Surah Taha in Marathi: translation and audio
Surah 20 · طه · Ta-Ha · 135 verses
Surah Taha verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Taha word by word in English.
Verse 1
طه
Transliteration tta-ha
Marathi १. ता.हा.
Verse 2
مَآ أَنزَلْنَا عَلَيْكَ ٱلْقُرْءَانَ لِتَشْقَىٰٓ
Transliteration mā anzalnā ʿalayka l-qur'āna litashqā
Marathi २. आम्ही या कुरआनाचे अवतरण तुमच्यावर अशासाठी केले नाही की तुम्ही कष्ट- यातनाग्रस्त व्हावे.
Verse 3
إِلَّا تَذْكِرَةً لِّمَن يَخْشَىٰ
Transliteration illā tadhkiratan liman yakhshā
Marathi ३. किंबहुना त्याच्या बोध- उपदेशाकरिता, जो अल्लाहचे भय राखतो.
Verse 4
تَنزِيلًا مِّمَّنْ خَلَقَ ٱلْأَرْضَ وَٱلسَّمَـٰوَٰتِ ٱلْعُلَى
Transliteration tanzīlan mimman khalaqa l-arḍa wal-samāwāti l-ʿulā
Marathi ४. याचे अवरण त्याच्याचतर्फे आहे, ज्याने जमिनीला आणि उंच उंच आकाशांना निर्माण केले आहे.
Verse 5
ٱلرَّحْمَـٰنُ عَلَى ٱلْعَرْشِ ٱسْتَوَىٰ
Transliteration al-raḥmānu ʿalā l-ʿarshi is'tawā
Marathi ५. जो अतिशय दयावान आहे, अर्श (ईशसिंहासना) वर विराजमान आहे.
Verse 6
لَهُۥ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا وَمَا تَحْتَ ٱلثَّرَىٰ
Transliteration lahu mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi wamā baynahumā wamā taḥta l-tharā
Marathi ६. आकाशांमध्ये आणि धरतीवर आणि यांच्या दरम्यान आणि जमिनीच्या पातळीखाली प्रत्येक ठिकाणी त्याची राज्यसत्ता आहे. (अर्थात या सर्वांचा एकमेव बादशहा तोच आहे.)
Verse 7
وَإِن تَجْهَرْ بِٱلْقَوْلِ فَإِنَّهُۥ يَعْلَمُ ٱلسِّرَّ وَأَخْفَى
Transliteration wa-in tajhar bil-qawli fa-innahu yaʿlamu l-sira wa-akhfā
Marathi ७. तुम्ही आपले म्हणणे उंच स्वरात सांगा किंवा हळू आवाजात, तो तर लपलेली आणि गुप्त स्वरुपाची गोष्टही चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 8
ٱللَّهُ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۖ لَهُ ٱلْأَسْمَآءُ ٱلْحُسْنَىٰ
Transliteration al-lahu lā ilāha illā huwa lahu l-asmāu l-ḥus'nā
Marathi ८. तोच अल्लाह होय, ज्याच्याखेरीज कोणीही सच्चा (खराखुरा) उपास्य नाही. सर्व उत्तमोत्तम नावे त्याचीच आहेत.
Verse 9
وَهَلْ أَتَىٰكَ حَدِيثُ مُوسَىٰٓ
Transliteration wahal atāka ḥadīthu mūsā
Marathi ९. तुम्हाला मूसाचा वृत्तांत तर माहीतच आहे.
Verse 10
إِذْ رَءَا نَارًا فَقَالَ لِأَهْلِهِ ٱمْكُثُوٓا۟ إِنِّىٓ ءَانَسْتُ نَارًا لَّعَلِّىٓ ءَاتِيكُم مِّنْهَا بِقَبَسٍ أَوْ أَجِدُ عَلَى ٱلنَّارِ هُدًى
Transliteration idh raā nāran faqāla li-ahlihi um'kuthū innī ānastu nāran laʿallī ātīkum min'hā biqabasin aw ajidu ʿalā l-nāri hudan
Marathi १०. जेव्हा त्यांनी आग पाहून आपल्या कुटुंबीयांना म्हटले की थोडा वेळ इथे थांबा, मला आग दिसत आहे. खूप शक्य आहे की मी त्या आगीचा निखारा तुमच्याजवळ आणावा किंवा आगीजवळून उचित रस्त्याची बातमी प्राप्त करून घ्यावी.
Verse 11
فَلَمَّآ أَتَىٰهَا نُودِىَ يَـٰمُوسَىٰٓ
Transliteration falammā atāhā nūdiya yāmūsā
Marathi ११. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा आवाज ऐकू आला की, हे मूसा!
Verse 12
إِنِّىٓ أَنَا۠ رَبُّكَ فَٱخْلَعْ نَعْلَيْكَ ۖ إِنَّكَ بِٱلْوَادِ ٱلْمُقَدَّسِ طُوًى
Transliteration innī anā rabbuka fa-ikh'laʿ naʿlayka innaka bil-wādi l-muqadasi ṭuwan
Marathi १२. निःसंशय, मीच तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. तुम्ही आपल्या पायातले जोडे उतरवा कारण तुम्ही ‘तोवा’च्या पवित्र मैदानात आहात.
Verse 13
وَأَنَا ٱخْتَرْتُكَ فَٱسْتَمِعْ لِمَا يُوحَىٰٓ
Transliteration wa-anā ikh'tartuka fa-is'tamiʿ limā yūḥā
Marathi १३. आणि मी तुमची निवड केली आहे. आता जी वहयी (प्रकाशना) केली जाईल तिला लक्षपूर्वक ऐका.
Verse 14
إِنَّنِىٓ أَنَا ٱللَّهُ لَآ إِلَـٰهَ إِلَّآ أَنَا۠ فَٱعْبُدْنِى وَأَقِمِ ٱلصَّلَوٰةَ لِذِكْرِىٓ
Transliteration innanī anā l-lahu lā ilāha illā anā fa-uʿ'bud'nī wa-aqimi l-ṣalata lidhik'rī
Marathi १४. निःसंशय, मीच अल्लाह आहे. माझ्याखेरीज उपासना करण्यायोग्य दुसरा कोणीही नाही, यास्तव तुम्ही माझीच उपासना करा आणि माझ्या स्मरणार्थ नमाज कायम करा.
Verse 15
إِنَّ ٱلسَّاعَةَ ءَاتِيَةٌ أَكَادُ أُخْفِيهَا لِتُجْزَىٰ كُلُّ نَفْسٍۭ بِمَا تَسْعَىٰ
Transliteration inna l-sāʿata ātiyatun akādu ukh'fīhā lituj'zā kullu nafsin bimā tasʿā
Marathi १५. कयामत हमखास येणार आहे, जिला मी गुप्त ठेवू इच्छितो यासाठी की प्रत्येक माणसाला तो मोबदला प्रदान केला जावा, जो त्याने प्रयत्न केला असेल.
Verse 16
فَلَا يَصُدَّنَّكَ عَنْهَا مَن لَّا يُؤْمِنُ بِهَا وَٱتَّبَعَ هَوَىٰهُ فَتَرْدَىٰ
Transliteration falā yaṣuddannaka ʿanhā man lā yu'minu bihā wa-ittabaʿa hawāhu fatardā
Marathi १६. तेव्हा आता यावर ईमान राखण्यापासून तुम्हाला अशा माणसाने रोखू नये, जो यावर ईमान राखत नसेल आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या मागे धावत असेल, अन्यथा तुम्ही नाश पावाल.
Verse 17
وَمَا تِلْكَ بِيَمِينِكَ يَـٰمُوسَىٰ
Transliteration wamā til'ka biyamīnika yāmūsā
Marathi १७. आणि हे मूसा! तुमच्या उजव्या हातात काय आहे?
Verse 18
قَالَ هِىَ عَصَاىَ أَتَوَكَّؤُا۟ عَلَيْهَا وَأَهُشُّ بِهَا عَلَىٰ غَنَمِى وَلِىَ فِيهَا مَـَٔارِبُ أُخْرَىٰ
Transliteration qāla hiya ʿaṣāya atawakka-u ʿalayhā wa-ahushu bihā ʿalā ghanamī waliya fīhā maāribu ukh'rā
Marathi १८. उत्तर दिले, ही माझी लाठी आहे, जिच्यावर मी टेका (आधार) घेतो आणि जिच्याद्वारे मी आपल्या शेळ्यांकरिता झाडाची पाने खाली पाडून घेतो आणि तिच्यापासून मला दुसरेही अनेक फायदे आहेत.
Verse 19
قَالَ أَلْقِهَا يَـٰمُوسَىٰ
Transliteration qāla alqihā yāmūsā
Marathi १९. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा, तिला (हातातून) खाली टाका.
Verse 20
فَأَلْقَىٰهَا فَإِذَا هِىَ حَيَّةٌ تَسْعَىٰ
Transliteration fa-alqāhā fa-idhā hiya ḥayyatun tasʿā
Marathi २०. तेव्हा खाली टाकताच साप बनून धावू लागली.
Verse 21
قَالَ خُذْهَا وَلَا تَخَفْ ۖ سَنُعِيدُهَا سِيرَتَهَا ٱلْأُولَىٰ
Transliteration qāla khudh'hā walā takhaf sanuʿīduhā sīratahā l-ūlā
Marathi २१. फर्माविले निर्भय होऊन तिला धरा, आम्ही तिला त्याच पहिल्या अवस्थेत पुन्हा आणू.
Verse 22
وَٱضْمُمْ يَدَكَ إِلَىٰ جَنَاحِكَ تَخْرُجْ بَيْضَآءَ مِنْ غَيْرِ سُوٓءٍ ءَايَةً أُخْرَىٰ
Transliteration wa-uḍ'mum yadaka ilā janāḥika takhruj bayḍāa min ghayri sūin āyatan ukh'rā
Marathi २२. आणि आपला हात आपल्या काखेत (बगलेत) घाला, तेव्हा तो सफेद, प्रकाशमान होताना बाहेर निघेल, मात्र कसल्याही व्यंग-दोष आणि आजाराविना. हा दुसरा ईश-चमत्कार आहे.
Verse 23
لِنُرِيَكَ مِنْ ءَايَـٰتِنَا ٱلْكُبْرَى
Transliteration linuriyaka min āyātinā l-kub'rā
Marathi २३. हे अशासाठी की आम्ही तुम्हाला आपल्या मोठमोठ्या निशाण्या दाखवू इच्छितो.
Verse 24
ٱذْهَبْ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُۥ طَغَىٰ
Transliteration idh'hab ilā fir'ʿawna innahu ṭaghā
Marathi २४. आता, तुम्ही फिरऔनकडे जा, त्याने मोठा उत्पात माजविला आहे.
Verse 25
قَالَ رَبِّ ٱشْرَحْ لِى صَدْرِى
Transliteration qāla rabbi ish'raḥ lī ṣadrī
Marathi २५. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझी छाती माझ्याकरिता उघड (मोकळी) कर.
Verse 26
وَيَسِّرْ لِىٓ أَمْرِى
Transliteration wayassir lī amrī
Marathi २६. आणि माझे कार्य माझ्यासाठी सोपे कर.
Verse 27
وَٱحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِى
Transliteration wa-uḥ'lul ʿuq'datan min lisānī
Marathi २७. आणि माझ्या जीभेची गाठ सोडव.
Verse 28
يَفْقَهُوا۟ قَوْلِى
Transliteration yafqahū qawlī
Marathi २८. यासाठी की लोकांनी माझे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकावे.
Verse 29
وَٱجْعَل لِّى وَزِيرًا مِّنْ أَهْلِى
Transliteration wa-ij'ʿal lī wazīran min ahlī
Marathi २९. आणि माझा वजीर माझ्या कुटुंबीयांपैकी बनव.
Verse 30
هَـٰرُونَ أَخِى
Transliteration hārūna akhī
Marathi ३०. (अर्थात) माझा भाऊ हारूनला.
Verse 31
ٱشْدُدْ بِهِۦٓ أَزْرِى
Transliteration ush'dud bihi azrī
Marathi ३१. तू त्याच्याद्वारे माझी कंबर मजबूत कर.
Verse 32
وَأَشْرِكْهُ فِىٓ أَمْرِى
Transliteration wa-ashrik'hu fī amrī
Marathi ३२. आणि त्याला माझ्या कार्यात सहाय्यक बनव.
Verse 33
كَىْ نُسَبِّحَكَ كَثِيرًا
Transliteration kay nusabbiḥaka kathīran
Marathi ३३. यासाठी की आम्ही दोघांनी तुझी खूप खूप स्तुती-प्रशंसा वर्णन करावी.
Verse 34
وَنَذْكُرَكَ كَثِيرًا
Transliteration wanadhkuraka kathīran
Marathi ३४. आणि तुझे अधिकाधिक स्मरण करावे.
Verse 35
إِنَّكَ كُنتَ بِنَا بَصِيرًا
Transliteration innaka kunta binā baṣīran
Marathi ३५. निःसंशय, तू आमची चांगल्या प्रकारे देखभाल करणारा आहेस.
Verse 36
قَالَ قَدْ أُوتِيتَ سُؤْلَكَ يَـٰمُوسَىٰ
Transliteration qāla qad ūtīta su'laka yāmūsā
Marathi ३६. (अल्लाहने) फर्माविले, हे मूसा! तुमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या गेल्या.
Verse 37
وَلَقَدْ مَنَنَّا عَلَيْكَ مَرَّةً أُخْرَىٰٓ
Transliteration walaqad manannā ʿalayka marratan ukh'rā
Marathi ३७. आणि आम्ही तर तुमच्यावर आणखी एकदा याहून मोठा उपकार केला आहे.
Verse 38
إِذْ أَوْحَيْنَآ إِلَىٰٓ أُمِّكَ مَا يُوحَىٰٓ
Transliteration idh awḥaynā ilā ummika mā yūḥā
Marathi ३८. जेव्हा आम्ही तुमच्या मातेच्या मनात ते अवतरित केले, ज्याचे वर्णन या वेळी केले जाते आहे.
Verse 39
أَنِ ٱقْذِفِيهِ فِى ٱلتَّابُوتِ فَٱقْذِفِيهِ فِى ٱلْيَمِّ فَلْيُلْقِهِ ٱلْيَمُّ بِٱلسَّاحِلِ يَأْخُذْهُ عَدُوٌّ لِّى وَعَدُوٌّ لَّهُۥ ۚ وَأَلْقَيْتُ عَلَيْكَ مَحَبَّةً مِّنِّى وَلِتُصْنَعَ عَلَىٰ عَيْنِىٓ
Transliteration ani iq'dhifīhi fī l-tābūti fa-iq'dhifīhi fī l-yami falyul'qihi l-yamu bil-sāḥili yakhudh'hu ʿaduwwun lī waʿaduwwun lahu wa-alqaytu ʿalayka maḥabbatan minnī walituṣ'naʿa ʿalā ʿaynī
Marathi ३९. की तुम्ही, या (बाळा) ला लाकडी पेटीत ठेवून तिला बंद करून नदीत सोडून द्या, मग नदी त्या पेटीला किनाऱ्यावर नेईल आणि माझा व त्याचा स्वतःचा शत्रू तिला घेईल आणि मी आपल्यातर्फे विशेष प्रेम आणि पसंतीचा तुमच्यावर वर्षाव केला यासाठी की तुमचे पालनपोषण माझ्या डोळ्यादेखत केले जावे.१
Verse 40
إِذْ تَمْشِىٓ أُخْتُكَ فَتَقُولُ هَلْ أَدُلُّكُمْ عَلَىٰ مَن يَكْفُلُهُۥ ۖ فَرَجَعْنَـٰكَ إِلَىٰٓ أُمِّكَ كَىْ تَقَرَّ عَيْنُهَا وَلَا تَحْزَنَ ۚ وَقَتَلْتَ نَفْسًا فَنَجَّيْنَـٰكَ مِنَ ٱلْغَمِّ وَفَتَنَّـٰكَ فُتُونًا ۚ فَلَبِثْتَ سِنِينَ فِىٓ أَهْلِ مَدْيَنَ ثُمَّ جِئْتَ عَلَىٰ قَدَرٍ يَـٰمُوسَىٰ
Transliteration idh tamshī ukh'tuka fataqūlu hal adullukum ʿalā man yakfuluhu farajaʿnāka ilā ummika kay taqarra ʿaynuhā walā taḥzana waqatalta nafsan fanajjaynāka mina l-ghami wafatannāka futūnan falabith'ta sinīna fī ahli madyana thumma ji'ta ʿalā qadarin yāmūsā
Marathi ४०. (स्मरण करा) जेव्हा तुमची बहीण जात होती आणि सांगत होती की, तुम्ही म्हणत असाल तर मी त्याचा पत्ता सांगू जो या (बाळा) ची देखरेख ठेवणारा बनू शकेल. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला पुन्हा तुमच्या मातेजवळ पाठविले, यासाठी की तिचे नेत्र शितल राहावेत आणि ती दुःखी होऊ नये आणि तुम्ही एका माणसाचा वध केला होता, त्या उपरान्त आम्ही तुम्हाला दुःखापासून वाचविले, अर्थात आम्ही तुमची चांगल्या प्रकारे कसोटी घेतली, मग तुम्ही अनेक वर्षापर्यंत मदयनच्या लोकांमध्ये निवास केला, मग अल्लाहच्या लिखित भाग्यानुसार हे मूसा तुम्ही आले.
Verse 41
وَٱصْطَنَعْتُكَ لِنَفْسِى
Transliteration wa-iṣ'ṭanaʿtuka linafsī
Marathi ४१. आणि मी तुम्हाला विशेषतः आपल्यासाठी पसंत केले.
Verse 42
ٱذْهَبْ أَنتَ وَأَخُوكَ بِـَٔايَـٰتِى وَلَا تَنِيَا فِى ذِكْرِى
Transliteration idh'hab anta wa-akhūka biāyātī walā taniyā fī dhik'rī
Marathi ४२. आता तुम्ही आपल्या भावासह माझ्या निशाण्यांसोबत घेऊन जा, खबरदार! तुम्ही दोघेही माझे स्मरण करण्यात सुस्ती करू नका.
Verse 43
ٱذْهَبَآ إِلَىٰ فِرْعَوْنَ إِنَّهُۥ طَغَىٰ
Transliteration idh'habā ilā fir'ʿawna innahu ṭaghā
Marathi ४३. तुम्ही दोघे फिरऔनच्या जवळ जा. त्याने मोठा विद्रोह केला आहे.
Verse 44
فَقُولَا لَهُۥ قَوْلًا لَّيِّنًا لَّعَلَّهُۥ يَتَذَكَّرُ أَوْ يَخْشَىٰ
Transliteration faqūlā lahu qawlan layyinan laʿallahu yatadhakkaru aw yakhshā
Marathi ४४. त्याला नरमीने समाजावून सांगा, कदाचित त्याने ध्यानी घ्यावे किंवा (अल्लाहचे) भय बाळगावे.
Verse 45
قَالَا رَبَّنَآ إِنَّنَا نَخَافُ أَن يَفْرُطَ عَلَيْنَآ أَوْ أَن يَطْغَىٰ
Transliteration qālā rabbanā innanā nakhāfu an yafruṭa ʿalaynā aw an yaṭghā
Marathi ४५. दोन्ही म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला भय वाटते की कदाचित फिरऔनने आमच्यावर एखादा अत्याचार न करावा, किंवा आपल्या बंडखोरीत आणखी वाढावा.
Verse 46
قَالَ لَا تَخَافَآ ۖ إِنَّنِى مَعَكُمَآ أَسْمَعُ وَأَرَىٰ
Transliteration qāla lā takhāfā innanī maʿakumā asmaʿu wa-arā
Marathi ४६. उत्तर मिळाले की तुम्ही कधीही भय राखू नका, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे आणि ऐकत व पाहत राहीन.
Verse 47
فَأْتِيَاهُ فَقُولَآ إِنَّا رَسُولَا رَبِّكَ فَأَرْسِلْ مَعَنَا بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ وَلَا تُعَذِّبْهُمْ ۖ قَدْ جِئْنَـٰكَ بِـَٔايَةٍ مِّن رَّبِّكَ ۖ وَٱلسَّلَـٰمُ عَلَىٰ مَنِ ٱتَّبَعَ ٱلْهُدَىٰٓ
Transliteration fatiyāhu faqūlā innā rasūlā rabbika fa-arsil maʿanā banī is'rāīla walā tuʿadhib'hum qad ji'nāka biāyatin min rabbika wal-salāmu ʿalā mani ittabaʿa l-hudā
Marathi ४७. तुम्ही त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगा की आम्ही तुझ्या पानलकर्त्याचे पैगंबर (ईशदूत) आहोत. तू आमच्या सोबत इस्राईलच्या संततीला पाठव, त्यांच्या शिक्षा-यातना संपव. आम्ही तर तुझ्याजवळ, तुझ्या पालनकर्त्यातर्फे निशाण्या घेऊन आलो आहोत. शांती सलामती फक्त त्याच्याचकरिता आहे, जो मार्गदर्शनाचा मजबूतपणे अंगिकार करेल.
Verse 48
إِنَّا قَدْ أُوحِىَ إِلَيْنَآ أَنَّ ٱلْعَذَابَ عَلَىٰ مَن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ
Transliteration innā qad ūḥiya ilaynā anna l-ʿadhāba ʿalā man kadhaba watawallā
Marathi ४८. आमच्याकडे वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जो खोटे ठरविल. आणि तोंड फिरविल, त्याच्याकरिता अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
Verse 49
قَالَ فَمَن رَّبُّكُمَا يَـٰمُوسَىٰ
Transliteration qāla faman rabbukumā yāmūsā
Marathi ४९. (फिरऔनने) विचारले की हे मूसा! तुम्हा दोघांचा पालनकर्ता कोण आहे?
Verse 50
قَالَ رَبُّنَا ٱلَّذِىٓ أَعْطَىٰ كُلَّ شَىْءٍ خَلْقَهُۥ ثُمَّ هَدَىٰ
Transliteration qāla rabbunā alladhī aʿṭā kulla shayin khalqahu thumma hadā
Marathi ५०. उत्तर दिले की आमचा पालनकर्ता तो आहे, ज्याने प्रत्येकाला त्याचे खास रूप प्रदान केले, मग मार्गदर्शनही दिले.
Verse 51
قَالَ فَمَا بَالُ ٱلْقُرُونِ ٱلْأُولَىٰ
Transliteration qāla famā bālu l-qurūni l-ūlā
Marathi ५१. फिरऔन म्हणाला, (बरे हे सांगा) पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय अवस्था झाली?
Verse 52
قَالَ عِلْمُهَا عِندَ رَبِّى فِى كِتَـٰبٍ ۖ لَّا يَضِلُّ رَبِّى وَلَا يَنسَى
Transliteration qāla ʿil'muhā ʿinda rabbī fī kitābin lā yaḍillu rabbī walā yansā
Marathi ५२. उत्तर दिले, त्यांचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळ ग्रंथात आहे. माझा पालनकर्ताना चूक करतो, ना विसरतो.
Verse 53
ٱلَّذِى جَعَلَ لَكُمُ ٱلْأَرْضَ مَهْدًا وَسَلَكَ لَكُمْ فِيهَا سُبُلًا وَأَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَخْرَجْنَا بِهِۦٓ أَزْوَٰجًا مِّن نَّبَاتٍ شَتَّىٰ
Transliteration alladhī jaʿala lakumu l-arḍa mahdan wasalaka lakum fīhā subulan wa-anzala mina l-samāi māan fa-akhrajnā bihi azwājan min nabātin shattā
Marathi ५३. त्यानेच तुमच्यासाठी जमिनीला अंथरुण (बिछाना) बनविले आहे आणि त्यात तुमच्या चालण्यासाठी रस्ते बनविले आहेत, आणि आकाशातून पर्जन्यवृष्टी देखील तोच करतो, मग त्या पावसाद्वारे अनेक प्रकारची पैदावारही आम्ही निर्माण करतो.
Verse 54
كُلُوا۟ وَٱرْعَوْا۟ أَنْعَـٰمَكُمْ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّأُو۟لِى ٱلنُّهَىٰ
Transliteration kulū wa-ir'ʿaw anʿāmakum inna fī dhālika laāyātin li-ulī l-nuhā
Marathi ५४. तुम्ही स्वतः खा आणि आपल्या जनावरांनाही चारा. निःसंशय यात बुद्धिमानांकरिता अनेक निशाण्या आहेत.
Verse 55
۞ مِنْهَا خَلَقْنَـٰكُمْ وَفِيهَا نُعِيدُكُمْ وَمِنْهَا نُخْرِجُكُمْ تَارَةً أُخْرَىٰ
Transliteration min'hā khalaqnākum wafīhā nuʿīdukum wamin'hā nukh'rijukum tāratan ukh'rā
Marathi ५५. त्याच धरतीमधून आम्ही तुम्हाला निर्माण केले आणि तिच्यातच पुन्हा परत पाठवू आणि तिच्यातूनच तुम्हा सर्वांना बाहेर काढून उभे करू.
Verse 56
وَلَقَدْ أَرَيْنَـٰهُ ءَايَـٰتِنَا كُلَّهَا فَكَذَّبَ وَأَبَىٰ
Transliteration walaqad araynāhu āyātinā kullahā fakadhaba wa-abā
Marathi ५६. आणि आम्ही त्याला सर्व निशाण्या दाखविल्या, परंतु तरीही त्याने खोटे ठरविले आणि इन्कार केला.
Verse 57
قَالَ أَجِئْتَنَا لِتُخْرِجَنَا مِنْ أَرْضِنَا بِسِحْرِكَ يَـٰمُوسَىٰ
Transliteration qāla aji'tanā litukh'rijanā min arḍinā bisiḥ'rika yāmūsā
Marathi ५७. तो म्हणाला, हे मूसा! काय तू आमच्याजवळ अशासाठी आला आहे की आम्हाला आपल्या जादूच्या सामर्थ्याने आमच्या देशातून बाहेर काढावे.
Verse 58
فَلَنَأْتِيَنَّكَ بِسِحْرٍ مِّثْلِهِۦ فَٱجْعَلْ بَيْنَنَا وَبَيْنَكَ مَوْعِدًا لَّا نُخْلِفُهُۥ نَحْنُ وَلَآ أَنتَ مَكَانًا سُوًى
Transliteration falanatiyannaka bisiḥ'rin mith'lihi fa-ij'ʿal baynanā wabaynaka mawʿidan lā nukh'lifuhu naḥnu walā anta makānan suwan
Marathi ५८. ठीक आहे. मग आम्हीही तुमचा सामना करण्यासाठी अशीच जादू जरूर आणू. तेव्हा तुम्ही आमच्या आणि आपल्या दरम्यान वायद्याची वेळ निश्चित ठरवून घ्या की ना आम्ही त्याविरूद्ध करावे आणि ना तुम्ही. मोकळ्या मैदानात ही स्पर्धा व्हावी.
Verse 59
قَالَ مَوْعِدُكُمْ يَوْمُ ٱلزِّينَةِ وَأَن يُحْشَرَ ٱلنَّاسُ ضُحًى
Transliteration qāla mawʿidukum yawmu l-zīnati wa-an yuḥ'shara l-nāsu ḍuḥan
Marathi ५९. (मूसा यांनी) उत्तर दिले, शोभा सजावट आणि समारंभाच्या दिवसाचा वायदा आहे, आणि हे की लोकांनी दिवस चढताच जमा व्हावे.
Verse 60
فَتَوَلَّىٰ فِرْعَوْنُ فَجَمَعَ كَيْدَهُۥ ثُمَّ أَتَىٰ
Transliteration fatawallā fir'ʿawnu fajamaʿa kaydahu thumma atā
Marathi ६०. नंतर फिरऔन परतला आणि त्याने आपले डावपेच गोळा केले मग आला.
Verse 61
قَالَ لَهُم مُّوسَىٰ وَيْلَكُمْ لَا تَفْتَرُوا۟ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا فَيُسْحِتَكُم بِعَذَابٍ ۖ وَقَدْ خَابَ مَنِ ٱفْتَرَىٰ
Transliteration qāla lahum mūsā waylakum lā taftarū ʿalā l-lahi kadhiban fayus'ḥitakum biʿadhābin waqad khāba mani if'tarā
Marathi ६१. मूसा त्याला म्हणाले की तुमचा नाश होवो, अल्लाहवर खोटे नाटे आणि लांछन लावू नका की (ज्यामुळे) त्याने तुमचा शिक्षा-यातनेद्वारे सर्वनाश करून टाकावा. लक्षात ठेवा! ज्याने असत्य रचले, तो कधीही सफल होणार नाही.
Verse 62
فَتَنَـٰزَعُوٓا۟ أَمْرَهُم بَيْنَهُمْ وَأَسَرُّوا۟ ٱلنَّجْوَىٰ
Transliteration fatanāzaʿū amrahum baynahum wa-asarrū l-najwā
Marathi ६२. मग हे लोक आपसात सल्लामसलत करण्यात एकमेकांविरूद्ध मताचे झाले आणि लपून छपून कानगोष्टी करू लागले.
Verse 63
قَالُوٓا۟ إِنْ هَـٰذَٰنِ لَسَـٰحِرَٰنِ يُرِيدَانِ أَن يُخْرِجَاكُم مِّنْ أَرْضِكُم بِسِحْرِهِمَا وَيَذْهَبَا بِطَرِيقَتِكُمُ ٱلْمُثْلَىٰ
Transliteration qālū in hādhāni lasāḥirāni yurīdāni an yukh'rijākum min arḍikum bisiḥ'rihimā wayadhhabā biṭarīqatikumu l-muth'lā
Marathi ६३. म्हणाले, हे दोघे फक्त जादूगार आहेत आणि यांचा पक्का इरादा आहे की आपल्या जादूच्या शक्तीने तुम्हाला तुमच्या देशाबाहेर घालवावे आणि तुमच्या उत्तम धर्माचा सत्यानाश करून टाकावा.
Verse 64
فَأَجْمِعُوا۟ كَيْدَكُمْ ثُمَّ ٱئْتُوا۟ صَفًّا ۚ وَقَدْ أَفْلَحَ ٱلْيَوْمَ مَنِ ٱسْتَعْلَىٰ
Transliteration fa-ajmiʿū kaydakum thumma i'tū ṣaffan waqad aflaḥa l-yawma mani is'taʿlā
Marathi ६४. तेव्हा तुम्ही देखील आपले कोणतेही डावपेच बाकी ठेवू नका, मग पंक्तीबद्ध होऊन रांगेत या, आज जो वर्चस्वशाली होईल तोच बाजी जिंकेल.
Verse 65
قَالُوا۟ يَـٰمُوسَىٰٓ إِمَّآ أَن تُلْقِىَ وَإِمَّآ أَن نَّكُونَ أَوَّلَ مَنْ أَلْقَىٰ
Transliteration qālū yāmūsā immā an tul'qiya wa-immā an nakūna awwala man alqā
Marathi ६५. ते म्हणू लागले की हे मूसा! एक तर तुम्ही आधी टाका किंवा आम्ही प्रथम टाकणारे बनावे.
Verse 66
قَالَ بَلْ أَلْقُوا۟ ۖ فَإِذَا حِبَالُهُمْ وَعِصِيُّهُمْ يُخَيَّلُ إِلَيْهِ مِن سِحْرِهِمْ أَنَّهَا تَسْعَىٰ
Transliteration qāla bal alqū fa-idhā ḥibāluhum waʿiṣiyyuhum yukhayyalu ilayhi min siḥ'rihim annahā tasʿā
Marathi ६६. उत्तर दिले, नाही तुम्हीच अगोदर टाका. आता तर मूसा यांना असे वाटू लागले की त्यांच्या त्या दोऱ्या आणि काठ्या त्यांच्या जादूच्या शक्तीने धावत जात आहेत.
Verse 67
فَأَوْجَسَ فِى نَفْسِهِۦ خِيفَةً مُّوسَىٰ
Transliteration fa-awjasa fī nafsihi khīfatan mūsā
Marathi ६७. अशाने मूसा मनातल्या मनात भिऊ लागले.
Verse 68
قُلْنَا لَا تَخَفْ إِنَّكَ أَنتَ ٱلْأَعْلَىٰ
Transliteration qul'nā lā takhaf innaka anta l-aʿlā
Marathi ६८. आम्ही फर्माविले, अजिबात भिऊ नका. निःसंशय तुम्हीच वर्चस्वशाली आणि उच्च राहाल.
Verse 69
وَأَلْقِ مَا فِى يَمِينِكَ تَلْقَفْ مَا صَنَعُوٓا۟ ۖ إِنَّمَا صَنَعُوا۟ كَيْدُ سَـٰحِرٍ ۖ وَلَا يُفْلِحُ ٱلسَّاحِرُ حَيْثُ أَتَىٰ
Transliteration wa-alqi mā fī yamīnika talqaf mā ṣanaʿū innamā ṣanaʿū kaydu sāḥirin walā yuf'liḥu l-sāḥiru ḥaythu atā
Marathi ६९. आणि तुमच्या उजव्या हातात जे आहे ते खाली टाका की त्यांच्या कारागिरीला याने गिळून टाकावे त्यांनी जे काही बनविले आहे ते केवळ जादूगारांचे कला कौशल्य आहे आणि जादूगार कोठूनही येवो, सफल होत नाही.
Verse 70
فَأُلْقِىَ ٱلسَّحَرَةُ سُجَّدًا قَالُوٓا۟ ءَامَنَّا بِرَبِّ هَـٰرُونَ وَمُوسَىٰ
Transliteration fa-ul'qiya l-saḥaratu sujjadan qālū āmannā birabbi hārūna wamūsā
Marathi ७०. आता तर सर्वच्या सर्व जादूगार सजद्यात पडले आणि अकस्मात उद्गारले की आम्ही तर हारुन आणि मूसाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले.
Verse 71
قَالَ ءَامَنتُمْ لَهُۥ قَبْلَ أَنْ ءَاذَنَ لَكُمْ ۖ إِنَّهُۥ لَكَبِيرُكُمُ ٱلَّذِى عَلَّمَكُمُ ٱلسِّحْرَ ۖ فَلَأُقَطِّعَنَّ أَيْدِيَكُمْ وَأَرْجُلَكُم مِّنْ خِلَـٰفٍ وَلَأُصَلِّبَنَّكُمْ فِى جُذُوعِ ٱلنَّخْلِ وَلَتَعْلَمُنَّ أَيُّنَآ أَشَدُّ عَذَابًا وَأَبْقَىٰ
Transliteration qāla āmantum lahu qabla an ādhana lakum innahu lakabīrukumu alladhī ʿallamakumu l-siḥ'ra fala-uqaṭṭiʿanna aydiyakum wa-arjulakum min khilāfin wala-uṣallibannakum fī judhūʿi l-nakhli walataʿlamunna ayyunā ashaddu ʿadhāban wa-abqā
Marathi ७१. (फिरऔन) म्हणाला, काय माझा आदेश होण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले? निःसंशय हाच तुमचा तो मोठा गुरू आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकविली आहे (ऐका) मी तुमचे हात पाय विरूद्ध दिशेने कापवून तुम्हा सर्वांना खजूरीच्या फांद्यांवर फासावर लटकविन आणि तुम्हाला पूर्णतः माहीत पडेल की आमच्यापैकी कोणाची सजा अधिक सक्त आणि जास्त काळ टिकणारी आहे.
Verse 72
قَالُوا۟ لَن نُّؤْثِرَكَ عَلَىٰ مَا جَآءَنَا مِنَ ٱلْبَيِّنَـٰتِ وَٱلَّذِى فَطَرَنَا ۖ فَٱقْضِ مَآ أَنتَ قَاضٍ ۖ إِنَّمَا تَقْضِى هَـٰذِهِ ٱلْحَيَوٰةَ ٱلدُّنْيَآ
Transliteration qālū lan nu'thiraka ʿalā mā jāanā mina l-bayināti wa-alladhī faṭaranā fa-iq'ḍi mā anta qāḍin innamā taqḍī hādhihi l-ḥayata l-dun'yā
Marathi ७२. (त्यांनी) उत्तर दिले की, असंभव आहे की आम्ही तुम्हाला प्राधान्य द्यावे त्या प्रमाणांवर, जी आमच्या समोर येऊन पोहोचलीत आणि त्या अल्लाहवर, ज्याने आम्हाला निर्माण केले. आता, तू वाटेल ते कर. तू जो काही आदेश चालवू शकतो तो या जगाच्या जीवनातच आहे.
Verse 73
إِنَّآ ءَامَنَّا بِرَبِّنَا لِيَغْفِرَ لَنَا خَطَـٰيَـٰنَا وَمَآ أَكْرَهْتَنَا عَلَيْهِ مِنَ ٱلسِّحْرِ ۗ وَٱللَّهُ خَيْرٌ وَأَبْقَىٰٓ
Transliteration innā āmannā birabbinā liyaghfira lanā khaṭāyānā wamā akrahtanā ʿalayhi mina l-siḥ'ri wal-lahu khayrun wa-abqā
Marathi ७३. आम्ही (या आशेने) आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले की त्याने आमचे अपराध माफ करावेत आणि प्रामुख्याने जादूगारी (चे पाप) जे काही तू आमच्याकडून विवशतेने करवून घेतले आहे. अल्लाहच सर्वांत उत्तम आणि सदैव काळ राहणारा (चिरस्थायी) आहे.
Verse 74
إِنَّهُۥ مَن يَأْتِ رَبَّهُۥ مُجْرِمًا فَإِنَّ لَهُۥ جَهَنَّمَ لَا يَمُوتُ فِيهَا وَلَا يَحْيَىٰ
Transliteration innahu man yati rabbahu muj'riman fa-inna lahu jahannama lā yamūtu fīhā walā yaḥyā
Marathi ७४. तात्पर्य हेच की जो कोणी अपराधी बनून अल्लाहच्या ठिकाणी जाईल, त्याच्यासाठी जहन्नम आहे, जिथे न मृत्यु असेल, न जीवन!
Verse 75
وَمَن يَأْتِهِۦ مُؤْمِنًا قَدْ عَمِلَ ٱلصَّـٰلِحَـٰتِ فَأُو۟لَـٰٓئِكَ لَهُمُ ٱلدَّرَجَـٰتُ ٱلْعُلَىٰ
Transliteration waman yatihi mu'minan qad ʿamila l-ṣāliḥāti fa-ulāika lahumu l-darajātu l-ʿulā
Marathi ७५. आणि जो कोणी त्याच्याजवळ ईमानधारक बनून जाईल आणि त्याने सत्कर्मेही केली असतील तर त्याच्यासाठी उच्च आणि चांगले दर्जे आहेत.
Verse 76
جَنَّـٰتُ عَدْنٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَا ۚ وَذَٰلِكَ جَزَآءُ مَن تَزَكَّىٰ
Transliteration jannātu ʿadnin tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā wadhālika jazāu man tazakkā
Marathi ७६. कायमस्वरूपी जन्नत, ज्यांच्याखाली नद्या वाहत असतील, जिथे ते सदासर्वदा राहतील. हाच मोबदला आहे अशा त्या प्रत्येक माणसाचा जो पवित्र (पापमुक्त) आहे.
Verse 77
وَلَقَدْ أَوْحَيْنَآ إِلَىٰ مُوسَىٰٓ أَنْ أَسْرِ بِعِبَادِى فَٱضْرِبْ لَهُمْ طَرِيقًا فِى ٱلْبَحْرِ يَبَسًا لَّا تَخَـٰفُ دَرَكًا وَلَا تَخْشَىٰ
Transliteration walaqad awḥaynā ilā mūsā an asri biʿibādī fa-iḍ'rib lahum ṭarīqan fī l-baḥri yabasan lā takhāfu darakan walā takhshā
Marathi ७७. आणि आम्ही मूसाकडे वहयी (प्रकाशना) अवतरित केली की तुम्ही रात्रीतूनच माझ्या दासांना घेऊन चला आणि त्यांच्यासाठी समुद्रात कोरडा मार्ग बनवून घ्या, मग ना तुम्हाला कोणाच्या येऊन धरण्याचे भय राहील ना धास्ती.
Verse 78
فَأَتْبَعَهُمْ فِرْعَوْنُ بِجُنُودِهِۦ فَغَشِيَهُم مِّنَ ٱلْيَمِّ مَا غَشِيَهُمْ
Transliteration fa-atbaʿahum fir'ʿawnu bijunūdihi faghashiyahum mina l-yami mā ghashiyahum
Marathi ७८. फिरऔनने आपल्या सैन्यासह त्यांचा पाठलाग केला, मग तर समुद्र त्या सर्वांवर आच्छादित झाला जसे काही आच्छादित होणार होते.
Verse 79
وَأَضَلَّ فِرْعَوْنُ قَوْمَهُۥ وَمَا هَدَىٰ
Transliteration wa-aḍalla fir'ʿawnu qawmahu wamā hadā
Marathi ७९. आणि फिरऔनने आपल्या जनसमूहाला मार्गभ्रष्टतेत टाकले आणि सरळ मार्ग दाखविला नाही.
Verse 80
يَـٰبَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ قَدْ أَنجَيْنَـٰكُم مِّنْ عَدُوِّكُمْ وَوَٰعَدْنَـٰكُمْ جَانِبَ ٱلطُّورِ ٱلْأَيْمَنَ وَنَزَّلْنَا عَلَيْكُمُ ٱلْمَنَّ وَٱلسَّلْوَىٰ
Transliteration yābanī is'rāīla qad anjaynākum min ʿaduwwikum wawāʿadnākum jāniba l-ṭūri l-aymana wanazzalnā ʿalaykumu l-mana wal-salwā
Marathi ८०. हे इस्राईलच्या पुत्रांनो! (पाहा) आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रुच्या तावडीतून मुक्त केले आणि तुम्हाला तूर पर्वताच्या उजवीकडचे वचन दिले आणि तुमच्यावर मन्न आणि सलवा उतरविला.
Verse 81
كُلُوا۟ مِن طَيِّبَـٰتِ مَا رَزَقْنَـٰكُمْ وَلَا تَطْغَوْا۟ فِيهِ فَيَحِلَّ عَلَيْكُمْ غَضَبِى ۖ وَمَن يَحْلِلْ عَلَيْهِ غَضَبِى فَقَدْ هَوَىٰ
Transliteration kulū min ṭayyibāti mā razaqnākum walā taṭghaw fīhi fayaḥilla ʿalaykum ghaḍabī waman yaḥlil ʿalayhi ghaḍabī faqad hawā
Marathi ८१. तुम्ही, आम्ही प्रदान केलेली स्वच्छ शुद्ध रोजी (आजिविका) खा आणि त्यात मर्यादेचे उल्लंघन करू नका अन्यथा तुमच्यावर माझा प्रकोप उतरेल तो निश्चितच नाश पावेल.
Verse 82
وَإِنِّى لَغَفَّارٌ لِّمَن تَابَ وَءَامَنَ وَعَمِلَ صَـٰلِحًا ثُمَّ ٱهْتَدَىٰ
Transliteration wa-innī laghaffārun liman tāba waāmana waʿamila ṣāliḥan thumma ih'tadā
Marathi ८२. आणि निश्चितच मी त्यांना माफ करणार आहे जे माफी मागतील ईमान राखतील सत्कर्मे करतील आणि सरळ मार्गावरही राहतील.१
Verse 83
۞ وَمَآ أَعْجَلَكَ عَن قَوْمِكَ يَـٰمُوسَىٰ
Transliteration wamā aʿjalaka ʿan qawmika yāmūsā
Marathi ८३. आणि हे मूसा! तुम्हाला आपला जनसमूहाशी (गाफील करून) कोणत्या गोष्टीने लवकर आणले?
Verse 84
قَالَ هُمْ أُو۟لَآءِ عَلَىٰٓ أَثَرِى وَعَجِلْتُ إِلَيْكَ رَبِّ لِتَرْضَىٰ
Transliteration qāla hum ulāi ʿalā atharī waʿajil'tu ilayka rabbi litarḍā
Marathi ८४. सांगितले ते लोक माझ्या पाठोपाठच आहेत आणि मी, हे पालनकर्त्या घाई अशासाठी केली की तू प्रसन्न व्हावे.
Verse 85
قَالَ فَإِنَّا قَدْ فَتَنَّا قَوْمَكَ مِنۢ بَعْدِكَ وَأَضَلَّهُمُ ٱلسَّامِرِىُّ
Transliteration qāla fa-innā qad fatannā qawmaka min baʿdika wa-aḍallahumu l-sāmiriyu
Marathi ८५. फर्माविले, आम्ही तुमच्या जनसमूहाला तुमच्या पश्चात कसोटीत टाकले आणि त्यांना सामरीने मार्गभ्रष्ट करून टाकले.
Verse 86
فَرَجَعَ مُوسَىٰٓ إِلَىٰ قَوْمِهِۦ غَضْبَـٰنَ أَسِفًا ۚ قَالَ يَـٰقَوْمِ أَلَمْ يَعِدْكُمْ رَبُّكُمْ وَعْدًا حَسَنًا ۚ أَفَطَالَ عَلَيْكُمُ ٱلْعَهْدُ أَمْ أَرَدتُّمْ أَن يَحِلَّ عَلَيْكُمْ غَضَبٌ مِّن رَّبِّكُمْ فَأَخْلَفْتُم مَّوْعِدِى
Transliteration farajaʿa mūsā ilā qawmihi ghaḍbāna asifan qāla yāqawmi alam yaʿid'kum rabbukum waʿdan ḥasanan afaṭāla ʿalaykumu l-ʿahdu am aradttum an yaḥilla ʿalaykum ghaḍabun min rabbikum fa-akhlaftum mawʿidī
Marathi ८६. तेव्हा मूसा अतिशय क्रोधित आणि दुःखी होऊन परतले आणि म्हणाले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्याशी तुमच्या पालनकर्त्याने चांगला वायदा केला नव्हता? काय त्याची मुदत तुम्हाला दीर्घ स्वरूपाची वाटली? की तुमचा इरादाच हा आहे की तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप कोसळावा, म्हणून तुम्ही माझा वायदा तोडून टाकला.
Verse 87
قَالُوا۟ مَآ أَخْلَفْنَا مَوْعِدَكَ بِمَلْكِنَا وَلَـٰكِنَّا حُمِّلْنَآ أَوْزَارًا مِّن زِينَةِ ٱلْقَوْمِ فَقَذَفْنَـٰهَا فَكَذَٰلِكَ أَلْقَى ٱلسَّامِرِىُّ
Transliteration qālū mā akhlafnā mawʿidaka bimalkinā walākinnā ḥummil'nā awzāran min zīnati l-qawmi faqadhafnāhā fakadhālika alqā l-sāmiriyu
Marathi ८७. (लोकांनी) उत्तर दिले, आम्ही आपल्या अधिकाराने तुमच्याशी केलेला वायदा तोडला नाही, किंबहुना आमच्यावर जे दागिने, लोकांचे लादले गेले होते, ते आम्ही टाकून दिले आणि त्याचप्रमाणे सामरीने देखील टाकले.
Verse 88
فَأَخْرَجَ لَهُمْ عِجْلًا جَسَدًا لَّهُۥ خُوَارٌ فَقَالُوا۟ هَـٰذَآ إِلَـٰهُكُمْ وَإِلَـٰهُ مُوسَىٰ فَنَسِىَ
Transliteration fa-akhraja lahum ʿij'lan jasadan lahu khuwārun faqālū hādhā ilāhukum wa-ilāhu mūsā fanasiya
Marathi ८८. मग त्याने लोकांसाठी एक वासरू घडविले अर्थात वासराची मूर्ती ज्याचा गायीसारखा आवाज होता, मग म्हणाले की हाच तुमचाही माबूद (उपास्य) आहे आणि मूसाचा देखील, परंतु मूसाला विसर पडला.
Verse 89
أَفَلَا يَرَوْنَ أَلَّا يَرْجِعُ إِلَيْهِمْ قَوْلًا وَلَا يَمْلِكُ لَهُمْ ضَرًّا وَلَا نَفْعًا
Transliteration afalā yarawna allā yarjiʿu ilayhim qawlan walā yamliku lahum ḍarran walā nafʿan
Marathi ८९. काय हे वाट चुकलेले लोक हेही पाहत नाही की ते तर त्यांच्या बोलण्याला उत्तरही देऊ शकत नाही आणि न त्यांच्या कसल्याही चांगल्या वाईटाचा अधिकार बाळगतो.
Verse 90
وَلَقَدْ قَالَ لَهُمْ هَـٰرُونُ مِن قَبْلُ يَـٰقَوْمِ إِنَّمَا فُتِنتُم بِهِۦ ۖ وَإِنَّ رَبَّكُمُ ٱلرَّحْمَـٰنُ فَٱتَّبِعُونِى وَأَطِيعُوٓا۟ أَمْرِى
Transliteration walaqad qāla lahum hārūnu min qablu yāqawmi innamā futintum bihi wa-inna rabbakumu l-raḥmānu fa-ittabiʿūnī wa-aṭīʿū amrī
Marathi ९०. आणि हारूनने यापूर्वीही त्यांना सांगितले होते की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या वासराद्वारे तर तुमची परीक्षा घेतली गेली आहे. तुमचा सच्चा पालनहार तर दयावान अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही सर्व माझे अनुसरण करा आणि माझे म्हणणे मानत जा.
Verse 91
قَالُوا۟ لَن نَّبْرَحَ عَلَيْهِ عَـٰكِفِينَ حَتَّىٰ يَرْجِعَ إِلَيْنَا مُوسَىٰ
Transliteration qālū lan nabraḥa ʿalayhi ʿākifīna ḥattā yarjiʿa ilaynā mūsā
Marathi ९१. (त्यांनी) उत्तर दिले मूसाचे आगमन होईपर्यंत आम्ही तर याचेच पुजारी बनून राहू.
Verse 92
قَالَ يَـٰهَـٰرُونُ مَا مَنَعَكَ إِذْ رَأَيْتَهُمْ ضَلُّوٓا۟
Transliteration qāla yāhārūnu mā manaʿaka idh ra-aytahum ḍallū
Marathi ९२. (मूसा) म्हणाले, हे हारून! यांना मार्गभ्रष्ट होत असलेले पाहून (त्यांना रोखण्यात) तुम्हाला कोणत्या गोष्टीने रोखून ठेवले होते?
Verse 93
أَلَّا تَتَّبِعَنِ ۖ أَفَعَصَيْتَ أَمْرِى
Transliteration allā tattabiʿani afaʿaṣayta amrī
Marathi ९३. की ज्यामुळे तू माझ्या पाठोपाठ आला नाही, काय तू देखील माझी अवज्ञा करणारा बनलास?
Verse 94
قَالَ يَبْنَؤُمَّ لَا تَأْخُذْ بِلِحْيَتِى وَلَا بِرَأْسِىٓ ۖ إِنِّى خَشِيتُ أَن تَقُولَ فَرَّقْتَ بَيْنَ بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ وَلَمْ تَرْقُبْ قَوْلِى
Transliteration qāla yabna-umma lā takhudh biliḥ'yatī walā birasī innī khashītu an taqūla farraqta bayna banī is'rāīla walam tarqub qawlī
Marathi ९४. (हारून) म्हणाले, हे माझ्या मातेच्या पुत्रा! माझी दाढी धरू नका, आणि डोक्याचे केस ओढू नका. माझ्या मनात तर केवळ हाच विचार आला आहे की कदाचित तुम्ही असे न म्हणावे की तू इस्राईलच्या संततीत फूट पाडलीस आणि माझ्या बोलण्याची (आदेशाची) वाट पाहिली नाही.
Verse 95
قَالَ فَمَا خَطْبُكَ يَـٰسَـٰمِرِىُّ
Transliteration qāla famā khaṭbuka yāsāmiriyyu
Marathi ९५. (मूसा यांनी) विचारले, सामरी तुझा काय मामला आहे?
Verse 96
قَالَ بَصُرْتُ بِمَا لَمْ يَبْصُرُوا۟ بِهِۦ فَقَبَضْتُ قَبْضَةً مِّنْ أَثَرِ ٱلرَّسُولِ فَنَبَذْتُهَا وَكَذَٰلِكَ سَوَّلَتْ لِى نَفْسِى
Transliteration qāla baṣur'tu bimā lam yabṣurū bihi faqabaḍtu qabḍatan min athari l-rasūli fanabadhtuhā wakadhālika sawwalat lī nafsī
Marathi ९६. (त्याने) उत्तर दिले, मला ते दिसले, जे त्यांना दिसले नाही, तेव्हा मी अल्लाहने पाठविलेल्या पाऊलखुणांतून एक मूठ भरून घेतली. तिला त्यात टाकले. अशा प्रकारे माझ्या मनाने माझ्यासाठी ही गोष्ट रचली.
Verse 97
قَالَ فَٱذْهَبْ فَإِنَّ لَكَ فِى ٱلْحَيَوٰةِ أَن تَقُولَ لَا مِسَاسَ ۖ وَإِنَّ لَكَ مَوْعِدًا لَّن تُخْلَفَهُۥ ۖ وَٱنظُرْ إِلَىٰٓ إِلَـٰهِكَ ٱلَّذِى ظَلْتَ عَلَيْهِ عَاكِفًا ۖ لَّنُحَرِّقَنَّهُۥ ثُمَّ لَنَنسِفَنَّهُۥ فِى ٱلْيَمِّ نَسْفًا
Transliteration qāla fa-idh'hab fa-inna laka fī l-ḥayati an taqūla lā misāsa wa-inna laka mawʿidan lan tukh'lafahu wa-unẓur ilā ilāhika alladhī ẓalta ʿalayhi ʿākifan lanuḥarriqannahu thumma lanansifannahu fī l-yami nasfan
Marathi ९७. सांगितले, ठीक आहे. जा, या जगाच्या जीवनात तुझी शिक्षा हीच की तू म्हणत राहावे, मला स्पर्श करू नका आणि एक दुसरा वायदाही तुझ्याशी आहे, जो तुझ्यावरून कधीही टाळणार नाही आणि आता तू आपल्या या दैवतालाही पाहा, ज्याचा तू पुजारी बनला होता, आम्ही त्याला जाळून टाकू, मग त्याला नदीत चूरेचूर उडवून देऊ.१
Verse 98
إِنَّمَآ إِلَـٰهُكُمُ ٱللَّهُ ٱلَّذِى لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۚ وَسِعَ كُلَّ شَىْءٍ عِلْمًا
Transliteration innamā ilāhukumu l-lahu alladhī lā ilāha illā huwa wasiʿa kulla shayin ʿil'man
Marathi ९८. निःसंशय, तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाहच आहे. त्याच्याखेरीज दुसरा कोणीही उपास्य नाही. त्याचे ज्ञान समस्त वस्तूंवर प्रभावी आहे.
Verse 99
كَذَٰلِكَ نَقُصُّ عَلَيْكَ مِنْ أَنۢبَآءِ مَا قَدْ سَبَقَ ۚ وَقَدْ ءَاتَيْنَـٰكَ مِن لَّدُنَّا ذِكْرًا
Transliteration kadhālika naquṣṣu ʿalayka min anbāi mā qad sabaqa waqad ātaynāka min ladunnā dhik'ran
Marathi ९९. अशा प्रकारे आम्ही तुमच्यासमोर पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे वर्णन करतो, आणि निःसंशय आम्ही तुम्हाला आपल्याकडून बोध- उपदेश प्रदान केलेला आहे.
Verse 100
مَّنْ أَعْرَضَ عَنْهُ فَإِنَّهُۥ يَحْمِلُ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ وِزْرًا
Transliteration man aʿraḍa ʿanhu fa-innahu yaḥmilu yawma l-qiyāmati wiz'ran
Marathi १००. यापासून जो तोंड फिरवेल तो निश्चितच कयामतच्या दिवशी आपले अवजड ओझे लादलेल्या स्थितीत असेल.
Verse 101
خَـٰلِدِينَ فِيهِ ۖ وَسَآءَ لَهُمْ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ حِمْلًا
Transliteration khālidīna fīhi wasāa lahum yawma l-qiyāmati ḥim'lan
Marathi १०१. ज्यात तो नेहमीच राहील आणि अशांकरिता कयामतच्या दिवशी (मोठे) भयंकर ओझे आहे.
Verse 102
يَوْمَ يُنفَخُ فِى ٱلصُّورِ ۚ وَنَحْشُرُ ٱلْمُجْرِمِينَ يَوْمَئِذٍ زُرْقًا
Transliteration yawma yunfakhu fī l-ṣūri wanaḥshuru l-muj'rimīna yawma-idhin zur'qan
Marathi १०२. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल आणि अपराधी लोकांना आम्ही त्या दिवशी (भीतीमुळे) निळ्या पिवळ्या डोळ्यांसह घेरून आणू.
Verse 103
يَتَخَـٰفَتُونَ بَيْنَهُمْ إِن لَّبِثْتُمْ إِلَّا عَشْرًا
Transliteration yatakhāfatūna baynahum in labith'tum illā ʿashran
Marathi १०३. ते आपसात हळू हळू बोलत असतील की आम्ही तर (जगात) केवळ दया दिवसच राहिलो.
Verse 104
نَّحْنُ أَعْلَمُ بِمَا يَقُولُونَ إِذْ يَقُولُ أَمْثَلُهُمْ طَرِيقَةً إِن لَّبِثْتُمْ إِلَّا يَوْمًا
Transliteration naḥnu aʿlamu bimā yaqūlūna idh yaqūlu amthaluhum ṭarīqatan in labith'tum illā yawman
Marathi १०४. जे काही ते बोलत आहेत, त्याची हकीगत आम्ही जाणतो. त्यांच्यातला सर्वांत चांगल्या मार्गाचा इसम म्हणत असेल, तुम्ही फक्त एकच दिवस राहिलेत.
Verse 105
وَيَسْـَٔلُونَكَ عَنِ ٱلْجِبَالِ فَقُلْ يَنسِفُهَا رَبِّى نَسْفًا
Transliteration wayasalūnaka ʿani l-jibāli faqul yansifuhā rabbī nasfan
Marathi १०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना माझा पालनकर्ता (अल्लाह) चूरेचूरे करून उडवून देईल.
Verse 106
فَيَذَرُهَا قَاعًا صَفْصَفًا
Transliteration fayadharuhā qāʿan ṣafṣafan
Marathi १०६. आणि (जमिनी) ला समतल सपाट मैदान करून टाकील.
Verse 107
لَّا تَرَىٰ فِيهَا عِوَجًا وَلَآ أَمْتًا
Transliteration lā tarā fīhā ʿiwajan walā amtan
Marathi १०७. ज्यात ना कोठे वळण दिसेल, ना उंच सखल भाग.
Verse 108
يَوْمَئِذٍ يَتَّبِعُونَ ٱلدَّاعِىَ لَا عِوَجَ لَهُۥ ۖ وَخَشَعَتِ ٱلْأَصْوَاتُ لِلرَّحْمَـٰنِ فَلَا تَسْمَعُ إِلَّا هَمْسًا
Transliteration yawma-idhin yattabiʿūna l-dāʿiya lā ʿiwaja lahu wakhashaʿati l-aṣwātu lilrraḥmāni falā tasmaʿu illā hamsan
Marathi १०८. ज्या दिवशी लोक पुकारणाऱ्याच्या मागे चालतील, ज्यात कसलीही कमी होणार नाही आणि दयावान अल्लाहच्या समोर सर्वांचे आवाज दबलेले असतील, कुजबुजखेरीज तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही.
Verse 109
يَوْمَئِذٍ لَّا تَنفَعُ ٱلشَّفَـٰعَةُ إِلَّا مَنْ أَذِنَ لَهُ ٱلرَّحْمَـٰنُ وَرَضِىَ لَهُۥ قَوْلًا
Transliteration yawma-idhin lā tanfaʿu l-shafāʿatu illā man adhina lahu l-raḥmānu waraḍiya lahu qawlan
Marathi १०९. त्या दिवशी कोणाची शिफारस काहीच कामी येणार नाही, तथापि ज्याला दयावान अल्लाह तसा आदेश देईल, आणि त्याचे म्हणणे पसंत करील.
Verse 110
يَعْلَمُ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَلَا يُحِيطُونَ بِهِۦ عِلْمًا
Transliteration yaʿlamu mā bayna aydīhim wamā khalfahum walā yuḥīṭūna bihi ʿil'man
Marathi ११०. जे काही त्यांच्या पुढे आणि मागे आहे, ते (अल्लाहच) जाणतो. त्याच्या निर्मितीपैकी कोणीही त्याला आपल्या ज्ञानकक्षेत घेऊ शकत नाही.
Verse 111
۞ وَعَنَتِ ٱلْوُجُوهُ لِلْحَىِّ ٱلْقَيُّومِ ۖ وَقَدْ خَابَ مَنْ حَمَلَ ظُلْمًا
Transliteration waʿanati l-wujūhu lil'ḥayyi l-qayūmi waqad khāba man ḥamala ẓul'man
Marathi १११. आणि सर्वांचे चेहरे त्या चिरसजीव आणि चिरस्थायी अल्लाहसमोर मोठ्या नम्रतेने झुकलेले असतील. निःसंशय, जो आपल्या पाठीवर अत्याचाराचे ओझे लावून येईल तो असफल ठरेल.
Verse 112
وَمَن يَعْمَلْ مِنَ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَا يَخَافُ ظُلْمًا وَلَا هَضْمًا
Transliteration waman yaʿmal mina l-ṣāliḥāti wahuwa mu'minun falā yakhāfu ẓul'man walā haḍman
Marathi ११२. आणि जो कोणी सत्कर्म करील, आणि ईमानधारकही असेल तर त्याला ना जुलूम अत्याचाराचे भय राहील, ना हक्क मारला जाण्याचे.
Verse 113
وَكَذَٰلِكَ أَنزَلْنَـٰهُ قُرْءَانًا عَرَبِيًّا وَصَرَّفْنَا فِيهِ مِنَ ٱلْوَعِيدِ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ أَوْ يُحْدِثُ لَهُمْ ذِكْرًا
Transliteration wakadhālika anzalnāhu qur'ānan ʿarabiyyan waṣarrafnā fīhi mina l-waʿīdi laʿallahum yattaqūna aw yuḥ'dithu lahum dhik'ran
Marathi ११३. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्यावर अरबी (भाषेत) कुरआन अवतरित केले आहे आणि अनेक प्रकारे त्यात शिक्षेची भीती सांगितली आहे, यासाठी की लोकांनी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणारे बनावे किंवा त्यांच्या मनात विचारचिंतन निर्माण व्हावे.
Verse 114
فَتَعَـٰلَى ٱللَّهُ ٱلْمَلِكُ ٱلْحَقُّ ۗ وَلَا تَعْجَلْ بِٱلْقُرْءَانِ مِن قَبْلِ أَن يُقْضَىٰٓ إِلَيْكَ وَحْيُهُۥ ۖ وَقُل رَّبِّ زِدْنِى عِلْمًا
Transliteration fataʿālā l-lahu l-maliku l-ḥaqu walā taʿjal bil-qur'āni min qabli an yuq'ḍā ilayka waḥyuhu waqul rabbi zid'nī ʿil'man
Marathi ११४. अशा प्रकारे अल्लाह सर्वांत मोठा सच्चा आणि खराखुरा स्वामी आहे. तुम्ही कुरआन पठण करण्यात घाई करू नका, याआधी की तुमच्याकडे जी वहयी (प्रकाशना) केली जाते, ती पूर्ण केली जावी आणि असे म्हणा की, पालनकर्त्या! माझे ज्ञान आणखी वाढव.
Verse 115
وَلَقَدْ عَهِدْنَآ إِلَىٰٓ ءَادَمَ مِن قَبْلُ فَنَسِىَ وَلَمْ نَجِدْ لَهُۥ عَزْمًا
Transliteration walaqad ʿahid'nā ilā ādama min qablu fanasiya walam najid lahu ʿazman
Marathi ११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही.
Verse 116
وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَـٰٓئِكَةِ ٱسْجُدُوا۟ لِـَٔادَمَ فَسَجَدُوٓا۟ إِلَّآ إِبْلِيسَ أَبَىٰ
Transliteration wa-idh qul'nā lil'malāikati us'judū liādama fasajadū illā ib'līsa abā
Marathi ११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला.
Verse 117
فَقُلْنَا يَـٰٓـَٔادَمُ إِنَّ هَـٰذَا عَدُوٌّ لَّكَ وَلِزَوْجِكَ فَلَا يُخْرِجَنَّكُمَا مِنَ ٱلْجَنَّةِ فَتَشْقَىٰٓ
Transliteration faqul'nā yāādamu inna hādhā ʿaduwwun laka walizawjika falā yukh'rijannakumā mina l-janati fatashqā
Marathi ११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे.
Verse 118
إِنَّ لَكَ أَلَّا تَجُوعَ فِيهَا وَلَا تَعْرَىٰ
Transliteration inna laka allā tajūʿa fīhā walā taʿrā
Marathi ११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न.
Verse 119
وَأَنَّكَ لَا تَظْمَؤُا۟ فِيهَا وَلَا تَضْحَىٰ
Transliteration wa-annaka lā taẓma-u fīhā walā taḍḥā
Marathi ११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता.
Verse 120
فَوَسْوَسَ إِلَيْهِ ٱلشَّيْطَـٰنُ قَالَ يَـٰٓـَٔادَمُ هَلْ أَدُلُّكَ عَلَىٰ شَجَرَةِ ٱلْخُلْدِ وَمُلْكٍ لَّا يَبْلَىٰ
Transliteration fawaswasa ilayhi l-shayṭānu qāla yāādamu hal adulluka ʿalā shajarati l-khul'di wamul'kin lā yablā
Marathi १२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी.
Verse 121
فَأَكَلَا مِنْهَا فَبَدَتْ لَهُمَا سَوْءَٰتُهُمَا وَطَفِقَا يَخْصِفَانِ عَلَيْهِمَا مِن وَرَقِ ٱلْجَنَّةِ ۚ وَعَصَىٰٓ ءَادَمُ رَبَّهُۥ فَغَوَىٰ
Transliteration fa-akalā min'hā fabadat lahumā sawātuhumā waṭafiqā yakhṣifāni ʿalayhimā min waraqi l-janati waʿaṣā ādamu rabbahu faghawā
Marathi १२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले.
Verse 122
ثُمَّ ٱجْتَبَـٰهُ رَبُّهُۥ فَتَابَ عَلَيْهِ وَهَدَىٰ
Transliteration thumma ij'tabāhu rabbuhu fatāba ʿalayhi wahadā
Marathi १२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले.
Verse 123
قَالَ ٱهْبِطَا مِنْهَا جَمِيعًۢا ۖ بَعْضُكُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ ۖ فَإِمَّا يَأْتِيَنَّكُم مِّنِّى هُدًى فَمَنِ ٱتَّبَعَ هُدَاىَ فَلَا يَضِلُّ وَلَا يَشْقَىٰ
Transliteration qāla ih'biṭā min'hā jamīʿan baʿḍukum libaʿḍin ʿaduwwun fa-immā yatiyannakum minnī hudan famani ittabaʿa hudāya falā yaḍillu walā yashqā
Marathi १२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.
Verse 124
وَمَنْ أَعْرَضَ عَن ذِكْرِى فَإِنَّ لَهُۥ مَعِيشَةً ضَنكًا وَنَحْشُرُهُۥ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ أَعْمَىٰ
Transliteration waman aʿraḍa ʿan dhik'rī fa-inna lahu maʿīshatan ḍankan wanaḥshuruhu yawma l-qiyāmati aʿmā
Marathi १२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू.
Verse 125
قَالَ رَبِّ لِمَ حَشَرْتَنِىٓ أَعْمَىٰ وَقَدْ كُنتُ بَصِيرًا
Transliteration qāla rabbi lima ḥashartanī aʿmā waqad kuntu baṣīran
Marathi १२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो.
Verse 126
قَالَ كَذَٰلِكَ أَتَتْكَ ءَايَـٰتُنَا فَنَسِيتَهَا ۖ وَكَذَٰلِكَ ٱلْيَوْمَ تُنسَىٰ
Transliteration qāla kadhālika atatka āyātunā fanasītahā wakadhālika l-yawma tunsā
Marathi १२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे.
Verse 127
وَكَذَٰلِكَ نَجْزِى مَنْ أَسْرَفَ وَلَمْ يُؤْمِنۢ بِـَٔايَـٰتِ رَبِّهِۦ ۚ وَلَعَذَابُ ٱلْـَٔاخِرَةِ أَشَدُّ وَأَبْقَىٰٓ
Transliteration wakadhālika najzī man asrafa walam yu'min biāyāti rabbihi walaʿadhābu l-ākhirati ashaddu wa-abqā
Marathi १२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे.
Verse 128
أَفَلَمْ يَهْدِ لَهُمْ كَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّنَ ٱلْقُرُونِ يَمْشُونَ فِى مَسَـٰكِنِهِمْ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّأُو۟لِى ٱلنُّهَىٰ
Transliteration afalam yahdi lahum kam ahlaknā qablahum mina l-qurūni yamshūna fī masākinihim inna fī dhālika laāyātin li-ulī l-nuhā
Marathi १२८. काय त्यांना या गोष्टीनेही मार्गदर्शन केले नाही की आम्ही त्यांच्यापूर्वी अनेक वस्त्या नष्ट करून टाकल्या आहेत. ज्या राहणाऱ्यांच्या जागेवर हेच चालत फिरत आहे निःसंशय अक्कलवान लोकांसाठी यात अनेक निशाण्या आहेत.
Verse 129
وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِن رَّبِّكَ لَكَانَ لِزَامًا وَأَجَلٌ مُّسَمًّى
Transliteration walawlā kalimatun sabaqat min rabbika lakāna lizāman wa-ajalun musamman
Marathi १२९. आणि तुमच्या पालनकर्त्याचा फैसला पाहिल्यापासून निर्धारित आणि काळ ठरविला गेलेला नसता तर याच क्षणी विनाश येऊन बिलगला असता.
Verse 130
فَٱصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ قَبْلَ طُلُوعِ ٱلشَّمْسِ وَقَبْلَ غُرُوبِهَا ۖ وَمِنْ ءَانَآئِ ٱلَّيْلِ فَسَبِّحْ وَأَطْرَافَ ٱلنَّهَارِ لَعَلَّكَ تَرْضَىٰ
Transliteration fa-iṣ'bir ʿalā mā yaqūlūna wasabbiḥ biḥamdi rabbika qabla ṭulūʿi l-shamsi waqabla ghurūbihā wamin ānāi al-layli fasabbiḥ wa-aṭrāfa l-nahāri laʿallaka tarḍā
Marathi १३०. तेव्हा त्यांच्या बोलण्यावर धीर- संयम राखा आणि आपल्या पालनकर्त्याची पवित्रता आणि महानता वर्णन करीत राहा, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी आणि रात्रीच्या वेगवेगळ्या हिश्श्यांमध्येही आणि दिवसाच्या हिश्श्यांमध्येही अल्लाहचे गुणगान करीत राहा. (अशाने) फार शक्य आहे की तुम्ही आनंदित व्हाल.
Verse 131
وَلَا تَمُدَّنَّ عَيْنَيْكَ إِلَىٰ مَا مَتَّعْنَا بِهِۦٓ أَزْوَٰجًا مِّنْهُمْ زَهْرَةَ ٱلْحَيَوٰةِ ٱلدُّنْيَا لِنَفْتِنَهُمْ فِيهِ ۚ وَرِزْقُ رَبِّكَ خَيْرٌ وَأَبْقَىٰ
Transliteration walā tamuddanna ʿaynayka ilā mā mattaʿnā bihi azwājan min'hum zahrata l-ḥayati l-dun'yā linaftinahum fīhi wariz'qu rabbika khayrun wa-abqā
Marathi १३१. आणि आपली नजर कधीही त्या वस्तूंवर टाकू नया, ज्या आम्ही त्यांच्यापैकी अनेक लोकांना ऐहिक शोभा- सजावटीसाठी देऊन ठेवल्या आहेत, यासाठी की याद्वआरे त्यांची कसोटी घ्यावी. तुमच्या पालनकर्त्याने प्रदान केलेलेच (फार) उत्तम आणि बाकी राहणारे आहे.
Verse 132
وَأْمُرْ أَهْلَكَ بِٱلصَّلَوٰةِ وَٱصْطَبِرْ عَلَيْهَا ۖ لَا نَسْـَٔلُكَ رِزْقًا ۖ نَّحْنُ نَرْزُقُكَ ۗ وَٱلْعَـٰقِبَةُ لِلتَّقْوَىٰ
Transliteration wamur ahlaka bil-ṣalati wa-iṣ'ṭabir ʿalayhā lā nasaluka riz'qan naḥnu narzuquka wal-ʿāqibatu lilttaqwā
Marathi १३२. आणि आपल्या कुटुंबीयांना नमाजचा आदेश द्या आणि स्वतःही त्यावर दृढतापूर्वक राहा. आम्ही तुमच्याकडून रोजी (आजिविका) मागत नाही, उलट आम्ही स्वतः तुम्हाला रोजी देतो, शेवटी चांगली परिणती नेक व सदाचारी लोकांचीच होते.
Verse 133
وَقَالُوا۟ لَوْلَا يَأْتِينَا بِـَٔايَةٍ مِّن رَّبِّهِۦٓ ۚ أَوَلَمْ تَأْتِهِم بَيِّنَةُ مَا فِى ٱلصُّحُفِ ٱلْأُولَىٰ
Transliteration waqālū lawlā yatīnā biāyatin min rabbihi awalam tatihim bayyinatu mā fī l-ṣuḥufi l-ūlā
Marathi १३३. आणि (ते) म्हणाले की या (पैगंबरां) ने आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी का नाही आणली? काय त्यांच्याजवळ पूर्वीच्या ग्रंथांच्या स्पष्ट निशाण्या पोहचल्या नाहीत?
Verse 134
وَلَوْ أَنَّآ أَهْلَكْنَـٰهُم بِعَذَابٍ مِّن قَبْلِهِۦ لَقَالُوا۟ رَبَّنَا لَوْلَآ أَرْسَلْتَ إِلَيْنَا رَسُولًا فَنَتَّبِعَ ءَايَـٰتِكَ مِن قَبْلِ أَن نَّذِلَّ وَنَخْزَىٰ
Transliteration walaw annā ahlaknāhum biʿadhābin min qablihi laqālū rabbanā lawlā arsalta ilaynā rasūlan fanattabiʿa āyātika min qabli an nadhilla wanakhzā
Marathi १३४. आणि जर आम्ही याच्या आधीच त्यांना अज़ाबद्वारे नष्ट करून टाकले असते, तर खात्रीने असे म्हणाले असते की हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याजवळ आपला रसूल (ईशदूत) का नाही पाठविला की आम्ही तुझ्या आयतींचे पालन केले असते, यापूर्वी की आम्ही अपमानित झालो असतो आणि धिःक्कारले गेले असतो.
Verse 135
قُلْ كُلٌّ مُّتَرَبِّصٌ فَتَرَبَّصُوا۟ ۖ فَسَتَعْلَمُونَ مَنْ أَصْحَـٰبُ ٱلصِّرَٰطِ ٱلسَّوِىِّ وَمَنِ ٱهْتَدَىٰ
Transliteration qul kullun mutarabbiṣun fatarabbaṣū fasataʿlamūna man aṣḥābu l-ṣirāṭi l-sawiyi wamani ih'tadā
Marathi १३५. त्यांना सांगा, प्रत्येकजण परिणामाच्या प्रतिक्षेत आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा प्रतिक्षेत राहा. लवकरच पूर्णतः जाणून घ्याल की सरळ मार्गावर असलेले कोण आहेत आणि मार्ग प्राप्त केलेले कोण आहेत?
Read Surah Taha in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.