MyDugsiStart learning

Surah Al-Qamar in Marathi: translation and audio

Surah 54 · القمر · The Moon · 55 verses

Surah Al-Qamar verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Qamar word by word in English.

Verse 1

ٱقْتَرَبَتِ ٱلسَّاعَةُ وَٱنشَقَّ ٱلْقَمَرُ

Transliteration iq'tarabati l-sāʿatu wa-inshaqqa l-qamaru

Marathi १. कयामत जवळ आली आणि चंद्र दुभंगला.

Verse 2

وَإِن يَرَوْا۟ ءَايَةً يُعْرِضُوا۟ وَيَقُولُوا۟ سِحْرٌ مُّسْتَمِرٌّ

Transliteration wa-in yaraw āyatan yuʿ'riḍū wayaqūlū siḥ'run mus'tamirrun

Marathi २. हे जेव्हा एखादा मोजिजा (चमत्कार) पाहतात, तेव्हा तोंड फिरवितात, आणि म्हणतात ही तर पहिल्यापासून चालत आलेली जादू आहे.

Verse 3

وَكَذَّبُوا۟ وَٱتَّبَعُوٓا۟ أَهْوَآءَهُمْ ۚ وَكُلُّ أَمْرٍ مُّسْتَقِرٌّ

Transliteration wakadhabū wa-ittabaʿū ahwāahum wakullu amrin mus'taqirrun

Marathi ३. आणि त्यांनी खोटे ठरविले व आपल्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले. आणि प्रत्येक कार्य निश्चित वेळेवरच निर्धारित आहे.

Verse 4

وَلَقَدْ جَآءَهُم مِّنَ ٱلْأَنۢبَآءِ مَا فِيهِ مُزْدَجَرٌ

Transliteration walaqad jāahum mina l-anbāi mā fīhi muz'dajarun

Marathi ४. निःसंशय, त्याच्याजवळ त्या वार्ता येऊन पोहचल्या आहेत, ज्यात तंबी - ताकीदी (ची शिकवण) आहेत.

Verse 5

حِكْمَةٌۢ بَـٰلِغَةٌ ۖ فَمَا تُغْنِ ٱلنُّذُرُ

Transliteration ḥik'matun bālighatun famā tugh'ni l-nudhuru

Marathi ५. आणि पूर्ण बुद्धिकौशल्याची गोष्ट आहे, परंतु या भयभीत करणाऱ्या गोष्टींनीही काही लाभ दिला नाही.

Verse 6

فَتَوَلَّ عَنْهُمْ ۘ يَوْمَ يَدْعُ ٱلدَّاعِ إِلَىٰ شَىْءٍ نُّكُرٍ

Transliteration fatawalla ʿanhum yawma yadʿu l-dāʿi ilā shayin nukurin

Marathi ६. (तेव्हा, हे पैगंबर!) तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवा, ज्या दिवशी एक पुकारणारा अप्रिय गोष्टीकडे बोलाविल.

Verse 7

خُشَّعًا أَبْصَـٰرُهُمْ يَخْرُجُونَ مِنَ ٱلْأَجْدَاثِ كَأَنَّهُمْ جَرَادٌ مُّنتَشِرٌ

Transliteration khushaʿan abṣāruhum yakhrujūna mina l-ajdāthi ka-annahum jarādun muntashirun

Marathi ७. हे झुकलेल्या नेत्रांनी कबरीमधून अशा प्रकारे उठून उभे राहतील की जणू इतस्ततः पसरलेला टोळ थवा.

Verse 8

مُّهْطِعِينَ إِلَى ٱلدَّاعِ ۖ يَقُولُ ٱلْكَـٰفِرُونَ هَـٰذَا يَوْمٌ عَسِرٌ

Transliteration muh'ṭiʿīna ilā l-dāʿi yaqūlu l-kāfirūna hādhā yawmun ʿasirun

Marathi ८. पुकारणाऱ्याकडे धावत जात असतील आणि काफिर म्हणतील की हा दिवस तर मोठा कठीण आहे!

Verse 9

۞ كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ فَكَذَّبُوا۟ عَبْدَنَا وَقَالُوا۟ مَجْنُونٌ وَٱزْدُجِرَ

Transliteration kadhabat qablahum qawmu nūḥin fakadhabū ʿabdanā waqālū majnūnun wa-uz'dujira

Marathi ९. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहानेही आमच्या दासाला खोटे ठरविले होते. आणि वेडा दर्शवून झिडकारले होते.

Verse 10

فَدَعَا رَبَّهُۥٓ أَنِّى مَغْلُوبٌ فَٱنتَصِرْ

Transliteration fadaʿā rabbahu annī maghlūbun fa-intaṣir

Marathi १०. तेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ दुआ (प्रार्थना) केली की मी तावडीत सापडलेलो आहे. तू माझी मदत कर.

Verse 11

فَفَتَحْنَآ أَبْوَٰبَ ٱلسَّمَآءِ بِمَآءٍ مُّنْهَمِرٍ

Transliteration fafataḥnā abwāba l-samāi bimāin mun'hamirin

Marathi ११. तेव्हा आम्ही आकाशाचे दरवाजे मुसळधार पावसाने उघडले.

Verse 12

وَفَجَّرْنَا ٱلْأَرْضَ عُيُونًا فَٱلْتَقَى ٱلْمَآءُ عَلَىٰٓ أَمْرٍ قَدْ قُدِرَ

Transliteration wafajjarnā l-arḍa ʿuyūnan fal-taqā l-māu ʿalā amrin qad qudira

Marathi १२. आणि जमिनीतून झरे प्रवाहित केले, तेव्हा त्या कार्यासाठी जे भाग्यात लिहिले गेले होते, (दोघेही) पाणी एकत्रित झाले.

Verse 13

وَحَمَلْنَـٰهُ عَلَىٰ ذَاتِ أَلْوَٰحٍ وَدُسُرٍ

Transliteration waḥamalnāhu ʿalā dhāti alwāḥin wadusurin

Marathi १३. आणि आम्ही त्याला अशा नौकेत चढविले, जी तक्ते आणि मेखा असलेली होती.

Verse 14

تَجْرِى بِأَعْيُنِنَا جَزَآءً لِّمَن كَانَ كُفِرَ

Transliteration tajrī bi-aʿyuninā jazāan liman kāna kufira

Marathi १४. जी आमच्या डोळ्यांसमोर चालत होती. हा मोबदला त्याच्यातर्फे, ज्याचा इन्कार केला गेला होता.

Verse 15

وَلَقَد تَّرَكْنَـٰهَآ ءَايَةً فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad taraknāhā āyatan fahal min muddakirin

Marathi १५. आणि निःसंशय, आम्ही या घटनेला निशाणी बनवून बाकी राखले तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 16

فَكَيْفَ كَانَ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration fakayfa kāna ʿadhābī wanudhuri

Marathi १६. तेव्हा (सांगा) कसा होता माझा प्रकोप आणि माझी भयपूर्ण तंबी.

Verse 17

وَلَقَدْ يَسَّرْنَا ٱلْقُرْءَانَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad yassarnā l-qur'āna lildhik'ri fahal min muddakirin

Marathi १७. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला समजण्याकरिता सोपे केले आहे१ तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 18

كَذَّبَتْ عَادٌ فَكَيْفَ كَانَ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration kadhabat ʿādun fakayfa kāna ʿadhābī wanudhuri

Marathi १८. आदच्या जनसमूहानेही खोटे ठरविले तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझी भयपूर्ण तंबी.

Verse 19

إِنَّآ أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ رِيحًا صَرْصَرًا فِى يَوْمِ نَحْسٍ مُّسْتَمِرٍّ

Transliteration innā arsalnā ʿalayhim rīḥan ṣarṣaran fī yawmi naḥsin mus'tamirrin

Marathi १९. आम्ही त्यांच्यावर सतत वेगाने वाहणारी हवा (वादळी वारा) एका सततच्या अशुभ दिवशी पाठविली.

Verse 20

تَنزِعُ ٱلنَّاسَ كَأَنَّهُمْ أَعْجَازُ نَخْلٍ مُّنقَعِرٍ

Transliteration tanziʿu l-nāsa ka-annahum aʿjāzu nakhlin munqaʿirin

Marathi २०. जी लोकांना उचलून आपटत होती, जणू मुळासकट उखडलेले खजुरीचे वृक्ष आहेत.

Verse 21

فَكَيْفَ كَانَ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration fakayfa kāna ʿadhābī wanudhuri

Marathi २१. तेव्हा कसा होता माझा प्रकोप आणि माझे भयभीत करणे.

Verse 22

وَلَقَدْ يَسَّرْنَا ٱلْقُرْءَانَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad yassarnā l-qur'āna lildhik'ri fahal min muddakirin

Marathi २२. आणि निःसंशय, आम्ही कुरआनानला बोधप्राप्तीकरिता सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 23

كَذَّبَتْ ثَمُودُ بِٱلنُّذُرِ

Transliteration kadhabat thamūdu bil-nudhuri

Marathi २३. समूदच्या जनसमूहाने (ही) खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.

Verse 24

فَقَالُوٓا۟ أَبَشَرًا مِّنَّا وَٰحِدًا نَّتَّبِعُهُۥٓ إِنَّآ إِذًا لَّفِى ضَلَـٰلٍ وَسُعُرٍ

Transliteration faqālū abasharan minnā wāḥidan nattabiʿuhu innā idhan lafī ḍalālin wasuʿurin

Marathi २४. आणि म्हणाले की, काय आमच्यापैकीच एका माणसाचे आम्ही अनुसरण करू लागावे? मग तर आम्ही अवश्य वाईटपणात आणि वेडेपणात पडलेले असू.

Verse 25

أَءُلْقِىَ ٱلذِّكْرُ عَلَيْهِ مِنۢ بَيْنِنَا بَلْ هُوَ كَذَّابٌ أَشِرٌ

Transliteration a-ul'qiya l-dhik'ru ʿalayhi min bayninā bal huwa kadhābun ashirun

Marathi २५. काय आम्हा सर्वांमधून फक्त त्याच्यावरच वहयी (प्रकाशना) अवतरित केली गेली? तेव्हा तो खोटारडा, घमेंडी आहे.

Verse 26

سَيَعْلَمُونَ غَدًا مَّنِ ٱلْكَذَّابُ ٱلْأَشِرُ

Transliteration sayaʿlamūna ghadan mani l-kadhābu l-ashiru

Marathi २६. आता सर्व जाणून घेतील की उद्या कोण खोटारडा व घमेंडी होता.

Verse 27

إِنَّا مُرْسِلُوا۟ ٱلنَّاقَةِ فِتْنَةً لَّهُمْ فَٱرْتَقِبْهُمْ وَٱصْطَبِرْ

Transliteration innā mur'silū l-nāqati fit'natan lahum fa-ir'taqib'hum wa-iṣ'ṭabir

Marathi २७. निःसंशय, आम्ही त्यांच्या कसोटीकरिता सांडणी पाठवू तेव्हा (हे स्वालेह!) तुम्ही त्यांची प्रतीक्षा करा आणि धीर संयम राखा.

Verse 28

وَنَبِّئْهُمْ أَنَّ ٱلْمَآءَ قِسْمَةٌۢ بَيْنَهُمْ ۖ كُلُّ شِرْبٍ مُّحْتَضَرٌ

Transliteration wanabbi'hum anna l-māa qis'matun baynahum kullu shir'bin muḥ'taḍarun

Marathi २८. आणि त्यांना खबर द्या की पाण्याची त्याच्यात वाटणी आहे. प्रत्येक आपल्या पाळीवर हजर होईल.

Verse 29

فَنَادَوْا۟ صَاحِبَهُمْ فَتَعَاطَىٰ فَعَقَرَ

Transliteration fanādaw ṣāḥibahum fataʿāṭā faʿaqara

Marathi २९. तेव्हा त्यांनी आपल्या साथीदाराला बोलविले, ज्याने (सांडणीवर) हल्ला केला आणि (तिच्या) घोडनसा कापून टाकल्या.

Verse 30

فَكَيْفَ كَانَ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration fakayfa kāna ʿadhābī wanudhuri

Marathi ३०. तेव्हा कसा होता माझा अज़ाब आणि माझे भयभीत करणे.

Verse 31

إِنَّآ أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ صَيْحَةً وَٰحِدَةً فَكَانُوا۟ كَهَشِيمِ ٱلْمُحْتَظِرِ

Transliteration innā arsalnā ʿalayhim ṣayḥatan wāḥidatan fakānū kahashīmi l-muḥ'taẓiri

Marathi ३१. आम्ही त्यांच्यावर एक भयंकर चित्कार पाठविला तेव्हा ते असे झाले, जणू कुंपण बनविणाऱ्याची तुडविलेली घास (चारा).

Verse 32

وَلَقَدْ يَسَّرْنَا ٱلْقُرْءَانَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad yassarnā l-qur'āna lildhik'ri fahal min muddakirin

Marathi ३२. आणि आम्ही बोधप्राप्तीकरिता कुरआनाला सोपे केले आहे तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 33

كَذَّبَتْ قَوْمُ لُوطٍۭ بِٱلنُّذُرِ

Transliteration kadhabat qawmu lūṭin bil-nudhuri

Marathi ३३. लूतच्या जनसमूहाने देखील खबरदार करणाऱ्यांना खोटे ठरविले.

Verse 34

إِنَّآ أَرْسَلْنَا عَلَيْهِمْ حَاصِبًا إِلَّآ ءَالَ لُوطٍ ۖ نَّجَّيْنَـٰهُم بِسَحَرٍ

Transliteration innā arsalnā ʿalayhim ḥāṣiban illā āla lūṭin najjaynāhum bisaḥarin

Marathi ३४. निःसंशय, आम्ही त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करणारी हवा पठविली, लूत (अलै.) यांच्या कुटुंबियांखेरीज, त्यांना प्रातःकाळी आम्ही सुरक्षा (मुक्ती) प्रदान केली.

Verse 35

نِّعْمَةً مِّنْ عِندِنَا ۚ كَذَٰلِكَ نَجْزِى مَن شَكَرَ

Transliteration niʿ'matan min ʿindinā kadhālika najzī man shakara

Marathi ३५. आपल्या कृपेने प्रत्येक कृतज्ञशील (दासा) ला आम्ही अशा प्रकारे मोबदला देतो.

Verse 36

وَلَقَدْ أَنذَرَهُم بَطْشَتَنَا فَتَمَارَوْا۟ بِٱلنُّذُرِ

Transliteration walaqad andharahum baṭshatanā fatamāraw bil-nudhuri

Marathi ३६. निःसंशय, त्या (लूत) ने त्यांना आमच्या पकडीचे भय दाखविले होते, परंतु त्यांनी भय दाखविणाऱ्यांबाबत शंका धरून वाद घातला.

Verse 37

وَلَقَدْ رَٰوَدُوهُ عَن ضَيْفِهِۦ فَطَمَسْنَآ أَعْيُنَهُمْ فَذُوقُوا۟ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration walaqad rāwadūhu ʿan ḍayfihi faṭamasnā aʿyunahum fadhūqū ʿadhābī wanudhuri

Marathi ३७. आणि लूत (अलै.) यांना त्यांच्या अतिथींच्या संदर्भात फूस लावू इच्छिले तेव्हा आम्ही त्यांचे डोळे आंधळे केले (आणि सांगितले), माझ्या शिक्षा - यातनेची व भयपूर्ण तंबीची गोडी चाखा.

Verse 38

وَلَقَدْ صَبَّحَهُم بُكْرَةً عَذَابٌ مُّسْتَقِرٌّ

Transliteration walaqad ṣabbaḥahum buk'ratan ʿadhābun mus'taqirrun

Marathi ३८. आणि निश्चित आहे की त्यांना सकाळीच एका ठिकाणी धरणाऱ्या निर्धारित अज़ाब (ईशशिक्षे) ने नष्ट करून टाकले.

Verse 39

فَذُوقُوا۟ عَذَابِى وَنُذُرِ

Transliteration fadhūqū ʿadhābī wanudhuri

Marathi ३९. तेव्हा माझ्या प्रकोपाचा आणि माझ्या तंबीचा स्वाद चाखा.

Verse 40

وَلَقَدْ يَسَّرْنَا ٱلْقُرْءَانَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad yassarnā l-qur'āna lildhik'ri fahal min muddakirin

Marathi ४०. आणि निःसंशय, आम्ही कुरआनाला बोध आणि उपदेशाकरिता सोपे केले आहे. तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 41

وَلَقَدْ جَآءَ ءَالَ فِرْعَوْنَ ٱلنُّذُرُ

Transliteration walaqad jāa āla fir'ʿawna l-nudhuru

Marathi ४१. आणि फिरऔनच्या लोकांजवळही खबरदार करणारे आले.

Verse 42

كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا كُلِّهَا فَأَخَذْنَـٰهُمْ أَخْذَ عَزِيزٍ مُّقْتَدِرٍ

Transliteration kadhabū biāyātinā kullihā fa-akhadhnāhum akhdha ʿazīzin muq'tadirin

Marathi ४२. त्यांनी आमच्या सर्व निशाण्यांना खोटे ठरविले तेव्हा आम्ही त्यांना मोठ्या जबरदस्त आणि शक्तिशाली पकडणाऱ्याप्रमाणे पकडले.

Verse 43

أَكُفَّارُكُمْ خَيْرٌ مِّنْ أُو۟لَـٰٓئِكُمْ أَمْ لَكُم بَرَآءَةٌ فِى ٱلزُّبُرِ

Transliteration akuffārukum khayrun min ulāikum am lakum barāatun fī l-zuburi

Marathi ४३. (हे मक्काच्या लोकांनो!) काय तुमच्या समुदायातील काफिर त्या समुदायांच्या काफिरांपेक्षा श्रेष्ठ आहेत की तुमच्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये सुटका लिहिलेली आहे?

Verse 44

أَمْ يَقُولُونَ نَحْنُ جَمِيعٌ مُّنتَصِرٌ

Transliteration am yaqūlūna naḥnu jamīʿun muntaṣirun

Marathi ४४. काय हे असे म्हणतात की आम्ही वर्चस्वशाली होणारे लोक आहोत?

Verse 45

سَيُهْزَمُ ٱلْجَمْعُ وَيُوَلُّونَ ٱلدُّبُرَ

Transliteration sayuh'zamu l-jamʿu wayuwallūna l-dubura

Marathi ४५. लवकरच हा समूह पराभूत केला जाईल आणि पाठ दाखवून पळ काढील.

Verse 46

بَلِ ٱلسَّاعَةُ مَوْعِدُهُمْ وَٱلسَّاعَةُ أَدْهَىٰ وَأَمَرُّ

Transliteration bali l-sāʿatu mawʿiduhum wal-sāʿatu adhā wa-amarru

Marathi ४६. किंबहुना कयामतची वेळ, त्यांच्या वायद्याची वेळ आहे आणि कयामत अतिशय कठीण आणि मोठी कटू बाब आहे.

Verse 47

إِنَّ ٱلْمُجْرِمِينَ فِى ضَلَـٰلٍ وَسُعُرٍ

Transliteration inna l-muj'rimīna fī ḍalālin wasuʿurin

Marathi ४७. निःसंशय, अपराधी लोक मार्गभ्रष्टतेत आणि यातनेत आहेत.

Verse 48

يَوْمَ يُسْحَبُونَ فِى ٱلنَّارِ عَلَىٰ وُجُوهِهِمْ ذُوقُوا۟ مَسَّ سَقَرَ

Transliteration yawma yus'ḥabūna fī l-nāri ʿalā wujūhihim dhūqū massa saqara

Marathi ४८. ज्या दिवशी ते तोंडघशी पाडून आगीत फरफटत नेले जातील (आणि त्यांना सांगितले जाईल) जहन्नमच्या आगीच्या स्पर्शाची गोडी चाखा.

Verse 49

إِنَّا كُلَّ شَىْءٍ خَلَقْنَـٰهُ بِقَدَرٍ

Transliteration innā kulla shayin khalaqnāhu biqadarin

Marathi ४९. निःसंशय, आम्ही प्रत्येक गोष्ट एका (निर्धारित) अनुमानावर निर्माण केली आहे.

Verse 50

وَمَآ أَمْرُنَآ إِلَّا وَٰحِدَةٌ كَلَمْحٍۭ بِٱلْبَصَرِ

Transliteration wamā amrunā illā wāḥidatun kalamḥin bil-baṣari

Marathi ५०. आणि आमचा आदेश केवळ एकदा (चा एक शब्द) च असतो, जसे पापणीचे लवणे.

Verse 51

وَلَقَدْ أَهْلَكْنَآ أَشْيَاعَكُمْ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ

Transliteration walaqad ahlaknā ashyāʿakum fahal min muddakirin

Marathi ५१. आणि आम्ही तुमच्यासारख्या कित्येकांना नष्ट करून टाकले आहे, तेव्हा आहे कोणी बोध ग्रहण करणारा?

Verse 52

وَكُلُّ شَىْءٍ فَعَلُوهُ فِى ٱلزُّبُرِ

Transliteration wakullu shayin faʿalūhu fī l-zuburi

Marathi ५२. आणि जे जे (कर्म) त्यांनी केले आहे ते सर्व कर्मपत्रात लिहिलेले आहे.

Verse 53

وَكُلُّ صَغِيرٍ وَكَبِيرٍ مُّسْتَطَرٌ

Transliteration wakullu ṣaghīrin wakabīrin mus'taṭarun

Marathi ५३. (अशा प्रकारे) प्रत्येक लहान मोठी गोष्ट लिहिलेली आहे.

Verse 54

إِنَّ ٱلْمُتَّقِينَ فِى جَنَّـٰتٍ وَنَهَرٍ

Transliteration inna l-mutaqīna fī jannātin wanaharin

Marathi ५४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणारे लोक जन्नत आणि प्रवाहांमध्ये असतील.

Verse 55

فِى مَقْعَدِ صِدْقٍ عِندَ مَلِيكٍ مُّقْتَدِرٍۭ

Transliteration fī maqʿadi ṣid'qin ʿinda malīkin muq'tadirin

Marathi ५५. सचोटी व प्रतिष्ठेच्या स्थानी सामर्थ्यशाली मालका (अल्लाह) जवळ.

Read Surah Al-Qamar in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.