MyDugsiStart learning

Surah An-Naml in Marathi: translation and audio

Surah 27 · النمل · The Ant · 93 verses

Surah An-Naml verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah An-Naml word by word in English.

Verse 1

طسٓ ۚ تِلْكَ ءَايَـٰتُ ٱلْقُرْءَانِ وَكِتَابٍ مُّبِينٍ

Transliteration tta-seen til'ka āyātu l-qur'āni wakitābin mubīnin

Marathi १. ता - सीन या आयती आहेत कुरआनच्या (अर्थात स्पष्ट) आणि दिव्य ग्रंथाच्या.

Verse 2

هُدًى وَبُشْرَىٰ لِلْمُؤْمِنِينَ

Transliteration hudan wabush'rā lil'mu'minīna

Marathi २. मार्गदर्शन आणि खूशखबर, ईमान राखणाऱ्यांकरिता.

Verse 3

ٱلَّذِينَ يُقِيمُونَ ٱلصَّلَوٰةَ وَيُؤْتُونَ ٱلزَّكَوٰةَ وَهُم بِٱلْـَٔاخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ

Transliteration alladhīna yuqīmūna l-ṣalata wayu'tūna l-zakata wahum bil-ākhirati hum yūqinūna

Marathi ३. जे नमाज कायम करतात आणि जकात अदा करतात आणि आखिरतवर ईमान राखतात.

Verse 4

إِنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ زَيَّنَّا لَهُمْ أَعْمَـٰلَهُمْ فَهُمْ يَعْمَهُونَ

Transliteration inna alladhīna lā yu'minūna bil-ākhirati zayyannā lahum aʿmālahum fahum yaʿmahūna

Marathi ४. जे लोक कयामतवर ईमान राखत नाही, आम्ही त्यांच्यासाठी त्यांची कर्मे सुशोभित करून दाखविली आहेत, यास्तव ते भटकत फिरतात.

Verse 5

أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ لَهُمْ سُوٓءُ ٱلْعَذَابِ وَهُمْ فِى ٱلْـَٔاخِرَةِ هُمُ ٱلْأَخْسَرُونَ

Transliteration ulāika alladhīna lahum sūu l-ʿadhābi wahum fī l-ākhirati humu l-akhsarūna

Marathi ५. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठी वाईट शिक्षा- यातना आहे, आणि आखिरतमध्येही ते मोठे नुकसान उचलणारे आहेत.

Verse 6

وَإِنَّكَ لَتُلَقَّى ٱلْقُرْءَانَ مِن لَّدُنْ حَكِيمٍ عَلِيمٍ

Transliteration wa-innaka latulaqqā l-qur'āna min ladun ḥakīmin ʿalīmin

Marathi ६. आणि निःसंशय तुम्हाला कुरआन शिकविला जात आहे, हिकमतशाली आणि सर्वकाही जाणणाऱ्या अल्लाहतर्फे.

Verse 7

إِذْ قَالَ مُوسَىٰ لِأَهْلِهِۦٓ إِنِّىٓ ءَانَسْتُ نَارًا سَـَٔاتِيكُم مِّنْهَا بِخَبَرٍ أَوْ ءَاتِيكُم بِشِهَابٍ قَبَسٍ لَّعَلَّكُمْ تَصْطَلُونَ

Transliteration idh qāla mūsā li-ahlihi innī ānastu nāran saātīkum min'hā bikhabarin aw ātīkum bishihābin qabasin laʿallakum taṣṭalūna

Marathi ७. जेव्हा मूसा आपल्या कुटुंबियांना म्हणाले, मी आग पाहिली आहे. मी तेथून एक तर काही बातमी घेऊन येईन किंवा आगीचा एखादा धगधगता विस्तव घेऊन लगेच तुमच्याजवळ येईन, यासाठी की तुम्ही शेकून घ्यावे.

Verse 8

فَلَمَّا جَآءَهَا نُودِىَ أَنۢ بُورِكَ مَن فِى ٱلنَّارِ وَمَنْ حَوْلَهَا وَسُبْحَـٰنَ ٱللَّهِ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration falammā jāahā nūdiya an būrika man fī l-nāri waman ḥawlahā wasub'ḥāna l-lahi rabbi l-ʿālamīna

Marathi ८. जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हाक दिली गेली की शुभ आहे तो, जो त्या आगीत आहे आणि शुभ आहे तो जो तिच्याजवळ पास आहे आणि मोठा पवित्र आहे अल्लाह, सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता.

Verse 9

يَـٰمُوسَىٰٓ إِنَّهُۥٓ أَنَا ٱللَّهُ ٱلْعَزِيزُ ٱلْحَكِيمُ

Transliteration yāmūsā innahu anā l-lahu l-ʿazīzu l-ḥakīmu

Marathi ९. मूसा (ऐका) खरी गोष्ट ही की मीच अल्लाह आहे जबरदस्त आणि हिकमत (बुद्धीकौशल्य) बाळगणारा.

Verse 10

وَأَلْقِ عَصَاكَ ۚ فَلَمَّا رَءَاهَا تَهْتَزُّ كَأَنَّهَا جَآنٌّ وَلَّىٰ مُدْبِرًا وَلَمْ يُعَقِّبْ ۚ يَـٰمُوسَىٰ لَا تَخَفْ إِنِّى لَا يَخَافُ لَدَىَّ ٱلْمُرْسَلُونَ

Transliteration wa-alqi ʿaṣāka falammā raāhā tahtazzu ka-annahā jānnun wallā mud'biran walam yuʿaqqib yāmūsā lā takhaf innī lā yakhāfu ladayya l-mur'salūna

Marathi १०. आणि तुम्ही आपली काठी खाली टाका. (हजरत मूसा यांनी) जेव्हा तिला हालचाल करताना पाहिले अशा प्रकारे की जणू साप आहे, तेव्हा तोंड फिरवून पाठ वळवून पळाले आणि मागे वळूनही पाहिले नाही. हे मूसा! भिऊ नका. माझ्यासमोर पैगंबर भित नसतात.

Verse 11

إِلَّا مَن ظَلَمَ ثُمَّ بَدَّلَ حُسْنًۢا بَعْدَ سُوٓءٍ فَإِنِّى غَفُورٌ رَّحِيمٌ

Transliteration illā man ẓalama thumma baddala ḥus'nan baʿda sūin fa-innī ghafūrun raḥīmun

Marathi ११. परंतु जे लोक अत्याचार करतील, मग त्यास नेकी (सत्कर्मा) ने बदलतील त्या दुराचारानंतर तर मी देखील माफ करणारा, दया करणारा आहे.

Verse 12

وَأَدْخِلْ يَدَكَ فِى جَيْبِكَ تَخْرُجْ بَيْضَآءَ مِنْ غَيْرِ سُوٓءٍ ۖ فِى تِسْعِ ءَايَـٰتٍ إِلَىٰ فِرْعَوْنَ وَقَوْمِهِۦٓ ۚ إِنَّهُمْ كَانُوا۟ قَوْمًا فَـٰسِقِينَ

Transliteration wa-adkhil yadaka fī jaybika takhruj bayḍāa min ghayri sūin fī tis'ʿi āyātin ilā fir'ʿawna waqawmihi innahum kānū qawman fāsiqīna

Marathi १२. आणि आपला हात आपल्या गळपट्टीत टाका तो शुभ्र (आणि तेजस्वी) होऊन निघेल, कसल्याही व्याधीविना. (तुम्ही) नऊ निशाण्या घेऊन फिरऔन आणि त्याच्या अनुयायींजवळ (जा) निःसंशय तो दुराचारी लोकांचा समूह आहे.

Verse 13

فَلَمَّا جَآءَتْهُمْ ءَايَـٰتُنَا مُبْصِرَةً قَالُوا۟ هَـٰذَا سِحْرٌ مُّبِينٌ

Transliteration falammā jāathum āyātunā mub'ṣiratan qālū hādhā siḥ'run mubīnun

Marathi १३. यास्तव, जेव्हा त्यांच्याजवळ डोळे उघडविणारे आमचे चमत्कार (मोजिजे) पोहोचले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे.

Verse 14

وَجَحَدُوا۟ بِهَا وَٱسْتَيْقَنَتْهَآ أَنفُسُهُمْ ظُلْمًا وَعُلُوًّا ۚ فَٱنظُرْ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلْمُفْسِدِينَ

Transliteration wajaḥadū bihā wa-is'tayqanathā anfusuhum ẓul'man waʿuluwwan fa-unẓur kayfa kāna ʿāqibatu l-muf'sidīna

Marathi १४. आणि त्यांनी इन्कार केला, वास्तिवक त्यांच्या मनात विश्वास बसला होता केवळ अत्याचार व घमेंडीमुळे (त्यांनी इन्कार केला) तर पाहा, त्या दुराचारी लोकांचा काय शेवट झाला!

Verse 15

وَلَقَدْ ءَاتَيْنَا دَاوُۥدَ وَسُلَيْمَـٰنَ عِلْمًا ۖ وَقَالَا ٱلْحَمْدُ لِلَّهِ ٱلَّذِى فَضَّلَنَا عَلَىٰ كَثِيرٍ مِّنْ عِبَادِهِ ٱلْمُؤْمِنِينَ

Transliteration walaqad ātaynā dāwūda wasulaymāna ʿil'man waqālā l-ḥamdu lillahi alladhī faḍḍalanā ʿalā kathīrin min ʿibādihi l-mu'minīna

Marathi १५. आणि निःसंशय, आम्ही दाऊद आणि सुलेमानला ज्ञान प्रदान केले होते आणि दोघे म्हणाले, सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आम्हाला आपल्या अनेक ईमानधारक दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे.

Verse 16

وَوَرِثَ سُلَيْمَـٰنُ دَاوُۥدَ ۖ وَقَالَ يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ عُلِّمْنَا مَنطِقَ ٱلطَّيْرِ وَأُوتِينَا مِن كُلِّ شَىْءٍ ۖ إِنَّ هَـٰذَا لَهُوَ ٱلْفَضْلُ ٱلْمُبِينُ

Transliteration wawaritha sulaymānu dāwūda waqāla yāayyuhā l-nāsu ʿullim'nā manṭiqa l-ṭayri waūtīnā min kulli shayin inna hādhā lahuwa l-faḍlu l-mubīnu

Marathi १६. आणि दाऊदचे वारस सुलेमान झाले आणि म्हणाले, लोकांनो! आम्हाला पक्ष्यांची बोली (भाषा) शिकिवली गेली आहे. आणि आम्हाला सर्व काही दिले गेले आहेे. निःसंशय हा (अल्लाहचा) मोठा उघड उपकार आहे.

Verse 17

وَحُشِرَ لِسُلَيْمَـٰنَ جُنُودُهُۥ مِنَ ٱلْجِنِّ وَٱلْإِنسِ وَٱلطَّيْرِ فَهُمْ يُوزَعُونَ

Transliteration waḥushira lisulaymāna junūduhu mina l-jini wal-insi wal-ṭayri fahum yūzaʿūna

Marathi १७. आणि सुलेमानच्या समोर त्यांचे सर्व सैन्य जिन्न आणि मनुष्य आणि पक्षी जमा केले गेले (प्रत्येक प्रकाराला) वेगवेगळे उभे केले गेले.

Verse 18

حَتَّىٰٓ إِذَآ أَتَوْا۟ عَلَىٰ وَادِ ٱلنَّمْلِ قَالَتْ نَمْلَةٌ يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّمْلُ ٱدْخُلُوا۟ مَسَـٰكِنَكُمْ لَا يَحْطِمَنَّكُمْ سُلَيْمَـٰنُ وَجُنُودُهُۥ وَهُمْ لَا يَشْعُرُونَ

Transliteration ḥattā idhā ataw ʿalā wādi l-namli qālat namlatun yāayyuhā l-namlu ud'khulū masākinakum lā yaḥṭimannakum sulaymānu wajunūduhu wahum lā yashʿurūna

Marathi १८. जेव्हा ते मुंग्यांच्या मैदानात पोहोचले, तेव्हा एक मुंगी म्हणाली, हे मुंग्यानो! आपापल्या बिळात पटकन घुसा (असे न व्हावे की) असावधानीमुळे सुलेमान आणि त्यांच्या सैन्याने तुम्हाला पायाखाली तुडवावे.

Verse 19

فَتَبَسَّمَ ضَاحِكًا مِّن قَوْلِهَا وَقَالَ رَبِّ أَوْزِعْنِىٓ أَنْ أَشْكُرَ نِعْمَتَكَ ٱلَّتِىٓ أَنْعَمْتَ عَلَىَّ وَعَلَىٰ وَٰلِدَىَّ وَأَنْ أَعْمَلَ صَـٰلِحًا تَرْضَىٰهُ وَأَدْخِلْنِى بِرَحْمَتِكَ فِى عِبَادِكَ ٱلصَّـٰلِحِينَ

Transliteration fatabassama ḍāḥikan min qawlihā waqāla rabbi awziʿ'nī an ashkura niʿ'mataka allatī anʿamta ʿalayya waʿalā wālidayya wa-an aʿmala ṣāliḥan tarḍāhu wa-adkhil'nī biraḥmatika fī ʿibādika l-ṣāliḥīna

Marathi १९. तिच्या या बोलण्यावर (हजरत सुलेमान) यांनी स्मितहास्य केले आणि दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! तू मला तौफिक (सुबुद्धी) प्रदान कर की मी तुझ्या या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, ज्या तू माझ्यावर केल्या आहेत आणि माझ्या माता-पित्यांवर आणि मी अशी सत्कर्मे करीत राहावे, ज्यामुळे तू प्रसन्न राहावे आणि मला आपल्या दया- कृपेने आपल्या नेक- सदाचारी दासांमध्ये सामील कर.

Verse 20

وَتَفَقَّدَ ٱلطَّيْرَ فَقَالَ مَا لِىَ لَآ أَرَى ٱلْهُدْهُدَ أَمْ كَانَ مِنَ ٱلْغَآئِبِينَ

Transliteration watafaqqada l-ṭayra faqāla mā liya lā arā l-hud'huda am kāna mina l-ghāibīna

Marathi २०. आणि त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण केले व म्हणाले, काय गोष्ट आहे की मला हुद हुद दिसून येत नाही? काय खरोखर तो हजर नाही?

Verse 21

لَأُعَذِّبَنَّهُۥ عَذَابًا شَدِيدًا أَوْ لَأَا۟ذْبَحَنَّهُۥٓ أَوْ لَيَأْتِيَنِّى بِسُلْطَـٰنٍ مُّبِينٍ

Transliteration la-uʿadhibannahu ʿadhāban shadīdan aw laādh'baḥannahu aw layatiyannī bisul'ṭānin mubīnin

Marathi २१. निःसंशय मी त्याला कठोर दंड देईन किंवा त्याला कापून टाकीन किंवा त्याने माझ्यासमोर योग्य कारण सादर करावे.

Verse 22

فَمَكَثَ غَيْرَ بَعِيدٍ فَقَالَ أَحَطتُ بِمَا لَمْ تُحِطْ بِهِۦ وَجِئْتُكَ مِن سَبَإٍۭ بِنَبَإٍ يَقِينٍ

Transliteration famakatha ghayra baʿīdin faqāla aḥaṭtu bimā lam tuḥiṭ bihi waji'tuka min saba-in binaba-in yaqīnin

Marathi २२. काही जास्त वेळ झाला नव्हता, तेवढ्यात तो (येऊन) म्हणाला, मी अशा गोष्टीची खबर आणली आहे की ज्याविषयी तुम्ही जाणतच नाही. मी ‘सबा’ची अगदी विश्वसनीय बातमी घेऊन तुमच्याजवळ आलो आहे.

Verse 23

إِنِّى وَجَدتُّ ٱمْرَأَةً تَمْلِكُهُمْ وَأُوتِيَتْ مِن كُلِّ شَىْءٍ وَلَهَا عَرْشٌ عَظِيمٌ

Transliteration innī wajadttu im'ra-atan tamlikuhum waūtiyat min kulli shayin walahā ʿarshun ʿaẓīmun

Marathi २३. मी पाहिले की एक स्त्री त्यांच्यावर राज्य करीत आहे, जिला सर्व प्रकारच्या वस्तूंपैकी काही न काही प्रदान केले गेले आहे आणि तिचे सिंहासन देखील मोठे भव्य आहे.

Verse 24

وَجَدتُّهَا وَقَوْمَهَا يَسْجُدُونَ لِلشَّمْسِ مِن دُونِ ٱللَّهِ وَزَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيْطَـٰنُ أَعْمَـٰلَهُمْ فَصَدَّهُمْ عَنِ ٱلسَّبِيلِ فَهُمْ لَا يَهْتَدُونَ

Transliteration wajadttuhā waqawmahā yasjudūna lilshamsi min dūni l-lahi wazayyana lahumu l-shayṭānu aʿmālahum faṣaddahum ʿani l-sabīli fahum lā yahtadūna

Marathi २४. मी तिला आणि तिच्या जनसमूहाच्या लोकांना अल्लाहऐवजी सूर्याला सजदा करताना पाहिले. सैतानाने त्याची कर्मे त्यांना भले चांगले असल्याचे दाखवून सत्य मार्गापासून त्यांना रोखले आहे, यास्तव त्यांना सन्मार्ग प्राप्त होत नाही.

Verse 25

أَلَّا يَسْجُدُوا۟ لِلَّهِ ٱلَّذِى يُخْرِجُ ٱلْخَبْءَ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُخْفُونَ وَمَا تُعْلِنُونَ

Transliteration allā yasjudū lillahi alladhī yukh'riju l-khaba-a fī l-samāwāti wal-arḍi wayaʿlamu mā tukh'fūna wamā tuʿ'linūna

Marathi २५. की केवळ त्याच अल्लाहला सजदा करावा, जो आकाशांच्या आणि धरतीच्या लपलेल्या वस्तूंना बाहेर काढतो, आणि जे काही तुम्ही लपवून ठेवता आणि जाहीर करता तो ते सर्व काही जाणतो.

Verse 26

ٱللَّهُ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ رَبُّ ٱلْعَرْشِ ٱلْعَظِيمِ ۩

Transliteration al-lahu lā ilāha illā huwa rabbu l-ʿarshi l-ʿaẓīmi

Marathi २६. (अर्थात) अल्लाह! त्याच्याखेरीज कोणीही उपासनीय नाही. तोच महान अर्श (ईश-सिंहासनां) चा स्वामी आहे.

Verse 27

۞ قَالَ سَنَنظُرُ أَصَدَقْتَ أَمْ كُنتَ مِنَ ٱلْكَـٰذِبِينَ

Transliteration qāla sananẓuru aṣadaqta am kunta mina l-kādhibīna

Marathi २७. (सुलेमान) म्हणाले, आता आम्ही पाहतो की तू खरे बोललास की तू खोटा आहे.

Verse 28

ٱذْهَب بِّكِتَـٰبِى هَـٰذَا فَأَلْقِهْ إِلَيْهِمْ ثُمَّ تَوَلَّ عَنْهُمْ فَٱنظُرْ مَاذَا يَرْجِعُونَ

Transliteration idh'hab bikitābī hādhā fa-alqih ilayhim thumma tawalla ʿanhum fa-unẓur mādhā yarjiʿūna

Marathi २८. माझे हे पत्र नेऊन त्यांना दे, मग त्यांच्यापासून दूर होऊन पाहा की ते काय उत्तर देतात.

Verse 29

قَالَتْ يَـٰٓأَيُّهَا ٱلْمَلَؤُا۟ إِنِّىٓ أُلْقِىَ إِلَىَّ كِتَـٰبٌ كَرِيمٌ

Transliteration qālat yāayyuhā l-mala-u innī ul'qiya ilayya kitābun karīmun

Marathi २९. ती म्हणाली, हे सरदारांनो! माझ्याजवळ एक महत्त्वपूर्ण पत्र टाकले गेले आहे.

Verse 30

إِنَّهُۥ مِن سُلَيْمَـٰنَ وَإِنَّهُۥ بِسْمِ ٱللَّهِ ٱلرَّحْمَـٰنِ ٱلرَّحِيمِ

Transliteration innahu min sulaymāna wa-innahu bis'mi l-lahi l-raḥmāni l-raḥīmi

Marathi ३०. जे सुलेमानतर्फे आहे आणि ज्याचा आरंभ अतिशय दयावान, मोठ्या मेहरबान अल्लाहच्या नावाने आहे.

Verse 31

أَلَّا تَعْلُوا۟ عَلَىَّ وَأْتُونِى مُسْلِمِينَ

Transliteration allā taʿlū ʿalayya watūnī mus'limīna

Marathi ३१. हे की तुम्ही माझ्यासमोर विद्रोह करू नका आणि मुस्लिम होऊन माझ्याजवळ या.

Verse 32

قَالَتْ يَـٰٓأَيُّهَا ٱلْمَلَؤُا۟ أَفْتُونِى فِىٓ أَمْرِى مَا كُنتُ قَاطِعَةً أَمْرًا حَتَّىٰ تَشْهَدُونِ

Transliteration qālat yāayyuhā l-mala-u aftūnī fī amrī mā kuntu qāṭiʿatan amran ḥattā tashhadūni

Marathi ३२. ती (राणी) म्हणाली, हे माझ्या दरबारी लोकांनो! तुम्ही माझ्या या समस्येबाबत मला सल्ला द्या. मी कोणत्याही गोष्टीचा अंतिम फैसला, जोपर्यंत तुमची उपिस्थती आणि मत नसेल, करत नसते.

Verse 33

قَالُوا۟ نَحْنُ أُو۟لُوا۟ قُوَّةٍ وَأُو۟لُوا۟ بَأْسٍ شَدِيدٍ وَٱلْأَمْرُ إِلَيْكِ فَٱنظُرِى مَاذَا تَأْمُرِينَ

Transliteration qālū naḥnu ulū quwwatin wa-ulū basin shadīdin wal-amru ilayki fa-unẓurī mādhā tamurīna

Marathi ३३. त्या सर्वांनी उत्तर दिले, आम्ही मोठे मजबूत आणि शक्तिशाली आणि खूप लढवय्ये आहोत. आता यापुढे तुमचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्ही आम्हाला कोणता आदेश देता.

Verse 34

قَالَتْ إِنَّ ٱلْمُلُوكَ إِذَا دَخَلُوا۟ قَرْيَةً أَفْسَدُوهَا وَجَعَلُوٓا۟ أَعِزَّةَ أَهْلِهَآ أَذِلَّةً ۖ وَكَذَٰلِكَ يَفْعَلُونَ

Transliteration qālat inna l-mulūka idhā dakhalū qaryatan afsadūhā wajaʿalū aʿizzata ahlihā adhillatan wakadhālika yafʿalūna

Marathi ३४. ती (राणी) म्हणाली, बादशाह (राजे-महाराजे) जेव्हा एखाद्या वस्तीत प्रवेश करतात, तेव्हा तिला ओसाड करून टाकतात आणि तिथल्या प्रतिष्ठित लोकांना अपमानित करतात तेव्हा लोक देखील असेच करतील.

Verse 35

وَإِنِّى مُرْسِلَةٌ إِلَيْهِم بِهَدِيَّةٍ فَنَاظِرَةٌۢ بِمَ يَرْجِعُ ٱلْمُرْسَلُونَ

Transliteration wa-innī mur'silatun ilayhim bihadiyyatin fanāẓiratun bima yarjiʿu l-mur'salūna

Marathi ३५. आणि मी त्यांना एक नजराणा पाठविणार आहे, मग पाहते की दूत काय उत्तर घेऊन परत येतात.

Verse 36

فَلَمَّا جَآءَ سُلَيْمَـٰنَ قَالَ أَتُمِدُّونَنِ بِمَالٍ فَمَآ ءَاتَىٰنِۦَ ٱللَّهُ خَيْرٌ مِّمَّآ ءَاتَىٰكُم بَلْ أَنتُم بِهَدِيَّتِكُمْ تَفْرَحُونَ

Transliteration falammā jāa sulaymāna qāla atumiddūnani bimālin famā ātāniya l-lahu khayrun mimmā ātākum bal antum bihadiyyatikum tafraḥūna

Marathi ३६. यास्तव (राजदूत) जेव्हा (हजरत) सुलेमानजवळ पोहोचला, तेव्हा सुलेमान म्हणाले, काय तुम्ही लोक धन देऊन माझी मदत करू इच्छिता? मला तर माझ्या पालनकर्त्याने याहून खूप जास्त देऊन ठेवले आहे, जे त्याने तुम्हाला दिले आहे. तेव्हा आपल्या नजराण्याने तुम्हीच खूश राहा.

Verse 37

ٱرْجِعْ إِلَيْهِمْ فَلَنَأْتِيَنَّهُم بِجُنُودٍ لَّا قِبَلَ لَهُم بِهَا وَلَنُخْرِجَنَّهُم مِّنْهَآ أَذِلَّةً وَهُمْ صَـٰغِرُونَ

Transliteration ir'jiʿ ilayhim falanatiyannahum bijunūdin lā qibala lahum bihā walanukh'rijannahum min'hā adhillatan wahum ṣāghirūna

Marathi ३७. जा, परत जा, त्यांच्याकडे आम्ही त्यांच्यावर असे सैन्य पाठवू की ज्याचा सामना करण्याची त्यांच्यात ताकत नाही आणि आम्ही त्यांना अपमानित व पराभूत करून तिथून बाहेर घालवू.

Verse 38

قَالَ يَـٰٓأَيُّهَا ٱلْمَلَؤُا۟ أَيُّكُمْ يَأْتِينِى بِعَرْشِهَا قَبْلَ أَن يَأْتُونِى مُسْلِمِينَ

Transliteration qāla yāayyuhā l-mala-u ayyukum yatīnī biʿarshihā qabla an yatūnī mus'limīna

Marathi ३८. (सुलेमान) म्हणाले, हे सरदारांनो! तुमच्यापैकी कोणी असा आहे, जो त्यांचे मुस्लिम होऊन पोहचण्यापूर्वीच, तिचे सिंहासन माझ्याजवळ आणून देईल.

Verse 39

قَالَ عِفْرِيتٌ مِّنَ ٱلْجِنِّ أَنَا۠ ءَاتِيكَ بِهِۦ قَبْلَ أَن تَقُومَ مِن مَّقَامِكَ ۖ وَإِنِّى عَلَيْهِ لَقَوِىٌّ أَمِينٌ

Transliteration qāla ʿif'rītun mina l-jini anā ātīka bihi qabla an taqūma min maqāmika wa-innī ʿalayhi laqawiyyun amīnun

Marathi ३९. एक बलाढ्य जिन्न म्हणाला, तुम्ही आपल्या जागेवरून उठण्यापूर्वीच मी ते तुमच्याजवळ आणतो. विश्वास राखा, मी याचे सामर्थ्य राखतो. आणि मी अमानतदार (विस्वस्त) ही आहे.

Verse 40

قَالَ ٱلَّذِى عِندَهُۥ عِلْمٌ مِّنَ ٱلْكِتَـٰبِ أَنَا۠ ءَاتِيكَ بِهِۦ قَبْلَ أَن يَرْتَدَّ إِلَيْكَ طَرْفُكَ ۚ فَلَمَّا رَءَاهُ مُسْتَقِرًّا عِندَهُۥ قَالَ هَـٰذَا مِن فَضْلِ رَبِّى لِيَبْلُوَنِىٓ ءَأَشْكُرُ أَمْ أَكْفُرُ ۖ وَمَن شَكَرَ فَإِنَّمَا يَشْكُرُ لِنَفْسِهِۦ ۖ وَمَن كَفَرَ فَإِنَّ رَبِّى غَنِىٌّ كَرِيمٌ

Transliteration qāla alladhī ʿindahu ʿil'mun mina l-kitābi anā ātīka bihi qabla an yartadda ilayka ṭarfuka falammā raāhu mus'taqirran ʿindahu qāla hādhā min faḍli rabbī liyabluwanī a-ashkuru am akfuru waman shakara fa-innamā yashkuru linafsihi waman kafara fa-inna rabbī ghaniyyun karīmun

Marathi ४०. ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान होते, तो म्हणाले, की तुमची पापणी लवण्यापूर्वीच मी त्यास तुमच्याजवळ पोहचवू शकतो. जेव्हा पैगंबर (सुलेमान) ने ते (सिंहासन) आपल्याजवळ हजर असलेले पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझ्या पालनकर्त्याचा उपकार आहे. यासाठी की त्याने माझी कसोटी घ्यावी की मी कृतज्ञता दर्शवितो की कृतघ्नता. कृतज्ञता व्यक्त करणारा आपल्या फायद्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जो कृतघ्नता दर्शवील तर माझा पालनकर्ता मोठा निःस्पृह आणि मोठा मेहेरबान आहे.

Verse 41

قَالَ نَكِّرُوا۟ لَهَا عَرْشَهَا نَنظُرْ أَتَهْتَدِىٓ أَمْ تَكُونُ مِنَ ٱلَّذِينَ لَا يَهْتَدُونَ

Transliteration qāla nakkirū lahā ʿarshahā nanẓur atahtadī am takūnu mina alladhīna lā yahtadūna

Marathi ४१. (हजरत सुलेमानने) आदेश दिला की राणीच्या सिंहासनाचे स्वरूप काहीसे बदलून टाका. मग पाहू या, ती मार्गदर्शन प्राप्त करते की त्या लोकांपैकी ठरते जे मार्गदर्शन प्राप्त करीत नाही.

Verse 42

فَلَمَّا جَآءَتْ قِيلَ أَهَـٰكَذَا عَرْشُكِ ۖ قَالَتْ كَأَنَّهُۥ هُوَ ۚ وَأُوتِينَا ٱلْعِلْمَ مِن قَبْلِهَا وَكُنَّا مُسْلِمِينَ

Transliteration falammā jāat qīla ahākadhā ʿarshuki qālat ka-annahu huwa waūtīnā l-ʿil'ma min qablihā wakunnā mus'limīna

Marathi ४२. मग जेव्हा ती हजर झाली तेव्हा तिला विचारले गेले की तुमचे सिंहासन असेच आहे? तिने उत्तर दिले, हे जणू तेच आहे आम्हाला याच्यापूर्वीच ज्ञान दिले गेले होते आणि आम्ही मुस्लिम होतो.

Verse 43

وَصَدَّهَا مَا كَانَت تَّعْبُدُ مِن دُونِ ٱللَّهِ ۖ إِنَّهَا كَانَتْ مِن قَوْمٍ كَـٰفِرِينَ

Transliteration waṣaddahā mā kānat taʿbudu min dūni l-lahi innahā kānat min qawmin kāfirīna

Marathi ४३. आणि तिला त्यांनी रोखून ठेवले होते, ज्यांची ती अल्लाहखेरीज उपासना करीत राहिली, निःसंशय ती काफिर लोकांपैकी होती.

Verse 44

قِيلَ لَهَا ٱدْخُلِى ٱلصَّرْحَ ۖ فَلَمَّا رَأَتْهُ حَسِبَتْهُ لُجَّةً وَكَشَفَتْ عَن سَاقَيْهَا ۚ قَالَ إِنَّهُۥ صَرْحٌ مُّمَرَّدٌ مِّن قَوَارِيرَ ۗ قَالَتْ رَبِّ إِنِّى ظَلَمْتُ نَفْسِى وَأَسْلَمْتُ مَعَ سُلَيْمَـٰنَ لِلَّهِ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ

Transliteration qīla lahā ud'khulī l-ṣarḥa falammā ra-athu ḥasibathu lujjatan wakashafat ʿan sāqayhā qāla innahu ṣarḥun mumarradun min qawārīra qālat rabbi innī ẓalamtu nafsī wa-aslamtu maʿa sulaymāna lillahi rabbi l-ʿālamīna

Marathi ४४. तिला सांगितले गेले की महालात प्रवेश करा. जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला असे वाटले की हा जलाशय (हौद) आहे, तिने आपल्या पोटऱ्या उघड्या केल्या (सुलेमान) म्हणाले, हा तर काचेचा बनलेला आहे. ती म्हणाली, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या प्राणावर अत्याचार केला. आता मी सुलेमानसोबत, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारक बनते.

Verse 45

وَلَقَدْ أَرْسَلْنَآ إِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمْ صَـٰلِحًا أَنِ ٱعْبُدُوا۟ ٱللَّهَ فَإِذَا هُمْ فَرِيقَانِ يَخْتَصِمُونَ

Transliteration walaqad arsalnā ilā thamūda akhāhum ṣāliḥan ani uʿ'budū l-laha fa-idhā hum farīqāni yakhtaṣimūna

Marathi ४५. आणि निःसंशय, आम्ही ‘समूद’कडे त्यांचा भाऊ ‘स्वालेह’ला पाठविले (या संदेशासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा. तरीही ते दोन गट बनून आपसात भांडणतंटा करू लागले.

Verse 46

قَالَ يَـٰقَوْمِ لِمَ تَسْتَعْجِلُونَ بِٱلسَّيِّئَةِ قَبْلَ ٱلْحَسَنَةِ ۖ لَوْلَا تَسْتَغْفِرُونَ ٱللَّهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ

Transliteration qāla yāqawmi lima tastaʿjilūna bil-sayi-ati qabla l-ḥasanati lawlā tastaghfirūna l-laha laʿallakum tur'ḥamūna

Marathi ४६. (पैगंबर स्वालेह) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही भलेपणाच्या आदी वाईट गोष्टीची घाई का माजवित आहात. तुम्ही अल्लाहजवळ माफी का नाही मागत? यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.

Verse 47

قَالُوا۟ ٱطَّيَّرْنَا بِكَ وَبِمَن مَّعَكَ ۚ قَالَ طَـٰٓئِرُكُمْ عِندَ ٱللَّهِ ۖ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ تُفْتَنُونَ

Transliteration qālū iṭṭayyarnā bika wabiman maʿaka qāla ṭāirukum ʿinda l-lahi bal antum qawmun tuf'tanūna

Marathi ४७. (ते) म्हणाले की आम्ही तर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना अपशकुनी समजतो (पैगंबरानी) उत्तर दिले, तुमचा अपशकून अल्लाहजवळ आहे. किंबहुना तुम्ही तर कसोटीत पडलेले लोक आहात.

Verse 48

وَكَانَ فِى ٱلْمَدِينَةِ تِسْعَةُ رَهْطٍ يُفْسِدُونَ فِى ٱلْأَرْضِ وَلَا يُصْلِحُونَ

Transliteration wakāna fī l-madīnati tis'ʿatu rahṭin yuf'sidūna fī l-arḍi walā yuṣ'liḥūna

Marathi ४८. या शहरात नऊ (प्रमुख) माणसे होती, जे धरतीत उत्पात (फसाद) पसरवित होते आणि सुधारणेचे काम करीत नव्हते.

Verse 49

قَالُوا۟ تَقَاسَمُوا۟ بِٱللَّهِ لَنُبَيِّتَنَّهُۥ وَأَهْلَهُۥ ثُمَّ لَنَقُولَنَّ لِوَلِيِّهِۦ مَا شَهِدْنَا مَهْلِكَ أَهْلِهِۦ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ

Transliteration qālū taqāsamū bil-lahi lanubayyitannahu wa-ahlahu thumma lanaqūlanna liwaliyyihi mā shahid'nā mahlika ahlihi wa-innā laṣādiqūna

Marathi ४९. त्यांनी आपसात अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की रात्रीतूनच ‘स्वालेह’ आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवू आणि त्यांच्या वारसदाराला सांगू की आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो आणि आम्ही खरे बोलत आहोत.

Verse 50

وَمَكَرُوا۟ مَكْرًا وَمَكَرْنَا مَكْرًا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ

Transliteration wamakarū makran wamakarnā makran wahum lā yashʿurūna

Marathi ५०. आणि त्यांनी डाव खेळा आणि आम्ही देखील आणि ते त्यास समजतच नव्हते.

Verse 51

فَٱنظُرْ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ مَكْرِهِمْ أَنَّا دَمَّرْنَـٰهُمْ وَقَوْمَهُمْ أَجْمَعِينَ

Transliteration fa-unẓur kayfa kāna ʿāqibatu makrihim annā dammarnāhum waqawmahum ajmaʿīna

Marathi ५१. आता पाहा, त्यांच्या कट-कारस्थानाचा काय परिणाम झाला? आम्ही त्यांना आणि त्यांच्या जनसमूहाला, सर्वांनाच नष्ट करून टाकले.

Verse 52

فَتِلْكَ بُيُوتُهُمْ خَاوِيَةًۢ بِمَا ظَلَمُوٓا۟ ۗ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَةً لِّقَوْمٍ يَعْلَمُونَ

Transliteration fatil'ka buyūtuhum khāwiyatan bimā ẓalamū inna fī dhālika laāyatan liqawmin yaʿlamūna

Marathi ५२. ही त्यांची घरे आहेत, जी त्यांच्या अत्याचारामुळे ओसाड पडली आहेत. जे लोक ज्ञान बाळगतात, त्यांच्यासाठी त्यात मोठी निशाणी आहे.

Verse 53

وَأَنجَيْنَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَكَانُوا۟ يَتَّقُونَ

Transliteration wa-anjaynā alladhīna āmanū wakānū yattaqūna

Marathi ५३. आणि आम्ही त्यांना, ज्यांनी ईमान राखले होते आणि जे सत्कर्म करीत होते, पूर्णपणे वाचविले.

Verse 54

وَلُوطًا إِذْ قَالَ لِقَوْمِهِۦٓ أَتَأْتُونَ ٱلْفَـٰحِشَةَ وَأَنتُمْ تُبْصِرُونَ

Transliteration walūṭan idh qāla liqawmihi atatūna l-fāḥishata wa-antum tub'ṣirūna

Marathi ५४. आणि लूतचा (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले, की जाणूनबुजूनही तुम्ही कुकर्म (पुरुष सहवास) करता?

Verse 55

أَئِنَّكُمْ لَتَأْتُونَ ٱلرِّجَالَ شَهْوَةً مِّن دُونِ ٱلنِّسَآءِ ۚ بَلْ أَنتُمْ قَوْمٌ تَجْهَلُونَ

Transliteration a-innakum latatūna l-rijāla shahwatan min dūni l-nisāi bal antum qawmun tajhalūna

Marathi ५५. ही काय गोष्ट आहे? की तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ कामवासनापूर्तीसाठी येता? खरी गोष्टी अशी की तुम्ही मोठे अज्ञान पूर्ण काम करीत आहात.

Verse 56

۞ فَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِۦٓ إِلَّآ أَن قَالُوٓا۟ أَخْرِجُوٓا۟ ءَالَ لُوطٍ مِّن قَرْيَتِكُمْ ۖ إِنَّهُمْ أُنَاسٌ يَتَطَهَّرُونَ

Transliteration famā kāna jawāba qawmihi illā an qālū akhrijū āla lūṭin min qaryatikum innahum unāsun yataṭahharūna

Marathi ५६. त्यांच्या जनसमूहाचे उत्तर या बोलण्याव्यतिरिक्त दुसरे काही नव्हते की लूतच्या कुटुंबियांना आपल्या शहरातून बाहेर घालवा, हे लोक मोठी पवित्रतता (सत्शीलता) दाखवित आहेत.

Verse 57

فَأَنجَيْنَـٰهُ وَأَهْلَهُۥٓ إِلَّا ٱمْرَأَتَهُۥ قَدَّرْنَـٰهَا مِنَ ٱلْغَـٰبِرِينَ

Transliteration fa-anjaynāhu wa-ahlahu illā im'ra-atahu qaddarnāhā mina l-ghābirīna

Marathi ५७. आणि आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीखेरीज सर्वांना वाचिवले. याचे अनुमान(र्तक) तर मागे राहणाऱ्यांमध्ये आम्ही लावलेच होते.

Verse 58

وَأَمْطَرْنَا عَلَيْهِم مَّطَرًا ۖ فَسَآءَ مَطَرُ ٱلْمُنذَرِينَ

Transliteration wa-amṭarnā ʿalayhim maṭaran fasāa maṭaru l-mundharīna

Marathi ५८. आणि त्यांच्यावर एक (विशेष प्रकारचा) पाऊस पाडला. यास्तव त्या खबरदार केल्या गेलेल्या लोकांवर वाईट पाऊस पडला.

Verse 59

قُلِ ٱلْحَمْدُ لِلَّهِ وَسَلَـٰمٌ عَلَىٰ عِبَادِهِ ٱلَّذِينَ ٱصْطَفَىٰٓ ۗ ءَآللَّهُ خَيْرٌ أَمَّا يُشْرِكُونَ

Transliteration quli l-ḥamdu lillahi wasalāmun ʿalā ʿibādihi alladhīna iṣ'ṭafā āllahu khayrun ammā yush'rikūna

Marathi ५९. तेव्हा तुम्ही सांगा की समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे आणि त्याच्या निवडक दासांवर सलाम (शांति) आहे. काय अल्लाह अधिक चांगला आहे की ते, ज्यांना हे लोक (अल्लाहचा) सहभागी बनवत आहेत.

Verse 60

أَمَّنْ خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَأَنزَلَ لَكُم مِّنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَنۢبَتْنَا بِهِۦ حَدَآئِقَ ذَاتَ بَهْجَةٍ مَّا كَانَ لَكُمْ أَن تُنۢبِتُوا۟ شَجَرَهَآ ۗ أَءِلَـٰهٌ مَّعَ ٱللَّهِ ۚ بَلْ هُمْ قَوْمٌ يَعْدِلُونَ

Transliteration amman khalaqa l-samāwāti wal-arḍa wa-anzala lakum mina l-samāi māan fa-anbatnā bihi ḥadāiqa dhāta bahjatin mā kāna lakum an tunbitū shajarahā a-ilāhun maʿa l-lahi bal hum qawmun yaʿdilūna

Marathi ६०. (बरे हे सांगा) आकाशांना आणि जमिनीला कोणी निर्माण केले? कोणी आकाशातून पाऊस पाडला? मग त्याद्वारे हिरव्या टवटवीत सुंदर बागा कोणी उगविल्या ? या बागांचे वृक्ष तुम्ही कधीही उगवू शकत नाही. काय अल्लाहखेरीज दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना हे लोक (सरळ मार्गापासून) दूर होतात.

Verse 61

أَمَّن جَعَلَ ٱلْأَرْضَ قَرَارًا وَجَعَلَ خِلَـٰلَهَآ أَنْهَـٰرًا وَجَعَلَ لَهَا رَوَٰسِىَ وَجَعَلَ بَيْنَ ٱلْبَحْرَيْنِ حَاجِزًا ۗ أَءِلَـٰهٌ مَّعَ ٱللَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ

Transliteration amman jaʿala l-arḍa qarāran wajaʿala khilālahā anhāran wajaʿala lahā rawāsiya wajaʿala bayna l-baḥrayni ḥājizan a-ilāhun maʿa l-lahi bal aktharuhum lā yaʿlamūna

Marathi ६१. काय तो, ज्याने धरतीला निवासस्थान बनविले, तिच्या दरम्यान नद्या प्रवाहित केल्या, तिच्यासाठी पर्वत बनविले आणि दोन समुद्रांच्या दरम्यान आड पडदा घातला, काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? किंबहुना त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत.

Verse 62

أَمَّن يُجِيبُ ٱلْمُضْطَرَّ إِذَا دَعَاهُ وَيَكْشِفُ ٱلسُّوٓءَ وَيَجْعَلُكُمْ خُلَفَآءَ ٱلْأَرْضِ ۗ أَءِلَـٰهٌ مَّعَ ٱللَّهِ ۚ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ

Transliteration amman yujību l-muḍ'ṭara idhā daʿāhu wayakshifu l-sūa wayajʿalukum khulafāa l-arḍi a-ilāhun maʿa l-lahi qalīlan mā tadhakkarūna

Marathi ६२. विवश आणि अगतिक व्यक्तीचे आर्जव, जेव्हा तो पुकारतो, कोण स्वीकारून त्याच्या त्रास- यातनेस दूर करतो, आणि तुम्हाला धरतीचा खलीफ़ा (सत्ताधिकारी) बनवितो. काय अल्लाहसोबत दुसरा कोणी उपासना करण्यायोग्य आहे? तुम्ही लोक फार कमी बोध ग्रहण करतात.

Verse 63

أَمَّن يَهْدِيكُمْ فِى ظُلُمَـٰتِ ٱلْبَرِّ وَٱلْبَحْرِ وَمَن يُرْسِلُ ٱلرِّيَـٰحَ بُشْرًۢا بَيْنَ يَدَىْ رَحْمَتِهِۦٓ ۗ أَءِلَـٰهٌ مَّعَ ٱللَّهِ ۚ تَعَـٰلَى ٱللَّهُ عَمَّا يُشْرِكُونَ

Transliteration amman yahdīkum fī ẓulumāti l-bari wal-baḥri waman yur'silu l-riyāḥa bush'ran bayna yaday raḥmatihi a-ilāhun maʿa l-lahi taʿālā l-lahu ʿammā yush'rikūna

Marathi ६३. असा कोण आहे, जो तुम्हाला खुष्की आणि समुद्राच्या अंधारात मार्ग दाखवितो आणि जो आपल्या कृपेच्या (येण्या) पूर्वीच खूशखबर देणारी हवा (वारे) पाठवितो. काय अल्लाहसोबत दुसरे एखादे आराध्या दैवतही आहे? ज्यांना हे (अल्लाहचा) सहभागी ठरवितात, त्या सर्वांपेक्षा अल्लाह अति उच्च आहे.

Verse 64

أَمَّن يَبْدَؤُا۟ ٱلْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُۥ وَمَن يَرْزُقُكُم مِّنَ ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ ۗ أَءِلَـٰهٌ مَّعَ ٱللَّهِ ۚ قُلْ هَاتُوا۟ بُرْهَـٰنَكُمْ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ

Transliteration amman yabda-u l-khalqa thumma yuʿīduhu waman yarzuqukum mina l-samāi wal-arḍi a-ilāhun maʿa l-lahi qul hātū bur'hānakum in kuntum ṣādiqīna

Marathi ६४. असा कोण आहे जो सृष्टीनिर्मितीला पहिल्यांदा निर्माण करतो, मग तिला पुन्हा निर्माण करील जो तुम्हाला आकाश आणि जमिनितून आजिविका प्रदान करीत आहे. काय अल्लाहसोबत दुसराही कोणी उपास्य आहे? सांगा, सच्चे असाल तर आपले प्रमाण (पुरावा) आणा.

Verse 65

قُل لَّا يَعْلَمُ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ٱلْغَيْبَ إِلَّا ٱللَّهُ ۚ وَمَا يَشْعُرُونَ أَيَّانَ يُبْعَثُونَ

Transliteration qul lā yaʿlamu man fī l-samāwāti wal-arḍi l-ghayba illā l-lahu wamā yashʿurūna ayyāna yub'ʿathūna

Marathi ६५. सांगा की आकाशवाल्यांपैकी आणि धरतीवाल्यांपैकी, अल्लाहखेरीज कोणीही परोक्ष ज्ञान बाळगत नाही१ ते तर हे देखील जाणत नाहीत की त्यांना दुसऱ्यांदा केव्हा जिवंत केले जाईल?

Verse 66

بَلِ ٱدَّٰرَكَ عِلْمُهُمْ فِى ٱلْـَٔاخِرَةِ ۚ بَلْ هُمْ فِى شَكٍّ مِّنْهَا ۖ بَلْ هُم مِّنْهَا عَمُونَ

Transliteration bali iddāraka ʿil'muhum fī l-ākhirati bal hum fī shakkin min'hā bal hum min'hā ʿamūna

Marathi ६६. किंबहुना आखिरत (मरणोत्तर जीवना) विषयी त्यांचे ज्ञान संपुष्टात आले आहे, किंबहुना हे त्या संदर्भात संशयग्रस्त आहेत, एवढेच नव्हे तर हे त्यापासून आंधळे आहेत.

Verse 67

وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ أَءِذَا كُنَّا تُرَٰبًا وَءَابَآؤُنَآ أَئِنَّا لَمُخْرَجُونَ

Transliteration waqāla alladhīna kafarū a-idhā kunnā turāban waābāunā a-innā lamukh'rajūna

Marathi ६७. काफिर (सत्य-विरोधक) म्हणाले, काय जेव्हा आम्ही माती होऊन जाऊ आणि आमचे वाडवडीलही, काय आम्ही पुन्हा बाहेर काढले जाऊ?

Verse 68

لَقَدْ وُعِدْنَا هَـٰذَا نَحْنُ وَءَابَآؤُنَا مِن قَبْلُ إِنْ هَـٰذَآ إِلَّآ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ

Transliteration laqad wuʿid'nā hādhā naḥnu waābāunā min qablu in hādhā illā asāṭīru l-awalīna

Marathi ६८. आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना फार पूर्वीपासून हे वायदे दिले जात राहिले. काही नाही, या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या काल्पनिक कथा मात्र आहेत.

Verse 69

قُلْ سِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ فَٱنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلْمُجْرِمِينَ

Transliteration qul sīrū fī l-arḍi fa-unẓurū kayfa kāna ʿāqibatu l-muj'rimīna

Marathi ६९. सांगा की, जमिनीवर जरा हिंडून फिरून पाहा की अपराधी लोकांचा काय परिणाम झाला?

Verse 70

وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ وَلَا تَكُن فِى ضَيْقٍ مِّمَّا يَمْكُرُونَ

Transliteration walā taḥzan ʿalayhim walā takun fī ḍayqin mimmā yamkurūna

Marathi ७०. आणि तुम्ही त्यांच्याविषयी चिंताग्रस्त होऊ नका आणि त्यांच्या कट-कारस्थानांमुळे मन संकुचित करू नका.

Verse 71

وَيَقُولُونَ مَتَىٰ هَـٰذَا ٱلْوَعْدُ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ

Transliteration wayaqūlūna matā hādhā l-waʿdu in kuntum ṣādiqīna

Marathi ७१. आणि म्हणतात की हा वायदा केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा.

Verse 72

قُلْ عَسَىٰٓ أَن يَكُونَ رَدِفَ لَكُم بَعْضُ ٱلَّذِى تَسْتَعْجِلُونَ

Transliteration qul ʿasā an yakūna radifa lakum baʿḍu alladhī tastaʿjilūna

Marathi ७२. त्यांना उत्तर द्या की कदाचित काही अशा गोष्टी, ज्यांची तुम्ही एवढी घाई माजवित आहात, तुमच्या खूप जवळ येऊन ठेपल्या आहेत.

Verse 73

وَإِنَّ رَبَّكَ لَذُو فَضْلٍ عَلَى ٱلنَّاسِ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَشْكُرُونَ

Transliteration wa-inna rabbaka ladhū faḍlin ʿalā l-nāsi walākinna aktharahum lā yashkurūna

Marathi ७३. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता समस्त लोकांवर मोठा कृपावान आहे, परंतु अधिकांश लोक कृतज्ञता दाखवित नाही.

Verse 74

وَإِنَّ رَبَّكَ لَيَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ

Transliteration wa-inna rabbaka layaʿlamu mā tukinnu ṣudūruhum wamā yuʿ'linūna

Marathi ७४. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता, त्या गोष्टींनाही जाणतो, ज्यांना ते आपल्या मनात लपवित आहेत, आणि ज्यांना व्यक्त करीत आहेत.

Verse 75

وَمَا مِنْ غَآئِبَةٍ فِى ٱلسَّمَآءِ وَٱلْأَرْضِ إِلَّا فِى كِتَـٰبٍ مُّبِينٍ

Transliteration wamā min ghāibatin fī l-samāi wal-arḍi illā fī kitābin mubīnin

Marathi ७५. आकाश आणि धरतीची कोणतीही लपलेली गोष्ट अशी नाही, जी दिव्य स्पष्ट ग्रंथात सामील नसावी.

Verse 76

إِنَّ هَـٰذَا ٱلْقُرْءَانَ يَقُصُّ عَلَىٰ بَنِىٓ إِسْرَٰٓءِيلَ أَكْثَرَ ٱلَّذِى هُمْ فِيهِ يَخْتَلِفُونَ

Transliteration inna hādhā l-qur'āna yaquṣṣu ʿalā banī is'rāīla akthara alladhī hum fīhi yakhtalifūna

Marathi ७६. निःसंशय हा कुरआन इस्राईलच्या संततीसमोर अधिक तर त्या गोष्टींचे निवेदन करीत आहे, ज्यात हे मतभेद करतात.१

Verse 77

وَإِنَّهُۥ لَهُدًى وَرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِينَ

Transliteration wa-innahu lahudan waraḥmatun lil'mu'minīna

Marathi ७७. आणि हा (कुरआन) ईमान राखणाऱ्यांकरिता निश्चितच मार्गदर्शन आणि दया- कृपा आहे.

Verse 78

إِنَّ رَبَّكَ يَقْضِى بَيْنَهُم بِحُكْمِهِۦ ۚ وَهُوَ ٱلْعَزِيزُ ٱلْعَلِيمُ

Transliteration inna rabbaka yaqḍī baynahum biḥuk'mihi wahuwa l-ʿazīzu l-ʿalīmu

Marathi ७८. तुमचा पालनकर्ता त्यांच्या दरम्यान आपल्या आदेशाने (सर्व) फैसला करील. तो मोठा वर्चस्वशाली आणि ज्ञान राखणारा आहे.

Verse 79

فَتَوَكَّلْ عَلَى ٱللَّهِ ۖ إِنَّكَ عَلَى ٱلْحَقِّ ٱلْمُبِينِ

Transliteration fatawakkal ʿalā l-lahi innaka ʿalā l-ḥaqi l-mubīni

Marathi ७९. तेव्हा, तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा. निःसंशय, तुम्ही सत्य आणि उघड अशा दीन (धर्मा) वर आहात.

Verse 80

إِنَّكَ لَا تُسْمِعُ ٱلْمَوْتَىٰ وَلَا تُسْمِعُ ٱلصُّمَّ ٱلدُّعَآءَ إِذَا وَلَّوْا۟ مُدْبِرِينَ

Transliteration innaka lā tus'miʿu l-mawtā walā tus'miʿu l-ṣuma l-duʿāa idhā wallaw mud'birīna

Marathi ८०. निःसंशय, तुम्ही ना मृतांना ऐकवू शकता आणि ना बहिऱ्यांना आपली पुकार (हाक) ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून विमुख होत असतील.

Verse 81

وَمَآ أَنتَ بِهَـٰدِى ٱلْعُمْىِ عَن ضَلَـٰلَتِهِمْ ۖ إِن تُسْمِعُ إِلَّا مَن يُؤْمِنُ بِـَٔايَـٰتِنَا فَهُم مُّسْلِمُونَ

Transliteration wamā anta bihādī l-ʿum'yi ʿan ḍalālatihim in tus'miʿu illā man yu'minu biāyātinā fahum mus'limūna

Marathi ८१. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेपासून हटवून, सन्मार्गाला लावू शकता, तुम्ही तर केवळ त्यांना ऐकवू शकता, ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आहे, मग ते आज्ञाधारक होतात.

Verse 82

۞ وَإِذَا وَقَعَ ٱلْقَوْلُ عَلَيْهِمْ أَخْرَجْنَا لَهُمْ دَآبَّةً مِّنَ ٱلْأَرْضِ تُكَلِّمُهُمْ أَنَّ ٱلنَّاسَ كَانُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا لَا يُوقِنُونَ

Transliteration wa-idhā waqaʿa l-qawlu ʿalayhim akhrajnā lahum dābbatan mina l-arḍi tukallimuhum anna l-nāsa kānū biāyātinā lā yūqinūna

Marathi ८२. आणि जेव्हा त्यांच्यावर शिक्षा- यातने (अज़ाब) चा वायदा लागू होईल, आम्ही जमिनीतून त्यांच्यासाठी एक जनावर बाहेर काढू, जे त्यांच्याशी बोलत असेल की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते.१

Verse 83

وَيَوْمَ نَحْشُرُ مِن كُلِّ أُمَّةٍ فَوْجًا مِّمَّن يُكَذِّبُ بِـَٔايَـٰتِنَا فَهُمْ يُوزَعُونَ

Transliteration wayawma naḥshuru min kulli ummatin fawjan mimman yukadhibu biāyātinā fahum yūzaʿūna

Marathi ८३. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहामधून, अशा लोकांचे समूह, जे आमच्या आयतींना खोटे ठरवित होते, घेरून आणू, मग ते सर्वच्या सर्व वेगळे केले जातील.

Verse 84

حَتَّىٰٓ إِذَا جَآءُو قَالَ أَكَذَّبْتُم بِـَٔايَـٰتِى وَلَمْ تُحِيطُوا۟ بِهَا عِلْمًا أَمَّاذَا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration ḥattā idhā jāū qāla akadhabtum biāyātī walam tuḥīṭū bihā ʿil'man ammādhā kuntum taʿmalūna

Marathi ८४. जेव्हा सर्वच्या सर्व येऊन पोहचतील तेव्हा अल्लाह फर्माविल की तुम्ही माझ्या आयतींना, यानंतरही की तुम्हाला त्यांचे पूर्ण ज्ञान नव्हते, का खोटे ठरविले? आणि हेही सांगा की तुम्ही काय (कर्म) करीत राहिलात?

Verse 85

وَوَقَعَ ٱلْقَوْلُ عَلَيْهِم بِمَا ظَلَمُوا۟ فَهُمْ لَا يَنطِقُونَ

Transliteration wawaqaʿa l-qawlu ʿalayhim bimā ẓalamū fahum lā yanṭiqūna

Marathi ८५. आणि याचे कारण हे की त्यांनी अत्याचार केला होता, त्यामुळे आमचे फर्मान त्याच्यावर लागू होईल आणि ते काहीच बोलू शकणार नाहीत.

Verse 86

أَلَمْ يَرَوْا۟ أَنَّا جَعَلْنَا ٱلَّيْلَ لِيَسْكُنُوا۟ فِيهِ وَٱلنَّهَارَ مُبْصِرًا ۚ إِنَّ فِى ذَٰلِكَ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ

Transliteration alam yaraw annā jaʿalnā al-layla liyaskunū fīhi wal-nahāra mub'ṣiran inna fī dhālika laāyātin liqawmin yu'minūna

Marathi ८६. काय ते पाहत नाहीत की आम्ही रात्र अशासाठी बनविली आहे की त्यांनी तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला आम्ही दाखविणारा बनविले आहे. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.

Verse 87

وَيَوْمَ يُنفَخُ فِى ٱلصُّورِ فَفَزِعَ مَن فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَن فِى ٱلْأَرْضِ إِلَّا مَن شَآءَ ٱللَّهُ ۚ وَكُلٌّ أَتَوْهُ دَٰخِرِينَ

Transliteration wayawma yunfakhu fī l-ṣūri fafaziʿa man fī l-samāwāti waman fī l-arḍi illā man shāa l-lahu wakullun atawhu dākhirīna

Marathi ८७. आणि ज्या दिवशी सूर फुंकला जाईल तेव्हा ते सर्वच्या सर्व, जे आकाशांमध्ये आणि जमिनीवर आहेत घाबरून उठतील,१ परंतु ज्याला अल्लाह इच्छिल (सुरक्षित ठेवील) आणि सर्वच्या सर्व विवश, लाचार होऊन त्याच्यासमोर हजर होतील.

Verse 88

وَتَرَى ٱلْجِبَالَ تَحْسَبُهَا جَامِدَةً وَهِىَ تَمُرُّ مَرَّ ٱلسَّحَابِ ۚ صُنْعَ ٱللَّهِ ٱلَّذِىٓ أَتْقَنَ كُلَّ شَىْءٍ ۚ إِنَّهُۥ خَبِيرٌۢ بِمَا تَفْعَلُونَ

Transliteration watarā l-jibāla taḥsabuhā jāmidatan wahiya tamurru marra l-saḥābi ṣun'ʿa l-lahi alladhī atqana kulla shayin innahu khabīrun bimā tafʿalūna

Marathi ८८. आणि तुम्ही पर्वतांना आपल्या जागी निश्चित व स्थिर समजता, परंतु ते देखील ढगासारखे उडत फिरतील. ही निर्मिती (कार्यकुशलता) आहे अल्लाहची, ज्याने प्रत्येक वस्तू मजबूत बनविली आहे. तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

Verse 89

مَن جَآءَ بِٱلْحَسَنَةِ فَلَهُۥ خَيْرٌ مِّنْهَا وَهُم مِّن فَزَعٍ يَوْمَئِذٍ ءَامِنُونَ

Transliteration man jāa bil-ḥasanati falahu khayrun min'hā wahum min fazaʿin yawma-idhin āminūna

Marathi ८९. जो मनुष्य सत्कर्म घेऊन येईल, त्याला त्याहून चांगला मोबदला मिळेल आणि असे लोक त्या दिवसाच्या दहशतीपासून निर्धास्त असतील.

Verse 90

وَمَن جَآءَ بِٱلسَّيِّئَةِ فَكُبَّتْ وُجُوهُهُمْ فِى ٱلنَّارِ هَلْ تُجْزَوْنَ إِلَّا مَا كُنتُمْ تَعْمَلُونَ

Transliteration waman jāa bil-sayi-ati fakubbat wujūhuhum fī l-nāri hal tuj'zawna illā mā kuntum taʿmalūna

Marathi ९०. आणि जे लोक दुष्कर्म घेऊन येतील त्यांना अधोमुखी (जहन्नमच्या) आगीत झोकले जाईल. तुम्हाला केवळ त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत राहिले.

Verse 91

إِنَّمَآ أُمِرْتُ أَنْ أَعْبُدَ رَبَّ هَـٰذِهِ ٱلْبَلْدَةِ ٱلَّذِى حَرَّمَهَا وَلَهُۥ كُلُّ شَىْءٍ ۖ وَأُمِرْتُ أَنْ أَكُونَ مِنَ ٱلْمُسْلِمِينَ

Transliteration innamā umir'tu an aʿbuda rabba hādhihi l-baldati alladhī ḥarramahā walahu kullu shayin wa-umir'tu an akūna mina l-mus'limīna

Marathi ९१. मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी या शहराच्या पालनकर्त्याची उपासना करीत राहावे, ज्याने यास आदर सन्मानपूर्ण बनविले आहे आणि जो प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे आणि मला हा आदेशही दिला गेला आहे की मी मुस्लमान (आज्ञाधारकां) पैकी व्हावे.

Verse 92

وَأَنْ أَتْلُوَا۟ ٱلْقُرْءَانَ ۖ فَمَنِ ٱهْتَدَىٰ فَإِنَّمَا يَهْتَدِى لِنَفْسِهِۦ ۖ وَمَن ضَلَّ فَقُلْ إِنَّمَآ أَنَا۠ مِنَ ٱلْمُنذِرِينَ

Transliteration wa-an atluwā l-qur'āna famani ih'tadā fa-innamā yahtadī linafsihi waman ḍalla faqul innamā anā mina l-mundhirīna

Marathi ९२. आणि मी कुरआनाचे पठण करीत राहावे, तेव्हा जो मार्गदर्शन अंगीकारील, आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर सांगा, मी केवळ सावधान करणाऱ्यांपैकी आहे.

Verse 93

وَقُلِ ٱلْحَمْدُ لِلَّهِ سَيُرِيكُمْ ءَايَـٰتِهِۦ فَتَعْرِفُونَهَا ۚ وَمَا رَبُّكَ بِغَـٰفِلٍ عَمَّا تَعْمَلُونَ

Transliteration waquli l-ḥamdu lillahi sayurīkum āyātihi fataʿrifūnahā wamā rabbuka bighāfilin ʿammā taʿmalūna

Marathi ९३. आणि सांगा, समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे. तो लवकरच तुम्हाला आपल्या निशाण्या दाखविल, ज्या तुम्ही स्वतः ओळखून घ्याल, आणि जे काही तुम्ही करीत आहात, तुमचा पालनकर्ता त्यापासून अनभिज्ञ (अजाण) नाही.

Read Surah An-Naml in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.