Surah Al-Ahzab in Marathi: translation and audio
Surah 33 · الأحزاب · The Combined Forces · 73 verses
Surah Al-Ahzab verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Ahzab word by word in English.
Verse 1
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ ٱتَّقِ ٱللَّهَ وَلَا تُطِعِ ٱلْكَـٰفِرِينَ وَٱلْمُنَـٰفِقِينَ ۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمًا
Transliteration yāayyuhā l-nabiyu ittaqi l-laha walā tuṭiʿi l-kāfirīna wal-munāfiqīna inna l-laha kāna ʿalīman ḥakīman
Marathi १. हे पैगंबर! अल्लाहचे भय बाळगून राहा आणि काफिर आणि मुनाफिक (दांभिक ईमानधारक) लोकांचे म्हणणे मानू नका. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा, मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.
Verse 2
وَٱتَّبِعْ مَا يُوحَىٰٓ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ ۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرًا
Transliteration wa-ittabiʿ mā yūḥā ilayka min rabbika inna l-laha kāna bimā taʿmalūna khabīran
Marathi २. आणि जे काही तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे वहयी (प्रकाशना) केली जाते, तिचे अनुसरण करा (विश्वास करा), कारण अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माशी परिचित आहे.
Verse 3
وَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ ۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِيلًا
Transliteration watawakkal ʿalā l-lahi wakafā bil-lahi wakīlan
Marathi ३. आणि तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्याकरिता पुरेसा आहे.
Verse 4
مَّا جَعَلَ ٱللَّهُ لِرَجُلٍ مِّن قَلْبَيْنِ فِى جَوْفِهِۦ ۚ وَمَا جَعَلَ أَزْوَٰجَكُمُ ٱلَّـٰٓـِٔى تُظَـٰهِرُونَ مِنْهُنَّ أُمَّهَـٰتِكُمْ ۚ وَمَا جَعَلَ أَدْعِيَآءَكُمْ أَبْنَآءَكُمْ ۚ ذَٰلِكُمْ قَوْلُكُم بِأَفْوَٰهِكُمْ ۖ وَٱللَّهُ يَقُولُ ٱلْحَقَّ وَهُوَ يَهْدِى ٱلسَّبِيلَ
Transliteration mā jaʿala l-lahu lirajulin min qalbayni fī jawfihi wamā jaʿala azwājakumu allāī tuẓāhirūna min'hunna ummahātikum wamā jaʿala adʿiyāakum abnāakum dhālikum qawlukum bi-afwāhikum wal-lahu yaqūlu l-ḥaqa wahuwa yahdī l-sabīla
Marathi ४. कोणत्याही माणसाच्या छातीत अल्लाहने दोन हृदय ठेवली नाहीत. आणि आपल्या ज्या पत्न्यांना तुम्ही माता म्हणून संबोधून बसता, त्यांना अल्लाहने तुमच्या (खऱ्याखुऱ्या) माता बनविले नाही आणि ना तुमच्या दत्तक घेतलेल्या बालकांना (वस्तुतः) तुमचे पुत्र बनविले आहे. या तर तुमच्या तोंडच्या गोष्टी आहेत. अल्लाह सत्य गोष्टी सांगतो आणि तोच सरळ मार्ग दाखवितो.
Verse 5
ٱدْعُوهُمْ لِـَٔابَآئِهِمْ هُوَ أَقْسَطُ عِندَ ٱللَّهِ ۚ فَإِن لَّمْ تَعْلَمُوٓا۟ ءَابَآءَهُمْ فَإِخْوَٰنُكُمْ فِى ٱلدِّينِ وَمَوَٰلِيكُمْ ۚ وَلَيْسَ عَلَيْكُمْ جُنَاحٌ فِيمَآ أَخْطَأْتُم بِهِۦ وَلَـٰكِن مَّا تَعَمَّدَتْ قُلُوبُكُمْ ۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا
Transliteration id'ʿūhum liābāihim huwa aqsaṭu ʿinda l-lahi fa-in lam taʿlamū ābāahum fa-ikh'wānukum fī l-dīni wamawālīkum walaysa ʿalaykum junāḥun fīmā akhṭatum bihi walākin mā taʿammadat qulūbukum wakāna l-lahu ghafūran raḥīman
Marathi ५. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या (खऱ्या) पित्यांच्या संबंधाने हाक मारा. अल्लाहजवळ पूर्ण न्याय हाच आहे. मग जर तुम्हाला त्यांचे (खरे) पिता माहीत नसतील तर ते तुमचे धर्म-बांधव आणि मित्र आहेत.१ तुमच्याकडून भूलचूक म्हणून काही घडल्यास त्याबाबत तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, परंतु गुन्हा तो आहे, ज्याचा तुम्ही इरादा कराल आणि इरादा मनापासून कराल. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
Verse 6
ٱلنَّبِىُّ أَوْلَىٰ بِٱلْمُؤْمِنِينَ مِنْ أَنفُسِهِمْ ۖ وَأَزْوَٰجُهُۥٓ أُمَّهَـٰتُهُمْ ۗ وَأُو۟لُوا۟ ٱلْأَرْحَامِ بَعْضُهُمْ أَوْلَىٰ بِبَعْضٍ فِى كِتَـٰبِ ٱللَّهِ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُهَـٰجِرِينَ إِلَّآ أَن تَفْعَلُوٓا۟ إِلَىٰٓ أَوْلِيَآئِكُم مَّعْرُوفًا ۚ كَانَ ذَٰلِكَ فِى ٱلْكِتَـٰبِ مَسْطُورًا
Transliteration al-nabiyu awlā bil-mu'minīna min anfusihim wa-azwājuhu ummahātuhum wa-ulū l-arḥāmi baʿḍuhum awlā bibaʿḍin fī kitābi l-lahi mina l-mu'minīna wal-muhājirīna illā an tafʿalū ilā awliyāikum maʿrūfan kāna dhālika fī l-kitābi masṭūran
Marathi ६. पैगंबर, ईमान राखणाऱ्यांवर स्वतः त्यांच्यापेक्षाही अधिक हक्क राखणारे आहेत आणि पैगंबराच्या पत्न्या ईमानधारकांच्या माता आहेत आणि नातेवाईक, अल्लाहच्या ग्रंथाच्या आधारावर इतर ईमानधारक आणि स्वदेशत्याग केलेल्यांच्या तुलनेत जास्त हक्कदार आहेत. (तथापि) तुम्हाला आपल्या मित्रांशी सद्व्यवहार करण्याची अनुमती आहे. हा आदेश ‘सुरिक्षत ग्रंथा’ (लौहे महफूज) मध्ये लिहिलेला आहे.
Verse 7
وَإِذْ أَخَذْنَا مِنَ ٱلنَّبِيِّـۧنَ مِيثَـٰقَهُمْ وَمِنكَ وَمِن نُّوحٍ وَإِبْرَٰهِيمَ وَمُوسَىٰ وَعِيسَى ٱبْنِ مَرْيَمَ ۖ وَأَخَذْنَا مِنْهُم مِّيثَـٰقًا غَلِيظًا
Transliteration wa-idh akhadhnā mina l-nabiyīna mīthāqahum waminka wamin nūḥin wa-ib'rāhīma wamūsā waʿīsā ib'ni maryama wa-akhadhnā min'hum mīthāqan ghalīẓan
Marathi ७. आणि जेव्हा आम्ही समस्त पैगंबरांकडून वचन घेतले (विशेषतः) तुमच्याकडून आणि नूहकडून आणि इब्राहीमकडून आणि मूसाकडून आणि मरियमचे पुत्र ईसाकडून आणि आम्ही त्या सर्वांकडून पक्के वचन घेतले होते.
Verse 8
لِّيَسْـَٔلَ ٱلصَّـٰدِقِينَ عَن صِدْقِهِمْ ۚ وَأَعَدَّ لِلْكَـٰفِرِينَ عَذَابًا أَلِيمًا
Transliteration liyasala l-ṣādiqīna ʿan ṣid'qihim wa-aʿadda lil'kāfirīna ʿadhāban alīman
Marathi ८. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या सच्चेपणाविषयी विचारणा करावी आणि न मानणाऱ्यांकरिता आम्ही दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे.
Verse 9
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱذْكُرُوا۟ نِعْمَةَ ٱللَّهِ عَلَيْكُمْ إِذْ جَآءَتْكُمْ جُنُودٌ فَأَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا وَجُنُودًا لَّمْ تَرَوْهَا ۚ وَكَانَ ٱللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū udh'kurū niʿ'mata l-lahi ʿalaykum idh jāatkum junūdun fa-arsalnā ʿalayhim rīḥan wajunūdan lam tarawhā wakāna l-lahu bimā taʿmalūna baṣīran
Marathi ९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने जो उपकार तुमच्यावर केला आहे, त्याचे स्मरण करा जेव्हा तुमचा सामना करण्याकरिता सैन्यांवर सैन्ये आली मग आम्ही त्यांच्यावर वेगवान वादळ आणि असे सैन्य पाठविले, जे तुम्ही पाहिलेच नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते सर्व पाहतो.
Verse 10
إِذْ جَآءُوكُم مِّن فَوْقِكُمْ وَمِنْ أَسْفَلَ مِنكُمْ وَإِذْ زَاغَتِ ٱلْأَبْصَـٰرُ وَبَلَغَتِ ٱلْقُلُوبُ ٱلْحَنَاجِرَ وَتَظُنُّونَ بِٱللَّهِ ٱلظُّنُونَا۠
Transliteration idh jāūkum min fawqikum wamin asfala minkum wa-idh zāghati l-abṣāru wabalaghati l-qulūbu l-ḥanājira wataẓunnūna bil-lahi l-ẓunūnā
Marathi १०. जेव्हा (शत्रू) तुमच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चालून आले आणि जेव्हा डोळे निश्चल झाले आणि काळीज तोंडाशी आले, आणि तुम्ही अल्लाहविषयी विभिन्न विचार करू लागले.
Verse 11
هُنَالِكَ ٱبْتُلِىَ ٱلْمُؤْمِنُونَ وَزُلْزِلُوا۟ زِلْزَالًا شَدِيدًا
Transliteration hunālika ub'tuliya l-mu'minūna wazul'zilū zil'zālan shadīdan
Marathi ११. इथेच ईमान राखणाऱ्यांची कसोटी घेतली गेली आणि पूर्णतः ते हलवून सोडले गेले.
Verse 12
وَإِذْ يَقُولُ ٱلْمُنَـٰفِقُونَ وَٱلَّذِينَ فِى قُلُوبِهِم مَّرَضٌ مَّا وَعَدَنَا ٱللَّهُ وَرَسُولُهُۥٓ إِلَّا غُرُورًا
Transliteration wa-idh yaqūlu l-munāfiqūna wa-alladhīna fī qulūbihim maraḍun mā waʿadanā l-lahu warasūluhu illā ghurūran
Marathi १२. आणि त्या वेळी दांभिक (मुनाफिक) आणि मनात रोग बाळगणारे म्हणू लागले की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने आमच्याशी केवळ धोक्याचेच वायदे केले होते.
Verse 13
وَإِذْ قَالَت طَّآئِفَةٌ مِّنْهُمْ يَـٰٓأَهْلَ يَثْرِبَ لَا مُقَامَ لَكُمْ فَٱرْجِعُوا۟ ۚ وَيَسْتَـْٔذِنُ فَرِيقٌ مِّنْهُمُ ٱلنَّبِىَّ يَقُولُونَ إِنَّ بُيُوتَنَا عَوْرَةٌ وَمَا هِىَ بِعَوْرَةٍ ۖ إِن يُرِيدُونَ إِلَّا فِرَارًا
Transliteration wa-idh qālat ṭāifatun min'hum yāahla yathriba lā muqāma lakum fa-ir'jiʿū wayastadhinu farīqun min'humu l-nabiya yaqūlūna inna buyūtanā ʿawratun wamā hiya biʿawratin in yurīdūna illā firāran
Marathi १३. आणि त्यांच्याच एका गटाने पुकारुन म्हटले, हे यासरिबच्या लोकानो! तुमच्या थांबण्याचे हे स्थान नाही, परत निघा आणि त्यांचा एक दुसरा गट, पैगंबराजवळ ही अनुमती मागू लागला की आमची घरे खाली (उघडी) आणि असुरक्षित आहेत. वास्तविक ती (उघडी) असुरक्षित नव्हती, (परंतु) त्यांनी पळ काढण्याचा पक्का इरादा केला होता.
Verse 14
وَلَوْ دُخِلَتْ عَلَيْهِم مِّنْ أَقْطَارِهَا ثُمَّ سُئِلُوا۟ ٱلْفِتْنَةَ لَـَٔاتَوْهَا وَمَا تَلَبَّثُوا۟ بِهَآ إِلَّا يَسِيرًا
Transliteration walaw dukhilat ʿalayhim min aqṭārihā thumma su-ilū l-fit'nata laātawhā wamā talabbathū bihā illā yasīran
Marathi १४. आणि जर मदीनेच्या चोहीबाजूंनी त्यांच्यावर (सैन्ये) दाखल केली गेली असती, मग त्यांच्याशी उत्पात (फसाद) ची मागणी केली गेली असती, तर त्यांनी उत्पात अवश्य माजविला असता. आणि काही लढलेही असते पण थोडेसे.
Verse 15
وَلَقَدْ كَانُوا۟ عَـٰهَدُوا۟ ٱللَّهَ مِن قَبْلُ لَا يُوَلُّونَ ٱلْأَدْبَـٰرَ ۚ وَكَانَ عَهْدُ ٱللَّهِ مَسْـُٔولًا
Transliteration walaqad kānū ʿāhadū l-laha min qablu lā yuwallūna l-adbāra wakāna ʿahdu l-lahi masūlan
Marathi १५. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की पाठ फिरविणार नाही आणि अल्लाहशी केल्या गेलेल्या वायद्याची विचारपूस निश्चितच होईल.
Verse 16
قُل لَّن يَنفَعَكُمُ ٱلْفِرَارُ إِن فَرَرْتُم مِّنَ ٱلْمَوْتِ أَوِ ٱلْقَتْلِ وَإِذًا لَّا تُمَتَّعُونَ إِلَّا قَلِيلًا
Transliteration qul lan yanfaʿakumu l-firāru in farartum mina l-mawti awi l-qatli wa-idhan lā tumattaʿūna illā qalīlan
Marathi १६. त्यांना सांगा, जर तुम्ही मृत्युच्या किंवा हत्येच्या भयाने पळ काढाल तर हे पळ काढणे तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि त्या वेळी तुम्ही फार कमी लाभान्वित केले जाल.
Verse 17
قُلْ مَن ذَا ٱلَّذِى يَعْصِمُكُم مِّنَ ٱللَّهِ إِنْ أَرَادَ بِكُمْ سُوٓءًا أَوْ أَرَادَ بِكُمْ رَحْمَةً ۚ وَلَا يَجِدُونَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا
Transliteration qul man dhā alladhī yaʿṣimukum mina l-lahi in arāda bikum sūan aw arāda bikum raḥmatan walā yajidūna lahum min dūni l-lahi waliyyan walā naṣīran
Marathi १७. त्यांना विचारा की जर अल्लाह तुम्हाला काही हानि पोहचवू इच्छिल किंवा तुमच्यावर एखादी दया कृपा करू इच्छिल तर असा कोण आहे जो तुम्हाला वाचवू शकेल (किंवा तुमच्यापासून रोखू शकेल) (अल्लाहच्या विरोधात) आपल्याकरिता, अल्लाहखेरीज त्यांना ना कोणी मित्र आढळून येईल ना कोणी सहाय्यक.
Verse 18
۞ قَدْ يَعْلَمُ ٱللَّهُ ٱلْمُعَوِّقِينَ مِنكُمْ وَٱلْقَآئِلِينَ لِإِخْوَٰنِهِمْ هَلُمَّ إِلَيْنَا ۖ وَلَا يَأْتُونَ ٱلْبَأْسَ إِلَّا قَلِيلًا
Transliteration qad yaʿlamu l-lahu l-muʿawiqīna minkum wal-qāilīna li-ikh'wānihim halumma ilaynā walā yatūna l-basa illā qalīlan
Marathi १८. अल्लाह तुमच्यापैकी त्यांना (चांगल्या प्रकारे) जाणतो, जे दुसऱ्यांना रोखतात आणि आपल्या बांधवांना सांगतात की आमच्याजवळ या आणि कधीतरी युद्धात सहभाग घेतात.
Verse 19
أَشِحَّةً عَلَيْكُمْ ۖ فَإِذَا جَآءَ ٱلْخَوْفُ رَأَيْتَهُمْ يَنظُرُونَ إِلَيْكَ تَدُورُ أَعْيُنُهُمْ كَٱلَّذِى يُغْشَىٰ عَلَيْهِ مِنَ ٱلْمَوْتِ ۖ فَإِذَا ذَهَبَ ٱلْخَوْفُ سَلَقُوكُم بِأَلْسِنَةٍ حِدَادٍ أَشِحَّةً عَلَى ٱلْخَيْرِ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ لَمْ يُؤْمِنُوا۟ فَأَحْبَطَ ٱللَّهُ أَعْمَـٰلَهُمْ ۚ وَكَانَ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرًا
Transliteration ashiḥḥatan ʿalaykum fa-idhā jāa l-khawfu ra-aytahum yanẓurūna ilayka tadūru aʿyunuhum ka-alladhī yugh'shā ʿalayhi mina l-mawti fa-idhā dhahaba l-khawfu salaqūkum bi-alsinatin ḥidādin ashiḥḥatan ʿalā l-khayri ulāika lam yu'minū fa-aḥbaṭa l-lahu aʿmālahum wakāna dhālika ʿalā l-lahi yasīran
Marathi १९. तुमची मदत करण्यात (पूर्णपणे) कंजूस आहेत, मग जेव्हा भय - दहशतीचा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही त्यांना पाहाल की ते तुमच्याकडे दृष्टी केंद्रित करतात आणि त्यांचे डोळे अशा प्रकारे गरगरा फिरू लागतात, त्या माणसासारखे, ज्याच्यावर मृत्युची मुर्छा आलेली असावी, मग जेव्हा भीती नाहीशी होते, तेव्हा तुमच्याशी आपल्या तीक्ष्ण जीभेने मोठमोठ्या गोष्टी बोलू लागतात. धनाचे मोठे लोभी आहेत. या लोकांनी ईमान राखलेच नाही. अल्लाहने त्यांची सर्व कर्मे वाया घालविली आहेत आणि असे करणे अल्लाहकरिता फार सोपे आहे.
Verse 20
يَحْسَبُونَ ٱلْأَحْزَابَ لَمْ يَذْهَبُوا۟ ۖ وَإِن يَأْتِ ٱلْأَحْزَابُ يَوَدُّوا۟ لَوْ أَنَّهُم بَادُونَ فِى ٱلْأَعْرَابِ يَسْـَٔلُونَ عَنْ أَنۢبَآئِكُمْ ۖ وَلَوْ كَانُوا۟ فِيكُم مَّا قَـٰتَلُوٓا۟ إِلَّا قَلِيلًا
Transliteration yaḥsabūna l-aḥzāba lam yadhhabū wa-in yati l-aḥzābu yawaddū law annahum bādūna fī l-aʿrābi yasalūna ʿan anbāikum walaw kānū fīkum mā qātalū illā qalīlan
Marathi २०. हे लोक समजतात की सैन्ये अद्याप गेली नाहीत आणि जर सैन्ये परत आली तर हे अशी इच्छा बाळगतात की ते वनात राहणाऱ्यांमध्ये वनवासी लोकांसोबत असते तर बरे झाले असते यासाठी की तुमची खबर बात घेत राहिले असते. जर ते तुमच्यात हजर असते (तरीदेखील?) उगाच बोलण्याचा मान राखण्यासाठी थोडेसे लढले असते.
Verse 21
لَّقَدْ كَانَ لَكُمْ فِى رَسُولِ ٱللَّهِ أُسْوَةٌ حَسَنَةٌ لِّمَن كَانَ يَرْجُوا۟ ٱللَّهَ وَٱلْيَوْمَ ٱلْـَٔاخِرَ وَذَكَرَ ٱللَّهَ كَثِيرًا
Transliteration laqad kāna lakum fī rasūli l-lahi us'watun ḥasanatun liman kāna yarjū l-laha wal-yawma l-ākhira wadhakara l-laha kathīran
Marathi २१. निःसंशय, तुमच्यासाठी अल्लाहच्या पैगंबरामध्ये उत्तम नमुना आहे१ त्या प्रत्येक माणसाकरिता जो अल्लाहची आणि कयामतच्या दिवसाची आशा बाळगतो आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करतो.
Verse 22
وَلَمَّا رَءَا ٱلْمُؤْمِنُونَ ٱلْأَحْزَابَ قَالُوا۟ هَـٰذَا مَا وَعَدَنَا ٱللَّهُ وَرَسُولُهُۥ وَصَدَقَ ٱللَّهُ وَرَسُولُهُۥ ۚ وَمَا زَادَهُمْ إِلَّآ إِيمَـٰنًا وَتَسْلِيمًا
Transliteration walammā raā l-mu'minūna l-aḥzāba qālū hādhā mā waʿadanā l-lahu warasūluhu waṣadaqa l-lahu warasūluhu wamā zādahum illā īmānan wataslīman
Marathi २२. आणि जेव्हा ईमानधारकांनी (काफिरांची) सैन्ये पाहिली, तेव्हा (अचानक) उद्गारले की याचाच वायदा आम्हाला अल्लाहने आणि त्याच्या पैगंबराने दिला होता आणि अल्लाह आणि त्याचे पैगंबर सच्चे आहेत आणि त्या (गोष्टी) ने त्यांच्या ईमानात आणि आज्ञापालनात आणखी जास्त वाढ केली.
Verse 23
مِّنَ ٱلْمُؤْمِنِينَ رِجَالٌ صَدَقُوا۟ مَا عَـٰهَدُوا۟ ٱللَّهَ عَلَيْهِ ۖ فَمِنْهُم مَّن قَضَىٰ نَحْبَهُۥ وَمِنْهُم مَّن يَنتَظِرُ ۖ وَمَا بَدَّلُوا۟ تَبْدِيلًا
Transliteration mina l-mu'minīna rijālun ṣadaqū mā ʿāhadū l-laha ʿalayhi famin'hum man qaḍā naḥbahu wamin'hum man yantaẓiru wamā baddalū tabdīlan
Marathi २३. ईमान राखणाऱ्यांमध्ये (असे) लोकही आहेत, ज्यांनी अल्लाहशी जो वायदा केला होता तो खरा करून दाखविला.१ काहींनी तर आपला वायदा पूर्ण केला आणि काही (संधीची) प्रतीक्षा करीत आहेत. आणि त्यांनी कसलाही बदल केला नाही.
Verse 24
لِّيَجْزِىَ ٱللَّهُ ٱلصَّـٰدِقِينَ بِصِدْقِهِمْ وَيُعَذِّبَ ٱلْمُنَـٰفِقِينَ إِن شَآءَ أَوْ يَتُوبَ عَلَيْهِمْ ۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ غَفُورًا رَّحِيمًا
Transliteration liyajziya l-lahu l-ṣādiqīna biṣid'qihim wayuʿadhiba l-munāfiqīna in shāa aw yatūba ʿalayhim inna l-laha kāna ghafūran raḥīman
Marathi २४. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या खरेपणाचा मोबदला प्रदान करावा आणि इच्छिल्यास मुनाफिक (दांभिक) लोकांना शिक्षा-यातना द्यावी किंवा त्यांचीही क्षमा- याचना कबूल करावी. अल्लाह मोठा क्षमाशील आणि मोठा दयावान आहे.
Verse 25
وَرَدَّ ٱللَّهُ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِغَيْظِهِمْ لَمْ يَنَالُوا۟ خَيْرًا ۚ وَكَفَى ٱللَّهُ ٱلْمُؤْمِنِينَ ٱلْقِتَالَ ۚ وَكَانَ ٱللَّهُ قَوِيًّا عَزِيزًا
Transliteration waradda l-lahu alladhīna kafarū bighayẓihim lam yanālū khayran wakafā l-lahu l-mu'minīna l-qitāla wakāna l-lahu qawiyyan ʿazīzan
Marathi २५. आणि अल्लाहने काफिरांना क्रोधाने भारावलेल्या अवस्थेतच (असफल) परतविले, ज्यामुळे त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्या युद्धात अल्लाह स्वतःच ईमान राखणाऱ्यांसाठी पुरेसा ठरला. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे.
Verse 26
وَأَنزَلَ ٱلَّذِينَ ظَـٰهَرُوهُم مِّنْ أَهْلِ ٱلْكِتَـٰبِ مِن صَيَاصِيهِمْ وَقَذَفَ فِى قُلُوبِهِمُ ٱلرُّعْبَ فَرِيقًا تَقْتُلُونَ وَتَأْسِرُونَ فَرِيقًا
Transliteration wa-anzala alladhīna ẓāharūhum min ahli l-kitābi min ṣayāṣīhim waqadhafa fī qulūbihimu l-ruʿ'ba farīqan taqtulūna watasirūna farīqan
Marathi २६. आणि ज्या ग्रंथधारकांनी, त्यांच्याशी लागेबांधे जुळवून घेतले होते त्यांनाही अल्लाहने त्यांच्या किल्ल्यांमधून बाहेर काढले आणि त्यांच्या मनात असा धाक बसविला की तुम्ही एका समूहास ठार करीत राहिले आणि एका समूहाला कैदी बनवित राहिले.
Verse 27
وَأَوْرَثَكُمْ أَرْضَهُمْ وَدِيَـٰرَهُمْ وَأَمْوَٰلَهُمْ وَأَرْضًا لَّمْ تَطَـُٔوهَا ۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرًا
Transliteration wa-awrathakum arḍahum wadiyārahum wa-amwālahum wa-arḍan lam taṭaūhā wakāna l-lahu ʿalā kulli shayin qadīran
Marathi २७. आणि त्याने तुम्हाला त्यांच्या जमिनीचे आणि त्याच्या घरांचे आणि धन-संपत्तीचे मालक बनविले आणि त्या जमिनीचेही जिच्यावर तुम्ही अद्याप पाऊलही ठेवले नाही. अल्लाह सर्व काही करण्याचे सामर्थ्य राखतो.
Verse 28
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ قُل لِّأَزْوَٰجِكَ إِن كُنتُنَّ تُرِدْنَ ٱلْحَيَوٰةَ ٱلدُّنْيَا وَزِينَتَهَا فَتَعَالَيْنَ أُمَتِّعْكُنَّ وَأُسَرِّحْكُنَّ سَرَاحًا جَمِيلًا
Transliteration yāayyuhā l-nabiyu qul li-azwājika in kuntunna turid'na l-ḥayata l-dun'yā wazīnatahā fataʿālayna umattiʿ'kunna wa-usarriḥ'kunna sarāḥan jamīlan
Marathi २८. हे पैगंबर! आपल्या पत्नींना सांगा की ऐहिक जीवनाची आणि ऐहिक शोभा सजावटीची इच्छा बाळगत असाल तर या मी तुम्हाला काही देऊन सवरून चांगल्या रितीने सोडून द्यावे.
Verse 29
وَإِن كُنتُنَّ تُرِدْنَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ وَٱلدَّارَ ٱلْـَٔاخِرَةَ فَإِنَّ ٱللَّهَ أَعَدَّ لِلْمُحْسِنَـٰتِ مِنكُنَّ أَجْرًا عَظِيمًا
Transliteration wa-in kuntunna turid'na l-laha warasūlahu wal-dāra l-ākhirata fa-inna l-laha aʿadda lil'muḥ'sināti minkunna ajran ʿaẓīman
Marathi २९. आणि जर तुमची इच्छा अल्लाह आणि त्याचा रसूल (पैगंबर) आणि आखिरतचे घर आहे तर (विश्वास ठेवा की) तुमच्यापैकी सत्कर्म करणारींकरिता अल्लाहने फार चांगला मोबदला तयार करून ठेवला आहे.
Verse 30
يَـٰنِسَآءَ ٱلنَّبِىِّ مَن يَأْتِ مِنكُنَّ بِفَـٰحِشَةٍ مُّبَيِّنَةٍ يُضَـٰعَفْ لَهَا ٱلْعَذَابُ ضِعْفَيْنِ ۚ وَكَانَ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرًا
Transliteration yānisāa l-nabiyi man yati minkunna bifāḥishatin mubayyinatin yuḍāʿaf lahā l-ʿadhābu ḍiʿ'fayni wakāna dhālika ʿalā l-lahi yasīran
Marathi ३०. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापैकी जी (पत्नी) देखील उघडपणे निर्लज्जतेचे कृत्य करील तर तिला दुप्पट अज़ाब दिला जाईल. अल्लाहकरिता ही फार सोपी गोष्ट आहे.
Verse 31
۞ وَمَن يَقْنُتْ مِنكُنَّ لِلَّهِ وَرَسُولِهِۦ وَتَعْمَلْ صَـٰلِحًا نُّؤْتِهَآ أَجْرَهَا مَرَّتَيْنِ وَأَعْتَدْنَا لَهَا رِزْقًا كَرِيمًا
Transliteration waman yaqnut minkunna lillahi warasūlihi wataʿmal ṣāliḥan nu'tihā ajrahā marratayni wa-aʿtadnā lahā riz'qan karīman
Marathi ३१. आणि तुमच्यापैकी जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करील आणि सत्कर्म करील तर आम्ही तिला दुप्पट मोबदला प्रदान करू आणि तिच्यासाठी आम्ही अति उत्तम आजिविका तयार करून ठेवली आहे.
Verse 32
يَـٰنِسَآءَ ٱلنَّبِىِّ لَسْتُنَّ كَأَحَدٍ مِّنَ ٱلنِّسَآءِ ۚ إِنِ ٱتَّقَيْتُنَّ فَلَا تَخْضَعْنَ بِٱلْقَوْلِ فَيَطْمَعَ ٱلَّذِى فِى قَلْبِهِۦ مَرَضٌ وَقُلْنَ قَوْلًا مَّعْرُوفًا
Transliteration yānisāa l-nabiyi lastunna ka-aḥadin mina l-nisāi ini ittaqaytunna falā takhḍaʿna bil-qawli fayaṭmaʿa alladhī fī qalbihi maraḍun waqul'na qawlan maʿrūfan
Marathi ३२. हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांसारख्या नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय राखणाऱ्या असाल तर कोमल स्वरात बोलत जाऊ नका की (ज्यामुळे) ज्याच्या मनात रोग असेल त्याने एखादा वाईट इरादा करावा, तथापि नियमाला अनुसरून बोलत राहा.
Verse 33
وَقَرْنَ فِى بُيُوتِكُنَّ وَلَا تَبَرَّجْنَ تَبَرُّجَ ٱلْجَـٰهِلِيَّةِ ٱلْأُولَىٰ ۖ وَأَقِمْنَ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتِينَ ٱلزَّكَوٰةَ وَأَطِعْنَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥٓ ۚ إِنَّمَا يُرِيدُ ٱللَّهُ لِيُذْهِبَ عَنكُمُ ٱلرِّجْسَ أَهْلَ ٱلْبَيْتِ وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا
Transliteration waqarna fī buyūtikunna walā tabarrajna tabarruja l-jāhiliyati l-ūlā wa-aqim'na l-ṣalata waātīna l-zakata wa-aṭiʿ'na l-laha warasūlahu innamā yurīdu l-lahu liyudh'hiba ʿankumu l-rij'sa ahla l-bayti wayuṭahhirakum taṭhīran
Marathi ३३. आणि आपल्या घरांमध्ये स्थैर्यपूर्वक राहा, आणि पूर्वीच्या अज्ञानकाळाप्रमाणे आपल्या शृंगारा (सौंदर्या) चे प्रदर्शन करू नका आणि नमाज नियिमतपणे अदा करीत राहा आणि जकात (धर्मदान) देत राहा, आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करा. अल्लाह हेच इच्छितो की हे पैगंबरांच्या पत्नींनो! तुमच्यापासून त्याने प्रत्येक (प्रकारची) अपवित्रता दूर करावी, आणि तुम्हाला खूप पवित्र करावे.
Verse 34
وَٱذْكُرْنَ مَا يُتْلَىٰ فِى بُيُوتِكُنَّ مِنْ ءَايَـٰتِ ٱللَّهِ وَٱلْحِكْمَةِ ۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ لَطِيفًا خَبِيرًا
Transliteration wa-udh'kur'na mā yut'lā fī buyūtikunna min āyāti l-lahi wal-ḥik'mati inna l-laha kāna laṭīfan khabīran
Marathi ३४. आणि तुमच्या घरांमध्ये अल्लाहच्या ज्या आयती आणि पैगंबरांची वचने (हदीस) वाचली जातात, त्या स्मरणात असू द्या. निःसंशय अल्लाह मोठा सूक्ष्मदर्शी, माहितगार आहे.
Verse 35
إِنَّ ٱلْمُسْلِمِينَ وَٱلْمُسْلِمَـٰتِ وَٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَـٰتِ وَٱلْقَـٰنِتِينَ وَٱلْقَـٰنِتَـٰتِ وَٱلصَّـٰدِقِينَ وَٱلصَّـٰدِقَـٰتِ وَٱلصَّـٰبِرِينَ وَٱلصَّـٰبِرَٰتِ وَٱلْخَـٰشِعِينَ وَٱلْخَـٰشِعَـٰتِ وَٱلْمُتَصَدِّقِينَ وَٱلْمُتَصَدِّقَـٰتِ وَٱلصَّـٰٓئِمِينَ وَٱلصَّـٰٓئِمَـٰتِ وَٱلْحَـٰفِظِينَ فُرُوجَهُمْ وَٱلْحَـٰفِظَـٰتِ وَٱلذَّٰكِرِينَ ٱللَّهَ كَثِيرًا وَٱلذَّٰكِرَٰتِ أَعَدَّ ٱللَّهُ لَهُم مَّغْفِرَةً وَأَجْرًا عَظِيمًا
Transliteration inna l-mus'limīna wal-mus'limāti wal-mu'minīna wal-mu'mināti wal-qānitīna wal-qānitāti wal-ṣādiqīna wal-ṣādiqāti wal-ṣābirīna wal-ṣābirāti wal-khāshiʿīna wal-khāshiʿāti wal-mutaṣadiqīna wal-mutaṣadiqāti wal-ṣāimīna wal-ṣāimāti wal-ḥāfiẓīna furūjahum wal-ḥāfiẓāti wal-dhākirīna l-laha kathīran wal-dhākirāti aʿadda l-lahu lahum maghfiratan wa-ajran ʿaẓīman
Marathi ३५. निःसंशय, मुस्लिम पुरुष आणि मुस्लिम स्त्रिया, ईमान राखणारे पुरुष आणि ईमान राखणाऱ्या स्त्रिया, आज्ञापालन करणारे पुरुष आणि आज्ञापालन करणाऱ्या स्त्रिया, सत्यवचनी पुरुष आणि सत्यवचनी स्त्रिया, सहनशीलता राखणारे पुरुष आणि सहनशीलता राखणाऱ्या स्त्रिया (अल्लाहला) विनंती करणारे पुरुष आणि विनंती करणाऱ्या स्त्रिया, दान (सदका) करणारे पुरुष आणि दान करणाऱ्या स्त्रिया, रोजा (उपवास-व्रत) करणारे पुरुष आणि रोजा राखणाऱ्या स्त्रिया, आपल्या लज्जास्थाना (गुप्तांगा) चे रक्षण करणारे पुरुष आणि आपल्या लज्जास्थानाचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया, अल्लाहचे अत्याधिक स्मरण करणारे पुरुष आणि अत्याधिक स्मरण करणाऱ्या स्त्रिया, या सर्वांसाठी अल्लाहने मोठी क्षमा आणि महान मोबदला तयार करून ठेवला आहे.
Verse 36
وَمَا كَانَ لِمُؤْمِنٍ وَلَا مُؤْمِنَةٍ إِذَا قَضَى ٱللَّهُ وَرَسُولُهُۥٓ أَمْرًا أَن يَكُونَ لَهُمُ ٱلْخِيَرَةُ مِنْ أَمْرِهِمْ ۗ وَمَن يَعْصِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ فَقَدْ ضَلَّ ضَلَـٰلًا مُّبِينًا
Transliteration wamā kāna limu'minin walā mu'minatin idhā qaḍā l-lahu warasūluhu amran an yakūna lahumu l-khiyaratu min amrihim waman yaʿṣi l-laha warasūlahu faqad ḍalla ḍalālan mubīnan
Marathi ३६. आणि (लक्षात ठेवा) कोणत्याही ईमान राखणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या फैसल्यानंतर आपल्या एखाद्या गोष्टीचा कसलाही अधिकार बाकी राहत नाही (लक्षात ठेवा) अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची जो कोणी अवज्ञा करील, तो उघड मार्गभ्रष्टतेत जाऊन पडेल.
Verse 37
وَإِذْ تَقُولُ لِلَّذِىٓ أَنْعَمَ ٱللَّهُ عَلَيْهِ وَأَنْعَمْتَ عَلَيْهِ أَمْسِكْ عَلَيْكَ زَوْجَكَ وَٱتَّقِ ٱللَّهَ وَتُخْفِى فِى نَفْسِكَ مَا ٱللَّهُ مُبْدِيهِ وَتَخْشَى ٱلنَّاسَ وَٱللَّهُ أَحَقُّ أَن تَخْشَىٰهُ ۖ فَلَمَّا قَضَىٰ زَيْدٌ مِّنْهَا وَطَرًا زَوَّجْنَـٰكَهَا لِكَىْ لَا يَكُونَ عَلَى ٱلْمُؤْمِنِينَ حَرَجٌ فِىٓ أَزْوَٰجِ أَدْعِيَآئِهِمْ إِذَا قَضَوْا۟ مِنْهُنَّ وَطَرًا ۚ وَكَانَ أَمْرُ ٱللَّهِ مَفْعُولًا
Transliteration wa-idh taqūlu lilladhī anʿama l-lahu ʿalayhi wa-anʿamta ʿalayhi amsik ʿalayka zawjaka wa-ittaqi l-laha watukh'fī fī nafsika mā l-lahu mub'dīhi watakhshā l-nāsa wal-lahu aḥaqqu an takhshāhu falammā qaḍā zaydun min'hā waṭaran zawwajnākahā likay lā yakūna ʿalā l-mu'minīna ḥarajun fī azwāji adʿiyāihim idhā qaḍaw min'hunna waṭaran wakāna amru l-lahi mafʿūlan
Marathi ३७. आणि (स्मरण करा) जेव्हा तुम्ही त्या माणसाला सांगत होते , ज्यावर अल्लाहने अनुग्रह केला आणि तु्म्ही देखील की आपल्या पत्नीला आपल्या जवळ ठेवा, आणि अल्लाहचे भय बाळगा आणि तुम्ही आपल्या मनात ही गोष्ट लपवून ठेवली होती जिला अल्लाह उघड करणार होता, आणि तुम्ही लोकांचे भय बाळगत होता, वास्तिवक अल्लाह या गोष्टीचा अधिक हक्क राखत होता की तुम्ही त्याचे भय बाळगावे, मग जेव्हा जैदने त्या स्त्रीकडून आपली गरज पूर्ण करून घेतली, तेव्हा तिला आम्ही तुमच्या विवाहात दिले. यासाठी की ईमान राखणाऱ्या लोकांना, त्यांच्या दत्तक पुत्रांच्या पत्नींबाबत कसल्याही प्रकारचा संकोच राहू नये, जेव्हा ते त्यांच्याकडून आपली गरज पूर्ण करून घेतील, अल्लाहचा हा आदेश कार्यान्वित होणारच होता.
Verse 38
مَّا كَانَ عَلَى ٱلنَّبِىِّ مِنْ حَرَجٍ فِيمَا فَرَضَ ٱللَّهُ لَهُۥ ۖ سُنَّةَ ٱللَّهِ فِى ٱلَّذِينَ خَلَوْا۟ مِن قَبْلُ ۚ وَكَانَ أَمْرُ ٱللَّهِ قَدَرًا مَّقْدُورًا
Transliteration mā kāna ʿalā l-nabiyi min ḥarajin fīmā faraḍa l-lahu lahu sunnata l-lahi fī alladhīna khalaw min qablu wakāna amru l-lahi qadaran maqdūran
Marathi ३८. ज्या गोष्टी अल्लाहने आपल्या पैगंबराकरिता उचित (मान्य) केल्या आहेत, त्यांच्या बाबतीत पैगंबरावर काही हरकत नाही. अल्लाहचा हाच नियम त्यां (पैगंबरां) च्याबाबतही राहिला जे पूर्वी होऊन गेले आणि अल्लाहची कामे अनुमानाने निर्धारित केलेले असतात.
Verse 39
ٱلَّذِينَ يُبَلِّغُونَ رِسَـٰلَـٰتِ ٱللَّهِ وَيَخْشَوْنَهُۥ وَلَا يَخْشَوْنَ أَحَدًا إِلَّا ٱللَّهَ ۗ وَكَفَىٰ بِٱللَّهِ حَسِيبًا
Transliteration alladhīna yuballighūna risālāti l-lahi wayakhshawnahu walā yakhshawna aḥadan illā l-laha wakafā bil-lahi ḥasīban
Marathi ३९. ते सर्व असे होते की अल्लाहचे आदेश पोहचवित नसत आणि अल्लाहचेच भय बाळगत आणि अल्लाहखेरीज कोणाचेही भय बाळगत नस, आणि अल्लाह हिशोब घेण्यासाठी पुरेसा आहे.
Verse 40
مَّا كَانَ مُحَمَّدٌ أَبَآ أَحَدٍ مِّن رِّجَالِكُمْ وَلَـٰكِن رَّسُولَ ٱللَّهِ وَخَاتَمَ ٱلنَّبِيِّـۧنَ ۗ وَكَانَ ٱللَّهُ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمًا
Transliteration mā kāna muḥammadun abā aḥadin min rijālikum walākin rasūla l-lahi wakhātama l-nabiyīna wakāna l-lahu bikulli shayin ʿalīman
Marathi ४०. लोकांनो! तुमच्या पुरुषांपैकी मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) कोणाचेही पिता नाहीत, तथापि ते अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि समस्त पैगंबरांमध्ये अंतिम पैगंबर आहेत,१ आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.
Verse 41
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱذْكُرُوا۟ ٱللَّهَ ذِكْرًا كَثِيرًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū udh'kurū l-laha dhik'ran kathīran
Marathi ४१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा.
Verse 42
وَسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا
Transliteration wasabbiḥūhu buk'ratan wa-aṣīlan
Marathi ४२. आणि सकाळ संध्याकाळ त्याची पवित्रता वर्णन करीत राहा.
Verse 43
هُوَ ٱلَّذِى يُصَلِّى عَلَيْكُمْ وَمَلَـٰٓئِكَتُهُۥ لِيُخْرِجَكُم مِّنَ ٱلظُّلُمَـٰتِ إِلَى ٱلنُّورِ ۚ وَكَانَ بِٱلْمُؤْمِنِينَ رَحِيمًا
Transliteration huwa alladhī yuṣallī ʿalaykum wamalāikatuhu liyukh'rijakum mina l-ẓulumāti ilā l-nūri wakāna bil-mu'minīna raḥīman
Marathi ४३. तोच आहे, जो तुमच्यावर आपली दया - कृपा पाठवितो आणि त्याचे फरिश्ते (तुमच्यासाठी दया याचनेची प्रार्थना करतात) यासाठी की त्याने तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशाकडे न्यावे, आणि अल्लाह ईमान राखणाऱ्यांवर मोठा दया करणारा आहे.
Verse 44
تَحِيَّتُهُمْ يَوْمَ يَلْقَوْنَهُۥ سَلَـٰمٌ ۚ وَأَعَدَّ لَهُمْ أَجْرًا كَرِيمًا
Transliteration taḥiyyatuhum yawma yalqawnahu salāmun wa-aʿadda lahum ajran karīman
Marathi ४४. ज्या दिवशी हे अल्लाहला भेटतील, त्यांचे स्वागत सलामद्वारे होईल, त्यांच्यासाठी अल्लाहने मान-सन्मानपूर्ण मोबदला तयार करून ठेवला आहे.
Verse 45
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ إِنَّآ أَرْسَلْنَـٰكَ شَـٰهِدًا وَمُبَشِّرًا وَنَذِيرًا
Transliteration yāayyuhā l-nabiyu innā arsalnāka shāhidan wamubashiran wanadhīran
Marathi ४५. हे पैगंबर! निःसंशय, आम्हीच तुम्हाला (रसूल) साक्षी, खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा बनवून पाठविले आहे.
Verse 46
وَدَاعِيًا إِلَى ٱللَّهِ بِإِذْنِهِۦ وَسِرَاجًا مُّنِيرًا
Transliteration wadāʿiyan ilā l-lahi bi-idh'nihi wasirājan munīran
Marathi ४६. आणि अल्लाहच्या आदेशाने त्याच्याकडे बोलविणारा आणि उज्ज्वल (प्रकाशमान) दीप बनवून.
Verse 47
وَبَشِّرِ ٱلْمُؤْمِنِينَ بِأَنَّ لَهُم مِّنَ ٱللَّهِ فَضْلًا كَبِيرًا
Transliteration wabashiri l-mu'minīna bi-anna lahum mina l-lahi faḍlan kabīran
Marathi ४७. आणि तुम्ही ईमान राखणाऱ्या लोकांना ही शुभवार्ता ऐकवा की त्यांच्याकरिता अल्लाहकडून फार मोठा अनुग्रह आहे.
Verse 48
وَلَا تُطِعِ ٱلْكَـٰفِرِينَ وَٱلْمُنَـٰفِقِينَ وَدَعْ أَذَىٰهُمْ وَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ ۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِيلًا
Transliteration walā tuṭiʿi l-kāfirīna wal-munāfiqīna wadaʿ adhāhum watawakkal ʿalā l-lahi wakafā bil-lahi wakīlan
Marathi ४८. आणि काफिरांचे व ढोंगी मुसलमानांचे म्हणणे मानू नका, आणि जे दुःख (त्यांच्याकडून) पोहोचेल त्याची चिंता करू नका. अल्लाहवर भरवसा राखा, अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे.
Verse 49
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِذَا نَكَحْتُمُ ٱلْمُؤْمِنَـٰتِ ثُمَّ طَلَّقْتُمُوهُنَّ مِن قَبْلِ أَن تَمَسُّوهُنَّ فَمَا لَكُمْ عَلَيْهِنَّ مِنْ عِدَّةٍ تَعْتَدُّونَهَا ۖ فَمَتِّعُوهُنَّ وَسَرِّحُوهُنَّ سَرَاحًا جَمِيلًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū idhā nakaḥtumu l-mu'mināti thumma ṭallaqtumūhunna min qabli an tamassūhunna famā lakum ʿalayhinna min ʿiddatin taʿtaddūnahā famattiʿūhunna wasarriḥūhunna sarāḥan jamīlan
Marathi ४९. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही ईमान राखणाऱ्या स्त्रियांशी विवाह कराल, मग त्यांना हात लावण्यापूर्वी तलाक (घटस्फोट) द्याल, तर त्यांच्यावर तुमचा कसलाही (अधिकार) इद्दत (तलाकनंतर निर्धारित वेळेपर्यंतची प्रतिबंधित मुदती) चा नाही, जिची तुम्ही गणना करावी.१ तेव्हा तुम्ही त्यांना काही न काही द्या आणि भल्या रितीने त्यांना निरोप द्या.
Verse 50
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ إِنَّآ أَحْلَلْنَا لَكَ أَزْوَٰجَكَ ٱلَّـٰتِىٓ ءَاتَيْتَ أُجُورَهُنَّ وَمَا مَلَكَتْ يَمِينُكَ مِمَّآ أَفَآءَ ٱللَّهُ عَلَيْكَ وَبَنَاتِ عَمِّكَ وَبَنَاتِ عَمَّـٰتِكَ وَبَنَاتِ خَالِكَ وَبَنَاتِ خَـٰلَـٰتِكَ ٱلَّـٰتِى هَاجَرْنَ مَعَكَ وَٱمْرَأَةً مُّؤْمِنَةً إِن وَهَبَتْ نَفْسَهَا لِلنَّبِىِّ إِنْ أَرَادَ ٱلنَّبِىُّ أَن يَسْتَنكِحَهَا خَالِصَةً لَّكَ مِن دُونِ ٱلْمُؤْمِنِينَ ۗ قَدْ عَلِمْنَا مَا فَرَضْنَا عَلَيْهِمْ فِىٓ أَزْوَٰجِهِمْ وَمَا مَلَكَتْ أَيْمَـٰنُهُمْ لِكَيْلَا يَكُونَ عَلَيْكَ حَرَجٌ ۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا
Transliteration yāayyuhā l-nabiyu innā aḥlalnā laka azwājaka allātī ātayta ujūrahunna wamā malakat yamīnuka mimmā afāa l-lahu ʿalayka wabanāti ʿammika wabanāti ʿammātika wabanāti khālika wabanāti khālātika allātī hājarna maʿaka wa-im'ra-atan mu'minatan in wahabat nafsahā lilnnabiyyi in arāda l-nabiyu an yastankiḥahā khāliṣatan laka min dūni l-mu'minīna qad ʿalim'nā mā faraḍnā ʿalayhim fī azwājihim wamā malakat aymānuhum likaylā yakūna ʿalayka ḥarajun wakāna l-lahu ghafūran raḥīman
Marathi ५०. हे पैगंबर (स.)! आम्ही तुमच्यासाठी तुमच्या त्या पत्न्या हलाल (वैध) केल्या आहेत, ज्यांना तुम्ही त्यांचे महर (स्त्रीधन) देऊन टाकले आहे आणि त्या दासी देखील, ज्यांना अल्लाहने युद्धात तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि तुमच्या काकाच्या कन्या, आत्याच्या कन्या, तुमच्या मामाच्या कन्या आणि तुमच्या मावशीच्या कन्या देखील, ज्यांनी तुमच्यासोबत हिजरत (स्वदेशत्याग) केली आहे आणि ती ईमानधारक स्त्री जी स्वतःला पैगंबरांना दान करील, हे त्या स्थितीत की स्वतः जर पैगंबरही तिच्याशी विवाह करू इच्छितील. हे विशेषतः तुमच्यासाठीच आहे आणि इतर ईमानधारकांसाठी नाही. आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणतो जे आम्ही त्यांच्यावर त्यांच्या पत्न्या आणि दासींविषयी (चे आदेश) निर्धारित केले आहेत. हे यासाठी की तुमच्यावर एखादी अडचण उद्भवू नये. अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दया करणारा आहे.
Verse 51
۞ تُرْجِى مَن تَشَآءُ مِنْهُنَّ وَتُـْٔوِىٓ إِلَيْكَ مَن تَشَآءُ ۖ وَمَنِ ٱبْتَغَيْتَ مِمَّنْ عَزَلْتَ فَلَا جُنَاحَ عَلَيْكَ ۚ ذَٰلِكَ أَدْنَىٰٓ أَن تَقَرَّ أَعْيُنُهُنَّ وَلَا يَحْزَنَّ وَيَرْضَيْنَ بِمَآ ءَاتَيْتَهُنَّ كُلُّهُنَّ ۚ وَٱللَّهُ يَعْلَمُ مَا فِى قُلُوبِكُمْ ۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَلِيمًا
Transliteration tur'jī man tashāu min'hunna watu'wī ilayka man tashāu wamani ib'taghayta mimman ʿazalta falā junāḥa ʿalayka dhālika adnā an taqarra aʿyunuhunna walā yaḥzanna wayarḍayna bimā ātaytahunna kulluhunna wal-lahu yaʿlamu mā fī qulūbikum wakāna l-lahu ʿalīman ḥalīman
Marathi ५१. त्यांच्यापैकी जिला तुम्ही इच्छित असाल दूर राखा आणि जिला इच्छित असाल आपल्या जवळ ठेवा आणि जर तुम्ही त्यांच्यापैकी एखादीला आपल्या जवळ बोलावून घ्याल, ज्यांना तुम्ही वेगळे करून ठेवले होते, तर यात तुम्हाला काही हरकत नाही. याद्वारे या गोष्टीची अधिक आशा बाळगली जाऊ शकते की या (स्त्रियां) चे नेत्र शितल राहावेत आणि त्या दुःखी न व्हाव्यात आणि तुम्ही जे काही त्यांना द्याल त्यावर त्या सर्व राजी खुशी राहतील. तुमच्या मनात जे काही आहे ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह मोठा ज्ञान बाळगणारा सहनशील आहे.
Verse 52
لَّا يَحِلُّ لَكَ ٱلنِّسَآءُ مِنۢ بَعْدُ وَلَآ أَن تَبَدَّلَ بِهِنَّ مِنْ أَزْوَٰجٍ وَلَوْ أَعْجَبَكَ حُسْنُهُنَّ إِلَّا مَا مَلَكَتْ يَمِينُكَ ۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ رَّقِيبًا
Transliteration lā yaḥillu laka l-nisāu min baʿdu walā an tabaddala bihinna min azwājin walaw aʿjabaka ḥus'nuhunna illā mā malakat yamīnuka wakāna l-lahu ʿalā kulli shayin raqīban
Marathi ५२. यानंतर इतर स्त्रिया तुमच्याकरिता हलाल (वैध) नाहीत आणि ना हे (उचित आहे) की त्यांना सोडून दुसऱ्या स्त्रियांशी (विवाह करावा) जरी त्यांचे रूप (सौंदर्य) कितीही चांगले वाटत असेल. परंतु तुमच्या दासीखेरीज, अल्लाह प्रत्येक गोष्टीवर देखरेख करणारा आहे.
Verse 53
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا تَدْخُلُوا۟ بُيُوتَ ٱلنَّبِىِّ إِلَّآ أَن يُؤْذَنَ لَكُمْ إِلَىٰ طَعَامٍ غَيْرَ نَـٰظِرِينَ إِنَىٰهُ وَلَـٰكِنْ إِذَا دُعِيتُمْ فَٱدْخُلُوا۟ فَإِذَا طَعِمْتُمْ فَٱنتَشِرُوا۟ وَلَا مُسْتَـْٔنِسِينَ لِحَدِيثٍ ۚ إِنَّ ذَٰلِكُمْ كَانَ يُؤْذِى ٱلنَّبِىَّ فَيَسْتَحْىِۦ مِنكُمْ ۖ وَٱللَّهُ لَا يَسْتَحْىِۦ مِنَ ٱلْحَقِّ ۚ وَإِذَا سَأَلْتُمُوهُنَّ مَتَـٰعًا فَسْـَٔلُوهُنَّ مِن وَرَآءِ حِجَابٍ ۚ ذَٰلِكُمْ أَطْهَرُ لِقُلُوبِكُمْ وَقُلُوبِهِنَّ ۚ وَمَا كَانَ لَكُمْ أَن تُؤْذُوا۟ رَسُولَ ٱللَّهِ وَلَآ أَن تَنكِحُوٓا۟ أَزْوَٰجَهُۥ مِنۢ بَعْدِهِۦٓ أَبَدًا ۚ إِنَّ ذَٰلِكُمْ كَانَ عِندَ ٱللَّهِ عَظِيمًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā tadkhulū buyūta l-nabiyi illā an yu'dhana lakum ilā ṭaʿāmin ghayra nāẓirīna ināhu walākin idhā duʿītum fa-ud'khulū fa-idhā ṭaʿim'tum fa-intashirū walā mus'tanisīna liḥadīthin inna dhālikum kāna yu'dhī l-nabiya fayastaḥyī minkum wal-lahu lā yastaḥyī mina l-ḥaqi wa-idhā sa-altumūhunna matāʿan fasalūhunna min warāi ḥijābin dhālikum aṭharu liqulūbikum waqulūbihinna wamā kāna lakum an tu'dhū rasūla l-lahi walā an tankiḥū azwājahu min baʿdihi abadan inna dhālikum kāna ʿinda l-lahi ʿaẓīman
Marathi ५३. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जोपर्यंत तुम्हाला (आत येण्याची) अनुमती दिली जात नाही, तोपर्यंत तुम्ही पैगंबराच्या घरात प्रवेश करू नका. भोजनाकरिता अशा वेळी की भोजन तयार होण्याची प्रतीक्षा करीत राहावे, किंबहुना जेव्हा बोलाविले जाईल, तेव्हा जा आणि जेव्हा भोजन करू घ्याल तेव्हा निघण्याची तयारी करा. तिथेच (बसून) गप्पा गोष्टीत मग्न होऊ नका. पैगंबराना तुमच्या या कामाचा त्रास होतो, परंतु ते तुमचा आदर (संकोच) करतात, आणि अल्लाह सत्य गोष्ट सांगण्यात कोणाचीही पर्वा करीत नाही, आणि जेव्हा तुम्ही पैगंबराच्या पत्नींकडून एखादी वस्तू मागाल तर पडद्याआडून मागा. तुमच्या आणि त्यांच्या हृदयांकरिता पुर्ण पवित्रता हीच आहे. तुमच्यासाठी हे योग्य नव्हे की तुम्ही अल्लाहच्या पैगंबरास त्रास द्यावा आणि ना तुमच्यासाठी हे उचित आहे की पैगंबर (स.) यांच्यानंतर त्यांच्या पत्नींशी विवाह करावा (लक्षात ठेवा) अल्लाहजवळ हे महाभयंकर (पाप) आहे.
Verse 54
إِن تُبْدُوا۟ شَيْـًٔا أَوْ تُخْفُوهُ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمًا
Transliteration in tub'dū shayan aw tukh'fūhu fa-inna l-laha kāna bikulli shayin ʿalīman
Marathi ५४. तुम्ही एखादी गोष्ट जाहीर करा किंवा लपवून ठेवा, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे चांगल्या प्रकारे ज्ञान राखणारा आहे.
Verse 55
لَّا جُنَاحَ عَلَيْهِنَّ فِىٓ ءَابَآئِهِنَّ وَلَآ أَبْنَآئِهِنَّ وَلَآ إِخْوَٰنِهِنَّ وَلَآ أَبْنَآءِ إِخْوَٰنِهِنَّ وَلَآ أَبْنَآءِ أَخَوَٰتِهِنَّ وَلَا نِسَآئِهِنَّ وَلَا مَا مَلَكَتْ أَيْمَـٰنُهُنَّ ۗ وَٱتَّقِينَ ٱللَّهَ ۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ شَهِيدًا
Transliteration lā junāḥa ʿalayhinna fī ābāihinna walā abnāihinna walā ikh'wānihinna walā abnāi ikh'wānihinna walā abnāi akhawātihinna walā nisāihinna walā mā malakat aymānuhunna wa-ittaqīna l-laha inna l-laha kāna ʿalā kulli shayin shahīdan
Marathi ५५. त्या स्त्रियांवर कसलाही गुन्हा नाही त्या आपल्या पित्यांच्या, आपल्या पुत्रांच्या आणि भावांच्या, आपल्या पुतण्यांच्या, भाच्यांच्या आणि आपल्या (परिचित) स्त्रियांच्या आणि ज्यांच्या त्या मालक आहेत त्यां (दास दासीं) च्या समोर असाव्यात.१ स्त्रियांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा, अल्लाह निःसंशय, प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे.
Verse 56
إِنَّ ٱللَّهَ وَمَلَـٰٓئِكَتَهُۥ يُصَلُّونَ عَلَى ٱلنَّبِىِّ ۚ يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ صَلُّوا۟ عَلَيْهِ وَسَلِّمُوا۟ تَسْلِيمًا
Transliteration inna l-laha wamalāikatahu yuṣallūna ʿalā l-nabiyi yāayyuhā alladhīna āmanū ṣallū ʿalayhi wasallimū taslīman
Marathi ५६. अल्लाह आणि त्याचे फरिश्ते या पैगंबरावर दरुद पाठवितात. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही (देखील) यांच्यावर दरुद पाठवा आणि जास्त सलाम (ही) पाठवत राहा. १
Verse 57
إِنَّ ٱلَّذِينَ يُؤْذُونَ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ لَعَنَهُمُ ٱللَّهُ فِى ٱلدُّنْيَا وَٱلْـَٔاخِرَةِ وَأَعَدَّ لَهُمْ عَذَابًا مُّهِينًا
Transliteration inna alladhīna yu'dhūna l-laha warasūlahu laʿanahumu l-lahu fī l-dun'yā wal-ākhirati wa-aʿadda lahum ʿadhāban muhīnan
Marathi ५७. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला दुःख- त्रास देतात, त्यांच्यावर या जगात व आखिरतमध्ये अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी मोठा अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.
Verse 58
وَٱلَّذِينَ يُؤْذُونَ ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَـٰتِ بِغَيْرِ مَا ٱكْتَسَبُوا۟ فَقَدِ ٱحْتَمَلُوا۟ بُهْتَـٰنًا وَإِثْمًا مُّبِينًا
Transliteration wa-alladhīna yu'dhūna l-mu'minīna wal-mu'mināti bighayri mā ik'tasabū faqadi iḥ'tamalū buh'tānan wa-ith'man mubīnan
Marathi ५८. आणि जे लोक ईमान राखणाऱ्या पुरुष व स्त्रियांना अशा एखाद्या अपराधाबद्दल दुःख - त्रास देतात, जो त्यांच्याकडून घडला नसेल तर ते फार मोठा आरोप आणि खुल्या अपराधाचे ओझे उचलतात.
Verse 59
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّبِىُّ قُل لِّأَزْوَٰجِكَ وَبَنَاتِكَ وَنِسَآءِ ٱلْمُؤْمِنِينَ يُدْنِينَ عَلَيْهِنَّ مِن جَلَـٰبِيبِهِنَّ ۚ ذَٰلِكَ أَدْنَىٰٓ أَن يُعْرَفْنَ فَلَا يُؤْذَيْنَ ۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورًا رَّحِيمًا
Transliteration yāayyuhā l-nabiyu qul li-azwājika wabanātika wanisāi l-mu'minīna yud'nīna ʿalayhinna min jalābībihinna dhālika adnā an yuʿ'rafna falā yu'dhayna wakāna l-lahu ghafūran raḥīman
Marathi ५९. हे पैगंबर! आपल्या पत्नींना आणि आपल्या कन्यांना आणि ईमान राखणाऱ्यांच्या स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या अंगावर आपल्या चादरी टाकून घेत जावे. अशाने त्या त्वरित ओळखल्या जातील, मग त्यांना त्रास पोहचविला जाणार नाही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
Verse 60
۞ لَّئِن لَّمْ يَنتَهِ ٱلْمُنَـٰفِقُونَ وَٱلَّذِينَ فِى قُلُوبِهِم مَّرَضٌ وَٱلْمُرْجِفُونَ فِى ٱلْمَدِينَةِ لَنُغْرِيَنَّكَ بِهِمْ ثُمَّ لَا يُجَاوِرُونَكَ فِيهَآ إِلَّا قَلِيلًا
Transliteration la-in lam yantahi l-munāfiqūna wa-alladhīna fī qulūbihim maraḍun wal-mur'jifūna fī l-madīnati lanugh'riyannaka bihim thumma lā yujāwirūnaka fīhā illā qalīlan
Marathi ६०. जर (अजूनही) हे मुनाफिक (ईमानधारक असल्याचे ढोंग करणारे) आणि ते, ज्यांच्या मनात रोग आहे आणि मदीनाचे ते रहिवाशी जे खोट्या अफवा उडवितात, थांबले नाहीत तर आम्ही तुम्हाला त्यांच्या (नाशा) वर लावून देऊ, मग तर ते काही दिवसच तुमच्यासोबत या (शहरा) त राहू शकतील.
Verse 61
مَّلْعُونِينَ ۖ أَيْنَمَا ثُقِفُوٓا۟ أُخِذُوا۟ وَقُتِّلُوا۟ تَقْتِيلًا
Transliteration malʿūnīna aynamā thuqifū ukhidhū waquttilū taqtīlan
Marathi ६१. त्यांच्यावर धिःक्काराचा वर्षाव केला गेला, ज्या ज्या ठिकाणी सापडावेत, धरले जावेत आणि खूप तुकडे तुकडे केले जावेत.
Verse 62
سُنَّةَ ٱللَّهِ فِى ٱلَّذِينَ خَلَوْا۟ مِن قَبْلُ ۖ وَلَن تَجِدَ لِسُنَّةِ ٱللَّهِ تَبْدِيلًا
Transliteration sunnata l-lahi fī alladhīna khalaw min qablu walan tajida lisunnati l-lahi tabdīlan
Marathi ६२. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांसाठीही अल्लाहचा हाच नियम लागू राहिला आणि तुम्हाला अल्लाहच्या विधी-नियमात केव्हाही बदल आढळणार नाही.
Verse 63
يَسْـَٔلُكَ ٱلنَّاسُ عَنِ ٱلسَّاعَةِ ۖ قُلْ إِنَّمَا عِلْمُهَا عِندَ ٱللَّهِ ۚ وَمَا يُدْرِيكَ لَعَلَّ ٱلسَّاعَةَ تَكُونُ قَرِيبًا
Transliteration yasaluka l-nāsu ʿani l-sāʿati qul innamā ʿil'muhā ʿinda l-lahi wamā yud'rīka laʿalla l-sāʿata takūnu qarīban
Marathi ६३. लोक तुम्हाला कयामत (च्या वेळे) विषयी विचारतात. (तुम्ही) सांगा, याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे, तुम्हाला काय माहीत, फार संभव आहे की कयामत अगदी जवळ येऊन ठेपली असेल.
Verse 64
إِنَّ ٱللَّهَ لَعَنَ ٱلْكَـٰفِرِينَ وَأَعَدَّ لَهُمْ سَعِيرًا
Transliteration inna l-laha laʿana l-kāfirīna wa-aʿadda lahum saʿīran
Marathi ६४. अल्लाहने काफिरांचा धिःक्कार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.
Verse 65
خَـٰلِدِينَ فِيهَآ أَبَدًا ۖ لَّا يَجِدُونَ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا
Transliteration khālidīna fīhā abadan lā yajidūna waliyyan walā naṣīran
Marathi ६५. जिच्यात ते सदैवकाळ राहतील, त्यांना ना कोणी पाठीराखा मित्र लाभेल आणि ना कोणी मदत करणारा.
Verse 66
يَوْمَ تُقَلَّبُ وُجُوهُهُمْ فِى ٱلنَّارِ يَقُولُونَ يَـٰلَيْتَنَآ أَطَعْنَا ٱللَّهَ وَأَطَعْنَا ٱلرَّسُولَا۠
Transliteration yawma tuqallabu wujūhuhum fī l-nāri yaqūlūna yālaytanā aṭaʿnā l-laha wa-aṭaʿnā l-rasūlā
Marathi ६६. त्या दिवशी त्यांचे चेहरे आगीत उलट पालट केले जातील (ते मोठ्या पश्चात्तापाने आणि दुःखाने) म्हणतील की आम्ही अल्लाहचे आणि पैगंबरांचे आज्ञापालन केले असते तर बरे झाले असते!
Verse 67
وَقَالُوا۟ رَبَّنَآ إِنَّآ أَطَعْنَا سَادَتَنَا وَكُبَرَآءَنَا فَأَضَلُّونَا ٱلسَّبِيلَا۠
Transliteration waqālū rabbanā innā aṭaʿnā sādatanā wakubarāanā fa-aḍallūnā l-sabīlā
Marathi ६७. आणि ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही आपल्या प्रमुखांचे आणि थोरा-मोठ्यांचे म्हणणे ऐकले (मानले) ज्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून विचलित केले.
Verse 68
رَبَّنَآ ءَاتِهِمْ ضِعْفَيْنِ مِنَ ٱلْعَذَابِ وَٱلْعَنْهُمْ لَعْنًا كَبِيرًا
Transliteration rabbanā ātihim ḍiʿ'fayni mina l-ʿadhābi wal-ʿanhum laʿnan kabīran
Marathi ६८. हे आमच्या पालनकर्त्या! तू त्यांना दुप्पट अज़ाब (शिक्षा-यातना) दे आणि त्यांच्यावर फार मोठा धिःक्कार (लानत) पाठव.
Verse 69
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا تَكُونُوا۟ كَٱلَّذِينَ ءَاذَوْا۟ مُوسَىٰ فَبَرَّأَهُ ٱللَّهُ مِمَّا قَالُوا۟ ۚ وَكَانَ عِندَ ٱللَّهِ وَجِيهًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā takūnū ka-alladhīna ādhaw mūsā fabarra-ahu l-lahu mimmā qālū wakāna ʿinda l-lahi wajīhan
Marathi ६९. हे ईमान राखणाऱ्यांनो! त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी मूसाला क्लेश - यातना दिली, तर जी गोष्ट त्यांनी सांगितली होती अल्लाहने त्यांना त्या गोष्टीपासून मुक्त केले आणि अल्लाहजवळ मूसा प्रतिष्ठित होते.
Verse 70
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱتَّقُوا۟ ٱللَّهَ وَقُولُوا۟ قَوْلًا سَدِيدًا
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū ittaqū l-laha waqūlū qawlan sadīdan
Marathi ७०. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय राखा आणि सरळ सरळ (सत्य) गोष्टी बोलत जा.
Verse 71
يُصْلِحْ لَكُمْ أَعْمَـٰلَكُمْ وَيَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ ۗ وَمَن يُطِعِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ فَقَدْ فَازَ فَوْزًا عَظِيمًا
Transliteration yuṣ'liḥ lakum aʿmālakum wayaghfir lakum dhunūbakum waman yuṭiʿi l-laha warasūlahu faqad fāza fawzan ʿaẓīman
Marathi ७१. यासाठी की अल्लाहने तुमच्या आचरणात सुधारणा करावी आणि तुमचे अपराध माफ करावेत आणि जो मनुष्य देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करील, त्याने फार मोठी सफलता प्राप्त करून घेतली.
Verse 72
إِنَّا عَرَضْنَا ٱلْأَمَانَةَ عَلَى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَٱلْجِبَالِ فَأَبَيْنَ أَن يَحْمِلْنَهَا وَأَشْفَقْنَ مِنْهَا وَحَمَلَهَا ٱلْإِنسَـٰنُ ۖ إِنَّهُۥ كَانَ ظَلُومًا جَهُولًا
Transliteration innā ʿaraḍnā l-amānata ʿalā l-samāwāti wal-arḍi wal-jibāli fa-abayna an yaḥmil'nahā wa-ashfaqna min'hā waḥamalahā l-insānu innahu kāna ẓalūman jahūlan
Marathi ७२. आम्ही आपल्या अमानतीला आकाशांच्या आणि जमिनीच्या आणि पर्वतांच्या समोर सादर केले (परंतु) सर्वांनी ती उचलण्याबाबत इन्कार केला आणि तिच्यापासून भयभित झाले (तथापि) मानवाने तिला उचलून घेतले, निःसंशय तो मोठा अत्याचारी आणि अडाणी आहे.
Verse 73
لِّيُعَذِّبَ ٱللَّهُ ٱلْمُنَـٰفِقِينَ وَٱلْمُنَـٰفِقَـٰتِ وَٱلْمُشْرِكِينَ وَٱلْمُشْرِكَـٰتِ وَيَتُوبَ ٱللَّهُ عَلَى ٱلْمُؤْمِنِينَ وَٱلْمُؤْمِنَـٰتِ ۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورًا رَّحِيمًۢا
Transliteration liyuʿadhiba l-lahu l-munāfiqīna wal-munāfiqāti wal-mush'rikīna wal-mush'rikāti wayatūba l-lahu ʿalā l-mu'minīna wal-mu'mināti wakāna l-lahu ghafūran raḥīman
Marathi ७३. (हे अशासाठी) की अल्लाहने मुनाफिक पुरुष आणि मुनाफिक स्त्रिया आणि अनेकेश्वरवादी पुरुष आणि अनेकेश्वरवादी स्त्रियांना सजा द्यावी आणि ईमान राखणाऱ्या पुरुषांची आणि ईमान राखणाऱ्या स्त्रियांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करावी, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.
Read Surah Al-Ahzab in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.