MyDugsiStart learning

Surah At-Talaq in Marathi: translation and audio

Surah 65 · الطلاق · The Divorce · 12 verses

Surah At-Talaq verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah At-Talaq word by word in English.

Verse 1

يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ إِذَا طَلَّقْتُمُ ٱلنِّسَآءَ فَطَلِّقُوهُنَّ لِعِدَّتِهِنَّ وَأَحْصُوا۟ ٱلْعِدَّةَ ۖ وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ رَبَّكُمْ ۖ لَا تُخْرِجُوهُنَّ مِنۢ بُيُوتِهِنَّ وَلَا يَخْرُجْنَ إِلَّآ أَن يَأْتِينَ بِفَـٰحِشَةٍ مُّبَيِّنَةٍ ۚ وَتِلْكَ حُدُودُ ٱللَّهِ ۚ وَمَن يَتَعَدَّ حُدُودَ ٱللَّهِ فَقَدْ ظَلَمَ نَفْسَهُۥ ۚ لَا تَدْرِى لَعَلَّ ٱللَّهَ يُحْدِثُ بَعْدَ ذَٰلِكَ أَمْرًا

Transliteration yāayyuhā l-nabiyu idhā ṭallaqtumu l-nisāa faṭalliqūhunna liʿiddatihinna wa-aḥṣū l-ʿidata wa-ittaqū l-laha rabbakum lā tukh'rijūhunna min buyūtihinna walā yakhruj'na illā an yatīna bifāḥishatin mubayyinatin watil'ka ḥudūdu l-lahi waman yataʿadda ḥudūda l-lahi faqad ẓalama nafsahu lā tadrī laʿalla l-laha yuḥ'dithu baʿda dhālika amran

Marathi १. हे पैगंबर! (आपल्या जनसमुदायाच्या लोकांना सांगा) जेव्हा तुम्ही आपल्या पत्न्यांना तलाक देऊ इच्छित असाल तर त्यांच्या इद्दत (ची मुदत सुरू होत) असताना तलाक द्या आणि इद्दतची गणना करा, आणि अल्लाहचे, जो तुमचा पालनकर्ता आहे. भय बाळगत राहा, ना तुम्ही त्यांना त्यांच्या घरांमधून बाहेर काढावे आणि ना त्यांनी (स्वतः) निघावे, मात्र ही गोष्ट वेगळी की त्यांनी उघडपणे दुष्कर्म करून बसावे. या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत, आणि जो मनुष्य अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करील त्याने खात्रीने आपल्या स्वतःवर अत्याचार केला, तुम्ही नाही जाणत की कदाचित त्यानंतर अल्लाहने एखादी नवी गोष्ट (स्थिती) निर्माण करावी.१

Verse 2

فَإِذَا بَلَغْنَ أَجَلَهُنَّ فَأَمْسِكُوهُنَّ بِمَعْرُوفٍ أَوْ فَارِقُوهُنَّ بِمَعْرُوفٍ وَأَشْهِدُوا۟ ذَوَىْ عَدْلٍ مِّنكُمْ وَأَقِيمُوا۟ ٱلشَّهَـٰدَةَ لِلَّهِ ۚ ذَٰلِكُمْ يُوعَظُ بِهِۦ مَن كَانَ يُؤْمِنُ بِٱللَّهِ وَٱلْيَوْمِ ٱلْـَٔاخِرِ ۚ وَمَن يَتَّقِ ٱللَّهَ يَجْعَل لَّهُۥ مَخْرَجًا

Transliteration fa-idhā balaghna ajalahunna fa-amsikūhunna bimaʿrūfin aw fāriqūhunna bimaʿrūfin wa-ashhidū dhaway ʿadlin minkum wa-aqīmū l-shahādata lillahi dhālikum yūʿaẓu bihi man kāna yu'minu bil-lahi wal-yawmi l-ākhiri waman yattaqi l-laha yajʿal lahu makhrajan

Marathi २. तर जेव्हा या (स्त्रिया) आपला अवधी पूर्ण करण्याप्रत पोहचतील तेव्हा त्यांना रीतसर आपल्या विवाहबंधनात राहू द्या किंवा नियमानुसार त्यांना विभक्त करा, १ आणि आपसात दोन न्याय करणाऱ्या माणसांना साक्षी बनवून घ्या, आणि अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी यथायोग्य साक्ष द्या, हेच ते, ज्याची शिकवण त्यांना दिली जात आहे, जे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असतील, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगतो अल्लाह त्याच्यासाठी सुटकेचा मार्ग काढतो.

Verse 3

وَيَرْزُقْهُ مِنْ حَيْثُ لَا يَحْتَسِبُ ۚ وَمَن يَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ فَهُوَ حَسْبُهُۥٓ ۚ إِنَّ ٱللَّهَ بَـٰلِغُ أَمْرِهِۦ ۚ قَدْ جَعَلَ ٱللَّهُ لِكُلِّ شَىْءٍ قَدْرًا

Transliteration wayarzuq'hu min ḥaythu lā yaḥtasibu waman yatawakkal ʿalā l-lahi fahuwa ḥasbuhu inna l-laha bālighu amrihi qad jaʿala l-lahu likulli shayin qadran

Marathi ३. आणि त्याला अशा ठिकाणाहून रोजी (आजिविका) उपलब्ध करून देतो ज्याची त्याला कल्पनाही नसेल आणि जो मनुष्य अल्लाहवर भरवसा करील, अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा असेल. अल्लाह आपले कार्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने प्रत्येक गोष्टीचे एक अनुमान निर्धारित केलेले आहे.

Verse 4

وَٱلَّـٰٓـِٔى يَئِسْنَ مِنَ ٱلْمَحِيضِ مِن نِّسَآئِكُمْ إِنِ ٱرْتَبْتُمْ فَعِدَّتُهُنَّ ثَلَـٰثَةُ أَشْهُرٍ وَٱلَّـٰٓـِٔى لَمْ يَحِضْنَ ۚ وَأُو۟لَـٰتُ ٱلْأَحْمَالِ أَجَلُهُنَّ أَن يَضَعْنَ حَمْلَهُنَّ ۚ وَمَن يَتَّقِ ٱللَّهَ يَجْعَل لَّهُۥ مِنْ أَمْرِهِۦ يُسْرًا

Transliteration wa-allāī ya-is'na mina l-maḥīḍi min nisāikum ini ir'tabtum faʿiddatuhunna thalāthatu ashhurin wa-allāī lam yaḥiḍ'na wa-ulātu l-aḥmāli ajaluhunna an yaḍaʿna ḥamlahunna waman yattaqi l-laha yajʿal lahu min amrihi yus'ran

Marathi ४. तुमच्या स्त्रियांपैकी ज्या स्त्रिया मासिक पाळीबाबत निराश झाल्या असतील, जर तुम्हाला शंका असेल तर त्यांची इद्दत तीन महीने आहे, आणि त्यांचीदेखील, ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झालेली नसेल, आणि गर्भवती स्त्रियांची इद्दत त्यांची प्रस्तुती होणे आहे आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याच्या प्रत्येक कामात सहजता निर्माण करील.

Verse 5

ذَٰلِكَ أَمْرُ ٱللَّهِ أَنزَلَهُۥٓ إِلَيْكُمْ ۚ وَمَن يَتَّقِ ٱللَّهَ يُكَفِّرْ عَنْهُ سَيِّـَٔاتِهِۦ وَيُعْظِمْ لَهُۥٓ أَجْرًا

Transliteration dhālika amru l-lahi anzalahu ilaykum waman yattaqi l-laha yukaffir ʿanhu sayyiātihi wayuʿ'ẓim lahu ajran

Marathi ५. हा अल्लाहचा आदेश आहे, जो त्याने तुमच्याकडे अवतरित केला आहे, आणि जो मनुष्य अल्लाहचे भय बाळगेल, अल्लाह त्याचे अपराध मिटविल आणि त्याला फार महान मोबदला प्रदान करील.

Verse 6

أَسْكِنُوهُنَّ مِنْ حَيْثُ سَكَنتُم مِّن وُجْدِكُمْ وَلَا تُضَآرُّوهُنَّ لِتُضَيِّقُوا۟ عَلَيْهِنَّ ۚ وَإِن كُنَّ أُو۟لَـٰتِ حَمْلٍ فَأَنفِقُوا۟ عَلَيْهِنَّ حَتَّىٰ يَضَعْنَ حَمْلَهُنَّ ۚ فَإِنْ أَرْضَعْنَ لَكُمْ فَـَٔاتُوهُنَّ أُجُورَهُنَّ ۖ وَأْتَمِرُوا۟ بَيْنَكُم بِمَعْرُوفٍ ۖ وَإِن تَعَاسَرْتُمْ فَسَتُرْضِعُ لَهُۥٓ أُخْرَىٰ

Transliteration askinūhunna min ḥaythu sakantum min wuj'dikum walā tuḍārrūhunna lituḍayyiqū ʿalayhinna wa-in kunna ulāti ḥamlin fa-anfiqū ʿalayhinna ḥattā yaḍaʿna ḥamlahunna fa-in arḍaʿna lakum faātūhunna ujūrahunna watamirū baynakum bimaʿrūfin wa-in taʿāsartum fasatur'ḍiʿu lahu ukh'rā

Marathi ६. तुम्ही आपल्या सामर्थ्यानुसार जिथे राहात असाल तिथे त्या (घटस्फोटित) स्त्रियांना ठेवा, आणि त्यांना सतविण्याकरिता कष्ट यातना देऊ नका, आणि जर त्या गर्भवती असतील तर त्या प्रसूत होई पर्यंत त्यांना खर्च देत राहा, मग जर तुमच्या सांगण्यावरून त्याच दूध पाजतील तर तुम्ही त्यांना त्यांचे पारश्रमिक देऊन टाका, आणि आपसात चांगल्या प्रकारे सल्लामसलत करून घेत जा आणि जर तुम्ही आपसात तणाव राखाल तर त्याच्या (पित्याच्या) सांगण्यावरून दुसरी स्त्री दूध पाजेल.

Verse 7

لِيُنفِقْ ذُو سَعَةٍ مِّن سَعَتِهِۦ ۖ وَمَن قُدِرَ عَلَيْهِ رِزْقُهُۥ فَلْيُنفِقْ مِمَّآ ءَاتَىٰهُ ٱللَّهُ ۚ لَا يُكَلِّفُ ٱللَّهُ نَفْسًا إِلَّا مَآ ءَاتَىٰهَا ۚ سَيَجْعَلُ ٱللَّهُ بَعْدَ عُسْرٍ يُسْرًا

Transliteration liyunfiq dhū saʿatin min saʿatihi waman qudira ʿalayhi riz'quhu falyunfiq mimmā ātāhu l-lahu lā yukallifu l-lahu nafsan illā mā ātāhā sayajʿalu l-lahu baʿda ʿus'rin yus'ran

Marathi ७. धनवानाने आपल्या धन (सामर्थ्या) नुसार खर्च केला पाहिजे, आणि ज्याची जीविका (रोजी) त्याच्यासाठी कमी केली गेली असेल तर अल्लाहने जे काही त्याला देऊन ठेवले आहे, त्यातून त्याने (आपल्या सामर्थ्यानुसार) द्यावे, कोणत्याही माणसावर अल्लाह ओझे ठेवत नाही, परंतु इतकेच जेवढे सामर्थ्य त्याला दिले गेले आहे. अल्लाह गरीबीनंतर धन देखील प्रदान करेल.

Verse 8

وَكَأَيِّن مِّن قَرْيَةٍ عَتَتْ عَنْ أَمْرِ رَبِّهَا وَرُسُلِهِۦ فَحَاسَبْنَـٰهَا حِسَابًا شَدِيدًا وَعَذَّبْنَـٰهَا عَذَابًا نُّكْرًا

Transliteration waka-ayyin min qaryatin ʿatat ʿan amri rabbihā warusulihi faḥāsabnāhā ḥisāban shadīdan waʿadhabnāhā ʿadhāban nuk'ran

Marathi ८. आणि अनेक वस्ती (वाल्यां) नी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा केली तेव्हा आम्ही देखील त्यांचा सक्त हिशोब घेतला आणि न पाहिलेला (कठोर) अज़ाब त्यांच्यावर टाकला.

Verse 9

فَذَاقَتْ وَبَالَ أَمْرِهَا وَكَانَ عَـٰقِبَةُ أَمْرِهَا خُسْرًا

Transliteration fadhāqat wabāla amrihā wakāna ʿāqibatu amrihā khus'ran

Marathi ९. तेव्हा त्यांनी आपल्या कृत-कर्मांचा स्वाद चाखून घेतला आणि परिणामस्वरुपी त्यांचे नुकसान झाले.

Verse 10

أَعَدَّ ٱللَّهُ لَهُمْ عَذَابًا شَدِيدًا ۖ فَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ يَـٰٓأُو۟لِى ٱلْأَلْبَـٰبِ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ۚ قَدْ أَنزَلَ ٱللَّهُ إِلَيْكُمْ ذِكْرًا

Transliteration aʿadda l-lahu lahum ʿadhāban shadīdan fa-ittaqū l-laha yāulī l-albābi alladhīna āmanū qad anzala l-lahu ilaykum dhik'ran

Marathi १०. त्यांच्यासाठी अल्लाहने फार कठोर शिक्षा - यातना तयार करून ठेवली आहे, तेव्हा हे बुद्धिमान ईमानधारकांनो, अल्लाहचे भय राखा, निःसंशय, अल्लाहने तुमच्याकडे बोध - उपदेश पाठविला आहे.

Verse 11

رَّسُولًا يَتْلُوا۟ عَلَيْكُمْ ءَايَـٰتِ ٱللَّهِ مُبَيِّنَـٰتٍ لِّيُخْرِجَ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ مِنَ ٱلظُّلُمَـٰتِ إِلَى ٱلنُّورِ ۚ وَمَن يُؤْمِنۢ بِٱللَّهِ وَيَعْمَلْ صَـٰلِحًا يُدْخِلْهُ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَآ أَبَدًا ۖ قَدْ أَحْسَنَ ٱللَّهُ لَهُۥ رِزْقًا

Transliteration rasūlan yatlū ʿalaykum āyāti l-lahi mubayyinātin liyukh'rija alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti mina l-ẓulumāti ilā l-nūri waman yu'min bil-lahi wayaʿmal ṣāliḥan yud'khil'hu jannātin tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā abadan qad aḥsana l-lahu lahu riz'qan

Marathi ११. (अर्थात) पैगंबर, जो तुम्हाला अल्लाहचे स्पष्ट आदेश वाचून ऐकवितो, यासाठी की त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, त्यांना अंधाराकडून उजेडाकडे आणावे आणि जो मनुष्य अल्लाहवर ईमान राखेल आणि सत्कर्म करेल, अल्लाह त्याला अशा जन्नतमध्ये दाखल करेल, जिच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील. निःसंशय, अल्लाहने त्याला सर्वांत उत्तम रोजी (जीविका) देऊन ठेवली आहे.

Verse 12

ٱللَّهُ ٱلَّذِى خَلَقَ سَبْعَ سَمَـٰوَٰتٍ وَمِنَ ٱلْأَرْضِ مِثْلَهُنَّ يَتَنَزَّلُ ٱلْأَمْرُ بَيْنَهُنَّ لِتَعْلَمُوٓا۟ أَنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ وَأَنَّ ٱللَّهَ قَدْ أَحَاطَ بِكُلِّ شَىْءٍ عِلْمًۢا

Transliteration al-lahu alladhī khalaqa sabʿa samāwātin wamina l-arḍi mith'lahunna yatanazzalu l-amru baynahunna litaʿlamū anna l-laha ʿalā kulli shayin qadīrun wa-anna l-laha qad aḥāṭa bikulli shayin ʿil'man

Marathi १२. अल्लाह तो आहे, ज्याने सात आकाश बनविले आणि त्याचप्रमाणे जमीन देखील.१ त्याचा आदेश त्यांच्या दरम्यान अवतरित होतो, यासाठी की तुम्ही जाणून घ्यावे की अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे, आणि अल्लाहने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे.

Read Surah At-Talaq in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.