Surah Al-Fath in Marathi: translation and audio
Surah 48 · الفتح · The Victory · 29 verses
Surah Al-Fath verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Fath word by word in English.
Verse 1
إِنَّا فَتَحْنَا لَكَ فَتْحًا مُّبِينًا
Transliteration innā fataḥnā laka fatḥan mubīnan
Marathi १. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे.
Verse 2
لِّيَغْفِرَ لَكَ ٱللَّهُ مَا تَقَدَّمَ مِن ذَنۢبِكَ وَمَا تَأَخَّرَ وَيُتِمَّ نِعْمَتَهُۥ عَلَيْكَ وَيَهْدِيَكَ صِرَٰطًا مُّسْتَقِيمًا
Transliteration liyaghfira laka l-lahu mā taqaddama min dhanbika wamā ta-akhara wayutimma niʿ'matahu ʿalayka wayahdiyaka ṣirāṭan mus'taqīman
Marathi २. यासाठी की अल्लाहने तुमच्या पुढच्या मागच्या चुका माफ कराव्यात, आणि तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे.
Verse 3
وَيَنصُرَكَ ٱللَّهُ نَصْرًا عَزِيزًا
Transliteration wayanṣuraka l-lahu naṣran ʿazīzan
Marathi ३. आणि तुम्हाला एक भरपूर मदत प्रदान करावी.
Verse 4
هُوَ ٱلَّذِىٓ أَنزَلَ ٱلسَّكِينَةَ فِى قُلُوبِ ٱلْمُؤْمِنِينَ لِيَزْدَادُوٓا۟ إِيمَـٰنًا مَّعَ إِيمَـٰنِهِمْ ۗ وَلِلَّهِ جُنُودُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمًا
Transliteration huwa alladhī anzala l-sakīnata fī qulūbi l-mu'minīna liyazdādū īmānan maʿa īmānihim walillahi junūdu l-samāwāti wal-arḍi wakāna l-lahu ʿalīman ḥakīman
Marathi ४. तोच आहे ज्याने मुसलमानांच्या मनात शांती (आणि आत्मिवश्वास) अवतरित केला, यासाठी की त्यांनी आपल्या ईमानासोबतच आणखी जास्त ईमानात वृद्धिंगत व्हावे. आणि आकाशांची व धरतीची समस्त सैन्ये अल्लाहचीच आहेत, आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे.
Verse 5
لِّيُدْخِلَ ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَـٰتِ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ خَـٰلِدِينَ فِيهَا وَيُكَفِّرَ عَنْهُمْ سَيِّـَٔاتِهِمْ ۚ وَكَانَ ذَٰلِكَ عِندَ ٱللَّهِ فَوْزًا عَظِيمًا
Transliteration liyud'khila l-mu'minīna wal-mu'mināti jannātin tajrī min taḥtihā l-anhāru khālidīna fīhā wayukaffira ʿanhum sayyiātihim wakāna dhālika ʿinda l-lahi fawzan ʿaẓīman
Marathi ५. यासाठी की मुस्लिम पुरुषांना आणि स्त्रियांना त्या जन्नतींमध्ये दाखल करावे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते सदैव काळ राहतील आणि त्यांच्यापासून त्यांची दुष्कर्मे दूर करावीत आणि अल्लाहच्या जवळही फार मोठी सफलता आहे.
Verse 6
وَيُعَذِّبَ ٱلْمُنَـٰفِقِينَ وَٱلْمُنَـٰفِقَـٰتِ وَٱلْمُشْرِكِينَ وَٱلْمُشْرِكَـٰتِ ٱلظَّآنِّينَ بِٱللَّهِ ظَنَّ ٱلسَّوْءِ ۚ عَلَيْهِمْ دَآئِرَةُ ٱلسَّوْءِ ۖ وَغَضِبَ ٱللَّهُ عَلَيْهِمْ وَلَعَنَهُمْ وَأَعَدَّ لَهُمْ جَهَنَّمَ ۖ وَسَآءَتْ مَصِيرًا
Transliteration wayuʿadhiba l-munāfiqīna wal-munāfiqāti wal-mush'rikīna wal-mush'rikāti l-ẓānīna bil-lahi ẓanna l-sawi ʿalayhim dāiratu l-sawi waghaḍiba l-lahu ʿalayhim walaʿanahum wa-aʿadda lahum jahannama wasāat maṣīran
Marathi ६. आणि यासाठी की त्या मुनाफिक (दांभिक) पुरुषांना आणि मुनाफिक स्त्रियांना, आणि मूर्तिपूजक पुरुषांना व मूर्तिपूजक स्त्रियांना अज़ाब (शिक्षा) द्यावी, जे अल्लाहविषयी गैरसमज बाळगतात (वस्तुतः) त्याच्यावरच वाईटपणाचे चक्र आहे. अल्लाह त्यांच्यावर नाराज झाला आणि त्याने त्यांना धिःक्कारले आणि त्यांच्यासाठी जहन्नम तयार केली आणि ते परतीचे मोठे वाईट ठिकाण आहे.
Verse 7
وَلِلَّهِ جُنُودُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمًا
Transliteration walillahi junūdu l-samāwāti wal-arḍi wakāna l-lahu ʿazīzan ḥakīman
Marathi ७. आणि अल्लाहच्याचकरिता आकाशांची आणि धरतीची सैन्ये आहेत, आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.
Verse 8
إِنَّآ أَرْسَلْنَـٰكَ شَـٰهِدًا وَمُبَشِّرًا وَنَذِيرًا
Transliteration innā arsalnāka shāhidan wamubashiran wanadhīran
Marathi ८. निःसंशय, आम्ही तुम्हाला साक्ष देणारा आणि शुभ समाचार ऐकविणारा व खबरदार करणारा बनवून पाठविले आहे.
Verse 9
لِّتُؤْمِنُوا۟ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَتُعَزِّرُوهُ وَتُوَقِّرُوهُ وَتُسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا
Transliteration litu'minū bil-lahi warasūlihi watuʿazzirūhu watuwaqqirūhu watusabbiḥūhu buk'ratan wa-aṣīlan
Marathi ९. यासाठी की (हे ईमानधारकांनो!) तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि त्याला सहाय्य करा व त्याचा आदर राखा, आणि अल्लाहचे पावित्र्य सकाळ-संध्याकाळ वर्णन करा.
Verse 10
إِنَّ ٱلَّذِينَ يُبَايِعُونَكَ إِنَّمَا يُبَايِعُونَ ٱللَّهَ يَدُ ٱللَّهِ فَوْقَ أَيْدِيهِمْ ۚ فَمَن نَّكَثَ فَإِنَّمَا يَنكُثُ عَلَىٰ نَفْسِهِۦ ۖ وَمَنْ أَوْفَىٰ بِمَا عَـٰهَدَ عَلَيْهُ ٱللَّهَ فَسَيُؤْتِيهِ أَجْرًا عَظِيمًا
Transliteration inna alladhīna yubāyiʿūnaka innamā yubāyiʿūna l-laha yadu l-lahi fawqa aydīhim faman nakatha fa-innamā yankuthu ʿalā nafsihi waman awfā bimā ʿāhada ʿalayhu l-laha fasayu'tīhi ajran ʿaẓīman
Marathi १०. निःसंशय, जे लोक तुमच्याशी बैअत (अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे आज्ञापालन व अनुसरण करण्याचा वायदा ताकीदपूर्वक जाहीर करणे) करतात, ते निःसंशय, अल्लाहशीच बैअत करतात. त्यांच्या हातावर अल्लाहचा हात आहे, तेव्हा जो मनुष्य वचन भंग करील तर तो स्वतःवरच वचन भंग करतो, आणि जो मनुष्य तो वायदा पूर्ण करील, जो त्याने अल्लाहशी केला आहे, तर त्याला लवकरच अल्लाह फार महान मोबदला प्रदान करील.
Verse 11
سَيَقُولُ لَكَ ٱلْمُخَلَّفُونَ مِنَ ٱلْأَعْرَابِ شَغَلَتْنَآ أَمْوَٰلُنَا وَأَهْلُونَا فَٱسْتَغْفِرْ لَنَا ۚ يَقُولُونَ بِأَلْسِنَتِهِم مَّا لَيْسَ فِى قُلُوبِهِمْ ۚ قُلْ فَمَن يَمْلِكُ لَكُم مِّنَ ٱللَّهِ شَيْـًٔا إِنْ أَرَادَ بِكُمْ ضَرًّا أَوْ أَرَادَ بِكُمْ نَفْعًۢا ۚ بَلْ كَانَ ٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرًۢا
Transliteration sayaqūlu laka l-mukhalafūna mina l-aʿrābi shaghalatnā amwālunā wa-ahlūnā fa-is'taghfir lanā yaqūlūna bi-alsinatihim mā laysa fī qulūbihim qul faman yamliku lakum mina l-lahi shayan in arāda bikum ḍarran aw arāda bikum nafʿan bal kāna l-lahu bimā taʿmalūna khabīran
Marathi ११. ग्रामीणांपैकी जे मागे सोडून दिले गेले होते, ते आता तुम्हाला निश्चित म्हणतील की आम्ही आपल्या धन-संपत्ती व संततीतच व्यस्त राहिलो, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी माफीची दुआ-प्रार्थना करा. हे लोक आपल्या तोंडांनी ते बोलतात, जे त्यांच्या मनात नाही. तुम्ही उत्तर द्या की तुमच्यासाठी अल्लाहतर्फे एखाद्या गोष्टीचाही अधिकार कोण बाळगतो, जर तो तुम्हाला नुकसान पोहचवू इच्छिल किंवा तुम्हाला काही लाभ पोहचवू इच्छिल? किंबहुना तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 12
بَلْ ظَنَنتُمْ أَن لَّن يَنقَلِبَ ٱلرَّسُولُ وَٱلْمُؤْمِنُونَ إِلَىٰٓ أَهْلِيهِمْ أَبَدًا وَزُيِّنَ ذَٰلِكَ فِى قُلُوبِكُمْ وَظَنَنتُمْ ظَنَّ ٱلسَّوْءِ وَكُنتُمْ قَوْمًۢا بُورًا
Transliteration bal ẓanantum an lan yanqaliba l-rasūlu wal-mu'minūna ilā ahlīhim abadan wazuyyina dhālika fī qulūbikum waẓanantum ẓanna l-sawi wakuntum qawman būran
Marathi १२. (नव्हे) किंबहुना तुम्ही तर असे गृहीत धरले होते की पैगंबर आणि मुसलमानांचे आपल्या घरांकडे परतणे अगदी अशक्य आहे आणि हाच विचार तुमच्या मनांमध्ये रुजला, तुम्ही दुराग्रह बाळगला होता (वास्तविक) तुम्ही लोक आहातच नष्ट होणारे.
Verse 13
وَمَن لَّمْ يُؤْمِنۢ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ فَإِنَّآ أَعْتَدْنَا لِلْكَـٰفِرِينَ سَعِيرًا
Transliteration waman lam yu'min bil-lahi warasūlihi fa-innā aʿtadnā lil'kāfirīna saʿīran
Marathi १३. आणि जो मनुष्य अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखणारे नाही तर आम्ही देखील अशा काफिरांकरिता धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.
Verse 14
وَلِلَّهِ مُلْكُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ يَغْفِرُ لِمَن يَشَآءُ وَيُعَذِّبُ مَن يَشَآءُ ۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا
Transliteration walillahi mul'ku l-samāwāti wal-arḍi yaghfiru liman yashāu wayuʿadhibu man yashāu wakāna l-lahu ghafūran raḥīman
Marathi १४. आणि आकाशांची व धरतीची राज्य-सत्ता अल्लाहकरिताच आहे तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल अज़ाब (शिक्षा) देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
Verse 15
سَيَقُولُ ٱلْمُخَلَّفُونَ إِذَا ٱنطَلَقْتُمْ إِلَىٰ مَغَانِمَ لِتَأْخُذُوهَا ذَرُونَا نَتَّبِعْكُمْ ۖ يُرِيدُونَ أَن يُبَدِّلُوا۟ كَلَـٰمَ ٱللَّهِ ۚ قُل لَّن تَتَّبِعُونَا كَذَٰلِكُمْ قَالَ ٱللَّهُ مِن قَبْلُ ۖ فَسَيَقُولُونَ بَلْ تَحْسُدُونَنَا ۚ بَلْ كَانُوا۟ لَا يَفْقَهُونَ إِلَّا قَلِيلًا
Transliteration sayaqūlu l-mukhalafūna idhā inṭalaqtum ilā maghānima litakhudhūhā dharūnā nattabiʿ'kum yurīdūna an yubaddilū kalāma l-lahi qul lan tattabiʿūnā kadhālikum qāla l-lahu min qablu fasayaqūlūna bal taḥsudūnanā bal kānū lā yafqahūna illā qalīlan
Marathi १५. जेव्हा तुम्ही (युद्धात हाती लागलेला) परिहार घेण्यास जाऊ लागला, तेव्हा त्वरित हे मागे सोडलेले लोक म्हणतील की आम्हालाही आपल्या सोबत येण्याची आज्ञा द्या. ते असे इच्छितात की अल्लाहचे कथन बदलून टाकावे (तुम्ही त्यांना) सांगा की, अल्लाहने या आधीच सांगून टाकले आहे की तुम्ही कधीही आमचे अनुसरण न कराल तेव्हा ते यावर उत्तर देतील की (नाही, नाही) किंबहुना तुम्हीच आमचा मत्सर करता. (खरी गोष्ट अशी की) हे लोक फार कमी समजतात.
Verse 16
قُل لِّلْمُخَلَّفِينَ مِنَ ٱلْأَعْرَابِ سَتُدْعَوْنَ إِلَىٰ قَوْمٍ أُو۟لِى بَأْسٍ شَدِيدٍ تُقَـٰتِلُونَهُمْ أَوْ يُسْلِمُونَ ۖ فَإِن تُطِيعُوا۟ يُؤْتِكُمُ ٱللَّهُ أَجْرًا حَسَنًا ۖ وَإِن تَتَوَلَّوْا۟ كَمَا تَوَلَّيْتُم مِّن قَبْلُ يُعَذِّبْكُمْ عَذَابًا أَلِيمًا
Transliteration qul lil'mukhallafīna mina l-aʿrābi satud'ʿawna ilā qawmin ulī basin shadīdin tuqātilūnahum aw yus'limūna fa-in tuṭīʿū yu'tikumu l-lahu ajran ḥasanan wa-in tatawallaw kamā tawallaytum min qablu yuʿadhib'kum ʿadhāban alīman
Marathi १६. (तुम्ही) मागे सोडलेल्या ग्रामीण लोकांना सांगा की लवकरच तुम्ही एका मोठ्या शूरवीर जनसमूहाकडे बोलाविले जाल, की तुम्ही त्याच्याशी युद्ध कराल किंवा ते ईमानधारक होतील. तेव्हा जर तुम्ही आज्ञापालन कराल, तर अल्लाह तुम्हाला फार चांगला मोबदला प्रदान करील आणि जर तुम्ही तोंड फिरविले, जसे की तुम्ही यापूर्वी तोंड फिरवून घेतले आहे, तर तो तुम्हाला दुःखदायक शिक्षा यातना देईल.
Verse 17
لَّيْسَ عَلَى ٱلْأَعْمَىٰ حَرَجٌ وَلَا عَلَى ٱلْأَعْرَجِ حَرَجٌ وَلَا عَلَى ٱلْمَرِيضِ حَرَجٌ ۗ وَمَن يُطِعِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ يُدْخِلْهُ جَنَّـٰتٍ تَجْرِى مِن تَحْتِهَا ٱلْأَنْهَـٰرُ ۖ وَمَن يَتَوَلَّ يُعَذِّبْهُ عَذَابًا أَلِيمًا
Transliteration laysa ʿalā l-aʿmā ḥarajun walā ʿalā l-aʿraji ḥarajun walā ʿalā l-marīḍi ḥarajun waman yuṭiʿi l-laha warasūlahu yud'khil'hu jannātin tajrī min taḥtihā l-anhāru waman yatawalla yuʿadhib'hu ʿadhāban alīman
Marathi १७. आंधळ्यावर कसलाही अपराध नाही, ना पांगळ्यावर काही अपराध आहे आणि ना आजारी माणसावर काही अपराध आहे आणि जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत आणि जो तोंड फिरविल, त्याला तो दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) देईल.
Verse 18
۞ لَّقَدْ رَضِىَ ٱللَّهُ عَنِ ٱلْمُؤْمِنِينَ إِذْ يُبَايِعُونَكَ تَحْتَ ٱلشَّجَرَةِ فَعَلِمَ مَا فِى قُلُوبِهِمْ فَأَنزَلَ ٱلسَّكِينَةَ عَلَيْهِمْ وَأَثَـٰبَهُمْ فَتْحًا قَرِيبًا
Transliteration laqad raḍiya l-lahu ʿani l-mu'minīna idh yubāyiʿūnaka taḥta l-shajarati faʿalima mā fī qulūbihim fa-anzala l-sakīnata ʿalayhim wa-athābahum fatḥan qarīban
Marathi १८. निःसंशय, अल्लाह ईमान राखणाऱ्यांशी प्रसन्न झाला, जेव्हा ते झाडाखाली तुमच्याशी बैअत (प्रतिज्ञा) करीत होते. त्याच्या मनात जे काही होते, ते त्याने माहीत करून घेतले आणि त्याच्यावर शांती अवतरित केली आणि त्यांना निकटचा विजय प्रदान केला.
Verse 19
وَمَغَانِمَ كَثِيرَةً يَأْخُذُونَهَا ۗ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمًا
Transliteration wamaghānima kathīratan yakhudhūnahā wakāna l-lahu ʿazīzan ḥakīman
Marathi १९. आणि युद्धात जिंकलेला अनेक प्रकारचा माल, जो ते प्राप्त करतील आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.
Verse 20
وَعَدَكُمُ ٱللَّهُ مَغَانِمَ كَثِيرَةً تَأْخُذُونَهَا فَعَجَّلَ لَكُمْ هَـٰذِهِۦ وَكَفَّ أَيْدِىَ ٱلنَّاسِ عَنكُمْ وَلِتَكُونَ ءَايَةً لِّلْمُؤْمِنِينَ وَيَهْدِيَكُمْ صِرَٰطًا مُّسْتَقِيمًا
Transliteration waʿadakumu l-lahu maghānima kathīratan takhudhūnahā faʿajjala lakum hādhihi wakaffa aydiya l-nāsi ʿankum walitakūna āyatan lil'mu'minīna wayahdiyakum ṣirāṭan mus'taqīman
Marathi २०. अल्लाहने तुमच्याशी खूप जास्त युद्धात जिंकलेल्या मालाचा वायदा केला आहे, जो तुम्ही प्राप्त कराल आणि हे तर तुम्हाला त्वरित प्रदान केले, आणि लोकांचे हात तुमच्यापासून रोखले, यासाठी की ईमान राखणाऱ्यांकरिता ही एक निशाणी ठरावी, आणि यासाठी की त्याने तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे.
Verse 21
وَأُخْرَىٰ لَمْ تَقْدِرُوا۟ عَلَيْهَا قَدْ أَحَاطَ ٱللَّهُ بِهَا ۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرًا
Transliteration wa-ukh'rā lam taqdirū ʿalayhā qad aḥāṭa l-lahu bihā wakāna l-lahu ʿalā kulli shayin qadīran
Marathi २१. आणि (तो) तुम्हाला इतर गनीमती (युद्धात हाती लागलेला माल) देखील देईल, ज्यांच्यावर तुम्ही अजून काबू मिळविला नाही अल्लाहने त्यांना काबूत ठेवले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.
Verse 22
وَلَوْ قَـٰتَلَكُمُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لَوَلَّوُا۟ ٱلْأَدْبَـٰرَ ثُمَّ لَا يَجِدُونَ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا
Transliteration walaw qātalakumu alladhīna kafarū lawallawū l-adbāra thumma lā yajidūna waliyyan walā naṣīran
Marathi २२. आणि जर तुमच्याशी काफिरांनी लढाई केली असती तर निःसंशय ते पाठ दाखवून पळाले असते. मग ना त्यांना कोणी कार्यसाधक आढळला असता, ना कोणी मदत करणारा.
Verse 23
سُنَّةَ ٱللَّهِ ٱلَّتِى قَدْ خَلَتْ مِن قَبْلُ ۖ وَلَن تَجِدَ لِسُنَّةِ ٱللَّهِ تَبْدِيلًا
Transliteration sunnata l-lahi allatī qad khalat min qablu walan tajida lisunnati l-lahi tabdīlan
Marathi २३. अल्लाहच्या त्या नियमानुसार जो पहिल्यापासून चालत आला आहे आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधीही बदल झालेला आढळत नाही.
Verse 24
وَهُوَ ٱلَّذِى كَفَّ أَيْدِيَهُمْ عَنكُمْ وَأَيْدِيَكُمْ عَنْهُم بِبَطْنِ مَكَّةَ مِنۢ بَعْدِ أَنْ أَظْفَرَكُمْ عَلَيْهِمْ ۚ وَكَانَ ٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرًا
Transliteration wahuwa alladhī kaffa aydiyahum ʿankum wa-aydiyakum ʿanhum bibaṭni makkata min baʿdi an aẓfarakum ʿalayhim wakāna l-lahu bimā taʿmalūna baṣīran
Marathi २४. तोच आहे, ज्याने खास मक्का येथे काफिरांच्या हातांना तुमच्यापासून आणि तुमच्या हातांना त्यांच्यापासून रोखले. यानंतर की त्याने तुम्हाला त्यांच्यावर विजयी केले, आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते सर्व पाहत आहे.
Verse 25
هُمُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ وَصَدُّوكُمْ عَنِ ٱلْمَسْجِدِ ٱلْحَرَامِ وَٱلْهَدْىَ مَعْكُوفًا أَن يَبْلُغَ مَحِلَّهُۥ ۚ وَلَوْلَا رِجَالٌ مُّؤْمِنُونَ وَنِسَآءٌ مُّؤْمِنَـٰتٌ لَّمْ تَعْلَمُوهُمْ أَن تَطَـُٔوهُمْ فَتُصِيبَكُم مِّنْهُم مَّعَرَّةٌۢ بِغَيْرِ عِلْمٍ ۖ لِّيُدْخِلَ ٱللَّهُ فِى رَحْمَتِهِۦ مَن يَشَآءُ ۚ لَوْ تَزَيَّلُوا۟ لَعَذَّبْنَا ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ مِنْهُمْ عَذَابًا أَلِيمًا
Transliteration humu alladhīna kafarū waṣaddūkum ʿani l-masjidi l-ḥarāmi wal-hadya maʿkūfan an yablugha maḥillahu walawlā rijālun mu'minūna wanisāon mu'minātun lam taʿlamūhum an taṭaūhum fatuṣībakum min'hum maʿarratun bighayri ʿil'min liyud'khila l-lahu fī raḥmatihi man yashāu law tazayyalū laʿadhabnā alladhīna kafarū min'hum ʿadhāban alīman
Marathi २५. हेच ते लोक होत, ज्यांनी कुप्र (इन्कार) केला आणि तुम्हाला मस्जिदेे हराम (काबागृहा) पासून रोखले आणि कुर्बानीसाठी थांबलेल्या जनावरांना त्याच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यापासून (रोखले) आणि जर असे (अनेक) मुस्लिम पुरुष आणि (अनेक) मुस्लिम स्त्रिया नसत्या, ज्यांची तुम्हाला खबर नव्हती की तुम्ही त्यांना (अजाणतेपणी) चिरडून टाकाल, ज्याबद्दल त्यांच्यामुळे तुम्हालाही नकळत हानि पोहचली असती (तर तुम्हाला लढण्याची अनुमती दिली गेली असती, परंतु असे केले गेले नाही) यासाठी की अल्लाहने आपल्या दया कृपेत, ज्याला इच्छिल त्याला दाखल करावे, आणि जर ते वेगवेगळे राहिले असते, तर त्यांच्यात जे काफिर होते, आम्ही त्यांना दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) दिला असता.
Verse 26
إِذْ جَعَلَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ فِى قُلُوبِهِمُ ٱلْحَمِيَّةَ حَمِيَّةَ ٱلْجَـٰهِلِيَّةِ فَأَنزَلَ ٱللَّهُ سَكِينَتَهُۥ عَلَىٰ رَسُولِهِۦ وَعَلَى ٱلْمُؤْمِنِينَ وَأَلْزَمَهُمْ كَلِمَةَ ٱلتَّقْوَىٰ وَكَانُوٓا۟ أَحَقَّ بِهَا وَأَهْلَهَا ۚ وَكَانَ ٱللَّهُ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمًا
Transliteration idh jaʿala alladhīna kafarū fī qulūbihimu l-ḥamiyata ḥamiyyata l-jāhiliyati fa-anzala l-lahu sakīnatahu ʿalā rasūlihi waʿalā l-mu'minīna wa-alzamahum kalimata l-taqwā wakānū aḥaqqa bihā wa-ahlahā wakāna l-lahu bikulli shayin ʿalīman
Marathi २६. जेव्हा त्या काफिरांनी आपल्या मनात पक्षपात भावनेला स्थान दिले, आणि पक्षपातही अडाणीपणाचा, तेव्हा अल्लाहने आपल्या पैगंबरावर आणि ईमान राखणाऱ्यांवर आपल्यातर्फे शांती अवतरित केली, आणि ईमान राखणाऱ्यांना ईशभया (तकवा) च्या गोष्टीवर दृढराखले१ आणि ते या गोष्टीस पात्र आणि जास्त हक्कदार होते आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 27
لَّقَدْ صَدَقَ ٱللَّهُ رَسُولَهُ ٱلرُّءْيَا بِٱلْحَقِّ ۖ لَتَدْخُلُنَّ ٱلْمَسْجِدَ ٱلْحَرَامَ إِن شَآءَ ٱللَّهُ ءَامِنِينَ مُحَلِّقِينَ رُءُوسَكُمْ وَمُقَصِّرِينَ لَا تَخَافُونَ ۖ فَعَلِمَ مَا لَمْ تَعْلَمُوا۟ فَجَعَلَ مِن دُونِ ذَٰلِكَ فَتْحًا قَرِيبًا
Transliteration laqad ṣadaqa l-lahu rasūlahu l-ru'yā bil-ḥaqi latadkhulunna l-masjida l-ḥarāma in shāa l-lahu āminīna muḥalliqīna ruūsakum wamuqaṣṣirīna lā takhāfūna faʿalima mā lam taʿlamū fajaʿala min dūni dhālika fatḥan qarīban
Marathi २७. वस्तुतः अल्लाहने आपल्या पैगंबराला, खरे स्वप्न दाखविले की जर अल्लाहने इच्छिले तर तुम्ही अवश्य शांती-सुरक्षापूर्वक मस्जिदेे हराममध्ये दाखल व्हाल, डोके मुंडवित आणि डोक्याचे केस कापवून घेत अगदी निर्भय होऊन. तो त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत, तेव्हा त्याने तुम्हाला यापूर्वी एक निकटचा विजय प्रदान केला.
Verse 28
هُوَ ٱلَّذِىٓ أَرْسَلَ رَسُولَهُۥ بِٱلْهُدَىٰ وَدِينِ ٱلْحَقِّ لِيُظْهِرَهُۥ عَلَى ٱلدِّينِ كُلِّهِۦ ۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدًا
Transliteration huwa alladhī arsala rasūlahu bil-hudā wadīni l-ḥaqi liyuẓ'hirahu ʿalā l-dīni kullihi wakafā bil-lahi shahīdan
Marathi २८. तोच होय, ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठविले, यासाठी की त्याला प्रत्येक धर्मावर वर्चस्वशाली करावे, आणि साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे.
Verse 29
مُّحَمَّدٌ رَّسُولُ ٱللَّهِ ۚ وَٱلَّذِينَ مَعَهُۥٓ أَشِدَّآءُ عَلَى ٱلْكُفَّارِ رُحَمَآءُ بَيْنَهُمْ ۖ تَرَىٰهُمْ رُكَّعًا سُجَّدًا يَبْتَغُونَ فَضْلًا مِّنَ ٱللَّهِ وَرِضْوَٰنًا ۖ سِيمَاهُمْ فِى وُجُوهِهِم مِّنْ أَثَرِ ٱلسُّجُودِ ۚ ذَٰلِكَ مَثَلُهُمْ فِى ٱلتَّوْرَىٰةِ ۚ وَمَثَلُهُمْ فِى ٱلْإِنجِيلِ كَزَرْعٍ أَخْرَجَ شَطْـَٔهُۥ فَـَٔازَرَهُۥ فَٱسْتَغْلَظَ فَٱسْتَوَىٰ عَلَىٰ سُوقِهِۦ يُعْجِبُ ٱلزُّرَّاعَ لِيَغِيظَ بِهِمُ ٱلْكُفَّارَ ۗ وَعَدَ ٱللَّهُ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ مِنْهُم مَّغْفِرَةً وَأَجْرًا عَظِيمًۢا
Transliteration muḥammadun rasūlu l-lahi wa-alladhīna maʿahu ashiddāu ʿalā l-kufāri ruḥamāu baynahum tarāhum rukkaʿan sujjadan yabtaghūna faḍlan mina l-lahi wariḍ'wānan sīmāhum fī wujūhihim min athari l-sujūdi dhālika mathaluhum fī l-tawrāti wamathaluhum fī l-injīli kazarʿin akhraja shaṭahu faāzarahu fa-is'taghlaẓa fa-is'tawā ʿalā sūqihi yuʿ'jibu l-zurāʿa liyaghīẓa bihimu l-kufāra waʿada l-lahu alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti min'hum maghfiratan wa-ajran ʿaẓīman
Marathi २९. मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, ते काफिरांवर कठोर आहेत. आपसात दयाशील आहेत. तुम्ही त्यांना पाहाल की रुकूअ व सजदे करीत आहेत. अल्लाहची कृपा व त्याच्या प्रसन्नतेची कामना करण्यात (मग्न) आहेत. त्यांचे निशाण त्याच्या चेहऱ्यांवर सजद्यांच्या प्रभावाने आहे. त्यांचा हाच गुणविशेष (उदाहरण) तौरातमध्ये आहे आणि त्यांचे उदाहरण इंजीलमध्ये आहे, त्या शेतीसारखे, जिने आपले अंकूर बाहेर काढले, मग त्याला मजबूती दिली आणि ते जाड झाले, मग आपल्या खोडावर सरळ उभे राहिले आणि शेतकऱ्यांना आनंदित करू लागले, यासाठी की त्यांच्यामुळे काफिरांना चिडवावे, आणि ईमान राखणाऱ्यांशी व नेक सदाचारी लोकांशी अल्लाहने माफीचा आणि फार मोठ्या मोबदल्याचा वायदा केला आहे.
Read Surah Al-Fath in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.