Surah Al-Hadid in Marathi: translation and audio
Surah 57 · الحديد · The Iron · 29 verses
Surah Al-Hadid verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Hadid word by word in English.
Verse 1
سَبَّحَ لِلَّهِ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ
Transliteration sabbaḥa lillahi mā fī l-samāwāti wal-arḍi wahuwa l-ʿazīzu l-ḥakīmu
Marathi १. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे (ते सर्व) अल्लाहचे महिमागान करीत आहेत आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमतशाली आहे.
Verse 2
لَهُۥ مُلْكُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ يُحْىِۦ وَيُمِيتُ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration lahu mul'ku l-samāwāti wal-arḍi yuḥ'yī wayumītu wahuwa ʿalā kulli shayin qadīrun
Marathi २. आकाशांचे आणि धरतीचे (समस्त) राज्य त्याचेच आहे, तोच जीवन देतो आणि मृत्युही आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो.
Verse 3
هُوَ ٱلْأَوَّلُ وَٱلْـَٔاخِرُ وَٱلظَّـٰهِرُ وَٱلْبَاطِنُ ۖ وَهُوَ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌ
Transliteration huwa l-awalu wal-ākhiru wal-ẓāhiru wal-bāṭinu wahuwa bikulli shayin ʿalīmun
Marathi ३. तोच आद्य आणि तोच अंतिम आहे, तोच उघड आणि तोच लपलेला आहे आणि तो प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.१
Verse 4
هُوَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ فِى سِتَّةِ أَيَّامٍ ثُمَّ ٱسْتَوَىٰ عَلَى ٱلْعَرْشِ ۚ يَعْلَمُ مَا يَلِجُ فِى ٱلْأَرْضِ وَمَا يَخْرُجُ مِنْهَا وَمَا يَنزِلُ مِنَ ٱلسَّمَآءِ وَمَا يَعْرُجُ فِيهَا ۖ وَهُوَ مَعَكُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ ۚ وَٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ
Transliteration huwa alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa fī sittati ayyāmin thumma is'tawā ʿalā l-ʿarshi yaʿlamu mā yaliju fī l-arḍi wamā yakhruju min'hā wamā yanzilu mina l-samāi wamā yaʿruju fīhā wahuwa maʿakum ayna mā kuntum wal-lahu bimā taʿmalūna baṣīrun
Marathi ४. तोच आहे ज्याने आकाशांना व जमिनीला सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (सिंहासना) वर उंचावला तो चांगल्या प्रकारे जाणतो त्या गोष्टीला, जी जमिनीत जाते आणि जी तिच्यातून निघते, आणि जी आकाशातून खाली येते आणि जी चढून आकाशात जाते आणि तुम्ही कोठेही ्सा, तो तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते पाहात आहे.
Verse 5
لَّهُۥ مُلْكُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَإِلَى ٱللَّهِ تُرْجَعُ ٱلْأُمُورُ
Transliteration lahu mul'ku l-samāwāti wal-arḍi wa-ilā l-lahi tur'jaʿu l-umūru
Marathi ५. आकाशांची व धरतीची राज्यसत्ता त्याचीच आहे आणि समस्त कार्य त्याच्याचकडे परतविली जातात.
Verse 6
يُولِجُ ٱلَّيْلَ فِى ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِى ٱلَّيْلِ ۚ وَهُوَ عَلِيمٌۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ
Transliteration yūliju al-layla fī l-nahāri wayūliju l-nahāra fī al-layli wahuwa ʿalīmun bidhāti l-ṣudūri
Marathi ६. तोच रात्रीला दिवसात दाखल करतो आणि तोच दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि छाती (मना) मध्ये लपलेल्या गोष्टींचे तो पूर्ण ज्ञान राखणारा आहे.
Verse 7
ءَامِنُوا۟ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَأَنفِقُوا۟ مِمَّا جَعَلَكُم مُّسْتَخْلَفِينَ فِيهِ ۖ فَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مِنكُمْ وَأَنفَقُوا۟ لَهُمْ أَجْرٌ كَبِيرٌ
Transliteration āminū bil-lahi warasūlihi wa-anfiqū mimmā jaʿalakum mus'takhlafīna fīhi fa-alladhīna āmanū minkum wa-anfaqū lahum ajrun kabīrun
Marathi ७. अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि धनातून खर्च करा ज्यात अल्लाहने तुम्हाला (इतरांचा) वारस बनविले आहे तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी ईमान राखेल आणि खर्च करेल तर अशांना फार मोठे पुण्य लाभेल.
Verse 8
وَمَا لَكُمْ لَا تُؤْمِنُونَ بِٱللَّهِ ۙ وَٱلرَّسُولُ يَدْعُوكُمْ لِتُؤْمِنُوا۟ بِرَبِّكُمْ وَقَدْ أَخَذَ مِيثَـٰقَكُمْ إِن كُنتُم مُّؤْمِنِينَ
Transliteration wamā lakum lā tu'minūna bil-lahi wal-rasūlu yadʿūkum litu'minū birabbikum waqad akhadha mīthāqakum in kuntum mu'minīna
Marathi ८. तुम्ही अल्लाहवर ईमान का नाही राखत? वास्तविक पैगंबर स्वतः तुम्हाला आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखण्याचे आवाहन करीत आहे आणि जर तुम्ही ईमान राखणारे असाल तर त्याने तुमच्याकडून दृढवचन घेतले आहे.
Verse 9
هُوَ ٱلَّذِى يُنَزِّلُ عَلَىٰ عَبْدِهِۦٓ ءَايَـٰتٍۭ بَيِّنَـٰتٍ لِّيُخْرِجَكُم مِّنَ ٱلظُّلُمَـٰتِ إِلَى ٱلنُّورِ ۚ وَإِنَّ ٱللَّهَ بِكُمْ لَرَءُوفٌ رَّحِيمٌ
Transliteration huwa alladhī yunazzilu ʿalā ʿabdihi āyātin bayyinātin liyukh'rijakum mina l-ẓulumāti ilā l-nūri wa-inna l-laha bikum laraūfun raḥīmun
Marathi ९. तो (अल्लाह) च आहे, जो आपल्या दासावर स्पष्ट आयती अवतरित करतो, यासाठी की त्याने तुम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्यावे. निःसंशय अल्लाह तुमच्यावर स्नेह, दया करणारा आहे.
Verse 10
وَمَا لَكُمْ أَلَّا تُنفِقُوا۟ فِى سَبِيلِ ٱللَّهِ وَلِلَّهِ مِيرَٰثُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ لَا يَسْتَوِى مِنكُم مَّنْ أَنفَقَ مِن قَبْلِ ٱلْفَتْحِ وَقَـٰتَلَ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ أَعْظَمُ دَرَجَةً مِّنَ ٱلَّذِينَ أَنفَقُوا۟ مِنۢ بَعْدُ وَقَـٰتَلُوا۟ ۚ وَكُلًّا وَعَدَ ٱللَّهُ ٱلْحُسْنَىٰ ۚ وَٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرٌ
Transliteration wamā lakum allā tunfiqū fī sabīli l-lahi walillahi mīrāthu l-samāwāti wal-arḍi lā yastawī minkum man anfaqa min qabli l-fatḥi waqātala ulāika aʿẓamu darajatan mina alladhīna anfaqū min baʿdu waqātalū wakullan waʿada l-lahu l-ḥus'nā wal-lahu bimā taʿmalūna khabīrun
Marathi १०. आणि तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च नाही करीत? वास्तविक आकाशांच्या आणि धरतीच्या समस्त वस्तूंचा स्वामी (एकटा) अल्लाहच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी विजयापूर्वी अल्लाहच्या मार्गात दिले आहे आणि धर्मयुद्ध (जिहाद) केले आहे ते दुसऱ्यांच्या समान नाहीत किंबहुना त्यांच्यापेक्षा उच्च पदाचे आहेत, ज्यांनी विजय प्राप्तीनंतर दान दिले आणि जिहाद केले. होय भलाईचा वायदा तर अल्लाहचा त्या सर्वांशी आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते जाणतो.
Verse 11
مَّن ذَا ٱلَّذِى يُقْرِضُ ٱللَّهَ قَرْضًا حَسَنًا فَيُضَـٰعِفَهُۥ لَهُۥ وَلَهُۥٓ أَجْرٌ كَرِيمٌ
Transliteration man dhā alladhī yuq'riḍu l-laha qarḍan ḥasanan fayuḍāʿifahu lahu walahu ajrun karīmun
Marathi ११. असा कोण आहे, जो अल्लाहला चांगल्या प्रकारे कर्ज देईल, मग अल्लाह त्याच्यासाठी ते वाढवित जाईल आणि त्याचा चांगला मोबदला ठरावा.
Verse 12
يَوْمَ تَرَى ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَـٰتِ يَسْعَىٰ نُورُهُم بَيْنَ أَيْدِيهِمْ وَبِأَيْمَـٰنِهِم بُشْرَىٰكُمُ ٱلْيَوْمَ جَنَّـٰتٌ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَا ۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلْفَوْزُ ٱلْعَظِيمُ
Transliteration yawma tarā l-mu'minīna wal-mu'mināti yasʿā nūruhum bayna aydīhim wabi-aymānihim bush'rākumu l-yawma jannātun tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā dhālika huwa l-fawzu l-ʿaẓīmu
Marathi १२. (कयामतच्या) दिवशी तुम्ही पाहाल की ईमान राखणाऱ्या पुरुषांचे आणि स्त्रियांचे तेज (नूर) त्यांच्या पुढे पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. आज तुम्हाला त्या जन्नतींचा शुभ समाचार आहे, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील, हीच मोठी सफलता आहे.
Verse 13
يَوْمَ يَقُولُ ٱلْمُنَـٰفِقُونَ وَٱلْمُنَـٰفِقَـٰتُ لِلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱنظُرُونَا نَقْتَبِسْ مِن نُّورِكُمْ قِيلَ ٱرْجِعُوا۟ وَرَآءَكُمْ فَٱلْتَمِسُوا۟ نُورًا فَضُرِبَ بَيْنَهُم بِسُورٍ لَّهُۥ بَابٌۢ بَاطِنُهُۥ فِيهِ ٱلرَّحْمَةُ وَظَـٰهِرُهُۥ مِن قِبَلِهِ ٱلْعَذَابُ
Transliteration yawma yaqūlu l-munāfiqūna wal-munāfiqātu lilladhīna āmanū unẓurūnā naqtabis min nūrikum qīla ir'jiʿū warāakum fal-tamisū nūran faḍuriba baynahum bisūrin lahu bābun bāṭinuhu fīhi l-raḥmatu waẓāhiruhu min qibalihi l-ʿadhābu
Marathi १३. त्या दिवशी दांभिक (मूनाफिक) पुरुष आणि दांभिक स्त्रिया ईमानधारकांना म्हणतील की आमची प्रतीक्षा तर करा की आम्हीही तुमच्या प्रकाशामधून थोडा प्रकाशा घ्यावा, उत्तर दिले जाईल की तुम्ही मागे फिरा आणि प्रकाश शोधा, मग त्यांच्या आणि यांच्या दरम्यान एक भिंत उभी केली जाईल, जिच्यात दरवाजाही असेल, त्याच्या आतल्या भागात रहमत (अल्लाहची कृपा) असेल आणि बाहेरच्या भागात अज़ाब (शिक्षा - यातना) असेल.
Verse 14
يُنَادُونَهُمْ أَلَمْ نَكُن مَّعَكُمْ ۖ قَالُوا۟ بَلَىٰ وَلَـٰكِنَّكُمْ فَتَنتُمْ أَنفُسَكُمْ وَتَرَبَّصْتُمْ وَٱرْتَبْتُمْ وَغَرَّتْكُمُ ٱلْأَمَانِىُّ حَتَّىٰ جَآءَ أَمْرُ ٱللَّهِ وَغَرَّكُم بِٱللَّهِ ٱلْغَرُورُ
Transliteration yunādūnahum alam nakun maʿakum qālū balā walākinnakum fatantum anfusakum watarabbaṣtum wa-ir'tabtum wagharratkumu l-amāniyu ḥattā jāa amru l-lahi wagharrakum bil-lahi l-gharūru
Marathi १४. हे ओरडून ओरडून त्यांना सांगतील की काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? ते म्हणतील, हो, होते जरूर, परंतु तुम्ही स्वतःला मार्गभ्रष्टतेत ठेवले होते. आणि प्रतीक्षा करीत राहिले आणि शंका - संशय करीत राहिले आणि तुम्हाला तुमच्या (निरर्थक) इच्छा आकांक्षांनी धोक्यातच ठेवले येथेपर्यंत की अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला आणि तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत धोका देणाऱ्याने धोक्यातच ठेवले.
Verse 15
فَٱلْيَوْمَ لَا يُؤْخَذُ مِنكُمْ فِدْيَةٌ وَلَا مِنَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ۚ مَأْوَىٰكُمُ ٱلنَّارُ ۖ هِىَ مَوْلَىٰكُمْ ۖ وَبِئْسَ ٱلْمَصِيرُ
Transliteration fal-yawma lā yu'khadhu minkum fid'yatun walā mina alladhīna kafarū mawākumu l-nāru hiya mawlākum wabi'sa l-maṣīru
Marathi १५. तेव्हा आज ना तुमच्याकडून फिदिया (आणि न बदला) स्वीकारला जाईल आणि ना काफिरांकडून. तुम्हा सर्वांचे ठिकाण जहन्नम आहे. तीच तुमची सोबती आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे.
Verse 16
۞ أَلَمْ يَأْنِ لِلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ أَن تَخْشَعَ قُلُوبُهُمْ لِذِكْرِ ٱللَّهِ وَمَا نَزَلَ مِنَ ٱلْحَقِّ وَلَا يَكُونُوا۟ كَٱلَّذِينَ أُوتُوا۟ ٱلْكِتَـٰبَ مِن قَبْلُ فَطَالَ عَلَيْهِمُ ٱلْأَمَدُ فَقَسَتْ قُلُوبُهُمْ ۖ وَكَثِيرٌ مِّنْهُمْ فَـٰسِقُونَ
Transliteration alam yani lilladhīna āmanū an takhshaʿa qulūbuhum lidhik'ri l-lahi wamā nazala mina l-ḥaqi walā yakūnū ka-alladhīna ūtū l-kitāba min qablu faṭāla ʿalayhimu l-amadu faqasat qulūbuhum wakathīrun min'hum fāsiqūna
Marathi १६. काय अजूनपर्यंत ईमान राखणाऱ्यांकरिता ती वेळ नाही आली की त्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने आणि जे सत्य अवतरित झाले आहे त्याने कोमल व्हावीत, आणि त्या लोकांसारखी न व्हावीत, ज्यांना यांच्या पूर्वी ग्रंथ प्रदान केला गेला, मग जेव्हा त्यांच्यावर एक दीर्घ मुदत लोटली, तेव्हा त्यांची हृदये कठोर झालीत आणि त्यांच्यापैकी अधिकांश दुराचारी आहेत.
Verse 17
ٱعْلَمُوٓا۟ أَنَّ ٱللَّهَ يُحْىِ ٱلْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ قَدْ بَيَّنَّا لَكُمُ ٱلْـَٔايَـٰتِ لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ
Transliteration iʿ'lamū anna l-laha yuḥ'yī l-arḍa baʿda mawtihā qad bayyannā lakumu l-āyāti laʿallakum taʿqilūna
Marathi १७. विश्वास राखा की अल्लाहच धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. आम्ही तर तुमच्यासाठी आपल्या निशाण्या स्पष्ट सांगितल्या, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.
Verse 18
إِنَّ ٱلْمُصَّدِّقِينَ وَٱلْمُصَّدِّقَـٰتِ وَأَقْرَضُوا۟ ٱللَّهَ قَرْضًا حَسَنًا يُضَـٰعَفُ لَهُمْ وَلَهُمْ أَجْرٌ كَرِيمٌ
Transliteration inna l-muṣadiqīna wal-muṣadiqāti wa-aqraḍū l-laha qarḍan ḥasanan yuḍāʿafu lahum walahum ajrun karīmun
Marathi १८. निःसंशय, दान देणारे पुरुष आणि स्त्रिया आणि जे अल्लाहला प्रेमाने चांगले कर्ज देत आहेत त्यांच्यासाठी अनेक पटींनी वाढविले जाईल, आणि त्यांच्यासाठी उत्तम असा मोबदला आहे.
Verse 19
وَٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦٓ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلصِّدِّيقُونَ ۖ وَٱلشُّهَدَآءُ عِندَ رَبِّهِمْ لَهُمْ أَجْرُهُمْ وَنُورُهُمْ ۖ وَٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَكَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَآ أُو۟لَـٰٓئِكَ أَصْحَـٰبُ ٱلْجَحِيمِ
Transliteration wa-alladhīna āmanū bil-lahi warusulihi ulāika humu l-ṣidīqūna wal-shuhadāu ʿinda rabbihim lahum ajruhum wanūruhum wa-alladhīna kafarū wakadhabū biāyātinā ulāika aṣḥābu l-jaḥīmi
Marathi १९. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर जे लोक ईमान राखतात तेच आपल्या पालनकर्त्याजवळ सच्चे आणि शहीद आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला आणि त्यांचे दिव्य तेज आहे, आणि जे कुप्र (इन्कार) करतात आणि आमच्या निशाण्यांना खोटे ठरवितात ते जहन्नमी आहेत.
Verse 20
ٱعْلَمُوٓا۟ أَنَّمَا ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَا لَعِبٌ وَلَهْوٌ وَزِينَةٌ وَتَفَاخُرٌۢ بَيْنَكُمْ وَتَكَاثُرٌ فِى ٱلْأَمْوَٰلِ وَٱلْأَوْلَـٰدِ ۖ كَمَثَلِ غَيْثٍ أَعْجَبَ ٱلْكُفَّارَ نَبَاتُهُۥ ثُمَّ يَهِيجُ فَتَرَىٰهُ مُصْفَرًّا ثُمَّ يَكُونُ حُطَـٰمًا ۖ وَفِى ٱلْـَٔاخِرَةِ عَذَابٌ شَدِيدٌ وَمَغْفِرَةٌ مِّنَ ٱللَّهِ وَرِضْوَٰنٌ ۚ وَمَا ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَآ إِلَّا مَتَـٰعُ ٱلْغُرُورِ
Transliteration iʿ'lamū annamā l-ḥayatu l-dun'yā laʿibun walahwun wazīnatun watafākhurun baynakum watakāthurun fī l-amwāli wal-awlādi kamathali ghaythin aʿjaba l-kufāra nabātuhu thumma yahīju fatarāhu muṣ'farran thumma yakūnu ḥuṭāman wafī l-ākhirati ʿadhābun shadīdun wamaghfiratun mina l-lahi wariḍ'wānun wamā l-ḥayatu l-dun'yā illā matāʿu l-ghurūri
Marathi २०. लक्षात ठेवा की या जगाचे जीवन तर केवळ खेळ तमाशा आणि शोभा सजावट आणि आपसात अभिमान (आणि अहंकार) आणि धन व संततीत एकमेकाहून स्वतःला जास्त दाखविणे आहे. ज्याप्रमाणे पाऊस आणि त्यापासून झालेली पैदावार शेतकऱ्यांना सुखद वाटते, मग जेव्हा ती सुकते तेव्हा तिला तुम्ही पिवळ्या रंगात पाहतात, मग ती अगदी चुरेचूर होऊन जाते, आणि आखिरतमध्ये सक्त शिक्षा-यातना आणि अल्लाहची माफी आणि प्रसन्नता आहे आणि या जगाचे जीवन केवळ धोक्याच्या सामुग्रीशिवाय आणखी काहीच नाही.
Verse 21
سَابِقُوٓا۟ إِلَىٰ مَغْفِرَةٍ مِّن رَّبِّكُمْ وَجَنَّةٍ عَرْضُهَا كَعَرْضِ ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ أُعِدَّتْ لِلَّذِينَ ءَامَنُوا۟ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦ ۚ ذَٰلِكَ فَضْلُ ٱللَّهِ يُؤْتِيهِ مَن يَشَآءُ ۚ وَٱللَّهُ ذُو ٱلْفَضْلِ ٱلْعَظِيمِ
Transliteration sābiqū ilā maghfiratin min rabbikum wajannatin ʿarḍuhā kaʿarḍi l-samāi wal-arḍi uʿiddat lilladhīna āmanū bil-lahi warusulihi dhālika faḍlu l-lahi yu'tīhi man yashāu wal-lahu dhū l-faḍli l-ʿaẓīmi
Marathi २१. (या) धावा आपल्या पालनकर्त्याच्या माफीकडे आणि त्या जन्नतकडे जिचा विस्तार आकाश आणि जमिनीच्या विस्ताराइतका आहे. ती अशा लोकांसाठी बनविली गेली आहे, जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखतात, ही अल्लाहची दया कृपा आहे, ज्याला इच्छितो प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपावान आहे.
Verse 22
مَآ أَصَابَ مِن مُّصِيبَةٍ فِى ٱلْأَرْضِ وَلَا فِىٓ أَنفُسِكُمْ إِلَّا فِى كِتَـٰبٍ مِّن قَبْلِ أَن نَّبْرَأَهَآ ۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٌ
Transliteration mā aṣāba min muṣībatin fī l-arḍi walā fī anfusikum illā fī kitābin min qabli an nabra-ahā inna dhālika ʿalā l-lahi yasīrun
Marathi २२. कोणतेही संकट या जगावर येत नाही ना खास तुमच्या प्राणांवर परंतु यापूर्वी की आम्ही त्यास निर्माण करावे, ते एका विशेष ग्रंथात लिहिलेले आहे. निःसंशय हे काम अल्लाहकरिता (मोठे) सोपे आहे.
Verse 23
لِّكَيْلَا تَأْسَوْا۟ عَلَىٰ مَا فَاتَكُمْ وَلَا تَفْرَحُوا۟ بِمَآ ءَاتَىٰكُمْ ۗ وَٱللَّهُ لَا يُحِبُّ كُلَّ مُخْتَالٍ فَخُورٍ
Transliteration likaylā tasaw ʿalā mā fātakum walā tafraḥū bimā ātākum wal-lahu lā yuḥibbu kulla mukh'tālin fakhūrin
Marathi २३. यासाठी की तुम्ही आपल्याकडून हिरावून घेतल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल दुःखी न व्हावे आणि ना प्रदान केलेल्या गोष्टीबद्दल गर्विष्ठ व्हावे आणि शेखी मिरविणाऱ्या, घमेंड करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम राखत नाही.
Verse 24
ٱلَّذِينَ يَبْخَلُونَ وَيَأْمُرُونَ ٱلنَّاسَ بِٱلْبُخْلِ ۗ وَمَن يَتَوَلَّ فَإِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلْغَنِىُّ ٱلْحَمِيدُ
Transliteration alladhīna yabkhalūna wayamurūna l-nāsa bil-bukh'li waman yatawalla fa-inna l-laha huwa l-ghaniyu l-ḥamīdu
Marathi २४. जे (स्वतःही) कंजूसपणा करतात आणि इतरांनाही कंजूसपणा करण्याची शिकवण देतात, (ऐका!) जो कोणी तोंड फिरविल, अल्लाह निःस्पृह आणि प्रशंसेस पात्र आहे.
Verse 25
لَقَدْ أَرْسَلْنَا رُسُلَنَا بِٱلْبَيِّنَـٰتِ وَأَنزَلْنَا مَعَهُمُ ٱلْكِتَـٰبَ وَٱلْمِيزَانَ لِيَقُومَ ٱلنَّاسُ بِٱلْقِسْطِ ۖ وَأَنزَلْنَا ٱلْحَدِيدَ فِيهِ بَأْسٌ شَدِيدٌ وَمَنَـٰفِعُ لِلنَّاسِ وَلِيَعْلَمَ ٱللَّهُ مَن يَنصُرُهُۥ وَرُسُلَهُۥ بِٱلْغَيْبِ ۚ إِنَّ ٱللَّهَ قَوِىٌّ عَزِيزٌ
Transliteration laqad arsalnā rusulanā bil-bayināti wa-anzalnā maʿahumu l-kitāba wal-mīzāna liyaqūma l-nāsu bil-qis'ṭi wa-anzalnā l-ḥadīda fīhi basun shadīdun wamanāfiʿu lilnnāsi waliyaʿlama l-lahu man yanṣuruhu warusulahu bil-ghaybi inna l-laha qawiyyun ʿazīzun
Marathi २५. निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांना (संदेशवाहकांना) स्पष्ट निशाण्या देऊन पाठविले आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि न्याय (तराजू) अवतरित केला, यासाठी की लोकांनी न्यायावरकायम राहावे आणि आम्ही लोखंडही अवतरित केले, ज्यात मोठी (हैबत आणि) ताकद आहे आणि लोकांसाठी इतरही अनेक फायदे आहेत आणि यासाठीही की अल्लाहने हे जाणून घ्यावे की त्याची व त्याच्या पैगंबरांची मदत न पाहता कोण करतो. निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.
Verse 26
وَلَقَدْ أَرْسَلْنَا نُوحًا وَإِبْرَٰهِيمَ وَجَعَلْنَا فِى ذُرِّيَّتِهِمَا ٱلنُّبُوَّةَ وَٱلْكِتَـٰبَ ۖ فَمِنْهُم مُّهْتَدٍ ۖ وَكَثِيرٌ مِّنْهُمْ فَـٰسِقُونَ
Transliteration walaqad arsalnā nūḥan wa-ib'rāhīma wajaʿalnā fī dhurriyyatihimā l-nubuwata wal-kitāba famin'hum muh'tadin wakathīrun min'hum fāsiqūna
Marathi २६. निःसंशय, आम्ही नूह आणि इब्राहीम (अलै.) यांना (पैगंबर बनवून) पाठविले आणि आम्ही त्या दोघांच्या संततीत प्रेषित्व आणि ग्रंथ कायम ठेवला , तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी मार्गदर्शन अंगीकारले आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण दुराचारी राहिले.
Verse 27
ثُمَّ قَفَّيْنَا عَلَىٰٓ ءَاثَـٰرِهِم بِرُسُلِنَا وَقَفَّيْنَا بِعِيسَى ٱبْنِ مَرْيَمَ وَءَاتَيْنَـٰهُ ٱلْإِنجِيلَ وَجَعَلْنَا فِى قُلُوبِ ٱلَّذِينَ ٱتَّبَعُوهُ رَأْفَةً وَرَحْمَةً وَرَهْبَانِيَّةً ٱبْتَدَعُوهَا مَا كَتَبْنَـٰهَا عَلَيْهِمْ إِلَّا ٱبْتِغَآءَ رِضْوَٰنِ ٱللَّهِ فَمَا رَعَوْهَا حَقَّ رِعَايَتِهَا ۖ فَـَٔاتَيْنَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ مِنْهُمْ أَجْرَهُمْ ۖ وَكَثِيرٌ مِّنْهُمْ فَـٰسِقُونَ
Transliteration thumma qaffaynā ʿalā āthārihim birusulinā waqaffaynā biʿīsā ib'ni maryama waātaynāhu l-injīla wajaʿalnā fī qulūbi alladhīna ittabaʿūhu rafatan waraḥmatan warahbāniyyatan ib'tadaʿūhā mā katabnāhā ʿalayhim illā ib'tighāa riḍ'wāni l-lahi famā raʿawhā ḥaqqa riʿāyatihā faātaynā alladhīna āmanū min'hum ajrahum wakathīrun min'hum fāsiqūna
Marathi २७. त्यांच्यानंतर, तरीही आम्ही सतत आपले पैगंबर पाठवित राहिलो आणि त्यांच्यानंतर मरियमचा पुत्र ईसाला पाठविले व त्यांना इंजील (ग्रंथ) प्रदान केला आणि त्यांच्या अनुयायींच्या मनात प्रेम आणि दयेची भावना ठेवली, परंतु वैराग्याचा मार्ग त्यांनी स्वतः शोधून कढला, आम्ही तो त्यांच्यासाठी अनिवार्य केला नव्हता, अल्लाहच्या प्रसन्नतेचा शोध घेण्याखेरीज, तेव्हा त्यांनी त्याचे पूर्णतः पालन केले नाही, तरी देखील आम्ही त्यांच्यापैकी ज्यांनी ईमान राखले होते, त्यांना त्यांचा मोबदला प्रदान केला आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक दुराचारी आहेत.
Verse 28
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَءَامِنُوا۟ بِرَسُولِهِۦ يُؤْتِكُمْ كِفْلَيْنِ مِن رَّحْمَتِهِۦ وَيَجْعَل لَّكُمْ نُورًا تَمْشُونَ بِهِۦ وَيَغْفِرْ لَكُمْ ۚ وَٱللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū ittaqū l-laha waāminū birasūlihi yu'tikum kif'layni min raḥmatihi wayajʿal lakum nūran tamshūna bihi wayaghfir lakum wal-lahu ghafūrun raḥīmun
Marathi २८. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा, अल्लाह तुम्हाला आपल्या दयेने दुप्पट हिस्सा देईल आणि तुम्हाला दिव्य तेज (नूर) प्रदान करील, ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालाल आणि तो (तुमचे अपराधीही) माफ करील, अल्लाह मोठा माफ करणारा अतिशय दयावान आहे.
Verse 29
لِّئَلَّا يَعْلَمَ أَهْلُ ٱلْكِتَـٰبِ أَلَّا يَقْدِرُونَ عَلَىٰ شَىْءٍ مِّن فَضْلِ ٱللَّهِ ۙ وَأَنَّ ٱلْفَضْلَ بِيَدِ ٱللَّهِ يُؤْتِيهِ مَن يَشَآءُ ۚ وَٱللَّهُ ذُو ٱلْفَضْلِ ٱلْعَظِيمِ
Transliteration li-allā yaʿlama ahlu l-kitābi allā yaqdirūna ʿalā shayin min faḍli l-lahi wa-anna l-faḍla biyadi l-lahi yu'tīhi man yashāu wal-lahu dhū l-faḍli l-ʿaẓīmi
Marathi २९. हे अशासाठी की (अल्लाहचा) ग्रंथ बाळगणाऱ्यांनी जाणून घ्यावे की अल्लाहच्या कृपेच्या कोणत्याही हिश्यावर त्यांचा अधिकार नाही आणि हे की, समस्त कृपा अल्लाहच्याच हाती आहे, तो ज्याला इच्छिल, देईल आणि अल्लाहच मोठा कृपावंत आहे.
Read Surah Al-Hadid in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.