MyDugsiStart learning

Surah Al-Muzzammil in Marathi: translation and audio

Surah 73 · المزمل · The Enshrouded One · 20 verses

Surah Al-Muzzammil verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Muzzammil word by word in English.

Verse 1

يَـٰٓأَيُّهَا ٱلْمُزَّمِّلُ

Transliteration yāayyuhā l-muzamilu

Marathi १. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या,

Verse 2

قُمِ ٱلَّيْلَ إِلَّا قَلِيلًا

Transliteration qumi al-layla illā qalīlan

Marathi २. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ.

Verse 3

نِّصْفَهُۥٓ أَوِ ٱنقُصْ مِنْهُ قَلِيلًا

Transliteration niṣ'fahu awi unquṣ min'hu qalīlan

Marathi ३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी.

Verse 4

أَوْ زِدْ عَلَيْهِ وَرَتِّلِ ٱلْقُرْءَانَ تَرْتِيلًا

Transliteration aw zid ʿalayhi warattili l-qur'āna tartīlan

Marathi ४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा.

Verse 5

إِنَّا سَنُلْقِى عَلَيْكَ قَوْلًا ثَقِيلًا

Transliteration innā sanul'qī ʿalayka qawlan thaqīlan

Marathi ५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू.

Verse 6

إِنَّ نَاشِئَةَ ٱلَّيْلِ هِىَ أَشَدُّ وَطْـًٔا وَأَقْوَمُ قِيلًا

Transliteration inna nāshi-ata al-layli hiya ashaddu waṭan wa-aqwamu qīlan

Marathi ६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे.

Verse 7

إِنَّ لَكَ فِى ٱلنَّهَارِ سَبْحًا طَوِيلًا

Transliteration inna laka fī l-nahāri sabḥan ṭawīlan

Marathi ७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात.

Verse 8

وَٱذْكُرِ ٱسْمَ رَبِّكَ وَتَبَتَّلْ إِلَيْهِ تَبْتِيلًا

Transliteration wa-udh'kuri is'ma rabbika watabattal ilayhi tabtīlan

Marathi ८. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करीत जा आणि संपूर्ण सृष्टी (निर्मिती) पासून अलग होऊन त्याच्याकडे ध्यानमग्न व्हा.

Verse 9

رَّبُّ ٱلْمَشْرِقِ وَٱلْمَغْرِبِ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ فَٱتَّخِذْهُ وَكِيلًا

Transliteration rabbu l-mashriqi wal-maghribi lā ilāha illā huwa fa-ittakhidh'hu wakīlan

Marathi ९. पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी, ज्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तुम्ही त्यालाच आपला कार्यसाधक (व संरक्षक) बनवा.

Verse 10

وَٱصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَٱهْجُرْهُمْ هَجْرًا جَمِيلًا

Transliteration wa-iṣ'bir ʿalā mā yaqūlūna wa-uh'jur'hum hajran jamīlan

Marathi १०. आणि जे काही ते सांगतात, तुम्ही ते सहन करीत राहा आणि त्यांना चांगल्या प्रकारे सोडून द्या.

Verse 11

وَذَرْنِى وَٱلْمُكَذِّبِينَ أُو۟لِى ٱلنَّعْمَةِ وَمَهِّلْهُمْ قَلِيلًا

Transliteration wadharnī wal-mukadhibīna ulī l-naʿmati wamahhil'hum qalīlan

Marathi ११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या.

Verse 12

إِنَّ لَدَيْنَآ أَنكَالًا وَجَحِيمًا

Transliteration inna ladaynā ankālan wajaḥīman

Marathi १२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे.

Verse 13

وَطَعَامًا ذَا غُصَّةٍ وَعَذَابًا أَلِيمًا

Transliteration waṭaʿāman dhā ghuṣṣatin waʿadhāban alīman

Marathi १३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे.

Verse 14

يَوْمَ تَرْجُفُ ٱلْأَرْضُ وَٱلْجِبَالُ وَكَانَتِ ٱلْجِبَالُ كَثِيبًا مَّهِيلًا

Transliteration yawma tarjufu l-arḍu wal-jibālu wakānati l-jibālu kathīban mahīlan

Marathi १४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील.

Verse 15

إِنَّآ أَرْسَلْنَآ إِلَيْكُمْ رَسُولًا شَـٰهِدًا عَلَيْكُمْ كَمَآ أَرْسَلْنَآ إِلَىٰ فِرْعَوْنَ رَسُولًا

Transliteration innā arsalnā ilaykum rasūlan shāhidan ʿalaykum kamā arsalnā ilā fir'ʿawna rasūlan

Marathi १५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता.

Verse 16

فَعَصَىٰ فِرْعَوْنُ ٱلرَّسُولَ فَأَخَذْنَـٰهُ أَخْذًا وَبِيلًا

Transliteration faʿaṣā fir'ʿawnu l-rasūla fa-akhadhnāhu akhdhan wabīlan

Marathi १६. तेव्हा फिरऔनने त्या पैगंबराची अवज्ञा केली तर आम्ही त्याला घोर संकटात धरले.

Verse 17

فَكَيْفَ تَتَّقُونَ إِن كَفَرْتُمْ يَوْمًا يَجْعَلُ ٱلْوِلْدَٰنَ شِيبًا

Transliteration fakayfa tattaqūna in kafartum yawman yajʿalu l-wil'dāna shīban

Marathi १७. तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.१

Verse 18

ٱلسَّمَآءُ مُنفَطِرٌۢ بِهِۦ ۚ كَانَ وَعْدُهُۥ مَفْعُولًا

Transliteration al-samāu munfaṭirun bihi kāna waʿduhu mafʿūlan

Marathi १८. ज्या दिवशी आकाश विदीर्ण होईल, अल्लाहचा हा वायदा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

Verse 19

إِنَّ هَـٰذِهِۦ تَذْكِرَةٌ ۖ فَمَن شَآءَ ٱتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِۦ سَبِيلًا

Transliteration inna hādhihi tadhkiratun faman shāa ittakhadha ilā rabbihi sabīlan

Marathi १९. निःसंशय, हा बोध (उपदेश) आहे, तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे (जाण्या) चा मार्ग पत्करावा.

Verse 20

۞ إِنَّ رَبَّكَ يَعْلَمُ أَنَّكَ تَقُومُ أَدْنَىٰ مِن ثُلُثَىِ ٱلَّيْلِ وَنِصْفَهُۥ وَثُلُثَهُۥ وَطَآئِفَةٌ مِّنَ ٱلَّذِينَ مَعَكَ ۚ وَٱللَّهُ يُقَدِّرُ ٱلَّيْلَ وَٱلنَّهَارَ ۚ عَلِمَ أَن لَّن تُحْصُوهُ فَتَابَ عَلَيْكُمْ ۖ فَٱقْرَءُوا۟ مَا تَيَسَّرَ مِنَ ٱلْقُرْءَانِ ۚ عَلِمَ أَن سَيَكُونُ مِنكُم مَّرْضَىٰ ۙ وَءَاخَرُونَ يَضْرِبُونَ فِى ٱلْأَرْضِ يَبْتَغُونَ مِن فَضْلِ ٱللَّهِ ۙ وَءَاخَرُونَ يُقَـٰتِلُونَ فِى سَبِيلِ ٱللَّهِ ۖ فَٱقْرَءُوا۟ مَا تَيَسَّرَ مِنْهُ ۚ وَأَقِيمُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُوا۟ ٱلزَّكَوٰةَ وَأَقْرِضُوا۟ ٱللَّهَ قَرْضًا حَسَنًا ۚ وَمَا تُقَدِّمُوا۟ لِأَنفُسِكُم مِّنْ خَيْرٍ تَجِدُوهُ عِندَ ٱللَّهِ هُوَ خَيْرًا وَأَعْظَمَ أَجْرًا ۚ وَٱسْتَغْفِرُوا۟ ٱللَّهَ ۖ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌۢ

Transliteration inna rabbaka yaʿlamu annaka taqūmu adnā min thuluthayi al-layli waniṣ'fahu wathuluthahu waṭāifatun mina alladhīna maʿaka wal-lahu yuqaddiru al-layla wal-nahāra ʿalima an lan tuḥ'ṣūhu fatāba ʿalaykum fa-iq'raū mā tayassara mina l-qur'āni ʿalima an sayakūnu minkum marḍā waākharūna yaḍribūna fī l-arḍi yabtaghūna min faḍli l-lahi waākharūna yuqātilūna fī sabīli l-lahi fa-iq'raū mā tayassara min'hu wa-aqīmū l-ṣalata waātū l-zakata wa-aqriḍū l-laha qarḍan ḥasanan wamā tuqaddimū li-anfusikum min khayrin tajidūhu ʿinda l-lahi huwa khayran wa-aʿẓama ajran wa-is'taghfirū l-laha inna l-laha ghafūrun raḥīmun

Marathi २०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुम्ही आणि तुमच्यासोबत असलेल्या लोकांचा एक समूह सुमारे दोन तृतियांश रात्रीला आणि अर्ध्या रात्रीला आणि एक तृतियांश रात्रीला (तहज्जुदच्या नमाजसाठी) उभे राहतात, आणि रात्र-दिवसाचे पूर्ण अनुमान अल्लाहलाच आहे. तो (चांगल्या प्रकारे) जाणतो की तुम्ही ते मुळीच निभावू शकणार नाहीत, तेव्हा त्याने तुमच्यावर कृपा केली, यास्तव जेवढे कुरआन पठण करणे तुम्हाला सहज असेल, तेवढेच पठण करा. तो जाणतो की तुमच्यापैकी काही रोगीही असतील, दुसरे काही जमिनीवर हिंडून फिरून अल्लाहची कृपा (अर्थात रोजीरोटी) शोधतील आणि काही अल्लाहच्या मार्गात जिहादही करतील, तेव्हा तुम्ही जेवढे (कुरआन) पठण सहजपणे करू शकता, तेवढे करा, आणि नमाज नियमितपणे पढत राहा आणि जकात (देखील) देत राहा, आणि अल्लाहला चांगले कर्ज द्या, आणि जी नेकी (सत्कर्मे) तुम्ही आपल्या स्वतःसाठी पुढे पाठवाल ती अल्लाहच्या ठिकाणी सर्वोत्तमरित्या मोबदल्यात अधिक प्राप्त कराल. आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

Read Surah Al-Muzzammil in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.