Surah Al-An'am in Marathi: translation and audio
Surah 6 · الأنعام · The Cattle · 165 verses
Surah Al-An'am verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-An'am word by word in English.
Verse 1
ٱلْحَمْدُ لِلَّهِ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَجَعَلَ ٱلظُّلُمَـٰتِ وَٱلنُّورَ ۖ ثُمَّ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ بِرَبِّهِمْ يَعْدِلُونَ
Transliteration al-ḥamdu lillahi alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa wajaʿala l-ẓulumāti wal-nūra thumma alladhīna kafarū birabbihim yaʿdilūna
Marathi १. सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले आणि अंधःकार व प्रकाश बनविला तरीदेखील ईमान न राखणारे लोक (इतरांना) आपल्या पालनकर्त्याच्या बरोबरीचा मानतात.
Verse 2
هُوَ ٱلَّذِى خَلَقَكُم مِّن طِينٍ ثُمَّ قَضَىٰٓ أَجَلًا ۖ وَأَجَلٌ مُّسَمًّى عِندَهُۥ ۖ ثُمَّ أَنتُمْ تَمْتَرُونَ
Transliteration huwa alladhī khalaqakum min ṭīnin thumma qaḍā ajalan wa-ajalun musamman ʿindahu thumma antum tamtarūna
Marathi २. त्यानेच तुम्हाला मातीपासून घडविले, मग एक अवधी ठरविला आणि एक निर्धारीत अवधी त्याच्याजवळ आहे तरीही तुम्ही संशयात पडले आहाता?
Verse 3
وَهُوَ ٱللَّهُ فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَفِى ٱلْأَرْضِ ۖ يَعْلَمُ سِرَّكُمْ وَجَهْرَكُمْ وَيَعْلَمُ مَا تَكْسِبُونَ
Transliteration wahuwa l-lahu fī l-samāwāti wafī l-arḍi yaʿlamu sirrakum wajahrakum wayaʿlamu mā taksibūna
Marathi ३. आणि तोच अल्लाह आहे आकाशांमध्ये आणि जमिनीवर. तो तुमचे गुप्त भेद व जाहीर सर्व काही जाणतो आणि तुमच्या कमाईला जाणून आहे.१
Verse 4
وَمَا تَأْتِيهِم مِّنْ ءَايَةٍ مِّنْ ءَايَـٰتِ رَبِّهِمْ إِلَّا كَانُوا۟ عَنْهَا مُعْرِضِينَ
Transliteration wamā tatīhim min āyatin min āyāti rabbihim illā kānū ʿanhā muʿ'riḍīna
Marathi ४. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याच्या निशाण्यांपैकी कोणतीही निशाणी आणली गेली तरीही ते तिच्यापासून तोंड फिरवितात.
Verse 5
فَقَدْ كَذَّبُوا۟ بِٱلْحَقِّ لَمَّا جَآءَهُمْ ۖ فَسَوْفَ يَأْتِيهِمْ أَنۢبَـٰٓؤُا۟ مَا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration faqad kadhabū bil-ḥaqi lammā jāahum fasawfa yatīhim anbāu mā kānū bihi yastahziūna
Marathi ५. त्यांनी त्या सत्य-ग्रंथालाही खोटे ठरविले, जेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचला तेव्हा लवकरच त्यांना खबर मिळेल त्या गोष्टीची जिची ते थट्टा उडवित होते.
Verse 6
أَلَمْ يَرَوْا۟ كَمْ أَهْلَكْنَا مِن قَبْلِهِم مِّن قَرْنٍ مَّكَّنَّـٰهُمْ فِى ٱلْأَرْضِ مَا لَمْ نُمَكِّن لَّكُمْ وَأَرْسَلْنَا ٱلسَّمَآءَ عَلَيْهِم مِّدْرَارًا وَجَعَلْنَا ٱلْأَنْهَـٰرَ تَجْرِى مِن تَحْتِهِمْ فَأَهْلَكْنَـٰهُم بِذُنُوبِهِمْ وَأَنشَأْنَا مِنۢ بَعْدِهِمْ قَرْنًا ءَاخَرِينَ
Transliteration alam yaraw kam ahlaknā min qablihim min qarnin makkannāhum fī l-arḍi mā lam numakkin lakum wa-arsalnā l-samāa ʿalayhim mid'rāran wajaʿalnā l-anhāra tajrī min taḥtihim fa-ahlaknāhum bidhunūbihim wa-anshanā min baʿdihim qarnan ākharīna
Marathi ६. काय त्यांनी पाहिले नाही की आम्ही त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकले, ज्यांना आम्ही या जगात एवढे सामर्थ्य प्रदान केले होते तसे तुम्हालाही प्रदान केले नाही आणि आम्ही त्यांच्यावर मुसळधार पाऊस पाडला आणि आम्ही त्यांच्या खालून जलप्रवाह जारी केले, मग आम्ही त्यांना त्यांच्या अपराधांपायी बरबाद करून टाकले आणि त्यांच्यानंतर दुसरा जनसमूह निर्माण केला.
Verse 7
وَلَوْ نَزَّلْنَا عَلَيْكَ كِتَـٰبًا فِى قِرْطَاسٍ فَلَمَسُوهُ بِأَيْدِيهِمْ لَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِنْ هَـٰذَآ إِلَّا سِحْرٌ مُّبِينٌ
Transliteration walaw nazzalnā ʿalayka kitāban fī qir'ṭāsin falamasūhu bi-aydīhim laqāla alladhīna kafarū in hādhā illā siḥ'run mubīnun
Marathi ७. आणि जर आम्ही कागदावर लिहिलेला एखादा ग्रंथ जरी तुमच्यावर उतरविला असता, आणि त्यास या लोकांनी आपल्या हातांनी स्पर्शही केला असता, तरीदेखील हे इन्कारी लोक असेच म्हणाले असते की ही तर उघड जादू आहे आणखी काही नाही.
Verse 8
وَقَالُوا۟ لَوْلَآ أُنزِلَ عَلَيْهِ مَلَكٌ ۖ وَلَوْ أَنزَلْنَا مَلَكًا لَّقُضِىَ ٱلْأَمْرُ ثُمَّ لَا يُنظَرُونَ
Transliteration waqālū lawlā unzila ʿalayhi malakun walaw anzalnā malakan laquḍiya l-amru thumma lā yunẓarūna
Marathi ८. आणि ते म्हणाले, तुमच्यावर एखादाा फरिश्ता का नाही उतरविला गेला? आणि जर आम्ही फरिश्ता उतरविला असता तर सारा किस्साच पूर्ण झाला असता, मग त्यांना (थोडासाही) अवसर दिला गेला नसता.
Verse 9
وَلَوْ جَعَلْنَـٰهُ مَلَكًا لَّجَعَلْنَـٰهُ رَجُلًا وَلَلَبَسْنَا عَلَيْهِم مَّا يَلْبِسُونَ
Transliteration walaw jaʿalnāhu malakan lajaʿalnāhu rajulan walalabasnā ʿalayhim mā yalbisūna
Marathi ९. आणि जर आम्ही पैगंबराला फरिश्ता बनविले असते तर त्याला पुरुष रूप दिले असते आणि तरीदेखील त्यावर त्याच लोकांनी संशय घेतला असता, जे या क्षणी संशय घेत आहेत.
Verse 10
وَلَقَدِ ٱسْتُهْزِئَ بِرُسُلٍ مِّن قَبْلِكَ فَحَاقَ بِٱلَّذِينَ سَخِرُوا۟ مِنْهُم مَّا كَانُوا۟ بِهِۦ يَسْتَهْزِءُونَ
Transliteration walaqadi us'tuh'zi-a birusulin min qablika faḥāqa bi-alladhīna sakhirū min'hum mā kānū bihi yastahziūna
Marathi १०. आणि तुमच्यापूर्वी अनेक पैगंबरांची थट्टा उडविली गेली, तर ते थट्टा उडवित होते, त्यांच्या त्या थट्टा-मस्करीचा दुष्परिणाम त्यांच्यावर उलटला.
Verse 11
قُلْ سِيرُوا۟ فِى ٱلْأَرْضِ ثُمَّ ٱنظُرُوا۟ كَيْفَ كَانَ عَـٰقِبَةُ ٱلْمُكَذِّبِينَ
Transliteration qul sīrū fī l-arḍi thumma unẓurū kayfa kāna ʿāqibatu l-mukadhibīna
Marathi ११. तुम्ही सांगा, जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहा की खोटे ठरविणाऱ्यांचा कसा अंत झाला!
Verse 12
قُل لِّمَن مَّا فِى ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ قُل لِّلَّهِ ۚ كَتَبَ عَلَىٰ نَفْسِهِ ٱلرَّحْمَةَ ۚ لَيَجْمَعَنَّكُمْ إِلَىٰ يَوْمِ ٱلْقِيَـٰمَةِ لَا رَيْبَ فِيهِ ۚ ٱلَّذِينَ خَسِرُوٓا۟ أَنفُسَهُمْ فَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration qul liman mā fī l-samāwāti wal-arḍi qul lillahi kataba ʿalā nafsihi l-raḥmata layajmaʿannakum ilā yawmi l-qiyāmati lā rayba fīhi alladhīna khasirū anfusahum fahum lā yu'minūna
Marathi १२. तुम्ही सांगा की, जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे ते सर्व कोणाच्या मालकीचे आहे? तुम्ही सांगा, सर्व काही अल्लाहच्याच मालकीचे आहे. दया कृपा करणे अल्लाहने स्वतःवर अनिवार्य करून घेतले आहे. तुम्हाला अल्लाह कयामतच्या दिवशी एकत्र करील, यात मुळीच शंका नाही. ज्या लोकांनी स्वतःचा सर्वनाश करून घेतला आहे, तेच ईमान राखणारे नाहीत.
Verse 13
۞ وَلَهُۥ مَا سَكَنَ فِى ٱلَّيْلِ وَٱلنَّهَارِ ۚ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ
Transliteration walahu mā sakana fī al-layli wal-nahāri wahuwa l-samīʿu l-ʿalīmu
Marathi १३. आणि जे काही दिवस आणि रात्रीत राहते ते सर्व काही अल्लाहचेच आहे आणि अल्लाह खूप ऐकणारा आणि मोठा जाणणारा आहे.
Verse 14
قُلْ أَغَيْرَ ٱللَّهِ أَتَّخِذُ وَلِيًّا فَاطِرِ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَهُوَ يُطْعِمُ وَلَا يُطْعَمُ ۗ قُلْ إِنِّىٓ أُمِرْتُ أَنْ أَكُونَ أَوَّلَ مَنْ أَسْلَمَ ۖ وَلَا تَكُونَنَّ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ
Transliteration qul aghayra l-lahi attakhidhu waliyyan fāṭiri l-samāwāti wal-arḍi wahuwa yuṭ'ʿimu walā yuṭ'ʿamu qul innī umir'tu an akūna awwala man aslama walā takūnanna mina l-mush'rikīna
Marathi १४. तुम्ही सांगा, काय मी त्या अल्लाहशिवाय दुसऱ्याला आपला सहाय्यक मित्र बनवू, जो आकाशांचा व जमिनीचा रचयिता आहे आणि तो सर्वांना खाऊ घालतो, त्याला कोणी खाऊ घालत नाही. तुम्ही सांगा, मला हा आदेश दिला गेला आहे की मी त्या सर्वांत प्रथम राहावे, ज्यांनी अल्लाहसाठी आत्मसमर्पण केले आणि अनेकेश्वरवाद्यांपैकी कधीही न राहावे.
Verse 15
قُلْ إِنِّىٓ أَخَافُ إِنْ عَصَيْتُ رَبِّى عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
Transliteration qul innī akhāfu in ʿaṣaytu rabbī ʿadhāba yawmin ʿaẓīmin
Marathi १५. तुम्ही सांगा की मी जर आपल्या पालनकर्त्याचा आदेश मानला नाही तर एका मोठ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा-यातने) चे मला भय वाटते.
Verse 16
مَّن يُصْرَفْ عَنْهُ يَوْمَئِذٍ فَقَدْ رَحِمَهُۥ ۚ وَذَٰلِكَ ٱلْفَوْزُ ٱلْمُبِينُ
Transliteration man yuṣ'raf ʿanhu yawma-idhin faqad raḥimahu wadhālika l-fawzu l-mubīnu
Marathi १६. ज्याच्यावरून हा अज़ाब त्या दिवशी हटविला गेला, तर त्याच्यावर अल्लाहने फार मोठी दया केली आणि ही स्पष्ट अशी सफलता आहे.
Verse 17
وَإِن يَمْسَسْكَ ٱللَّهُ بِضُرٍّ فَلَا كَاشِفَ لَهُۥٓ إِلَّا هُوَ ۖ وَإِن يَمْسَسْكَ بِخَيْرٍ فَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ قَدِيرٌ
Transliteration wa-in yamsaska l-lahu biḍurrin falā kāshifa lahu illā huwa wa-in yamsaska bikhayrin fahuwa ʿalā kulli shayin qadīrun
Marathi १७. आणि जर अल्लाह तुम्हाला काही त्रास-यातना देईल तर तिला दूर करणारा अल्लाहशिवाय अन्य कोणीही नाही आणि जर अल्लाह तुम्हाला लाभ प्रदान करील तर तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
Verse 18
وَهُوَ ٱلْقَاهِرُ فَوْقَ عِبَادِهِۦ ۚ وَهُوَ ٱلْحَكِيمُ ٱلْخَبِيرُ
Transliteration wahuwa l-qāhiru fawqa ʿibādihi wahuwa l-ḥakīmu l-khabīru
Marathi १८. तोच आपल्या दासांवर प्रभावशाली आणि वर्चस्वशाली आहे आणि तोच हिकमत बाळगणारा, खबर राखणारा आहे.
Verse 19
قُلْ أَىُّ شَىْءٍ أَكْبَرُ شَهَـٰدَةً ۖ قُلِ ٱللَّهُ ۖ شَهِيدٌۢ بَيْنِى وَبَيْنَكُمْ ۚ وَأُوحِىَ إِلَىَّ هَـٰذَا ٱلْقُرْءَانُ لِأُنذِرَكُم بِهِۦ وَمَنۢ بَلَغَ ۚ أَئِنَّكُمْ لَتَشْهَدُونَ أَنَّ مَعَ ٱللَّهِ ءَالِهَةً أُخْرَىٰ ۚ قُل لَّآ أَشْهَدُ ۚ قُلْ إِنَّمَا هُوَ إِلَـٰهٌ وَٰحِدٌ وَإِنَّنِى بَرِىٓءٌ مِّمَّا تُشْرِكُونَ
Transliteration qul ayyu shayin akbaru shahādatan quli l-lahu shahīdun baynī wabaynakum waūḥiya ilayya hādhā l-qur'ānu li-undhirakum bihi waman balagha a-innakum latashhadūna anna maʿa l-lahi ālihatan ukh'rā qul lā ashhadu qul innamā huwa ilāhun wāḥidun wa-innanī barīon mimmā tush'rikūna
Marathi १९. तुम्ही सांगा की कोणाची साक्ष मोठी आहे? सांगा की आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी आहे आणि हा कुरआन माझ्याकडे वहयी (अवतरीत) केला गेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल, त्या सर्वांना सचेत करावे.१ काय तुम्ही साक्ष देता की अल्लाहसोबत अन्य इतर उपास्ये (माबूद) आहेत? तुम्ही सांगा की मी या गोष्टीची साक्ष नाही देत. तुम्ही सांगा, तो एकच उपासना करण्यायोग्य आहे आणि मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे.
Verse 20
ٱلَّذِينَ ءَاتَيْنَـٰهُمُ ٱلْكِتَـٰبَ يَعْرِفُونَهُۥ كَمَا يَعْرِفُونَ أَبْنَآءَهُمُ ۘ ٱلَّذِينَ خَسِرُوٓا۟ أَنفُسَهُمْ فَهُمْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration alladhīna ātaynāhumu l-kitāba yaʿrifūnahu kamā yaʿrifūna abnāahumu alladhīna khasirū anfusahum fahum lā yu'minūna
Marathi २०. ज्यांना आम्ही ग्रंथ (तौरात आणि इंजील) दिला आहे ते तुम्हाला (हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना) त्याचप्रमाणे ओळखतात, ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ओळखतात. जे स्वतः आपल्याला हरवून बसले आहेत, तेच ईमान राखणार नाहीत.
Verse 21
وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ ٱفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا أَوْ كَذَّبَ بِـَٔايَـٰتِهِۦٓ ۗ إِنَّهُۥ لَا يُفْلِحُ ٱلظَّـٰلِمُونَ
Transliteration waman aẓlamu mimmani if'tarā ʿalā l-lahi kadhiban aw kadhaba biāyātihi innahu lā yuf'liḥu l-ẓālimūna
Marathi २१. आणि या हून मोठा अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहवर खोटा आळ घेईल त्याच्या निशाण्यां (प्रतिकां) ना खोटे जाणेल. निःसंशय, अत्याचारी लोक सफल होत नाहीत.
Verse 22
وَيَوْمَ نَحْشُرُهُمْ جَمِيعًا ثُمَّ نَقُولُ لِلَّذِينَ أَشْرَكُوٓا۟ أَيْنَ شُرَكَآؤُكُمُ ٱلَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ
Transliteration wayawma naḥshuruhum jamīʿan thumma naqūlu lilladhīna ashrakū ayna shurakāukumu alladhīna kuntum tazʿumūna
Marathi २२. आणि ज्या दिवशी आम्ही सर्वांना एकत्र करू, मंग ज्यांनी अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी ठरविले, त्यांना सांगू, कोठे आहेत ते, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी जाणत होते (तो दिवस आठवतो).
Verse 23
ثُمَّ لَمْ تَكُن فِتْنَتُهُمْ إِلَّآ أَن قَالُوا۟ وَٱللَّهِ رَبِّنَا مَا كُنَّا مُشْرِكِينَ
Transliteration thumma lam takun fit'natuhum illā an qālū wal-lahi rabbinā mā kunnā mush'rikīna
Marathi २३. मग त्यांच्या शिर्कची, याखेरीज कोणतीही सबब नसेल की म्हणतील, आमच्या पालनकर्त्या अल्लाहची शपथ, आम्ही अनेक ईश्वरांची उपासना करणारे नव्हतो. १
Verse 24
ٱنظُرْ كَيْفَ كَذَبُوا۟ عَلَىٰٓ أَنفُسِهِمْ ۚ وَضَلَّ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَفْتَرُونَ
Transliteration unẓur kayfa kadhabū ʿalā anfusihim waḍalla ʿanhum mā kānū yaftarūna
Marathi २४. बघा, आपल्याविषयी त्यांनी कसे खोटे सांगितले आणि त्यांचे ते मिथ्या आरोप त्यांच्याकडून हरवले, गायब झाले.
Verse 25
وَمِنْهُم مَّن يَسْتَمِعُ إِلَيْكَ ۖ وَجَعَلْنَا عَلَىٰ قُلُوبِهِمْ أَكِنَّةً أَن يَفْقَهُوهُ وَفِىٓ ءَاذَانِهِمْ وَقْرًا ۚ وَإِن يَرَوْا۟ كُلَّ ءَايَةٍ لَّا يُؤْمِنُوا۟ بِهَا ۚ حَتَّىٰٓ إِذَا جَآءُوكَ يُجَـٰدِلُونَكَ يَقُولُ ٱلَّذِينَ كَفَرُوٓا۟ إِنْ هَـٰذَآ إِلَّآ أَسَـٰطِيرُ ٱلْأَوَّلِينَ
Transliteration wamin'hum man yastamiʿu ilayka wajaʿalnā ʿalā qulūbihim akinnatan an yafqahūhu wafī ādhānihim waqran wa-in yaraw kulla āyatin lā yu'minū bihā ḥattā idhā jāūka yujādilūnaka yaqūlu alladhīna kafarū in hādhā illā asāṭīru l-awalīna
Marathi २५. त्यांच्यापैकी काहीजण तुमच्याकडे कान लावून बसतात आणि आम्ही त्यांच्या हृदयांवर पडदे टाकून ठेवले आहेत की त्यास समजावे आणि त्यांचे कान बधीर आहेत आणि सर्व निशाण्या त्यांनी पाहून घेतल्या तरीही त्यांच्यावर ईमान राखणार नाहीत, येथपर्यंत की जेव्हा ते तुमच्याजवळ येतात, भांडण करतात, ईमान न राखणारे म्हणतात की या सर्व थोर बुजूर्ग लोकांच्या कथा-कहाण्या आहेत.
Verse 26
وَهُمْ يَنْهَوْنَ عَنْهُ وَيَنْـَٔوْنَ عَنْهُ ۖ وَإِن يُهْلِكُونَ إِلَّآ أَنفُسَهُمْ وَمَا يَشْعُرُونَ
Transliteration wahum yanhawna ʿanhu wayanawna ʿanhu wa-in yuh'likūna illā anfusahum wamā yashʿurūna
Marathi २६. आणि हे लोक याच्यापासून दुसऱ्यांनाही रोखतात आणि स्वतःदेखील दूर दूर राहतात आणि हे स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेत आणि ध्यानी घेत नाही.
Verse 27
وَلَوْ تَرَىٰٓ إِذْ وُقِفُوا۟ عَلَى ٱلنَّارِ فَقَالُوا۟ يَـٰلَيْتَنَا نُرَدُّ وَلَا نُكَذِّبَ بِـَٔايَـٰتِ رَبِّنَا وَنَكُونَ مِنَ ٱلْمُؤْمِنِينَ
Transliteration walaw tarā idh wuqifū ʿalā l-nāri faqālū yālaytanā nuraddu walā nukadhiba biāyāti rabbinā wanakūna mina l-mu'minīna
Marathi २७. आणि जर तुम्ही त्या वेळी पाहाल, जेव्हा या लोकांना जहन्नमच्या जवळ उभे केले जाईल, तेव्हा म्हणतील, अरेरे! आम्हाला पुन्हा परत पाठविले गेले तर किती चांगले होईल (आणि असे झाल्यास) तर आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या निशाण्यांना खोटे ठरवणार नाही आणि आम्ही ईमान राखणाऱ्यांपैकी होऊ.
Verse 28
بَلْ بَدَا لَهُم مَّا كَانُوا۟ يُخْفُونَ مِن قَبْلُ ۖ وَلَوْ رُدُّوا۟ لَعَادُوا۟ لِمَا نُهُوا۟ عَنْهُ وَإِنَّهُمْ لَكَـٰذِبُونَ
Transliteration bal badā lahum mā kānū yukh'fūna min qablu walaw ruddū laʿādū limā nuhū ʿanhu wa-innahum lakādhibūna
Marathi २८. किंबहुना ज्या गोष्टीला यापूर्वी लपवित असत, ती त्यांच्यासमोर आली आहे. जर या लोकांना पुन्हा परत पाठविले गेले, तरीही हे तेच करतील, ज्यापासून यांना रोखले गेले होते आणि निःसंशय हे लोक खोटे आहेत.
Verse 29
وَقَالُوٓا۟ إِنْ هِىَ إِلَّا حَيَاتُنَا ٱلدُّنْيَا وَمَا نَحْنُ بِمَبْعُوثِينَ
Transliteration waqālū in hiya illā ḥayātunā l-dun'yā wamā naḥnu bimabʿūthīna
Marathi २९. आणि हे असे म्हणतात की केवळ हे ऐहिक जीवनच आमचे जीवन आहे आणि आम्हाला दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही.
Verse 30
وَلَوْ تَرَىٰٓ إِذْ وُقِفُوا۟ عَلَىٰ رَبِّهِمْ ۚ قَالَ أَلَيْسَ هَـٰذَا بِٱلْحَقِّ ۚ قَالُوا۟ بَلَىٰ وَرَبِّنَا ۚ قَالَ فَذُوقُوا۟ ٱلْعَذَابَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ
Transliteration walaw tarā idh wuqifū ʿalā rabbihim qāla alaysa hādhā bil-ḥaqi qālū balā warabbinā qāla fadhūqū l-ʿadhāba bimā kuntum takfurūna
Marathi ३०. आणि जर तुम्ही त्या वेळी पाहाल, जेव्हा हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर उभे केले जातील, अल्लाह फर्माविल, काय हे खरे नाही? ते म्हणतील, निःसंशय, पालनकर्त्याची शपथ, हे खरे आहे. अल्लाह फर्माविल, तर मग आपल्या ईमान न राखण्याच्या परिणामी अज़ाब (शिक्षा-यातना) सहन करा.
Verse 31
قَدْ خَسِرَ ٱلَّذِينَ كَذَّبُوا۟ بِلِقَآءِ ٱللَّهِ ۖ حَتَّىٰٓ إِذَا جَآءَتْهُمُ ٱلسَّاعَةُ بَغْتَةً قَالُوا۟ يَـٰحَسْرَتَنَا عَلَىٰ مَا فَرَّطْنَا فِيهَا وَهُمْ يَحْمِلُونَ أَوْزَارَهُمْ عَلَىٰ ظُهُورِهِمْ ۚ أَلَا سَآءَ مَا يَزِرُونَ
Transliteration qad khasira alladhīna kadhabū biliqāi l-lahi ḥattā idhā jāathumu l-sāʿatu baghtatan qālū yāḥasratanā ʿalā mā farraṭnā fīhā wahum yaḥmilūna awzārahum ʿalā ẓuhūrihim alā sāa mā yazirūna
Marathi ३१. निःसंशय, मोठ्या तोट्यात पडले ते लोक ज्यांनी अल्लहाची भेट होण्याला खोटे ठरविले, येथपर्यंत की जेव्हा ती निर्धारीत वेळ त्यांच्यावर अचानक येईल, तेव्हा म्हणतील, की अरेरे! खेद आहे आमच्या सुस्तीबद्दल जी या बाबतीत झाली आणि त्यांची अवस्था अशी होईल की आपले ओझे आपल्या कमरेवर लादुन घेतलेले असतील. शावधान! ते मोठेे वाईट ओझे लादून घेतील.
Verse 32
وَمَا ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَآ إِلَّا لَعِبٌ وَلَهْوٌ ۖ وَلَلدَّارُ ٱلْـَٔاخِرَةُ خَيْرٌ لِّلَّذِينَ يَتَّقُونَ ۗ أَفَلَا تَعْقِلُونَ
Transliteration wamā l-ḥayatu l-dun'yā illā laʿibun walahwun walalddāru l-ākhiratu khayrun lilladhīna yattaqūna afalā taʿqilūna
Marathi ३२. आणि या जगाचे जीवन तर, खेळ-तमाशाव्यतिरिक्त आणखी काहीच नाही. आणि अंतिम घर (आखिरत) अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता अधिक चांगले आहे, काय तुम्ही विचार चिंतन करीत नाही?
Verse 33
قَدْ نَعْلَمُ إِنَّهُۥ لَيَحْزُنُكَ ٱلَّذِى يَقُولُونَ ۖ فَإِنَّهُمْ لَا يُكَذِّبُونَكَ وَلَـٰكِنَّ ٱلظَّـٰلِمِينَ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ يَجْحَدُونَ
Transliteration qad naʿlamu innahu layaḥzunuka alladhī yaqūlūna fa-innahum lā yukadhibūnaka walākinna l-ẓālimīna biāyāti l-lahi yajḥadūna
Marathi ३३. आम्ही हे चांगल्या प्रकारे जाणतो की, त्यांच्या कथनांनी तुम्ही दुःखी कष्टी होता, तर हे लोक तुम्हाला खोटे म्हणत नाहीत, तर हे अत्याचारी अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात.१
Verse 34
وَلَقَدْ كُذِّبَتْ رُسُلٌ مِّن قَبْلِكَ فَصَبَرُوا۟ عَلَىٰ مَا كُذِّبُوا۟ وَأُوذُوا۟ حَتَّىٰٓ أَتَىٰهُمْ نَصْرُنَا ۚ وَلَا مُبَدِّلَ لِكَلِمَـٰتِ ٱللَّهِ ۚ وَلَقَدْ جَآءَكَ مِن نَّبَإِى۟ ٱلْمُرْسَلِينَ
Transliteration walaqad kudhibat rusulun min qablika faṣabarū ʿalā mā kudhibū waūdhū ḥattā atāhum naṣrunā walā mubaddila likalimāti l-lahi walaqad jāaka min naba-i l-mur'salīna
Marathi ३४. आणि तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांनाही खोटे ठरविले गेले आहे आणि त्यांनी, त्या खोटे ठरविले जाण्यावर धीर-संयम राखला आणि त्यांना त्रास-यातना दिली गेली, येथपावेतो की त्यांच्याजवळ आमची मदत पोहोचली. अल्लाहचे फर्मान कोणी बदलणारा नाही आणि तुमच्याजवळ पैगंबरांचे वृत्तांत येऊन पोहोचले आहेत.
Verse 35
وَإِن كَانَ كَبُرَ عَلَيْكَ إِعْرَاضُهُمْ فَإِنِ ٱسْتَطَعْتَ أَن تَبْتَغِىَ نَفَقًا فِى ٱلْأَرْضِ أَوْ سُلَّمًا فِى ٱلسَّمَآءِ فَتَأْتِيَهُم بِـَٔايَةٍ ۚ وَلَوْ شَآءَ ٱللَّهُ لَجَمَعَهُمْ عَلَى ٱلْهُدَىٰ ۚ فَلَا تَكُونَنَّ مِنَ ٱلْجَـٰهِلِينَ
Transliteration wa-in kāna kabura ʿalayka iʿ'rāḍuhum fa-ini is'taṭaʿta an tabtaghiya nafaqan fī l-arḍi aw sullaman fī l-samāi fatatiyahum biāyatin walaw shāa l-lahu lajamaʿahum ʿalā l-hudā falā takūnanna mina l-jāhilīna
Marathi ३५. आणि जर त्यांचे तोंड फिरविणे तुम्हाला असह्य होत असेल तर तुमच्याने हे शक्य असेल तर जमिनीत एखादे भुयार किंवा आकाशात (चढून जाण्यासाठी) एखादी शिडी शोधा आणि त्यांना एखादा मोजिजा (चमत्कार) आणून दाखवा. अल्लाहने इच्छिले असते तर त्या सर्वांना सत्य मार्गावर जमा केले असते. यास्तव नादान लोकांपैकी होऊ नका.
Verse 36
۞ إِنَّمَا يَسْتَجِيبُ ٱلَّذِينَ يَسْمَعُونَ ۘ وَٱلْمَوْتَىٰ يَبْعَثُهُمُ ٱللَّهُ ثُمَّ إِلَيْهِ يُرْجَعُونَ
Transliteration innamā yastajību alladhīna yasmaʿūna wal-mawtā yabʿathuhumu l-lahu thumma ilayhi yur'jaʿūna
Marathi ३६. आणि तेच लोक स्वीकार करतात, जे ऐकतात आणि मेलेल्या लोकांना अल्लाह जिवंत करून उठविल, मग सर्व त्या (अल्लाहच्याच) कडे आणले जातील.
Verse 37
وَقَالُوا۟ لَوْلَا نُزِّلَ عَلَيْهِ ءَايَةٌ مِّن رَّبِّهِۦ ۚ قُلْ إِنَّ ٱللَّهَ قَادِرٌ عَلَىٰٓ أَن يُنَزِّلَ ءَايَةً وَلَـٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ
Transliteration waqālū lawlā nuzzila ʿalayhi āyatun min rabbihi qul inna l-laha qādirun ʿalā an yunazzila āyatan walākinna aktharahum lā yaʿlamūna
Marathi ३७. आणि ते म्हणाले की, त्यांच्यावर त्यांच्या पानलकर्त्यातर्फे एखादा मोजिजा (चमत्कार) का नाही उतरविला गेला? तुम्ही सांगा की अल्लाह एखादा चमत्कार उतरविण्याचे पुरेपूर सामर्थ्य राखतो तथापि बहुतेक लोक जाणत नाहीत.
Verse 38
وَمَا مِن دَآبَّةٍ فِى ٱلْأَرْضِ وَلَا طَـٰٓئِرٍ يَطِيرُ بِجَنَاحَيْهِ إِلَّآ أُمَمٌ أَمْثَالُكُم ۚ مَّا فَرَّطْنَا فِى ٱلْكِتَـٰبِ مِن شَىْءٍ ۚ ثُمَّ إِلَىٰ رَبِّهِمْ يُحْشَرُونَ
Transliteration wamā min dābbatin fī l-arḍi walā ṭāirin yaṭīru bijanāḥayhi illā umamun amthālukum mā farraṭnā fī l-kitābi min shayin thumma ilā rabbihim yuḥ'sharūna
Marathi ३८. आणि जितक्या प्रकारचे सजीव जमिनीवर चालणारे आहेत, आणि जितक्या प्रकारचे पंखांनी उडणारे पक्षी आहेत, त्यांच्यापैकी कोणीही असा नाही, जो तुमच्यासारखा एक समूह नसावा. आम्ही ग्रंथात लिहून ठेवण्यात एकही गोष्ट सोडली नाही, मग सर्व लोक आपल्या पालनकर्त्याजवळ जमा केले जातील.
Verse 39
وَٱلَّذِينَ كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا صُمٌّ وَبُكْمٌ فِى ٱلظُّلُمَـٰتِ ۗ مَن يَشَإِ ٱللَّهُ يُضْلِلْهُ وَمَن يَشَأْ يَجْعَلْهُ عَلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration wa-alladhīna kadhabū biāyātinā ṣummun wabuk'mun fī l-ẓulumāti man yasha-i l-lahu yuḍ'lil'hu waman yasha yajʿalhu ʿalā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi ३९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, ते बहीरे, मुके आहेत, अंधारात पडले आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्गास लावतो.
Verse 40
قُلْ أَرَءَيْتَكُمْ إِنْ أَتَىٰكُمْ عَذَابُ ٱللَّهِ أَوْ أَتَتْكُمُ ٱلسَّاعَةُ أَغَيْرَ ٱللَّهِ تَدْعُونَ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration qul ara-aytakum in atākum ʿadhābu l-lahi aw atatkumu l-sāʿatu aghayra l-lahi tadʿūna in kuntum ṣādiqīna
Marathi ४०. तुम्ही सांगा की आपली काय अवस्था होईल ते सांगा की जर तुमच्यावर अल्लाहचा एखादा अज़ाब येऊन कोसळावा किंवा तुमच्यापर्यंत कयामतच येऊन पोहचावी, तर काय अल्लाहशिवाय इतरांना पुकाराल? (सांगा) जर तुम्ही सच्चे असाल.
Verse 41
بَلْ إِيَّاهُ تَدْعُونَ فَيَكْشِفُ مَا تَدْعُونَ إِلَيْهِ إِن شَآءَ وَتَنسَوْنَ مَا تُشْرِكُونَ
Transliteration bal iyyāhu tadʿūna fayakshifu mā tadʿūna ilayhi in shāa watansawna mā tush'rikūna
Marathi ४१. किंबहुना, विशेषतः त्यालाच पुकाराल, मग ज्यासाठी तुम्ही पुकाराल, जर त्याने इच्छिले तर त्यास हटवूनही देईल आणि ज्यांना तुम्ही अल्लाहचे सहभागी ठरविता, त्या सर्वांना विसरून जाल.
Verse 42
وَلَقَدْ أَرْسَلْنَآ إِلَىٰٓ أُمَمٍ مِّن قَبْلِكَ فَأَخَذْنَـٰهُم بِٱلْبَأْسَآءِ وَٱلضَّرَّآءِ لَعَلَّهُمْ يَتَضَرَّعُونَ
Transliteration walaqad arsalnā ilā umamin min qablika fa-akhadhnāhum bil-basāi wal-ḍarāi laʿallahum yataḍarraʿūna
Marathi ४२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या इतर जनसमूहांकडेही पैगंबर पाठविले होते. त्यांनादेखील आम्ही गरीबी व रोगराईने धरले, यासाठी की त्यांनी गयावया करावी.
Verse 43
فَلَوْلَآ إِذْ جَآءَهُم بَأْسُنَا تَضَرَّعُوا۟ وَلَـٰكِن قَسَتْ قُلُوبُهُمْ وَزَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيْطَـٰنُ مَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration falawlā idh jāahum basunā taḍarraʿū walākin qasat qulūbuhum wazayyana lahumu l-shayṭānu mā kānū yaʿmalūna
Marathi ४३. अशा प्रकारे जेव्हा त्यांना आमची सजा मिळाली तर ते कमजोर का नाही पडतील? परंतु त्यांची मने कठोर झालीत आणि सैतानाने त्यांच्या कर्मांना, त्यांच्या विचारात चांगले करून दाखविले.
Verse 44
فَلَمَّا نَسُوا۟ مَا ذُكِّرُوا۟ بِهِۦ فَتَحْنَا عَلَيْهِمْ أَبْوَٰبَ كُلِّ شَىْءٍ حَتَّىٰٓ إِذَا فَرِحُوا۟ بِمَآ أُوتُوٓا۟ أَخَذْنَـٰهُم بَغْتَةً فَإِذَا هُم مُّبْلِسُونَ
Transliteration falammā nasū mā dhukkirū bihi fataḥnā ʿalayhim abwāba kulli shayin ḥattā idhā fariḥū bimā ūtū akhadhnāhum baghtatan fa-idhā hum mub'lisūna
Marathi ४४. आणि जेव्हा ते त्या उपदेशाला विसरले, ज्याची त्यांना शिकवण दिली गेली होती, तर आम्ही त्यांच्यावर प्रत्येक चीज-वस्तूचे दरवाजे खुले केले, येथपर्यंत की जेव्हा आपण प्राप्त केलेल्या चीजवस्तूंवर ते घमेंड करू लागले तेव्हा त्यांना आम्ही अचानक तावडीत घेतले, मग ते निराश होऊन बसले.
Verse 45
فَقُطِعَ دَابِرُ ٱلْقَوْمِ ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ ۚ وَٱلْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration faquṭiʿa dābiru l-qawmi alladhīna ẓalamū wal-ḥamdu lillahi rabbi l-ʿālamīna
Marathi ४५. मग अत्याचारी लोकांची पाळेमुळे कापली गेली आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रशंसा आहे, जो साऱ्या जगाचा पालनहार आहे.
Verse 46
قُلْ أَرَءَيْتُمْ إِنْ أَخَذَ ٱللَّهُ سَمْعَكُمْ وَأَبْصَـٰرَكُمْ وَخَتَمَ عَلَىٰ قُلُوبِكُم مَّنْ إِلَـٰهٌ غَيْرُ ٱللَّهِ يَأْتِيكُم بِهِ ۗ ٱنظُرْ كَيْفَ نُصَرِّفُ ٱلْـَٔايَـٰتِ ثُمَّ هُمْ يَصْدِفُونَ
Transliteration qul ara-aytum in akhadha l-lahu samʿakum wa-abṣārakum wakhatama ʿalā qulūbikum man ilāhun ghayru l-lahi yatīkum bihi unẓur kayfa nuṣarrifu l-āyāti thumma hum yaṣdifūna
Marathi ४६. तुम्ही त्यांना सांगा, बरे हे सांगा की जर अल्लाह तुमची ऐकण्याची व पाहण्याची शक्ती पूर्णतः हिरावून घेईल आणि तुमच्या हृदयांवर मोहर लावून देईल तर अल्लाहशिवाय कोणी उपास्य (माबूद) आहे जो तुम्हाला हे पुन्हा परत करील? तुम्ही पाहा की आम्ही कशा प्रकारे आपल्या निशाण्यांना अनेक रूपांनी प्रस्तुत करीत आहोत, तरीदेखील ते कानाडोळा करीत आहेत.
Verse 47
قُلْ أَرَءَيْتَكُمْ إِنْ أَتَىٰكُمْ عَذَابُ ٱللَّهِ بَغْتَةً أَوْ جَهْرَةً هَلْ يُهْلَكُ إِلَّا ٱلْقَوْمُ ٱلظَّـٰلِمُونَ
Transliteration qul ara-aytakum in atākum ʿadhābu l-lahi baghtatan aw jahratan hal yuh'laku illā l-qawmu l-ẓālimūna
Marathi ४७. तुम्ही सांगा, बरे हे सांगा की जर तुमच्यावर अल्लाहचा अज़ाब अचानक किंवा सावध असताना कोसळून पडला तर (या स्थितीत) काय अत्याचारी लोकांशिवाय दुसरा कोणी मारला जाईल?
Verse 48
وَمَا نُرْسِلُ ٱلْمُرْسَلِينَ إِلَّا مُبَشِّرِينَ وَمُنذِرِينَ ۖ فَمَنْ ءَامَنَ وَأَصْلَحَ فَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ
Transliteration wamā nur'silu l-mur'salīna illā mubashirīna wamundhirīna faman āmana wa-aṣlaḥa falā khawfun ʿalayhim walā hum yaḥzanūna
Marathi ४८. आणि आम्ही पैगंबर अशासाठी पाठवितो की त्यांनी शुभ-वार्ता दयावी आणि लोकांना (दुष्परिणतीचे) भय दाखवावे, मग जो कोणी ईमान राखील आणि आपले वर्तन सुधारेल तर अशांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील.
Verse 49
وَٱلَّذِينَ كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا يَمَسُّهُمُ ٱلْعَذَابُ بِمَا كَانُوا۟ يَفْسُقُونَ
Transliteration wa-alladhīna kadhabū biāyātinā yamassuhumu l-ʿadhābu bimā kānū yafsuqūna
Marathi ४९. आणि जे लोक आमच्या आयतींना खोटे ठरवतील, तर त्यांना अल्लाहचा अज़ाब येऊन घेरेल, कारण ते अवज्ञाकारी आहेत.
Verse 50
قُل لَّآ أَقُولُ لَكُمْ عِندِى خَزَآئِنُ ٱللَّهِ وَلَآ أَعْلَمُ ٱلْغَيْبَ وَلَآ أَقُولُ لَكُمْ إِنِّى مَلَكٌ ۖ إِنْ أَتَّبِعُ إِلَّا مَا يُوحَىٰٓ إِلَىَّ ۚ قُلْ هَلْ يَسْتَوِى ٱلْأَعْمَىٰ وَٱلْبَصِيرُ ۚ أَفَلَا تَتَفَكَّرُونَ
Transliteration qul lā aqūlu lakum ʿindī khazāinu l-lahi walā aʿlamu l-ghayba walā aqūlu lakum innī malakun in attabiʿu illā mā yūḥā ilayya qul hal yastawī l-aʿmā wal-baṣīru afalā tatafakkarūna
Marathi ५०. तुम्ही सांगा की मी ना तर तुम्हाला हे सांगतो की माझ्याजवळ अल्लाहचा खजिना आहे आणि ना मी परोक्ष गोष्टींना जाणतो आणि ना मी असे सांगतो की मी फरिश्ता आहे, मी तर केवळ, जे काही वहयीच्या रूपाने माझ्याजवळ येते, त्याचे अनुसरण करतो.१ तुम्ही सांगा की आंधळा आणि डोळस दोघे समान कसे असू शकतात? तर मग तुम्ही विचार चिंतन का नाही करीत?
Verse 51
وَأَنذِرْ بِهِ ٱلَّذِينَ يَخَافُونَ أَن يُحْشَرُوٓا۟ إِلَىٰ رَبِّهِمْ ۙ لَيْسَ لَهُم مِّن دُونِهِۦ وَلِىٌّ وَلَا شَفِيعٌ لَّعَلَّهُمْ يَتَّقُونَ
Transliteration wa-andhir bihi alladhīna yakhāfūna an yuḥ'sharū ilā rabbihim laysa lahum min dūnihi waliyyun walā shafīʿun laʿallahum yattaqūna
Marathi ५१. आणि अशा लोकांना भय दाखवा, जे या गोष्टीचे भय बाळगतात की आपल्या पालनकर्त्यासमोर अशा स्थितीत एकत्र केले जातील की अल्लाहखेरीज जेवढे आहेत, ना त्यांची मदत करतील आणि ना कोणी शिफारस करणारा असेल, या आशेसह की त्यांनी भय राखावे.
Verse 52
وَلَا تَطْرُدِ ٱلَّذِينَ يَدْعُونَ رَبَّهُم بِٱلْغَدَوٰةِ وَٱلْعَشِىِّ يُرِيدُونَ وَجْهَهُۥ ۖ مَا عَلَيْكَ مِنْ حِسَابِهِم مِّن شَىْءٍ وَمَا مِنْ حِسَابِكَ عَلَيْهِم مِّن شَىْءٍ فَتَطْرُدَهُمْ فَتَكُونَ مِنَ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration walā taṭrudi alladhīna yadʿūna rabbahum bil-ghadati wal-ʿashiyi yurīdūna wajhahu mā ʿalayka min ḥisābihim min shayin wamā min ḥisābika ʿalayhim min shayin fataṭrudahum fatakūna mina l-ẓālimīna
Marathi ५२. आणि तुम्ही त्यांना बाहेर काढू नका, जे सकाळ-संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याची उपासना करतात, विशेषतः त्याची मर्जी प्राप्त करू इच्छितात, त्यांच्या हिशोबाशी तुमचा किंचितही संबंध नाही आणि तुमच्या हिशोबाशी त्यांचा किंचितही संबंध नाही की ज्यामुळे तुम्ही त्यांना बाहेर घालवावे, किंबहुना तुम्ही अत्याचार करणाऱ्यांपैकी ठराल.
Verse 53
وَكَذَٰلِكَ فَتَنَّا بَعْضَهُم بِبَعْضٍ لِّيَقُولُوٓا۟ أَهَـٰٓؤُلَآءِ مَنَّ ٱللَّهُ عَلَيْهِم مِّنۢ بَيْنِنَآ ۗ أَلَيْسَ ٱللَّهُ بِأَعْلَمَ بِٱلشَّـٰكِرِينَ
Transliteration wakadhālika fatannā baʿḍahum bibaʿḍin liyaqūlū ahāulāi manna l-lahu ʿalayhim min bayninā alaysa l-lahu bi-aʿlama bil-shākirīna
Marathi ५३. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना आपसात कसोटीत टाकले, यासाठी की त्यांनी म्हणावे, काय अल्लाहने आमच्यामधून फक्त यांच्यावरच उपकार केला? तेव्हा काय असे नाही की अल्लाह कृतज्ञशील लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.
Verse 54
وَإِذَا جَآءَكَ ٱلَّذِينَ يُؤْمِنُونَ بِـَٔايَـٰتِنَا فَقُلْ سَلَـٰمٌ عَلَيْكُمْ ۖ كَتَبَ رَبُّكُمْ عَلَىٰ نَفْسِهِ ٱلرَّحْمَةَ ۖ أَنَّهُۥ مَنْ عَمِلَ مِنكُمْ سُوٓءًۢا بِجَهَـٰلَةٍ ثُمَّ تَابَ مِنۢ بَعْدِهِۦ وَأَصْلَحَ فَأَنَّهُۥ غَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration wa-idhā jāaka alladhīna yu'minūna biāyātinā faqul salāmun ʿalaykum kataba rabbukum ʿalā nafsihi l-raḥmata annahu man ʿamila minkum sūan bijahālatin thumma tāba min baʿdihi wa-aṣlaḥa fa-annahu ghafūrun raḥīmun
Marathi ५४. आणि तुमच्याजवळ जेव्हा ते लोक येतील, जे आमच्या आयतींवर ईमान राखतात, तर त्यांना सांगा, तुमच्यावर सलामती असो तुमच्या पालनकर्त्याने स्वतःवर दया अनिवार्य करून घेतली आहे की तुमच्यापैकी ज्याने मूर्खपणाने वाईट कृत्य केले मग त्यानंतर क्षमा याचना केली आणि सुधारणा करून घेतली तर अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे.
Verse 55
وَكَذَٰلِكَ نُفَصِّلُ ٱلْـَٔايَـٰتِ وَلِتَسْتَبِينَ سَبِيلُ ٱلْمُجْرِمِينَ
Transliteration wakadhālika nufaṣṣilu l-āyāti walitastabīna sabīlu l-muj'rimīna
Marathi ५५. अशा प्रकारे आम्ही आपल्या आयतींचे सविस्तर निवेदन करतो यासाठी की अपराधी लोकांचा मार्ग स्पष्ट व्हावा.
Verse 56
قُلْ إِنِّى نُهِيتُ أَنْ أَعْبُدَ ٱلَّذِينَ تَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ ۚ قُل لَّآ أَتَّبِعُ أَهْوَآءَكُمْ ۙ قَدْ ضَلَلْتُ إِذًا وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلْمُهْتَدِينَ
Transliteration qul innī nuhītu an aʿbuda alladhīna tadʿūna min dūni l-lahi qul lā attabiʿu ahwāakum qad ḍalaltu idhan wamā anā mina l-muh'tadīna
Marathi ५६. तुम्ही सांगा की मला या गोष्टीपासून रोखले गेले आहे की मी त्यांची उपासना करावी, ज्यांना अल्लाहशिवाय तुम्ही पुकारता. तुम्ही सांगा की मी तुमच्या मनाच्या इच्छेनुसार चालणार नाही कारण अशा स्थितीत मी मार्गभ्रष्ट होईन आणि सन्मार्गावर राहणार नाही.
Verse 57
قُلْ إِنِّى عَلَىٰ بَيِّنَةٍ مِّن رَّبِّى وَكَذَّبْتُم بِهِۦ ۚ مَا عِندِى مَا تَسْتَعْجِلُونَ بِهِۦٓ ۚ إِنِ ٱلْحُكْمُ إِلَّا لِلَّهِ ۖ يَقُصُّ ٱلْحَقَّ ۖ وَهُوَ خَيْرُ ٱلْفَـٰصِلِينَ
Transliteration qul innī ʿalā bayyinatin min rabbī wakadhabtum bihi mā ʿindī mā tastaʿjilūna bihi ini l-ḥuk'mu illā lillahi yaquṣṣu l-ḥaqa wahuwa khayru l-fāṣilīna
Marathi ५७. तुम्ही सांगा, माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्यातर्फे एक प्रमाण आहे आणि ते तुम्ही खोटे ठरविता. ज्या गोष्टीची तुम्ही घाई करीत आहात ती माझ्याजवळ नाही. अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाही आदेश नाही अल्लाह वास्तव गोष्टींना स्पष्टतः सांगतो आणि तोच सर्वांत चांगला फैसला करणारा आहे.
Verse 58
قُل لَّوْ أَنَّ عِندِى مَا تَسْتَعْجِلُونَ بِهِۦ لَقُضِىَ ٱلْأَمْرُ بَيْنِى وَبَيْنَكُمْ ۗ وَٱللَّهُ أَعْلَمُ بِٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration qul law anna ʿindī mā tastaʿjilūna bihi laquḍiya l-amru baynī wabaynakum wal-lahu aʿlamu bil-ẓālimīna
Marathi ५८. तुम्ही सांगा, ज्या गोष्टीची तुम्ही एवढ्या घाईने मागणी करीत आहात ती जर माझ्या अवाख्यात असती तर माझ्या व तुमच्या दरम्यान केव्हाच फैसला झाला असता आणि अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो.
Verse 59
۞ وَعِندَهُۥ مَفَاتِحُ ٱلْغَيْبِ لَا يَعْلَمُهَآ إِلَّا هُوَ ۚ وَيَعْلَمُ مَا فِى ٱلْبَرِّ وَٱلْبَحْرِ ۚ وَمَا تَسْقُطُ مِن وَرَقَةٍ إِلَّا يَعْلَمُهَا وَلَا حَبَّةٍ فِى ظُلُمَـٰتِ ٱلْأَرْضِ وَلَا رَطْبٍ وَلَا يَابِسٍ إِلَّا فِى كِتَـٰبٍ مُّبِينٍ
Transliteration waʿindahu mafātiḥu l-ghaybi lā yaʿlamuhā illā huwa wayaʿlamu mā fī l-bari wal-baḥri wamā tasquṭu min waraqatin illā yaʿlamuhā walā ḥabbatin fī ẓulumāti l-arḍi walā raṭbin walā yābisin illā fī kitābin mubīnin
Marathi ५९. आणि त्या (अल्लाह) कडेच परोक्षाच्या चाव्या आहेत, ज्यांना फक्त तोच जाणतो आणि जे काही धरतीवर आणि जलाशयात आहे ते सर्व तो जाणतो आणि जमिनीच्या अंधःकारात एक दाणाही खाली पडत नाही. आणि ना एखादी ओली व कोरडी वस्तू पडते, परंतु हे सर्व काही स्पष्ट ग्रंथात नमूद आहे.१
Verse 60
وَهُوَ ٱلَّذِى يَتَوَفَّىٰكُم بِٱلَّيْلِ وَيَعْلَمُ مَا جَرَحْتُم بِٱلنَّهَارِ ثُمَّ يَبْعَثُكُمْ فِيهِ لِيُقْضَىٰٓ أَجَلٌ مُّسَمًّى ۖ ثُمَّ إِلَيْهِ مَرْجِعُكُمْ ثُمَّ يُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
Transliteration wahuwa alladhī yatawaffākum bi-al-layli wayaʿlamu mā jaraḥtum bil-nahāri thumma yabʿathukum fīhi liyuq'ḍā ajalun musamman thumma ilayhi marjiʿukum thumma yunabbi-ukum bimā kuntum taʿmalūna
Marathi ६०. तोच (अल्लाह) होय, जो रात्री तुमचा आत्मा (एक पट) ताब्यात घेतो आणि दिवसा जे काही करता तेही जाणतो, मग तुम्हाला त्यात एक ठरलेली मुदत पूर्ण करण्याकरिता जागे करतो. मग तुम्हाला त्याच्याचकडे परत जायचे आहे. तेव्हा तुम्ही जे काही करीत राहिले ते तुम्हाला सांगेल.
Verse 61
وَهُوَ ٱلْقَاهِرُ فَوْقَ عِبَادِهِۦ ۖ وَيُرْسِلُ عَلَيْكُمْ حَفَظَةً حَتَّىٰٓ إِذَا جَآءَ أَحَدَكُمُ ٱلْمَوْتُ تَوَفَّتْهُ رُسُلُنَا وَهُمْ لَا يُفَرِّطُونَ
Transliteration wahuwa l-qāhiru fawqa ʿibādihi wayur'silu ʿalaykum ḥafaẓatan ḥattā idhā jāa aḥadakumu l-mawtu tawaffathu rusulunā wahum lā yufarriṭūna
Marathi ६१. तोच आपल्या दासांवर वर्चस्वशाली आहे आणि तुमच्यावर देखरेख ठेवणारे (फरिश्ते) पाठवितो, येथ पर्यंत की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्यु (समय) जवळ येतो, तेव्हा आमचे फरिश्ते त्याचा जीव काढून घेतात आणि ते किंचितही आळस करीत नाहीत.
Verse 62
ثُمَّ رُدُّوٓا۟ إِلَى ٱللَّهِ مَوْلَىٰهُمُ ٱلْحَقِّ ۚ أَلَا لَهُ ٱلْحُكْمُ وَهُوَ أَسْرَعُ ٱلْحَـٰسِبِينَ
Transliteration thumma ruddū ilā l-lahi mawlāhumu l-ḥaqi alā lahu l-ḥuk'mu wahuwa asraʿu l-ḥāsibīna
Marathi ६२. मग ते आपल्या सच्चा पालनकर्त्या (अल्लाह) जवळ आणले जातील सावधान! त्याचाच आदेश चालेल आणि तो फार लवकर हिशोब घेईल.
Verse 63
قُلْ مَن يُنَجِّيكُم مِّن ظُلُمَـٰتِ ٱلْبَرِّ وَٱلْبَحْرِ تَدْعُونَهُۥ تَضَرُّعًا وَخُفْيَةً لَّئِنْ أَنجَىٰنَا مِنْ هَـٰذِهِۦ لَنَكُونَنَّ مِنَ ٱلشَّـٰكِرِينَ
Transliteration qul man yunajjīkum min ẓulumāti l-bari wal-baḥri tadʿūnahu taḍarruʿan wakhuf'yatan la-in anjānā min hādhihi lanakūnanna mina l-shākirīna
Marathi ६३. तुम्ही सांगा, जमीन आणि जलाशयाच्या अंधःकारातून जेव्हा त्याला नरमी आणि हळू स्वरात पुकारता की जर आम्हाला यातून सोडवशिल तर आम्ही खआत्रीने तुझे कृतज्ञशील बनू, तेव्हा कोण तुम्हाला वाचवितो.
Verse 64
قُلِ ٱللَّهُ يُنَجِّيكُم مِّنْهَا وَمِن كُلِّ كَرْبٍ ثُمَّ أَنتُمْ تُشْرِكُونَ
Transliteration quli l-lahu yunajjīkum min'hā wamin kulli karbin thumma antum tush'rikūna
Marathi ६४. तुम्ही स्वतः सांगा की यापासून आणि प्रत्येक संकटापासून तुम्हाला अल्लाहच वाचवितो, पण तरीही तुम्ही शिर्क करता.
Verse 65
قُلْ هُوَ ٱلْقَادِرُ عَلَىٰٓ أَن يَبْعَثَ عَلَيْكُمْ عَذَابًا مِّن فَوْقِكُمْ أَوْ مِن تَحْتِ أَرْجُلِكُمْ أَوْ يَلْبِسَكُمْ شِيَعًا وَيُذِيقَ بَعْضَكُم بَأْسَ بَعْضٍ ۗ ٱنظُرْ كَيْفَ نُصَرِّفُ ٱلْـَٔايَـٰتِ لَعَلَّهُمْ يَفْقَهُونَ
Transliteration qul huwa l-qādiru ʿalā an yabʿatha ʿalaykum ʿadhāban min fawqikum aw min taḥti arjulikum aw yalbisakum shiyaʿan wayudhīqa baʿḍakum basa baʿḍin unẓur kayfa nuṣarrifu l-āyāti laʿallahum yafqahūna
Marathi ६५. तुम्ही सांगा, तोच तुमच्यावर, तुमच्यावरून किंवा तुमच्या पायांखालून अज़ाब (शिक्षा-यातना) पाठविण्याचे किंवा तुमचे अनेक समूह बनवून आपसात लढाईची मजा चाखविण्याचे सामर्थ्य राखतो. तुम्ही पाहा की आम्ही अनेकरित्या कशा प्रकारे आपल्या आयतींचे निवेदन करतो, यासाठी की त्यांना समजावे.
Verse 66
وَكَذَّبَ بِهِۦ قَوْمُكَ وَهُوَ ٱلْحَقُّ ۚ قُل لَّسْتُ عَلَيْكُم بِوَكِيلٍ
Transliteration wakadhaba bihi qawmuka wahuwa l-ḥaqu qul lastu ʿalaykum biwakīlin
Marathi ६६. आणि तुमच्या जनसमूहाने त्याला खोटे ठरविले वास्तविक ते सत्य आहे. तुम्ही सांगा की मी तुमच्यावर अधिकारी (निरीक्षक) नाही.
Verse 67
لِّكُلِّ نَبَإٍ مُّسْتَقَرٌّ ۚ وَسَوْفَ تَعْلَمُونَ
Transliteration likulli naba-in mus'taqarrun wasawfa taʿlamūna
Marathi ६७. प्रत्येक खबरीची एक निर्धारीत वेळ आहे आणि हे तुम्ही फार लवकर जाणून घ्याल.
Verse 68
وَإِذَا رَأَيْتَ ٱلَّذِينَ يَخُوضُونَ فِىٓ ءَايَـٰتِنَا فَأَعْرِضْ عَنْهُمْ حَتَّىٰ يَخُوضُوا۟ فِى حَدِيثٍ غَيْرِهِۦ ۚ وَإِمَّا يُنسِيَنَّكَ ٱلشَّيْطَـٰنُ فَلَا تَقْعُدْ بَعْدَ ٱلذِّكْرَىٰ مَعَ ٱلْقَوْمِ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration wa-idhā ra-ayta alladhīna yakhūḍūna fī āyātinā fa-aʿriḍ ʿanhum ḥattā yakhūḍū fī ḥadīthin ghayrihi wa-immā yunsiyannaka l-shayṭānu falā taqʿud baʿda l-dhik'rā maʿa l-qawmi l-ẓālimīna
Marathi ६८. आणि जेव्हा तुम्ही त्या लोकांना पाहाल, जे आमच्या आयतींमध्ये व्यंग दोष काढत आहेत, तेव्हा अशा लोकांपासून वेगळे व्हा, येथपर्यंत की ते दुसऱ्या कामात गुंतावेत आणि जर तुम्हाला सैतान विसरही पाडेल तरी आठवण आल्यावर पुन्हा अशा अत्याचारी लोकांसोबत बसू नका.
Verse 69
وَمَا عَلَى ٱلَّذِينَ يَتَّقُونَ مِنْ حِسَابِهِم مِّن شَىْءٍ وَلَـٰكِن ذِكْرَىٰ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ
Transliteration wamā ʿalā alladhīna yattaqūna min ḥisābihim min shayin walākin dhik'rā laʿallahum yattaqūna
Marathi ६९. आणि जे लोक अल्लाहचे भय राखून वागतात, त्यांच्यावर त्यांच्या पकडीचा काहीच परिणाम होणार नाही. मात्र त्यांना शिकवण देत राहाणे (चांगले आहे) कदाचित तेदेखील अल्लाहचे भय राखून दुष्कर्मापासून दूर राहू लागतील.
Verse 70
وَذَرِ ٱلَّذِينَ ٱتَّخَذُوا۟ دِينَهُمْ لَعِبًا وَلَهْوًا وَغَرَّتْهُمُ ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَا ۚ وَذَكِّرْ بِهِۦٓ أَن تُبْسَلَ نَفْسٌۢ بِمَا كَسَبَتْ لَيْسَ لَهَا مِن دُونِ ٱللَّهِ وَلِىٌّ وَلَا شَفِيعٌ وَإِن تَعْدِلْ كُلَّ عَدْلٍ لَّا يُؤْخَذْ مِنْهَآ ۗ أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ أُبْسِلُوا۟ بِمَا كَسَبُوا۟ ۖ لَهُمْ شَرَابٌ مِّنْ حَمِيمٍ وَعَذَابٌ أَلِيمٌۢ بِمَا كَانُوا۟ يَكْفُرُونَ
Transliteration wadhari alladhīna ittakhadhū dīnahum laʿiban walahwan wagharrathumu l-ḥayatu l-dun'yā wadhakkir bihi an tub'sala nafsun bimā kasabat laysa lahā min dūni l-lahi waliyyun walā shafīʿun wa-in taʿdil kulla ʿadlin lā yu'khadh min'hā ulāika alladhīna ub'silū bimā kasabū lahum sharābun min ḥamīmin waʿadhābun alīmun bimā kānū yakfurūna
Marathi ७०. आणि अशा लोकांशी कधीही नाते ठेवू नका, ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला खेळ-तमाशा बनवून ठेवले आहे आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात टाकले आहे. आणि या कुरआनाद्वारे उपदेश जरूर करीत राहा, यासाठी की एखादा मनुष्य आपल्या कर्मांमुळे अशा प्रकारे न फसावा की कोणी अल्लाहशिवाय त्याची मदत करणारा नसावा आणि ना शिफारस करणारा आणि अवस्था अशी व्हावी की जर सारे जग भरून मोबदल्यात देऊन टाकील, तरीही त्याच्याकडून घेतले न जावे. ते असेच लोक आहेत की आपल्या कर्मांमुळे अडकून पडले. त्यांच्यासाठी खूप गरम पाणी पिण्याचे असेल आणि त्यांच्या कुप्र (इन्कारा) मुळे मोठी दुःदायक शिक्षा-यातना असेल.
Verse 71
قُلْ أَنَدْعُوا۟ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَنفَعُنَا وَلَا يَضُرُّنَا وَنُرَدُّ عَلَىٰٓ أَعْقَابِنَا بَعْدَ إِذْ هَدَىٰنَا ٱللَّهُ كَٱلَّذِى ٱسْتَهْوَتْهُ ٱلشَّيَـٰطِينُ فِى ٱلْأَرْضِ حَيْرَانَ لَهُۥٓ أَصْحَـٰبٌ يَدْعُونَهُۥٓ إِلَى ٱلْهُدَى ٱئْتِنَا ۗ قُلْ إِنَّ هُدَى ٱللَّهِ هُوَ ٱلْهُدَىٰ ۖ وَأُمِرْنَا لِنُسْلِمَ لِرَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration qul anadʿū min dūni l-lahi mā lā yanfaʿunā walā yaḍurrunā wanuraddu ʿalā aʿqābinā baʿda idh hadānā l-lahu ka-alladhī is'tahwathu l-shayāṭīnu fī l-arḍi ḥayrāna lahu aṣḥābun yadʿūnahu ilā l-hudā i'tinā qul inna hudā l-lahi huwa l-hudā wa-umir'nā linus'lima lirabbi l-ʿālamīna
Marathi ७१. तुम्ही सांगा, काय आम्ही अल्लाहशिवाय त्याला पुकारावे जो आमचे भले-बुरे काहीच करू शकत नसावा, आणि अल्लाहचे मार्गदर्शन लाभल्यानंतर त्या माणसासारखे टाचा रगडत परत फिरविले जावे, जणू सैतानाने बहकविले असावे आणि तो धरतीवर भटकत फिरत असावा. त्याचे साथीदार त्याला सरळ मार्गाकडे बोलावित असावेत की आमच्या जवळ ये. तुम्ही सांगा, अल्लाहचे मार्गदर्शनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. आणि आम्हाला हा आदेश दिला गेला आहे की समस्त जगाच्या स्वामीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करावे.
Verse 72
وَأَنْ أَقِيمُوا۟ ٱلصَّلَوٰةَ وَٱتَّقُوهُ ۚ وَهُوَ ٱلَّذِىٓ إِلَيْهِ تُحْشَرُونَ
Transliteration wa-an aqīmū l-ṣalata wa-ittaqūhu wahuwa alladhī ilayhi tuḥ'sharūna
Marathi ७२. आणि नमाज कायम करा आणि त्या (अल्लाह) चे भय राखा, तो, तोच आहे, ज्याच्याकडे तुम्ही एकत्रित केले जाल.
Verse 73
وَهُوَ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ بِٱلْحَقِّ ۖ وَيَوْمَ يَقُولُ كُن فَيَكُونُ ۚ قَوْلُهُ ٱلْحَقُّ ۚ وَلَهُ ٱلْمُلْكُ يَوْمَ يُنفَخُ فِى ٱلصُّورِ ۚ عَـٰلِمُ ٱلْغَيْبِ وَٱلشَّهَـٰدَةِ ۚ وَهُوَ ٱلْحَكِيمُ ٱلْخَبِيرُ
Transliteration wahuwa alladhī khalaqa l-samāwāti wal-arḍa bil-ḥaqi wayawma yaqūlu kun fayakūnu qawluhu l-ḥaqu walahu l-mul'ku yawma yunfakhu fī l-ṣūri ʿālimu l-ghaybi wal-shahādati wahuwa l-ḥakīmu l-khabīru
Marathi ७३. त्यानेच आकाशआंना व जमिनीला सत्यासह निर्माण केले, आणि ज्या दिवशी तो फर्माविल, होऊन जा तर होऊन जाईल. त्याचे वचन अगदी सत्य आहे, आणि ज्या दिवशी शंख फुंकला जाईल, राज्य सत्ता त्याचीच असेल. तो जाणणारा आहे परोक्ष आणि अस्तित्वाचा आणितो हिकमतशाली व खबर राखणारा आहे.
Verse 74
۞ وَإِذْ قَالَ إِبْرَٰهِيمُ لِأَبِيهِ ءَازَرَ أَتَتَّخِذُ أَصْنَامًا ءَالِهَةً ۖ إِنِّىٓ أَرَىٰكَ وَقَوْمَكَ فِى ضَلَـٰلٍ مُّبِينٍ
Transliteration wa-idh qāla ib'rāhīmu li-abīhi āzara atattakhidhu aṣnāman ālihatan innī arāka waqawmaka fī ḍalālin mubīnin
Marathi ७४. आणि स्मरण करा, जेव्हा इब्राहीम आपले पिता आजरला म्हणाले, काय तुम्ही मुर्त्यांना उपास्य (माबूद) बनवित आहात? मी तर तुम्हाला व तुमच्या लोकांना उघड मार्गभ्रष्टतेत पाहतोय.
Verse 75
وَكَذَٰلِكَ نُرِىٓ إِبْرَٰهِيمَ مَلَكُوتَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ وَلِيَكُونَ مِنَ ٱلْمُوقِنِينَ
Transliteration wakadhālika nurī ib'rāhīma malakūta l-samāwāti wal-arḍi waliyakūna mina l-mūqinīna
Marathi ७५. आणि अशा प्रकारे आम्ही इब्राहीमला आकाशांची व जमिनीची राज्य-सत्ता दाखविली यासाठी की त्यांनी पुरेपूर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी व्हावे.
Verse 76
فَلَمَّا جَنَّ عَلَيْهِ ٱلَّيْلُ رَءَا كَوْكَبًا ۖ قَالَ هَـٰذَا رَبِّى ۖ فَلَمَّآ أَفَلَ قَالَ لَآ أُحِبُّ ٱلْـَٔافِلِينَ
Transliteration falammā janna ʿalayhi al-laylu raā kawkaban qāla hādhā rabbī falammā afala qāla lā uḥibbu l-āfilīna
Marathi ७६. मग जेव्हा त्यांच्यावर रात्रीचा अंधार पसरला तेव्हा एक तारा पाहिला, म्हणाले की हा माझा पालनहार आहे, मग जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले की मी अस्त पावणाऱ्याशी प्रेम राखत नाही.
Verse 77
فَلَمَّا رَءَا ٱلْقَمَرَ بَازِغًا قَالَ هَـٰذَا رَبِّى ۖ فَلَمَّآ أَفَلَ قَالَ لَئِن لَّمْ يَهْدِنِى رَبِّى لَأَكُونَنَّ مِنَ ٱلْقَوْمِ ٱلضَّآلِّينَ
Transliteration falammā raā l-qamara bāzighan qāla hādhā rabbī falammā afala qāla la-in lam yahdinī rabbī la-akūnanna mina l-qawmi l-ḍālīna
Marathi ७७. मग जेव्हा चंद्राला चमकताना पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझा पालनकर्ता आहे, मग जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले की जर माझ्या पालनकर्त्याने मला सरळ मार्ग दाखविला नाही तर मी मार्गभ्रष्ट झालेल्यांपैकी होईन.
Verse 78
فَلَمَّا رَءَا ٱلشَّمْسَ بَازِغَةً قَالَ هَـٰذَا رَبِّى هَـٰذَآ أَكْبَرُ ۖ فَلَمَّآ أَفَلَتْ قَالَ يَـٰقَوْمِ إِنِّى بَرِىٓءٌ مِّمَّا تُشْرِكُونَ
Transliteration falammā raā l-shamsa bāzighatan qāla hādhā rabbī hādhā akbaru falammā afalat qāla yāqawmi innī barīon mimmā tush'rikūna
Marathi ७८. मग जेव्हा सूर्याला चमकताना पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझा पालनहार आहे. हा तर सर्वांत मोठा आहे, परंतु जेव्हा तो बुडाला तेव्हा म्हणाले, की निःसंशय मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे.
Verse 79
إِنِّى وَجَّهْتُ وَجْهِىَ لِلَّذِى فَطَرَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ حَنِيفًا ۖ وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ
Transliteration innī wajjahtu wajhiya lilladhī faṭara l-samāwāti wal-arḍa ḥanīfan wamā anā mina l-mush'rikīna
Marathi ७९. मी आपले तोंड त्याच्याकडे फिरवून घेतले, ज्याने आकाशांना व जमिनीला निर्माण केले एकाग्रतापूर्वक, आणि मी अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.
Verse 80
وَحَآجَّهُۥ قَوْمُهُۥ ۚ قَالَ أَتُحَـٰٓجُّوٓنِّى فِى ٱللَّهِ وَقَدْ هَدَىٰنِ ۚ وَلَآ أَخَافُ مَا تُشْرِكُونَ بِهِۦٓ إِلَّآ أَن يَشَآءَ رَبِّى شَيْـًٔا ۗ وَسِعَ رَبِّى كُلَّ شَىْءٍ عِلْمًا ۗ أَفَلَا تَتَذَكَّرُونَ
Transliteration waḥājjahu qawmuhu qāla atuḥājjūnnī fī l-lahi waqad hadāni walā akhāfu mā tush'rikūna bihi illā an yashāa rabbī shayan wasiʿa rabbī kulla shayin ʿil'man afalā tatadhakkarūna
Marathi ८०. आणि त्यांच्याशी, त्यांचे लोक हुज्जत करू लागले. पैगंबर (इब्राहीम) म्हणाले, काय तुम्ही अल्लाहविषयी माझ्याशी वाद घालता. वास्तविक त्याने मला सरळ मार्ग दाखविला आहे आणि ज्यांना तुम्ही अल्लाहसोबत सामील करता, मी त्यांचे भय राखत नाही, परंतु हे की माझा पालनकर्ता एखाद्या कारणाने इच्छिल. माझ्या पालनकर्त्याने प्रत्येक गोष्टीला आपल्या ज्ञानकक्षेत घेरलेले आहे. काय तुम्ही तरीही विचार करीत नाही?
Verse 81
وَكَيْفَ أَخَافُ مَآ أَشْرَكْتُمْ وَلَا تَخَافُونَ أَنَّكُمْ أَشْرَكْتُم بِٱللَّهِ مَا لَمْ يُنَزِّلْ بِهِۦ عَلَيْكُمْ سُلْطَـٰنًا ۚ فَأَىُّ ٱلْفَرِيقَيْنِ أَحَقُّ بِٱلْأَمْنِ ۖ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ
Transliteration wakayfa akhāfu mā ashraktum walā takhāfūna annakum ashraktum bil-lahi mā lam yunazzil bihi ʿalaykum sul'ṭānan fa-ayyu l-farīqayni aḥaqqu bil-amni in kuntum taʿlamūna
Marathi ८१. आणि मी त्या वस्तूचे का म्हणून भय राखावे जिला तुम्ही अल्लाहचा सहभागी ठरविले आहे, वास्तविक तुम्ही त्या वस्तूला अल्लाहचा सहभागी बनविण्यापासून भित नाही, ज्याचे तुमच्याजवळ अल्लाहने एखादे प्रमाण उतरविले नाही. मग या दोन्ही समूहांमध्ये कोण शांतीचा जास्त हक्कदार आहे, जर तुम्ही जाणत असाल.
Verse 82
ٱلَّذِينَ ءَامَنُوا۟ وَلَمْ يَلْبِسُوٓا۟ إِيمَـٰنَهُم بِظُلْمٍ أُو۟لَـٰٓئِكَ لَهُمُ ٱلْأَمْنُ وَهُم مُّهْتَدُونَ
Transliteration alladhīna āmanū walam yalbisū īmānahum biẓul'min ulāika lahumu l-amnu wahum muh'tadūna
Marathi ८२. ज्या लोकांनी ईमान राखले आणि आपल्या ईमानात कसल्याही प्रकारच्या शिर्कचे मिश्रण केले नाही, त्यांच्याचसाठी शांती आहे आणि तेच सरळ मार्गावर आहेत.
Verse 83
وَتِلْكَ حُجَّتُنَآ ءَاتَيْنَـٰهَآ إِبْرَٰهِيمَ عَلَىٰ قَوْمِهِۦ ۚ نَرْفَعُ دَرَجَـٰتٍ مَّن نَّشَآءُ ۗ إِنَّ رَبَّكَ حَكِيمٌ عَلِيمٌ
Transliteration watil'ka ḥujjatunā ātaynāhā ib'rāhīma ʿalā qawmihi narfaʿu darajātin man nashāu inna rabbaka ḥakīmun ʿalīmun
Marathi ८३ . आणि हे आमचे प्रमाण आहे जे आम्ही इब्राहिमला त्यााच्या जनसमूहाच्या मुकाबल्यात दिले . आम्ही ज्याला इच्छितो त्याचे दर्जे बुलंद (उंचवितो ) निःशंय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली सर्वज्ञ आहे
Verse 84
وَوَهَبْنَا لَهُۥٓ إِسْحَـٰقَ وَيَعْقُوبَ ۚ كُلًّا هَدَيْنَا ۚ وَنُوحًا هَدَيْنَا مِن قَبْلُ ۖ وَمِن ذُرِّيَّتِهِۦ دَاوُۥدَ وَسُلَيْمَـٰنَ وَأَيُّوبَ وَيُوسُفَ وَمُوسَىٰ وَهَـٰرُونَ ۚ وَكَذَٰلِكَ نَجْزِى ٱلْمُحْسِنِينَ
Transliteration wawahabnā lahu is'ḥāqa wayaʿqūba kullan hadaynā wanūḥan hadaynā min qablu wamin dhurriyyatihi dāwūda wasulaymāna wa-ayyūba wayūsufa wamūsā wahārūna wakadhālika najzī l-muḥ'sinīna
Marathi ८४. आणि आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला सरळ मार्ग दाखविला आणि यापूर्वी नूहला मार्ग दाखविला आणि संततीत दाऊद आणि सुलेमान आणि अय्यूब आणि यूसुफ आणि मूसा व हारून यांना आणि अशा प्रकारे आम्ही नेकी (सत्कर्म) करणाऱ्या लोकांना मोबदला प्रदान करतो.
Verse 85
وَزَكَرِيَّا وَيَحْيَىٰ وَعِيسَىٰ وَإِلْيَاسَ ۖ كُلٌّ مِّنَ ٱلصَّـٰلِحِينَ
Transliteration wazakariyyā wayaḥyā waʿīsā wa-il'yāsa kullun mina l-ṣāliḥīna
Marathi ८५. आणि जकरिया आणि यह्या आणि ईसा आणि इलियास यांना, हे सर्व नेक सदाचारी लोकांपैकी होते.
Verse 86
وَإِسْمَـٰعِيلَ وَٱلْيَسَعَ وَيُونُسَ وَلُوطًا ۚ وَكُلًّا فَضَّلْنَا عَلَى ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration wa-is'māʿīla wal-yasaʿa wayūnusa walūṭan wakullan faḍḍalnā ʿalā l-ʿālamīna
Marathi ८६. आणि इस्माईल आणि यसअ आणि यूनुस आणि लूत यांना, या सर्वांना आम्ही या जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली.
Verse 87
وَمِنْ ءَابَآئِهِمْ وَذُرِّيَّـٰتِهِمْ وَإِخْوَٰنِهِمْ ۖ وَٱجْتَبَيْنَـٰهُمْ وَهَدَيْنَـٰهُمْ إِلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ
Transliteration wamin ābāihim wadhurriyyātihim wa-ikh'wānihim wa-ij'tabaynāhum wahadaynāhum ilā ṣirāṭin mus'taqīmin
Marathi ८७. आणि त्यांच्या वाडवडील, संतती आणि भावांमधून आणि आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला.
Verse 88
ذَٰلِكَ هُدَى ٱللَّهِ يَهْدِى بِهِۦ مَن يَشَآءُ مِنْ عِبَادِهِۦ ۚ وَلَوْ أَشْرَكُوا۟ لَحَبِطَ عَنْهُم مَّا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration dhālika hudā l-lahi yahdī bihi man yashāu min ʿibādihi walaw ashrakū laḥabiṭa ʿanhum mā kānū yaʿmalūna
Marathi ८८. हाच अल्लाहचा मार्ग आहे आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, त्याला मार्ग दाखवितो आणि जर त्या लोकांनीही अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी केले असते तर त्यांचे कर्म वाया गेले असते.
Verse 89
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ ءَاتَيْنَـٰهُمُ ٱلْكِتَـٰبَ وَٱلْحُكْمَ وَٱلنُّبُوَّةَ ۚ فَإِن يَكْفُرْ بِهَا هَـٰٓؤُلَآءِ فَقَدْ وَكَّلْنَا بِهَا قَوْمًا لَّيْسُوا۟ بِهَا بِكَـٰفِرِينَ
Transliteration ulāika alladhīna ātaynāhumu l-kitāba wal-ḥuk'ma wal-nubuwata fa-in yakfur bihā hāulāi faqad wakkalnā bihā qawman laysū bihā bikāfirīna
Marathi ८९. यांनाच आम्ही ग्रंथ आणि हिकमत आणि नुबूवत (पैगंबरी) प्रदान केली आणि जर या लोकांनी यास मानले नाही, तर आम्ही अशा लोकांना तयार करून ठेवले आहे, जे याचा इन्कार करणार नाहीत.
Verse 90
أُو۟لَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ هَدَى ٱللَّهُ ۖ فَبِهُدَىٰهُمُ ٱقْتَدِهْ ۗ قُل لَّآ أَسْـَٔلُكُمْ عَلَيْهِ أَجْرًا ۖ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرَىٰ لِلْعَـٰلَمِينَ
Transliteration ulāika alladhīna hadā l-lahu fabihudāhumu iq'tadih qul lā asalukum ʿalayhi ajran in huwa illā dhik'rā lil'ʿālamīna
Marathi ९०. हेच ते लोक होते, ज्यांना अल्लाहने उचित मार्ग दाखविला, यास्तव तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करा. तुम्ही सांगा की मी याबद्दल कसलाही मोबदला मागत नाही. समस्त जगातील लोकांकरिता ही केवळ स्मरणिका आहे.
Verse 91
وَمَا قَدَرُوا۟ ٱللَّهَ حَقَّ قَدْرِهِۦٓ إِذْ قَالُوا۟ مَآ أَنزَلَ ٱللَّهُ عَلَىٰ بَشَرٍ مِّن شَىْءٍ ۗ قُلْ مَنْ أَنزَلَ ٱلْكِتَـٰبَ ٱلَّذِى جَآءَ بِهِۦ مُوسَىٰ نُورًا وَهُدًى لِّلنَّاسِ ۖ تَجْعَلُونَهُۥ قَرَاطِيسَ تُبْدُونَهَا وَتُخْفُونَ كَثِيرًا ۖ وَعُلِّمْتُم مَّا لَمْ تَعْلَمُوٓا۟ أَنتُمْ وَلَآ ءَابَآؤُكُمْ ۖ قُلِ ٱللَّهُ ۖ ثُمَّ ذَرْهُمْ فِى خَوْضِهِمْ يَلْعَبُونَ
Transliteration wamā qadarū l-laha ḥaqqa qadrihi idh qālū mā anzala l-lahu ʿalā basharin min shayin qul man anzala l-kitāba alladhī jāa bihi mūsā nūran wahudan lilnnāsi tajʿalūnahu qarāṭīsa tub'dūnahā watukh'fūna kathīran waʿullim'tum mā lam taʿlamū antum walā ābāukum quli l-lahu thumma dharhum fī khawḍihim yalʿabūna
Marathi ९१. आणि त्यांनी, अल्लाहची जशी कदर केली पाहिजे होती तशी कदर केली नाही. जेव्हा ते असे म्हणाले की अल्लाहने कोणा माणसावर काही उतरविले नाही. तुम्ही सांगा, मूसा जो ग्रंथ तुमच्याजवळ घेऊन आले, जो लोकांकरिता दिव्य प्रकाश आणि मार्गदर्शन आहे, तो कोणी उतरविला, ज्याला तुम्ही वेगवेगळ्या पानांमध्ये ठेवता, ज्यातून काही जाहीर करता आणि अधिकांश लपविता आणि तुम्हाला ते ज्ञान दिले गेले, जे तुम्ही आणि तुमचे वाडवडील जाणत नव्हते. तुम्ही सांगा की अल्लाहनेच उतरविला होता. मग त्यांना त्यांच्या दोष काढण्यात, खेळ तमाशा करीत सोडून द्या.
Verse 92
وَهَـٰذَا كِتَـٰبٌ أَنزَلْنَـٰهُ مُبَارَكٌ مُّصَدِّقُ ٱلَّذِى بَيْنَ يَدَيْهِ وَلِتُنذِرَ أُمَّ ٱلْقُرَىٰ وَمَنْ حَوْلَهَا ۚ وَٱلَّذِينَ يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ يُؤْمِنُونَ بِهِۦ ۖ وَهُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ
Transliteration wahādhā kitābun anzalnāhu mubārakun muṣaddiqu alladhī bayna yadayhi walitundhira umma l-qurā waman ḥawlahā wa-alladhīna yu'minūna bil-ākhirati yu'minūna bihi wahum ʿalā ṣalātihim yuḥāfiẓūna
Marathi ९२. आणि हादेखील एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरीत केला आहे. आपल्या पूर्वीच्या ग्रंथांची सत्यता दर्शवितो, यासाठी की तुम्ही मूळ वस्ती (मक्का) आणि त्याच्या जवळपासच्या (शहरांना म्हणजे समस्त मानवविश्वा) ला सूचित करावे आणि जे आखिरतवर ईमान राखतात, तेच याला मानतील आणि तेच आपल्या नमाजांचे रक्षण करतील.
Verse 93
وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ ٱفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا أَوْ قَالَ أُوحِىَ إِلَىَّ وَلَمْ يُوحَ إِلَيْهِ شَىْءٌ وَمَن قَالَ سَأُنزِلُ مِثْلَ مَآ أَنزَلَ ٱللَّهُ ۗ وَلَوْ تَرَىٰٓ إِذِ ٱلظَّـٰلِمُونَ فِى غَمَرَٰتِ ٱلْمَوْتِ وَٱلْمَلَـٰٓئِكَةُ بَاسِطُوٓا۟ أَيْدِيهِمْ أَخْرِجُوٓا۟ أَنفُسَكُمُ ۖ ٱلْيَوْمَ تُجْزَوْنَ عَذَابَ ٱلْهُونِ بِمَا كُنتُمْ تَقُولُونَ عَلَى ٱللَّهِ غَيْرَ ٱلْحَقِّ وَكُنتُمْ عَنْ ءَايَـٰتِهِۦ تَسْتَكْبِرُونَ
Transliteration waman aẓlamu mimmani if'tarā ʿalā l-lahi kadhiban aw qāla ūḥiya ilayya walam yūḥa ilayhi shayon waman qāla sa-unzilu mith'la mā anzala l-lahu walaw tarā idhi l-ẓālimūna fī ghamarāti l-mawti wal-malāikatu bāsiṭū aydīhim akhrijū anfusakumu l-yawma tuj'zawna ʿadhāba l-hūni bimā kuntum taqūlūna ʿalā l-lahi ghayra l-ḥaqi wakuntum ʿan āyātihi tastakbirūna
Marathi ९३. आणि त्याहून मोठा अत्याचारी आणखी कोण असू शकतो, जो अल्लाहवर खोटा आरोप ठेवील किंवा असे म्हणेल की माझ्याकडे वहयी आली आहे, वास्तविक त्याच्याकडे काहीच आले नाही आणि जो असे म्हणाला की, ज्याप्रकारे अल्लाहने उतरविले तसे मीदेखील उतरविन. जर तुम्ही अत्याचारींना मृत्युच्या कठोर शिक्षा-यातनेत पाहाल, जेव्हा फरिश्ते आपले हात पुढे करून म्हणतील, आपला जीव काढा. आज तुम्हाला अल्लाहवर नाहक आरोप ठेवण्यामुळे आणि घमेंडीने त्याच्या आयतींचा इन्कार करण्यापायी अपमानदायक मोबदला दिला जाईल.
Verse 94
وَلَقَدْ جِئْتُمُونَا فُرَٰدَىٰ كَمَا خَلَقْنَـٰكُمْ أَوَّلَ مَرَّةٍ وَتَرَكْتُم مَّا خَوَّلْنَـٰكُمْ وَرَآءَ ظُهُورِكُمْ ۖ وَمَا نَرَىٰ مَعَكُمْ شُفَعَآءَكُمُ ٱلَّذِينَ زَعَمْتُمْ أَنَّهُمْ فِيكُمْ شُرَكَـٰٓؤُا۟ ۚ لَقَد تَّقَطَّعَ بَيْنَكُمْ وَضَلَّ عَنكُم مَّا كُنتُمْ تَزْعُمُونَ
Transliteration walaqad ji'tumūnā furādā kamā khalaqnākum awwala marratin wataraktum mā khawwalnākum warāa ẓuhūrikum wamā narā maʿakum shufaʿāakumu alladhīna zaʿamtum annahum fīkum shurakāu laqad taqaṭṭaʿa baynakum waḍalla ʿankum mā kuntum tazʿumūna
Marathi ९४. आणि तुम्ही आमच्याजवळ एकटे-एकटे आलात, जसे तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले गेले आणि तुम्हाला जे दिले ते आपल्या मागे सोडून आलात आणि तुमची शिफारस करणारे आम्हाला दृष्टीस पडत नाहीत, ज्यांना तुम्ही आपल्या कार्यात आमचा सहभागी समजत होते. निःसंशय तुमचे आणि त्यांचे संबंध तुटले आणि तुमचे ते विचार तुमच्यापासून हरवले.
Verse 95
۞ إِنَّ ٱللَّهَ فَالِقُ ٱلْحَبِّ وَٱلنَّوَىٰ ۖ يُخْرِجُ ٱلْحَىَّ مِنَ ٱلْمَيِّتِ وَمُخْرِجُ ٱلْمَيِّتِ مِنَ ٱلْحَىِّ ۚ ذَٰلِكُمُ ٱللَّهُ ۖ فَأَنَّىٰ تُؤْفَكُونَ
Transliteration inna l-laha fāliqu l-ḥabi wal-nawā yukh'riju l-ḥaya mina l-mayiti wamukh'riju l-mayiti mina l-ḥayi dhālikumu l-lahu fa-annā tu'fakūna
Marathi ९५. अल्लाहच बीज आणि कोय फाडून अंकूर बाहेर काढतो. तो सजीवाला निर्जीवातून, निर्जीवाला सजीवातून बाहेर काढतो. तोच अल्लाह आहे. मग तुम्ही कोठे उलट बहकत जात आहात?
Verse 96
فَالِقُ ٱلْإِصْبَاحِ وَجَعَلَ ٱلَّيْلَ سَكَنًا وَٱلشَّمْسَ وَٱلْقَمَرَ حُسْبَانًا ۚ ذَٰلِكَ تَقْدِيرُ ٱلْعَزِيزِ ٱلْعَلِيمِ
Transliteration fāliqu l-iṣ'bāḥi wajaʿala al-layla sakanan wal-shamsa wal-qamara ḥus'bānan dhālika taqdīru l-ʿazīzi l-ʿalīmi
Marathi ९६. तो प्रातःकाळ फाडणारा आहे आणि त्याने रात्रीला आराम करण्यासाठी आणि सूर्य आणि चंद्राला हिशोब लावण्यासाठी बनविले. ही निर्धारीत गोष्ट आहे, जबरदस्त ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) ची.
Verse 97
وَهُوَ ٱلَّذِى جَعَلَ لَكُمُ ٱلنُّجُومَ لِتَهْتَدُوا۟ بِهَا فِى ظُلُمَـٰتِ ٱلْبَرِّ وَٱلْبَحْرِ ۗ قَدْ فَصَّلْنَا ٱلْـَٔايَـٰتِ لِقَوْمٍ يَعْلَمُونَ
Transliteration wahuwa alladhī jaʿala lakumu l-nujūma litahtadū bihā fī ẓulumāti l-bari wal-baḥri qad faṣṣalnā l-āyāti liqawmin yaʿlamūna
Marathi ९७. आणि त्यानेच तुमच्यासाठी तारे बनविले, यासाठी की तुम्ही जमीन आणि समुद्राच्या अंधारात त्यांच्याद्वारे मार्ग जाणून घ्यावा. आम्ही त्या लोकांसाठी निशाण्या सांगितल्या आहेत, जे ज्ञान बाळगतात.
Verse 98
وَهُوَ ٱلَّذِىٓ أَنشَأَكُم مِّن نَّفْسٍ وَٰحِدَةٍ فَمُسْتَقَرٌّ وَمُسْتَوْدَعٌ ۗ قَدْ فَصَّلْنَا ٱلْـَٔايَـٰتِ لِقَوْمٍ يَفْقَهُونَ
Transliteration wahuwa alladhī ansha-akum min nafsin wāḥidatin famus'taqarrun wamus'tawdaʿun qad faṣṣalnā l-āyāti liqawmin yafqahūna
Marathi ९८. आणि त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले. मग तुमचे एक कायमस्वरूपी आणि एक सुपूर्द होण्याचे ठिकाण आहे. आम्ही त्यांच्यासाठी निशाण्या (चिन्हे) सांगितल्या आहेत. जे ज्ञान बाळगतात.
Verse 99
وَهُوَ ٱلَّذِىٓ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءً فَأَخْرَجْنَا بِهِۦ نَبَاتَ كُلِّ شَىْءٍ فَأَخْرَجْنَا مِنْهُ خَضِرًا نُّخْرِجُ مِنْهُ حَبًّا مُّتَرَاكِبًا وَمِنَ ٱلنَّخْلِ مِن طَلْعِهَا قِنْوَانٌ دَانِيَةٌ وَجَنَّـٰتٍ مِّنْ أَعْنَابٍ وَٱلزَّيْتُونَ وَٱلرُّمَّانَ مُشْتَبِهًا وَغَيْرَ مُتَشَـٰبِهٍ ۗ ٱنظُرُوٓا۟ إِلَىٰ ثَمَرِهِۦٓ إِذَآ أَثْمَرَ وَيَنْعِهِۦٓ ۚ إِنَّ فِى ذَٰلِكُمْ لَـَٔايَـٰتٍ لِّقَوْمٍ يُؤْمِنُونَ
Transliteration wahuwa alladhī anzala mina l-samāi māan fa-akhrajnā bihi nabāta kulli shayin fa-akhrajnā min'hu khaḍiran nukh'riju min'hu ḥabban mutarākiban wamina l-nakhli min ṭalʿihā qin'wānun dāniyatun wajannātin min aʿnābin wal-zaytūna wal-rumāna mush'tabihan waghayra mutashābihin unẓurū ilā thamarihi idhā athmara wayanʿihi inna fī dhālikum laāyātin liqawmin yu'minūna
Marathi ९९. आणि तोच होय, ज्याने आकाशातून पर्जन्यवृष्टी केली. मग आम्ही त्याद्वारे सर्व प्रकारची वनस्पती उगवली, मग त्याद्वारे हिरवेगार शेती उत्पन्न केली, ज्यापासून आम्ही थरावर थर असलेले धान्य आणि खजूरीच्या गाभ्याशी लटकणारे घोंस आणि द्राक्ष व जैतून व डाळींबाच्या बागा उत्पन करतो, ज्या एकाच प्रकारच्या आणि अनेक प्रकारच्या असतात. त्यांची फळे पाहा, जेव्हा ती लागतात, त्यांचे पिकणे, निःसंशय या सर्वांत, त्या लोकांकरिता निशाण्या (चिन्हे) आहेत, जे ईमान राखतात.
Verse 100
وَجَعَلُوا۟ لِلَّهِ شُرَكَآءَ ٱلْجِنَّ وَخَلَقَهُمْ ۖ وَخَرَقُوا۟ لَهُۥ بَنِينَ وَبَنَـٰتٍۭ بِغَيْرِ عِلْمٍ ۚ سُبْحَـٰنَهُۥ وَتَعَـٰلَىٰ عَمَّا يَصِفُونَ
Transliteration wajaʿalū lillahi shurakāa l-jina wakhalaqahum wakharaqū lahu banīna wabanātin bighayri ʿil'min sub'ḥānahu wataʿālā ʿammā yaṣifūna
Marathi १००. आणि लोकांनी जिन्नांना अल्लाहचे सहभागी बनविले आहे, वास्तविक त्यानेच त्यांना निर्माण केले आहे आणि त्या (अल्लाह) च्याकरिता पुत्र आणि कन्या, मनाने ठरवून घेतल्या, कसल्याही ज्ञानाविना तो (अल्लाह) यांनी सांगितलेल्या अवगुणांपासून मुक्त आणि उत्तम आहे.
Verse 101
بَدِيعُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۖ أَنَّىٰ يَكُونُ لَهُۥ وَلَدٌ وَلَمْ تَكُن لَّهُۥ صَـٰحِبَةٌ ۖ وَخَلَقَ كُلَّ شَىْءٍ ۖ وَهُوَ بِكُلِّ شَىْءٍ عَلِيمٌ
Transliteration badīʿu l-samāwāti wal-arḍi annā yakūnu lahu waladun walam takun lahu ṣāḥibatun wakhalaqa kulla shayin wahuwa bikulli shayin ʿalīmun
Marathi १०१. तो आकाशांची व धरतीची िनिर्मती करणारा आहे, त्याला संतती कशी असू शकते? वास्तविक त्याची कोणतीही पत्नी नाही आणि तो प्रत्येक चीज-वस्तूचा निर्माणकर्ता आणि जाणणारा आहे.
Verse 102
ذَٰلِكُمُ ٱللَّهُ رَبُّكُمْ ۖ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۖ خَـٰلِقُ كُلِّ شَىْءٍ فَٱعْبُدُوهُ ۚ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَىْءٍ وَكِيلٌ
Transliteration dhālikumu l-lahu rabbukum lā ilāha illā huwa khāliqu kulli shayin fa-uʿ'budūhu wahuwa ʿalā kulli shayin wakīlun
Marathi १०२. तोच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य (माबूद) नाही, प्रत्येक चीज-वस्तूचा रचयिता, यास्तव फक्त त्याचीच उपासना करा आणि तो प्रत्येक गोष्टीची देखभाल ठेवणारा आहे.
Verse 103
لَّا تُدْرِكُهُ ٱلْأَبْصَـٰرُ وَهُوَ يُدْرِكُ ٱلْأَبْصَـٰرَ ۖ وَهُوَ ٱللَّطِيفُ ٱلْخَبِيرُ
Transliteration lā tud'rikuhu l-abṣāru wahuwa yud'riku l-abṣāra wahuwa l-laṭīfu l-khabīru
Marathi १०३. डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि तो सर्व नजरा पाहतो आणि तो अतिसूक्ष्मदर्शी, भेद जाणणारा खबर राखणारा आहे.
Verse 104
قَدْ جَآءَكُم بَصَآئِرُ مِن رَّبِّكُمْ ۖ فَمَنْ أَبْصَرَ فَلِنَفْسِهِۦ ۖ وَمَنْ عَمِىَ فَعَلَيْهَا ۚ وَمَآ أَنَا۠ عَلَيْكُم بِحَفِيظٍ
Transliteration qad jāakum baṣāiru min rabbikum faman abṣara falinafsihi waman ʿamiya faʿalayhā wamā anā ʿalaykum biḥafīẓin
Marathi १०४. तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ प्रमाण घेऊन पोहोचले आहे तेव्हा जो पाहील, आपल्या भल्याकरिता (पाहील) आणि जो आंधळा बनून राहील, तो आपले अहित ( नुकसान) करून घेईल आणि मी तुमचा रक्षक नाही.
Verse 105
وَكَذَٰلِكَ نُصَرِّفُ ٱلْـَٔايَـٰتِ وَلِيَقُولُوا۟ دَرَسْتَ وَلِنُبَيِّنَهُۥ لِقَوْمٍ يَعْلَمُونَ
Transliteration wakadhālika nuṣarrifu l-āyāti waliyaqūlū darasta walinubayyinahu liqawmin yaʿlamūna
Marathi १०५. अशा प्रकारे आम्ही (पवित्र कुरआनाच्या) आयतींना पुन्हा पुन्हा सांगात आहोत, यासाठी की त्यांनी सांगावे की तुम्ही वाचून ऐकविले त्या लोकांकरिता जे जाणतात आम्ही ते चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगावे.
Verse 106
ٱتَّبِعْ مَآ أُوحِىَ إِلَيْكَ مِن رَّبِّكَ ۖ لَآ إِلَـٰهَ إِلَّا هُوَ ۖ وَأَعْرِضْ عَنِ ٱلْمُشْرِكِينَ
Transliteration ittabiʿ mā ūḥiya ilayka min rabbika lā ilāha illā huwa wa-aʿriḍ ʿani l-mush'rikīna
Marathi १०६. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशा (वहयी) चे अनुसरण करा की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य (माबूद) नाही आणि अनेकेश्वरवाद्यांपासून विमुख व्हा.
Verse 107
وَلَوْ شَآءَ ٱللَّهُ مَآ أَشْرَكُوا۟ ۗ وَمَا جَعَلْنَـٰكَ عَلَيْهِمْ حَفِيظًا ۖ وَمَآ أَنتَ عَلَيْهِم بِوَكِيلٍ
Transliteration walaw shāa l-lahu mā ashrakū wamā jaʿalnāka ʿalayhim ḥafīẓan wamā anta ʿalayhim biwakīlin
Marathi १०७. आणि अल्लाहने इच्छिले असते तर यांनी इतरांना अल्लाहचे सहभागी ठरविले नसते आणि आम्ही तुम्हाला या लोकांवर देखरेख ठेवणारा बनविले नाही, आणि ना तुम्ही त्यांच्यावर अधिकार राखणारे आहात.
Verse 108
وَلَا تَسُبُّوا۟ ٱلَّذِينَ يَدْعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ فَيَسُبُّوا۟ ٱللَّهَ عَدْوًۢا بِغَيْرِ عِلْمٍ ۗ كَذَٰلِكَ زَيَّنَّا لِكُلِّ أُمَّةٍ عَمَلَهُمْ ثُمَّ إِلَىٰ رَبِّهِم مَّرْجِعُهُمْ فَيُنَبِّئُهُم بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration walā tasubbū alladhīna yadʿūna min dūni l-lahi fayasubbū l-laha ʿadwan bighayri ʿil'min kadhālika zayyannā likulli ummatin ʿamalahum thumma ilā rabbihim marjiʿuhum fayunabbi-uhum bimā kānū yaʿmalūna
Marathi १०८. आणि जे लोक अल्लाहशिवाय दुसऱ्यांना पुकारतात त्यांना अपशब्द वापरू नका, अन्यथा शत्रू बनून अजाणतेपणी तेदेखील अल्लाहसाठी अपशब्द वापरतील. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जनसमूहासाठी त्यांचे कर्म सुशोभित बनविले आहे, मग त्यांना आपल्या पालनकर्त्याकडेच परतायचे आहे. यास्तव तो त्यांना त्याबाबत सूचित करील जे काही ते करीत राहिले.
Verse 109
وَأَقْسَمُوا۟ بِٱللَّهِ جَهْدَ أَيْمَـٰنِهِمْ لَئِن جَآءَتْهُمْ ءَايَةٌ لَّيُؤْمِنُنَّ بِهَا ۚ قُلْ إِنَّمَا ٱلْـَٔايَـٰتُ عِندَ ٱللَّهِ ۖ وَمَا يُشْعِرُكُمْ أَنَّهَآ إِذَا جَآءَتْ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration wa-aqsamū bil-lahi jahda aymānihim la-in jāathum āyatun layu'minunna bihā qul innamā l-āyātu ʿinda l-lahi wamā yush'ʿirukum annahā idhā jāat lā yu'minūna
Marathi १०९. आणि त्यांनी जोरदारपणे अल्लाहची शपथ घेतली की त्यांच्याजवळ एखादी निशाणी आली तर खात्रीने मानतील. तुम्ही सांगा की निशाण्या अल्लाहजवळ आहेत आणि तुम्हाला काय माहीत की त्या निशाण्या येऊन पोहचतील, तरीही ते मानणार नाहीत.
Verse 110
وَنُقَلِّبُ أَفْـِٔدَتَهُمْ وَأَبْصَـٰرَهُمْ كَمَا لَمْ يُؤْمِنُوا۟ بِهِۦٓ أَوَّلَ مَرَّةٍ وَنَذَرُهُمْ فِى طُغْيَـٰنِهِمْ يَعْمَهُونَ
Transliteration wanuqallibu afidatahum wa-abṣārahum kamā lam yu'minū bihi awwala marratin wanadharuhum fī ṭugh'yānihim yaʿmahūna
Marathi ११०. आणि आम्ही त्यांची मने व डोळे फिरवून टाकू जसे त्यांनी पूर्वी यावर ईमान राखले नाही आणि त्यांना त्यांच्या विद्रोहा (च्या अंधारा) त असेच भटकत ठेवू.
Verse 111
۞ وَلَوْ أَنَّنَا نَزَّلْنَآ إِلَيْهِمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةَ وَكَلَّمَهُمُ ٱلْمَوْتَىٰ وَحَشَرْنَا عَلَيْهِمْ كُلَّ شَىْءٍ قُبُلًا مَّا كَانُوا۟ لِيُؤْمِنُوٓا۟ إِلَّآ أَن يَشَآءَ ٱللَّهُ وَلَـٰكِنَّ أَكْثَرَهُمْ يَجْهَلُونَ
Transliteration walaw annanā nazzalnā ilayhimu l-malāikata wakallamahumu l-mawtā waḥasharnā ʿalayhim kulla shayin qubulan mā kānū liyu'minū illā an yashāa l-lahu walākinna aktharahum yajhalūna
Marathi १११. आणि जर आम्ही त्यांच्याजवळ फरिश्ते उतरविले असते, आणि त्यांच्याशी मेलेल्या लोकांनी बातचित केली असती आणि त्यांच्यापुढे सर्व चीज-वस्तू जमा केली असती तरीदेखील अल्लाहच्या इच्छेविना यांनी ईमान राखले नसते, परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक मूर्खता करीत आहेत.
Verse 112
وَكَذَٰلِكَ جَعَلْنَا لِكُلِّ نَبِىٍّ عَدُوًّا شَيَـٰطِينَ ٱلْإِنسِ وَٱلْجِنِّ يُوحِى بَعْضُهُمْ إِلَىٰ بَعْضٍ زُخْرُفَ ٱلْقَوْلِ غُرُورًا ۚ وَلَوْ شَآءَ رَبُّكَ مَا فَعَلُوهُ ۖ فَذَرْهُمْ وَمَا يَفْتَرُونَ
Transliteration wakadhālika jaʿalnā likulli nabiyyin ʿaduwwan shayāṭīna l-insi wal-jini yūḥī baʿḍuhum ilā baʿḍin zukh'rufa l-qawli ghurūran walaw shāa rabbuka mā faʿalūhu fadharhum wamā yaftarūna
Marathi ११२. आणि अशा प्रकारे प्रत्येक पैगंबराकरिता जिन्नांच्या आणि मानवांच्या सैतानांना शत्रू बनविले१ जे आपसात भुरळ पडण्याकरिता मनमोहक गोष्टी मनात आणतात आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते. तेव्हा तुम्ही त्यांना व त्यांच्या कारस्थानाला सोडा.
Verse 113
وَلِتَصْغَىٰٓ إِلَيْهِ أَفْـِٔدَةُ ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ وَلِيَرْضَوْهُ وَلِيَقْتَرِفُوا۟ مَا هُم مُّقْتَرِفُونَ
Transliteration walitaṣghā ilayhi afidatu alladhīna lā yu'minūna bil-ākhirati waliyarḍawhu waliyaqtarifū mā hum muq'tarifūna
Marathi ११३. आणि यासाठी की त्यांची मने त्याकडे प्रवृत्त व्हावीत, जे आखिरतवर ईमान राखत नाही आणि तशाने आनंदित व्हावेत आणि तोच अपराध करावा जो ते लोक करीत होते.१
Verse 114
أَفَغَيْرَ ٱللَّهِ أَبْتَغِى حَكَمًا وَهُوَ ٱلَّذِىٓ أَنزَلَ إِلَيْكُمُ ٱلْكِتَـٰبَ مُفَصَّلًا ۚ وَٱلَّذِينَ ءَاتَيْنَـٰهُمُ ٱلْكِتَـٰبَ يَعْلَمُونَ أَنَّهُۥ مُنَزَّلٌ مِّن رَّبِّكَ بِٱلْحَقِّ ۖ فَلَا تَكُونَنَّ مِنَ ٱلْمُمْتَرِينَ
Transliteration afaghayra l-lahi abtaghī ḥakaman wahuwa alladhī anzala ilaykumu l-kitāba mufaṣṣalan wa-alladhīna ātaynāhumu l-kitāba yaʿlamūna annahu munazzalun min rabbika bil-ḥaqi falā takūnanna mina l-mum'tarīna
Marathi ११४. तर काय मी अल्लाहखेरीज अन्य एखाद्या शासकाचा शोध घ्यावा वास्तविक त्यानेच तुमच्याकडे एक सविस्तर ग्रंथ (कुरआन) अवतरीत केला आणि आम्ही ज्यांना ग्रंथ प्रदान केला आहे, ते जाणतात की खरोखर तो तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्यासह आहे, तेव्हा तुम्ही संशय करणाऱ्यांपैकी होऊ नका.
Verse 115
وَتَمَّتْ كَلِمَتُ رَبِّكَ صِدْقًا وَعَدْلًا ۚ لَّا مُبَدِّلَ لِكَلِمَـٰتِهِۦ ۚ وَهُوَ ٱلسَّمِيعُ ٱلْعَلِيمُ
Transliteration watammat kalimatu rabbika ṣid'qan waʿadlan lā mubaddila likalimātihi wahuwa l-samīʿu l-ʿalīmu
Marathi ११५. आणि तुमच्या पालनकर्त्याची वचने सत्यकथन आणि न्यायाने परिपूर्ण झालीत. त्याच्या वाणीला कोणीही बदलू शकत नाही आणि तो चांगल्या प्रकारे ऐकणारा, जाणणारा आहे.
Verse 116
وَإِن تُطِعْ أَكْثَرَ مَن فِى ٱلْأَرْضِ يُضِلُّوكَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ ۚ إِن يَتَّبِعُونَ إِلَّا ٱلظَّنَّ وَإِنْ هُمْ إِلَّا يَخْرُصُونَ
Transliteration wa-in tuṭiʿ akthara man fī l-arḍi yuḍillūka ʿan sabīli l-lahi in yattabiʿūna illā l-ẓana wa-in hum illā yakhruṣūna
Marathi ११६. आणि जगात राहणाऱ्यांपैकी तुम्ही जर अधिकांश लोकांचे अनुसरण कराल तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटवतील. ते फक्त निराधार कल्पनांच्या मागे चालतात आणि अटकळीच्या गोष्टी करतात.१
Verse 117
إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ مَن يَضِلُّ عَن سَبِيلِهِۦ ۖ وَهُوَ أَعْلَمُ بِٱلْمُهْتَدِينَ
Transliteration inna rabbaka huwa aʿlamu man yaḍillu ʿan sabīlihi wahuwa aʿlamu bil-muh'tadīna
Marathi ११७. निःसंशय तुमचा पालनकर्ता त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो, जे त्याच्या मार्गापासून विचलित होतात आणि तो त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो जे त्याच्या मार्गावर चालतात.
Verse 118
فَكُلُوا۟ مِمَّا ذُكِرَ ٱسْمُ ٱللَّهِ عَلَيْهِ إِن كُنتُم بِـَٔايَـٰتِهِۦ مُؤْمِنِينَ
Transliteration fakulū mimmā dhukira us'mu l-lahi ʿalayhi in kuntum biāyātihi mu'minīna
Marathi ११८. तर ज्या (जनावरा) वर अल्लाहचे नाव घेतले जाईल, त्यातून खा, जर तुम्ही त्याच्या (अल्लाहच्या) हुकूमावर ईमान राखत असाल.
Verse 119
وَمَا لَكُمْ أَلَّا تَأْكُلُوا۟ مِمَّا ذُكِرَ ٱسْمُ ٱللَّهِ عَلَيْهِ وَقَدْ فَصَّلَ لَكُم مَّا حَرَّمَ عَلَيْكُمْ إِلَّا مَا ٱضْطُرِرْتُمْ إِلَيْهِ ۗ وَإِنَّ كَثِيرًا لَّيُضِلُّونَ بِأَهْوَآئِهِم بِغَيْرِ عِلْمٍ ۗ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ بِٱلْمُعْتَدِينَ
Transliteration wamā lakum allā takulū mimmā dhukira us'mu l-lahi ʿalayhi waqad faṣṣala lakum mā ḥarrama ʿalaykum illā mā uḍ'ṭurir'tum ilayhi wa-inna kathīran layuḍillūna bi-ahwāihim bighayri ʿil'min inna rabbaka huwa aʿlamu bil-muʿ'tadīna
Marathi ११९. आणि तुमच्यासाठी कोणती गोष्ट याचे कारण असावी की तुम्ही अशा जनावरांमधून न खावे, ज्यावर अल्लाहचे नाव घेतले गेले असेल जरी अल्लाहने त्या सर्व जनावरांचा तपशील सांगितला आहे. ज्यांना तुमच्यासाठी हराम केले गेले आहे, परंतु तेदेखील जेव्हा तुम्हाला सक्त गरज भासल्यास (वैध आहे) आणि हे निश्चित आहे की बहुतेक लोक आपल्या चुकीच्या इराद्यांवर, कसल्याही प्रमाणाविना भटकतात. निःसंशय अल्लाह अतिरेक करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो.
Verse 120
وَذَرُوا۟ ظَـٰهِرَ ٱلْإِثْمِ وَبَاطِنَهُۥٓ ۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَكْسِبُونَ ٱلْإِثْمَ سَيُجْزَوْنَ بِمَا كَانُوا۟ يَقْتَرِفُونَ
Transliteration wadharū ẓāhira l-ith'mi wabāṭinahu inna alladhīna yaksibūna l-ith'ma sayuj'zawna bimā kānū yaqtarifūna
Marathi १२०. तुम्ही उघड आणि लपलेले असे सर्व अपराध सोडून द्या. निःसंशय जे लोक गुन्हा कमवितात, त्यांना त्यांच्या दुष्कर्मांचा मोबदला लवकरच दिला जाईल.
Verse 121
وَلَا تَأْكُلُوا۟ مِمَّا لَمْ يُذْكَرِ ٱسْمُ ٱللَّهِ عَلَيْهِ وَإِنَّهُۥ لَفِسْقٌ ۗ وَإِنَّ ٱلشَّيَـٰطِينَ لَيُوحُونَ إِلَىٰٓ أَوْلِيَآئِهِمْ لِيُجَـٰدِلُوكُمْ ۖ وَإِنْ أَطَعْتُمُوهُمْ إِنَّكُمْ لَمُشْرِكُونَ
Transliteration walā takulū mimmā lam yudh'kari us'mu l-lahi ʿalayhi wa-innahu lafis'qun wa-inna l-shayāṭīna layūḥūna ilā awliyāihim liyujādilūkum wa-in aṭaʿtumūhum innakum lamush'rikūna
Marathi १२१. आणि ते खाऊ नका, ज्या जनावरावर जिबह करतेवेळी अल्लाहचे नाव घेतले गेले नसेल आणि हे दुष्कृत्य आहे आणि सैतान आपल्या मित्रांच्या मनात अशा गोष्टी भरवितात की त्यांनी तुमच्याशी भांडण करावे जर तुम्ही त्यांचे म्हणणे मानले तर खचितच तुम्ही शिर्क करणारे व्हाल.
Verse 122
أَوَمَن كَانَ مَيْتًا فَأَحْيَيْنَـٰهُ وَجَعَلْنَا لَهُۥ نُورًا يَمْشِى بِهِۦ فِى ٱلنَّاسِ كَمَن مَّثَلُهُۥ فِى ٱلظُّلُمَـٰتِ لَيْسَ بِخَارِجٍ مِّنْهَا ۚ كَذَٰلِكَ زُيِّنَ لِلْكَـٰفِرِينَ مَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration awaman kāna maytan fa-aḥyaynāhu wajaʿalnā lahu nūran yamshī bihi fī l-nāsi kaman mathaluhu fī l-ẓulumāti laysa bikhārijin min'hā kadhālika zuyyina lil'kāfirīna mā kānū yaʿmalūna
Marathi १२२. आणि असा मनुष्य, जो पूर्वी मेलेला होता, मग आम्ही त्याला जिवंत केले आणि त्याच्यासाठी दिव्य प्रकाश बनविला, ज्याद्वारे तो लोकांमध्ये चालतो, काय त्या माणसासारखा असू शकतो, जो अंधारात असावा, आणि त्यातून बाहेर पडू शकत नसावा? अशाच अधर्मी लोकांकरिता त्यांचे आचरण सुशोभित बनविले गेले आहे.
Verse 123
وَكَذَٰلِكَ جَعَلْنَا فِى كُلِّ قَرْيَةٍ أَكَـٰبِرَ مُجْرِمِيهَا لِيَمْكُرُوا۟ فِيهَا ۖ وَمَا يَمْكُرُونَ إِلَّا بِأَنفُسِهِمْ وَمَا يَشْعُرُونَ
Transliteration wakadhālika jaʿalnā fī kulli qaryatin akābira muj'rimīhā liyamkurū fīhā wamā yamkurūna illā bi-anfusihim wamā yashʿurūna
Marathi १२३. आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वस्तीच्या मोठ्या अपराध्यांना कट-कारस्थान रचण्यासाठी बनविले यासाठी की त्यांनी वस्तीत कारस्थान रचावे आणि ते आपल्याच विरूद्ध कारस्थान रचतात मात्र त्यांना ते कळून येत नाही.
Verse 124
وَإِذَا جَآءَتْهُمْ ءَايَةٌ قَالُوا۟ لَن نُّؤْمِنَ حَتَّىٰ نُؤْتَىٰ مِثْلَ مَآ أُوتِىَ رُسُلُ ٱللَّهِ ۘ ٱللَّهُ أَعْلَمُ حَيْثُ يَجْعَلُ رِسَالَتَهُۥ ۗ سَيُصِيبُ ٱلَّذِينَ أَجْرَمُوا۟ صَغَارٌ عِندَ ٱللَّهِ وَعَذَابٌ شَدِيدٌۢ بِمَا كَانُوا۟ يَمْكُرُونَ
Transliteration wa-idhā jāathum āyatun qālū lan nu'mina ḥattā nu'tā mith'la mā ūtiya rusulu l-lahi l-lahu aʿlamu ḥaythu yajʿalu risālatahu sayuṣību alladhīna ajramū ṣaghārun ʿinda l-lahi waʿadhābun shadīdun bimā kānū yamkurūna
Marathi १२४. आणि जेव्हा त्यांच्याजवळ एखादी आयत येते तेव्हा म्हणतात की आम्ही कधीही विश्वास ठेवणार नाहीत जोपर्यंत आम्हालाही तशीच आयत दिली जात नाही, जी अल्लाहच्या पैगंबरांना दिली गेली. अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की त्याने आपली पैगंबरी (रिसालत) कोणत्या ठिकाणी राखावी. लवकरच ज्यांनी अपराध केले आहेत, त्यांना अल्लाहच्या ठिकाणी अपमानित व्हायचे आहे आणि जे कट-कारस्थान ते करीत राहिले, त्याचा मोबदला फार मोठा अज़ाब आहे.
Verse 125
فَمَن يُرِدِ ٱللَّهُ أَن يَهْدِيَهُۥ يَشْرَحْ صَدْرَهُۥ لِلْإِسْلَـٰمِ ۖ وَمَن يُرِدْ أَن يُضِلَّهُۥ يَجْعَلْ صَدْرَهُۥ ضَيِّقًا حَرَجًا كَأَنَّمَا يَصَّعَّدُ فِى ٱلسَّمَآءِ ۚ كَذَٰلِكَ يَجْعَلُ ٱللَّهُ ٱلرِّجْسَ عَلَى ٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ
Transliteration faman yuridi l-lahu an yahdiyahu yashraḥ ṣadrahu lil'is'lāmi waman yurid an yuḍillahu yajʿal ṣadrahu ḍayyiqan ḥarajan ka-annamā yaṣṣaʿʿadu fī l-samāi kadhālika yajʿalu l-lahu l-rij'sa ʿalā alladhīna lā yu'minūna
Marathi १२५. ज्याला अल्लाह सरळ मार्ग दाखवू इच्छितो त्याची छाती (हृदय) इस्लाम (धर्मा) करिता खुली करतो आणि ज्याला मार्गभ्रष्ट करू इच्छितो, त्याची छाती आणखी जास्त संकुचित करतो, जणू काही तो आकाशात चढत आहे. अशा प्रकारे अल्लाह त्यांना घाणीत टाकतो जे ईमान राखत नाही.
Verse 126
وَهَـٰذَا صِرَٰطُ رَبِّكَ مُسْتَقِيمًا ۗ قَدْ فَصَّلْنَا ٱلْـَٔايَـٰتِ لِقَوْمٍ يَذَّكَّرُونَ
Transliteration wahādhā ṣirāṭu rabbika mus'taqīman qad faṣṣalnā l-āyāti liqawmin yadhakkarūna
Marathi १२६. हा तुमच्या पालनकर्त्याचा सरळ मार्ग आहे आम्ही आयतींचे सविस्तर वर्णन त्या जनसमूहाकरिता दिले आहे, जे बोध प्राप्त करतात.
Verse 127
۞ لَهُمْ دَارُ ٱلسَّلَـٰمِ عِندَ رَبِّهِمْ ۖ وَهُوَ وَلِيُّهُم بِمَا كَانُوا۟ يَعْمَلُونَ
Transliteration lahum dāru l-salāmi ʿinda rabbihim wahuwa waliyyuhum bimā kānū yaʿmalūna
Marathi १२७. यांच्याचसाठी त्यांच्या पालनकर्त्याच्या ठिकाणी सलामतीचे घर आहे आणि तोच त्यांच्या सत्कर्मांच्या आधारावर त्यांचा मित्र आहे.
Verse 128
وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ جَمِيعًا يَـٰمَعْشَرَ ٱلْجِنِّ قَدِ ٱسْتَكْثَرْتُم مِّنَ ٱلْإِنسِ ۖ وَقَالَ أَوْلِيَآؤُهُم مِّنَ ٱلْإِنسِ رَبَّنَا ٱسْتَمْتَعَ بَعْضُنَا بِبَعْضٍ وَبَلَغْنَآ أَجَلَنَا ٱلَّذِىٓ أَجَّلْتَ لَنَا ۚ قَالَ ٱلنَّارُ مَثْوَىٰكُمْ خَـٰلِدِينَ فِيهَآ إِلَّا مَا شَآءَ ٱللَّهُ ۗ إِنَّ رَبَّكَ حَكِيمٌ عَلِيمٌ
Transliteration wayawma yaḥshuruhum jamīʿan yāmaʿshara l-jini qadi is'takthartum mina l-insi waqāla awliyāuhum mina l-insi rabbanā is'tamtaʿa baʿḍunā bibaʿḍin wabalaghnā ajalanā alladhī ajjalta lanā qāla l-nāru mathwākum khālidīna fīhā illā mā shāa l-lahu inna rabbaka ḥakīmun ʿalīmun
Marathi १२८. आणि ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना एकत्र करील (आणि फर्माविल) हे जिन्न-समूह! तुम्ही मानवांपैकी बहुतेकांना आत्मसात केले आणि मानवांपैकी त्यांचे मित्र म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपसात लाभ पोहचव आणि आम्ही तुझ्या निर्धारीत वेळेस, जी तू आमच्यासाठी निश्चित केली, जाऊन पोहोचलो. (अल्लाह) फर्माविल, की तुमची जागा जहन्नममध्ये आहे, ज्यात तुम्ही सदैव राहाल, परंतु अल्लाह इच्छिल, निःसंशय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली, ज्ञानी आहे.
Verse 129
وَكَذَٰلِكَ نُوَلِّى بَعْضَ ٱلظَّـٰلِمِينَ بَعْضًۢا بِمَا كَانُوا۟ يَكْسِبُونَ
Transliteration wakadhālika nuwallī baʿḍa l-ẓālimīna baʿḍan bimā kānū yaksibūna
Marathi १२९. अशाच प्रकारे आम्ही अत्याचारी लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी एकमेकांचे दोस्त बनवितो.
Verse 130
يَـٰمَعْشَرَ ٱلْجِنِّ وَٱلْإِنسِ أَلَمْ يَأْتِكُمْ رُسُلٌ مِّنكُمْ يَقُصُّونَ عَلَيْكُمْ ءَايَـٰتِى وَيُنذِرُونَكُمْ لِقَآءَ يَوْمِكُمْ هَـٰذَا ۚ قَالُوا۟ شَهِدْنَا عَلَىٰٓ أَنفُسِنَا ۖ وَغَرَّتْهُمُ ٱلْحَيَوٰةُ ٱلدُّنْيَا وَشَهِدُوا۟ عَلَىٰٓ أَنفُسِهِمْ أَنَّهُمْ كَانُوا۟ كَـٰفِرِينَ
Transliteration yāmaʿshara l-jini wal-insi alam yatikum rusulun minkum yaquṣṣūna ʿalaykum āyātī wayundhirūnakum liqāa yawmikum hādhā qālū shahid'nā ʿalā anfusinā wagharrathumu l-ḥayatu l-dun'yā washahidū ʿalā anfusihim annahum kānū kāfirīna
Marathi १३०. हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो! काय तुमच्याजवळ तुमच्यामधून रसूल (पैगंबर) नाही आलेत? जे तुमच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या (कयामतच्या) दिवसाचा सामना करण्याबाबत सचेत करीत राहिले. ते म्हणतील, आम्ही स्वतःविरूद्ध साक्षी आहोत आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात ठेवले आणि ते स्वतःविरूद्धच साक्ष देतील की ते काफिर (इन्कारी) होते.
Verse 131
ذَٰلِكَ أَن لَّمْ يَكُن رَّبُّكَ مُهْلِكَ ٱلْقُرَىٰ بِظُلْمٍ وَأَهْلُهَا غَـٰفِلُونَ
Transliteration dhālika an lam yakun rabbuka muh'lika l-qurā biẓul'min wa-ahluhā ghāfilūna
Marathi १३१. (पैगंबर पाठविले गेले) कारण तुमचा पालनकर्ता एखाद्या वस्तीच्या लोकांना एखाद्या अत्याचारापायी नष्ट करीत नाही, जेव्हा तेथील रहिवाशी गाफील असावेत.
Verse 132
وَلِكُلٍّ دَرَجَـٰتٌ مِّمَّا عَمِلُوا۟ ۚ وَمَا رَبُّكَ بِغَـٰفِلٍ عَمَّا يَعْمَلُونَ
Transliteration walikullin darajātun mimmā ʿamilū wamā rabbuka bighāfilin ʿammā yaʿmalūna
Marathi १३२. आणि प्रत्येकासाठी त्याच्या कर्मानुसार अनेक दर्जे आहेत आणि तुमचा पालनकर्ता या कर्मांशी गाफील नाही जी ते करीत आहेत.
Verse 133
وَرَبُّكَ ٱلْغَنِىُّ ذُو ٱلرَّحْمَةِ ۚ إِن يَشَأْ يُذْهِبْكُمْ وَيَسْتَخْلِفْ مِنۢ بَعْدِكُم مَّا يَشَآءُ كَمَآ أَنشَأَكُم مِّن ذُرِّيَّةِ قَوْمٍ ءَاخَرِينَ
Transliteration warabbuka l-ghaniyu dhū l-raḥmati in yasha yudh'hib'kum wayastakhlif min baʿdikum mā yashāu kamā ansha-akum min dhurriyyati qawmin ākharīna
Marathi १३३. आणि तुमचा पालनकर्ता निःस्पृह दया करणारा आहे. जर त्याने इच्छिले तर तुमचा सर्वनाश करून टाकील आणि तुमच्यानंतर ज्याला इच्छिल तुमच्या जागी आणून ठेवील, जसे तुम्हाला अन्य एका जनसमूहाच्या वंशात निर्माण केले.
Verse 134
إِنَّ مَا تُوعَدُونَ لَـَٔاتٍ ۖ وَمَآ أَنتُم بِمُعْجِزِينَ
Transliteration inna mā tūʿadūna laātin wamā antum bimuʿ'jizīna
Marathi १३४. ज्या गोष्टीचा तुम्हाला वायदा दिला जात आहे, ती निःसंशय घडून येणार आहे आणि तुम्ही विवश करू शकत नाही.
Verse 135
قُلْ يَـٰقَوْمِ ٱعْمَلُوا۟ عَلَىٰ مَكَانَتِكُمْ إِنِّى عَامِلٌ ۖ فَسَوْفَ تَعْلَمُونَ مَن تَكُونُ لَهُۥ عَـٰقِبَةُ ٱلدَّارِ ۗ إِنَّهُۥ لَا يُفْلِحُ ٱلظَّـٰلِمُونَ
Transliteration qul yāqawmi iʿ'malū ʿalā makānatikum innī ʿāmilun fasawfa taʿlamūna man takūnu lahu ʿāqibatu l-dāri innahu lā yuf'liḥu l-ẓālimūna
Marathi १३५. तुम्ही सांगा, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या ठिकाणी आपले कर्म करीत राहा, मीदेखील (आपल्या जागी) कर्म करीत आहे. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणाचा शेवट या जगानंतर (चांगला) होतो. निःसंशय अत्याचार करणारे कधीही सफल होणार नाहीत.
Verse 136
وَجَعَلُوا۟ لِلَّهِ مِمَّا ذَرَأَ مِنَ ٱلْحَرْثِ وَٱلْأَنْعَـٰمِ نَصِيبًا فَقَالُوا۟ هَـٰذَا لِلَّهِ بِزَعْمِهِمْ وَهَـٰذَا لِشُرَكَآئِنَا ۖ فَمَا كَانَ لِشُرَكَآئِهِمْ فَلَا يَصِلُ إِلَى ٱللَّهِ ۖ وَمَا كَانَ لِلَّهِ فَهُوَ يَصِلُ إِلَىٰ شُرَكَآئِهِمْ ۗ سَآءَ مَا يَحْكُمُونَ
Transliteration wajaʿalū lillahi mimmā dhara-a mina l-ḥarthi wal-anʿāmi naṣīban faqālū hādhā lillahi bizaʿmihim wahādhā lishurakāinā famā kāna lishurakāihim falā yaṣilu ilā l-lahi wamā kāna lillahi fahuwa yaṣilu ilā shurakāihim sāa mā yaḥkumūna
Marathi १३६. आणि अल्लाहने जी शेती आणि जनावरे निर्माण केलीत, त्यांनी त्यांच्यातून काही भाग अल्लाहचा ठरविला आणि आपल्या कल्पनेनुसार म्हणाले की हा हिस्सा अल्लाहचा आहे, आणि हा आमच्या उपास्य-देवतांचा, मग जो आमच्या दैवतांचा (हिस्सा) आहे, तो अल्लाहपर्यंत पोहचत नाही, मात्र जो अल्लाहचा आहे तो त्यांच्या दैवतांपर्यंत पोहोचतो. किती वाईट फैसला ते करतात!
Verse 137
وَكَذَٰلِكَ زَيَّنَ لِكَثِيرٍ مِّنَ ٱلْمُشْرِكِينَ قَتْلَ أَوْلَـٰدِهِمْ شُرَكَآؤُهُمْ لِيُرْدُوهُمْ وَلِيَلْبِسُوا۟ عَلَيْهِمْ دِينَهُمْ ۖ وَلَوْ شَآءَ ٱللَّهُ مَا فَعَلُوهُ ۖ فَذَرْهُمْ وَمَا يَفْتَرُونَ
Transliteration wakadhālika zayyana likathīrin mina l-mush'rikīna qatla awlādihim shurakāuhum liyur'dūhum waliyalbisū ʿalayhim dīnahum walaw shāa l-lahu mā faʿalūhu fadharhum wamā yaftarūna
Marathi १३७. आणि अशा प्रकारे बहुतेक अनेकेश्वरवाद्यांकरिता त्यांच्या दैवतांनी त्यांना बरबाद करण्यासाठी आणि त्यांच्यावर त्यांचा धर्म संशयास्पद बनविण्यासाठी, त्यांच्या संततीच्या हत्येला सुशोभित बनविले आहे आणि अल्लाहने इच्छिले असते तर त्यांनी असे केले नसते तेव्हा तुम्ही त्यांना आणि त्यांच्या मनाने रचलेल्या गोष्टीला सोडून द्या.
Verse 138
وَقَالُوا۟ هَـٰذِهِۦٓ أَنْعَـٰمٌ وَحَرْثٌ حِجْرٌ لَّا يَطْعَمُهَآ إِلَّا مَن نَّشَآءُ بِزَعْمِهِمْ وَأَنْعَـٰمٌ حُرِّمَتْ ظُهُورُهَا وَأَنْعَـٰمٌ لَّا يَذْكُرُونَ ٱسْمَ ٱللَّهِ عَلَيْهَا ٱفْتِرَآءً عَلَيْهِ ۚ سَيَجْزِيهِم بِمَا كَانُوا۟ يَفْتَرُونَ
Transliteration waqālū hādhihi anʿāmun waḥarthun ḥij'run lā yaṭʿamuhā illā man nashāu bizaʿmihim wa-anʿāmun ḥurrimat ẓuhūruhā wa-anʿāmun lā yadhkurūna is'ma l-lahi ʿalayhā if'tirāan ʿalayhi sayajzīhim bimā kānū yaftarūna
Marathi १३८. आणि ते म्हणाले, ही जनावरे आणि शेती हराम आहे, याला तोच खाईल, ज्याला आम्ही आपल्या इच्छेने खायला सांगू आणि काही जनावरांची पाठ (अर्थात स्वार होणे) हराम आहे आणि काही जनावरांवर (जिबह करतेवेळी) अल्लाहचे नाव घेत नाही, अल्लाहवर खोटे रचण्याकरिता अल्लाह त्यांना त्यांच्या आरोपाचा मोबदला लवकरच देईल.
Verse 139
وَقَالُوا۟ مَا فِى بُطُونِ هَـٰذِهِ ٱلْأَنْعَـٰمِ خَالِصَةٌ لِّذُكُورِنَا وَمُحَرَّمٌ عَلَىٰٓ أَزْوَٰجِنَا ۖ وَإِن يَكُن مَّيْتَةً فَهُمْ فِيهِ شُرَكَآءُ ۚ سَيَجْزِيهِمْ وَصْفَهُمْ ۚ إِنَّهُۥ حَكِيمٌ عَلِيمٌ
Transliteration waqālū mā fī buṭūni hādhihi l-anʿāmi khāliṣatun lidhukūrinā wamuḥarramun ʿalā azwājinā wa-in yakun maytatan fahum fīhi shurakāu sayajzīhim waṣfahum innahu ḥakīmun ʿalīmun
Marathi १३९. आणि ते म्हणाले, या जनावरांच्या गर्भात जे आहे ते विशेषतः आमच्या पुरुषांकरिता आहे आणि आमच्या बायकांवर हराम आहे, मात्र जर ते मृत असेल तर त्यात सर्वांचा हिस्सा आहे. तो (अल्लाह) त्यांच्या या कथनाचा मोबदला लवकरच देईल. निःसंशय तो हिकमतशाली, जाणणारा आहे.
Verse 140
قَدْ خَسِرَ ٱلَّذِينَ قَتَلُوٓا۟ أَوْلَـٰدَهُمْ سَفَهًۢا بِغَيْرِ عِلْمٍ وَحَرَّمُوا۟ مَا رَزَقَهُمُ ٱللَّهُ ٱفْتِرَآءً عَلَى ٱللَّهِ ۚ قَدْ ضَلُّوا۟ وَمَا كَانُوا۟ مُهْتَدِينَ
Transliteration qad khasira alladhīna qatalū awlādahum safahan bighayri ʿil'min waḥarramū mā razaqahumu l-lahu if'tirāan ʿalā l-lahi qad ḍallū wamā kānū muh'tadīna
Marathi १४०. मोठ्या नुकसानात राहिले ते ज्यांनी ज्ञानाविना मूर्खपणाने आपल्या संततीची हत्या केली आणि अल्लाहने जी रोजी (आजीविका) प्रदान केली तिला हराम ठरवून घेतले अल्लाहवर खोटे रचण्यापायी, ते मार्गभ्रष्ट झाले आणि सन्मार्गावर राहिले नाहीत.
Verse 141
۞ وَهُوَ ٱلَّذِىٓ أَنشَأَ جَنَّـٰتٍ مَّعْرُوشَـٰتٍ وَغَيْرَ مَعْرُوشَـٰتٍ وَٱلنَّخْلَ وَٱلزَّرْعَ مُخْتَلِفًا أُكُلُهُۥ وَٱلزَّيْتُونَ وَٱلرُّمَّانَ مُتَشَـٰبِهًا وَغَيْرَ مُتَشَـٰبِهٍ ۚ كُلُوا۟ مِن ثَمَرِهِۦٓ إِذَآ أَثْمَرَ وَءَاتُوا۟ حَقَّهُۥ يَوْمَ حَصَادِهِۦ ۖ وَلَا تُسْرِفُوٓا۟ ۚ إِنَّهُۥ لَا يُحِبُّ ٱلْمُسْرِفِينَ
Transliteration wahuwa alladhī ansha-a jannātin maʿrūshātin waghayra maʿrūshātin wal-nakhla wal-zarʿa mukh'talifan ukuluhu wal-zaytūna wal-rumāna mutashābihan waghayra mutashābihin kulū min thamarihi idhā athmara waātū ḥaqqahu yawma ḥaṣādihi walā tus'rifū innahu lā yuḥibbu l-mus'rifīna
Marathi १४१. तोच (अल्लाह) आहे, ज्याने वेलींच्या आणि विनावेलींच्या बागा निर्माण केल्या, आणि खजूर व शेती ज्यांचा स्वाद अनेक प्रकारचा आहे, आणि जैतून व डाळिंबे एक प्रकारची, अनेकविध (अनेकप्रकारची). जेव्हा त्यांना फळे येतील तेव्हा तुम्ही ती खा आणि त्याच्या कापणीच्या दिवशी त्याचा हक्क जरूर अदा करा आणि उधळपट्टीने खर्च करू नका. निःसंशय, अल्लाह उधळपट्टी करणाऱ्यांशी प्रेम राखत नाही.
Verse 142
وَمِنَ ٱلْأَنْعَـٰمِ حَمُولَةً وَفَرْشًا ۚ كُلُوا۟ مِمَّا رَزَقَكُمُ ٱللَّهُ وَلَا تَتَّبِعُوا۟ خُطُوَٰتِ ٱلشَّيْطَـٰنِ ۚ إِنَّهُۥ لَكُمْ عَدُوٌّ مُّبِينٌ
Transliteration wamina l-anʿāmi ḥamūlatan wafarshan kulū mimmā razaqakumu l-lahu walā tattabiʿū khuṭuwāti l-shayṭāni innahu lakum ʿaduwwun mubīnun
Marathi १४२. आणि जनावरांमध्ये काही ओझे लादण्यायोग्य आणि काही जमिनीला लागून असलेले बनविले. खा, जे तुम्हाला अल्लाहने प्रदान केले आहे, आणि सैतानाच्या पद-चिन्हांचे अन्ुसरण करू नका. निःसंशय, तो तुमचा उघड शत्रू आहे.
Verse 143
ثَمَـٰنِيَةَ أَزْوَٰجٍ ۖ مِّنَ ٱلضَّأْنِ ٱثْنَيْنِ وَمِنَ ٱلْمَعْزِ ٱثْنَيْنِ ۗ قُلْ ءَآلذَّكَرَيْنِ حَرَّمَ أَمِ ٱلْأُنثَيَيْنِ أَمَّا ٱشْتَمَلَتْ عَلَيْهِ أَرْحَامُ ٱلْأُنثَيَيْنِ ۖ نَبِّـُٔونِى بِعِلْمٍ إِن كُنتُمْ صَـٰدِقِينَ
Transliteration thamāniyata azwājin mina l-ḍani ith'nayni wamina l-maʿzi ith'nayni qul āldhakarayni ḥarrama ami l-unthayayni ammā ish'tamalat ʿalayhi arḥāmu l-unthayayni nabbiūnī biʿil'min in kuntum ṣādiqīna
Marathi १४३. आठ प्रकारचे जोडे (बनविले) मेंढीच्या जातीचे दोन, बकरीच्या जातीचे दोन. तुम्ही सांगा की अल्लाहने दोघांच्या नराला हराम केले आहे किंवा दोघांच्या मादीला? किंवा त्याला जो दोन्ही माद्यांच्या गर्भाशयात आहे मला ज्ञानासह सांगा, जर सच्चे असाल.
Verse 144
وَمِنَ ٱلْإِبِلِ ٱثْنَيْنِ وَمِنَ ٱلْبَقَرِ ٱثْنَيْنِ ۗ قُلْ ءَآلذَّكَرَيْنِ حَرَّمَ أَمِ ٱلْأُنثَيَيْنِ أَمَّا ٱشْتَمَلَتْ عَلَيْهِ أَرْحَامُ ٱلْأُنثَيَيْنِ ۖ أَمْ كُنتُمْ شُهَدَآءَ إِذْ وَصَّىٰكُمُ ٱللَّهُ بِهَـٰذَا ۚ فَمَنْ أَظْلَمُ مِمَّنِ ٱفْتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًا لِّيُضِلَّ ٱلنَّاسَ بِغَيْرِ عِلْمٍ ۗ إِنَّ ٱللَّهَ لَا يَهْدِى ٱلْقَوْمَ ٱلظَّـٰلِمِينَ
Transliteration wamina l-ibili ith'nayni wamina l-baqari ith'nayni qul āldhakarayni ḥarrama ami l-unthayayni ammā ish'tamalat ʿalayhi arḥāmu l-unthayayni am kuntum shuhadāa idh waṣṣākumu l-lahu bihādhā faman aẓlamu mimmani if'tarā ʿalā l-lahi kadhiban liyuḍilla l-nāsa bighayri ʿil'min inna l-laha lā yahdī l-qawma l-ẓālimīna
Marathi १४४. आणि उंटामध्ये दोन आणि गायीच्या जातीत दोन. तुम्ही सांगा, काय अल्लाहने दोन्ही माद्यांना किंवा दोन्ही नरांना हराम केले आहे? किंवा त्याला, जो दोन्ही माद्यांच्या गर्भाशयात सामील असेल. काय तुम्ही त्या वेळी हजर होते, जेव्हा अल्लाहने याचा आदेश दिला? मग त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहवर खोटा आरोप ठेवील, यासाठी की कसल्याही ज्ञानाविना लोकांना मार्गभ्रष्ट करावे. निःसंशय, अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
Verse 145
قُل لَّآ أَجِدُ فِى مَآ أُوحِىَ إِلَىَّ مُحَرَّمًا عَلَىٰ طَاعِمٍ يَطْعَمُهُۥٓ إِلَّآ أَن يَكُونَ مَيْتَةً أَوْ دَمًا مَّسْفُوحًا أَوْ لَحْمَ خِنزِيرٍ فَإِنَّهُۥ رِجْسٌ أَوْ فِسْقًا أُهِلَّ لِغَيْرِ ٱللَّهِ بِهِۦ ۚ فَمَنِ ٱضْطُرَّ غَيْرَ بَاغٍ وَلَا عَادٍ فَإِنَّ رَبَّكَ غَفُورٌ رَّحِيمٌ
Transliteration qul lā ajidu fī mā ūḥiya ilayya muḥarraman ʿalā ṭāʿimin yaṭʿamuhu illā an yakūna maytatan aw daman masfūḥan aw laḥma khinzīrin fa-innahu rij'sun aw fis'qan uhilla lighayri l-lahi bihi famani uḍ'ṭurra ghayra bāghin walā ʿādin fa-inna rabbaka ghafūrun raḥīmun
Marathi १४५. तुम्ही सांगा, मला जो आदेश दिला गेला आहे, त्यात कोणा खाणाऱ्याकरिता कोणतेही खाद्य हराम आढळत नाही. परंतु हे की ते मेलेले असेल, किंवा वाहते रक्त, किंवा डुकराचे मांस, यासाठी की ते अगदी नापाक (अस्वच्छ-अशुद्ध) आहे किंवा जे शिर्कचे कारण असेल, ज्यावर अल्लाहशिवाय दुसऱ्यांचे नाव घेतले गेले असेल, मग जो कोणी लाचार असेल वास्तविक विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणारा नसेल तर अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.
Verse 146
وَعَلَى ٱلَّذِينَ هَادُوا۟ حَرَّمْنَا كُلَّ ذِى ظُفُرٍ ۖ وَمِنَ ٱلْبَقَرِ وَٱلْغَنَمِ حَرَّمْنَا عَلَيْهِمْ شُحُومَهُمَآ إِلَّا مَا حَمَلَتْ ظُهُورُهُمَآ أَوِ ٱلْحَوَايَآ أَوْ مَا ٱخْتَلَطَ بِعَظْمٍ ۚ ذَٰلِكَ جَزَيْنَـٰهُم بِبَغْيِهِمْ ۖ وَإِنَّا لَصَـٰدِقُونَ
Transliteration waʿalā alladhīna hādū ḥarramnā kulla dhī ẓufurin wamina l-baqari wal-ghanami ḥarramnā ʿalayhim shuḥūmahumā illā mā ḥamalat ẓuhūruhumā awi l-ḥawāyā aw mā ikh'talaṭa biʿaẓmin dhālika jazaynāhum bibaghyihim wa-innā laṣādiqūna
Marathi १४६. आणि आम्ही यहूदी लोकांवर नखे असलेली जनावरे हराम केली आणि गाय व बकरीची चरबी त्यांच्यावर हराम केली, मात्र जी दोघांच्या पाठीवर आणि आतड्यात असेल किंवा जी एखाद्या हाडाशी लागून असेल. आम्ही हा त्यांच्या (धर्माशी) विद्रोहाचा मोबदला दिला आणि आम्ही सच्चे आहोत.
Verse 147
فَإِن كَذَّبُوكَ فَقُل رَّبُّكُمْ ذُو رَحْمَةٍ وَٰسِعَةٍ وَلَا يُرَدُّ بَأْسُهُۥ عَنِ ٱلْقَوْمِ ٱلْمُجْرِمِينَ
Transliteration fa-in kadhabūka faqul rabbukum dhū raḥmatin wāsiʿatin walā yuraddu basuhu ʿani l-qawmi l-muj'rimīna
Marathi १४७. जर तो तुम्हाला खोटे ठरविल तर सांगा की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ची दया अतिशय विस्तृत आहे आणि त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टळू शकत नाही.
Verse 148
سَيَقُولُ ٱلَّذِينَ أَشْرَكُوا۟ لَوْ شَآءَ ٱللَّهُ مَآ أَشْرَكْنَا وَلَآ ءَابَآؤُنَا وَلَا حَرَّمْنَا مِن شَىْءٍ ۚ كَذَٰلِكَ كَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبْلِهِمْ حَتَّىٰ ذَاقُوا۟ بَأْسَنَا ۗ قُلْ هَلْ عِندَكُم مِّنْ عِلْمٍ فَتُخْرِجُوهُ لَنَآ ۖ إِن تَتَّبِعُونَ إِلَّا ٱلظَّنَّ وَإِنْ أَنتُمْ إِلَّا تَخْرُصُونَ
Transliteration sayaqūlu alladhīna ashrakū law shāa l-lahu mā ashraknā walā ābāunā walā ḥarramnā min shayin kadhālika kadhaba alladhīna min qablihim ḥattā dhāqū basanā qul hal ʿindakum min ʿil'min fatukh'rijūhu lanā in tattabiʿūna illā l-ẓana wa-in antum illā takhruṣūna
Marathi १४८. अनेक ईश्वरांची उपासना करणारे म्हणतील, अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमच्या वाड-वडिलांनी, अल्लाहसोबत दुसऱ्यांना उपास्य मानले नसते, ना एखाद्या वस्तूला हराम ठरविले असते अशा प्रकारे यांच्या पूर्वीच्या लोकांनी खोटे ठरविले, येथपर्यंत की आमच्या अज़ाबचा स्वाद चाखून घेतला. त्यांना सांगा, काय तुमच्याजवळ एखादे ज्ञान आहे तर ते आमच्यासाठी बाहेर काढा (जाहीर करा) तुम्ही अटकळीवर चालता आणि फक्त अनुमान लावता.
Verse 149
قُلْ فَلِلَّهِ ٱلْحُجَّةُ ٱلْبَـٰلِغَةُ ۖ فَلَوْ شَآءَ لَهَدَىٰكُمْ أَجْمَعِينَ
Transliteration qul falillahi l-ḥujatu l-bālighatu falaw shāa lahadākum ajmaʿīna
Marathi १४९. तुम्ही सांगा, मग अल्लाहचेच प्रमाण प्रभावशाली आहे, यास्तव त्याने जर इच्छिले तर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करू शकतो.
Verse 150
قُلْ هَلُمَّ شُهَدَآءَكُمُ ٱلَّذِينَ يَشْهَدُونَ أَنَّ ٱللَّهَ حَرَّمَ هَـٰذَا ۖ فَإِن شَهِدُوا۟ فَلَا تَشْهَدْ مَعَهُمْ ۚ وَلَا تَتَّبِعْ أَهْوَآءَ ٱلَّذِينَ كَذَّبُوا۟ بِـَٔايَـٰتِنَا وَٱلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِٱلْـَٔاخِرَةِ وَهُم بِرَبِّهِمْ يَعْدِلُونَ
Transliteration qul halumma shuhadāakumu alladhīna yashhadūna anna l-laha ḥarrama hādhā fa-in shahidū falā tashhad maʿahum walā tattabiʿ ahwāa alladhīna kadhabū biāyātinā wa-alladhīna lā yu'minūna bil-ākhirati wahum birabbihim yaʿdilūna
Marathi १५०. तुम्ही सांगा, आपल्या त्या साक्ष देणाऱ्यांना आणा, ज्यांनी ही साक्ष द्यावी की अल्लाहने याला हरामे केले आहे, मग जर ते साक्ष देतील तर तुम्ही त्यांच्यासोबत साक्ष देऊ नका आणि त्यांच्या मनमानी इच्छा-आकांक्षांचे अनुसरण करू नका आणि ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि जे आखिरतवर ईमान राखत नाही आणि (इतरांना)आपल्या पालनकर्त्यासमान मानतात.
Verse 151
۞ قُلْ تَعَالَوْا۟ أَتْلُ مَا حَرَّمَ رَبُّكُمْ عَلَيْكُمْ ۖ أَلَّا تُشْرِكُوا۟ بِهِۦ شَيْـًٔا ۖ وَبِٱلْوَٰلِدَيْنِ إِحْسَـٰنًا ۖ وَلَا تَقْتُلُوٓا۟ أَوْلَـٰدَكُم مِّنْ إِمْلَـٰقٍ ۖ نَّحْنُ نَرْزُقُكُمْ وَإِيَّاهُمْ ۖ وَلَا تَقْرَبُوا۟ ٱلْفَوَٰحِشَ مَا ظَهَرَ مِنْهَا وَمَا بَطَنَ ۖ وَلَا تَقْتُلُوا۟ ٱلنَّفْسَ ٱلَّتِى حَرَّمَ ٱللَّهُ إِلَّا بِٱلْحَقِّ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّىٰكُم بِهِۦ لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ
Transliteration qul taʿālaw atlu mā ḥarrama rabbukum ʿalaykum allā tush'rikū bihi shayan wabil-wālidayni iḥ'sānan walā taqtulū awlādakum min im'lāqin naḥnu narzuqukum wa-iyyāhum walā taqrabū l-fawāḥisha mā ẓahara min'hā wamā baṭana walā taqtulū l-nafsa allatī ḥarrama l-lahu illā bil-ḥaqi dhālikum waṣṣākum bihi laʿallakum taʿqilūna
Marathi १५१. तुम्ही सांगा की, या, मी वाचून ऐकवू की तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याने कशापासून मनाई केली आहे. ते हे की त्याच्यासोबत कोणत्याही चीज-वस्तूला सहभागी करू नका आणि माता पित्याशी नेक वर्तन करा आणि आपल्या संततीची गरीबीमुळे हत्या करू नका. आम्ही तुम्हाला आणि त्यांना रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि खुल्या व छुप्या निर्लज्जतेच्या जवळ जाऊ नका आणि त्या जीवाला ज्याबाबत अल्लाहने मनाई केली आहे, ठार मारू नका, परंतु धर्मशास्त्रीय (शरीअतच्या) कारणाने. तुम्हाला त्याने याचाच आदेश दिला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.
Verse 152
وَلَا تَقْرَبُوا۟ مَالَ ٱلْيَتِيمِ إِلَّا بِٱلَّتِى هِىَ أَحْسَنُ حَتَّىٰ يَبْلُغَ أَشُدَّهُۥ ۖ وَأَوْفُوا۟ ٱلْكَيْلَ وَٱلْمِيزَانَ بِٱلْقِسْطِ ۖ لَا نُكَلِّفُ نَفْسًا إِلَّا وُسْعَهَا ۖ وَإِذَا قُلْتُمْ فَٱعْدِلُوا۟ وَلَوْ كَانَ ذَا قُرْبَىٰ ۖ وَبِعَهْدِ ٱللَّهِ أَوْفُوا۟ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّىٰكُم بِهِۦ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ
Transliteration walā taqrabū māla l-yatīmi illā bi-allatī hiya aḥsanu ḥattā yablugha ashuddahu wa-awfū l-kayla wal-mīzāna bil-qis'ṭi lā nukallifu nafsan illā wus'ʿahā wa-idhā qul'tum fa-iʿ'dilū walaw kāna dhā qur'bā wabiʿahdi l-lahi awfū dhālikum waṣṣākum bihi laʿallakum tadhakkarūna
Marathi १५२. आणि अनाथाच्या संपत्तीच्या जवळही जाऊ नका, तथापि खूप चांगल्या पद्धतीने, येथेपर्यंत की ते तारुण्यावस्थेस पोहोचावेत, आणि न्यायासह माप-तोल पूर्ण करा. आम्ही कोणावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त भार ठेवत नाही आणि जेव्हा बोलाल, तेव्हा न्याय करा, मग तो जवळचा नातेवाईक का असेना आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा. त्याने तुम्हा लोकांना याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही स्मरण राखावे.
Verse 153
وَأَنَّ هَـٰذَا صِرَٰطِى مُسْتَقِيمًا فَٱتَّبِعُوهُ ۖ وَلَا تَتَّبِعُوا۟ ٱلسُّبُلَ فَتَفَرَّقَ بِكُمْ عَن سَبِيلِهِۦ ۚ ذَٰلِكُمْ وَصَّىٰكُم بِهِۦ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ
Transliteration wa-anna hādhā ṣirāṭī mus'taqīman fa-ittabiʿūhu walā tattabiʿū l-subula fatafarraqa bikum ʿan sabīlihi dhālikum waṣṣākum bihi laʿallakum tattaqūna
Marathi १५३. आणि हाच माझा सरळ मार्ग आहे यास्तव त्यावरच चाला आणि इतर मार्गांवर चालू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्या मार्गपासून दूर करतील त्याने (अल्लाहने) याचाच आदेश दिला आहे यासाठी की तुम्ही सुरक्षित राहावे.
Verse 154
ثُمَّ ءَاتَيْنَا مُوسَى ٱلْكِتَـٰبَ تَمَامًا عَلَى ٱلَّذِىٓ أَحْسَنَ وَتَفْصِيلًا لِّكُلِّ شَىْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً لَّعَلَّهُم بِلِقَآءِ رَبِّهِمْ يُؤْمِنُونَ
Transliteration thumma ātaynā mūsā l-kitāba tamāman ʿalā alladhī aḥsana watafṣīlan likulli shayin wahudan waraḥmatan laʿallahum biliqāi rabbihim yu'minūna
Marathi १५४. आणि आम्ही (पैगंबर) मूसा यांना ग्रंथ प्रदान केला, त्याच्यावर आपली कृपा देणगी (नेमत) पूर्ण करण्यासाठी, ज्याने सत्कर्मे केलीत आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि मार्गदर्शन आणि दया कृपाकरिता, यासाठी की त्यांनी आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर ईमान राखावे.
Verse 155
وَهَـٰذَا كِتَـٰبٌ أَنزَلْنَـٰهُ مُبَارَكٌ فَٱتَّبِعُوهُ وَٱتَّقُوا۟ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ
Transliteration wahādhā kitābun anzalnāhu mubārakun fa-ittabiʿūhu wa-ittaqū laʿallakum tur'ḥamūna
Marathi १५५. आणि हा (पवित्र कुरआन) एक शुभ ग्रंथ आहे, जो आम्ही अवतरित केला, यास्तव तुम्ही याचे अनुसरण करा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी.
Verse 156
أَن تَقُولُوٓا۟ إِنَّمَآ أُنزِلَ ٱلْكِتَـٰبُ عَلَىٰ طَآئِفَتَيْنِ مِن قَبْلِنَا وَإِن كُنَّا عَن دِرَاسَتِهِمْ لَغَـٰفِلِينَ
Transliteration an taqūlū innamā unzila l-kitābu ʿalā ṭāifatayni min qablinā wa-in kunnā ʿan dirāsatihim laghāfilīna
Marathi १५६. यासाठी की असे न म्हणावे की आमच्या पूर्वी दोन जनसमूहांवर ग्रंथ (तौरात आणि इंजील) अवतरित केले गेले आणि आम्ही त्यांच्या शिकवणीपासून अनभिज्ञ राहिलो.
Verse 157
أَوْ تَقُولُوا۟ لَوْ أَنَّآ أُنزِلَ عَلَيْنَا ٱلْكِتَـٰبُ لَكُنَّآ أَهْدَىٰ مِنْهُمْ ۚ فَقَدْ جَآءَكُم بَيِّنَةٌ مِّن رَّبِّكُمْ وَهُدًى وَرَحْمَةٌ ۚ فَمَنْ أَظْلَمُ مِمَّن كَذَّبَ بِـَٔايَـٰتِ ٱللَّهِ وَصَدَفَ عَنْهَا ۗ سَنَجْزِى ٱلَّذِينَ يَصْدِفُونَ عَنْ ءَايَـٰتِنَا سُوٓءَ ٱلْعَذَابِ بِمَا كَانُوا۟ يَصْدِفُونَ
Transliteration aw taqūlū law annā unzila ʿalaynā l-kitābu lakunnā ahdā min'hum faqad jāakum bayyinatun min rabbikum wahudan waraḥmatun faman aẓlamu mimman kadhaba biāyāti l-lahi waṣadafa ʿanhā sanajzī alladhīna yaṣdifūna ʿan āyātinā sūa l-ʿadhābi bimā kānū yaṣdifūna
Marathi १५७. किंवा तुम्ही असे न म्हणावे की जर आमच्यावर ग्रंथ अवतरित झाला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक सत्य मार्गावर राहिलो असतो. तेव्हा तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण आणि मार्गदर्शन व दया येऊन पोहोचली आहे. मग त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, ज्याने अल्लाहच्या आयतींना खोटे ठरविले आणि त्यांच्याकडून तोंड फिरविले आम्ही लवकरच अशा लोकांना मोठा सक्त अज़ाब देऊ जे आमच्या आयतींकडून तोंड फिरवितात.
Verse 158
هَلْ يَنظُرُونَ إِلَّآ أَن تَأْتِيَهُمُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ أَوْ يَأْتِىَ رَبُّكَ أَوْ يَأْتِىَ بَعْضُ ءَايَـٰتِ رَبِّكَ ۗ يَوْمَ يَأْتِى بَعْضُ ءَايَـٰتِ رَبِّكَ لَا يَنفَعُ نَفْسًا إِيمَـٰنُهَا لَمْ تَكُنْ ءَامَنَتْ مِن قَبْلُ أَوْ كَسَبَتْ فِىٓ إِيمَـٰنِهَا خَيْرًا ۗ قُلِ ٱنتَظِرُوٓا۟ إِنَّا مُنتَظِرُونَ
Transliteration hal yanẓurūna illā an tatiyahumu l-malāikatu aw yatiya rabbuka aw yatiya baʿḍu āyāti rabbika yawma yatī baʿḍu āyāti rabbika lā yanfaʿu nafsan īmānuhā lam takun āmanat min qablu aw kasabat fī īmānihā khayran quli intaẓirū innā muntaẓirūna
Marathi १५८. ते फरिश्त्यांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत आहेत की आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या आगमनाची की तुमच्या पालनकर्त्याच्या एखाद्या निशाणीच्या आगमनाची? ज्या दिवशी तुमच्या पालनकर्त्यातर्फे निशाणी येईल, तेव्हा कोणत्याही माणसाला त्याचे ईमान कामी पडणार नाही, ज्याने यापूर्वी ईमान राखले नसेल किंवा आपल्या ईमानाने एखादे सत्कर्म केले नसेल. तुम्ही सांगा, तुम्ही प्रतिक्षा करा, आम्ही (देखील) प्रतिक्षा करीत आहोत.
Verse 159
إِنَّ ٱلَّذِينَ فَرَّقُوا۟ دِينَهُمْ وَكَانُوا۟ شِيَعًا لَّسْتَ مِنْهُمْ فِى شَىْءٍ ۚ إِنَّمَآ أَمْرُهُمْ إِلَى ٱللَّهِ ثُمَّ يُنَبِّئُهُم بِمَا كَانُوا۟ يَفْعَلُونَ
Transliteration inna alladhīna farraqū dīnahum wakānū shiyaʿan lasta min'hum fī shayin innamā amruhum ilā l-lahi thumma yunabbi-uhum bimā kānū yafʿalūna
Marathi १५९. निःसंशय, ज्यांनी आपल्या धर्माला वेगवेगळे करून घेतले आणि अनेक धार्मिक पंथ-संप्रदाय बनले, त्यांच्याशी तुमचे कसलेही नाते नाही, त्याचा फैसला अल्लाहजवळ आहे, मग तो त्यांना त्याबाबत सांगेल की ते कसकसे कर्म करीत राहिले.
Verse 160
مَن جَآءَ بِٱلْحَسَنَةِ فَلَهُۥ عَشْرُ أَمْثَالِهَا ۖ وَمَن جَآءَ بِٱلسَّيِّئَةِ فَلَا يُجْزَىٰٓ إِلَّا مِثْلَهَا وَهُمْ لَا يُظْلَمُونَ
Transliteration man jāa bil-ḥasanati falahu ʿashru amthālihā waman jāa bil-sayi-ati falā yuj'zā illā mith'lahā wahum lā yuẓ'lamūna
Marathi १६०. जो मनुष्य सत्कर्म करील तर त्याला त्याच्या दहा पट (मोबदला) मिळेल आणि जो दुष्कर्म करील तर त्याला त्याच्याइतकीच सजा मिळेल आणि त्या लोकांवर किंचितही अत्याचार होणार नाही.
Verse 161
قُلْ إِنَّنِى هَدَىٰنِى رَبِّىٓ إِلَىٰ صِرَٰطٍ مُّسْتَقِيمٍ دِينًا قِيَمًا مِّلَّةَ إِبْرَٰهِيمَ حَنِيفًا ۚ وَمَا كَانَ مِنَ ٱلْمُشْرِكِينَ
Transliteration qul innanī hadānī rabbī ilā ṣirāṭin mus'taqīmin dīnan qiyaman millata ib'rāhīma ḥanīfan wamā kāna mina l-mush'rikīna
Marathi १६१. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याने एक सरळ मार्ग दाखविला आहे की तो एक मजबूत व कायम राहणारा दीन (धर्म) आहे जो मार्ग आहे इब्राहीमचा जे अल्लाहकडे एकचित्त होते आणि ते अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हते.
Verse 162
قُلْ إِنَّ صَلَاتِى وَنُسُكِى وَمَحْيَاىَ وَمَمَاتِى لِلَّهِ رَبِّ ٱلْعَـٰلَمِينَ
Transliteration qul inna ṣalātī wanusukī wamaḥyāya wamamātī lillahi rabbi l-ʿālamīna
Marathi १६२. तुम्ही सांगा, निःसंशय माझी नमाज, माझी सर्व उपासना, माझे जीवन, आणि मृत्यु, समस्त विश्वाच्या अल्लाहकरिता आहे.
Verse 163
لَا شَرِيكَ لَهُۥ ۖ وَبِذَٰلِكَ أُمِرْتُ وَأَنَا۠ أَوَّلُ ٱلْمُسْلِمِينَ
Transliteration lā sharīka lahu wabidhālika umir'tu wa-anā awwalu l-mus'limīna
Marathi १६३. त्याचा (अल्लाहचा) कोणीही सहभागी नाही. मला याचाच आदेश दिला गेला आहे आणि मी सर्वांत प्रथम ईमान राखणारा आहे.
Verse 164
قُلْ أَغَيْرَ ٱللَّهِ أَبْغِى رَبًّا وَهُوَ رَبُّ كُلِّ شَىْءٍ ۚ وَلَا تَكْسِبُ كُلُّ نَفْسٍ إِلَّا عَلَيْهَا ۚ وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَىٰ ۚ ثُمَّ إِلَىٰ رَبِّكُم مَّرْجِعُكُمْ فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ فِيهِ تَخْتَلِفُونَ
Transliteration qul aghayra l-lahi abghī rabban wahuwa rabbu kulli shayin walā taksibu kullu nafsin illā ʿalayhā walā taziru wāziratun wiz'ra ukh'rā thumma ilā rabbikum marjiʿukum fayunabbi-ukum bimā kuntum fīhi takhtalifūna
Marathi १६४. तुम्ही सांगा, काय मी अल्लाहखेरीज दुसऱ्या पालनकर्त्याचा शोध घेऊ वास्तविक तोच प्रत्येक चीज वस्तूचा स्वामी (उपास्य) आहे आणि जो कोणी, जे काही कमवील, ते त्यालाच भोगावे लागेल आणि कोणीही कोणा दुसऱ्यांचे ओझे उचलणार नाही, मग तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याकडे दुसऱ्यांदा जायचे आहे. तो तुम्हाला तुमच्या मतभेदांविषयी सांगेल.
Verse 165
وَهُوَ ٱلَّذِى جَعَلَكُمْ خَلَـٰٓئِفَ ٱلْأَرْضِ وَرَفَعَ بَعْضَكُمْ فَوْقَ بَعْضٍ دَرَجَـٰتٍ لِّيَبْلُوَكُمْ فِى مَآ ءَاتَىٰكُمْ ۗ إِنَّ رَبَّكَ سَرِيعُ ٱلْعِقَابِ وَإِنَّهُۥ لَغَفُورٌ رَّحِيمٌۢ
Transliteration wahuwa alladhī jaʿalakum khalāifa l-arḍi warafaʿa baʿḍakum fawqa baʿḍin darajātin liyabluwakum fī mā ātākum inna rabbaka sarīʿu l-ʿiqābi wa-innahu laghafūrun raḥīmun
Marathi १६५. आणि त्यानेच तुम्हाला धरतीत खलीफा बनविले आणि एकमेकांवर दर्जे प्रदान केले, यासाठी की जे काही तुम्हाला प्रदान केले, त्यात तुमची कसोटी घ्यावी. निःसंशय, तुमचा पालनकर्ता लवकरच अज़ाब (शिक्षा-यातना) देणार आहे आणि निःसंशय तो मोठा माफ करणारा आहे, दया करणारा आहे.
Read Surah Al-An'am in another language
- English (word by word)
- Albanian
- Amazigh
- Amharic
- Assamese
- Azerbaijani
- Bambara
- Bangla
- Bosnian
- Bulgarian
- Chechen
- Chinese
- Czech
- Dari
- Dhivehi
- Dutch
- Finnish
- French
- German
- Gujarati
- Hausa
- Hebrew
- Hindi
- Indonesian
- Italian
- Japanese
- Kannada
- Kazakh
- Khmer
- Kinyarwanda
- Korean
- Kurdish
- Luganda
- Malay
- Malayalam
- Maranao
- Nepali
- Norwegian
- Oromo
- Pashto
- Persian
- Polish
- Portuguese
- Romanian
- Russian
- Sindhi
- Sinhala
- Somali
- Spanish
- Swahili
- Swedish
- Tagalog
- Tajik
- Tamil
- Tatar
- Telugu
- Thai
- Turkish
- Ukrainian
- Urdu
- Uyghur
- Uzbek
- Vietnamese
- Yao
- Yoruba
All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.
Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.