrajahā min wiʿāi akhīhi kadhālika kid'nā liyūsufa mā kāna liyakhudha akhāhu fī dīni l-maliki illā an yashāa l-lahu narfaʿu darajātin man nashāu wafawqa kulli dhī ʿil'min ʿalīmun

Marathi ७६. मग (यूसुफ) ने आपल्या भावाचे सामान तपासण्यापूर्वी दुसऱ्यांचे सामान तपासायला सुरुवात केली, मग त्याने पिण्याचा प्याला आपल्या भावाच्या सामानातून काढला. आम्ही यूसुफकरिता अशा प्रकारे ही योजना बनविली. त्या बादशहाच्या कायद्यानुसार तो आपल्या भावाला (रोखून) ठेवू शकत नव्हता, परंतु हे की अल्लाहला मंजूर असेल. आम्ही ज्याला इच्छितो त्याचा दर्जा बुलंद करतो. प्रत्येक ज्ञान राखणाऱ्यावर (मोठेपणात) एक मोठा ज्ञानी अस्तित्वात आहे.

Verse 77

۞ قَالُوٓا۟ إِن يَسْرِقْ فَقَدْ سَرَقَ أَخٌ لَّهُۥ مِن قَبْلُ ۚ فَأَسَرَّهَا يُوسُفُ فِى نَفْسِهِۦ وَلَمْ يُبْدِهَا لَهُمْ ۚ قَالَ أَنتُمْ شَرٌّ مَّكَانًا ۖ وَٱللَّهُ أَعْلَمُ بِمَا تَصِفُونَ

Transliteration qālū in yasriq faqad saraqa akhun lahu min qablu fa-asarrahā yūsufu fī nafsihi walam yub'dihā lahum qāla antum sharrun makānan wal-lahu aʿlamu bimā taṣifūna

Marathi ७७. ते म्हणाले, जर याने चोरी केली आहे तर (नवलाची गोष्ट नव्हे) याच्या भावानेही यापूर्वी चोरी केली आहे. यूसुफने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली आणि त्यांच्यासमोर अगदी जाहीर केले नाही, म्हटले की तुम्ही वाईट ठिकाणी आहात आणि जे काही तुम्ही सांगत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

Verse 78

قَالُوا۟ يَـٰٓأَيُّهَا ٱلْعَزِيزُ إِنَّ لَهُۥٓ أَبًا شَيْخًا كَبِيرًا فَخُذْ أَحَدَنَا مَكَانَهُۥٓ ۖ إِنَّا نَرَىٰكَ مِنَ ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration qālū yāayyuhā l-ʿazīzu inna lahu aban shaykhan kabīran fakhudh aḥadanā makānahu innā narāka mina l-muḥ'sinīna

Marathi ७८. ते म्हणाले, हे मिस्र देशाचा सर्वाधिकार राखणारे! याचे पिता अतिशय वृद्ध मनुष्य आहेत. तुम्ही याच्याऐवजी आमच्यापैकी एखाद्याला ठेवून घ्या. आम्ही असे पाहतो की तुम्ही मोठे सज्जन मनुष्य आहात.

Verse 79

قَالَ مَعَاذَ ٱللَّهِ أَن نَّأْخُذَ إِلَّا مَن وَجَدْنَا مَتَـٰعَنَا عِندَهُۥٓ إِنَّآ إِذًا لَّظَـٰلِمُونَ

Transliteration qāla maʿādha l-lahi an nakhudha illā man wajadnā matāʿanā ʿindahu innā idhan laẓālimūna

Marathi ७९. (यूसुफ) म्हणाले की आम्हाला ज्याच्याजवळ आमची वस्तू आढळून आली आहे त्याला सोडून दुसऱ्यांना बंदी बनविण्यापासून अल्लाहचे शरण इच्छितो. असे केल्याने निश्चितच आम्ही अन्याय करणाऱ्यांपैकी ठरू.

Verse 80

فَلَمَّا ٱسْتَيْـَٔسُوا۟ مِنْهُ خَلَصُوا۟ نَجِيًّا ۖ قَالَ كَبِيرُهُمْ أَلَمْ تَعْلَمُوٓا۟ أَنَّ أَبَاكُمْ قَدْ أَخَذَ عَلَيْكُم مَّوْثِقًا مِّنَ ٱللَّهِ وَمِن قَبْلُ مَا فَرَّطتُمْ فِى يُوسُفَ ۖ فَلَنْ أَبْرَحَ ٱلْأَرْضَ حَتَّىٰ يَأْذَنَ لِىٓ أَبِىٓ أَوْ يَحْكُمَ ٱللَّهُ لِى ۖ وَهُوَ خَيْرُ ٱلْحَـٰكِمِينَ

Transliteration falammā is'tayasū min'hu khalaṣū najiyyan qāla kabīruhum alam taʿlamū anna abākum qad akhadha ʿalaykum mawthiqan mina l-lahi wamin qablu mā farraṭtum fī yūsufa falan abraḥa l-arḍa ḥattā yadhana lī abī aw yaḥkuma l-lahu lī wahuwa khayru l-ḥākimīna

Marathi ८०. जेव्हा हे, यूसुफकडून निराश झाले, तेव्हा एकांतात बसून सल्लामसलत करू लागले. त्यांच्यापैकी जो सर्वांत मोठा होता तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या पित्याने तुमच्याकडून अल्लाहला मध्यस्थी ठेवून पक्के वचन घेतले आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही यूसुफविषयी अपराध केलेला आहे. आता मी तर भूमीतून पाय काढणार नाही, जोपर्यंत पिता स्वतः मला अनुमती देत नाहीत किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाह माझ्या या समस्येचा फैसला करील. तोच सर्वोत्तम शासक आहे.

Verse 81

ٱرْجِعُوٓا۟ إِلَىٰٓ أَبِيكُمْ فَقُولُوا۟ يَـٰٓأَبَانَآ إِنَّ ٱبْنَكَ سَرَقَ وَمَا شَهِدْنَآ إِلَّا بِمَا عَلِمْنَا وَمَا كُنَّا لِلْغَيْبِ حَـٰفِظِينَ

Transliteration ir'jiʿū ilā abīkum faqūlū yāabānā inna ib'naka saraqa wamā shahid'nā illā bimā ʿalim'nā wamā kunnā lil'ghaybi ḥāfiẓīna

Marathi ८१. तुम्ही सर्व पित्याच्या सेवेत परत जा आणि सांगा की हे पिता! तुमच्या पुत्राने चोरी केली आणि आम्ही तीच साक्ष दिली, जी आम्ही जाणत होतो. आम्ही काही परोक्ष (गैब) चे रक्षण करणारे तर नव्हतो.

Verse 82

وَسْـَٔلِ ٱلْقَرْيَةَ ٱلَّتِى كُنَّا فِيهَا وَٱلْعِيرَ ٱلَّتِىٓ أَقْبَلْنَا فِيهَا ۖ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ

Transliteration wasali l-qaryata allatī kunnā fīhā wal-ʿīra allatī aqbalnā fīhā wa-innā laṣādiqūna

Marathi ८२. आणि तुम्ही त्या शहराच्या लोकांना विचारा, जिथे आम्ही होतो आणि त्या प्रवाशांनाही विचारा ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहोत आणि निःसंशय आम्ही पूर्णपणे सच्चे आहोत.

Verse 83

قَالَ بَلْ سَوَّلَتْ لَكُمْ أَنفُسُكُمْ أَمْرًا ۖ فَصَبْرٌ جَمِيلٌ ۖ عَسَى ٱللَّهُ أَن يَأْتِيَنِى بِهِمْ جَمِيعًا ۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلْعَلِيمُ ٱلْحَكِيمُ

Transliteration qāla bal sawwalat lakum anfusukum amran faṣabrun jamīlun ʿasā l-lahu an yatiyanī bihim jamīʿan innahu huwa l-ʿalīmu l-ḥakīmu

Marathi ८३. (याकूब) म्हणाले, असे नाही, किंबहुना तुम्ही आपल्यातर्फे एक गोष्ट रचून घेतली, तेव्हा आता संयम राखणेच उत्तम आहे. संभवतः सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या सर्वांना माझ्याजवळ पोहचविल. तोच ज्ञानी आणि हिकमतशाली आहे.

Verse 84

وَتَوَلَّىٰ عَنْهُمْ وَقَالَ يَـٰٓأَسَفَىٰ عَلَىٰ يُوسُفَ وَٱبْيَضَّتْ عَيْنَاهُ مِنَ ٱلْحُزْنِ فَهُوَ كَظِيمٌ

Transliteration watawallā ʿanhum waqāla yāasafā ʿalā yūsufa wa-ib'yaḍḍat ʿaynāhu mina l-ḥuz'ni fahuwa kaẓīmun

Marathi ८४. आणि मग (याकूबने) त्यांच्याकडून तोंड फिरवून घेतले आणि म्हटले, अरेरे, यूसुफ! त्यांचे डोळे दुःखातिरेकाने पांढरे झाले होते आणि ते या दुःखाला सहन करीत होते.

Verse 85

قَالُوا۟ تَٱللَّهِ تَفْتَؤُا۟ تَذْكُرُ يُوسُفَ حَتَّىٰ تَكُونَ حَرَضًا أَوْ تَكُونَ مِنَ ٱلْهَـٰلِكِينَ

Transliteration qālū tal-lahi tafta-u tadhkuru yūsufa ḥattā takūna ḥaraḍan aw takūna mina l-hālikīna

Marathi ८५. (पुत्र) म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही नेहमी यूसुफच्या आठवणीत भान हरपून राहाल येथेपर्यंत की अगदी गळून जाल किंवा मरण पावाल.

Verse 86

قَالَ إِنَّمَآ أَشْكُوا۟ بَثِّى وَحُزْنِىٓ إِلَى ٱللَّهِ وَأَعْلَمُ مِنَ ٱللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ

Transliteration qāla innamā ashkū bathī waḥuz'nī ilā l-lahi wa-aʿlamu mina l-lahi mā lā taʿlamūna

Marathi ८६. (याकूब) म्हणाले, मी तर आपल्या संकट आणि दुःखाचे गाऱ्हाणे अल्लाहजवळ मांडत आहे. मला अल्लाहतर्फे त्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे, ज्यांच्याबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात.

Verse 87

يَـٰبَنِىَّ ٱذْهَبُوا۟ فَتَحَسَّسُوا۟ مِن يُوسُفَ وَأَخِيهِ وَلَا تَا۟يْـَٔسُوا۟ مِن رَّوْحِ ٱللَّهِ ۖ إِنَّهُۥ لَا يَا۟يْـَٔسُ مِن رَّوْحِ ٱللَّهِ إِلَّا ٱلْقَوْمُ ٱلْكَـٰفِرُونَ

Transliteration yābaniyya idh'habū fataḥassasū min yūsufa wa-akhīhi walā tāy'asū min rawḥi l-lahi innahu lā yāy'asu min rawḥi l-lahi illā l-qawmu l-kāfirūna

Marathi ८७. माझ्या प्रिय पुत्रांनो! तुम्ही जा आणि यूसुफ आणि त्याच्या भावाचा चांगल्या प्रकारे शोध घ्या आणि अल्लाहच्या दयेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाहच्या दया-कृपेपासून तेच लोक निराश होतात जे काफिर (इन्कारी) असतात.

Verse 88

فَلَمَّا دَخَلُوا۟ عَلَيْهِ قَالُوا۟ يَـٰٓأَيُّهَا ٱلْعَزِيزُ مَسَّنَا وَأَهْلَنَا ٱلضُّرُّ وَجِئْنَا بِبِضَـٰعَةٍ مُّزْجَىٰةٍ فَأَوْفِ لَنَا ٱلْكَيْلَ وَتَصَدَّقْ عَلَيْنَآ ۖ إِنَّ ٱللَّهَ يَجْزِى ٱلْمُتَصَدِّقِينَ

Transliteration falammā dakhalū ʿalayhi qālū yāayyuhā l-ʿazīzu massanā wa-ahlanā l-ḍuru waji'nā bibiḍāʿatin muz'jātin fa-awfi lanā l-kayla wataṣaddaq ʿalaynā inna l-laha yajzī l-mutaṣadiqīna

Marathi ८८. मग जेव्हा हे लोक यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा म्हणू लागले की हे अजीज! आम्ही आणि आमचे कुटुंब अतिशय अडचणीत आहे, आम्ही थोडीशी तुच्छ पुंजी आणली आहे, परंतु तुम्ही आम्हाला धान्याचे पूर्ण माप देऊन टाका आणि आम्हाला दान म्हणून द्या. निश्चितच अल्लाह दान देणाऱ्यांना चांगला मोबदला देतो.

Verse 89

قَالَ هَلْ عَلِمْتُم مَّا فَعَلْتُم بِيُوسُفَ وَأَخِيهِ إِذْ أَنتُمْ جَـٰهِلُونَ

Transliteration qāla hal ʿalim'tum mā faʿaltum biyūsufa wa-akhīhi idh antum jāhilūna

Marathi ८९. (यूसुफ) म्हणाले, तुमच्या ध्यानात तरी आहे का की तुम्ही यूसुफ आणि त्याच्या भावाशी आपल्या नादानपणात काय काय केले?

Verse 90

قَالُوٓا۟ أَءِنَّكَ لَأَنتَ يُوسُفُ ۖ قَالَ أَنَا۠ يُوسُفُ وَهَـٰذَآ أَخِى ۖ قَدْ مَنَّ ٱللَّهُ عَلَيْنَآ ۖ إِنَّهُۥ مَن يَتَّقِ وَيَصْبِرْ فَإِنَّ ٱللَّهَ لَا يُضِيعُ أَجْرَ ٱلْمُحْسِنِينَ

Transliteration qālū a-innaka la-anta yūsufu qāla anā yūsufu wahādhā akhī qad manna l-lahu ʿalaynā innahu man yattaqi wayaṣbir fa-inna l-laha lā yuḍīʿu ajra l-muḥ'sinīna

Marathi ९०. ते म्हणाले, काय (खरोखर) तूच यूसुफ आहेस? उत्तर दिले, होय! मीच तो यूसुफ आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहने आमच्यावर दया आणि कृपा केली. खरी गोष्ट अशी की जो कोणी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहील आणि धीर-संयम राखील तर अल्लाह एखाद्या सत्कर्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही.

Verse 91

قَالُوا۟ تَٱللَّهِ لَقَدْ ءَاثَرَكَ ٱللَّهُ عَلَيْنَا وَإِن كُنَّا لَخَـٰطِـِٔينَ

Transliteration qālū tal-lahi laqad ātharaka l-lahu ʿalaynā wa-in kunnā lakhāṭiīna

Marathi ९१. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! अल्लाहने तुला आमच्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि हेही सत्य आहे की आम्ही अपराधी आहोत.

Verse 92

قَالَ لَا تَثْرِيبَ عَلَيْكُمُ ٱلْيَوْمَ ۖ يَغْفِرُ ٱللَّهُ لَكُمْ ۖ وَهُوَ أَرْحَمُ ٱلرَّٰحِمِينَ

Transliteration qāla lā tathrība ʿalaykumu l-yawma yaghfiru l-lahu lakum wahuwa arḥamu l-rāḥimīna

Marathi ९२. उत्तर दिले, आज तुमच्यावर कसलाही आरोप नाही, अल्लाह तुम्हाला माफ करो, तो तर समस्त दया करणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा दया करणारा आहे.

Verse 93

ٱذْهَبُوا۟ بِقَمِيصِى هَـٰذَا فَأَلْقُوهُ عَلَىٰ وَجْهِ أَبِى يَأْتِ بَصِيرًا وَأْتُونِى بِأَهْلِكُمْ أَجْمَعِينَ

Transliteration idh'habū biqamīṣī hādhā fa-alqūhu ʿalā wajhi abī yati baṣīran watūnī bi-ahlikum ajmaʿīna

Marathi ९३. माझा हा सदरा तुम्ही घेऊन जा आणि तो माझ्या पित्याच्या तोंडावर टाका की (ज्यामुळे) ते पाहू लागतील आणि येतील आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याजवळ घेऊन या.

Verse 94

وَلَمَّا فَصَلَتِ ٱلْعِيرُ قَالَ أَبُوهُمْ إِنِّى لَأَجِدُ رِيحَ يُوسُفَ ۖ لَوْلَآ أَن تُفَنِّدُونِ

Transliteration walammā faṣalati l-ʿīru qāla abūhum innī la-ajidu rīḥa yūsufa lawlā an tufannidūni

Marathi ९४. आणि जेव्हा हा काफिला (मायदेशी) निघाला, तेव्हा त्यांचे पिता (याकूब) म्हणाले, मला यूसुफचा सुगंध येत आहे, जर तुम्ही मला मूर्ख समजत नसाल.

Verse 95

قَالُوا۟ تَٱللَّهِ إِنَّكَ لَفِى ضَلَـٰلِكَ ٱلْقَدِيمِ

Transliteration qālū tal-lahi innaka lafī ḍalālika l-qadīmi

Marathi ९५. (पुत्र) म्हणू लागले की अल्लाहची शपथ! तुम्ही तर अजूनही आपल्या त्याच जुन्या चुकीवर कायम आहात!

Verse 96

فَلَمَّآ أَن جَآءَ ٱلْبَشِيرُ أَلْقَىٰهُ عَلَىٰ وَجْهِهِۦ فَٱرْتَدَّ بَصِيرًا ۖ قَالَ أَلَمْ أَقُل لَّكُمْ إِنِّىٓ أَعْلَمُ مِنَ ٱللَّهِ مَا لَا تَعْلَمُونَ

Transliteration falammā an jāa l-bashīru alqāhu ʿalā wajhihi fa-ir'tadda baṣīran qāla alam aqul lakum innī aʿlamu mina l-lahi mā lā taʿlamūna

Marathi ९६. जेव्हा शुभ समाचार देणाऱ्याने पोहोचून त्यांच्या तोंडावर तो सदरा टाकला, त्याच क्षणी त्यांना पुनश्च दिसू लागले. म्हणाले की, काय मी तुम्हाला सांगत नव्हतो की मी अल्लाहतर्फे त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही नाही जाणत.

Verse 97

قَالُوا۟ يَـٰٓأَبَانَا ٱسْتَغْفِرْ لَنَا ذُنُوبَنَآ إِنَّا كُنَّا خَـٰطِـِٔينَ

Transliteration qālū yāabānā is'taghfir lanā dhunūbanā innā kunnā khāṭiīna

Marathi ९७. ते म्हणाले, हे पिता! तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा-याचना (माफीची दुआ) करा. निःसंशय आम्ही अपराधी आहोत.

Verse 98

قَالَ سَوْفَ أَسْتَغْفِرُ لَكُمْ رَبِّىٓ ۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلْغَفُورُ ٱلرَّحِيمُ

Transliteration qāla sawfa astaghfiru lakum rabbī innahu huwa l-ghafūru l-raḥīmu

Marathi ९८. म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच तुमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याजवळ माफीची दुआ-प्रार्थना करेन. निश्चितच तो मोठा क्षमाशील, आणि अतिशय दयावान आहे.

Verse 99

فَلَمَّا دَخَلُوا۟ عَلَىٰ يُوسُفَ ءَاوَىٰٓ إِلَيْهِ أَبَوَيْهِ وَقَالَ ٱدْخُلُوا۟ مِصْرَ إِن شَآءَ ٱللَّهُ ءَامِنِينَ

Transliteration falammā dakhalū ʿalā yūsufa āwā ilayhi abawayhi waqāla ud'khulū miṣ'ra in shāa l-lahu āminīna

Marathi ९९. जेव्हा हा समस्त परिवार यूसुफजवळ पोहोचला, तेव्हा यूसुफने आपल्या माता-पित्यास आपल्याजवळ जागा दिली आणि म्हटले, अल्लाहने इच्छिल्यास तुम्ही सर्व मिस्र देशात सुख-शांतीपूर्वक राहाल.

Verse 100

وَرَفَعَ أَبَوَيْهِ عَلَى ٱلْعَرْشِ وَخَرُّوا۟ لَهُۥ سُجَّدًا ۖ وَقَالَ يَـٰٓأَبَتِ هَـٰذَا تَأْوِيلُ رُءْيَـٰىَ مِن قَبْلُ قَدْ جَعَلَهَا رَبِّى حَقًّا ۖ وَقَدْ أَحْسَنَ بِىٓ إِذْ أَخْرَجَنِى مِنَ ٱلسِّجْنِ وَجَآءَ بِكُم مِّنَ ٱلْبَدْوِ مِنۢ بَعْدِ أَن نَّزَغَ ٱلشَّيْطَـٰنُ بَيْنِى وَبَيْنَ إِخْوَتِىٓ ۚ إِنَّ رَبِّى لَطِيفٌ لِّمَا يَشَآءُ ۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلْعَلِيمُ ٱلْحَكِيمُ

Transliteration warafaʿa abawayhi ʿalā l-ʿarshi wakharrū lahu sujjadan waqāla yāabati hādhā tawīlu ru'yāya min qablu qad jaʿalahā rabbī ḥaqqan waqad aḥsana bī idh akhrajanī mina l-sij'ni wajāa bikum mina l-badwi min baʿdi an nazagha l-shayṭānu baynī wabayna ikh'watī inna rabbī laṭīfun limā yashāu innahu huwa l-ʿalīmu l-ḥakīmu

Marathi १००. आणि आपल्या सिंहासनावर आपल्या माता-पित्यास उच्चस्थानी बसविले आणि सर्व त्याच्यासमोर सजद्यात पडले१ आणि सर्व म्हणाले, हे पिता! हा माझ्या पहिल्या स्वप्नाचा खुलासा आहे, माझ्या पालनकर्त्याने तो पूर्ण करून दाखविला. त्याने माझ्यावर फार मोठा उपकार केला, की जेव्हा मला कैदखान्यातून बाहेर काढले आणि तुम्ही लोकांना वाळवंटातून येथे आणले त्या मतभेदानंतर, जो सैतानाने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान निर्माण केला होता. माझा पालनकर्ता, ज्याच्यासाठी इच्छितो, त्याच्यासाठी उत्तम उपाययोजना करतो. निःसंशय तो मोठा जाणणारा, हिकमत बाळगणारा आहे.

Verse 101

۞ رَبِّ قَدْ ءَاتَيْتَنِى مِنَ ٱلْمُلْكِ وَعَلَّمْتَنِى مِن تَأْوِيلِ ٱلْأَحَادِيثِ ۚ فَاطِرَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ أَنتَ وَلِىِّۦ فِى ٱلدُّنْيَا وَٱلْـَٔاخِرَةِ ۖ تَوَفَّنِى مُسْلِمًا وَأَلْحِقْنِى بِٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration rabbi qad ātaytanī mina l-mul'ki waʿallamtanī min tawīli l-aḥādīthi fāṭira l-samāwāti wal-arḍi anta waliyyī fī l-dun'yā wal-ākhirati tawaffanī mus'liman wa-alḥiq'nī bil-ṣāliḥīna

Marathi १०१. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला राज्य (सत्ताधिकार) प्रदान केला आणि मला स्वप्नांचा अर्थ लावण्याचे ज्ञान दिले. हे आकाशांचा व धरतीचा निर्माणकर्ता! तूच या जगात आणि आखिरतमध्ये माझा मित्र आणि मदत करणारा आहेस. तू मला इस्लामच्या अवस्थेत मृत्यु दे आणि मला नेकी करणाऱ्यांमध्ये सामील कर.

Verse 102

ذَٰلِكَ مِنْ أَنۢبَآءِ ٱلْغَيْبِ نُوحِيهِ إِلَيْكَ ۖ وَمَا كُنتَ لَدَيْهِمْ إِذْ أَجْمَعُوٓا۟ أَمْرَهُمْ وَهُمْ يَمْكُرُونَ

Transliteration dhālika min anbāi l-ghaybi nūḥīhi ilayka wamā kunta ladayhim idh ajmaʿū amrahum wahum yamkurūna

Marathi १०२. हे परोक्षा (गैब) च्या खबरींपैकी आहे, जे आम्ही तुमच्याकडे वहयी करीत आहोत आणि तुम्ही त्यांच्याजवळ नव्हते जेव्हा त्यांनी आपला बेत पक्का करून घेतला होता आणि ते कपट कारस्थान करू लागले होते.

Verse 103

وَمَآ أَكْثَرُ ٱلنَّاسِ وَلَوْ حَرَصْتَ بِمُؤْمِنِينَ

Transliteration wamā aktharu l-nāsi walaw ḥaraṣta bimu'minīna

Marathi १०३. तुम्ही कितीही इच्छा धरा, पण अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.

Verse 104

وَمَا تَسْـَٔلُهُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۚ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَـٰلَمِينَ

Transliteration wamā tasaluhum ʿalayhi min ajrin in huwa illā dhik'run lil'ʿālamīna

Marathi १०४. आणि तुम्ही त्यांच्याकडून याबद्दल काही मजूरी मागत नाही, हा तर समस्त विश्वाकरिता बोध-उपदेश आहे.

Verse 105

وَكَأَيِّن مِّنْ ءَايَةٍ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ يَمُرُّونَ عَلَيْهَا وَهُمْ عَنْهَا مُعْرِضُونَ

Transliteration waka-ayyin min āyatin fī l-samāwāti wal-arḍi yamurrūna ʿalayhā wahum ʿanhā muʿ'riḍūna

Marathi १०५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत अनेक निशाण्या आहेत, ज्यांच्यापासून हे लोक तोंड फिरवून निघून जातात.

Verse 106

وَمَا يُؤْمِنُ أَكْثَرُهُم بِٱللَّهِ إِلَّا وَهُم مُّشْرِكُونَ

Transliteration wamā yu'minu aktharuhum bil-lahi illā wahum mush'rikūna

Marathi १०६. आणि त्यांच्यापैकी बहुतेक लोक अल्लाहवर ईमान राखत असतानाही शिर्क करणारे आहेत.१

Verse 107

أَفَأَمِنُوٓا۟ أَن تَأْتِيَهُمْ غَـٰشِيَةٌ مِّنْ عَذَابِ ٱللَّهِ أَوْ تَأْتِيَهُمُ ٱلسَّاعَةُ بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ

Transliteration afa-aminū an tatiyahum ghāshiyatun min ʿadhābi l-lahi aw tatiyahumu l-sāʿatu baghtatan wahum lā yashʿurūna

Marathi १०७. काय ते या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की त्यांच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा-यातनांपैकी एखादी सर्वसामान्य शिक्षा यावी किंवा त्यांच्यावर अचानक कयामत येऊन कोसळावी आणि ते गाफील असावेत.

Verse 108

قُلْ هَـٰذِهِۦ سَبِيلِىٓ أَدْعُوٓا۟ إِلَى ٱللَّهِ ۚ عَلَىٰ بَصِيرَةٍ أَنَا۠ وَمَنِ ٱتَّبَعَنِى ۖ وَسُبْحَـٰنَ ٱللَّهِ وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ

Transliteration qul hādhihi sabīlī adʿū ilā l-lahi ʿalā baṣīratin anā wamani ittabaʿanī wasub'ḥāna l-lahi wamā anā mina l-mush'rikīna

Marathi १०८. (तुम्ही) सांगा, माझा हाच मार्ग आहे. मी आणि माझे अनुयायी अल्लाहकडे बोलावित आहेत पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह १ आणि अल्लाह पवित्र आहे आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.

Verse 109

وَمَآ أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ إِلَّا رِجَالًا نُّوحِىٓ إِلَيْهِم مِّنْ أَهْلِ ٱلْقُرَىٰٓ ۗ أَفَلَمْ يَسِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَيَنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۗ وَلَدَارُ ٱلْـَٔاخِرَةِ خَيْرٌ لِّلَّذِينَ ٱتَّقَوْا۟ ۗ أَفَلَا تَعْقِلُونَ

Transliteration wamā arsalnā min qablika illā rijālan nūḥī ilayhim min ahli l-qurā afalam yasīrū fī l-arḍi fayanẓurū kayfa kāna ʿāqibatu alladhīna min qablihim waladāru l-ākhirati khayrun lilladhīna ittaqaw afalā taʿqilūna

Marathi १०९. आणि तुमच्यापूर्वी आम्ही वस्तीवाल्यांमध्ये जेवढेदेखील पैगंबर पाठविले ते सर्व पुरुषच होते, ज्यांच्याकडे आम्ही वहयी (प्रकाशना) उतरवित राहिली काय धरतीवर या लोकांनी हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा कसा परिणाम (अंत) झाला? निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्या व त्याचा आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्या लोकांकरिता आखिरतचे घर फार उत्तम आहे. काय तरीही तुम्ही ध्यानी घेत नाही?

Verse 110

حَتَّىٰٓ إِذَا ٱسْتَيْـَٔسَ ٱلرُّسُلُ وَظَنُّوٓا۟ أَنَّهُمْ قَدْ كُذِبُوا۟ جَآءَهُمْ نَصْرُنَا فَنُجِّىَ مَن نَّشَآءُ ۖ وَلَا يُرَدُّ بَأْسُنَا عَنِ ٱلْقَوْمِ ٱلْمُجْرِمِينَ

Transliteration ḥattā idhā is'tayasa l-rusulu waẓannū annahum qad kudhibū jāahum naṣrunā fanujjiya man nashāu walā yuraddu basunā ʿani l-qawmi l-muj'rimīna

Marathi ११०. येथेपर्यंत की जेव्हा पैगंबर निराश होऊ लागले आणि उम्मत (जनसमुदाया) चे लोक असे समजू लागले की त्यांना खोटे सांगितले गेले, त्वरित त्यांच्यापर्यंत आमची मदत येऊन पोहोचली. आम्ही ज्याला इच्छिले त्याला सुटका प्रदान केली. खरी गोष्ट अशी की आमचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टाळला जात नाही.

Verse 111

لَقَدْ كَانَ فِى قَصَصِهِمْ عِبْرَةٌ لِّأُو۟لِى ٱلْأَلْبَـٰبِ ۗ مَا كَانَ حَدِيثًا يُفْتَرَىٰ وَلَـٰكِن تَصْدِيقَ ٱلَّذِى بَيْنَ يَدَيْهِ وَتَفْصِيلَ كُلِّ شَىْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ

Transliteration laqad kāna fī qaṣaṣihim ʿib'ratun li-ulī l-albābi mā kāna ḥadīthan yuf'tarā walākin taṣdīqa alladhī bayna yadayhi watafṣīla kulli shayin wahudan waraḥmatan liqawmin yu'minūna

Marathi १११. यांच्या कहाण्यां (वृत्तांता) मध्ये बुद्धिमानांकरिता निश्चितच बोध आणि तंबी आहे. हा कुरआन काही खोट्या रचलेल्या गोष्टी नाही, किंबहुना हे सत्य-समर्थन आहे त्या ग्रंथांचे जे याच्या पूर्वीचे आहेत, आणि प्रत्येक गोष्टीचे सविस्तर वर्णन आणि मार्गदर्शन व दया-कृपा आहे ईमान राखणाऱ्यांकरिता.

Read Surah Yusuf in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.