MyDugsiStart learning

Surah Sad in Marathi: translation and audio

Surah 38 · ص · The Letter "Saad" · 88 verses

Surah Sad verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Sad word by word in English.

Verse 1

صٓ ۚ وَٱلْقُرْءَانِ ذِى ٱلذِّكْرِ

Transliteration sad wal-qur'āni dhī l-dhik'ri

Marathi १. साद, या बोध उपदेशपूर्ण कुरआनाची शपथ.

Verse 2

بَلِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ فِى عِزَّةٍ وَشِقَاقٍ

Transliteration bali alladhīna kafarū fī ʿizzatin washiqāqin

Marathi २. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१

Verse 3

كَمْ أَهْلَكْنَا مِن قَبْلِهِم مِّن قَرْنٍ فَنَادَوا۟ وَّلَاتَ حِينَ مَنَاصٍ

Transliteration kam ahlaknā min qablihim min qarnin fanādaw walāta ḥīna manāṣin

Marathi ३. आम्ही याच्यापूर्वीही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले, त्यांनी प्रत्येक प्रकारे आरडाओरड केली, परंतु ती वेळ सुटकेची नव्हती.

Verse 4

وَعَجِبُوٓا۟ أَن جَآءَهُم مُّنذِرٌ مِّنْهُمْ ۖ وَقَالَ ٱلْكَـٰفِرُونَ هَـٰذَا سَـٰحِرٌ كَذَّابٌ

Transliteration waʿajibū an jāahum mundhirun min'hum waqāla l-kāfirūna hādhā sāḥirun kadhābun

Marathi ४. आणि काफिर लोकांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकीच एक खबरदार करणारा आला आणि म्हणू लागले की हा जादूगार आणि खोटारडा आहे.

Verse 5

أَجَعَلَ ٱلْـَٔالِهَةَ إِلَـٰهًا وَٰحِدًا ۖ إِنَّ هَـٰذَا لَشَىْءٌ عُجَابٌ

Transliteration ajaʿala l-ālihata ilāhan wāḥidan inna hādhā lashayon ʿujābun

Marathi ५. काय याने एवढ्या साऱ्या आराध्य दैवतांना एकच दैवत (माबूद) बनवून टाकले, खरोखर ही मोठा विचित्र गोष्ट आहे!

Verse 6

وَٱنطَلَقَ ٱلْمَلَأُ مِنْهُمْ أَنِ ٱمْشُوا۟ وَٱصْبِرُوا۟ عَلَىٰٓ ءَالِهَتِكُمْ ۖ إِنَّ هَـٰذَا لَشَىْءٌ يُرَادُ

Transliteration wa-inṭalaqa l-mala-u min'hum ani im'shū wa-iṣ'birū ʿalā ālihatikum inna hādhā lashayon yurādu

Marathi ६. त्यांचे सरदार (प्रमुख) असे बोलत निघून जाऊ लागले, जा, आपल्या दैवतांवर मजबूत (अटळ) राहा. निःसंशय, या गोष्टीत काहीतरी उद्दिष्ट (स्वार्थ) आहे.

Verse 7

مَا سَمِعْنَا بِهَـٰذَا فِى ٱلْمِلَّةِ ٱلْـَٔاخِرَةِ إِنْ هَـٰذَآ إِلَّا ٱخْتِلَـٰقٌ

Transliteration mā samiʿ'nā bihādhā fī l-milati l-ākhirati in hādhā illā ikh'tilāqun

Marathi ७. आम्ही तर ही गोष्ट प्राचीन धर्मांमध्येही ऐकली नाही काही नाही, ही केवळ मनाने रचलेली गोष्टी आहे.

Verse 8

أَءُنزِلَ عَلَيْهِ ٱلذِّكْرُ مِنۢ بَيْنِنَا ۚ بَلْ هُمْ فِى شَكٍّ مِّن ذِكْرِى ۖ بَل لَّمَّا يَذُوقُوا۟ عَذَابِ

Transliteration a-unzila ʿalayhi l-dhik'ru min bayninā bal hum fī shakkin min dhik'rī bal lammā yadhūqū ʿadhābi

Marathi ८. काय आम्ही सर्वांपैकी त्याच्यावरच (अल्लाहची) वहयी अवतरित केली गेली? वस्तुतः हे लोक माझ्या वहयी (प्रकाशना) बाबत संशयग्रस्त आहेत,१ किंबहुना (खरेतर) त्यांनी माझ्या शिक्षा यातनेची गोडी अद्याप चाखलीच नाही.

Verse 9

أَمْ عِندَهُمْ خَزَآئِنُ رَحْمَةِ رَبِّكَ ٱلْعَزِيزِ ٱلْوَهَّابِ

Transliteration am ʿindahum khazāinu raḥmati rabbika l-ʿazīzi l-wahābi

Marathi ९. काय त्यांच्याजवळ, तुमच्या वर्चस्वशाली, भरपूर प्रदान करणाऱ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजीने आहेत?

Verse 10

أَمْ لَهُم مُّلْكُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ۖ فَلْيَرْتَقُوا۟ فِى ٱلْأَسْبَـٰبِ

Transliteration am lahum mul'ku l-samāwāti wal-arḍi wamā baynahumā falyartaqū fī l-asbābi

Marathi १०. किंवा आकाश आणि धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या प्रत्येक गोष्टीचे राज्य त्यांचेच आहे, असे आहे तर दोऱ्या ताणून (आकाशात) चढून जावे.

Verse 11

جُندٌ مَّا هُنَالِكَ مَهْزُومٌ مِّنَ ٱلْأَحْزَابِ

Transliteration jundun mā hunālika mahzūmun mina l-aḥzābi

Marathi ११. हेदेखील (विशाल) सैन्यांपैकी पराभूत (लहानसे) सैन्य आहे.

Verse 12

كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَعَادٌ وَفِرْعَوْنُ ذُو ٱلْأَوْتَادِ

Transliteration kadhabat qablahum qawmu nūḥin waʿādun wafir'ʿawnu dhū l-awtādi

Marathi १२. त्यांच्या पूर्वीही नूहचा जनसमूह आणि आदचा जनसमूह आणि खिळे (मेखां) वाल्या फिरऔनने खोटे ठरविले होते.

Verse 13

وَثَمُودُ وَقَوْمُ لُوطٍ وَأَصْحَـٰبُ لْـَٔيْكَةِ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ ٱلْأَحْزَابُ

Transliteration wathamūdu waqawmu lūṭin wa-aṣḥābu al'aykati ulāika l-aḥzābu

Marathi १३. आणि समूद व लूत जनसमूहाने आणि वनात राहणाऱ्यांनीही, हीच विशाल सैन्ये होती.

Verse 14

إِن كُلٌّ إِلَّا كَذَّبَ ٱلرُّسُلَ فَحَقَّ عِقَابِ

Transliteration in kullun illā kadhaba l-rusula faḥaqqa ʿiqābi

Marathi १४. यांच्यापैकी एक देखील असा नव्हता, ज्याने पैगंबरांना खोटे ठरविले नसेल, तेव्हा माझा अज़ाब त्यांच्यावर लागू झाला.

Verse 15

وَمَا يَنظُرُ هَـٰٓؤُلَآءِ إِلَّا صَيْحَةً وَٰحِدَةً مَّا لَهَا مِن فَوَاقٍ

Transliteration wamā yanẓuru hāulāi illā ṣayḥatan wāḥidatan mā lahā min fawāqin

Marathi १५. आणि त्यांना केवळ एका तीव्र (भयंकर) चित्काराची प्रतीक्षा आहे, ज्यात कसलाही अडथळा (आणि विलंब) नाही.

Verse 16

وَقَالُوا۟ رَبَّنَا عَجِّل لَّنَا قِطَّنَا قَبْلَ يَوْمِ ٱلْحِسَابِ

Transliteration waqālū rabbanā ʿajjil lanā qiṭṭanā qabla yawmi l-ḥisābi

Marathi १६. आणि (ते) म्हणाले की हे आमच्या पालनकर्त्या! आमचा वाटा तू आम्हाला हिशोबाच्या दिवसापूर्वीच प्रदान कर.

Verse 17

ٱصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَٱذْكُرْ عَبْدَنَا دَاوُۥدَ ذَا ٱلْأَيْدِ ۖ إِنَّهُۥٓ أَوَّابٌ

Transliteration iṣ'bir ʿalā mā yaqūlūna wa-udh'kur ʿabdanā dāwūda dhā l-aydi innahu awwābun

Marathi १७. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर सहनशीलता राखा आणि आमचे दास दाऊदचे स्मरण करा जो मोठा शक्तिशाली होता, निःसंशय, तो (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा होता.

Verse 18

إِنَّا سَخَّرْنَا ٱلْجِبَالَ مَعَهُۥ يُسَبِّحْنَ بِٱلْعَشِىِّ وَٱلْإِشْرَاقِ

Transliteration innā sakharnā l-jibāla maʿahu yusabbiḥ'na bil-ʿashiyi wal-ish'rāqi

Marathi १८. आम्ही पर्वतांना त्यांच्या अधीन केले (ताब्यात दिले) होते की त्याच्यासोबत सकाळ संध्याकाळ अल्लाहच्या पवित्रतेचा जाप (तस्बीह) करावा.

Verse 19

وَٱلطَّيْرَ مَحْشُورَةً ۖ كُلٌّ لَّهُۥٓ أَوَّابٌ

Transliteration wal-ṭayra maḥshūratan kullun lahu awwābun

Marathi १९. आणि (उडणाऱ्या) पक्षांनाही एकत्र होऊन सर्वच्या सर्व त्याच्या अधीन होते.

Verse 20

وَشَدَدْنَا مُلْكَهُۥ وَءَاتَيْنَـٰهُ ٱلْحِكْمَةَ وَفَصْلَ ٱلْخِطَابِ

Transliteration washadadnā mul'kahu waātaynāhu l-ḥik'mata wafaṣla l-khiṭābi

Marathi २०. आम्ही त्याचे राज्य मजबूत केले होते आणि त्याला हिकमत (बुद्धिकौशल्य) प्रदान केले होते आणि गोष्टीचा फैसला (सुचविला होता.)

Verse 21

۞ وَهَلْ أَتَىٰكَ نَبَؤُا۟ ٱلْخَصْمِ إِذْ تَسَوَّرُوا۟ ٱلْمِحْرَابَ

Transliteration wahal atāka naba-u l-khaṣmi idh tasawwarū l-miḥ'rāba

Marathi २१. आणि काय तुम्हाला भांडण करणाऱ्यांची खबर पोहोचली, जेव्हा ते भिंत ओलांडून मेहराबमध्ये (उपासनेच्या ठिकाणी) आले.

Verse 22

إِذْ دَخَلُوا۟ عَلَىٰ دَاوُۥدَ فَفَزِعَ مِنْهُمْ ۖ قَالُوا۟ لَا تَخَفْ ۖ خَصْمَانِ بَغَىٰ بَعْضُنَا عَلَىٰ بَعْضٍ فَٱحْكُم بَيْنَنَا بِٱلْحَقِّ وَلَا تُشْطِطْ وَٱهْدِنَآ إِلَىٰ سَوَآءِ ٱلصِّرَٰطِ

Transliteration idh dakhalū ʿalā dāwūda fafaziʿa min'hum qālū lā takhaf khaṣmāni baghā baʿḍunā ʿalā baʿḍin fa-uḥ'kum baynanā bil-ḥaqi walā tush'ṭiṭ wa-ih'dinā ilā sawāi l-ṣirāṭi

Marathi २२. जेव्हा ते दाऊदजवळ पोहोचले, तेव्हा ते यांना पाहून घाबरले. ते म्हणाले, भिऊ नका, आमचा आपसातील तंटा आहे. आमच्यापैकी एकाने दुसऱ्यावर अत्याचार केला आहे, तेव्हा तुम्ही आमच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसला करावा आणि अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा.

Verse 23

إِنَّ هَـٰذَآ أَخِى لَهُۥ تِسْعٌ وَتِسْعُونَ نَعْجَةً وَلِىَ نَعْجَةٌ وَٰحِدَةٌ فَقَالَ أَكْفِلْنِيهَا وَعَزَّنِى فِى ٱلْخِطَابِ

Transliteration inna hādhā akhī lahu tis'ʿun watis'ʿūna naʿjatan waliya naʿjatun wāḥidatun faqāla akfil'nīhā waʿazzanī fī l-khiṭābi

Marathi २३. (ऐका!) हा माझा भाऊ आहे. याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत. आणि माझ्याजवळ एकच आहे. परंतु हा मला म्हणतो की तुझी ती एक देखील मला देऊन टाक आणि माझ्यावर बोलण्यात मोठा सक्त मामला (व्यवहार) करतो.

Verse 24

قَالَ لَقَدْ ظَلَمَكَ بِسُؤَالِ نَعْجَتِكَ إِلَىٰ نِعَاجِهِۦ ۖ وَإِنَّ كَثِيرًا مِّنَ ٱلْخُلَطَآءِ لَيَبْغِى بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ إِلَّا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ وَقَلِيلٌ مَّا هُمْ ۗ وَظَنَّ دَاوُۥدُ أَنَّمَا فَتَنَّـٰهُ فَٱسْتَغْفَرَ رَبَّهُۥ وَخَرَّ رَاكِعًا وَأَنَابَ ۩

Transliteration qāla laqad ẓalamaka bisuāli naʿjatika ilā niʿājihi wa-inna kathīran mina l-khulaṭāi layabghī baʿḍuhum ʿalā baʿḍin illā alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti waqalīlun mā hum waẓanna dāwūdu annamā fatannāhu fa-is'taghfara rabbahu wakharra rākiʿan wa-anāba

Marathi २४. (दाऊद) म्हणाले, त्याचे आपल्या मेंढ्यांसोबत तुझी एक मेंढी सामील करून घेण्याचा प्रश्न निश्चितच तुझ्यावर अत्याचार आहे. आणि अधिकांश भागीदार आणि सहभागी (असेच असतात की) एकमेकांवर जुलूम अत्याचार आणि अन्याय करतात, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले, तथापि असे लोक फारच कमी आहेत आणि दाऊद (अलै.) यांनी जाणुन घेतले की आम्ही त्यांची परीक्षा घेतली आहे, मग तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) जवळ तौबा (क्षमा याचना) करू लागले आणि मोठ्या विनम्रतेने खाली पडले (सजद्यात गेले) आणि (पूर्णपणे) रुजू झाले.

Verse 25

فَغَفَرْنَا لَهُۥ ذَٰلِكَ ۖ وَإِنَّ لَهُۥ عِندَنَا لَزُلْفَىٰ وَحُسْنَ مَـَٔابٍ

Transliteration faghafarnā lahu dhālika wa-inna lahu ʿindanā lazul'fā waḥus'na maābin

Marathi २५. तेव्हा आम्ही देखील त्यांची ही (चूक) माफ केली. निःसंशय, ते आमच्याजवळ मोठे उच्च स्थान राखणारे आणि सर्वांत चांगले ठिकाण बाळगणारे आहेत.

Verse 26

يَـٰدَاوُۥدُ إِنَّا جَعَلْنَـٰكَ خَلِيفَةً فِى ٱلْأَرْضِ فَٱحْكُم بَيْنَ ٱلنَّاسِ بِٱلْحَقِّ وَلَا تَتَّبِعِ ٱلْهَوَىٰ فَيُضِلَّكَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَضِلُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌۢ بِمَا نَسُوا۟ يَوْمَ ٱلْحِسَابِ

Transliteration yādāwūdu innā jaʿalnāka khalīfatan fī l-arḍi fa-uḥ'kum bayna l-nāsi bil-ḥaqi walā tattabiʿi l-hawā fayuḍillaka ʿan sabīli l-lahi inna alladhīna yaḍillūna ʿan sabīli l-lahi lahum ʿadhābun shadīdun bimā nasū yawma l-ḥisābi

Marathi २६. हे दाऊद! आम्ही तुम्हाला धरतीवर खलीफा बनविले, तेव्हा तुम्ही लोकांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका, अन्यथा ती तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटविल. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात, त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. अशासाठी की त्यांनी हिशोबाच्या दिवसाचा विसर पाडला आहे.

Verse 27

وَمَا خَلَقْنَا ٱلسَّمَآءَ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا بَـٰطِلًا ۚ ذَٰلِكَ ظَنُّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ ۚ فَوَيْلٌ لِّلَّذِينَ كَفَرُوا۟ مِنَ ٱلنَّارِ

Transliteration wamā khalaqnā l-samāa wal-arḍa wamā baynahumā bāṭilan dhālika ẓannu alladhīna kafarū fawaylun lilladhīna kafarū mina l-nāri

Marathi २७. आणि आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना (अस्तित्वांना) व्यर्थ (आणि अकारण) निर्माण नाही केले. ही शंका तर काफिर (इन्कारी) लोकांची आहे, तेव्हा काफिरांकरिता आगीचा विनाश आहे.

Verse 28

أَمْ نَجْعَلُ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ كَٱلْمُفْسِدِينَ فِى ٱلْأَرْضِ أَمْ نَجْعَلُ ٱلْمُتَّقِينَ كَٱلْفُجَّارِ

Transliteration am najʿalu alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti kal-muf'sidīna fī l-arḍi am najʿalu l-mutaqīna kal-fujāri

Marathi २८. काय आम्ही त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केली त्या लोकांसमान ठरवू जे (रोज) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित राहिले, किंवा नेक सदाचारी लोकांना दुराचाऱ्यांसारखं बनवू?

Verse 29

كِتَـٰبٌ أَنزَلْنَـٰهُ إِلَيْكَ مُبَـٰرَكٌ لِّيَدَّبَّرُوٓا۟ ءَايَـٰتِهِۦ وَلِيَتَذَكَّرَ أُو۟لُوا۟ ٱلْأَلْبَـٰبِ

Transliteration kitābun anzalnāhu ilayka mubārakun liyaddabbarū āyātihi waliyatadhakkara ulū l-albābi

Marathi २९. हा मोठा शुभग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्याकडे अशासाठी अवतरित केला आहे की लोकांनी याच्या आयतींवर विचार चिंतन करावे आणि बुद्धी राखणाऱ्यांनी यापासून बोध ग्रहण करावा.

Verse 30

وَوَهَبْنَا لِدَاوُۥدَ سُلَيْمَـٰنَ ۚ نِعْمَ ٱلْعَبْدُ ۖ إِنَّهُۥٓ أَوَّابٌ

Transliteration wawahabnā lidāwūda sulaymāna niʿ'ma l-ʿabdu innahu awwābun

Marathi ३०. आणि आम्ही दाऊदला सुलैमान (नावाचा पुत्र) प्रदान केला. जो मोठा उत्तम दास होता आणि (अल्लाहकडे) खूप रुजू करणारा होता.

Verse 31

إِذْ عُرِضَ عَلَيْهِ بِٱلْعَشِىِّ ٱلصَّـٰفِنَـٰتُ ٱلْجِيَادُ

Transliteration idh ʿuriḍa ʿalayhi bil-ʿashiyi l-ṣāfinātu l-jiyādu

Marathi ३१. जेव्हा त्यांच्यासमोर संध्याकाळी वेगात चालणारे खास घोडे सादर केले गेले.

Verse 32

فَقَالَ إِنِّىٓ أَحْبَبْتُ حُبَّ ٱلْخَيْرِ عَن ذِكْرِ رَبِّى حَتَّىٰ تَوَارَتْ بِٱلْحِجَابِ

Transliteration faqāla innī aḥbabtu ḥubba l-khayri ʿan dhik'ri rabbī ḥattā tawārat bil-ḥijābi

Marathi ३२. तेव्हा म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या स्मरणावर या घोड्याच्या प्रेमाला प्राधान्य दिले, येथेपर्यंत की सूर्य बुडाला.

Verse 33

رُدُّوهَا عَلَىَّ ۖ فَطَفِقَ مَسْحًۢا بِٱلسُّوقِ وَٱلْأَعْنَاقِ

Transliteration ruddūhā ʿalayya faṭafiqa masḥan bil-sūqi wal-aʿnāqi

Marathi ३३. या घोड्यांना पुन्हा माझ्यासमोर आणा, मग पोटऱ्यांवर आणि मानांवर हात फिरवू लागले.

Verse 34

وَلَقَدْ فَتَنَّا سُلَيْمَـٰنَ وَأَلْقَيْنَا عَلَىٰ كُرْسِيِّهِۦ جَسَدًا ثُمَّ أَنَابَ

Transliteration walaqad fatannā sulaymāna wa-alqaynā ʿalā kur'siyyihi jasadan thumma anāba

Marathi ३४. आणि आम्ही सुलेमानची कसोटी घेतली आणि त्यांच्या सिंहासनावर एक धड (मृत शरीर) टाकून दिले, मग ते ध्यानमग्न झाले.

Verse 35

قَالَ رَبِّ ٱغْفِرْ لِى وَهَبْ لِى مُلْكًا لَّا يَنۢبَغِى لِأَحَدٍ مِّنۢ بَعْدِىٓ ۖ إِنَّكَ أَنتَ ٱلْوَهَّابُ

Transliteration qāla rabbi igh'fir lī wahab lī mul'kan lā yanbaghī li-aḥadin min baʿdī innaka anta l-wahābu

Marathi ३५. म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या मला क्षमा कर आणि मला असे राज्य प्रदान कर, जे माझ्याखेरीज कोणत्याही (माणसास) पात्र नसावे. तू फार मोठा दाता आहेस.

Verse 36

فَسَخَّرْنَا لَهُ ٱلرِّيحَ تَجْرِى بِأَمْرِهِۦ رُخَآءً حَيْثُ أَصَابَ

Transliteration fasakharnā lahu l-rīḥa tajrī bi-amrihi rukhāan ḥaythu aṣāba

Marathi ३६. तेव्हा आम्ही हवेला त्यांच्या अधीन केले. ती त्यांच्या आदेशानं, जिकडे ते इच्छित, नरमीने पोहचवू देत असे.

Verse 37

وَٱلشَّيَـٰطِينَ كُلَّ بَنَّآءٍ وَغَوَّاصٍ

Transliteration wal-shayāṭīna kulla bannāin waghawwāṣin

Marathi ३७. आणि (शक्तिशाली) जिन्नांना देखील, त्यांच्या अधीन (ताबे) केले होते आणि प्रत्येक घर बनविणाऱ्याला आणि पाणबुड्याला.

Verse 38

وَءَاخَرِينَ مُقَرَّنِينَ فِى ٱلْأَصْفَادِ

Transliteration waākharīna muqarranīna fī l-aṣfādi

Marathi ३८. आणि इतर (जिन्नांना) देखील, जे शृंखलांनी जखडलेले राहत.

Verse 39

هَـٰذَا عَطَآؤُنَا فَٱمْنُنْ أَوْ أَمْسِكْ بِغَيْرِ حِسَابٍ

Transliteration hādhā ʿaṭāunā fa-um'nun aw amsik bighayri ḥisābin

Marathi ३९. हा आहे आमचा अनुग्रह, आता तुम्ही उपकार करा किंवा रोखून ठेवा, काही हिशोब नाही.

Verse 40

وَإِنَّ لَهُۥ عِندَنَا لَزُلْفَىٰ وَحُسْنَ مَـَٔابٍ

Transliteration wa-inna lahu ʿindanā lazul'fā waḥus'na maābin

Marathi ४०. आणि त्यांच्यासाठी आमच्याजवळ मोठी निकटता आहे, आणि फार चांगले ठिकाण आहैे.

Verse 41

وَٱذْكُرْ عَبْدَنَآ أَيُّوبَ إِذْ نَادَىٰ رَبَّهُۥٓ أَنِّى مَسَّنِىَ ٱلشَّيْطَـٰنُ بِنُصْبٍ وَعَذَابٍ

Transliteration wa-udh'kur ʿabdanā ayyūba idh nādā rabbahu annī massaniya l-shayṭānu binuṣ'bin waʿadhābin

Marathi ४१. आणि आमचे दास अय्यूबचीही चर्चा करा, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला सैतानाने दुःख - यातना पोहचविली आहे.

Verse 42

ٱرْكُضْ بِرِجْلِكَ ۖ هَـٰذَا مُغْتَسَلٌۢ بَارِدٌ وَشَرَابٌ

Transliteration ur'kuḍ birij'lika hādhā mugh'tasalun bāridun washarābun

Marathi ४२. आपला पाय जमिनीवर मारा. हे आंघोळीचे थंड आणि पिण्याचे पाणी आहे.

Verse 43

وَوَهَبْنَا لَهُۥٓ أَهْلَهُۥ وَمِثْلَهُم مَّعَهُمْ رَحْمَةً مِّنَّا وَذِكْرَىٰ لِأُو۟لِى ٱلْأَلْبَـٰبِ

Transliteration wawahabnā lahu ahlahu wamith'lahum maʿahum raḥmatan minnā wadhik'rā li-ulī l-albābi

Marathi ४३. आणि आम्ही त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब प्रदान केले, किंबहुना तेवढेच आणखीही त्यासोबत आपल्या खास कृपेने, आणि बुद्धिमानांकरिता बोधप्राप्तीसाठी.

Verse 44

وَخُذْ بِيَدِكَ ضِغْثًا فَٱضْرِب بِّهِۦ وَلَا تَحْنَثْ ۗ إِنَّا وَجَدْنَـٰهُ صَابِرًا ۚ نِّعْمَ ٱلْعَبْدُ ۖ إِنَّهُۥٓ أَوَّابٌ

Transliteration wakhudh biyadika ḍigh'than fa-iḍ'rib bihi walā taḥnath innā wajadnāhu ṣābiran niʿ'ma l-ʿabdu innahu awwābun

Marathi ४४. आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.१ खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा.

Verse 45

وَٱذْكُرْ عِبَـٰدَنَآ إِبْرَٰهِيمَ وَإِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ أُو۟لِى ٱلْأَيْدِى وَٱلْأَبْصَـٰرِ

Transliteration wa-udh'kur ʿibādanā ib'rāhīma wa-is'ḥāqa wayaʿqūba ulī l-aydī wal-abṣāri

Marathi ४५. आणि आमचे दास इब्राहीम, इसहाक आणि याकूब यांचीही (लोकांमध्ये) चर्चा करा जे हात आणि डोळे राखणारे होते.

Verse 46

إِنَّآ أَخْلَصْنَـٰهُم بِخَالِصَةٍ ذِكْرَى ٱلدَّارِ

Transliteration innā akhlaṣnāhum bikhāliṣatin dhik'rā l-dāri

Marathi ४६. आम्ही त्यांना एक विशेष गोष्ट अर्थात आखिरतच्या स्मरणासोबत खासरित्या संबंधित करून घेतले होते.

Verse 47

وَإِنَّهُمْ عِندَنَا لَمِنَ ٱلْمُصْطَفَيْنَ ٱلْأَخْيَارِ

Transliteration wa-innahum ʿindanā lamina l-muṣ'ṭafayna l-akhyāri

Marathi ४७. आणि हे सर्व आमच्याजवळ निवडक आणि सर्वाधिक चांगल्या लोकांपैकी होते.

Verse 48

وَٱذْكُرْ إِسْمَـٰعِيلَ وَٱلْيَسَعَ وَذَا ٱلْكِفْلِ ۖ وَكُلٌّ مِّنَ ٱلْأَخْيَارِ

Transliteration wa-udh'kur is'māʿīla wal-yasaʿa wadhā l-kif'li wakullun mina l-akhyāri

Marathi ४८. आणि इस्माईल, यसअ आणि जुलकिफ्ल यांचेही वर्णन करा. हे सर्व नेक लोक होते.

Verse 49

هَـٰذَا ذِكْرٌ ۚ وَإِنَّ لِلْمُتَّقِينَ لَحُسْنَ مَـَٔابٍ

Transliteration hādhā dhik'run wa-inna lil'muttaqīna laḥus'na maābin

Marathi ४९. हा उपदेश आहे आणि विश्वास करा की नेक सदाचारी लोकांसाठी सर्वांत उत्तम स्थान आहे.

Verse 50

جَنَّـٰتِ عَدْنٍ مُّفَتَّحَةً لَّهُمُ ٱلْأَبْوَٰبُ

Transliteration jannāti ʿadnin mufattaḥatan lahumu l-abwābu

Marathi ५०. अर्थात सदैव काळ राहणारी जन्नत, ज्यांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत.

Verse 51

مُتَّكِـِٔينَ فِيهَا يَدْعُونَ فِيهَا بِفَـٰكِهَةٍ كَثِيرَةٍ وَشَرَابٍ

Transliteration muttakiīna fīhā yadʿūna fīhā bifākihatin kathīratin washarābin

Marathi ५१. ज्यांच्यात ते (मोठ्या चैनीने) तक्के लावून बसले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे मेवे (फळे) आणि अनेक प्रकारची पेये मागत असतील.

Verse 52

۞ وَعِندَهُمْ قَـٰصِرَٰتُ ٱلطَّرْفِ أَتْرَابٌ

Transliteration waʿindahum qāṣirātu l-ṭarfi atrābun

Marathi ५२. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या समवयस्क हूर (पऱ्या) असतील.

Verse 53

هَـٰذَا مَا تُوعَدُونَ لِيَوْمِ ٱلْحِسَابِ

Transliteration hādhā mā tūʿadūna liyawmi l-ḥisābi

Marathi ५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता.

Verse 54

إِنَّ هَـٰذَا لَرِزْقُنَا مَا لَهُۥ مِن نَّفَادٍ

Transliteration inna hādhā lariz'qunā mā lahu min nafādin

Marathi ५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही.

Verse 55

هَـٰذَا ۚ وَإِنَّ لِلطَّـٰغِينَ لَشَرَّ مَـَٔابٍ

Transliteration hādhā wa-inna lilṭṭāghīna lasharra maābin

Marathi ५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे.

Verse 56

جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا فَبِئْسَ ٱلْمِهَادُ

Transliteration jahannama yaṣlawnahā fabi'sa l-mihādu

Marathi ५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे.

Verse 57

هَـٰذَا فَلْيَذُوقُوهُ حَمِيمٌ وَغَسَّاقٌ

Transliteration hādhā falyadhūqūhu ḥamīmun waghassāqun

Marathi ५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू.

Verse 58

وَءَاخَرُ مِن شَكْلِهِۦٓ أَزْوَٰجٌ

Transliteration waākharu min shaklihi azwājun

Marathi ५८. आणि काही इतर प्रकारच्या शिक्षा.

Verse 59

هَـٰذَا فَوْجٌ مُّقْتَحِمٌ مَّعَكُمْ ۖ لَا مَرْحَبًۢا بِهِمْ ۚ إِنَّهُمْ صَالُوا۟ ٱلنَّارِ

Transliteration hādhā fawjun muq'taḥimun maʿakum lā marḥaban bihim innahum ṣālū l-nāri

Marathi ५९. हा एक समुदाय आहे, जो तुमच्यासोबत (आगीत) जाणार आहे. त्यांच्यासाठी कसलीही स्वागत नाही. हेच जहन्नममध्ये जाणार आहेत.

Verse 60

قَالُوا۟ بَلْ أَنتُمْ لَا مَرْحَبًۢا بِكُمْ ۖ أَنتُمْ قَدَّمْتُمُوهُ لَنَا ۖ فَبِئْسَ ٱلْقَرَارُ

Transliteration qālū bal antum lā marḥaban bikum antum qaddamtumūhu lanā fabi'sa l-qarāru

Marathi ६०. (ते) म्हणतील की, किंबहुना तुम्हीच ते आहात ज्यांच्यासाठी कसलेही स्वागत नाही. तुम्हीच तर यास आधीपासूनच आमच्यासमोर आणून ठेवले होते. तेव्हा राहण्याचे मोठे वाईट स्थान आहे.

Verse 61

قَالُوا۟ رَبَّنَا مَن قَدَّمَ لَنَا هَـٰذَا فَزِدْهُ عَذَابًا ضِعْفًا فِى ٱلنَّارِ

Transliteration qālū rabbanā man qaddama lanā hādhā fazid'hu ʿadhāban ḍiʿ'fan fī l-nāri

Marathi ६१. (ते) म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! ज्याने ती (कुप्रची प्रथा) आमच्यासाठी सर्वांत प्रथम सुरू केली असेल, त्याच्यासाठी जहन्नमची शिक्षा दुप्पट कर.

Verse 62

وَقَالُوا۟ مَا لَنَا لَا نَرَىٰ رِجَالًا كُنَّا نَعُدُّهُم مِّنَ ٱلْأَشْرَارِ

Transliteration waqālū mā lanā lā narā rijālan kunnā naʿudduhum mina l-ashrāri

Marathi ६२. आणि (जहन्नमवासी) म्हणतील की, हे काय! आम्हाला ते लोक दिसून येत नाहीत, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो.

Verse 63

أَتَّخَذْنَـٰهُمْ سِخْرِيًّا أَمْ زَاغَتْ عَنْهُمُ ٱلْأَبْصَـٰرُ

Transliteration attakhadhnāhum sikh'riyyan am zāghat ʿanhumu l-abṣāru

Marathi ६३. काय आम्हीच त्यांना थट्टा-मस्करी बनवून ठेवले होते की आमचे डोळे त्यांच्यापासून बहकून गेले आहेत.

Verse 64

إِنَّ ذَٰلِكَ لَحَقٌّ تَخَاصُمُ أَهْلِ ٱلنَّارِ

Transliteration inna dhālika laḥaqqun takhāṣumu ahli l-nāri

Marathi ६४. निःसंशय, जहन्नमवाल्यांचे हे भांडण अवश्य होईल.

Verse 65

قُلْ إِنَّمَآ أَنَا۠ مُنذِرٌ ۖ وَمَا مِنْ إِلَـٰهٍ إِلَّا ٱللَّهُ ٱلْوَٰحِدُ ٱلْقَهَّارُ

Transliteration qul innamā anā mundhirun wamā min ilāhin illā l-lahu l-wāḥidu l-qahāru

Marathi ६५. सांगा की मी तर केवळ एक खबरदार करणारा आहे आणि एकमेव जबरदस्त अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही.

Verse 66

رَبُّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا ٱلْعَزِيزُ ٱلْغَفَّـٰرُ

Transliteration rabbu l-samāwāti wal-arḍi wamā baynahumā l-ʿazīzu l-ghafāru

Marathi ६६. जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे.

Verse 67

قُلْ هُوَ نَبَؤٌا۟ عَظِيمٌ

Transliteration qul huwa naba-on ʿaẓīmun

Marathi ६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे.

Verse 68

أَنتُمْ عَنْهُ مُعْرِضُونَ

Transliteration antum ʿanhu muʿ'riḍūna

Marathi ६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात.

Verse 69

مَا كَانَ لِىَ مِنْ عِلْمٍۭ بِٱلْمَلَإِ ٱلْأَعْلَىٰٓ إِذْ يَخْتَصِمُونَ

Transliteration mā kāna liya min ʿil'min bil-mala-i l-aʿlā idh yakhtaṣimūna

Marathi ६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते.

Verse 70

إِن يُوحَىٰٓ إِلَىَّ إِلَّآ أَنَّمَآ أَنَا۠ نَذِيرٌ مُّبِينٌ

Transliteration in yūḥā ilayya illā annamā anā nadhīrun mubīnun

Marathi ७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे.

Verse 71

إِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَـٰٓئِكَةِ إِنِّى خَـٰلِقٌۢ بَشَرًا مِّن طِينٍ

Transliteration idh qāla rabbuka lil'malāikati innī khāliqun basharan min ṭīnin

Marathi ७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे.

Verse 72

فَإِذَا سَوَّيْتُهُۥ وَنَفَخْتُ فِيهِ مِن رُّوحِى فَقَعُوا۟ لَهُۥ سَـٰجِدِينَ

Transliteration fa-idhā sawwaytuhu wanafakhtu fīhi min rūḥī faqaʿū lahu sājidīna

Marathi ७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका)

Verse 73

فَسَجَدَ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ كُلُّهُمْ أَجْمَعُونَ

Transliteration fasajada l-malāikatu kulluhum ajmaʿūna

Marathi ७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.

Verse 74

إِلَّآ إِبْلِيسَ ٱسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ ٱلْكَـٰفِرِينَ

Transliteration illā ib'līsa is'takbara wakāna mina l-kāfirīna

Marathi ७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता.

Verse 75

قَالَ يَـٰٓإِبْلِيسُ مَا مَنَعَكَ أَن تَسْجُدَ لِمَا خَلَقْتُ بِيَدَىَّ ۖ أَسْتَكْبَرْتَ أَمْ كُنتَ مِنَ ٱلْعَالِينَ

Transliteration qāla yāib'līsu mā manaʿaka an tasjuda limā khalaqtu biyadayya astakbarta am kunta mina l-ʿālīna

Marathi ७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस?

Verse 76

قَالَ أَنَا۠ خَيْرٌ مِّنْهُ ۖ خَلَقْتَنِى مِن نَّارٍ وَخَلَقْتَهُۥ مِن طِينٍ

Transliteration qāla anā khayrun min'hu khalaqtanī min nārin wakhalaqtahu min ṭīnin

Marathi ७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले.

Verse 77

قَالَ فَٱخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ

Transliteration qāla fa-ukh'ruj min'hā fa-innaka rajīmun

Marathi ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला.

Verse 78

وَإِنَّ عَلَيْكَ لَعْنَتِىٓ إِلَىٰ يَوْمِ ٱلدِّينِ

Transliteration wa-inna ʿalayka laʿnatī ilā yawmi l-dīni

Marathi ७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे.

Verse 79

قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِىٓ إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ

Transliteration qāla rabbi fa-anẓir'nī ilā yawmi yub'ʿathūna

Marathi ७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील.

Verse 80

قَالَ فَإِنَّكَ مِنَ ٱلْمُنظَرِينَ

Transliteration qāla fa-innaka mina l-munẓarīna

Marathi ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस.

Verse 81

إِلَىٰ يَوْمِ ٱلْوَقْتِ ٱلْمَعْلُومِ

Transliteration ilā yawmi l-waqti l-maʿlūmi

Marathi ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत .

Verse 82

قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ

Transliteration qāla fabiʿizzatika la-ugh'wiyannahum ajmaʿīna

Marathi ८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन.

Verse 83

إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ ٱلْمُخْلَصِينَ

Transliteration illā ʿibādaka min'humu l-mukh'laṣīna

Marathi ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील.

Verse 84

قَالَ فَٱلْحَقُّ وَٱلْحَقَّ أَقُولُ

Transliteration qāla fal-ḥaqu wal-ḥaqa aqūlu

Marathi ८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.

Verse 85

لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنكَ وَمِمَّن تَبِعَكَ مِنْهُمْ أَجْمَعِينَ

Transliteration la-amla-anna jahannama minka wamimman tabiʿaka min'hum ajmaʿīna

Marathi ८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन.

Verse 86

قُلْ مَآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلْمُتَكَلِّفِينَ

Transliteration qul mā asalukum ʿalayhi min ajrin wamā anā mina l-mutakalifīna

Marathi ८६. सांगा की मी याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही आणि आणि मी बनावट करणाऱ्यांपैकी नाही.

Verse 87

إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِّلْعَـٰلَمِينَ

Transliteration in huwa illā dhik'run lil'ʿālamīna

Marathi ८७. हा तर सर्व जगवाल्यांकरिता परिपूर्ण उपदेश आणि स्मरण आहे.

Verse 88

وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُۥ بَعْدَ حِينٍۭ

Transliteration walataʿlamunna naba-ahu baʿda ḥīnin

Marathi ८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल.

Read Surah Sad in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.