Surah Hud in Marathi: translation and audio
Surah 11 · هود · Hud · 123 verses
Surah Hud verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Hud word by word in English.
Verse 1
الٓر ۚ كِتَـٰبٌ أُحْكِمَتْ ءَايَـٰتُهُۥ ثُمَّ فُصِّلَتْ مِن لَّدُنْ حَكِيمٍ خَبِيرٍ
Transliteration alif-lam-ra kitābun uḥ'kimat āyātuhu thumma fuṣṣilat min ladun ḥakīmin khabīrin
Marathi १. अलिफ. लाम. रॉ . हा एक असा ग्रंथ आहे की याच्या आयती मजबूत केल्या गेल्या आहेत, मग सविस्तर सांगितल्या गेल्या आहेत एका हिकमतशाली, पूर्ण ज्ञान राखणाऱ्यातर्फे.
Verse 2
أَلَّا تَعْبُدُوٓا۟ إِلَّا ٱللَّهَ ۚ إِنَّنِى لَكُم مِّنْهُ نَذِيرٌ وَبَشِيرٌ
Transliteration allā taʿbudū illā l-laha innanī lakum min'hu nadhīrun wabashīrun
Marathi २. हे की अल्लाहशिवाय कोणाचीही उपासना करू नका. मी तुम्हाला अल्लाहतर्फे भय दाखविणारा आणि खूशखबर देणारा आहे.
Verse 3
وَأَنِ ٱسْتَغْفِرُوا۟ رَبَّكُمْ ثُمَّ تُوبُوٓا۟ إِلَيْهِ يُمَتِّعْكُم مَّتَـٰعًا حَسَنًا إِلَىٰٓ أَجَلٍ مُّسَمًّى وَيُؤْتِ كُلَّ ذِى فَضْلٍ فَضْلَهُۥ ۖ وَإِن تَوَلَّوْا۟ فَإِنِّىٓ أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ كَبِيرٍ
Transliteration wa-ani is'taghfirū rabbakum thumma tūbū ilayhi yumattiʿ'kum matāʿan ḥasanan ilā ajalin musamman wayu'ti kulla dhī faḍlin faḍlahu wa-in tawallaw fa-innī akhāfu ʿalaykum ʿadhāba yawmin kabīrin
Marathi ३. आणि हे की तुम्ही आपल्या अपराधांना आपल्या पालनकर्त्याकडून माफ करवून घ्या, मग त्याच्याचकडे एकचित्त व्हा. तो तुम्हाला एका निर्धारीत वेळेपर्यंत (जीवन) सामुग्री देईल आणि प्रत्येक चांगले काम करणाऱ्यावर अधिक कृपा करील आणि जर तुम्ही लोक तोंड फिरवित राहिलात तर मला तुमच्याबाबत एका मोठ्या दिवसाच्या शिक्षेची चिंता वाटते.
Verse 4
إِلَى ٱللَّهِ مَرْجِعُكُمْ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration ilā l-lahi marjiʿukum wahuwa ʿalā kulli shayin qadīrun
Marathi ४. तुम्हाला अल्लाहच्याच जवळ जायचे आहे आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
Verse 5
أَلَآ إِنَّهُمْ يَثْنُونَ صُدُورَهُمْ لِيَسْتَخْفُوا۟ مِنْهُ ۚ أَلَا حِينَ يَسْتَغْشُونَ ثِيَابَهُمْ يَعْلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعْلِنُونَ ۚ إِنَّهُۥ عَلِيمٌۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ
Transliteration alā innahum yathnūna ṣudūrahum liyastakhfū min'hu alā ḥīna yastaghshūna thiyābahum yaʿlamu mā yusirrūna wamā yuʿ'linūna innahu ʿalīmun bidhāti l-ṣudūri
Marathi ५. लक्षात ठेवा ते लोक आपल्या छातींना दुहेरी करून घेतात, यासाठी की आपल्या गोष्टी (बोलणे) अल्लाहपासून लपवू शकावे. लक्षात ठेवा की ते लोक ज्या वेळी आपले कपडे गुंडाळतात, त्या वेळीही तो सर्व काही जाणतो जे काही लपवितात (कानगोष्टी करतात) आणि जे काही साफ- स्पष्ट बोलतात. निःसंशय तो मनातल्या गोष्टीही जाणतो.
Verse 6
۞ وَمَا مِن دَآبَّةٍ فِى ٱلْأَرْضِ إِلَّا عَلَى ٱللَّهِ رِزْقُهَا وَيَعْلَمُ مُسْتَقَرَّهَا وَمُسْتَوْدَعَهَا ۚ كُلٌّ فِى كِتَـٰبٍ مُّبِينٍ
Transliteration wamā min dābbatin fī l-arḍi illā ʿalā l-lahi riz'quhā wayaʿlamu mus'taqarrahā wamus'tawdaʿahā kullun fī kitābin mubīnin
Marathi ६. आणि जमिनीवर चालण्या-फिरणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या अन्नसामुग्रीची जबाबदारी अल्लाहवर आहे. तोच त्यांच्या निवासाचे ठिकाणही जाणतो आणि त्यांना सोपविले जाण्याचे ठिकाणही. सर्व काही स्पष्ट ग्रंथात आहे.
Verse 7
وَهُوَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ فِى سِتَّةِ أَيَّامٍ وَكَانَ عَرْشُهُۥ عَلَى ٱلْمَآءِ لِيَبْلُوَكُمْ أَيُّكُمْ أَحْسَنُ عَمَلًا ۗ وَلَئِن قُلْتَ إِنَّكُم مَّبْعُوثُونَ مِنۢ بَعْدِ ٱلْمَوْتِ لَيَقُولَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِنْ هَـٰذَآ إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ
Transliteration wahuwa alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa fī sittati ayyāmin wakāna ʿarshuhu ʿalā l-māi liyabluwakum ayyukum aḥsanu ʿamalan wala-in qul'ta innakum mabʿūthūna min baʿdi l-mawti layaqūlanna alladhīna kafarū in hādhā illā siḥ'run mubīnun
Marathi ७. आणि तो (अल्लाहच) होय, ज्याने सहा दिवसांत आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते१ यासाठी की त्याने तुमची कसोटी घ्यावी की तुमच्यात सदाचारी कोण आहे? जर तुम्ही त्यांना सांगाल की तुम्हाला मेल्यानंतर पुन्हा जिवंत केले जाईल, तर इन्कारी लोक उत्तर देतील की ही केवळ उघड जादू आहे.
Verse 8
وَلَئِنْ أَخَّرْنَا عَنْهُمُ ٱلْعَذَابَ إِلَىٰٓ أُمَّةٍ مَّعْدُودَةٍ لَّيَقُولُنَّ مَا يَحْبِسُهُۥٓ ۗ أَلَا يَوْمَ يَأْتِيهِمْ لَيْسَ مَصْرُوفًا عَنْهُمْ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration wala-in akharnā ʿanhumu l-ʿadhāba ilā ummatin maʿdūdatin layaqūlunna mā yaḥbisuhu alā yawma yatīhim laysa maṣrūfan ʿanhum waḥāqa bihim mā kānū bihi yastahziūna
Marathi ८. आणि जर आम्ही काही मुदतीपर्यंत त्यांच्यावरील शिक्षा- यातना स्थगित केली तर हे निश्चित उद्गारतील की अज़ाबला कोणत्या गोष्टीने रोखले आहे, ऐका! ज्या दिवशी अज़ाब त्यांच्या जवळ येऊन पोहोचेल, मग तो त्यांच्यावरून टळणार नाही, मग तर ज्याची ते थट्टा उडवित होते, तोच त्यांच्यावर उलटून पडेल.
Verse 9
وَلَئِنْ أَذَقْنَا ٱلْإِنسَـٰنَ مِنَّا رَحْمَةً ثُمَّ نَزَعْنَـٰهَا مِنْهُ إِنَّهُۥ لَيَـُٔوسٌ كَفُورٌ
Transliteration wala-in adhaqnā l-insāna minnā raḥmatan thumma nazaʿnāhā min'hu innahu layaūsun kafūrun
Marathi ९. आणि जर आम्ही माणसाला एखाद्या सुखाची गोडी चाखवून, मग ते त्याच्याकडून हिरावून घेतो, तेव्हा तो फार उदास आणि मोठा कृतघ्न बनतो.
Verse 10
وَلَئِنْ أَذَقْنَـٰهُ نَعْمَآءَ بَعْدَ ضَرَّآءَ مَسَّتْهُ لَيَقُولَنَّ ذَهَبَ ٱلسَّيِّـَٔاتُ عَنِّىٓ ۚ إِنَّهُۥ لَفَرِحٌ فَخُورٌ
Transliteration wala-in adhaqnāhu naʿmāa baʿda ḍarrāa massathu layaqūlanna dhahaba l-sayiātu ʿannī innahu lafariḥun fakhūrun
Marathi १०. आणि जर आम्ही त्याला एखादे सुख पोहचवितो, त्या दुःखानंतर जे त्याला पोहोचले होते, तेव्हा तो म्हणू लागतो की आता माझ्या कष्ट-यातना दूर झाल्या १ निश्चितच तो खूप आनंदित होऊन घमेंड करू लागतो.
Verse 11
إِلَّا ٱلَّذِينَ صَبَرُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ أُو۟لَـٰٓئِكَ لَهُم مَّغْفِرَةٌ وَأَجْرٌ كَبِيرٌ
Transliteration illā alladhīna ṣabarū waʿamilū l-ṣāliḥāti ulāika lahum maghfiratun wa-ajrun kabīrun
Marathi ११. त्यांच्याखेरीज, जे धीर-संयम राखतात आणि सत्कर्म करीत राहतात अशाच लोकांसाठी क्षमाही आहे आणि फार मोठा मोबदलाही.
Verse 12
فَلَعَلَّكَ تَارِكٌۢ بَعْضَ مَا يُوحَىٰٓ إِلَيْكَ وَضَآئِقٌۢ بِهِۦ صَدْرُكَ أَن يَقُولُوا۟ لَوْلَآ أُنزِلَ عَلَيْهِ كَنزٌ أَوْ جَآءَ مَعَهُۥ مَلَكٌ ۚ إِنَّمَآ أَنتَ نَذِيرٌ ۚ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ وَكِيلٌ
Transliteration falaʿallaka tārikun baʿḍa mā yūḥā ilayka waḍāiqun bihi ṣadruka an yaqūlū lawlā unzila ʿalayhi kanzun aw jāa maʿahu malakun innamā anta nadhīrun wal-lahu ʿalā kulli shayin wakīlun
Marathi १२. तर कदाचित तुम्ही त्या वहयी (ईश-संदेशा) चा एखादा भाग सोडून देणार आहात, जो तुमच्याकडे अवतरीत केला जातो आणि त्यामुळे तुमच्या मनात संकोच आहे केवळ त्यांच्या या बोलण्यावर की याच्यावर एखादा खजिना का नाही उतरविला गेला? किंवा याच्यासोबत एखादा फरिश्ता तरी आला असता. ऐका! तुम्ही तर केवळ भय दाखविणारेच आहात आणि प्रत्येक चीजवस्तूची देखरेख करणारा केवळ अल्लाह आहे.
Verse 13
أَمْ يَقُولُونَ ٱفْتَرَىٰهُ ۖ قُلْ فَأْتُوا۟ بِعَشْرِ سُوَرٍ مِّثْلِهِۦ مُفْتَرَيَـٰتٍ وَٱدْعُوا۟ مَنِ ٱسْتَطَعْتُم مِّن دُونِ ٱللَّهِ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration am yaqūlūna if'tarāhu qul fatū biʿashri suwarin mith'lihi muf'tarayātin wa-id'ʿū mani is'taṭaʿtum min dūni l-lahi in kuntum ṣādiqīna
Marathi १३. काय ते असे म्हणतात की या कुरआनाला त्याने आपल्या मनाने रचले आहे. तुम्ही उत्तर द्या की तुम्हीदेखील अशा दहा सूरह (अध्याय) मनाने रचून आणा आणि अल्लाहखेरीज वाटेल त्याला आपल्यासोबत सामील करून घ्या, जर तुम्ही सच्चे असाल.
Verse 14
فَإِلَّمْ يَسْتَجِيبُوا۟ لَكُمْ فَٱعْلَمُوٓا۟ أَنَّمَآ أُنزِلَ بِعِلْمِ ٱللَّهِ وَأَن لَّآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۖ فَهَلْ أَنتُم مُّسْلِمُونَ
Transliteration fa-illam yastajībū lakum fa-iʿ'lamū annamā unzila biʿil'mi l-lahi wa-an lā ilāha illā huwa fahal antum mus'limūna
Marathi १४. मग जर ते तुमचे हे म्हणणे मान्य न करतील तर तुम्ही खात्रीपूर्वक जाणून घ्या की हा ग्रंथ (कुरआन) अल्लाहच्या ज्ञानासह अवतरित केला गेला आहे आणि हे की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही. तर काय तुम्ही मुस्लिम होता?
Verse 15
مَن كَانَ يُرِيدُ ٱلْحَيَوٰةَ ٱلدُّنْيَا وَزِينَتَهَا نُوَفِّ إِلَيْهِمْ أَعْمَـٰلَهُمْ فِيهَا وَهُمْ فِيهَا لَا يُبْخَسُونَ
Transliteration man kāna yurīdu l-ḥayata l-dun'yā wazīnatahā nuwaffi ilayhim aʿmālahum fīhā wahum fīhā lā yub'khasūna
Marathi १५. जो मनुष्य ऐहिक जीवन आणि शोभा- सजावटीवर आसक्त असेल तर अशांना आम्ही सर्व कर्मांचा (मोबदला) इथेच पूर्णतः देऊन टाकतो आणि इथे त्यांना कसलीही कमतरता ठेवली जात नाही.
Verse 16
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ لَيْسَ لَهُمْ فِى ٱلْـَٔاخِرَةِ إِلَّا ٱلنَّارُ ۖ وَحَبِطَ مَا صَنَعُوا۟ فِيهَا وَبَـٰطِلٌ مَّا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration ulāika alladhīna laysa lahum fī l-ākhirati illā l-nāru waḥabiṭa mā ṣanaʿū fīhā wabāṭilun mā kānū yaʿmalūna
Marathi १६. मात्र हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी आखिरतमध्ये आगीशिवाय दुसरे काहीही नाही आणि जे काही त्यांनी इथे केले असेल ते तिथे सर्व व्यर्थ आहे आणि जी काही त्यांची कर्मे होती, ती सर्व नाश पावणारी आहेत.
Verse 17
أَفَمَن كَانَ عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّهِۦ وَيَتْلُوهُ شَاهِدٌ مِّنْهُ وَمِن قَبْلِهِۦ كِتَـٰبُ مُوسَىٰٓ إِمَامًا وَرَحْمَةً ۚ أُو۟لَـٰٓئِكَ يُؤْمِنُونَ بِهِۦ ۚ وَمَن يَكْفُرْ بِهِۦ مِنَ ٱلْأَحْزَابِ فَٱلنَّارُ مَوْعِدُهُۥ ۚ فَلَا تَكُ فِى مِرْيَةٍ مِّنْهُ ۚ إِنَّهُ ٱلْحَقُّ مِن رَّبِّكَ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَ ٱلنَّاسِ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration afaman kāna ʿalā bayyinatin min rabbihi wayatlūhu shāhidun min'hu wamin qablihi kitābu mūsā imāman waraḥmatan ulāika yu'minūna bihi waman yakfur bihi mina l-aḥzābi fal-nāru mawʿiduhu falā taku fī mir'yatin min'hu innahu l-ḥaqu min rabbika walākinna akthara l-nāsi lā yu'minūna
Marathi १७. तो, जो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका प्रमाणावर कायम असेल, आणि त्याच्यासोबत अल्लाहतर्फे साक्षी असेल, आणि त्याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ (साक्षी) असेल जो मार्गदर्शक आणि दया- कृपा आहे. (दुसऱ्यांप्रमाणे असू शकतो?) हेच लोक आहेत, जे त्यावर ईमान राखतात आणि सर्व समूहांपैकी, जोदेखील याचा इन्कारी असेल त्याच्या अंतिम वायद्याचे ठिकाण जहन्नम आहे.१ तेव्हा तुम्ही त्याबाबत कसल्याही संशयात पडू नका. निःसंशय हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्णतः सत्य आहे. परंतु अधिकांश लोक ईमान बाळगणारे नसतात.
Verse 18
وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ ٱفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا ۚ أُو۟لَـٰٓئِكَ يُعْرَضُونَ عَلَىٰ رَبِّهِمْ وَيَقُولُ ٱلْأَشْهَـٰدُ هَـٰٓؤُلَآءِ ٱلَّذِينَ كَذَبُوا۟ عَلَىٰ رَبِّهِمْ ۚ أَلَا لَعْنَةُ ٱللَّهِ عَلَى ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration waman aẓlamu mimmani if'tarā ʿalā l-lahi kadhiban ulāika yuʿ'raḍūna ʿalā rabbihim wayaqūlu l-ashhādu hāulāi alladhīna kadhabū ʿalā rabbihim alā laʿnatu l-lahi ʿalā l-ẓālimīna
Marathi १८. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबाबत खोटे रचेल. हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर सादर केले जातील आणि साक्ष देणारे सर्व म्हणतील की हे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याविषयी असत्य रचले. खबरदार! अल्लाहतर्फे धिक्काराचा मारा आहे अशा अत्याचारी लोकांवर.१
Verse 19
ٱلَّذِينَ يَصُدُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ وَيَبْغُونَهَا عِوَجًا وَهُم بِٱلْـَٔاخِرَةِ هُمْ كَـٰفِرُونَ
Transliteration alladhīna yaṣuddūna ʿan sabīli l-lahi wayabghūnahā ʿiwajan wahum bil-ākhirati hum kāfirūna
Marathi १९. जे अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात चुका शोधण्यामागे लागतात. हेच ते लोक होते, जे आखिरतचा इन्कार करतात.
Verse 20
أُو۟لَـٰٓئِكَ لَمْ يَكُونُوا۟ مُعْجِزِينَ فِى ٱلْأَرْضِ وَمَا كَانَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنْ أَوْلِيَآءَ ۘ يُضَـٰعَفُ لَهُمُ ٱلْعَذَابُ ۚ مَا كَانُوا۟ يَسْتَطِيعُونَ ٱلسَّمْعَ وَمَا كَانُوا۟ يُبْصِرُونَ
Transliteration ulāika lam yakūnū muʿ'jizīna fī l-arḍi wamā kāna lahum min dūni l-lahi min awliyāa yuḍāʿafu lahumu l-ʿadhābu mā kānū yastaṭīʿūna l-samʿa wamā kānū yub'ṣirūna
Marathi २०. असे लोक ना या जगात अल्लाहला हरवू शकले, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता अल्लाहखेरीज झाला. त्यांच्यासाठी शिक्षा दुप्पट केली जाईल ना ते ऐकण्याचे सामर्थ्य बाळगत होते आणि पाहातही नव्हते.
Verse 21
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ خَسِرُوٓا۟ أَنفُسَهُمْ وَضَلَّ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَفْتَرُونَ
Transliteration ulāika alladhīna khasirū anfusahum waḍalla ʿanhum mā kānū yaftarūna
Marathi २१. हेच ते लोक होते ज्यांनी स्वतःच आपले नुकसान करून घेतले आणि त्यांच्याकडून त्यांनी रचलेले असत्य हरवले.
Verse 22
لَا جَرَمَ أَنَّهُمْ فِى ٱلْـَٔاخِرَةِ هُمُ ٱلْأَخْسَرُونَ
Transliteration lā jarama annahum fī l-ākhirati humu l-akhsarūna
Marathi २२. निःसंशय हे लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये तोट्यात असतील.
Verse 23
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَأَخْبَتُوٓا۟ إِلَىٰ رَبِّهِمْ أُو۟لَـٰٓئِكَ أَصْحَـٰبُ ٱلْجَنَّةِ ۖ هُمْ فِيهَا خَـٰلِدُونَ
Transliteration inna alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti wa-akhbatū ilā rabbihim ulāika aṣḥābu l-janati hum fīhā khālidūna
Marathi २३. निःसंशय, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि आपल्या पालनकर्त्याकडे झुकतही राहिले, तेच लोक जन्नतमध्ये जाणार आहेत जिथे ते नेहमी नेहमी राहतील.
Verse 24
۞ مَثَلُ ٱلْفَرِيقَيْنِ كَٱلْأَعْمَىٰ وَٱلْأَصَمِّ وَٱلْبَصِيرِ وَٱلسَّمِيعِ ۚ هَلْ يَسْتَوِيَانِ مَثَلًا ۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
Transliteration mathalu l-farīqayni kal-aʿmā wal-aṣami wal-baṣīri wal-samīʿi hal yastawiyāni mathalan afalā tadhakkarūna
Marathi २४. दोन्ही गटांचे उदाहरण असे आहे जणू एक आंधळा आणि बहिरा तर दुसरा डोळस आणि ऐकणारा. उदाहरणात काय हे दोन्ही समान आहेत? काय तरीही तुम्ही बोध प्राप्त करीत नाहीत?
Verse 25
وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا إِلَىٰ قَوْمِهِۦٓ إِنِّى لَكُمْ نَذِيرٌ مُّبِينٌ
Transliteration walaqad arsalnā nūḥan ilā qawmihi innī lakum nadhīrun mubīnun
Marathi २५. आणि निःसंशय आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविले की मी तुम्हाला स्पष्टपणे सचेत करणारा आहे?
Verse 26
أَن لَّا تَعْبُدُوٓا۟ إِلَّا ٱللَّهَ ۖ إِنِّىٓ أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ أَلِيمٍ
Transliteration an lā taʿbudū illā l-laha innī akhāfu ʿalaykum ʿadhāba yawmin alīmin
Marathi २६. की तुम्ही फक्त अल्लाहचीच उपासना करा, मला तर तुमच्याविषयी दुःखदायक दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते.
Verse 27
فَقَالَ ٱلْمَلَأُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ مِن قَوْمِهِۦ مَا نَرَىٰكَ إِلَّا بَشَرًا مِّثْلَنَا وَمَا نَرَىٰكَ ٱتَّبَعَكَ إِلَّا ٱلَّذِينَ هُمْ أَرَاذِلُنَا بَادِىَ ٱلرَّأْىِ وَمَا نَرَىٰ لَكُمْ عَلَيْنَا مِن فَضْلٍۭ بَلْ نَظُنُّكُمْ كَـٰذِبِينَ
Transliteration faqāla l-mala-u alladhīna kafarū min qawmihi mā narāka illā basharan mith'lanā wamā narāka ittabaʿaka illā alladhīna hum arādhilunā bādiya l-rayi wamā narā lakum ʿalaynā min faḍlin bal naẓunnukum kādhibīna
Marathi २७. त्यांच्या जनसमूहाच्या काफिर सरदारांनी उत्तर दिले की आम्ही तर तुम्हाला आपल्याचसारखे मनुष्य असल्याचे पाहतो आणि तुमच्या अनुयायींनाही पाहतो की स्पष्टतः खालच्या पातळीच्या लोकांखेरीज दुसरा कोणी नाही. (जे तुमचे अनुसरण करीत आहेत) आम्हाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आमच्यापेक्षा श्रेष्ठ दिसत नाही, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो.
Verse 28
قَالَ يَـٰقَوْمِ أَرَءَيْتُمْ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّى وَءَاتَىٰنِى رَحْمَةً مِّنْ عِندِهِۦ فَعُمِّيَتْ عَلَيْكُمْ أَنُلْزِمُكُمُوهَا وَأَنتُمْ لَهَا كَـٰرِهُونَ
Transliteration qāla yāqawmi ara-aytum in kuntu ʿalā bayyinatin min rabbī waātānī raḥmatan min ʿindihi faʿummiyat ʿalaykum anul'zimukumūhā wa-antum lahā kārihūna
Marathi २८. (नूह) म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! मला हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट निशाणीवर कामय असलेला आणि मला त्याने आपल्याकडून (एखादी चांगली) दया- कृपा प्रदान केली असेल, मग ती तुमच्या डोळ्यांत सामावली नाही तर काय जबरदस्तीने तिला तुमच्या गळ्यात टाकू, वास्तविक तुम्ही तिला इच्छित नाही.
Verse 29
وَيَـٰقَوْمِ لَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مَالًا ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَى ٱللَّهِ ۚ وَمَآ أَنَا۠ بِطَارِدِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ ۚ إِنَّهُم مُّلَـٰقُوا۟ رَبِّهِمْ وَلَـٰكِنِّىٓ أَرَىٰكُمْ قَوْمًا تَجْهَلُونَ
Transliteration wayāqawmi lā asalukum ʿalayhi mālan in ajriya illā ʿalā l-lahi wamā anā biṭāridi alladhīna āmanū innahum mulāqū rabbihim walākinnī arākum qawman tajhalūna
Marathi २९. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी याच्या मोबदल्यात तुमच्याकडून कसलेही धन मागत नाही. माझा मोबदला तर केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ आहे, ना मी ईमानधारकांना आपल्या जवळून दूर करू शकतो, त्यांना आपल्या पालनकर्त्याशी भेटायचे आहे. परंतु मी असे पाहतो की तुम्ही लोक मूर्खपणा करीत आहात.
Verse 30
وَيَـٰقَوْمِ مَن يَنصُرُنِى مِنَ ٱللَّهِ إِن طَرَدتُّهُمْ ۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
Transliteration wayāqawmi man yanṣurunī mina l-lahi in ṭaradttuhum afalā tadhakkarūna
Marathi ३०. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! जर मी ईमानधारकांना आपल्यापासून दूर करेन, तर अल्लाहच्या विरोधात कोण माझी मदत करू शकतो, काय तुम्ही थोडादेखील विचार करीत नाहीत?
Verse 31
وَلَآ أَقُولُ لَكُمْ عِندِى خَزَآئِنُ ٱللَّهِ وَلَآ أَعْلَمُ ٱلْغَيْبَ وَلَآ أَقُولُ إِنِّى مَلَكٌ وَلَآ أَقُولُ لِلَّذِينَ تَزْدَرِىٓ أَعْيُنُكُمْ لَن يُؤْتِيَهُمُ ٱللَّهُ خَيْرًا ۖ ٱللَّهُ أَعْلَمُ بِمَا فِىٓ أَنفُسِهِمْ ۖ إِنِّىٓ إِذًا لَّمِنَ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration walā aqūlu lakum ʿindī khazāinu l-lahi walā aʿlamu l-ghayba walā aqūlu innī malakun walā aqūlu lilladhīna tazdarī aʿyunukum lan yu'tiyahumu l-lahu khayran l-lahu aʿlamu bimā fī anfusihim innī idhan lamina l-ẓālimīna
Marathi ३१. आणि मी तुम्हाला हे नाही सांगत की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. (ऐका!) मी अपरोक्षाचेही ज्ञान बाळगत नाही, ना मी हे सांगतो की मी फरिश्ता आहे. ना माझे असे म्हणणे आहे की ज्यांच्यावर तुमची नजर अपमानाने पडत आहे त्यांना अल्लाह एखादी भलाई देणारच नाही. त्यांच्या मनात जे काही आहे अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. जर मी असे म्हणेन तर निश्चितच माझीही गणना अत्याचारी लोकांत होईल.
Verse 32
قَالُوا۟ يَـٰنُوحُ قَدْ جَـٰدَلْتَنَا فَأَكْثَرْتَ جِدَٰلَنَا فَأْتِنَا بِمَا تَعِدُنَآ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
Transliteration qālū yānūḥu qad jādaltanā fa-aktharta jidālanā fatinā bimā taʿidunā in kunta mina l-ṣādiqīna
Marathi ३२. (जनसमूहाचे लोक) म्हणाले, हे नूह! तू आमच्याशी खूप खूप वाद घातला आहेस. आता तर ज्या गोष्टीचे भय तू आम्हाला दाखवित आहेस तीच आमच्याजवळ आणून दाखव जर तू सच्चा आहेस.
Verse 33
قَالَ إِنَّمَا يَأْتِيكُم بِهِ ٱللَّهُ إِن شَآءَ وَمَآ أَنتُم بِمُعْجِزِينَ
Transliteration qāla innamā yatīkum bihi l-lahu in shāa wamā antum bimuʿ'jizīna
Marathi ३३. उत्तर दिले, तीदेखील अल्लाहच आणील जर तो इच्छिल, आणि होय! तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही.
Verse 34
وَلَا يَنفَعُكُمْ نُصْحِىٓ إِنْ أَرَدتُّ أَنْ أَنصَحَ لَكُمْ إِن كَانَ ٱللَّهُ يُرِيدُ أَن يُغْوِيَكُمْ ۚ هُوَ رَبُّكُمْ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ
Transliteration walā yanfaʿukum nuṣ'ḥī in aradttu an anṣaḥa lakum in kāna l-lahu yurīdu an yugh'wiyakum huwa rabbukum wa-ilayhi tur'jaʿūna
Marathi ३४. आणि तुम्हाला माझा उपदेश काहीच लाभ पोहचवू शकत नाही, मग मी कितीही तुमचे भले इच्छिले तरीही. जर अल्लाहची मर्जी तुम्हाला भटकत ठेवण्याची असेल. तोच तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही परतून जाल.
Verse 35
أَمْ يَقُولُونَ ٱفْتَرَىٰهُ ۖ قُلْ إِنِ ٱفْتَرَيْتُهُۥ فَعَلَىَّ إِجْرَامِى وَأَنَا۠ بَرِىٓءٌ مِّمَّا تُجْرِمُونَ
Transliteration am yaqūlūna if'tarāhu qul ini if'taraytuhu faʿalayya ij'rāmī wa-anā barīon mimmā tuj'rimūna
Marathi ३५. काय हे म्हणतात की हा ग्रंथ पैगंबराने स्वतः मनाने रचलेला आहे? तर तुम्ही उत्तर द्या की जर तो मी मनाने रचलेला असेल तर माझा गुन्हा माझ्यावर आहे आणि मी त्या अपराधांपासून वेगळा आहे, जे तुम्ही करीत आहात.
Verse 36
وَأُوحِىَ إِلَىٰ نُوحٍ أَنَّهُۥ لَن يُؤْمِنَ مِن قَوْمِكَ إِلَّا مَن قَدْ ءَامَنَ فَلَا تَبْتَئِسْ بِمَا كَانُوا۟ يَفْعَلُونَ
Transliteration waūḥiya ilā nūḥin annahu lan yu'mina min qawmika illā man qad āmana falā tabta-is bimā kānū yafʿalūna
Marathi ३६. आणि नूहकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली गेली की तुमच्या जनसमूहामध्ये ज्यांनीदेखील ईमान राखले आहे, त्यांच्याखेरीज आता कोणीही ईमान राखणार नाही. तेव्हा त्यांच्या कर्मांबद्दल दुःखी होऊ नका.
Verse 37
وَٱصْنَعِ ٱلْفُلْكَ بِأَعْيُنِنَا وَوَحْيِنَا وَلَا تُخَـٰطِبْنِى فِى ٱلَّذِينَ ظَلَمُوٓا۟ ۚ إِنَّهُم مُّغْرَقُونَ
Transliteration wa-iṣ'naʿi l-ful'ka bi-aʿyuninā wawaḥyinā walā tukhāṭib'nī fī alladhīna ẓalamū innahum mugh'raqūna
Marathi ३७. आणि एक नौका आमच्या डोळ्यांदेखत आणि आमच्या वहयीनुसार तयार करा आणि अत्याचारी लोकांविषयी आम्हाला काहीही बोलू नका, त्यांना पाण्यात बुडविले जाणार आहे.
Verse 38
وَيَصْنَعُ ٱلْفُلْكَ وَكُلَّمَا مَرَّ عَلَيْهِ مَلَأٌ مِّن قَوْمِهِۦ سَخِرُوا۟ مِنْهُ ۚ قَالَ إِن تَسْخَرُوا۟ مِنَّا فَإِنَّا نَسْخَرُ مِنكُمْ كَمَا تَسْخَرُونَ
Transliteration wayaṣnaʿu l-ful'ka wakullamā marra ʿalayhi mala-on min qawmihi sakhirū min'hu qāla in taskharū minnā fa-innā naskharu minkum kamā taskharūna
Marathi ३८. ते (नूह) नाव बनवू लागले, त्यांच्या जनसमूहाचे ज्या ज्या गटाचे लोक त्यांच्या जवळून जात, त्यांची थट्टा उटवित. ते (नूह) म्हणत, जर तुम्ही आमची थट्टा उडवित असाल तर आम्हीदेखील एक दिवस तुमच्यावर हसणार जशी तुम्ही थट्टा करीत आहात.
Verse 39
فَسَوْفَ تَعْلَمُونَ مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَيَحِلُّ عَلَيْهِ عَذَابٌ مُّقِيمٌ
Transliteration fasawfa taʿlamūna man yatīhi ʿadhābun yukh'zīhi wayaḥillu ʿalayhi ʿadhābun muqīmun
Marathi ३९. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणावर शिक्षा-यातना येणार आहे जी त्याला अपमानित करील आणि त्याच्यावर निरंतर अज़ाब उतरेल.
Verse 40
حَتَّىٰٓ إِذَا جَآءَ أَمْرُنَا وَفَارَ ٱلتَّنُّورُ قُلْنَا ٱحْمِلْ فِيهَا مِن كُلٍّ زَوْجَيْنِ ٱثْنَيْنِ وَأَهْلَكَ إِلَّا مَن سَبَقَ عَلَيْهِ ٱلْقَوْلُ وَمَنْ ءَامَنَ ۚ وَمَآ ءَامَنَ مَعَهُۥٓ إِلَّا قَلِيلٌ
Transliteration ḥattā idhā jāa amrunā wafāra l-tanūru qul'nā iḥ'mil fīhā min kullin zawjayni ith'nayni wa-ahlaka illā man sabaqa ʿalayhi l-qawlu waman āmana wamā āmana maʿahu illā qalīlun
Marathi ४०. येथेपर्यंत की जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला आणि तंदूरमधून पाणी उचंबळू लागले, आम्ही सांगितले की या नौकेत प्रत्येक प्रकारच्या (नर व मादा अशा) जोड्या स्वार करून घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही, मात्र त्यांच्याखेरीज ज्यांच्याबद्दल आधीच फैसला झालेला आहे आणि सर्व ईमान राखणाऱ्यांनाही. थ्यांच्यासोबत ईमान राखणारे फारच कमी होते.
Verse 41
۞ وَقَالَ ٱرْكَبُوا۟ فِيهَا بِسْمِ ٱللَّهِ مَجْر۪ىٰهَا وَمُرْسَىٰهَآ ۚ إِنَّ رَبِّى لَغَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration waqāla ir'kabū fīhā bis'mi l-lahi majrahā wamur'sāhā inna rabbī laghafūrun raḥīmun
Marathi ४१. आणि नूह म्हणाले की या नौकेत स्वार व्हा अल्लाहच्याच नावाने हिचे चालणे आणि थांबणे आहे. निःसंशय, माझा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
Verse 42
وَهِىَ تَجْرِى بِهِمْ فِى مَوْجٍ كَٱلْجِبَالِ وَنَادَىٰ نُوحٌ ٱبْنَهُۥ وَكَانَ فِى مَعْزِلٍ يَـٰبُنَىَّ ٱرْكَب مَّعَنَا وَلَا تَكُن مَّعَ ٱلْكَـٰفِرِينَ
Transliteration wahiya tajrī bihim fī mawjin kal-jibāli wanādā nūḥun ib'nahu wakāna fī maʿzilin yābunayya ir'kab maʿanā walā takun maʿa l-kāfirīna
Marathi ४२. आणि तो नौका त्यांना पर्वतासमान लाटांमधून नेत होती आणि नूहने आपल्या पुत्राला, जो एका किनाऱ्यावर होता, हाक मारून म्हटले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आमच्यासोबत स्वार हो आणि इन्कारी लोकांत सामील राहू नकोस.
Verse 43
قَالَ سَـَٔاوِىٓ إِلَىٰ جَبَلٍ يَعْصِمُنِى مِنَ ٱلْمَآءِ ۚ قَالَ لَا عَاصِمَ ٱلْيَوْمَ مِنْ أَمْرِ ٱللَّهِ إِلَّا مَن رَّحِمَ ۚ وَحَالَ بَيْنَهُمَا ٱلْمَوْجُ فَكَانَ مِنَ ٱلْمُغْرَقِينَ
Transliteration qāla saāwī ilā jabalin yaʿṣimunī mina l-māi qāla lā ʿāṣima l-yawma min amri l-lahi illā man raḥima waḥāla baynahumā l-mawju fakāna mina l-mugh'raqīna
Marathi ४३. त्याने उत्तर दिले की मी एखाद्या उंच पर्वताच्या आश्रयाला जाईन, जो मला पाण्यापासून वाचवील. नूह म्हणाले, आज अल्लाहच्या हुकुमाने वाचविणारा कोणीही नाही. केवळ तेच वाचतील, ज्यांच्यावर अल्लाहची दया- कृपा होईल, त्याच क्षणी त्यांच्या दरम्यान एक लाट आली आणि तो बुडणाऱ्यांपैकी झाला.
Verse 44
وَقِيلَ يَـٰٓأَرْضُ ٱبْلَعِى مَآءَكِ وَيَـٰسَمَآءُ أَقْلِعِى وَغِيضَ ٱلْمَآءُ وَقُضِىَ ٱلْأَمْرُ وَٱسْتَوَتْ عَلَى ٱلْجُودِىِّ ۖ وَقِيلَ بُعْدًا لِّلْقَوْمِ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration waqīla yāarḍu ib'laʿī māaki wayāsamāu aqliʿī waghīḍa l-māu waquḍiya l-amru wa-is'tawat ʿalā l-jūdiyi waqīla buʿ'dan lil'qawmi l-ẓālimīna
Marathi ४४. आणि फर्माविले गेले की, हे जमीन! आपले पाणी गिळून टाक, आणि हे आकाश! पुरे कर,थांब. त्याच वेळी पाणी सुकवले गेले आणि काम पूर्ण केले गेले आणि नौका जूदी नावाच्या पर्वताशी जाऊन थांबली आणि फर्माविले गेले अन्याय करणाऱ्यांवर धिक्काराचा वर्षाव होवो.
Verse 45
وَنَادَىٰ نُوحٌ رَّبَّهُۥ فَقَالَ رَبِّ إِنَّ ٱبْنِى مِنْ أَهْلِى وَإِنَّ وَعْدَكَ ٱلْحَقُّ وَأَنتَ أَحْكَمُ ٱلْحَـٰكِمِينَ
Transliteration wanādā nūḥun rabbahu faqāla rabbi inna ib'nī min ahlī wa-inna waʿdaka l-ḥaqu wa-anta aḥkamu l-ḥākimīna
Marathi ४५. आणि नूहने आपल्या पालनकर्त्यास पुकारले आणि म्हटले, हे माझ्या पालनकर्त्या! माझा पुत्र तर माझ्या कुटुंबियांपैकी आहे. निश्चितच तुझा वायदा पूर्णतः सच्चा आहे आणि तू समस्त शासकांपेक्षा उत्तम शासक आहे.
Verse 46
قَالَ يَـٰنُوحُ إِنَّهُۥ لَيْسَ مِنْ أَهْلِكَ ۖ إِنَّهُۥ عَمَلٌ غَيْرُ صَـٰلِحٍ ۖ فَلَا تَسْـَٔلْنِ مَا لَيْسَ لَكَ بِهِۦ عِلْمٌ ۖ إِنِّىٓ أَعِظُكَ أَن تَكُونَ مِنَ ٱلْجَـٰهِلِينَ
Transliteration qāla yānūḥu innahu laysa min ahlika innahu ʿamalun ghayru ṣāliḥin falā tasalni mā laysa laka bihi ʿil'mun innī aʿiẓuka an takūna mina l-jāhilīna
Marathi ४६. (अल्लाहने) फर्माविले, हे नूह! खात्रीने तो तुझ्या कुटुंबियांपैकी नाही.१ त्याची कर्मे अगदी नापसंतीची आहेत. तू कधीही अशा गोष्टीची याचना करू नये, जिचे तुला किंचितही ज्ञान नसावे. मी तुला उपदेश करतो की तू अडाणी लोकांमध्ये आपली गणना करण्यापासून थांब.
Verse 47
قَالَ رَبِّ إِنِّىٓ أَعُوذُ بِكَ أَنْ أَسْـَٔلَكَ مَا لَيْسَ لِى بِهِۦ عِلْمٌ ۖ وَإِلَّا تَغْفِرْ لِى وَتَرْحَمْنِىٓ أَكُن مِّنَ ٱلْخَـٰسِرِينَ
Transliteration qāla rabbi innī aʿūdhu bika an asalaka mā laysa lī bihi ʿil'mun wa-illā taghfir lī watarḥamnī akun mina l-khāsirīna
Marathi ४७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझेच शरण मागतो, या गोष्टीपासून की तुझ्याकडे अशा गोष्टीची याचना करावी, जिचे मला ज्ञानच नसावे जर तू मला माफ केले नाही आणि माझ्यावर दया केली नाही तर मी तोटा उचलणाऱ्यांपैकी होईन.
Verse 48
قِيلَ يَـٰنُوحُ ٱهْبِطْ بِسَلَـٰمٍ مِّنَّا وَبَرَكَـٰتٍ عَلَيْكَ وَعَلَىٰٓ أُمَمٍ مِّمَّن مَّعَكَ ۚ وَأُمَمٌ سَنُمَتِّعُهُمْ ثُمَّ يَمَسُّهُم مِّنَّا عَذَابٌ أَلِيمٌ
Transliteration qīla yānūḥu ih'biṭ bisalāmin minnā wabarakātin ʿalayka waʿalā umamin mimman maʿaka wa-umamun sanumattiʿuhum thumma yamassuhum minnā ʿadhābun alīmun
Marathi ४८. फर्माविले गेले, हे नूह! आमच्यातर्फे सलामती आणि त्या समृद्धींसह उतर ज्या तुझ्यावर आहेत आणि तुझ्यासोबतच्या अनेक जनसमुदायांवर आणि अनेक समुदाय असे असतील, ज्यांना आम्ही लाभ तर निश्चित पोहोचवू, परंतु नंतर त्यांना आमच्यातर्फे दुःखदायक शिक्षाही पोहोचेल.
Verse 49
تِلْكَ مِنْ أَنۢبَآءِ ٱلْغَيْبِ نُوحِيهَآ إِلَيْكَ ۖ مَا كُنتَ تَعْلَمُهَآ أَنتَ وَلَا قَوْمُكَ مِن قَبْلِ هَـٰذَا ۖ فَٱصْبِرْ ۖ إِنَّ ٱلْعَـٰقِبَةَ لِلْمُتَّقِينَ
Transliteration til'ka min anbāi l-ghaybi nūḥīhā ilayka mā kunta taʿlamuhā anta walā qawmuka min qabli hādhā fa-iṣ'bir inna l-ʿāqibata lil'muttaqīna
Marathi ४९. ही खबर परोक्षाच्या खबरींपैकी आहे, ज्यांची वहयी (अवतरण) आम्ही तुमच्याकडे करतो. यांना यापूर्वी ना तुम्ही जाणत होते, आणि ना तुमचा जनसमूह. यास्तव तुम्ही धीर- संयम राखा. निःसंशय, परिणाम अल्लाहचे भय राखून वागणाऱ्यांकरिताच आहे.
Verse 50
وَإِلَىٰ عَادٍ أَخَاهُمْ هُودًا ۚ قَالَ يَـٰقَوْمِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنْ إِلَـٰهٍ غَيْرُهُۥٓ ۖ إِنْ أَنتُمْ إِلَّا مُفْتَرُونَ
Transliteration wa-ilā ʿādin akhāhum hūdan qāla yāqawmi uʿ'budū l-laha mā lakum min ilāhin ghayruhu in antum illā muf'tarūna
Marathi ५०. आणि आद जनसमूहाकडे त्यांचे भाऊ हूद यांना पाठविले. हूद म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तुम्ही तर केवळ असत्य रचत आहात.
Verse 51
يَـٰقَوْمِ لَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ أَجْرًا ۖ إِنْ أَجْرِىَ إِلَّا عَلَى ٱلَّذِى فَطَرَنِىٓ ۚ أَفَلَا تَعْقِلُونَ
Transliteration yāqawmi lā asalukum ʿalayhi ajran in ajriya illā ʿalā alladhī faṭaranī afalā taʿqilūna
Marathi ५१. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुमच्याकडून याचा काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर त्याच्याकडे आहे, ज्याने मला निर्माण केले आहे. तर काय तरीही तुम्ही अकलेचा वापर करीत नाही?
Verse 52
وَيَـٰقَوْمِ ٱسْتَغْفِرُوا۟ رَبَّكُمْ ثُمَّ تُوبُوٓا۟ إِلَيْهِ يُرْسِلِ ٱلسَّمَآءَ عَلَيْكُم مِّدْرَارًا وَيَزِدْكُمْ قُوَّةً إِلَىٰ قُوَّتِكُمْ وَلَا تَتَوَلَّوْا۟ مُجْرِمِينَ
Transliteration wayāqawmi is'taghfirū rabbakum thumma tūbū ilayhi yur'sili l-samāa ʿalaykum mid'rāran wayazid'kum quwwatan ilā quwwatikum walā tatawallaw muj'rimīna
Marathi ५२. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ आपल्या अपराधांची माफी मागा आणि त्याच्या दरबारात तौबा (क्षमा-याचना) करा. यासाठी की त्याने पाऊस पाडणारे ढग तुमच्यावर पाठवावेत. आणि तुमच्या शक्ती-सामर्थ्यात आणखी वाढ करावी आणि तुम्ही गुन्हेगार बनून तोंड फिरवू नका.
Verse 53
قَالُوا۟ يَـٰهُودُ مَا جِئْتَنَا بِبَيِّنَةٍ وَمَا نَحْنُ بِتَارِكِىٓ ءَالِهَتِنَا عَن قَوْلِكَ وَمَا نَحْنُ لَكَ بِمُؤْمِنِينَ
Transliteration qālū yāhūdu mā ji'tanā bibayyinatin wamā naḥnu bitārikī ālihatinā ʿan qawlika wamā naḥnu laka bimu'minīna
Marathi ५३. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे हूद! तू आमच्याजवळ एखादे प्रमाण तर आणले नाही, आणि आम्ही केवळ तुझ्या सांगण्यावरून आपल्या दैवतांना सोडणार नाहीत आणि ना आम्ही तुझ्यावर ईमान राखणार आहोत.
Verse 54
إِن نَّقُولُ إِلَّا ٱعْتَرَىٰكَ بَعْضُ ءَالِهَتِنَا بِسُوٓءٍ ۗ قَالَ إِنِّىٓ أُشْهِدُ ٱللَّهَ وَٱشْهَدُوٓا۟ أَنِّى بَرِىٓءٌ مِّمَّا تُشْرِكُونَ
Transliteration in naqūlu illā iʿ'tarāka baʿḍu ālihatinā bisūin qāla innī ush'hidu l-laha wa-ish'hadū annī barīon mimmā tush'rikūna
Marathi ५४. किंबहुना आम्ही तर म्हणतो की तुला आमच्या एखाद्या दैवताने झपाटून टाकले आहे. हूद म्हणाले, मी अल्लाहला साक्षी बनवितो आणि तुम्हीदेखील साक्षी राहा की मी तर अल्लाहखेरीज त्या सर्वांपासून वेगळा आहे, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी बनवित आहात.
Verse 55
مِن دُونِهِۦ ۖ فَكِيدُونِى جَمِيعًا ثُمَّ لَا تُنظِرُونِ
Transliteration min dūnihi fakīdūnī jamīʿan thumma lā tunẓirūni
Marathi ५५. ठीक, तुम्ही सर्व मिळून माझ्याविरूद्ध वाईट कारवाई करून टाका, आणि मला कधीही सवड देऊ नका.
Verse 56
إِنِّى تَوَكَّلْتُ عَلَى ٱللَّهِ رَبِّى وَرَبِّكُم ۚ مَّا مِن دَآبَّةٍ إِلَّا هُوَ ءَاخِذٌۢ بِنَاصِيَتِهَآ ۚ إِنَّ رَبِّى عَلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration innī tawakkaltu ʿalā l-lahi rabbī warabbikum mā min dābbatin illā huwa ākhidhun bināṣiyatihā inna rabbī ʿalā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi ५६. माझा भरोसा केवळ अल्लाहवरच आहे, जो माझा पालनकर्ता आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे. जेवढेदेखील चालणारे फिरणारे आहेत, त्या सर्वांचे मस्तिष्क (कपाळ) त्यानेच धरून ठेवले आहे. निःसंशय माझा पालनकर्ता अगदी सरळ मार्गावर आहे.
Verse 57
فَإِن تَوَلَّوْا۟ فَقَدْ أَبْلَغْتُكُم مَّآ أُرْسِلْتُ بِهِۦٓ إِلَيْكُمْ ۚ وَيَسْتَخْلِفُ رَبِّى قَوْمًا غَيْرَكُمْ وَلَا تَضُرُّونَهُۥ شَيْـًٔا ۚ إِنَّ رَبِّى عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ حَفِيظٌ
Transliteration fa-in tawallaw faqad ablaghtukum mā ur'sil'tu bihi ilaykum wayastakhlifu rabbī qawman ghayrakum walā taḍurrūnahu shayan inna rabbī ʿalā kulli shayin ḥafīẓun
Marathi ५७. तरीही तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा. मी तर तुम्हाला तो संदेश पोहचता केला, जो देऊन मला तुमच्याकडे पाठविले गेले होते. माझा पालनकर्ता तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना आणील आणि तुम्ही त्याचे काहीच बिघडवू शकणार नाहीत. निःसंशय माझा पालनकर्ता प्रत्येक चीज वस्तूचा संरक्षक आहे.
Verse 58
وَلَمَّا جَآءَ أَمْرُنَا نَجَّيْنَا هُودًا وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَنَجَّيْنَـٰهُم مِّنْ عَذَابٍ غَلِيظٍ
Transliteration walammā jāa amrunā najjaynā hūdan wa-alladhīna āmanū maʿahu biraḥmatin minnā wanajjaynāhum min ʿadhābin ghalīẓin
Marathi ५८. आणि जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, तेव्हा आम्ही हूदला आणि त्याच्या ईमानधारक साथीदारांना आपल्या खास दया-कृपेने सुटका प्रदान केली आणि आम्ही त्या सर्वांना भयंकर (सक्त) शिक्षा-यातनेपासून वाचविले.१
Verse 59
وَتِلْكَ عَادٌ ۖ جَحَدُوا۟ بِـَٔايَـٰتِ رَبِّهِمْ وَعَصَوْا۟ رُسُلَهُۥ وَٱتَّبَعُوٓا۟ أَمْرَ كُلِّ جَبَّارٍ عَنِيدٍ
Transliteration watil'ka ʿādun jaḥadū biāyāti rabbihim waʿaṣaw rusulahu wa-ittabaʿū amra kulli jabbārin ʿanīdin
Marathi ५९. हा होता आदचा जनसमूह, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा केली आणि प्रत्येक विद्रोही अवज्ञाकारीच्या आदेशांचे पालन केले.
Verse 60
وَأُتْبِعُوا۟ فِى هَـٰذِهِ ٱلدُّنْيَا لَعْنَةً وَيَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ ۗ أَلَآ إِنَّ عَادًا كَفَرُوا۟ رَبَّهُمْ ۗ أَلَا بُعْدًا لِّعَادٍ قَوْمِ هُودٍ
Transliteration wa-ut'biʿū fī hādhihi l-dun'yā laʿnatan wayawma l-qiyāmati alā inna ʿādan kafarū rabbahum alā buʿ'dan liʿādin qawmi hūdin
Marathi ६०. आणि या जगातही त्यांचा धिःक्कार व निर्भत्सना होत राहिली आणि कयामतच्या दिवशीही १ पाहा, आदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला. हूदचा जनसमूह आदचा धिःक्कार असो.
Verse 61
۞ وَإِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمْ صَـٰلِحًا ۚ قَالَ يَـٰقَوْمِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنْ إِلَـٰهٍ غَيْرُهُۥ ۖ هُوَ أَنشَأَكُم مِّنَ ٱلْأَرْضِ وَٱسْتَعْمَرَكُمْ فِيهَا فَٱسْتَغْفِرُوهُ ثُمَّ تُوبُوٓا۟ إِلَيْهِ ۚ إِنَّ رَبِّى قَرِيبٌ مُّجِيبٌ
Transliteration wa-ilā thamūda akhāhum ṣāliḥan qāla yāqawmi uʿ'budū l-laha mā lakum min ilāhin ghayruhu huwa ansha-akum mina l-arḍi wa-is'taʿmarakum fīhā fa-is'taghfirūhu thumma tūbū ilayhi inna rabbī qarībun mujībun
Marathi ६१. आणि समूदच्या जनसमूहाकडे त्यांचे भाऊ सॉलेह यांना पाठविले. सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहचीच भक्ती उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. त्यानेच तुम्हाला जमिनीपासून निर्माण केले आहे, आणि त्याने या धरतीवर तुम्हाला आबाद केले आहे. यास्तव तुम्ही त्याच्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे तौबा (क्षमा-याचना) करा. निःसंशय माझा पालनकर्ता तौबा कबूल करणारा समीप आहे.
Verse 62
قَالُوا۟ يَـٰصَـٰلِحُ قَدْ كُنتَ فِينَا مَرْجُوًّا قَبْلَ هَـٰذَآ ۖ أَتَنْهَىٰنَآ أَن نَّعْبُدَ مَا يَعْبُدُ ءَابَآؤُنَا وَإِنَّنَا لَفِى شَكٍّ مِّمَّا تَدْعُونَآ إِلَيْهِ مُرِيبٍ
Transliteration qālū yāṣāliḥu qad kunta fīnā marjuwwan qabla hādhā atanhānā an naʿbuda mā yaʿbudu ābāunā wa-innanā lafī shakkin mimmā tadʿūnā ilayhi murībin
Marathi ६२. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे सॉलेह! याच्या पूर्वी आम्ही तुमच्याकडून अनेक आशा अपेक्षा बाळगून होतो. काय तुम्ही आम्हाला त्यांच्या भक्तीपासून रोखता, ज्यांची भक्ती आराधना आमचे वाडवडील करत आले, आम्हाला तर या धर्माबाबत शंका आहे, ज्याकडे तुम्ही आम्हाला बोलावित आहात.
Verse 63
قَالَ يَـٰقَوْمِ أَرَءَيْتُمْ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّى وَءَاتَىٰنِى مِنْهُ رَحْمَةً فَمَن يَنصُرُنِى مِنَ ٱللَّهِ إِنْ عَصَيْتُهُۥ ۖ فَمَا تَزِيدُونَنِى غَيْرَ تَخْسِيرٍ
Transliteration qāla yāqawmi ara-aytum in kuntu ʿalā bayyinatin min rabbī waātānī min'hu raḥmatan faman yanṣurunī mina l-lahi in ʿaṣaytuhu famā tazīdūnanī ghayra takhsīrin
Marathi ६३. सालेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! बरे हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखाद्या खास प्रमाणावर असेल आणि त्याने मला आपल्या जवळून दया-कृपा प्रदान केली असेल, मग मी जर त्याची अवज्ञा केली तर असा कोण आहे, जो त्याच्यासमोर माझी मदत करेल? तुम्ही तर माझ्या नुकसानातच भर टाकत आहात.
Verse 64
وَيَـٰقَوْمِ هَـٰذِهِۦ نَاقَةُ ٱللَّهِ لَكُمْ ءَايَةً فَذَرُوهَا تَأْكُلْ فِىٓ أَرْضِ ٱللَّهِ وَلَا تَمَسُّوهَا بِسُوٓءٍ فَيَأْخُذَكُمْ عَذَابٌ قَرِيبٌ
Transliteration wayāqawmi hādhihi nāqatu l-lahi lakum āyatan fadharūhā takul fī arḍi l-lahi walā tamassūhā bisūin fayakhudhakum ʿadhābun qarībun
Marathi ६४. आणि हे माझ्या जातीबांधवांनो! ही अल्लाहने पाठविलेली सांडणी आहे, जी तुमच्याकरिता अल्लाहचा एक चमत्कार आहे. आता तुम्ही तिला अल्लाहच्या धरतीवर चरण्यासाठी मोकळे सोडा आणि तिला कशाही प्रकारचा त्रास पोहचवू नका, अन्यथा लवकरच तुम्हाला अज़ाब येऊन धरेल.
Verse 65
فَعَقَرُوهَا فَقَالَ تَمَتَّعُوا۟ فِى دَارِكُمْ ثَلَـٰثَةَ أَيَّامٍ ۖ ذَٰلِكَ وَعْدٌ غَيْرُ مَكْذُوبٍ
Transliteration faʿaqarūhā faqāla tamattaʿū fī dārikum thalāthata ayyāmin dhālika waʿdun ghayru makdhūbin
Marathi ६५. तरीही त्या लोकांनी त्या सांडणीचे पाय कापून (मारून टाकले). यावर सॉलेह म्हणाले, ठीक तर तुम्ही आपल्या घरांमध्ये तीन दिवस पर्यंत वास्तव्य करून घ्या, हा वायदा खोटा नाही.
Verse 66
فَلَمَّا جَآءَ أَمْرُنَا نَجَّيْنَا صَـٰلِحًا وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَمِنْ خِزْىِ يَوْمِئِذٍ ۗ إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلْقَوِىُّ ٱلْعَزِيزُ
Transliteration falammā jāa amrunā najjaynā ṣāliḥan wa-alladhīna āmanū maʿahu biraḥmatin minnā wamin khiz'yi yawmi-idhin inna rabbaka huwa l-qawiyu l-ʿazīzu
Marathi ६६. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही सॉलेह आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना आपल्या दया-कृपेने त्या (शिक्षे) पासूनही वाचविले आणि त्या दिवसाच्या अपमानापासूनही. निःसंशय तुमचा पालनकर्ता शक्तिशाली आणि जबरदस्त आहे.
Verse 67
وَأَخَذَ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ ٱلصَّيْحَةُ فَأَصْبَحُوا۟ فِى دِيَـٰرِهِمْ جَـٰثِمِينَ
Transliteration wa-akhadha alladhīna ẓalamū l-ṣayḥatu fa-aṣbaḥū fī diyārihim jāthimīna
Marathi ६७. आणि अत्याचारी लोकांना मोठा भयंकर आवाजाने येऊन धरले, मग ते आपल्या घरांमध्ये तोंडघशी मरून पडलेले राहिले.
Verse 68
كَأَن لَّمْ يَغْنَوْا۟ فِيهَآ ۗ أَلَآ إِنَّ ثَمُودَا۟ كَفَرُوا۟ رَبَّهُمْ ۗ أَلَا بُعْدًا لِّثَمُودَ
Transliteration ka-an lam yaghnaw fīhā alā inna thamūdā kafarū rabbahum alā buʿ'dan lithamūda
Marathi ६८. अशा प्रकारे जणू ते त्या ठिकाणी कधी राहिलेच नव्हते. सावधान! समूदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याचा इन्कार केला. ऐका! त्या समूदच्या लोकांवर धिःक्कार आहे.
Verse 69
وَلَقَدْ جَآءَتْ رُسُلُنَآ إِبْرَٰهِيمَ بِٱلْبُشْرَىٰ قَالُوا۟ سَلَـٰمًا ۖ قَالَ سَلَـٰمٌ ۖ فَمَا لَبِثَ أَن جَآءَ بِعِجْلٍ حَنِيذٍ
Transliteration walaqad jāat rusulunā ib'rāhīma bil-bush'rā qālū salāman qāla salāmun famā labitha an jāa biʿij'lin ḥanīdhin
Marathi ६९. आणि आम्ही पाठिवलेले दूत इब्राहीमजवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले आणि सलाम म्हणाले. त्यांनीदेखील सलामचे प्रत्युत्तर दिले आणि विनाविलंब भाजलेले वासरु घेऊन आले.
Verse 70
فَلَمَّا رَءَآ أَيْدِيَهُمْ لَا تَصِلُ إِلَيْهِ نَكِرَهُمْ وَأَوْجَسَ مِنْهُمْ خِيفَةً ۚ قَالُوا۟ لَا تَخَفْ إِنَّآ أُرْسِلْنَآ إِلَىٰ قَوْمِ لُوطٍ
Transliteration falammā raā aydiyahum lā taṣilu ilayhi nakirahum wa-awjasa min'hum khīfatan qālū lā takhaf innā ur'sil'nā ilā qawmi lūṭin
Marathi ७०. आणि जेव्हा पाहिले की त्यांचे हातदेखील त्या (खाद्या) कडे पोहचत नाही, तर त्यांना अनोळखी जाणून मनातल्या मनात भयभीत होऊ लागले. दूत म्हणाले, भिऊ नका. आम्हाला तर लूतच्या जनसमूहाकडे पाठविले गेले आहे.
Verse 71
وَٱمْرَأَتُهُۥ قَآئِمَةٌ فَضَحِكَتْ فَبَشَّرْنَـٰهَا بِإِسْحَـٰقَ وَمِن وَرَآءِ إِسْحَـٰقَ يَعْقُوبَ
Transliteration wa-im'ra-atuhu qāimatun faḍaḥikat fabasharnāhā bi-is'ḥāqa wamin warāi is'ḥāqa yaʿqūba
Marathi ७१. आणि त्यांची पत्नी, जी उभी होती, ती हसली, तेव्हा आम्ही तिला इसहाकचा आणि त्याच्यानंतर याकूबचा शुभ समाचार दिला.
Verse 72
قَالَتْ يَـٰوَيْلَتَىٰٓ ءَأَلِدُ وَأَنَا۠ عَجُوزٌ وَهَـٰذَا بَعْلِى شَيْخًا ۖ إِنَّ هَـٰذَا لَشَىْءٌ عَجِيبٌ
Transliteration qālat yāwaylatā a-alidu wa-anā ʿajūzun wahādhā baʿlī shaykhan inna hādhā lashayon ʿajībun
Marathi ७२. ती म्हणू लागली, हाय रे दुर्दैव! मला मूलबाळ होऊ शकते? मी तर स्वतः म्हातारी आणि माझे पतीही खूप वयस्कर आहेत. निश्चितच ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय.
Verse 73
قَالُوٓا۟ أَتَعْجَبِينَ مِنْ أَمْرِ ٱللَّهِ ۖ رَحْمَتُ ٱللَّهِ وَبَرَكَـٰتُهُۥ عَلَيْكُمْ أَهْلَ ٱلْبَيْتِ ۚ إِنَّهُۥ حَمِيدٌ مَّجِيدٌ
Transliteration qālū ataʿjabīna min amri l-lahi raḥmatu l-lahi wabarakātuhu ʿalaykum ahla l-bayti innahu ḥamīdun majīdun
Marathi ७३. (फरिश्ते) म्हणाले, काय तुम्हाला अल्लाहच्या सामर्थ्याविषयी आश्चर्य वाटत आहे. या घराच्या लोकांनो! तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा आणि त्याच्या बरकती (समृद्धी) अवतरीत होवो! निःसंशय समस्त स्तुती- प्रशंसा आणि शान- वैभव अल्लाहकरिताच आहे.
Verse 74
فَلَمَّا ذَهَبَ عَنْ إِبْرَٰهِيمَ ٱلرَّوْعُ وَجَآءَتْهُ ٱلْبُشْرَىٰ يُجَـٰدِلُنَا فِى قَوْمِ لُوطٍ
Transliteration falammā dhahaba ʿan ib'rāhīma l-rawʿu wajāathu l-bush'rā yujādilunā fī qawmi lūṭin
Marathi ७४. जेव्हा इब्राहीम यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांना शुभ समाचारही कळला तेव्हा लूतच्या जनसमूहाबाबत आमच्याशी वादविवाद करू लागले.
Verse 75
إِنَّ إِبْرَٰهِيمَ لَحَلِيمٌ أَوَّٰهٌ مُّنِيبٌ
Transliteration inna ib'rāhīma laḥalīmun awwāhun munībun
Marathi ७५. निःसंशय, इब्राहीम मोठे संयमशील आणि कोमल मनाचे आणि अल्लाहकडे झुकणारे होते.
Verse 76
يَـٰٓإِبْرَٰهِيمُ أَعْرِضْ عَنْ هَـٰذَآ ۖ إِنَّهُۥ قَدْ جَآءَ أَمْرُ رَبِّكَ ۖ وَإِنَّهُمْ ءَاتِيهِمْ عَذَابٌ غَيْرُ مَرْدُودٍ
Transliteration yāib'rāhīmu aʿriḍ ʿan hādhā innahu qad jāa amru rabbika wa-innahum ātīhim ʿadhābun ghayru mardūdin
Marathi ७६. हे इब्राहीम! हा इरादा सोडून द्या. तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला आहे, आणि त्यांच्यावर न परतविल्या जाणाऱ्या शिक्षा- यातना अवश्य येणार आहेत.
Verse 77
وَلَمَّا جَآءَتْ رُسُلُنَا لُوطًا سِىٓءَ بِهِمْ وَضَاقَ بِهِمْ ذَرْعًا وَقَالَ هَـٰذَا يَوْمٌ عَصِيبٌ
Transliteration walammā jāat rusulunā lūṭan sīa bihim waḍāqa bihim dharʿan waqāla hādhā yawmun ʿaṣībun
Marathi ७७. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूतजवळ पोहोचले, तेव्हा त्यांच्या कारणाने ते फार दुःखी झाले आणि मनातल्या मनात दुःख करू लागले आणि म्हणू लागले, आजचा दिवस फार दुःखाचा दिवस आहे.
Verse 78
وَجَآءَهُۥ قَوْمُهُۥ يُهْرَعُونَ إِلَيْهِ وَمِن قَبْلُ كَانُوا۟ يَعْمَلُونَ ٱلسَّيِّـَٔاتِ ۚ قَالَ يَـٰقَوْمِ هَـٰٓؤُلَآءِ بَنَاتِى هُنَّ أَطْهَرُ لَكُمْ ۖ فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَلَا تُخْزُونِ فِى ضَيْفِىٓ ۖ أَلَيْسَ مِنكُمْ رَجُلٌ رَّشِيدٌ
Transliteration wajāahu qawmuhu yuh'raʿūna ilayhi wamin qablu kānū yaʿmalūna l-sayiāti qāla yāqawmi hāulāi banātī hunna aṭharu lakum fa-ittaqū l-laha walā tukh'zūni fī ḍayfī alaysa minkum rajulun rashīdun
Marathi ७८. आणि त्याच्या जनसमूहाचे लोक त्यांच्याकडे धावत आले. ते तर आधीपासूनच वाईट कामात मग्न होते. (लूत) म्हणाले की, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माझ्या या मुली आहेत, ज्या तुमच्यासाठी फार साफसुथऱ्या आहेत. अल्लाहचे भय राखा आणि मला माझ्या पाहुण्यांबाबत अपमानित करू नका. काय तुमच्यात एकही भला माणूस नाही?
Verse 79
قَالُوا۟ لَقَدْ عَلِمْتَ مَا لَنَا فِى بَنَاتِكَ مِنْ حَقٍّ وَإِنَّكَ لَتَعْلَمُ مَا نُرِيدُ
Transliteration qālū laqad ʿalim'ta mā lanā fī banātika min ḥaqqin wa-innaka lataʿlamu mā nurīdu
Marathi ७९. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आम्हाला तुमच्या मुलीवर कसलाही अधिकार नाही आणि तुम्ही आमची खरी इच्छा चांगल्या प्रकारे जाणून आहात.
Verse 80
قَالَ لَوْ أَنَّ لِى بِكُمْ قُوَّةً أَوْ ءَاوِىٓ إِلَىٰ رُكْنٍ شَدِيدٍ
Transliteration qāla law anna lī bikum quwwatan aw āwī ilā ruk'nin shadīdin
Marathi ८०. (लूत) म्हणाले, मला तुमच्याशी लढण्याची शक्ती असती तर फार बरे झाले असते किंवा मी एखाद्या मजबूत आश्रयाला असतो.
Verse 81
قَالُوا۟ يَـٰلُوطُ إِنَّا رُسُلُ رَبِّكَ لَن يَصِلُوٓا۟ إِلَيْكَ ۖ فَأَسْرِ بِأَهْلِكَ بِقِطْعٍ مِّنَ ٱلَّيْلِ وَلَا يَلْتَفِتْ مِنكُمْ أَحَدٌ إِلَّا ٱمْرَأَتَكَ ۖ إِنَّهُۥ مُصِيبُهَا مَآ أَصَابَهُمْ ۚ إِنَّ مَوْعِدَهُمُ ٱلصُّبْحُ ۚ أَلَيْسَ ٱلصُّبْحُ بِقَرِيبٍ
Transliteration qālū yālūṭu innā rusulu rabbika lan yaṣilū ilayka fa-asri bi-ahlika biqiṭ'ʿin mina al-layli walā yaltafit minkum aḥadun illā im'ra-ataka innahu muṣībuhā mā aṣābahum inna mawʿidahumu l-ṣub'ḥu alaysa l-ṣub'ḥu biqarībin
Marathi ८१. आता (फरिश्ते) म्हणाले, हे लूत! आम्ही तुमच्या पालनकर्त्याचे पाठविलेले आहोत. अशक्य आहे की हे तुमच्यापर्यंत पोहचावेत. तेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबियांना घेऊन थोडी रात्र बाकी राहताना निघून जा. तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये. मात्र तुमच्या पत्नीखेरीज, कारण तिलाही तेच पोहचणार आहे, जे सर्वांना पोहोचेल. निश्चितच त्यांच्या वायद्याची वेळ सकाळची आहे, तर काय सकाळ अगदी जवळ नाही?
Verse 82
فَلَمَّا جَآءَ أَمْرُنَا جَعَلْنَا عَـٰلِيَهَا سَافِلَهَا وَأَمْطَرْنَا عَلَيْهَا حِجَارَةً مِّن سِجِّيلٍ مَّنضُودٍ
Transliteration falammā jāa amrunā jaʿalnā ʿāliyahā sāfilahā wa-amṭarnā ʿalayhā ḥijāratan min sijjīlin manḍūdin
Marathi ८२. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही त्या वस्तीला उलथे पालथे करून टाकले. वरचा हिस्सा खाली केला आणि त्यांच्यावर खंगर दगडांचा वर्षाव केला जे थरावर थर होते.
Verse 83
مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَ ۖ وَمَا هِىَ مِنَ ٱلظَّـٰلِمِينَ بِبَعِيدٍ
Transliteration musawwamatan ʿinda rabbika wamā hiya mina l-ẓālimīna bibaʿīdin
Marathi ८३. तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित (निशाण असलेले) होते आणि ते त्या अत्याचारीपासून किंचितचही दूर नव्हते.
Verse 84
۞ وَإِلَىٰ مَدْيَنَ أَخَاهُمْ شُعَيْبًا ۚ قَالَ يَـٰقَوْمِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنْ إِلَـٰهٍ غَيْرُهُۥ ۖ وَلَا تَنقُصُوا۟ ٱلْمِكْيَالَ وَٱلْمِيزَانَ ۚ إِنِّىٓ أَرَىٰكُم بِخَيْرٍ وَإِنِّىٓ أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ مُّحِيطٍ
Transliteration wa-ilā madyana akhāhum shuʿayban qāla yāqawmi uʿ'budū l-laha mā lakum min ilāhin ghayruhu walā tanquṣū l-mik'yāla wal-mīzāna innī arākum bikhayrin wa-innī akhāfu ʿalaykum ʿadhāba yawmin muḥīṭin
Marathi ८४. आणि (आम्ही) मदयनच्या लोकांकडे त्यांचे भाऊ शुऐबला पाठविले. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. तुम्ही माप-तोल करण्यात कमी करू नका. मी तुम्हाला सुसंपन्न अवस्थेत पाहात आहे आणि मला तुमच्याबद्दल घेरून टाकणाऱ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा-यातने) चे भयदेखील आहे.
Verse 85
وَيَـٰقَوْمِ أَوْفُوا۟ ٱلْمِكْيَالَ وَٱلْمِيزَانَ بِٱلْقِسْطِ ۖ وَلَا تَبْخَسُوا۟ ٱلنَّاسَ أَشْيَآءَهُمْ وَلَا تَعْثَوْا۟ فِى ٱلْأَرْضِ مُفْسِدِينَ
Transliteration wayāqawmi awfū l-mik'yāla wal-mīzāna bil-qis'ṭi walā tabkhasū l-nāsa ashyāahum walā taʿthaw fī l-arḍi muf'sidīna
Marathi ८५. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माप-तोल न्यायपूर्वक करा, लोकांना त्यांच्या वस्तू कमी (करून) देऊ नका आणि धरतीत उत्पात आणि बिघाड माजवू नका.
Verse 86
بَقِيَّتُ ٱللَّهِ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ ۚ وَمَآ أَنَا۠ عَلَيْكُم بِحَفِيظٍ
Transliteration baqiyyatu l-lahi khayrun lakum in kuntum mu'minīna wamā anā ʿalaykum biḥafīẓin
Marathi ८६. अल्लाहचा हलाल (वैध) केलेला बाकी फायदा तुमच्यासाठी फारच चांगला आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल. मी काही तुमच्यावर देखरेख ठेवणारा नाही.
Verse 87
قَالُوا۟ يَـٰشُعَيْبُ أَصَلَوٰتُكَ تَأْمُرُكَ أَن نَّتْرُكَ مَا يَعْبُدُ ءَابَآؤُنَآ أَوْ أَن نَّفْعَلَ فِىٓ أَمْوَٰلِنَا مَا نَشَـٰٓؤُا۟ ۖ إِنَّكَ لَأَنتَ ٱلْحَلِيمُ ٱلرَّشِيدُ
Transliteration qālū yāshuʿaybu aṣalatuka tamuruka an natruka mā yaʿbudu ābāunā aw an nafʿala fī amwālinā mā nashāu innaka la-anta l-ḥalīmu l-rashīdu
Marathi ८७. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले, हे शुऐब! काय तुमची उपासना तुम्हाला हाच आदेश देते की आम्ही आपल्या वाडवडिलांच्या आराध्य दैवतांना सोडून द्यावे आणि आम्ही आपल्या धन-संपत्तीत जे काही करू इच्छितो, ते करणेही सोडून द्यावे. तुम्ही तर मोठे समंजस आणि सदाचारी आहात.
Verse 88
قَالَ يَـٰقَوْمِ أَرَءَيْتُمْ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّى وَرَزَقَنِى مِنْهُ رِزْقًا حَسَنًا ۚ وَمَآ أُرِيدُ أَنْ أُخَالِفَكُمْ إِلَىٰ مَآ أَنْهَىٰكُمْ عَنْهُ ۚ إِنْ أُرِيدُ إِلَّا ٱلْإِصْلَـٰحَ مَا ٱسْتَطَعْتُ ۚ وَمَا تَوْفِيقِىٓ إِلَّا بِٱللَّهِ ۚ عَلَيْهِ تَوَكَّلْتُ وَإِلَيْهِ أُنِيبُ
Transliteration qāla yāqawmi ara-aytum in kuntu ʿalā bayyinatin min rabbī warazaqanī min'hu riz'qan ḥasanan wamā urīdu an ukhālifakum ilā mā anhākum ʿanhu in urīdu illā l-iṣ'lāḥa mā is'taṭaʿtu wamā tawfīqī illā bil-lahi ʿalayhi tawakkaltu wa-ilayhi unību
Marathi ८८. शुऐब म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! पाहा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणासह आहे आणि त्याने आपल्याकडून चांगली रोजी (अन्नसामुग्री) देऊन ठेवली आहे. माझी कधीही ही इच्छा नाही की तुम्हाला मनाई करून स्वतः त्या गोष्टीकडे झुकावे जिच्यापासून तुम्हाला रोखत आहे. माझा इरादा तर आपल्या कुवतीनुसार सुधारणा करण्याचाच आहे, आणि माझी सुबुद्धी (तौफीक) अल्लाहच्याच मदतीने आहे. त्याच्यावरच माझा भरोसा आहे, आणि त्याच्याकडेच मला परतून जायचे आहे.
Verse 89
وَيَـٰقَوْمِ لَا يَجْرِمَنَّكُمْ شِقَاقِىٓ أَن يُصِيبَكُم مِّثْلُ مَآ أَصَابَ قَوْمَ نُوحٍ أَوْ قَوْمَ هُودٍ أَوْ قَوْمَ صَـٰلِحٍ ۚ وَمَا قَوْمُ لُوطٍ مِّنكُم بِبَعِيدٍ
Transliteration wayāqawmi lā yajrimannakum shiqāqī an yuṣībakum mith'lu mā aṣāba qawma nūḥin aw qawma hūdin aw qawma ṣāliḥin wamā qawmu lūṭin minkum bibaʿīdin
Marathi ८९. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! कदाचित असे न व्हावे की तुम्ही माझ्या विरोधात येऊन त्या शिक्षा-यातनांना पात्र ठरावे ज्या नूहच्या जनसमूहावर आणि हूदच्या जनसमूहावर आणि सालेहच्या जनसमूहावर आल्या आणि लूतचा जनसमूह तर तुमच्यापासून किंचितही दूर नाही!
Verse 90
وَٱسْتَغْفِرُوا۟ رَبَّكُمْ ثُمَّ تُوبُوٓا۟ إِلَيْهِ ۚ إِنَّ رَبِّى رَحِيمٌ وَدُودٌ
Transliteration wa-is'taghfirū rabbakum thumma tūbū ilayhi inna rabbī raḥīmun wadūdun
Marathi ९०. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे झुका. निश्चितच माझा पालनकर्ता अतिशय दयावान आणि खूप प्रेम करणारा आहे.
Verse 91
قَالُوا۟ يَـٰشُعَيْبُ مَا نَفْقَهُ كَثِيرًا مِّمَّا تَقُولُ وَإِنَّا لَنَرَىٰكَ فِينَا ضَعِيفًا ۖ وَلَوْلَا رَهْطُكَ لَرَجَمْنَـٰكَ ۖ وَمَآ أَنتَ عَلَيْنَا بِعَزِيزٍ
Transliteration qālū yāshuʿaybu mā nafqahu kathīran mimmā taqūlu wa-innā lanarāka fīnā ḍaʿīfan walawlā rahṭuka larajamnāka wamā anta ʿalaynā biʿazīzin
Marathi ९१. ते (लोक) म्हणाले, हे शुऐब! तुमच्या बहुतेक गोष्टी आम्हाला समजत नाही आणि आम्ही तुम्हाला आपल्या दरम्यान खूप कमकुवत असल्याचे पाहतो. जर तुमच्या कबिल्याविषयी आदर नसता तर आम्ही तुमच्यावर दगडफेक केली असती आणि आम्ही तुम्हाला एखादा प्रतिष्ठित मनुष्य समजत नाही.
Verse 92
قَالَ يَـٰقَوْمِ أَرَهْطِىٓ أَعَزُّ عَلَيْكُم مِّنَ ٱللَّهِ وَٱتَّخَذْتُمُوهُ وَرَآءَكُمْ ظِهْرِيًّا ۖ إِنَّ رَبِّى بِمَا تَعْمَلُونَ مُحِيطٌ
Transliteration qāla yāqawmi arahṭī aʿazzu ʿalaykum mina l-lahi wa-ittakhadhtumūhu warāakum ẓih'riyyan inna rabbī bimā taʿmalūna muḥīṭun
Marathi ९२. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्या दृष्टीने माझ्या कबिल्याचे लोक अल्लाहपेक्षा जास्त सन्मानित आहेत की (ज्यामुळे) तुम्ही त्याला पाठीमागे टाकले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, माझ्या पालनकर्त्याने ते सर्व घेरलेले आहे.
Verse 93
وَيَـٰقَوْمِ ٱعْمَلُوا۟ عَلَىٰ مَكَانَتِكُمْ إِنِّى عَـٰمِلٌ ۖ سَوْفَ تَعْلَمُونَ مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَمَنْ هُوَ كَـٰذِبٌ ۖ وَٱرْتَقِبُوٓا۟ إِنِّى مَعَكُمْ رَقِيبٌ
Transliteration wayāqawmi iʿ'malū ʿalā makānatikum innī ʿāmilun sawfa taʿlamūna man yatīhi ʿadhābun yukh'zīhi waman huwa kādhibun wa-ir'taqibū innī maʿakum raqībun
Marathi ९३. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आता तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा, मीदेखील काम करीत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की कोणाकडे तो अज़ाब येतो, जो त्याला अपमानित करून टाकील आणि असा कोण आहे जो खोटा आहे? तुम्ही प्रतिक्षा करा आणि मीदेखील तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहे.
Verse 94
وَلَمَّا جَآءَ أَمْرُنَا نَجَّيْنَا شُعَيْبًا وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مَعَهُۥ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَأَخَذَتِ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ ٱلصَّيْحَةُ فَأَصْبَحُوا۟ فِى دِيَـٰرِهِمْ جَـٰثِمِينَ
Transliteration walammā jāa amrunā najjaynā shuʿayban wa-alladhīna āmanū maʿahu biraḥmatin minnā wa-akhadhati alladhīna ẓalamū l-ṣayḥatu fa-aṣbaḥū fī diyārihim jāthimīna
Marathi ९४. आणि जेव्हा आमचा आदेश (अज़ाब) येऊन पोहोचला, आम्ही शुऐबला आणि त्यांच्यासह समस्त ईमानधारकांना आपल्या खास कृपेने मुक्ती प्रदान केली आणि अत्याचारी लोकांना मोठ्या भयंकर आवाजाच्या अज़ाबाने येऊन धरले१ ज्यामुळे ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले.
Verse 95
كَأَن لَّمْ يَغْنَوْا۟ فِيهَآ ۗ أَلَا بُعْدًا لِّمَدْيَنَ كَمَا بَعِدَتْ ثَمُودُ
Transliteration ka-an lam yaghnaw fīhā alā buʿ'dan limadyana kamā baʿidat thamūdu
Marathi ९५. जणू काही ते त्या घरांमध्ये कधी राहिलेच नव्हते. सावध राहा! मदयनकरिताही तसाच दुरावा असो, जसा दुरावा समूदसाठी झाला.
Verse 96
وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَىٰ بِـَٔايَـٰتِنَا وَسُلْطَـٰنٍ مُّبِينٍ
Transliteration walaqad arsalnā mūsā biāyātinā wasul'ṭānin mubīnin
Marathi ९६. आणि निःसंशय, आम्हीच मूसाला आपल्या आयती आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले होते.
Verse 97
إِلَىٰ فِرْعَوْنَ وَمَلَإِي۟هِۦ فَٱتَّبَعُوٓا۟ أَمْرَ فِرْعَوْنَ ۖ وَمَآ أَمْرُ فِرْعَوْنَ بِرَشِيدٍ
Transliteration ilā fir'ʿawna wamala-ihi fa-ittabaʿū amra fir'ʿawna wamā amru fir'ʿawna birashīdin
Marathi ९७. फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे, तरीही त्या लोकांनी फिरऔनच्या आदेशांचे पालन केले आणि फिरऔनचा कोणताही आदेश उचित आणि रास्त नव्हता.
Verse 98
يَقْدُمُ قَوْمَهُۥ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ فَأَوْرَدَهُمُ ٱلنَّارَ ۖ وَبِئْسَ ٱلْوِرْدُ ٱلْمَوْرُودُ
Transliteration yaqdumu qawmahu yawma l-qiyāmati fa-awradahumu l-nāra wabi'sa l-wir'du l-mawrūdu
Marathi ९८. तो तर कयामतच्या दिवशी आपल्या जनसमूहाचा पुढाकार घेऊन त्या सर्वांना नरकात आणून उभा करील. तो मोठा वाईट घाट आहे जिथे हे लोक जाऊन पोहचतील.
Verse 99
وَأُتْبِعُوا۟ فِى هَـٰذِهِۦ لَعْنَةً وَيَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ ۚ بِئْسَ ٱلرِّفْدُ ٱلْمَرْفُودُ
Transliteration wa-ut'biʿū fī hādhihi laʿnatan wayawma l-qiyāmati bi'sa l-rif'du l-marfūdu
Marathi ९९. आणि त्यांच्यावर या जगातही धिःक्कार (चा मारा) झाला आणि कयामतच्या दिवशीही. किती वाईट इनाम (बक्षीस) आहे, जे त्यांना दिले गेले.
Verse 100
ذَٰلِكَ مِنْ أَنۢبَآءِ ٱلْقُرَىٰ نَقُصُّهُۥ عَلَيْكَ ۖ مِنْهَا قَآئِمٌ وَحَصِيدٌ
Transliteration dhālika min anbāi l-qurā naquṣṣuhu ʿalayka min'hā qāimun waḥaṣīdun
Marathi १००. वस्त्यांचा हा काही समाचार, जो आम्ही तुमच्यासमोर निवेदन करीत आहोत, त्यांच्यापैकी काही अस्तित्वात आहेत आणि काही कापणी केलेल्या पिकांसारख्या झाल्या.
Verse 101
وَمَا ظَلَمْنَـٰهُمْ وَلَـٰكِن ظَلَمُوٓا۟ أَنفُسَهُمْ ۖ فَمَآ أَغْنَتْ عَنْهُمْ ءَالِهَتُهُمُ ٱلَّتِى يَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مِن شَىْءٍ لَّمَّا جَآءَ أَمْرُ رَبِّكَ ۖ وَمَا زَادُوهُمْ غَيْرَ تَتْبِيبٍ
Transliteration wamā ẓalamnāhum walākin ẓalamū anfusahum famā aghnat ʿanhum ālihatuhumu allatī yadʿūna min dūni l-lahi min shayin lammā jāa amru rabbika wamā zādūhum ghayra tatbībin
Marathi १०१. आणि आम्ही त्यांच्यावर कोणताही जुलूम-अत्याचार केला नाही, किंबहुना त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार केला आणि त्यांना त्यांच्या आराध्य दैवतांनी कसलाही लाभ पोहचविला नाही, ज्यांना ते अल्लाहखेरीज पुकारत होते, वास्तविक तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला, किंबहुना त्यांनी त्यांच्या नुकसानात भरच घातली.
Verse 102
وَكَذَٰلِكَ أَخْذُ رَبِّكَ إِذَآ أَخَذَ ٱلْقُرَىٰ وَهِىَ ظَـٰلِمَةٌ ۚ إِنَّ أَخْذَهُۥٓ أَلِيمٌ شَدِيدٌ
Transliteration wakadhālika akhdhu rabbika idhā akhadha l-qurā wahiya ẓālimatun inna akhdhahu alīmun shadīdun
Marathi १०२. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या पकडीचा हाच नियम आहे, जेव्हा तो वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अत्याचारी लोकांना तावडीत घेतो. निःसंशय अल्लाहची पकड दुःखदायक आणि अतिशय सक्त आहे.
Verse 103
إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّمَنْ خَافَ عَذَابَ ٱلْـَٔاخِرَةِ ۚ ذَٰلِكَ يَوْمٌ مَّجْمُوعٌ لَّهُ ٱلنَّاسُ وَذَٰلِكَ يَوْمٌ مَّشْهُودٌ
Transliteration inna fī dhālika laāyatan liman khāfa ʿadhāba l-ākhirati dhālika yawmun majmūʿun lahu l-nāsu wadhālika yawmun mashhūdun
Marathi १०३. निश्चितच यात त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे कयामतच्या भयंकर शिक्षा-यातनेचे भय राखतात. तो दिवस, ज्या दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवस की ज्या दिवशी सर्वांना हजर केले जाईल.
Verse 104
وَمَا نُؤَخِّرُهُۥٓ إِلَّا لِأَجَلٍ مَّعْدُودٍ
Transliteration wamā nu-akhiruhu illā li-ajalin maʿdūdin
Marathi १०४. आणि त्याला आम्ही जो विलंब करतो, तो फकत् एका निर्धारीत वेळेपर्यंतच आहे.
Verse 105
يَوْمَ يَأْتِ لَا تَكَلَّمُ نَفْسٌ إِلَّا بِإِذْنِهِۦ ۚ فَمِنْهُمْ شَقِىٌّ وَسَعِيدٌ
Transliteration yawma yati lā takallamu nafsun illā bi-idh'nihi famin'hum shaqiyyun wasaʿīdun
Marathi १०५. ज्या दिवशी ती (कयामत) येईल, कोणाला हिंमत होणार नाही की अल्लाहच्या अनुमतीविना काही बोलावे, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी दुर्दैवी असेल आणि कोणी सुदैवी.
Verse 106
فَأَمَّا ٱلَّذِينَ شَقُوا۟ فَفِى ٱلنَّارِ لَهُمْ فِيهَا زَفِيرٌ وَشَهِيقٌ
Transliteration fa-ammā alladhīna shaqū fafī l-nāri lahum fīhā zafīrun washahīqun
Marathi १०६. तर जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील, तिथे हळू आणि उंच स्वरात ओरडतील.
Verse 107
خَـٰلِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَـٰوَٰتُ وَٱلْأَرْضُ إِلَّا مَا شَآءَ رَبُّكَ ۚ إِنَّ رَبَّكَ فَعَّالٌ لِّمَا يُرِيدُ
Transliteration khālidīna fīhā mā dāmati l-samāwātu wal-arḍu illā mā shāa rabbuka inna rabbaka faʿʿālun limā yurīdu
Marathi १०७. ते तिथे सदैवकाळ राहतील, जोपर्यंत आकाश व धरती कायम असतील. मात्र त्या वेळखेरीज, जी तुमच्या पालनकर्त्याची मर्जी असेल. निःसंशय, तुमचा पालनकर्ता जे काही इच्छितो ते करतोच.
Verse 108
۞ وَأَمَّا ٱلَّذِينَ سُعِدُوا۟ فَفِى ٱلْجَنَّةِ خَـٰلِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَـٰوَٰتُ وَٱلْأَرْضُ إِلَّا مَا شَآءَ رَبُّكَ ۖ عَطَآءً غَيْرَ مَجْذُوذٍ
Transliteration wa-ammā alladhīna suʿidū fafī l-janati khālidīna fīhā mā dāmati l-samāwātu wal-arḍu illā mā shāa rabbuka ʿaṭāan ghayra majdhūdhin
Marathi १०८. आणि ज्यांना सुदैवी केले गेले ते जन्नत (स्वर्गा) मध्ये असतील जिथे ते नेहमीकरिता राहतील, जोपर्यंत आकाश व धरती बाकी राहील, परंतु जे तुमचा पालनकर्ता इच्छिल ही कधीही न संपणारी देणगी आहे.
Verse 109
فَلَا تَكُ فِى مِرْيَةٍ مِّمَّا يَعْبُدُ هَـٰٓؤُلَآءِ ۚ مَا يَعْبُدُونَ إِلَّا كَمَا يَعْبُدُ ءَابَآؤُهُم مِّن قَبْلُ ۚ وَإِنَّا لَمُوَفُّوهُمْ نَصِيبَهُمْ غَيْرَ مَنقُوصٍ
Transliteration falā taku fī mir'yatin mimmā yaʿbudu hāulāi mā yaʿbudūna illā kamā yaʿbudu ābāuhum min qablu wa-innā lamuwaffūhum naṣībahum ghayra manqūṣin
Marathi १०९. यास्तव तुम्ही त्या वस्तूंविषयी संशयग्रस्त राहू नका, ज्यांची हे लोक पूजा करीत आहेत. त्यांची उपासना तर अशा प्रकारे आहे, ज्या प्रकारे यांच्या पूर्वजांची यापूर्वी होती. आम्ही त्या सर्वांना पुरेपूर हिस्सा कमी न करता देणारच आहोत.
Verse 110
وَلَقَدْ ءَاتَيْنَا مُوسَى ٱلْكِتَـٰبَ فَٱخْتُلِفَ فِيهِ ۚ وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِن رَّبِّكَ لَقُضِىَ بَيْنَهُمْ ۚ وَإِنَّهُمْ لَفِى شَكٍّ مِّنْهُ مُرِيبٍ
Transliteration walaqad ātaynā mūsā l-kitāba fa-ukh'tulifa fīhi walawlā kalimatun sabaqat min rabbika laquḍiya baynahum wa-innahum lafī shakkin min'hu murībin
Marathi ११०. निःसंशय आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला, मग त्यात मतभेद केला गेला जर या आधीच तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लागू झालेले नसते तर निश्चितच त्यांचा फैसला केला गेला असता. त्यांना तर यात संशय वाटत आहे (हे तर दुविधाग्रस्त आहेत).
Verse 111
وَإِنَّ كُلًّا لَّمَّا لَيُوَفِّيَنَّهُمْ رَبُّكَ أَعْمَـٰلَهُمْ ۚ إِنَّهُۥ بِمَا يَعْمَلُونَ خَبِيرٌ
Transliteration wa-inna kullan lammā layuwaffiyannahum rabbuka aʿmālahum innahu bimā yaʿmalūna khabīrun
Marathi १११. आणि निःसंशय त्यांच्यापैकी प्रत्येकाला (जेव्हा त्याच्यासमोर जाईल तेव्हा) तुमचा पालनकर्ता त्याला त्याच्या कर्मांचा पुरेपूर मोबदला प्रदान करील. निःसंशय ते जे काही करीत आहेत, अल्लाह ते सर्वकाही जाणून आहे.
Verse 112
فَٱسْتَقِمْ كَمَآ أُمِرْتَ وَمَن تَابَ مَعَكَ وَلَا تَطْغَوْا۟ ۚ إِنَّهُۥ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
Transliteration fa-is'taqim kamā umir'ta waman tāba maʿaka walā taṭghaw innahu bimā taʿmalūna baṣīrun
Marathi ११२. तेव्हा तुम्ही अगदी अटळ राहा, जसा तुम्हाला आदेश दिला गेला आहे आणि ते लोकदेखील ज्यांनी तुमच्यासह क्षमा-याचना केली आहे. (खबरदार) तुम्ही मर्यादा पार करू नका. अल्लाह तुमच्या समस्त कर्मांना पाहत आहे.
Verse 113
وَلَا تَرْكَنُوٓا۟ إِلَى ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ فَتَمَسَّكُمُ ٱلنَّارُ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنْ أَوْلِيَآءَ ثُمَّ لَا تُنصَرُونَ
Transliteration walā tarkanū ilā alladhīna ẓalamū fatamassakumu l-nāru wamā lakum min dūni l-lahi min awliyāa thumma lā tunṣarūna
Marathi ११३. आणि पाहा, अत्याचारी लोकांकडे कधीही झुकू नका. अन्यथा तुम्हालाही आगीचा दाह लागेल आणि अल्लाहखेरीज कोणी तुमच्या मदतीला उभा राहू शकणार नाही, आणि ना तुम्हाला मदत दिली जाईल.
Verse 114
وَأَقِمِ ٱلصَّلَوٰةَ طَرَفَىِ ٱلنَّهَارِ وَزُلَفًا مِّنَ ٱلَّيْلِ ۚ إِنَّ ٱلْحَسَنَـٰتِ يُذْهِبْنَ ٱلسَّيِّـَٔاتِ ۚ ذَٰلِكَ ذِكْرَىٰ لِلذَّٰكِرِينَ
Transliteration wa-aqimi l-ṣalata ṭarafayi l-nahāri wazulafan mina al-layli inna l-ḥasanāti yudh'hib'na l-sayiāti dhālika dhik'rā lildhākirīna
Marathi ११४. आणि दिवसाच्या दोन्ही किनाऱ्यांवर नमाज कायम राखा, आणि रात्रीच्या काही भागातही.१ निःसंशय सत्कर्मे वाईट गोष्टींना दूर करतात.२ हा उपदेश आहे, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता.
Verse 115
وَٱصْبِرْ فَإِنَّ ٱللَّهَ لَا يُضِيعُ أَجْرَ ٱلْمُحْسِنِينَ
Transliteration wa-iṣ'bir fa-inna l-laha lā yuḍīʿu ajra l-muḥ'sinīna
Marathi ११५. आणि तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही.
Verse 116
فَلَوْلَا كَانَ مِنَ ٱلْقُرُونِ مِن قَبْلِكُمْ أُو۟لُوا۟ بَقِيَّةٍ يَنْهَوْنَ عَنِ ٱلْفَسَادِ فِى ٱلْأَرْضِ إِلَّا قَلِيلًا مِّمَّنْ أَنجَيْنَا مِنْهُمْ ۗ وَٱتَّبَعَ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ مَآ أُتْرِفُوا۟ فِيهِ وَكَانُوا۟ مُجْرِمِينَ
Transliteration falawlā kāna mina l-qurūni min qablikum ulū baqiyyatin yanhawna ʿani l-fasādi fī l-arḍi illā qalīlan mimman anjaynā min'hum wa-ittabaʿa alladhīna ẓalamū mā ut'rifū fīhi wakānū muj'rimīna
Marathi ११६. जेव्हा तुमच्या पूर्वीच्या काळातील लोकांपैकी असे भलाई करणारे लोक का नाही झालेत, ज्यांनी धरतीवर फसाद (उत्पात) पसरविण्यास प्रतिबंध घातला असता, ज्या थोड्या लोकांखेरीज ज्यांना आम्ही त्यांच्यापैकी सुटका प्रदान केली होती. अत्यारारी लोक तर त्या गोष्टीच्या मागे लागले, ज्यात त्यांना सुसंपन्न केले गेले होते आणि ते दुराचारी होते.
Verse 117
وَمَا كَانَ رَبُّكَ لِيُهْلِكَ ٱلْقُرَىٰ بِظُلْمٍ وَأَهْلُهَا مُصْلِحُونَ
Transliteration wamā kāna rabbuka liyuh'lika l-qurā biẓul'min wa-ahluhā muṣ'liḥūna
Marathi ११७. तुमचा पालनकर्ता असा नाही की एखाद्या वस्तीला अत्याचारपूर्वक नष्ट करून टाकील, जेव्हा की तिथले लोक अल्लाहचे भय राखणारे असावेत.
Verse 118
وَلَوْ شَآءَ رَبُّكَ لَجَعَلَ ٱلنَّاسَ أُمَّةً وَٰحِدَةً ۖ وَلَا يَزَالُونَ مُخْتَلِفِينَ
Transliteration walaw shāa rabbuka lajaʿala l-nāsa ummatan wāḥidatan walā yazālūna mukh'talifīna
Marathi ११८. आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर समस्त लोकांना एका मार्गावर (चालणारा) एक जनसमुदाय बनविला असता. ते तर नेहमी विरोध करणारेच राहतील.
Verse 119
إِلَّا مَن رَّحِمَ رَبُّكَ ۚ وَلِذَٰلِكَ خَلَقَهُمْ ۗ وَتَمَّتْ كَلِمَةُ رَبِّكَ لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنَ ٱلْجِنَّةِ وَٱلنَّاسِ أَجْمَعِينَ
Transliteration illā man raḥima rabbuka walidhālika khalaqahum watammat kalimatu rabbika la-amla-anna jahannama mina l-jinati wal-nāsi ajmaʿīna
Marathi ११९. त्यांच्याखेरीज, ज्यांच्यावर तुमचा पालनकर्ता दया करील, त्यांना तर यासाठी निर्माण केले गेले आहे आणि तुमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान पूर्ण झाल्याविना राहणार नाही की मी जहन्नमला जिन्न आणि मानव सर्वांनी भरून टाकीन.
Verse 120
وَكُلًّا نَّقُصُّ عَلَيْكَ مِنْ أَنۢبَآءِ ٱلرُّسُلِ مَا نُثَبِّتُ بِهِۦ فُؤَادَكَ ۚ وَجَآءَكَ فِى هَـٰذِهِ ٱلْحَقُّ وَمَوْعِظَةٌ وَذِكْرَىٰ لِلْمُؤْمِنِينَ
Transliteration wakullan naquṣṣu ʿalayka min anbāi l-rusuli mā nuthabbitu bihi fuādaka wajāaka fī hādhihi l-ḥaqu wamawʿiẓatun wadhik'rā lil'mu'minīna
Marathi १२०. आणि पैगंबरांचे सर्व वृत्तांत आम्ही तुमच्यासमोर, तुमच्या मनाला शांती लाभावी यासाठी सांगत आहोत. तुमच्याजवळ या अध्यायातही सत्य पोहचले, जे ईमान राखणाऱ्यांकरिता बोध-उपदेश आहे.
Verse 121
وَقُل لِّلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ ٱعْمَلُوا۟ عَلَىٰ مَكَانَتِكُمْ إِنَّا عَـٰمِلُونَ
Transliteration waqul lilladhīna lā yu'minūna iʿ'malū ʿalā makānatikum innā ʿāmilūna
Marathi १२१. आणि ईमान न राखणाऱ्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा. आम्हीही कर्मांमध्ये मग्न आहोत.
Verse 122
وَٱنتَظِرُوٓا۟ إِنَّا مُنتَظِرُونَ
Transliteration wa-intaẓirū innā muntaẓirūna
Marathi १२२. आणि तुम्हीही प्रतिक्षा करा, आम्हीही प्रतिक्षा करीत आहोत.
Verse 123
وَلِلَّهِ غَيْبُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَإِلَيْهِ يُرْجَعُ ٱلْأَمْرُ كُلُّهُۥ فَٱعْبُدْهُ وَتَوَكَّلْ عَلَيْهِ ۚ وَمَا رَبُّكَ بِغَـٰفِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ
Transliteration walillahi ghaybu l-samāwāti wal-arḍi wa-ilayhi yur'jaʿu l-amru kulluhu fa-uʿ'bud'hu watawakkal ʿalayhi wamā rabbuka bighāfilin ʿammā taʿmalūna
Marathi १२३. आणि आकाशांचे व जमिनीचे परोक्ष ज्ञान केवळ अल्लाहला आहे. आणि समस्त कार्यांचे परतनेही त्याच्याचकडे आहे. यास्तव तुम्ही त्याचीच उपासना केली पाहिजे आणि त्याच्यावरच भरोसा राखला पाहिजे आणि तुम्ही जे काही करता, त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही.
Read Surah Hud in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.