Surah Al-Mulk in Marathi: translation and audio
Surah 67 · الملك · The Sovereignty · 30 verses
Surah Al-Mulk verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Mulk word by word in English.
Verse 1
تَبَـٰرَكَ ٱلَّذِى بِيَدِهِ ٱلْمُلْكُ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration tabāraka alladhī biyadihi l-mul'ku wahuwa ʿalā kulli shayin qadīrun
Marathi १. मोठा समृद्धशाली आहे तो, ज्याच्या हाती राज्य (सत्ता) आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे.
Verse 2
ٱلَّذِى خَلَقَ ٱلْمَوْتَ وَٱلْحَيَوٰةَ لِيَبْلُوَكُمْ أَيُّكُمْ أَحْسَنُ عَمَلًا ۚ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْغَفُورُ
Transliteration alladhī khalaqa l-mawta wal-ḥayata liyabluwakum ayyukum aḥsanu ʿamalan wahuwa l-ʿazīzu l-ghafūru
Marathi २. ज्याने जीवन आणि मृत्युला अशासाठी निर्माण केले की तुमची परीक्षा घ्यावी की तुमच्यापैकी चांगले कर्म कोण करतो आणि तो वर्चस्वशाली आणि माफ करणारा आहे.
Verse 3
ٱلَّذِى خَلَقَ سَبْعَ سَمَـٰوَٰتٍ طِبَاقًا ۖ مَّا تَرَىٰ فِى خَلْقِ ٱلرَّحْمَـٰنِ مِن تَفَـٰوُتٍ ۖ فَٱرْجِعِ ٱلْبَصَرَ هَلْ تَرَىٰ مِن فُطُورٍ
Transliteration alladhī khalaqa sabʿa samāwātin ṭibāqan mā tarā fī khalqi l-raḥmāni min tafāwutin fa-ir'jiʿi l-baṣara hal tarā min fuṭūrin
Marathi ३. ज्याने सात आकाश वर-खाली निर्माण केले (तेव्हा हे पाहणाऱ्यांनो!) रहमान (अल्लाह) च्या निर्मितीत कसलीही विसंगती आढळणार नाही. दुसऱ्यांदा परतून पाहा की काय एखादा (व्यंग - दोष) दिसून येतो?
Verse 4
ثُمَّ ٱرْجِعِ ٱلْبَصَرَ كَرَّتَيْنِ يَنقَلِبْ إِلَيْكَ ٱلْبَصَرُ خَاسِئًا وَهُوَ حَسِيرٌ
Transliteration thumma ir'jiʿi l-baṣara karratayni yanqalib ilayka l-baṣaru khāsi-an wahuwa ḥasīrun
Marathi ४. मग परत पुन्हा दोन दोन वेळा पाहा, तुझी दृष्टी तुझ्याकडे अपमानित (आणि लाचार) होऊन थकलेली परत येईल.
Verse 5
وَلَقَدْ زَيَّنَّا ٱلسَّمَآءَ ٱلدُّنْيَا بِمَصَـٰبِيحَ وَجَعَلْنَـٰهَا رُجُومًا لِّلشَّيَـٰطِينِ ۖ وَأَعْتَدْنَا لَهُمْ عَذَابَ ٱلسَّعِيرِ
Transliteration walaqad zayyannā l-samāa l-dun'yā bimaṣābīḥa wajaʿalnāhā rujūman lilshayāṭīni wa-aʿtadnā lahum ʿadhāba l-saʿīri
Marathi ५. आणि निःसंशय, आम्ही या जगाच्या आकाशाला दिव्यांनी (ताऱ्यांनी) सुशोभित केले आणि त्यांना सैतानांना मारण्याचे साधन बनविले. आणि सैतानांकरिता आम्ही (जहन्नमचा जाळणारा) अज़ाब तयार करून ठेवला आहे.
Verse 6
وَلِلَّذِينَ كَفَرُوا۟ بِرَبِّهِمْ عَذَابُ جَهَنَّمَ ۖ وَبِئْسَ ٱلْمَصِيرُ
Transliteration walilladhīna kafarū birabbihim ʿadhābu jahannama wabi'sa l-maṣīru
Marathi ६. आणि आपल्या पालनकर्त्याशी इन्कार करणाऱ्यांकरिता जहन्नमचा अज़ाब (शिक्षा - यातना) आहे आणि ते किती वाईट स्थान आहे!
Verse 7
إِذَآ أُلْقُوا۟ فِيهَا سَمِعُوا۟ لَهَا شَهِيقًا وَهِىَ تَفُورُ
Transliteration idhā ul'qū fīhā samiʿū lahā shahīqan wahiya tafūru
Marathi ७. जेव्हा हे त्यात टाकले जातील, तेव्हा तिचा (जहन्नमचा) भयंकर आवाज ऐकतील आणि ती उकळत असेल.
Verse 8
تَكَادُ تَمَيَّزُ مِنَ ٱلْغَيْظِ ۖ كُلَّمَآ أُلْقِىَ فِيهَا فَوْجٌ سَأَلَهُمْ خَزَنَتُهَآ أَلَمْ يَأْتِكُمْ نَذِيرٌ
Transliteration takādu tamayyazu mina l-ghayẓi kullamā ul'qiya fīhā fawjun sa-alahum khazanatuhā alam yatikum nadhīrun
Marathi ८. (असे दिसेल की आताच) क्रोधातिरेकाने फाटून जाईल. जेव्हा जेव्हा त्यात एखादा समूह टाकला जाईल, तेव्हा त्याला जहन्नमचा रक्षक विचारेल की, काय तुमच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला नव्हता?
Verse 9
قَالُوا۟ بَلَىٰ قَدْ جَآءَنَا نَذِيرٌ فَكَذَّبْنَا وَقُلْنَا مَا نَزَّلَ ٱللَّهُ مِن شَىْءٍ إِنْ أَنتُمْ إِلَّا فِى ضَلَـٰلٍ كَبِيرٍ
Transliteration qālū balā qad jāanā nadhīrun fakadhabnā waqul'nā mā nazzala l-lahu min shayin in antum illā fī ḍalālin kabīrin
Marathi ९. ते उत्तर देतील, निःसंशय, आला तर होता, परंतु आम्ही त्याला खोटे ठरविले आणि म्हटले की अल्लाहने काहीच अवतरित केले नाही, तुम्ही फार मोठ्या मार्गभ्रष्टतेत आहात.
Verse 10
وَقَالُوا۟ لَوْ كُنَّا نَسْمَعُ أَوْ نَعْقِلُ مَا كُنَّا فِىٓ أَصْحَـٰبِ ٱلسَّعِيرِ
Transliteration waqālū law kunnā nasmaʿu aw naʿqilu mā kunnā fī aṣḥābi l-saʿīri
Marathi १०. आणि म्हणतील की जर आम्ही ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर जहन्नमवाल्यांमध्ये (सामील) झालो नसतो.
Verse 11
فَٱعْتَرَفُوا۟ بِذَنۢبِهِمْ فَسُحْقًا لِّأَصْحَـٰبِ ٱلسَّعِيرِ
Transliteration fa-iʿ'tarafū bidhanbihim fasuḥ'qan li-aṣḥābi l-saʿīri
Marathi ११. जेव्हा त्यांनी आपले अपराध कबूल केले. आता हे जहन्नमी लोक दूर होवोत.
Verse 12
إِنَّ ٱلَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُم بِٱلْغَيْبِ لَهُم مَّغْفِرَةٌ وَأَجْرٌ كَبِيرٌ
Transliteration inna alladhīna yakhshawna rabbahum bil-ghaybi lahum maghfiratun wa-ajrun kabīrun
Marathi १२. निःसंशय, जे लोक आपल्या पालनकर्त्याचे न पाहताच भय बाळगतात, त्यांच्यासाठी माफी आहे आणि मोठा मोबदला आहे.
Verse 13
وَأَسِرُّوا۟ قَوْلَكُمْ أَوِ ٱجْهَرُوا۟ بِهِۦٓ ۖ إِنَّهُۥ عَلِيمٌۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ
Transliteration wa-asirrū qawlakum awi ij'harū bihi innahu ʿalīmun bidhāti l-ṣudūri
Marathi १३. आणि तुम्ही आपल्या गोष्टी अगदी हळू स्वरात बोला किंवा उंच आवाजात, तो तर छातीमध्ये (मनात लपलेल्या) गोष्टींनाही चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 14
أَلَا يَعْلَمُ مَنْ خَلَقَ وَهُوَ ٱللَّطِيفُ ٱلْخَبِيرُ
Transliteration alā yaʿlamu man khalaqa wahuwa l-laṭīfu l-khabīru
Marathi १४. काय तोच नाही जाणणार, ज्याने निर्माण केले? मग तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणाराही असावा.
Verse 15
هُوَ ٱلَّذِى جَعَلَ لَكُمُ ٱلْأَرْضَ ذَلُولًا فَٱمْشُوا۟ فِى مَنَاكِبِهَا وَكُلُوا۟ مِن رِّزْقِهِۦ ۖ وَإِلَيْهِ ٱلنُّشُورُ
Transliteration huwa alladhī jaʿala lakumu l-arḍa dhalūlan fa-im'shū fī manākibihā wakulū min riz'qihi wa-ilayhi l-nushūru
Marathi १५. तो, तोच आहे, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला सखल (आणि कोमल) बनविले, यासाठी की तुम्ही तिच्या रस्त्यांवर येणे-जाणे करीत राहावे आणि तिने दिलेल्या जीविके (अन्न-सामुग्री) ला खावे-प्यावे. त्याच्याचकडे (तुम्हाला) जिवंत होऊन उठून उभे राहायचे आहे.
Verse 16
ءَأَمِنتُم مَّن فِى ٱلسَّمَآءِ أَن يَخْسِفَ بِكُمُ ٱلْأَرْضَ فَإِذَا هِىَ تَمُورُ
Transliteration a-amintum man fī l-samāi an yakhsifa bikumu l-arḍa fa-idhā hiya tamūru
Marathi १६. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झालात की आकाशांच्या स्वामीने तुम्हाला जमिनीत धसवून टाकावे आणि जमीन अकस्मात थरथरावी.
Verse 17
أَمْ أَمِنتُم مَّن فِى ٱلسَّمَآءِ أَن يُرْسِلَ عَلَيْكُمْ حَاصِبًا ۖ فَسَتَعْلَمُونَ كَيْفَ نَذِيرِ
Transliteration am amintum man fī l-samāi an yur'sila ʿalaykum ḥāṣiban fasataʿlamūna kayfa nadhīri
Marathi १७. किंवा काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की आकाशांच्या स्वामीने तुमच्यावर दगडांचा वर्षाव करावा? मग तर तुम्हाला कळूनच येईल की माझे भय दाखवणे कसे होते?
Verse 18
وَلَقَدْ كَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ فَكَيْفَ كَانَ نَكِيرِ
Transliteration walaqad kadhaba alladhīna min qablihim fakayfa kāna nakīri
Marathi १८. आणि त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, (तर पाहा) त्यांच्यावर माझा प्रकोप (अज़ाब) कसा झाला?
Verse 19
أَوَلَمْ يَرَوْا۟ إِلَى ٱلطَّيْرِ فَوْقَهُمْ صَـٰٓفَّـٰتٍ وَيَقْبِضْنَ ۚ مَا يُمْسِكُهُنَّ إِلَّا ٱلرَّحْمَـٰنُ ۚ إِنَّهُۥ بِكُلِّ شَىْءٍۭ بَصِيرٌ
Transliteration awalam yaraw ilā l-ṭayri fawqahum ṣāffātin wayaqbiḍ'na mā yum'sikuhunna illā l-raḥmānu innahu bikulli shayin baṣīrun
Marathi १९. काय हे कधी आपल्या वर पक्ष्यांना पंख पसरविताना आणि (कधी) मिटविताना पाहत नाहीत? त्यांना रहमान (अल्लाह) नेच (वातावरणात व आकाशात) आधार दिलेला आहे. निःसंशय, प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेत आहे.
Verse 20
أَمَّنْ هَـٰذَا ٱلَّذِى هُوَ جُندٌ لَّكُمْ يَنصُرُكُم مِّن دُونِ ٱلرَّحْمَـٰنِ ۚ إِنِ ٱلْكَـٰفِرُونَ إِلَّا فِى غُرُورٍ
Transliteration amman hādhā alladhī huwa jundun lakum yanṣurukum min dūni l-raḥmāni ini l-kāfirūna illā fī ghurūrin
Marathi २०. अल्लाहखेरीज तुमची कोणती सेना आहे, जी तुम्हाला मदत करू शकेल, काफिर (इन्कार करणारे) तर पूर्णतः धोक्यातच आहेत.
Verse 21
أَمَّنْ هَـٰذَا ٱلَّذِى يَرْزُقُكُمْ إِنْ أَمْسَكَ رِزْقَهُۥ ۚ بَل لَّجُّوا۟ فِى عُتُوٍّ وَنُفُورٍ
Transliteration amman hādhā alladhī yarzuqukum in amsaka riz'qahu bal lajjū fī ʿutuwwin wanufūrin
Marathi २१. जर अल्लाह आपली रोजी रोखून घेईल तर (सांगा) कोण आहे जो तुम्हाला रोजी (जीविका) देईल? किंबहुना (काफिर) तर विद्रोह आणि सत्यापासून उद्विग्न होण्यावर अडून बसले आहेत.
Verse 22
أَفَمَن يَمْشِى مُكِبًّا عَلَىٰ وَجْهِهِۦٓ أَهْدَىٰٓ أَمَّن يَمْشِى سَوِيًّا عَلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration afaman yamshī mukibban ʿalā wajhihi ahdā amman yamshī sawiyyan ʿalā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi २२. काय तो मनुष्य अधिक मार्गदर्शनावर चालणारा आहे, जो तोंडघशी पडून चालत असावा की तो, जो सरळ (पायांवर) मार्गावर चालत असेल?
Verse 23
قُلْ هُوَ ٱلَّذِىٓ أَنشَأَكُمْ وَجَعَلَ لَكُمُ ٱلسَّمْعَ وَٱلْأَبْصَـٰرَ وَٱلْأَفْـِٔدَةَ ۖ قَلِيلًا مَّا تَشْكُرُونَ
Transliteration qul huwa alladhī ansha-akum wajaʿala lakumu l-samʿa wal-abṣāra wal-afidata qalīlan mā tashkurūna
Marathi २३. सांगा की तोच (अल्लाह) आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले, (परंतु) तुम्ही फार कमीच कृतज्ञता व्यक्त करता.
Verse 24
قُلْ هُوَ ٱلَّذِى ذَرَأَكُمْ فِى ٱلْأَرْضِ وَإِلَيْهِ تُحْشَرُونَ
Transliteration qul huwa alladhī dhara-akum fī l-arḍi wa-ilayhi tuḥ'sharūna
Marathi २४. सांगा की तोच आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर (इतस्ततः) पसरविले, आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल.
Verse 25
وَيَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلْوَعْدُ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration wayaqūlūna matā hādhā l-waʿdu in kuntum ṣādiqīna
Marathi २५. आणि (काफिर) विचारतात की तो वायदा केव्हा प्रकट (पूर्ण) होईल, जर तुम्ही सच्चे असाल (तर सांगा)?
Verse 26
قُلْ إِنَّمَا ٱلْعِلْمُ عِندَ ٱللَّهِ وَإِنَّمَآ أَنَا۠ نَذِيرٌ مُّبِينٌ
Transliteration qul innamā l-ʿil'mu ʿinda l-lahi wa-innamā anā nadhīrun mubīnun
Marathi २६. (तुम्ही) सांगा की याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे. मी तर स्पष्टपणे खबरदार करणारा आहे.
Verse 27
فَلَمَّا رَأَوْهُ زُلْفَةً سِيٓـَٔتْ وُجُوهُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَقِيلَ هَـٰذَا ٱلَّذِى كُنتُم بِهِۦ تَدَّعُونَ
Transliteration falammā ra-awhu zul'fatan sīat wujūhu alladhīna kafarū waqīla hādhā alladhī kuntum bihi taddaʿūna
Marathi २७. जेव्हा या लोकांना तो वायदा निकट आलेला आढळेल, त्या वेळी या काफिरांचे चेहरे बिघडतील, मग त्यांना सांगितले जाईल की, हेच आहे ते, ज्याची तुम्ही मागणी करीत होते.
Verse 28
قُلْ أَرَءَيْتُمْ إِنْ أَهْلَكَنِىَ ٱللَّهُ وَمَن مَّعِىَ أَوْ رَحِمَنَا فَمَن يُجِيرُ ٱلْكَـٰفِرِينَ مِنْ عَذَابٍ أَلِيمٍ
Transliteration qul ara-aytum in ahlakaniya l-lahu waman maʿiya aw raḥimanā faman yujīru l-kāfirīna min ʿadhābin alīmin
Marathi २८. (तुम्ही) सांगा की, ठीक आहे. जर मला आणि माझ्या साथीदारांना अल्लाह नष्ट करील किंवा आमच्यावर दया कृपा करील (जे काही होवो, परंतु हे सांगा) की काफिरांना (इन्कार करणाऱ्यांना) कष्टदायक शिक्षा - यातनेपासून कोण वाचविल?
Verse 29
قُلْ هُوَ ٱلرَّحْمَـٰنُ ءَامَنَّا بِهِۦ وَعَلَيْهِ تَوَكَّلْنَا ۖ فَسَتَعْلَمُونَ مَنْ هُوَ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration qul huwa l-raḥmānu āmannā bihi waʿalayhi tawakkalnā fasataʿlamūna man huwa fī ḍalālin mubīnin
Marathi २९. (तुम्ही) सांगा की तोच रहमान (दयावान) आहे, आम्ही त्याच्यावर ईमान राखले आणि त्याच्यावरच आम्ही भरवसा केला. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की उघड (स्वरूपाच्या) मार्गभ्रष्टतेत कोण आहे?
Verse 30
قُلْ أَرَءَيْتُمْ إِنْ أَصْبَحَ مَآؤُكُمْ غَوْرًا فَمَن يَأْتِيكُم بِمَآءٍ مَّعِينٍۭ
Transliteration qul ara-aytum in aṣbaḥa māukum ghawran faman yatīkum bimāin maʿīnin
Marathi ३०. (तुम्ही) सांगा, ठीक आहे, बरे हे तर सांगा की जर तुमचे (पिण्याचे) पाणी जमीन शोषून घेईल तर मग कोण आहे जो तुमच्यासाठी निथारलेले साफ पाणी घेऊन येईल?
Read Surah Al-Mulk in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.