Surah Al-Hujurat in Marathi: translation and audio
Surah 49 · الحجرات · The Rooms · 18 verses
Surah Al-Hujurat verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Hujurat word by word in English.
Verse 1
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا تُقَدِّمُوا۟ بَيْنَ يَدَىِ ٱللَّهِ وَرَسُولِهِۦ ۖ وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ ۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِيعٌ عَلِيمٌ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā tuqaddimū bayna yadayi l-lahi warasūlihi wa-ittaqū l-laha inna l-laha samīʿun ʿalīmun
Marathi १. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे जाऊ नका१ आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय अल्लाह ऐकणारा, जाणणारा आहे.
Verse 2
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا تَرْفَعُوٓا۟ أَصْوَٰتَكُمْ فَوْقَ صَوْتِ ٱلنَّبِىِّ وَلَا تَجْهَرُوا۟ لَهُۥ بِٱلْقَوْلِ كَجَهْرِ بَعْضِكُمْ لِبَعْضٍ أَن تَحْبَطَ أَعْمَـٰلُكُمْ وَأَنتُمْ لَا تَشْعُرُونَ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā tarfaʿū aṣwātakum fawqa ṣawti l-nabiyi walā tajharū lahu bil-qawli kajahri baʿḍikum libaʿḍin an taḥbaṭa aʿmālukum wa-antum lā tashʿurūna
Marathi २. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपला स्वर (आवाज) पैगंबराच्या स्वरापेक्षा उंचावू नका, आणि त्यांच्याशी अशा प्रकारे उंच स्वरात बोलू नका ज्या प्रकारे आपसात एकमेकांशी बोलता. (कदाचित असे न व्हावे) की तुमची कर्मे वाया जावीत आणि तुम्हाला खबरही न व्हावी.१
Verse 3
إِنَّ ٱلَّذِينَ يَغُضُّونَ أَصْوَٰتَهُمْ عِندَ رَسُولِ ٱللَّهِ أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ ٱمْتَحَنَ ٱللَّهُ قُلُوبَهُمْ لِلتَّقْوَىٰ ۚ لَهُم مَّغْفِرَةٌ وَأَجْرٌ عَظِيمٌ
Transliteration inna alladhīna yaghuḍḍūna aṣwātahum ʿinda rasūli l-lahi ulāika alladhīna im'taḥana l-lahu qulūbahum lilttaqwā lahum maghfiratun wa-ajrun ʿaẓīmun
Marathi ३. वस्तुतः जे लोक पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या समोर आपला स्वर धीमा (खालचा) राखतात, हेच ते लोक होत, ज्यांच्या हृदयांना, अल्लाहने तकवा (अल्लाहच्या भया) करीता पारखून घेतले आहे, त्यांच्यासाठी माफी आहे आणि फार मोठे पुण्य आहे.
Verse 4
إِنَّ ٱلَّذِينَ يُنَادُونَكَ مِن وَرَآءِ ٱلْحُجُرَٰتِ أَكْثَرُهُمْ لَا يَعْقِلُونَ
Transliteration inna alladhīna yunādūnaka min warāi l-ḥujurāti aktharuhum lā yaʿqilūna
Marathi ४. निःसंशय, जे लोक तुम्हाला खोल्यांच्या मागून हाक मारतात, त्यांच्यापैकी अधिकांश (पूर्णतः) निर्बुद्ध आहेत.
Verse 5
وَلَوْ أَنَّهُمْ صَبَرُوا۟ حَتَّىٰ تَخْرُجَ إِلَيْهِمْ لَكَانَ خَيْرًا لَّهُمْ ۚ وَٱللَّهُ غَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration walaw annahum ṣabarū ḥattā takhruja ilayhim lakāna khayran lahum wal-lahu ghafūrun raḥīmun
Marathi ५. आणि जर या लोकांनी येथेपर्यंत धीर संयम राखला असता की तुम्ही (स्वतः) त्यांच्या जवळ आले असते तर हेच त्यांच्यासाठी अधिक चांगले झाले असते, आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.
Verse 6
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓا۟ إِن جَآءَكُمْ فَاسِقٌۢ بِنَبَإٍ فَتَبَيَّنُوٓا۟ أَن تُصِيبُوا۟ قَوْمًۢا بِجَهَـٰلَةٍ فَتُصْبِحُوا۟ عَلَىٰ مَا فَعَلْتُمْ نَـٰدِمِينَ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū in jāakum fāsiqun binaba-in fatabayyanū an tuṣībū qawman bijahālatin fatuṣ'biḥū ʿalā mā faʿaltum nādimīna
Marathi ६. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्हाला एखादा दुराचारी खबर देईल तर तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे चौकशी करून घेत जा (असे न व्हावे) की अजाणतेपणामुळे तुम्ही एखाद्या समुदायाला हानी पोहचवावी, मग नंतर आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करू लागावे.
Verse 7
وَٱعْلَمُوٓا۟ أَنَّ فِيكُمْ رَسُولَ ٱللَّهِ ۚ لَوْ يُطِيعُكُمْ فِى كَثِيرٍ مِّنَ ٱلْأَمْرِ لَعَنِتُّمْ وَلَـٰكِنَّ ٱللَّهَ حَبَّبَ إِلَيْكُمُ ٱلْإِيمَـٰنَ وَزَيَّنَهُۥ فِى قُلُوبِكُمْ وَكَرَّهَ إِلَيْكُمُ ٱلْكُفْرَ وَٱلْفُسُوقَ وَٱلْعِصْيَانَ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلرَّٰشِدُونَ
Transliteration wa-iʿ'lamū anna fīkum rasūla l-lahi law yuṭīʿukum fī kathīrin mina l-amri laʿanittum walākinna l-laha ḥabbaba ilaykumu l-īmāna wazayyanahu fī qulūbikum wakarraha ilaykumu l-kuf'ra wal-fusūqa wal-ʿiṣ'yāna ulāika humu l-rāshidūna
Marathi ७. आणि जाणून असा की तुमच्या दरम्यान अल्लाहचा पैगंबर हजर आहे जर बहुतेक गोष्टींमध्ये ते तुमचे म्हणणे मानत राहिले तर तुम्ही अडचणीत पडाल, परंतु अल्लाहने तुमच्यासाठी ईमानास प्रिय बनविले आणि त्यास तुमच्या हृदयात सुशोभित केले आहे आणि कुप्र (इन्कार) ला आणि दुष्कर्मांना व अवज्ञाकारितेला तुमच्या नजरेत अप्रिय बनवेले आहे. हेच लोक सन्मार्ग प्राप्त झालेले आहेत.
Verse 8
فَضْلًا مِّنَ ٱللَّهِ وَنِعْمَةً ۚ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٌ
Transliteration faḍlan mina l-lahi waniʿ'matan wal-lahu ʿalīmun ḥakīmun
Marathi ८. अल्लाहच्या कृपा आणि अनुग्रहाने, आणि अल्लाह जाणणारा व बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे.
Verse 9
وَإِن طَآئِفَتَانِ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ ٱقْتَتَلُوا۟ فَأَصْلِحُوا۟ بَيْنَهُمَا ۖ فَإِنۢ بَغَتْ إِحْدَىٰهُمَا عَلَى ٱلْأُخْرَىٰ فَقَـٰتِلُوا۟ ٱلَّتِى تَبْغِى حَتَّىٰ تَفِىٓءَ إِلَىٰٓ أَمْرِ ٱللَّهِ ۚ فَإِن فَآءَتْ فَأَصْلِحُوا۟ بَيْنَهُمَا بِٱلْعَدْلِ وَأَقْسِطُوٓا۟ ۖ إِنَّ ٱللَّهَ يُحِبُّ ٱلْمُقْسِطِينَ
Transliteration wa-in ṭāifatāni mina l-mu'minīna iq'tatalū fa-aṣliḥū baynahumā fa-in baghat iḥ'dāhumā ʿalā l-ukh'rā faqātilū allatī tabghī ḥattā tafīa ilā amri l-lahi fa-in fāat fa-aṣliḥū baynahumā bil-ʿadli wa-aqsiṭū inna l-laha yuḥibbu l-muq'siṭīna
Marathi ९. आणि जर मुसलमानांचे दोन गट आपसात लढू लागतील तर त्याच्यात समेट (मिलाफ) घडवून आणा, मग जर त्यांच्यापैकी एक गट दुसऱ्या गटावर अत्याचार करील, तर तुम्ही (सर्व) अत्याचार करणाऱ्या गटाशी लढा. येथे पर्यर्ंत की तो अल्लाहच्या आदेशाकडे परत यावा,१ जर परतून आला तर न्यायपूर्वक त्यांच्या दरम्यान समजोता करा आणि न्याय करा. निःसंशय, अल्लाह न्याय करणाऱ्यांशी प्रेम राखतो.
Verse 10
إِنَّمَا ٱلْمُؤْمِنُونَ إِخْوَةٌ فَأَصْلِحُوا۟ بَيْنَ أَخَوَيْكُمْ ۚ وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
Transliteration innamā l-mu'minūna ikh'watun fa-aṣliḥū bayna akhawaykum wa-ittaqū l-laha laʿallakum tur'ḥamūna
Marathi १०. (लक्षात ठेवा) समस्त ईमान राखणारे (आपसात) भाऊ भाऊ आहेत, तेव्हा आपल्या दोन बांधवांच्या दरम्यान समेट (मिलाफ) करून देत राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा, यासाठी की तुमच्यावर दया कृपा केली जावी.
Verse 11
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ لَا يَسْخَرْ قَوْمٌ مِّن قَوْمٍ عَسَىٰٓ أَن يَكُونُوا۟ خَيْرًا مِّنْهُمْ وَلَا نِسَآءٌ مِّن نِّسَآءٍ عَسَىٰٓ أَن يَكُنَّ خَيْرًا مِّنْهُنَّ ۖ وَلَا تَلْمِزُوٓا۟ أَنفُسَكُمْ وَلَا تَنَابَزُوا۟ بِٱلْأَلْقَـٰبِ ۖ بِئْسَ ٱلِٱسْمُ ٱلْفُسُوقُ بَعْدَ ٱلْإِيمَـٰنِ ۚ وَمَن لَّمْ يَتُبْ فَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلظَّـٰلِمُونَ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū lā yaskhar qawmun min qawmin ʿasā an yakūnū khayran min'hum walā nisāon min nisāin ʿasā an yakunna khayran min'hunna walā talmizū anfusakum walā tanābazū bil-alqābi bi'sa l-s'mu l-fusūqu baʿda l-īmāni waman lam yatub fa-ulāika humu l-ẓālimūna
Marathi ११. हे ईमान राखणाऱ्यांनो! पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची थट्टा उडवू नये, संभवतः ते यांच्याहून अधिक चांगले असावेत आणि ना स्त्रियांनी (इतर) स्त्रियांची थट्टा करावी. संभवतः त्या, त्यांच्याहून अधिक चांगल्या असाव्यात, आणि आपसात एकमेकांवर दोषारोप ठेवू नका आणि ना एखाद्याला वाईट टोपण नाव द्या. ईमानानंतर फिस्क (वाईट शब्द) वाईट नाव आहे। आणि जे क्षमा-याचना न करतील, तर तेच अत्याचारी लोक आहेत.
Verse 12
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ ٱجْتَنِبُوا۟ كَثِيرًا مِّنَ ٱلظَّنِّ إِنَّ بَعْضَ ٱلظَّنِّ إِثْمٌ ۖ وَلَا تَجَسَّسُوا۟ وَلَا يَغْتَب بَّعْضُكُم بَعْضًا ۚ أَيُحِبُّ أَحَدُكُمْ أَن يَأْكُلَ لَحْمَ أَخِيهِ مَيْتًا فَكَرِهْتُمُوهُ ۚ وَٱتَّقُوا۟ ٱللَّهَ ۚ إِنَّ ٱللَّهَ تَوَّابٌ رَّحِيمٌ
Transliteration yāayyuhā alladhīna āmanū ij'tanibū kathīran mina l-ẓani inna baʿḍa l-ẓani ith'mun walā tajassasū walā yaghtab baʿḍukum baʿḍan ayuḥibbu aḥadukum an yakula laḥma akhīhi maytan fakarih'tumūhu wa-ittaqū l-laha inna l-laha tawwābun raḥīmun
Marathi १२. हे ईमान राखणाऱ्यांनो! अनेक वाईट तर्क (दुराग्रह) करण्यापासून दूर राहा, विश्वास राखा की काही तर्क अपराध आहेत आणि भेद (जाणून घेण्यासाठी) पाळतीवर राहू नका आणि ना तुमच्यापैकी कोणी एखाद्याची निदा-नालस्ती (त्याच्या पश्चात) करावी. काय तुमच्यापैकी कोणीही आपल्या मेलेल्या भावाचे मांस खाणे पसंत करतो? तुम्हाला तर त्या गोष्टीचा तिरस्कारच वाटेल आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह माफी कबूल करणारा दयाशील आहे.
Verse 13
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِنَّا خَلَقْنَـٰكُم مِّن ذَكَرٍ وَأُنثَىٰ وَجَعَلْنَـٰكُمْ شُعُوبًا وَقَبَآئِلَ لِتَعَارَفُوٓا۟ ۚ إِنَّ أَكْرَمَكُمْ عِندَ ٱللَّهِ أَتْقَىٰكُمْ ۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمٌ خَبِيرٌ
Transliteration yāayyuhā l-nāsu innā khalaqnākum min dhakarin wa-unthā wajaʿalnākum shuʿūban waqabāila litaʿārafū inna akramakum ʿinda l-lahi atqākum inna l-laha ʿalīmun khabīrun
Marathi १३. लोकांनो! आम्ही तुम्हाला एकाच पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण केले आहे आणि यासाठी की तुम्ही आपसात एकमेकांना ओळखावे, अनेक जाती आणि प्रजाती बनविल्या, अल्लाहच्या नजरेत तुम्हा सर्वांत प्रतिष्ठासंपन्न तो आहे, जो सर्वांत जास्त (अल्लाहचे) भय बाळगणारा आहे.१ निःसंशय, अल्लाह जाणणारा, चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 14
۞ قَالَتِ ٱلْأَعْرَابُ ءَامَنَّا ۖ قُل لَّمْ تُؤْمِنُوا۟ وَلَـٰكِن قُولُوٓا۟ أَسْلَمْنَا وَلَمَّا يَدْخُلِ ٱلْإِيمَـٰنُ فِى قُلُوبِكُمْ ۖ وَإِن تُطِيعُوا۟ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ لَا يَلِتْكُم مِّنْ أَعْمَـٰلِكُمْ شَيْـًٔا ۚ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration qālati l-aʿrābu āmannā qul lam tu'minū walākin qūlū aslamnā walammā yadkhuli l-īmānu fī qulūbikum wa-in tuṭīʿū l-laha warasūlahu lā yalit'kum min aʿmālikum shayan inna l-laha ghafūrun raḥīmun
Marathi १४. ग्रामीण लोक म्हणतात की आम्ही ईमान राखले. (तुम्ही) सांगा की, तुम्ही ईमान राखले नाही, परंतु तुम्ही असे म्हणा की आम्ही इस्लामचा स्वीकार केला (विरोध सोडून आज्ञाधारक झालोत) वास्तविक अजूनपर्यंत ईमान तुमच्या हृदयात दाखल झालेच नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करू लागाल तर अल्लाह तुमच्या कर्मांमधून काहीच घटविणार नाही. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.
Verse 15
إِنَّمَا ٱلْمُؤْمِنُونَ ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ ثُمَّ لَمْ يَرْتَابُوا۟ وَجَـٰهَدُوا۟ بِأَمْوَٰلِهِمْ وَأَنفُسِهِمْ فِى سَبِيلِ ٱللَّهِ ۚ أُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلصَّـٰدِقُونَ
Transliteration innamā l-mu'minūna alladhīna āmanū bil-lahi warasūlihi thumma lam yartābū wajāhadū bi-amwālihim wa-anfusihim fī sabīli l-lahi ulāika humu l-ṣādiqūna
Marathi १५. ईमान राखणारे (खरे) तर ते आहेत, जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर (मजबूत) ईमान राखतील, मग शंका संशय न करतील आणि आपल्या धनाने आणि आपल्या प्राणाने अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध) करीत राहतील (आपल्या ईमानाच्या दाव्यात) हेच सच्चे आहेत.
Verse 16
قُلْ أَتُعَلِّمُونَ ٱللَّهَ بِدِينِكُمْ وَٱللَّهُ يَعْلَمُ مَا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَمَا فِى ٱلْأَرْضِ ۚ وَٱللَّهُ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌ
Transliteration qul atuʿallimūna l-laha bidīnikum wal-lahu yaʿlamu mā fī l-samāwāti wamā fī l-arḍi wal-lahu bikulli shayin ʿalīmun
Marathi १६. सांगा की काय तुम्ही अल्लाहला आपल्या धार्मिकतेची जाणीव करून देत आहात? अल्लाह, ते सर्व काही जे आकाशांमध्ये आणि धरतीत आहे, चांगल्या प्रकारे जाणतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.
Verse 17
يَمُنُّونَ عَلَيْكَ أَنْ أَسْلَمُوا۟ ۖ قُل لَّا تَمُنُّوا۟ عَلَىَّ إِسْلَـٰمَكُم ۖ بَلِ ٱللَّهُ يَمُنُّ عَلَيْكُمْ أَنْ هَدَىٰكُمْ لِلْإِيمَـٰنِ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration yamunnūna ʿalayka an aslamū qul lā tamunnū ʿalayya is'lāmakum bali l-lahu yamunnu ʿalaykum an hadākum lil'īmāni in kuntum ṣādiqīna
Marathi १७. ते तुम्हाला आपल्या मुसलमान होण्याचा उपकार जाणिवतात. (तुम्ही) सांगा की आपल्या मुसलमान होण्याचा उपकार माझ्यावर ठेवू नका, किंबहुना अल्लाहचा तुमच्यावर उपकार आहे की त्याने तुम्हाला ईमानकडे मार्गदर्शन केले, जर तुम्ही सच्चे असाल.
Verse 18
إِنَّ ٱللَّهَ يَعْلَمُ غَيْبَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ وَٱللَّهُ بَصِيرٌۢ بِمَا تَعْمَلُونَ
Transliteration inna l-laha yaʿlamu ghayba l-samāwāti wal-arḍi wal-lahu baṣīrun bimā taʿmalūna
Marathi १८. निःसंशय, आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व लपलेल्या गोष्टी अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो, आणि जे काही तुम्ही करीत आहात, ते अल्लाह चांगल्या प्रकारे पाहत आहे.
Read Surah Al-Hujurat in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.