Surah Maryam in Marathi: translation and audio
Surah 19 · مريم · Mary · 98 verses
Surah Maryam verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Maryam word by word in English.
Verse 1
كٓهيعٓصٓ
Transliteration kaf-ha-ya-ain-sad
Marathi १. काफ. हा. या. एैन. श्वाद.
Verse 2
ذِكْرُ رَحْمَتِ رَبِّكَ عَبْدَهُۥ زَكَرِيَّآ
Transliteration dhik'ru raḥmati rabbika ʿabdahu zakariyyā
Marathi २. हा उल्लेख आहे तुमच्या पालनकर्त्याच्या त्या कृपेचा, जी त्याने आपले दास जकरियावर केली होती.
Verse 3
إِذْ نَادَىٰ رَبَّهُۥ نِدَآءً خَفِيًّا
Transliteration idh nādā rabbahu nidāan khafiyyan
Marathi ३. जेव्हा त्यांनी आपल्या पालनकर्त्याजवळ गुपचुप रित्या प्रार्थना केली
Verse 4
قَالَ رَبِّ إِنِّى وَهَنَ ٱلْعَظْمُ مِنِّى وَٱشْتَعَلَ ٱلرَّأْسُ شَيْبًا وَلَمْ أَكُنۢ بِدُعَآئِكَ رَبِّ شَقِيًّا
Transliteration qāla rabbi innī wahana l-ʿaẓmu minnī wa-ish'taʿala l-rasu shayban walam akun biduʿāika rabbi shaqiyyan
Marathi ४. म्हणाले हे माझ्या पालनकर्त्या माझी हाडे कमकुवत झाली आहेत आणि डोके म्हातारपणामुळे भडकले आहे, परंतु मी कधीही तुझ्याजवळ दुआ (प्रार्थना) करून वंचित राहिलो नाही.
Verse 5
وَإِنِّى خِفْتُ ٱلْمَوَٰلِىَ مِن وَرَآءِى وَكَانَتِ ٱمْرَأَتِى عَاقِرًا فَهَبْ لِى مِن لَّدُنكَ وَلِيًّا
Transliteration wa-innī khif'tu l-mawāliya min warāī wakānati im'ra-atī ʿāqiran fahab lī min ladunka waliyyan
Marathi ५. आणि मला आपल्या (मृत्यु) नंतर, आपल्या जवळच्या नातेवाईकांचे भय आहे. माझी पत्नी देखील वांझ आहे, पण तरीही तू मला आपल्यातर्फे वारस प्रदान कर.
Verse 6
يَرِثُنِى وَيَرِثُ مِنْ ءَالِ يَعْقُوبَ ۖ وَٱجْعَلْهُ رَبِّ رَضِيًّا
Transliteration yarithunī wayarithu min āli yaʿqūba wa-ij'ʿalhu rabbi raḍiyyan
Marathi ६. जो माझाही वारस असेल आणि याकूबच्या वंशाचाही वारस, आणि हे माझ्या पालनकर्त्या! तू त्याला आपला आवडता दास बनव.
Verse 7
يَـٰزَكَرِيَّآ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَـٰمٍ ٱسْمُهُۥ يَحْيَىٰ لَمْ نَجْعَل لَّهُۥ مِن قَبْلُ سَمِيًّا
Transliteration yāzakariyyā innā nubashiruka bighulāmin us'muhu yaḥyā lam najʿal lahu min qablu samiyyan
Marathi ७. हे जकरिया! आम्ही तुम्हाला एका पुत्रा (च्या प्राप्ती) ची खूशखबर देतो, ज्याचे नाव यहया आहे. आम्ही त्यांच्यापूर्वी या नावासारखे नाव कोणालाही दिले नाही.
Verse 8
قَالَ رَبِّ أَنَّىٰ يَكُونُ لِى غُلَـٰمٌ وَكَانَتِ ٱمْرَأَتِى عَاقِرًا وَقَدْ بَلَغْتُ مِنَ ٱلْكِبَرِ عِتِيًّا
Transliteration qāla rabbi annā yakūnu lī ghulāmun wakānati im'ra-atī ʿāqiran waqad balaghtu mina l-kibari ʿitiyyan
Marathi ८. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मला पुत्र कसा बरे होईल, माझी पत्नी वांझ आणि मी स्वतः म्हातारपणाच्या अतिशय कमकुवत अवस्थेस पोहोचलो आहे.
Verse 9
قَالَ كَذَٰلِكَ قَالَ رَبُّكَ هُوَ عَلَىَّ هَيِّنٌ وَقَدْ خَلَقْتُكَ مِن قَبْلُ وَلَمْ تَكُ شَيْـًٔا
Transliteration qāla kadhālika qāla rabbuka huwa ʿalayya hayyinun waqad khalaqtuka min qablu walam taku shayan
Marathi ९. आदेश झाला की (वायदा) अशाच प्रकारे पूर्ण झाला. तुमच्या पालनकर्त्याने फर्माविले आहे की माझ्याकरिता तर हे अगदी सोपे आहे आणि तुम्ही स्वतः जेव्हा काहीच नव्हता, मी तुम्हाला निर्माण केले आहे.
Verse 10
قَالَ رَبِّ ٱجْعَل لِّىٓ ءَايَةً ۚ قَالَ ءَايَتُكَ أَلَّا تُكَلِّمَ ٱلنَّاسَ ثَلَـٰثَ لَيَالٍ سَوِيًّا
Transliteration qāla rabbi ij'ʿal lī āyatan qāla āyatuka allā tukallima l-nāsa thalātha layālin sawiyyan
Marathi १०. (जकरिया) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! माझ्यासाठी एखादी निशाणी निर्धारीत कर, आदेश दिला की तुमच्यासाठी निशाणी ही की प्रकृती धडधाकट असतानाही तुम्ही तीन रात्री पर्यंत कोणत्याही माणसाशी बोलू शकणार नाहीत.
Verse 11
فَخَرَجَ عَلَىٰ قَوْمِهِۦ مِنَ ٱلْمِحْرَابِ فَأَوْحَىٰٓ إِلَيْهِمْ أَن سَبِّحُوا۟ بُكْرَةً وَعَشِيًّا
Transliteration fakharaja ʿalā qawmihi mina l-miḥ'rābi fa-awḥā ilayhim an sabbiḥū buk'ratan waʿashiyyan
Marathi ११. आता जकरिया आपल्या खोली (हुजऱ्या) च्या बाहेर येऊन आपल्या जनसमूहाजवळ येऊन त्यांना इशारा करतात की तुम्ही सकाळ-संध्याकाळ अल्लाहची पवित्रता वर्णन करा.
Verse 12
يَـٰيَحْيَىٰ خُذِ ٱلْكِتَـٰبَ بِقُوَّةٍ ۖ وَءَاتَيْنَـٰهُ ٱلْحُكْمَ صَبِيًّا
Transliteration yāyaḥyā khudhi l-kitāba biquwwatin waātaynāhu l-ḥuk'ma ṣabiyyan
Marathi १२. हे यहया! (माझ्या) ग्रंथावर आपली पकड मजबूत राखा आणि आम्ही यहयाला बालपणापासूनच ज्ञान प्रदान केले.
Verse 13
وَحَنَانًا مِّن لَّدُنَّا وَزَكَوٰةً ۖ وَكَانَ تَقِيًّا
Transliteration waḥanānan min ladunnā wazakatan wakāna taqiyyan
Marathi १३. आणि आपल्याकडून दया-कृपा आणि पवित्रता देखील, तो अल्लाहचे भय राखून वागणारा मनुष्य होता.
Verse 14
وَبَرًّۢا بِوَٰلِدَيْهِ وَلَمْ يَكُن جَبَّارًا عَصِيًّا
Transliteration wabarran biwālidayhi walam yakun jabbāran ʿaṣiyyan
Marathi १४. आणि आपल्या माता-पित्याशी नेक-सदाचारी होता, तो कठोर आणि गुन्हेगार नव्हता.
Verse 15
وَسَلَـٰمٌ عَلَيْهِ يَوْمَ وُلِدَ وَيَوْمَ يَمُوتُ وَيَوْمَ يُبْعَثُ حَيًّا
Transliteration wasalāmun ʿalayhi yawma wulida wayawma yamūtu wayawma yub'ʿathu ḥayyan
Marathi १५. त्याच्यावर सलामती आहे, ज्या दिवशी त्याने जन्म घेतला आणि ज्या दिवशी तो मरण पावेल, आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठविला जाईल.
Verse 16
وَٱذْكُرْ فِى ٱلْكِتَـٰبِ مَرْيَمَ إِذِ ٱنتَبَذَتْ مِنْ أَهْلِهَا مَكَانًا شَرْقِيًّا
Transliteration wa-udh'kur fī l-kitābi maryama idhi intabadhat min ahlihā makānan sharqiyyan
Marathi १६. या ग्रंथात मरियमच्या वृत्तांताचाही उल्लेख करा, जेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या लोकांपासून वेगळे होऊन पूर्वेकडे एकांतवास पत्करला.
Verse 17
فَٱتَّخَذَتْ مِن دُونِهِمْ حِجَابًا فَأَرْسَلْنَآ إِلَيْهَا رُوحَنَا فَتَمَثَّلَ لَهَا بَشَرًا سَوِيًّا
Transliteration fa-ittakhadhat min dūnihim ḥijāban fa-arsalnā ilayhā rūḥanā fatamathala lahā basharan sawiyyan
Marathi १७. आणि त्या लोकांपासून आड-पडदा केला, मग आम्ही तिच्याजवळ आपला आत्मा (जिब्रील अले.) पाठविला, तर तो तिच्यासमोर संपूर्ण मानव रूपात प्रकट झाला.
Verse 18
قَالَتْ إِنِّىٓ أَعُوذُ بِٱلرَّحْمَـٰنِ مِنكَ إِن كُنتَ تَقِيًّا
Transliteration qālat innī aʿūdhu bil-raḥmāni minka in kunta taqiyyan
Marathi १८. ती म्हणाली, मी तुझ्यापासून रहमान (दयावान अल्लाह) चे शरण मागते, जर तू थोडासाही अल्लाहचे भय राखणारा आहेस.
Verse 19
قَالَ إِنَّمَآ أَنَا۠ رَسُولُ رَبِّكِ لِأَهَبَ لَكِ غُلَـٰمًا زَكِيًّا
Transliteration qāla innamā anā rasūlu rabbiki li-ahaba laki ghulāman zakiyyan
Marathi १९. तो म्हणाला, मी अल्लाहतर्फे पाठविला गेलेला रसूल (प्रेषित) आहे, तुला एक पवित्र पुत्र देण्यासाठी आलो आहे.
Verse 20
قَالَتْ أَنَّىٰ يَكُونُ لِى غُلَـٰمٌ وَلَمْ يَمْسَسْنِى بَشَرٌ وَلَمْ أَكُ بَغِيًّا
Transliteration qālat annā yakūnu lī ghulāmun walam yamsasnī basharun walam aku baghiyyan
Marathi २०. ती म्हणाली, मला पुत्र कसा बरे होऊ शकतो? मला तर एखाद्या पुरुषाचा हात देखील लागला नाही, आणि ना मी दुराचारी आहे.
Verse 21
قَالَ كَذَٰلِكِ قَالَ رَبُّكِ هُوَ عَلَىَّ هَيِّنٌ ۖ وَلِنَجْعَلَهُۥٓ ءَايَةً لِّلنَّاسِ وَرَحْمَةً مِّنَّا ۚ وَكَانَ أَمْرًا مَّقْضِيًّا
Transliteration qāla kadhāliki qāla rabbuki huwa ʿalayya hayyinun walinajʿalahu āyatan lilnnāsi waraḥmatan minnā wakāna amran maqḍiyyan
Marathi २१. तो म्हणाला, फर्मान तर हेच आहे. (परंतु) तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की ते माझ्यासाठी फारच सोपे आहे. आम्ही तर त्याला लोकांसाठी एक निशाणी१ बनवू आणि आपली खास दया ही तर एक निश्चित अशी गोष्ट आहे.
Verse 22
۞ فَحَمَلَتْهُ فَٱنتَبَذَتْ بِهِۦ مَكَانًا قَصِيًّا
Transliteration faḥamalathu fa-intabadhat bihi makānan qaṣiyyan
Marathi २२. मग ती गर्भवती झाली आणि याच कारणास्तव ती एकाग्रचित्त होऊन एका दूरच्या ठिकाणी निघून गेली.
Verse 23
فَأَجَآءَهَا ٱلْمَخَاضُ إِلَىٰ جِذْعِ ٱلنَّخْلَةِ قَالَتْ يَـٰلَيْتَنِى مِتُّ قَبْلَ هَـٰذَا وَكُنتُ نَسْيًا مَّنسِيًّا
Transliteration fa-ajāahā l-makhāḍu ilā jidh'ʿi l-nakhlati qālat yālaytanī mittu qabla hādhā wakuntu nasyan mansiyyan
Marathi २३. मग प्रसव-पीडा तिला एका खजूरीच्या झाडाखाली घेऊन आली आणि तिच्या तोंडून निघाले, अरेरे! मी यापूर्वी मेली असती आणि लोकांना माझा अगदी विसर पडला असता.
Verse 24
فَنَادَىٰهَا مِن تَحْتِهَآ أَلَّا تَحْزَنِى قَدْ جَعَلَ رَبُّكِ تَحْتَكِ سَرِيًّا
Transliteration fanādāhā min taḥtihā allā taḥzanī qad jaʿala rabbuki taḥtaki sariyyan
Marathi २४. तेवढ्यात तिला उताराकडून हाक ऐकू आली की, निराश होऊ नकोस, तुझ्या पालनकर्त्याने तुझ्या पायाखाली एक झरा प्रवाहीत केला आहे.
Verse 25
وَهُزِّىٓ إِلَيْكِ بِجِذْعِ ٱلنَّخْلَةِ تُسَـٰقِطْ عَلَيْكِ رُطَبًا جَنِيًّا
Transliteration wahuzzī ilayki bijidh'ʿi l-nakhlati tusāqiṭ ʿalayki ruṭaban janiyyan
Marathi २५. आणि त्या खजुरीच्या झाडाच्या फांदीला आपल्याकडे हलव. ती तुझ्यासमोर ताज्या पिकलेल्या खजुरी पाडील.
Verse 26
فَكُلِى وَٱشْرَبِى وَقَرِّى عَيْنًا ۖ فَإِمَّا تَرَيِنَّ مِنَ ٱلْبَشَرِ أَحَدًا فَقُولِىٓ إِنِّى نَذَرْتُ لِلرَّحْمَـٰنِ صَوْمًا فَلَنْ أُكَلِّمَ ٱلْيَوْمَ إِنسِيًّا
Transliteration fakulī wa-ish'rabī waqarrī ʿaynan fa-immā tarayinna mina l-bashari aḥadan faqūlī innī nadhartu lilrraḥmāni ṣawman falan ukallima l-yawma insiyyan
Marathi २६. आता निर्धास्त होऊन खा आणि पी आणि डोळे थंड राख, जर तुला एखादा मनुष्य दिसला तर सांग की मी दयावान अल्लाहच्या नावाने रोजा (उपवास) ठेवला आहे. आज मी कोणत्याही माणसाशी बोलणार नाही.
Verse 27
فَأَتَتْ بِهِۦ قَوْمَهَا تَحْمِلُهُۥ ۖ قَالُوا۟ يَـٰمَرْيَمُ لَقَدْ جِئْتِ شَيْـًٔا فَرِيًّا
Transliteration fa-atat bihi qawmahā taḥmiluhu qālū yāmaryamu laqad ji'ti shayan fariyyan
Marathi २७. आता (हजरत ईसा) यांना घेऊन ती आपल्या लोकांमध्ये आली. सर्वजण म्हणाले, मरियम, तू मोठे वाईट कृत्य केलेस.
Verse 28
يَـٰٓأُخْتَ هَـٰرُونَ مَا كَانَ أَبُوكِ ٱمْرَأَ سَوْءٍ وَمَا كَانَتْ أُمُّكِ بَغِيًّا
Transliteration yāukh'ta hārūna mā kāna abūki im'ra-a sawin wamā kānat ummuki baghiyyan
Marathi २८. हे हारुनच्या बहिणी! ना तर तुझा पिता वाईट माणूस होता, आणि ना तुझी आई दुराचारी होती.
Verse 29
فَأَشَارَتْ إِلَيْهِ ۖ قَالُوا۟ كَيْفَ نُكَلِّمُ مَن كَانَ فِى ٱلْمَهْدِ صَبِيًّا
Transliteration fa-ashārat ilayhi qālū kayfa nukallimu man kāna fī l-mahdi ṣabiyyan
Marathi २९. (मरियमने) आपल्या बाळाकडे इशारा केला, सर्व म्हणू लागले, आता कुशीत असलेल्या बाळाशी आम्ही बोलणार तरी कसे.
Verse 30
قَالَ إِنِّى عَبْدُ ٱللَّهِ ءَاتَىٰنِىَ ٱلْكِتَـٰبَ وَجَعَلَنِى نَبِيًّا
Transliteration qāla innī ʿabdu l-lahi ātāniya l-kitāba wajaʿalanī nabiyyan
Marathi ३०. (बाळ) उद्गारले, मी सर्वश्रेष्ठ अल्लाहचा दास आहे. त्याने मला ग्रंथ प्रदान केला आहे आणि मला आपला पैगंबर (दूत) बनविले आहे.
Verse 31
وَجَعَلَنِى مُبَارَكًا أَيْنَ مَا كُنتُ وَأَوْصَـٰنِى بِٱلصَّلَوٰةِ وَٱلزَّكَوٰةِ مَا دُمْتُ حَيًّا
Transliteration wajaʿalanī mubārakan ayna mā kuntu wa-awṣānī bil-ṣalati wal-zakati mā dum'tu ḥayyan
Marathi ३१. आणि त्याने मला शुभ मंगलदायी बनविले आहे, जिथे देखील मी राहीन आणि जोपर्यंत मी जिवंत राहीन तोपर्यंत त्याने मला नमाज आणि जकातचा आदेश दिला आहे.
Verse 32
وَبَرًّۢا بِوَٰلِدَتِى وَلَمْ يَجْعَلْنِى جَبَّارًا شَقِيًّا
Transliteration wabarran biwālidatī walam yajʿalnī jabbāran shaqiyyan
Marathi ३२. आणि त्याने मला आपल्या मातेचा सेवक बनविले आहे आणि मला कठोर आणि दुर्दैवी केले नाही.
Verse 33
وَٱلسَّلَـٰمُ عَلَىَّ يَوْمَ وُلِدتُّ وَيَوْمَ أَمُوتُ وَيَوْمَ أُبْعَثُ حَيًّا
Transliteration wal-salāmu ʿalayya yawma wulidttu wayawma amūtu wayawma ub'ʿathu ḥayyan
Marathi ३३. आणि माझ्यावर माझ्या जन्माच्या दिवशी आणि माझ्या मृत्युच्या दिवशी आणि ज्या दिवशी मी दुसऱ्यांदा उभा केला जाईन, माझ्यावर शांती-सलामती आहे.
Verse 34
ذَٰلِكَ عِيسَى ٱبْنُ مَرْيَمَ ۚ قَوْلَ ٱلْحَقِّ ٱلَّذِى فِيهِ يَمْتَرُونَ
Transliteration dhālika ʿīsā ub'nu maryama qawla l-ḥaqi alladhī fīhi yamtarūna
Marathi ३४. ही आहे सच्ची कहाणी मरियमचा पुत्र ईसाची. हीच ती सत्य गोष्टहोय, ज्याबाबत लोक संशयात पडले आहेत.
Verse 35
مَا كَانَ لِلَّهِ أَن يَتَّخِذَ مِن وَلَدٍ ۖ سُبْحَـٰنَهُۥٓ ۚ إِذَا قَضَىٰٓ أَمْرًا فَإِنَّمَا يَقُولُ لَهُۥ كُن فَيَكُونُ
Transliteration mā kāna lillahi an yattakhidha min waladin sub'ḥānahu idhā qaḍā amran fa-innamā yaqūlu lahu kun fayakūnu
Marathi ३५. अल्लाहकरिता संतती असणे उचित नाही तो तर अतिशय पवित्र आहे तो जेव्हा एखाद्या कामाचा संकल्प करतो तेव्हा त्यासाठी म्हणतो होऊन जा आणि त्या क्षणी ते घडून येते.
Verse 36
وَإِنَّ ٱللَّهَ رَبِّى وَرَبُّكُمْ فَٱعْبُدُوهُ ۚ هَـٰذَا صِرَٰطٌ مُّسْتَقِيمٌ
Transliteration wa-inna l-laha rabbī warabbukum fa-uʿ'budūhu hādhā ṣirāṭun mus'taqīmun
Marathi ३६. आणि माझा आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा, हाच सरळ मार्ग आहे.
Verse 37
فَٱخْتَلَفَ ٱلْأَحْزَابُ مِنۢ بَيْنِهِمْ ۖ فَوَيْلٌ لِّلَّذِينَ كَفَرُوا۟ مِن مَّشْهَدِ يَوْمٍ عَظِيمٍ
Transliteration fa-ikh'talafa l-aḥzābu min baynihim fawaylun lilladhīna kafarū min mashhadi yawmin ʿaẓīmin
Marathi ३७. मग (हे) गट आपसात मतभेद करू लागले. तथापि काफिरांसाठी दुःख आहे एका भयंकर दिवसाच्या येण्याने.
Verse 38
أَسْمِعْ بِهِمْ وَأَبْصِرْ يَوْمَ يَأْتُونَنَا ۖ لَـٰكِنِ ٱلظَّـٰلِمُونَ ٱلْيَوْمَ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration asmiʿ bihim wa-abṣir yawma yatūnanā lākini l-ẓālimūna l-yawma fī ḍalālin mubīnin
Marathi ३८. किती चांगले पाहणारे ऐकणारे असतील त्या दिवशी, जेव्हा आमच्यासमोर हजर होतील, परंतु आज तर हे अत्याचारी लोक उघड अशा मार्गभ्रष्टतेत पडले आहेत.
Verse 39
وَأَنذِرْهُمْ يَوْمَ ٱلْحَسْرَةِ إِذْ قُضِىَ ٱلْأَمْرُ وَهُمْ فِى غَفْلَةٍ وَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration wa-andhir'hum yawma l-ḥasrati idh quḍiya l-amru wahum fī ghaflatin wahum lā yu'minūna
Marathi ३९. आणि तुम्ही त्यांना या दुःख आणि निराशेच्या दिवसाचे भय ऐकवा जेव्हा कार्य पूर्णत्वास पोहचविले जाईल आणि हे लोक गफलतीत आणि बेईमानीतच पडून राहतील.
Verse 40
إِنَّا نَحْنُ نَرِثُ ٱلْأَرْضَ وَمَنْ عَلَيْهَا وَإِلَيْنَا يُرْجَعُونَ
Transliteration innā naḥnu narithu l-arḍa waman ʿalayhā wa-ilaynā yur'jaʿūna
Marathi ४०. निःसंशय, धरतीचे आणि धरतीवर राहणाऱ्यांचे वारस आम्हीच असणार आणि समस्त लोक आमच्याचकडे परतवून आणले जातील.
Verse 41
وَٱذْكُرْ فِى ٱلْكِتَـٰبِ إِبْرَٰهِيمَ ۚ إِنَّهُۥ كَانَ صِدِّيقًا نَّبِيًّا
Transliteration wa-udh'kur fī l-kitābi ib'rāhīma innahu kāna ṣiddīqan nabiyyan
Marathi ४१. या ग्रंथात इब्राहीम (च्या वृत्तांता) चा उल्लेख करा. निःसंशय ते मोठे सच्चे पैगंबर (ईशदूत) होते.
Verse 42
إِذْ قَالَ لِأَبِيهِ يَـٰٓأَبَتِ لِمَ تَعْبُدُ مَا لَا يَسْمَعُ وَلَا يُبْصِرُ وَلَا يُغْنِى عَنكَ شَيْـًٔا
Transliteration idh qāla li-abīhi yāabati lima taʿbudu mā lā yasmaʿu walā yub'ṣiru walā yugh'nī ʿanka shayan
Marathi ४२. जेव्हा ते आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! तुम्ही अशांची उपासना का करीत आहात जे ना ऐकू शकतील, ना पाहू शकतील आणि ना तुम्हाला कसलाही लाभ पोहचवू शकतील.
Verse 43
يَـٰٓأَبَتِ إِنِّى قَدْ جَآءَنِى مِنَ ٱلْعِلْمِ مَا لَمْ يَأْتِكَ فَٱتَّبِعْنِىٓ أَهْدِكَ صِرَٰطًا سَوِيًّا
Transliteration yāabati innī qad jāanī mina l-ʿil'mi mā lam yatika fa-ittabiʿ'nī ahdika ṣirāṭan sawiyyan
Marathi ४३. हे (माझ्या प्रिय) पिता! (तुम्ही पाहा) माझ्याजवळ ते ज्ञान आले आहे जे तुमच्याजवळ आलेच नाही, तेव्हा तुम्ही माझेच म्हणणे मान्य करा मी अगदी सरळ मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करीन.
Verse 44
يَـٰٓأَبَتِ لَا تَعْبُدِ ٱلشَّيْطَـٰنَ ۖ إِنَّ ٱلشَّيْطَـٰنَ كَانَ لِلرَّحْمَـٰنِ عَصِيًّا
Transliteration yāabati lā taʿbudi l-shayṭāna inna l-shayṭāna kāna lilrraḥmāni ʿaṣiyyan
Marathi ४४. हे माझ्या पित्या! तुम्ही सैतानाची उपासना करण्यापासून थांबा सैतान तर दयाळू आणि कृपाळू अल्लाहची खूप अवज्ञा करणारा आहे.
Verse 45
يَـٰٓأَبَتِ إِنِّىٓ أَخَافُ أَن يَمَسَّكَ عَذَابٌ مِّنَ ٱلرَّحْمَـٰنِ فَتَكُونَ لِلشَّيْطَـٰنِ وَلِيًّا
Transliteration yāabati innī akhāfu an yamassaka ʿadhābun mina l-raḥmāni fatakūna lilshayṭāni waliyyan
Marathi ४५. हे पिता! मला भय वाटते की कदाचित तुमच्यावर अल्लाहची एखादी शिक्षा यातना न येऊन कोसळावी की (ज्यामुळे) तुम्ही सैतानाचे मित्र बनावे.
Verse 46
قَالَ أَرَاغِبٌ أَنتَ عَنْ ءَالِهَتِى يَـٰٓإِبْرَٰهِيمُ ۖ لَئِن لَّمْ تَنتَهِ لَأَرْجُمَنَّكَ ۖ وَٱهْجُرْنِى مَلِيًّا
Transliteration qāla arāghibun anta ʿan ālihatī yāib'rāhīmu la-in lam tantahi la-arjumannaka wa-uh'jur'nī maliyyan
Marathi ४६. (पित्याने) उत्तर दिले, हे इब्राहीम! काय तू आमच्या उपास्यांपासून तोंड फिरवित आहेस? (ऐक) जर तू असे करणे थांबविले नाही तर मी तुला दगडांनी (ठेचून) मारुन टाकीन, जा एका दीर्घ मुदतापर्यंत माझ्यापासून वेगळाच राहा.
Verse 47
قَالَ سَلَـٰمٌ عَلَيْكَ ۖ سَأَسْتَغْفِرُ لَكَ رَبِّىٓ ۖ إِنَّهُۥ كَانَ بِى حَفِيًّا
Transliteration qāla salāmun ʿalayka sa-astaghfiru laka rabbī innahu kāna bī ḥafiyyan
Marathi ४७. (इब्राहीम) म्हणाले, ठीक आहे. सलाम असो तुमच्यावर मी तर आपल्या पालनकर्त्याजवळ तुमच्यासाठी माफीची दुआ (प्रार्थना) करीत राहीन. तो माझ्यावर अतिशय जास्त मेहरबानी करीत आहे.
Verse 48
وَأَعْتَزِلُكُمْ وَمَا تَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ وَأَدْعُوا۟ رَبِّى عَسَىٰٓ أَلَّآ أَكُونَ بِدُعَآءِ رَبِّى شَقِيًّا
Transliteration wa-aʿtazilukum wamā tadʿūna min dūni l-lahi wa-adʿū rabbī ʿasā allā akūna biduʿāi rabbī shaqiyyan
Marathi ४८. आणि मी तर तुम्हालाही आणि ज्यांना ज्यांना तुम्ही अल्लाहशिवाय पुकारता त्यांना (सर्वांना) ही सोडत आहे. मी फक्त आपल्या पालनकर्त्याला पुकारित राहीन. मला पूर्ण विश्वास आहे की मी आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) करण्यात असफल राहणार नाही.
Verse 49
فَلَمَّا ٱعْتَزَلَهُمْ وَمَا يَعْبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ وَهَبْنَا لَهُۥٓ إِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ ۖ وَكُلًّا جَعَلْنَا نَبِيًّا
Transliteration falammā iʿ'tazalahum wamā yaʿbudūna min dūni l-lahi wahabnā lahu is'ḥāqa wayaʿqūba wakullan jaʿalnā nabiyyan
Marathi ४९. जेव्हा (इब्राहीम यांनी) त्या सर्वांचा आणि अल्लाहशिवाय त्यांच्या सर्व उपास्यांचा त्याग केला, तेव्हा आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला पैगंबर बनविले.
Verse 50
وَوَهَبْنَا لَهُم مِّن رَّحْمَتِنَا وَجَعَلْنَا لَهُمْ لِسَانَ صِدْقٍ عَلِيًّا
Transliteration wawahabnā lahum min raḥmatinā wajaʿalnā lahum lisāna ṣid'qin ʿaliyyan
Marathi ५०. आणि त्या सर्वांना आम्ही आपली भरपूर दया-कृपा प्रदान केली आणि आम्ही त्यांच्या सच्चा वायद्याला बुलंद दर्जा दिला.
Verse 51
وَٱذْكُرْ فِى ٱلْكِتَـٰبِ مُوسَىٰٓ ۚ إِنَّهُۥ كَانَ مُخْلَصًا وَكَانَ رَسُولًا نَّبِيًّا
Transliteration wa-udh'kur fī l-kitābi mūsā innahu kāna mukh'laṣan wakāna rasūlan nabiyyan
Marathi ५१. या ग्रंथात मूसाचाही उल्लेख करा, जो निवडलेला आणि रसूल आणि नबी (पैगंबर) होता.
Verse 52
وَنَـٰدَيْنَـٰهُ مِن جَانِبِ ٱلطُّورِ ٱلْأَيْمَنِ وَقَرَّبْنَـٰهُ نَجِيًّا
Transliteration wanādaynāhu min jānibi l-ṭūri l-aymani waqarrabnāhu najiyyan
Marathi ५२. आम्ही त्यांना (मूसाला) तूर पर्वताच्या उजव्या किनाऱ्याकडून पुकारले आणि कानगोष्टी करीत त्यांना जवळ केले.
Verse 53
وَوَهَبْنَا لَهُۥ مِن رَّحْمَتِنَآ أَخَاهُ هَـٰرُونَ نَبِيًّا
Transliteration wawahabnā lahu min raḥmatinā akhāhu hārūna nabiyyan
Marathi ५३. आणि आपल्या विशेष दया-कृपेने त्यांचा भाऊ हारुन यांनाही पैगंबर पद प्रदान केले.
Verse 54
وَٱذْكُرْ فِى ٱلْكِتَـٰبِ إِسْمَـٰعِيلَ ۚ إِنَّهُۥ كَانَ صَادِقَ ٱلْوَعْدِ وَكَانَ رَسُولًا نَّبِيًّا
Transliteration wa-udh'kur fī l-kitābi is'māʿīla innahu kāna ṣādiqa l-waʿdi wakāna rasūlan nabiyyan
Marathi ५४. आणि या ग्रंथात इस्माईल (च्या वृत्तांता) चाही उल्लेख करा. ते वायद्याचे मोठे पक्के होते आणि ते देखील रसूल आणि नबी होते.
Verse 55
وَكَانَ يَأْمُرُ أَهْلَهُۥ بِٱلصَّلَوٰةِ وَٱلزَّكَوٰةِ وَكَانَ عِندَ رَبِّهِۦ مَرْضِيًّا
Transliteration wakāna yamuru ahlahu bil-ṣalati wal-zakati wakāna ʿinda rabbihi marḍiyyan
Marathi ५५. आणि ते आपल्या कुटुंबियांना सतत नमाज आणि जकात (धर्मदाना) चा आदेश देत असत आणि ते आपल्या पालनकर्त्याच्या दरबारात प्रिय आणि पसंत केले गेलेले होते.
Verse 56
وَٱذْكُرْ فِى ٱلْكِتَـٰبِ إِدْرِيسَ ۚ إِنَّهُۥ كَانَ صِدِّيقًا نَّبِيًّا
Transliteration wa-udh'kur fī l-kitābi id'rīsa innahu kāna ṣiddīqan nabiyyan
Marathi ५६. आणि या ग्रंथात इदरीसचाही उल्लेख करा ते देखील एक सच्चे पैगंबर होते.
Verse 57
وَرَفَعْنَـٰهُ مَكَانًا عَلِيًّا
Transliteration warafaʿnāhu makānan ʿaliyyan
Marathi ५७. आम्ही त्यांना मोठे उच्च स्थान प्रदान केले.
Verse 58
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ أَنْعَمَ ٱللَّهُ عَلَيْهِم مِّنَ ٱلنَّبِيِّـۧنَ مِن ذُرِّيَّةِ ءَادَمَ وَمِمَّنْ حَمَلْنَا مَعَ نُوحٍ وَمِن ذُرِّيَّةِ إِبْرَٰهِيمَ وَإِسْرَٰٓءِيلَ وَمِمَّنْ هَدَيْنَا وَٱجْتَبَيْنَآ ۚ إِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُ ٱلرَّحْمَـٰنِ خَرُّوا۟ سُجَّدًا وَبُكِيًّا ۩
Transliteration ulāika alladhīna anʿama l-lahu ʿalayhim mina l-nabiyīna min dhurriyyati ādama wamimman ḥamalnā maʿa nūḥin wamin dhurriyyati ib'rāhīma wa-is'rāīla wamimman hadaynā wa-ij'tabaynā idhā tut'lā ʿalayhim āyātu l-raḥmāni kharrū sujjadan wabukiyyan
Marathi ५८. हेच ते पैगंबर होते, ज्यांच्यावर सर्वश्रेष्ठ अल्लाहने दया आणि कृपा केली, जे आदमच्या संततीपैकी आहेत आणि त्या लोकांचे वंशज आहेत, ज्यांना आम्ही नूह यांच्यासोबत नौकेत स्वार केले होते आणि इब्राहीम आणि याकूबच्या संततीपैकी आणि आमच्यातर्फे मार्गदर्शन लाभलेले आणि आमच्या प्रिय लोकांपैकी. यांच्यासमोर जेव्हा अतिशय दयावान अल्लाहच्या आयतींचे पठण केले जात असे, ते सजदा करीत आणि खूप रडत व गयावया करीत खाली पडत असत.
Verse 59
۞ فَخَلَفَ مِنۢ بَعْدِهِمْ خَلْفٌ أَضَاعُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَٱتَّبَعُوا۟ ٱلشَّهَوَٰتِ ۖ فَسَوْفَ يَلْقَوْنَ غَيًّا
Transliteration fakhalafa min baʿdihim khalfun aḍāʿū l-ṣalata wa-ittabaʿū l-shahawāti fasawfa yalqawna ghayyan
Marathi ५९. पुढे त्यांच्यानंतर असे कुपुत्र जन्मास आले की त्यांनी नमाज बरबाद केली आणि मनाच्या इच्छा-आकांक्षांच्या मागे लागले. यास्तव त्यांचे नुकसान त्यांच्यासमोर येईल.
Verse 60
إِلَّا مَن تَابَ وَءَامَنَ وَعَمِلَ صَـٰلِحًا فَأُو۟لَـٰٓئِكَ يَدْخُلُونَ ٱلْجَنَّةَ وَلَا يُظْلَمُونَ شَيْـًٔا
Transliteration illā man tāba waāmana waʿamila ṣāliḥan fa-ulāika yadkhulūna l-janata walā yuẓ'lamūna shayan
Marathi ६०. मात्र त्यांच्याखेरीज, जे माफी मागतील आणि ईमान राखतील आणि सत्कर्मे करतील असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या हक्कांना किंचितही नुकसान पोहचविले जाणार नाही.
Verse 61
جَنَّـٰتِ عَدْنٍ ٱلَّتِى وَعَدَ ٱلرَّحْمَـٰنُ عِبَادَهُۥ بِٱلْغَيْبِ ۚ إِنَّهُۥ كَانَ وَعْدُهُۥ مَأْتِيًّا
Transliteration jannāti ʿadnin allatī waʿada l-raḥmānu ʿibādahu bil-ghaybi innahu kāna waʿduhu matiyyan
Marathi ६१. नेहमी कायम राहणाऱ्या जन्नतींमध्ये ज्यांच्या अपरोक्ष वायदा दयावान अल्लाहने आपल्या दासांना दिला आहे. निःसंशय, त्याचा वायदा पूर्ण झाल्याविना राहणार नाही.
Verse 62
لَّا يَسْمَعُونَ فِيهَا لَغْوًا إِلَّا سَلَـٰمًا ۖ وَلَهُمْ رِزْقُهُمْ فِيهَا بُكْرَةً وَعَشِيًّا
Transliteration lā yasmaʿūna fīhā laghwan illā salāman walahum riz'quhum fīhā buk'ratan waʿashiyyan
Marathi ६२. त्यांना तिथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ऐकायला मिळणार नाही, ते फक्त सलामच, सलाम ऐकतील त्यांच्यासाठी सकाळ-संध्याकाळ त्यांची रोजी (अन्न-सामुग्री) असेल.१
Verse 63
تِلْكَ ٱلْجَنَّةُ ٱلَّتِى نُورِثُ مِنْ عِبَادِنَا مَن كَانَ تَقِيًّا
Transliteration til'ka l-janatu allatī nūrithu min ʿibādinā man kāna taqiyyan
Marathi ६३. ही आहे ती जन्नत जिचा वारस आम्ही आपल्या दासांपैकी अशांना बनवितो, जे अल्लाहचे भय बाळगतात.
Verse 64
وَمَا نَتَنَزَّلُ إِلَّا بِأَمْرِ رَبِّكَ ۖ لَهُۥ مَا بَيْنَ أَيْدِينَا وَمَا خَلْفَنَا وَمَا بَيْنَ ذَٰلِكَ ۚ وَمَا كَانَ رَبُّكَ نَسِيًّا
Transliteration wamā natanazzalu illā bi-amri rabbika lahu mā bayna aydīnā wamā khalfanā wamā bayna dhālika wamā kāna rabbuka nasiyyan
Marathi ६४. आम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या आदेशाविना उतरुच शकत नाही, आमच्या पुढे-मागे आणि त्या दरम्यानच्या समस्त वस्तू त्याच्याच अधिकारात आहेत आणि तुमचा पालनकर्ता विसरणारा नाही.
Verse 65
رَّبُّ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا فَٱعْبُدْهُ وَٱصْطَبِرْ لِعِبَـٰدَتِهِۦ ۚ هَلْ تَعْلَمُ لَهُۥ سَمِيًّا
Transliteration rabbu l-samāwāti wal-arḍi wamā baynahumā fa-uʿ'bud'hu wa-iṣ'ṭabir liʿibādatihi hal taʿlamu lahu samiyyan
Marathi ६५. आकाशांचा आणि जमिनीचा आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे त्या सर्वांचा तोच स्वामी आणि पानलहार आहे. तुम्ही त्याचीच उपासना करा आणि त्याच्या उपासनेवर दृढ-मजबूत व्हा. काय तुमच्या माहितीत त्याच्यासारखे नाव असलेला (आणि बरोबरीचा) आणखी कोणी आहे?
Verse 66
وَيَقُولُ ٱلْإِنسَـٰنُ أَءِذَا مَا مِتُّ لَسَوْفَ أُخْرَجُ حَيًّا
Transliteration wayaqūlu l-insānu a-idhā mā mittu lasawfa ukh'raju ḥayyan
Marathi ६६. आणि मनुष्य म्हणतो की जेव्हा मी मरण पावेल, तर काय पुन्हा जिवंत करून बाहेर काढला जाईन?
Verse 67
أَوَلَا يَذْكُرُ ٱلْإِنسَـٰنُ أَنَّا خَلَقْنَـٰهُ مِن قَبْلُ وَلَمْ يَكُ شَيْـًٔا
Transliteration awalā yadhkuru l-insānu annā khalaqnāhu min qablu walam yaku shayan
Marathi ६७. काय हा मनुष्य एवढेही स्मरणात राखत नाही की आम्ही त्याला याच्यापूर्वी निर्माण केले, वास्तविक तो काहीच नव्हता.
Verse 68
فَوَرَبِّكَ لَنَحْشُرَنَّهُمْ وَٱلشَّيَـٰطِينَ ثُمَّ لَنُحْضِرَنَّهُمْ حَوْلَ جَهَنَّمَ جِثِيًّا
Transliteration fawarabbika lanaḥshurannahum wal-shayāṭīna thumma lanuḥ'ḍirannahum ḥawla jahannama jithiyyan
Marathi ६८. तुमच्या पालनकर्त्याची शपथ! आम्ही त्यांना आणि सैतानांना एकत्रित करून निश्चितच जहन्नमच्या चोहीबाजूला गुडघे टेकलेल्या अवस्थेत हजर करू.
Verse 69
ثُمَّ لَنَنزِعَنَّ مِن كُلِّ شِيعَةٍ أَيُّهُمْ أَشَدُّ عَلَى ٱلرَّحْمَـٰنِ عِتِيًّا
Transliteration thumma lananziʿanna min kulli shīʿatin ayyuhum ashaddu ʿalā l-raḥmāni ʿitiyyan
Marathi ६९. मग आम्ही प्रत्येक समूहापासून त्यांना वेगळे काढून उभे करू, जे अतिशय दयावान अल्लाहपासून मोठी अकड दाखवित फिरत होते.
Verse 70
ثُمَّ لَنَحْنُ أَعْلَمُ بِٱلَّذِينَ هُمْ أَوْلَىٰ بِهَا صِلِيًّا
Transliteration thumma lanaḥnu aʿlamu bi-alladhīna hum awlā bihā ṣiliyyan
Marathi ७०. मग आम्ही त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो, जे जहन्नममध्ये दाखल होण्यास जास्त पात्र आहेत.
Verse 71
وَإِن مِّنكُمْ إِلَّا وَارِدُهَا ۚ كَانَ عَلَىٰ رَبِّكَ حَتْمًا مَّقْضِيًّا
Transliteration wa-in minkum illā wāriduhā kāna ʿalā rabbika ḥatman maqḍiyyan
Marathi ७१. आणि तुमच्यापैकी प्रत्येकजण तिथे निश्चित हजर होणार आहे. हा तुमच्या पालनकर्त्याचा अगदी अटळ फैसला आहे.
Verse 72
ثُمَّ نُنَجِّى ٱلَّذِينَ ٱتَّقَوا۟ وَّنَذَرُ ٱلظَّـٰلِمِينَ فِيهَا جِثِيًّا
Transliteration thumma nunajjī alladhīna ittaqaw wanadharu l-ẓālimīna fīhā jithiyyan
Marathi ७२. मग आम्ही, आमचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना वाचवून घेऊ आणि जुलूम अत्याचार करणाऱ्यांना त्यातच गुडघे टेकलेल्या अवस्थेत खाली पडलेले सोडू.१
Verse 73
وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِمْ ءَايَـٰتُنَا بَيِّنَـٰتٍ قَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ لِلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ أَىُّ ٱلْفَرِيقَيْنِ خَيْرٌ مَّقَامًا وَأَحْسَنُ نَدِيًّا
Transliteration wa-idhā tut'lā ʿalayhim āyātunā bayyinātin qāla alladhīna kafarū lilladhīna āmanū ayyu l-farīqayni khayrun maqāman wa-aḥsanu nadiyyan
Marathi ७३. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या साफ आणि स्पष्ट आयतींचे पठण केले जाते, तेव्हा काफिर लोक मुसलमानांना म्हणतात, (सांगा) आमच्या-तुमच्यात कोणाचा मान-मर्तबा मोठा आहे आणि कोणाची सभा शानदार आहे?
Verse 74
وَكَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّن قَرْنٍ هُمْ أَحْسَنُ أَثَـٰثًا وَرِءْيًا
Transliteration wakam ahlaknā qablahum min qarnin hum aḥsanu athāthan wari'yan
Marathi ७४. आणि आम्ही तर त्यांच्यापूर्वी अनेक जनसमूहांना नष्ट केले आहे जे साधनसामुग्री आणि नावलौकिकात यांच्याहून खूप मोठे होते.
Verse 75
قُلْ مَن كَانَ فِى ٱلضَّلَـٰلَةِ فَلْيَمْدُدْ لَهُ ٱلرَّحْمَـٰنُ مَدًّا ۚ حَتَّىٰٓ إِذَا رَأَوْا۟ مَا يُوعَدُونَ إِمَّا ٱلْعَذَابَ وَإِمَّا ٱلسَّاعَةَ فَسَيَعْلَمُونَ مَنْ هُوَ شَرٌّ مَّكَانًا وَأَضْعَفُ جُندًا
Transliteration qul man kāna fī l-ḍalālati falyamdud lahu l-raḥmānu maddan ḥattā idhā ra-aw mā yūʿadūna immā l-ʿadhāba wa-immā l-sāʿata fasayaʿlamūna man huwa sharrun makānan wa-aḍʿafu jundan
Marathi ७५. सांगा, जो मार्गभ्रष्टतेत असतो, दयावान अल्लाह त्याला खूप दीर्घ संधी देतो, येथपर्यंत की त्याने त्या गोष्टी पाहून घ्याव्यात, ज्यांच्याविषयी वायदे केले जात आहेत, अर्थात अल्लाहतर्फे शिक्षा-यातना किंवा कयामतला त्या वेळी त्यांना चांगल्या प्रकारे कळून येईल की कोण वाईट पदाचा आहे आणि कोणाचा जथा(समूह) कमकुवत आहे.
Verse 76
وَيَزِيدُ ٱللَّهُ ٱلَّذِينَ ٱهْتَدَوْا۟ هُدًى ۗ وَٱلْبَـٰقِيَـٰتُ ٱلصَّـٰلِحَـٰتُ خَيْرٌ عِندَ رَبِّكَ ثَوَابًا وَخَيْرٌ مَّرَدًّا
Transliteration wayazīdu l-lahu alladhīna ih'tadaw hudan wal-bāqiyātu l-ṣāliḥātu khayrun ʿinda rabbika thawāban wakhayrun maraddan
Marathi ७६. आणि मार्गदर्शन लाभलेल्या लोकांच्या मार्गदर्शनात अल्लाह आणखी भर टाकतो, आणि बाकी राहणारी नेकी (सत्कर्म) तुमच्या पालनकर्त्याजवळ मोबदल्याच्या दृष्टीने आणि परिणामाच्या दृष्टीने फारच चांगली आहे.
Verse 77
أَفَرَءَيْتَ ٱلَّذِى كَفَرَ بِـَٔايَـٰتِنَا وَقَالَ لَأُوتَيَنَّ مَالًا وَوَلَدًا
Transliteration afara-ayta alladhī kafara biāyātinā waqāla laūtayanna mālan wawaladan
Marathi ७७. काय तुम्ही त्यालाही पाहिले, ज्याने आमच्या आयतींशी कुप्र (इन्कार) केला आणि म्हणाला की मला तर धन आणि संतती अवश्य दिली जाईल.
Verse 78
أَطَّلَعَ ٱلْغَيْبَ أَمِ ٱتَّخَذَ عِندَ ٱلرَّحْمَـٰنِ عَهْدًا
Transliteration aṭṭalaʿa l-ghayba ami ittakhadha ʿinda l-raḥmāni ʿahdan
Marathi ७८. काय तो अपरोक्ष ज्ञान राखतो किंवा अल्लाहकडून त्याने एखादे वचन घेतले आहे?
Verse 79
كَلَّا ۚ سَنَكْتُبُ مَا يَقُولُ وَنَمُدُّ لَهُۥ مِنَ ٱلْعَذَابِ مَدًّا
Transliteration kallā sanaktubu mā yaqūlu wanamuddu lahu mina l-ʿadhābi maddan
Marathi ७९. मुळीच नाही हा जे काही बोलत आहे, ते आम्ही अवश्य लिहून घेऊ आणि त्यांच्यासाठी अज़ाब (शिक्षा-यातना) वाढवत जाऊ.
Verse 80
وَنَرِثُهُۥ مَا يَقُولُ وَيَأْتِينَا فَرْدًا
Transliteration wanarithuhu mā yaqūlu wayatīnā fardan
Marathi ८०. आणि हा ज्या वस्तूंबाबत बोलत आहे, त्या आम्ही त्याच्या पश्चात घेऊन टाकू आणि हा एकटाच आमच्या समोर हजर होईल.
Verse 81
وَٱتَّخَذُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ ءَالِهَةً لِّيَكُونُوا۟ لَهُمْ عِزًّا
Transliteration wa-ittakhadhū min dūni l-lahi ālihatan liyakūnū lahum ʿizzan
Marathi ८१. त्यांनी अल्लाहखेरीज इतर देवता (उपास्ये) बनवून ठेवली आहेत की ते त्यांच्यासाठी सन्मानाचे कारण ठरोत.
Verse 82
كَلَّا ۚ سَيَكْفُرُونَ بِعِبَادَتِهِمْ وَيَكُونُونَ عَلَيْهِمْ ضِدًّا
Transliteration kallā sayakfurūna biʿibādatihim wayakūnūna ʿalayhim ḍiddan
Marathi ८२. असे कदापि होणार नाही. ते तर यांच्या उपासनेचाच इन्कार करतील आणि उलट यांचे शत्रू बनतील.
Verse 83
أَلَمْ تَرَ أَنَّآ أَرْسَلْنَا ٱلشَّيَـٰطِينَ عَلَى ٱلْكَـٰفِرِينَ تَؤُزُّهُمْ أَزًّا
Transliteration alam tara annā arsalnā l-shayāṭīna ʿalā l-kāfirīna ta-uzzuhum azzan
Marathi ८३. काय तुम्ही नाही पाहिले की आम्ही काफिरांजवळ सैतानांना पाठवितो जे त्यांना खूप प्रेरित करतात.
Verse 84
فَلَا تَعْجَلْ عَلَيْهِمْ ۖ إِنَّمَا نَعُدُّ لَهُمْ عَدًّا
Transliteration falā taʿjal ʿalayhim innamā naʿuddu lahum ʿaddan
Marathi ८४. तुम्ही त्यांच्या बाबतीत घाई करू नका. आम्ही तर स्वतःच त्यांची कालगणना करीत आहोत.
Verse 85
يَوْمَ نَحْشُرُ ٱلْمُتَّقِينَ إِلَى ٱلرَّحْمَـٰنِ وَفْدًا
Transliteration yawma naḥshuru l-mutaqīna ilā l-raḥmāni wafdan
Marathi ८५. ज्या दिवशी आम्ही, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणाऱ्यांना, दयावान अल्लाहचा अतिथी बनवून एकत्र करू.
Verse 86
وَنَسُوقُ ٱلْمُجْرِمِينَ إِلَىٰ جَهَنَّمَ وِرْدًا
Transliteration wanasūqu l-muj'rimīna ilā jahannama wir'dan
Marathi ८६. आणि अपराधी लोकांना (अतिशय तहान लागलेल्या अवस्थेत) जहन्नमकडे हाकलत घेऊन जाऊ.
Verse 87
لَّا يَمْلِكُونَ ٱلشَّفَـٰعَةَ إِلَّا مَنِ ٱتَّخَذَ عِندَ ٱلرَّحْمَـٰنِ عَهْدًا
Transliteration lā yamlikūna l-shafāʿata illā mani ittakhadha ʿinda l-raḥmāni ʿahdan
Marathi ८७. कोणालाही शिफारस करण्याचा अधिकार नसेल, मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून एखादे वचन घेऊन ठेवले आहे.
Verse 88
وَقَالُوا۟ ٱتَّخَذَ ٱلرَّحْمَـٰنُ وَلَدًا
Transliteration waqālū ittakhadha l-raḥmānu waladan
Marathi ८८. आणि त्यांचे म्हणणे तर असे आहे की दयावान अल्लाहने देखील संतती करून ठेवली आहे.
Verse 89
لَّقَدْ جِئْتُمْ شَيْـًٔا إِدًّا
Transliteration laqad ji'tum shayan iddan
Marathi ८९. निःसंशय तुम्ही मोठी (वाईट आणि) भयंकर गोष्ट आणली आहे.
Verse 90
تَكَادُ ٱلسَّمَـٰوَٰتُ يَتَفَطَّرْنَ مِنْهُ وَتَنشَقُّ ٱلْأَرْضُ وَتَخِرُّ ٱلْجِبَالُ هَدًّا
Transliteration takādu l-samāwātu yatafaṭṭarna min'hu watanshaqqu l-arḍu watakhirru l-jibālu haddan
Marathi ९०. शक्य आहे की या कथनामुळे आकाश फाटून जाईल आणि धरती दुभंगून जाईल आणि पर्वताचे कण कण होतील.
Verse 91
أَن دَعَوْا۟ لِلرَّحْمَـٰنِ وَلَدًا
Transliteration an daʿaw lilrraḥmāni waladan
Marathi ९१. की ते रहमान (अल्लाह) ची संतती साबीत करण्यास बसले आहेत.
Verse 92
وَمَا يَنۢبَغِى لِلرَّحْمَـٰنِ أَن يَتَّخِذَ وَلَدًا
Transliteration wamā yanbaghī lilrraḥmāni an yattakhidha waladan
Marathi ९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने संतती राखावी.
Verse 93
إِن كُلُّ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ إِلَّآ ءَاتِى ٱلرَّحْمَـٰنِ عَبْدًا
Transliteration in kullu man fī l-samāwāti wal-arḍi illā ātī l-raḥmāni ʿabdan
Marathi ९३. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे, सर्व अल्लाहचे दास बनूनच येणार आहेत.
Verse 94
لَّقَدْ أَحْصَىٰهُمْ وَعَدَّهُمْ عَدًّا
Transliteration laqad aḥṣāhum waʿaddahum ʿaddan
Marathi ९४. त्या सर्वांना त्याने घेरून ठेवले आहे आणि सर्वांची पूर्णतः गणनाही करून ठेवली आहे.
Verse 95
وَكُلُّهُمْ ءَاتِيهِ يَوْمَ ٱلْقِيَـٰمَةِ فَرْدًا
Transliteration wakulluhum ātīhi yawma l-qiyāmati fardan
Marathi ९५. हे सर्वच्या सर्व कयामतच्या दिवशी एकटे त्याच्यासमोर हजर होणार आहेत.
Verse 96
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَعَمِلُوا۟ ٱلصَّـٰلِحَـٰتِ سَيَجْعَلُ لَهُمُ ٱلرَّحْمَـٰنُ وُدًّا
Transliteration inna alladhīna āmanū waʿamilū l-ṣāliḥāti sayajʿalu lahumu l-raḥmānu wuddan
Marathi ९६. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आहे आणि ज्यांनी सत्कर्मे केली आहेत, त्यांच्याकरिता दयावान अल्लाह प्रेम निर्माण करील.
Verse 97
فَإِنَّمَا يَسَّرْنَـٰهُ بِلِسَانِكَ لِتُبَشِّرَ بِهِ ٱلْمُتَّقِينَ وَتُنذِرَ بِهِۦ قَوْمًا لُّدًّا
Transliteration fa-innamā yassarnāhu bilisānika litubashira bihi l-mutaqīna watundhira bihi qawman luddan
Marathi ९७. आणि (कुरआनाला) तुमच्या भाषेत फार सोपे केले आहे की तुम्ही त्याच्याद्वारे नेक- सदाचारी लोकांना खूशखबर द्यावी आणि भांडखोर लोकांना खबरदार करावे.
Verse 98
وَكَمْ أَهْلَكْنَا قَبْلَهُم مِّن قَرْنٍ هَلْ تُحِسُّ مِنْهُم مِّنْ أَحَدٍ أَوْ تَسْمَعُ لَهُمْ رِكْزًۢا
Transliteration wakam ahlaknā qablahum min qarnin hal tuḥissu min'hum min aḥadin aw tasmaʿu lahum rik'zan
Marathi ९८. आणि आम्ही याच्यापूर्वी अनेक जमातींना नष्ट केले आहे, काय त्यांच्यापैकी कोणा एकाचाही चाहूल तुम्हाला ऐकू येते किंवा त्यांचा किंचित आवाजही तुमच्या कानी पडतो?
Read Surah Maryam in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.